मित्रो!
मी गेले कित्येक वर्षे दुचाकी फारशी चालवली नाहीये, वीसेक वर्ष आधी लुना (ब्रह्मे फेम), राजदूत (300-400 किमी) नंतर बजाज प्लॅटिना (500 किमी), होंडा सीबीआर 250 (100 किमी), स्टारसिटी(100 किमी), ऍक्टिवा (100 किमी) अशी अनुभव गंगाजळी आहे,
होंडा युनिकोर्न घेणार होतो, फायनल झाले होते, त्याच दिवशी बाळराजे येण्याची चाहूल लागली आणि पूर्वीच ठरवल्यानुसार कि पत्नीस अशा अवस्थेत बाईकचे धक्के नको म्हणून प्लॅन बदलून लांसर घरी आणली, ;)
आताशा एक बाईक असावी अशी गरज भासत आहे, पण दुचाकीबद्दल विचारच टाकून दिल्याने बरीच वर्षे ह्या क्षेत्रातले फॉलोअप घेतलेले नाहीत, त्यामुळे माहिती न के बराबर! तसेच आता बाजारात इतके ऑप्शन्स आलेत कि गोंधळायला झाले आहे.
तस्मात बाईकविषयी चांगली माहिती असलेल्या मिपाकर मित्रांना सल्ला मागतो आहे, मदत करावी.
माझी उंची 5'6", वजन 94 kg (पाच वर्षांपासून अगदी मेंटेन आहे, एक ग्राम इकडे तिकडे नाही). ;)
माझी गरज: शहरात फिरायला, सामान वगैरे आणायला. खेड्यापाड्यातल्या कसल्याही रस्त्याला (माझ्या वजनासकट) सांभाळून घेणारी, लॉंग हायवे ड्राइव्ह ला आरामदायक
बजेट: बजेटचे नक्की नाही, परवडत नसल्यास थोडं थांबायची तयारी आहे, अगदीच दीडदोन लाखवालीही नकोय, नैयेत माझ्याकडे, ;)
मायलेजपेक्षा कम्फर्ट, पॉवर व स्टाईलला महत्त्व देतो. मेंटेनन्स मध्ये रडवणारी नको.
बजाज अवेंजर मनात बसलीये, थोडीशी चालवली होती,
बुलेटची इच्छा फार पण अभी टेम नै आया वैसा!
बाकी नवीन तत्सम गाड्यांची माहिती नाही तेव्हा त्या देखील ट्राय करण्यास हरकत नाही,
कृपया मार्गदर्शन करा...
(विंग्रजी शब्दांबद्दल माफी)
प्रतिक्रिया
25 Oct 2016 - 9:44 pm | मोदक
युनीकॉर्न घ्या.
माझी पॅशन + आहे, पण ती हिरो होंडा वाली आहे. हिरोने काही बदल केले असले तर माहिती नाही. पॅशन + पण चांगली आहे तुम्हाला उंचीला एकदम बरोबर होईल.
पण शक्य असेल तर युनीकॉर्नच घ्या.
25 Oct 2016 - 9:54 pm | संदीप डांगे
2010 चं मॉडेल मस्त होतं, नंतर डिझाईन बदललं बहुतेक त्यामुळे आजकाल रस्त्यावरून जातायेता उठून दिसत नाही, म्हणून विचार नव्हता केला, मला वाटलं बंद झाली की काय!
टेस्ट ड्राइव्ह घेतो
25 Oct 2016 - 10:19 pm | तुषार काळभोर
+१
मी ५ वर्षे झालं वापरतोय. झीरो मेंटेनन्स गाडी आहे.
१५०सीसी मुळे चांगली शक्ती, चांगले acceleration,आणि तरी पण ५०+चे उत्तम average!
माझे वजन ९२किलो, उंची ६'२". अतिशय आरामदायक आहे.
सातारा, कराड, वाई, महाबळेश्वर असे लॉंग ड्राईव्ह केलेत. स्मूथ!!
स्कुटरचा विचार करत असाल तर होंडाच घ्या डिओ, ऍक्टीवा किंवा aviator.
25 Oct 2016 - 10:58 pm | अभ्या..
हायला खरंच पैलवान आहात की.
बेस्ट बेस्ट. कीपीटप.
26 Oct 2016 - 11:08 am | असंका
+१...
अगदी हेच मनात आलेलं...
25 Oct 2016 - 10:31 pm | माम्लेदारचा पन्खा
तुम्ही युनिकॉर्न घ्या.....
मुख्य म्हणजे वजनाची काळजी घ्या !
25 Oct 2016 - 10:41 pm | अभ्या..
वजन ९४ किलो, प्लस तुम्ही सामान पण आणनार म्हणजे १०० व ११० सीसी सगळ्या बाद.
आता पुढे १२५ मध्ये शाईन बरीय, पण जुनी झाली आता. स्टाइल इल्ला
हिरो ग्लॅमर चांगलीय पण फायबर पार्ट खिळखिळे होतात कालांतराने.
१३५ मध्ये पल्सर १३५ चांगली पण स्पोर्टी लुक आहे. (सामान मॅटर इल्ला)
डैरेक्ट १५० मध्ये
युनिकॉर्न बेस्ट. टफ, स्मूद, मायलेज ठिक.
सीबीजी एक्स्ट्रीम. टफ, इंजिन बरेय, स्पोर्टी लुक. अॅव्हरेज नाही. (सामान मॅटर इल्ला)
बजाज व्ही. हा सगळ्यात बेस्ट ऑप्शन माझ्या मते. जुने १५० डीटीएसाय प्रुव्हन इंजिन आहे. तुमच्या अॅव्हेंजर इच्छेला जवळपास जाणारी आहे. मेटल बॉडी. अगदी फंकी नसला तरी नवीन लुक आहे. तुमच्या हाईट वजनाला सूट होणारी. खिशाला पण परवडेल. (ऑन रोड ७० जाते बहुधा) मायलेज ५० पर्यंत. दिडशे सीसीला तेवढेच मिळणार. थोड्या वर्षानी कंटाळा आला तर कॅफे रेसरमध्ये कन्वर्ट करुन तन्मय पण वापरेल. ;)
पल्सर १५०. ठिक पण फायबर पार्ट जास्त. अनावश्यक लांबी. (सामान मॅटर इल्ला)
यमाहा एक्स झेड आर.(?) नवीन कलर्स. मजबूत आहे. मायलेज ठिक. परवडेबल डील.
बाकी पुढे सगळी महाग सिरीज जी तुमच्या बुलेट रेटच्या जवळ जाते. तुम्हाला ती नकोय सो...इस्टॉप.
स्कूटरेट मध्ये १०० सी नकोच.
अॅक्टिव्हा १२५ बेस्ट. फरंट सस्पेन्शन टेलिस्कोपिक. पॉवर आहे. मायलेज ठिक.
टीव्हीएस वेगो आणि हिरो ड्युएट जरा बरी.
सुझुकी अॅक्सेस बेस्ट डील. १२५ सीसी आहे. मेटल बॉडी आणि मस्त कॉम्पॅक्ट लुक आहे. अॅव्हरेज पण उत्तम आहे.
3 Jan 2022 - 3:04 pm | बापू मामा
अहो, वजन ९४ + असेल तर सायकल का वापरत नाही? जास्त वजनाने व अनुवांशिक मधुमेहाने मी ही त्रस्त झालो होतो. मागील महिन्यात कामावर येता जाता १६ किमी सायकलने जाणे सुरु केले व २० दिवसात ५ कि वजन व मधुमेह पूर्ण नाहीसा झाला.
25 Oct 2016 - 10:50 pm | अभिजीत अवलिया
सुझुकी अॅक्सेस, होंडा ऍक्टिवा 3g, होंडा ऍक्टिवा i ह्यातली उत्तम कुठली ते पण सांगा. मला घ्यायची आहे.
26 Oct 2016 - 1:40 pm | टवाळ कार्टा
झैरात ;) - बायकांच्या बैका
25 Oct 2016 - 10:55 pm | एस
युनिकॉर्न चालवायला आणि मेंटेनन्स ला चांगली गाडी आहे. बजाज अव्हेंजरसुद्धा चांगला पर्याय आहे. स्कूटर श्रेणीत स्टाइल वेस्पाची आणि यामाहाची नवीन (नाव विसरलो) छान दिसतात. नाहीतर ऍक्टिव्हा आणि ऍक्सेस प्रुव्हन गाड्या आहेत.
26 Oct 2016 - 10:36 am | amit१२३
फसिनो म्हणायचे आहे काय तुम्हाला
25 Oct 2016 - 11:04 pm | स्वप्क००७
सामान ने आण करण्यासाठी tvs ज्युपिटर किंवा होंडा ऍक्टिवा चांगली पण लॉन्ग रूट साठी गियर वाली मोटारसायकल चांगली. अव्हेंजर cruising बाईक आहे लोंग डिस्टन्स साठी चांगली पण टर्निंग रेडियस मोठा आहे तिचा म्हणून ट्राफिक मधून गाडी पटकन काढता येत नाही. बाकी ktm बद्धल लोकांची मत जाणून घ्यायला आवडेल मला.
26 Oct 2016 - 1:41 pm | टवाळ कार्टा
KTM = Best Value For Money and offers much more than any of it's compititor
25 Oct 2016 - 11:21 pm | साहना
गरज पेक्षा प्लेजर साठी घेत असाल तर खालील गोष्टी जरूर पहा:
१. १५०cc किंवा जास्त. ओव्हरटेक करणे सोपे जाते. राईड quality फार चांगली असते.
२. डिस्क ब्रेक महत्वाचे. दोन्ही ब्रेक डिस्क असले तर आणखीन चांगले.
३. तुम्ही राहता तिथे जास्त पाऊस, धूळ किंवा समुद्र किनारा असेल तर एन्क्लोज्ड चेन असलेली बाईक घ्यावी.
४. मागे कोणी बसणार असेल/नसेल त्याप्रमाणे सुद्धा बाईक ची निवड ठरून आहे. पल्सर १५० चे सीट चांगले आहे. यामाहा Fz इत्यादी मध्ये मागचं व्यक्तीला खेटून बसण्याशिवाय पर्याय नाही.
५. मोटारसायकल सामानासाठी पूर्णतः निरुपयोगी आहे. आणि लॉन्ग ड्रियिवं साठी ऍक्टिव्ह सारखी स्कुटर निरुपयोगी/असुरक्षित आहे.
माझ्या कडे १ डियो होती. अतिशय छान स्कुटर. दूर कधी गेले नाही पण ३ वर्षांत कधीहि दगा नाही दिला. त्यानंतर सुमारे ३००० KM करून विकली. त्या आधी एका मित्राची पल्सर १५० होती त्यावरून अक्खा दक्षिण महाराष्ट्र - गोवा - उत्तर कर्नाटक पालथा घातला होता ५०,००० KM चालून अजून चालत आहे. पल्सर ५ वर्षे विना तक्रार चालली. एकदा पंक्चर सोडून काहीही तक्रार नाही. पण पाच वर्षां नंतर ३ हजाराचा इलेक्ट्रॉनिक सामानाचा खर्च आला. त्याशिवाय ८ हजरांचा आणखीन काही मोठा खर्च आला असे ऐकून आहे.
इतर मित्र मंडळींत यामाहा fz आणि युनिकॉर्न होती. युनिकॉर्न हि थोडी "मध्यम वर्गीय" बाईक वाटली. परफॉर्मन्स ओके असला तरी सामानाचा दर्जा फार खालचा होता. सदर मित्राला "अँपिअरन्स" चे थोडे वेड असल्याने जरा काही खरचटले तर त्याच्या जीवाला लागायचे. त्यांत त्याची फ्युएल टंक ला गंज लागला. एकूण मानसिक समाधान कमी होते.
यामाहा fz फार छान होती. चालवायला एक नंबर. युवा लोकांसाठी फार छान आहे. पण चेन ओपन होती आणि ३ वर्षांत एकदा फक्त त्रास दिला. मागे बसायला: शहरांत ओके पण दूर जायला त्रास. सुरक्षा आणि वेग च्या बाबतित पल्सर १५० च्या थोडी उजवी.
चालविण्याचा माझा अनुभव प्रचंड नसला तरी सर्व प्रकारच्या बाईक्स आणि गाडयां मी विविध परिस्थितीत हाताळल्या आहेत. एके काळी बुलेट वगैरे घेऊन लडाख ला जाण्याची मनीषा होती. जुन्या गॅंग मधील काही मित्र आता एकदम US style बाईक गॅंग चालवतात. कधी कधी बुलेट, हरली डेव्हिडसन वगैरे सुद्धा बऱ्यापैकी चालवली आहे.
बजाज अवेन्गर कि काय ते अजिबात घेऊ नका एकाहि बाईकर मित्रांकडून चांगले ऐकले नाही. BMW चे कातडे पांघरून असलेली अल्टो असे कुणी तरी वर्णन केलेले आठवते पण मी हात लावला नाही.
तुम्हाला परवडत असेल तर top tier मधील बाईक घ्यावी. कारण ह्या सेगमेंट मधील ग्राहक कमी कोस्ट सेन्सिटिव्ह असल्याने मालाचा एकूण दर्जा चांगला असतो. त्या शिवाय तुमचे वजन ९५ असल्याने (जे तुमच्या उंचीच्या मानाने सरासरी भारतीय पुरुषांच्या तुलनेत ३० किलो जास्त आहे) मिडल लेवल बाईक्स तुमच्या साठी अतिशय वाईट चालतील. मागे कुणी व्यक्ती असेल तर आणखीन वाईट.
26 Oct 2016 - 12:39 am | कपिलमुनी
१५० सीसी आहे आणि सामान भरपूर बसेल शिवाय डिस्क ब्रेक सुद्धा आहेत
26 Oct 2016 - 4:31 am | साहना
वाव हे प्रकरण कधी लाँच झाले ?
26 Oct 2016 - 7:39 am | वेल्लाभट
गेल्या दोन महिन्याभरात. कड्ड्ड्डक आहे ही. शिवाय गियरलेस. म्हणजे बासच.
26 Oct 2016 - 3:54 pm | John McClain
Aprilia sr150 आहे माझ्याकडे.
1 महिना झाला...
Run-in चालू आहे त्यामुळे पळवत नाहीये.
पण चांगली वाटतेय.फक्त खूप उंच आहे ☺...
कमी उंची असणाऱ्यांना तापदायक वाटू शकते.
अजून एक कमीपणा जो मला वाटतो तो म्हणजे पुढचे suspensions खूप stiff आहेत.
फायदे म्हणजे भरपूर power, मोठे टायर्स (उंची आणि width), डिस्क ब्रेक्स, सामानाची जागा, dynamics....
26 Oct 2016 - 12:41 am | कपिलमुनी
१ लाख
१५०+ सीसी
५-६" उंची
असे निकष पहाता आपाचे २०० किंवा १८० घ्या
26 Oct 2016 - 1:05 am | संदीप डांगे
ओहॊ, बरेच माहितीपूर्ण प्रतिसाद आलेत! धन्यवाद!
थोडंसं अपडेट: ऍक्टीवा किंवा ज्युपिटर वेगळी घ्यायची आहेच पत्नीसाठी-तिची चॉईस फायनल आहे
हा धागा बाईकसाठी आहे, स्कुट्रेटबद्दल नाही, अजून गोंधळ नको म्हणून खुलासा!
26 Oct 2016 - 1:18 am | वेल्लाभट
आताची युनिकॉर्न भंगार केलीय. त्यापेक्षा अॅवेंजर केंव्हाही सरस दिसते.
तुमच्या क्रायटेरियात बसणारी एका लाखाच्या आतली बाईक म्हणून
टीव्हीएस आपाचे १८० आरटीआर सुचवेन. परफॉर्म्न्स खतरा आहे असं ऐकून वाचून आहे. कुठलाही एक्सपर्ट रिव्ह्यू काढून वाचा. आरटीआर ची प्रशंसाच वाचाल.
माझी सजेशन्स
आरटीआर १८० किंवा २००
सुझुकी जिक्सर (हिचे पण रिव्ह्यू उत्तम आहेत)
नाहीतर सरळ अॅप्रिलिया एस आर १५० स्कूटर घ्या, आणि परफॉर्मन्स ची मजा शिवाय ऑटॉगियरची सोय अनुभवा.
मी तर ऑटोगियरचा फ्यान आहे. सो ईजी टू राइड. आपण काय लांबलांब हायवे ने बाईक नेणारे नव्हे त्यामुळे सिटीत ऑटॉगियर बेस्ट
26 Oct 2016 - 1:42 pm | टवाळ कार्टा
कार अथवा बाईकचा कोणताही रिव्ह्यू नेहमी चांगलाच असतो...कारण कोणीही वाईट लिहित नाही...काही अपवाद सोडले तर
26 Oct 2016 - 1:36 am | विखि
डान्गे साहेब, बाईक साठी ची तुम्ची आन माझी गरज सेम होती, मी बी ५-६" उंची चा, फकस्त ६७ मधी खेळतोय :)
१५० सीसी मधी लै शोध घेतला, जुनी युनिकॉर्न बन्द झाली तेव्हा लै नाराज झालो, मग कळाले नविन युनिकॉर्न येतिये मग तिच्या सठी थाम्बलो, पाहीली, काही राम नाय वाटला, मग कळाले युनिकॉर्न च्याच भावकी मध्ली हॉरनेट येतीये, तित पन काय दिसना, पलसर कुटुम्ब बघुन झाल, अपाचे, यामाहा, अव्हेंजर, शेवटी बुलेट वर गाडी येउन थाम्बली, पन आत्तच्या बुलेट मधी पहील्यागत मजा राहीली नाय ( माफी मागुन) ६ महिन्यात बुलेट ईन्जिन कामाला काढलेल्या पाहील्यात, या सगळ्यात एक वर्ष गेल.
मन्ग जुनी युनिकॉर्न येतीये अस कळाल, कारन तिला लैच मागणी वाढाय लागली होती. तसाच जाउन बूक केली. १ महीना वाट पाहील्यावर दारात आली बया युनिकॉर्न
८ महीने झाले आता, एक नम्बर चालीत, बयाला लदाख ला न्यायचीत आता :)
26 Oct 2016 - 2:56 am | अभिदेश
घ्या , फक्त सुचवणाऱयांवर ते कंपनीची जाहिरात करतायत हा आरोप करू नका.
26 Oct 2016 - 10:06 am | प्रसाद भागवत १९८७
मस्त आहे हि गाडी बघा दादा एकदा !
yamaha fz s version 2.0
27 Oct 2016 - 10:57 pm | सतिश गावडे
या गाडीचे डीझाईन इथून ढापलं आहे का?
26 Oct 2016 - 10:28 am | कैलासवासी सोन्याबापु
इलेकट्रा घ्या हो सरकी! सनान हाय गाडी!
26 Oct 2016 - 10:29 am | वामन देशमुख
अवेंजरच घ्या. मस्त दिसते.
26 Oct 2016 - 10:38 am | amit१२३
अव्हेंजर मस्त आहे . घेऊन टाका
26 Oct 2016 - 11:16 am | राहुल काटु
अतिशय रास्त दरात उत्तम क्वालिटी आणि आराम ....
26 Oct 2016 - 11:27 am | मराठी कथालेखक
125 cc चालणार असल्यास (आणि डिलरकडे मिळाल्यास :)
26 Oct 2016 - 11:58 am | सुबोध खरे
होंडा युनिकॉर्न मोटारसायकल हि दिसायला इतर गाड्यांइतकी आकर्षक नाही. परंतु अत्यंत मुलायम आणि खात्रीशीर इंजिन मोनो शॉक मुळे वळणावर गाडी रस्ता पकडून चालते. रुंद टायर, आरामदायक सवारी यामुळे हि गाडी अतिशय उत्तम चालते. माझी ९ वर्षे जुनी युनिकॉर्न सध्या माझा मुलगा चालवतो. त्याची मूळ बॅटरी ७ वर्षे चालली.( याचा अर्थ त्यांची विद्युत प्रणाली उच्च दर्जाची आहे). आज आहे त्या स्थितीत विना सर्व्हिसिंग लेह ला जाऊन येईल अशी खात्री आहे.
तुमच्या अर्थशास्त्रात बसत असेल तर होंडा सीबी हॉर्नचा १६० (कम्बाइन्ड ब्रेक सिस्टीम) ची घ्या (घरपोच किंमत साधारण ९०,०००) . करा यात पुढे आणि मागे डिस्क ब्रेक असून ते एकत्र लावले जातात यामुळे अचानक ब्रेक लावायला लागले तरीही गाडी घसरत नाही. हा माझ्या दृष्टीने सर्वात मोठा फायदा आहे. गेल्या तीस वर्षात रस्त्यावर रहदारी अफाट वाढली आहे त्यामुळे बेशिस्त वाहनचालक आणि कानाला हेडफोन लावून रस्त्यावर अस्ताव्यस्त चालणाऱ्या कॉलेजच्या पोरी यांच्या पासून संरक्षण या दृष्टीने बोट लावल्यावर जागीच उभी राहणारी मोटार सायकल हि आजमितीला जास्त महत्त्वाची असते असे मी मानतो.
होंडा गाड्या आपण सहज १५ वर्षे चालवू शकाल इतकी त्याची खात्री असते. (EXTREMELY RELIABLE)
वाट पाहण्याची तयारी असेल तर ती व्ही एस अपाचे २०० आर टी आर विथ ABS आणि पिरेली टायर हीअगदी पुढील २-३ महिन्यात बाजारात येईल अशी अटकळ आहे (साधारण घरपोच किंमत १.२५ लाख). ( ABS/ पिरेली विना गाडी आताच उपलब्ध आहे १. १ लाख)
बाकी "बुलेट वगैरे" आपण भक्त असाल तर ठीक आहे अन्यथा दार दोन महिन्यात काही तरी रुटू खुटू चालूच असते.
26 Oct 2016 - 12:16 pm | संदीप डांगे
युनिकोर्न बद्दल जास्त चांगली मतं येतायत, बजेटमध्ये बसेल तुम्ही सुचवलेल्या बाईक्स नक्की ट्राय करतो,
बुलेटभक्त नाही, अजून चालवलीच नाहीये (बापू, मोदक मारतील आता मला!) देखभालीची भीती! :(
26 Oct 2016 - 12:21 pm | भटकंती अनलिमिटेड
मी आधी युनिकॉर्न वापरायचो. दोन वर्ष वापरुन थंडरबर्डसाठी विकली. दोन्हीचे काही फायदे तोटे आहेतच. युनिकॉर्नचा स्मूथनेस आणि जब्रा हॅंडलिंग मिस करतो आहे. पण थंडरबर्डचा क्रुझिंग कंफर्ट आणि लो एंड टॉर्कमुळे रिग्रेट करत नाही.
26 Oct 2016 - 12:36 pm | संदीप डांगे
Renegade बद्दल काय मत आहे?
26 Oct 2016 - 12:40 pm | अभ्या..
ते सोन्याबापू सांगतय.
माझे मत इतकेच की प्रथमदर्शनी इंजिन ब्लॉक लहान दिसतो. गाडीचा लुक जातो. आहे पॉवरफुल पण दिसत नाही.
26 Oct 2016 - 12:49 pm | अनिरुद्ध.वैद्य
नाही वाटली शिवाय जरा जास्तच लो बेस आहे असे वाटते, पावसाळ्यात उगा चिखल माती उडायची. भारतात नुकतीच लाँच झालिये तर सध्या एखादं वर्ष थांबुन मग अंदाज बांधता येइल.
26 Oct 2016 - 12:48 pm | सुबोध खरे
बुलेट आजही बोट लावल्यावर आटोक्यात येईल अशी नाही. किंवा त्याचे डिस्क ब्रेक सुद्धा तितके पटकन लागत नाहीत. त्यामुळे शहरात किंवा गर्दीच्या रस्त्यावर चालवायला बुलेट आजही कटकटीचीच वाटते. शिवाय युनिकॉर्न सारखे एक वर्ष बिना सर्व्हिसिंगचे गेले असे शक्यच नाही.
बुलेटचे कौतुक असणाऱ्या लोकांचा आपला एक संप्रदाय आहे. तुम्ही त्यातले असाल तर ठीक आहे. अन्यथा स्पोक च तुटला, टाकीच गंजली, केबल तुटली अशा कटकटी फार असतात.
जाता जाता -- युनिकॉर्न वर धागा निघाला तर त्याचे १०० सुद्धा प्रतिसाद होणार नाहीत कारण त्या गाडीचे फायदे दोन तीन प्रतिसादात लिहून होतील. मग "असे झाले, तसे झाले" तर काय असे किती प्रतिसाद त्यात भरणार?
26 Oct 2016 - 12:56 pm | भटकंती अनलिमिटेड
अमान्य. माझ्या गाडीला दोन्ही डिस्कब्रेक आहेत आणि एमर्जन्सी ब्रेकिंग कंट्रोल आतापर्यंततरी झाला आहे (टचवूड). फिशटेलिंगचा थोडा इश्यू आहे पण तो मुख्यतः टायरचा दोष.
बुलेटप्रेमी असण्याचा प्रश्नच नाही. बजेट येईल आणि लॉंचिंग होईल तेव्हा नक्कीच ड्युक-३९०, बीएमडब्लु-३१० जीएस अशा गाड्यांचा विचार करेन. पण अद्यापतरी मला काही इश्य़ू आला नाही. पण हो बुलेटचे क्वालिटी इशूज आहेत हे मान्य. पण मी गाडी घेतली तेव्हा माझा मुख्य वापर "हायवेला तासनतास आरामदायी सीटवर क्रूझ करत राहणे" या पद्धतीचा होता (आणि आहे) आणि त्या पद्धतीला त्यावेळी मला थंडरबर्ड योग्य वाटली.
26 Oct 2016 - 1:44 pm | टवाळ कार्टा
बाब्बो..."बुलेट", "भक्त" आणि "मोदक" हे तीन शब्द एकत्र एकाच वाक्यात भरले कि विस्फोटक दारुगोळा तयार होतो =))
26 Oct 2016 - 2:05 pm | कैलासवासी सोन्याबापु
नाही रे भावा, उडता बाण होतो , जो तुला अगदी आवर्जून वाटेत उभारून नेमक्या जागी घ्यायची हौस उफाळून येते ! =))
(हलके घे रे बाबा कलियुग आहे लेड बॅक पोरांना ही सांगावं लागतंय च्यायला)
26 Oct 2016 - 12:46 pm | अनिरुद्ध.वैद्य
तर मस्त! नवी सिबिआर रेंज मधली काही खास नाही वाटली.
वर डॉक्टर साहेबांनी सांगितले आहेच तर अपाचे टीव्हीएस २०० विथ एबीएस मस्त असेल.
सध्याची ट्रॅफिक कंडीशन बघता, एबीएस / कंबाईंड ब्रेकींग असेल तर उत्तम.
26 Oct 2016 - 12:51 pm | संदीप डांगे
मलाही जुनीच माहिती आहे आणि आवडली होती,
सीबीआर आल्यापासून जीव उडाला होता युनिकोर्न वरून,
होंडा सीबीआर 250 सुद्धा इतकी खास वाटली नाही, लगेच हात दुखून येतात, स्टाईल मारायला दोन लाख जरा जास्तच!
26 Oct 2016 - 12:55 pm | अभ्या..
१५० सीबीआर आहे की. लाखात येते.
जवळपास तशीच यामाह आर १५ पण आहे. पल्सर एनएस आहे ऑईल कूल्ड.
26 Oct 2016 - 12:56 pm | संदीप डांगे
रायडिंग पोजिशन जरा त्रासदायक वाटते!!
26 Oct 2016 - 12:50 pm | सुबोध खरे
एक महत्त्वाचे --तुम्हाला आपण कसे "दिसतो" महत्त्वाचे वाटते कि कसे "आहोत" ते ठरवा.
"जमाने को दिखाना है" असेल तर युनिकॉर्न घेऊ नका.
26 Oct 2016 - 12:55 pm | संदीप डांगे
खरं आहे डॉक!
माझं इंक्लिनेशन थोडे क्रुजर बाईक कडे आहे,
बसण्याची आरामदायक पोजिशन हे अति महत्वाचे, मेंटेनन्स दुसरे, पावर तिसरे तर लुक चवथ्या प्रयोरिटी वर आहे.
26 Oct 2016 - 1:10 pm | एस
तसे असेल तर बजाज ऍव्हेंजर 220 क्रूज चांगली आहे.
26 Oct 2016 - 1:43 pm | कैलासवासी सोन्याबापु
चालेल! तसंही डांगेब्वा, बुलेट चालवायला कल्टचा भक्त असायलाच पाहिजे असे नाही/नसते, बुलेट न आवडताही खिशात पैसा असता ती विकत घेता येतेच हो :), बाकी सन्माननीय मंडळीस वाटते तशी बुलेट अगदी टाकाऊ नाही हा फर्स्ट हँड अनुभव आहे , अवेंजर सुद्धा उत्तम रेनेगेड बद्दल थोड्या वेळात सविस्तर लिहितो
26 Oct 2016 - 2:01 pm | ललित परब
बोलून चालून मी आहे यामाहा चा पंखा त्यामुळे मी तुम्हाला FZ सुचवेन ते हि FI वाली. सुझुकी ची GIXXER पण चांगली बाईक आहे 150 CC आणि बऱ्यापैकी पॉवरफुल आणि ह्या जापान च्या उत्पादकांच्या दुचाकी असल्या मुले विश्वासक आहेत हे मात्र नक्की.
26 Oct 2016 - 2:20 pm | गंम्बा
हे वाक्य डोक्यावरुन गेले. बाइक चे कॅन्सल झाले म्हणुन अल्टो, सँत्रो अश्या साध्या गाड्या सोडुन एकदम लँसर चा निर्णय कसा झाला ह्याची उत्सुकता आहे.
26 Oct 2016 - 3:04 pm | नितीन पाठक
मागच्या महिन्यात मी सप्टेंबर मध्ये "गणेश चतुर्थी" ला Yamaha FZ S FI Version 2.0 घेतली. मस्त गाडी. सगळे नवीन फीचर आहे. घ्यायला काहीच हरकत नाही.
26 Oct 2016 - 3:13 pm | बाळ सप्रे
विक्रांतच्या अवशेषातून बनवलेली बजाज व्ही चांगली वाटली..
26 Oct 2016 - 4:02 pm | John McClain
अण्णा,
Yamaha RX series घ्या...
अर्थात वापरलेली.
माझ्याकडे rx135 आहे, 14 वर्षांपूर्वी घेतलेली...
RD350 नंतर भारतातली सगळ्यात चांगली बाईक आहे हि ☺...
2स्ट्रोक engine, खूप हलकी, उंचीला कमी,
नॉन-nonsense design, प्रचंड पॉवर.....
आणि खूप काही लिहिता येऊ शकते...
ज्याने वापरली असेल तो/ती आठवणीनेच hi होऊ शकतो ☺
साधे design आणि इंजिने असल्यामुळे routine maintenance चा पण issue नाही.
नक्की विचार करा.
बंद होऊन सुद्धा स्परे पार्टस चा काही issue आलेला नाही
26 Oct 2016 - 4:07 pm | एस
अशा टू स्ट्रोक दुचाक्यांबद्दल एक गोष्ट फार तापदायक वाटते. ती म्हणजे मागे भकाभक धूर सोडत जातात.
26 Oct 2016 - 4:08 pm | John McClain
माझ्याकडे आहे 14 वर्षे पासून सांगायचं उद्देश होता कि गाडी मक्खन सारखी चालू आहे.
किरकोळ तक्रारी सोडून काहीच नाही...
Mileage विचार करा फक्त
26 Oct 2016 - 4:20 pm | कैलासवासी सोन्याबापु
आयहायहाय, दिलातली आठवणींची तार छेडली हो मॅक भाऊ!! आरडी, १३५ अन आरेक्स १०० चुम्मा गाड्या, काय भेंडी पिकप अन काय तो आवाज मज्जा नुसती!
26 Oct 2016 - 4:33 pm | संदीप डांगे
ह्या गाड्यांचा एकच प्राब्लेम! सेकंड मध्ये मिळणं महामुष्कील! लोक विकतच नाही, इकडे नाशिकमध्ये खास आरडी साठी गॅरेज आहेत, जुन्या गाड्या मूळ किमतीच्या दहा हजार रुपयाने जास्त किमतीच्या विकतात ;) हौसेला मोल नसतं!
इकडच्या आरडी म्हणजे चमचम चमकत असतात नव्यासारख्या, एसभाऊ म्हणाले तशा धूर सोडताना दिसली नाही कोणतीच...
आरडी आवडते पण धोनीसारखी श्रीमती आल्यावर लाईन लावू हो! ;) आता खिसा तंग आणि इच्छा अनंत अशी परिस्थिती आहे! =))
26 Oct 2016 - 4:47 pm | अभ्या..
त्या सगळ्या आरेक्स असतील संदीपराव. आरडी मिळणं महामुश्कील. आरेक्स एस्कॉर्टची होती. आरडी वरिजिनल यमाहाची ३५० सिरीज होती. ट्विन सायलेन्सरवाली. आरेक्सला जरा लट्ठ केली तर जशी फिगर दिसेल तशी.
नाशकात लै झाल्या तर चार पाच आरडी सापडतील. जुनी मिळणारच नाही बिल्कुल. मिळाली तरी २-३ लाखाच्या खाली नाही.
ही आरेक्स १००
आणि ही आरडी ३५०
दोन्ही गाड्यांच्या किमतीत आणि परफोर्मन्समध्ये जमीन अस्मानाचा फरक आहे. जुन्या आरेक्स १०० म्हनून विकल्या जाणार्या सुध्दा आरेक्स १०० नसतात. त्या आरेक्सजी किंवा १३५ ह्या यामाहाच्या न चाललेल्या मॉडेलला रिपेंट आणि ग्लीडिंग करुन १०० चे एम्ब्लेम लावून विकतात.
26 Oct 2016 - 4:55 pm | संदीप डांगे
बरोबर, माझा आरडी व आरेक्स मध्ये गोंधळ झाला, आरेक्स100 खूप दिसतात, आरडी दुर्मिळ आहे.
26 Oct 2016 - 6:09 pm | टवाळ कार्टा
दुसरी ऑटोगीअर स्कुटर घेणार असाल तर सामान आणायला ती वापरा...सामान* ठेवायला जास्त जागा मिळते...बाईकचा वापर नक्की कसा करणार ते आधी ठरावा...वैचारिक गोंधळ असेल तर "हि झैरात वाचा ;)"
* इथे श्लेष नाही ;)
यातून तुमचे बजेट जास्तीत जास्त १.३ लाखापर्यंत ताणता येईल असे मानू
इथे पहिली २ मते आणि तिसरे मत परस्पर विरोधी वाटतेय...अजूनही वैचारिक गोंधळ असेल तर "परत एकदा हि झैरात वाचा :D"
बुलेट ही कधीही / कुठेही / कसेही नखरे करणाऱ्या गफसारखी आहे...सतत तिची काळजी घेत राहावी लागते नाहीतर अनपेक्षित टँट्रम सहन करायची तयारी ठेवा :D...हे झेपणार असेल तर बघा...बाकी बुलेटसाठी १+ लाख मोजूनही क्वालीटी मिळत नाही...अगदी १-२ वर्षांतच गंज...इंजिन ऑइल लीक वगैरे तक्रारी सुरु होणे नवीन नाही...आणि ABS कमीत कमी काही दशके लांब असेल असे वाटतेय
हि सध्ध्या नवीनच आलीये...लुक्स / पॉवर चांगले आहेत पण क्वालीटी माहीत नाहीये...सर्व्हिस सेंटर जवळ आहे का बघा नाहीतर मेंटेनन्स / स्पेअर पार्ट साठी त्रास होऊ शकतो...१ वर्ष थांबू शकत असाल तर त्यानंतर रिव्ह्यु वगैरे पाहुन हीचा विचार करा...आणि हि तुमच्या बजेटच्या बाहेर असू शकते
५'६" उंची असेल तर बाईक घेण्याआधी टेस्ट ड्रॅइव्ह नक्की करून बघा...बाईकवर बसल्यावर दोन्ही पायांचे तळवे जमिनीला "पूर्णपणे" चिटकतात का ते बघा...ट्रॅफिकमध्ये चालवताना हे फार महत्वाचे असते
जर स्पीड रेसिंग करायचे नसेल आणि खूपच खड्डे असणाऱ्या रोडवरून रोजच जाणे येणे नसेल तर वजन ९४ kg असले तरी काही फरक पडत नाही...अगदी १०० cc ची बाईकसुद्धा चालून जाईल...बाईकवर डबलसीट बसल्यावरसुद्धा बाईक साधारणपणे ~१५० kg खेचतेच तस्मात बाईकच्या इंजिनाची काळजी नसावी
स्पीड रेसिंग करायचे असेल अथवा खूपच खड्डे असणाऱ्या रोडवरून रोजच जाणे येणे असेल तर कमीत कमी १५० cc बाईकचा विचार करावा ... आणि त्याचबरोबर वजन कमी करण्याचा सुद्धा :P
या आणखी झैराती बघा :)
१००-११० cc यात होंडाच्या लिवो बद्दल नाहीये पण
१२५ cc
१३५ cc
ऑटोगिअर स्कुटर
१ - बसण्याची आरामदायक पोजिशन हे अति महत्वाचे
२ - मेंटेनन्स
३ - पावर
४ - लुक
तुमच्या खालील निकषात बसणारी सगळ्यात चांगली बाईक सध्यातरी
बजेट कमी असेल आणि मायलेज हवे असेल तर
होंडा युनिकॉर्न १५० / १६० cc कॉम्बी ब्रेकसकट"च"
बजेट वाढवणे शक्य असेल आणि मायलेज थोडे कमी चालून जाणार असेल अथवा लुक्स हवे असतील तर
होंडा हॉर्नेट ड्युएल डिस्क ब्रेक आणि कॉम्बी ब्रेकसकट"च"
इथे ज्या बाकी बाईक सुचवल्या आहेत त्याबद्दल थोडेसे
बजाज अव्हेंजर १५० / २२० cc
हि मी १.५ वर्षे वापरली आहे...हायवेवर चालवण्यासाठी हि २ चाकांची मर्सिडीझ आहे आणि खड्डे असणाऱ्या रोडवर हिची बैलगाडी होते...टर्निंग रेडिअस मोठा आहे...कधी चुकून कचकून पुढचा डिस्क ब्रेक वापरला तर पटकन स्किड होते...मागच्या चाकाचा ब्रेक असून नसल्यासारखा आहे
बजाज V-१५०
हिचे इंजिन पल्सरचेच जुने DTSi इंजिन आहे...तुमच्या उंचीला मानवेल..."विक्रांत" नावाचा फील गुड फॅक्टर आहे...पण बजाजच्या बाईक्स १० वर्षे झाली की इंजिन smoothness जाणवण्याइतपत कमी होतो
बजाज पल्सर-१५०
शक्यतो पल्सर नका घेऊ, बजाज नवीन ट्रिपल स्पार्क असणारी १७ BHP वाली पल्सर १५० लवकरच आणणार आहे त्यामुळे सद्ध्याच्या पल्सरचे प्रॉडक्शन काही वर्षांनी बंद होईल
बुलेट
याबद्दल वर थोडे लिहिलेच आहे...आणि जितके लिहू तितके कमीच आहे ;)
होंडा युनिकॉर्न
अगदी गुणी बाळ बाईक...हिच्यात २०० cc पेक्षा कमी क्षमतेचे आजपर्यंतचे सर्वोत्तम इंजिन आहे...शो-शाईन नसेल करायची तर डोळे झाकून घ्या...१५० / १६० कोणतीही
होंडा CBR-१५०R
हि घेण्यापेक्षा थोडे जास्त पैसे घालून CBR-२५० R घ्यावी...या दोन्ही बाईक्सवर वाकून बसायला लागते...कदाचित लाँग राईडसाठी त्रास होउ शकतो
यामाहा FZ
फक्त आणि फक्त लुक्स...मायलेज बेक्कार गंडलेय (३५ च्या आसपास)
टीव्हीएस अपाचे १८०-२००
या बाईक्सवरसुद्धा वाकून बसावे लागते...आणि टर्निंग रेडिअस थोडा मोठा आहे...पण हि घेतलीत तर ABS असणारीच घ्या...१८० वाली थोडी छोटी वाटेल पण नवीन २०० मस्त आहे (हेडलाईट डिझाईन थोडे गण्डलेले वाटतेय)
सुझुकी GIXXER-१५०
हि पण मस्तय...स्मूथ इंजिन आहे आणि मायलेज / लुक्स सगळेच आहे...आता नवीन पुढे आणि मागे डिस्क ब्रेक असणारी सुद्धा आलीये...युनिकॉर्न नंतर हीच
27 Oct 2016 - 5:48 pm | असंका
=))
26 Oct 2016 - 6:46 pm | सुबोध खरे
ट का ला बाडीस
एक विशेष सूचना --- बाकी कोणतीही सेकंड हॅन्ड बाईक घेणार असाल तर १० वर्षापेक्षा जुनी( शक्यतो ५ वर्षेच) कधीही घेऊ नये.
वरची रंग रंगोटी आणि आपल्या जुन्या रम्य आठवणी बाजूला ठेवून थंड डोक्याने विचार करून गाडीची टाकी बाहेर काढून आतली चासीस किती गांजलेली आहे ते पहा म्हणजे मग लक्षात येईल.
प्रथम करा हा विचार पुरता आवरोनी ममता
जुन्या गाडीच्या वायरिंगचे इन्सुलेशन कडक झालेले असते आणि एकदा हलवले कि ते फाटते /निघते आणि गाडीच्या विद्युत प्रणालीची वाट लागते.
स्प्रॉकेट, चेन, गियरची चाके झिजलेली असतात. बहुसंख्य नट बोल्ट चे जाते झिजलेले/ गंजलेले असतात
26 Oct 2016 - 8:33 pm | टवाळ कार्टा
सेकंड हँड बाईक शक्यतो घेउच नये...घ्यायची असल्यास मूळ मालकाकडूनच घ्यावी...इतर गॅरेजवाले / सेकंड हँड बाईक डिलर ९९% वेळा बाईकमधले चांगले पार्ट काढून खराब पार्ट बसवतात आणि मग बाईक विकतात...माझे हात सेकंड हँड अॅव्हेंजर घेउन पोळलेले आहेत
26 Oct 2016 - 8:45 pm | सुबोध खरे
सेकंड हँड बाईक शक्यतो घेउच नये --बरोबर
आणि त्यातून हि गाडी जवळच्या मेकॅनिक च्या सांगण्यावर तर नक्कीच नाही. कारण गाडी जितकी खराब तितके त्याला मिळणारे पैसे अधिक.
अधिक सांगण्याची गरज नाही.
27 Oct 2016 - 8:00 am | संदीप डांगे
टाका,अपेक्षित अशा सविस्तर आणि माहितीपूर्ण प्रतिसादासाठी खूप खूप धन्यवाद!
27 Oct 2016 - 8:00 am | संदीप डांगे
टका,अपेक्षित अशा सविस्तर आणि माहितीपूर्ण प्रतिसादासाठी खूप खूप धन्यवाद!
27 Oct 2016 - 8:49 am | मंदार कात्रे
८ वर्षे यामाहा क्रक्स ,नन्तर १ वर्ष एलेमेल फ्रीडम ,१ वर्ष पॅशन प्रो वापरून सध्या युनिकॉर्न १६० वर स्थिरावलोय ...
घेवून ८ महिने झाले . जबरदस्त गाडी आहे
27 Oct 2016 - 2:28 pm | वत्स
होण्डा हॉर्नेट ड्युएल डिस्क ब्रेक एक चान्गला पर्याय आहे.
27 Oct 2016 - 9:23 pm | Hulk the devil
अव्हेंजर ==>> FLG ==> Feel Like God !!!!!!!!!!!!
मी अव्हेंजर वापरली आहे 3 वर्ष 23287KM कुठलाही धोका नाही दिला अव्हेंजरनि
प्रति लिटर 42 ते 45 ची सरासरी होती 3 वर्षात कुठलाही काम नाही काढलं.
ज्यांनी गाडी वापरली नाही त्यांनी कंमेंट करूच नये ना दिसण्या बदल ना गाडी वळण घेण्यासाठी लागणाऱ्या जागे बदल.. मी अव्हेंजर पुणे नासिक आणि मुंबई या शहरात ऑफिस टाईमिंग ला फिरवली आहे काही प्रॉब्लेम नाही येत... फक्त 3 दिवस गाडी च्या ride postiion सोबत जुळवून घेण्या साठी
आता बुलेट वापरतो आहे... ह्या बदल सांगतो थोड्या वेळात
रॉयल एनफिल्ड हिमालयन ही आहे माझी नवीन गाडी.....
29 Oct 2016 - 5:38 pm | संदीप डांगे
सो फायनली फायनल!!!
कमी चारा खाणारी, आखुडशिंगी, बहुदुधी,
एकशिंगी
सर्वच मार्गदर्शक मित्रांचे अनेक धन्यवाद! योग्य चर्चा झाली व चांगले सल्ले मिळाले, एव्हन्जर कडे असलेला कल बदलून गरजेपुरतं असावं ह्याकडे येत युनिकोर्न वर स्थिरावला!
आता जरा सिरीयस नोटवर येऊयात का? जसे सल्ले पटापट दिले तसे सगळ्यांनी दोन-दोन हजार रुपये अकौंटला ट्रान्सफर करा बघू, तुमच्या सहकार्याने होईन आमची गरिबांची बैक! म्होट्टा फ्लेक्स लावून आभार मानल्या जातील... ;) =))
परत एकदा धन्यवाद मित्रांनो, गाडी घेतल्यावर पेढे आधी तुम्हालाच मिळतील!!! :)
29 Oct 2016 - 7:06 pm | सुबोध खरे
२९ फेब्रुवारी २०१७ चा चेक पाठवलेला आहे.
29 Oct 2016 - 7:43 pm | संदीप डांगे
धन्यवाद डॉक, आपल्यासारखे दानशूर असतांना जगाला कर्णाची कमतरता जाणवू नयेच!!
29 Oct 2016 - 8:20 pm | टवाळ कार्टा
चेक बिक काय न्हाय, मी त्याच दिवशी सोत्ता भेटून क्याश देणारे
29 Oct 2016 - 8:19 pm | खटपट्या
हे बरं आहे. एकतर सल्ला द्या आणि वर पैसेही द्या. :)
नवीन गाडीवर बसलेला फोटो टाका इथं आधी...
29 Oct 2016 - 8:31 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
जोर्दार हाबिणंदण.
गरजेपुरतं ह्या शब्दाबद्दलं जोर्दार णीषेद. युणिकॉर्ण इझ दी बेष्ट पॅकेज. आता गाडी येईल तेव्हा प्रथमहाती अण्भव नक्की लिहा.
=====
अवांतर- दिलेल्या सल्ल्याची फीज झाली ५०००. तुम्हाला दोन द्यायचे. एक करा मलाचं तीन चा चेक पाठौन द्या. =))
30 Oct 2016 - 11:58 am | अनिरुद्ध.वैद्य
युनिकॉर्न म्हणजे मस्तच! येंजॉय यौर राईड!
जाता जाता, उगाचच सल्ला: उत्तम दर्जाचे हेल्मेट असु द्या नेहमी सोबत :)
29 Oct 2016 - 8:03 pm | झेन
चेक पाठवणार होतो पण फ्लेक्स वरच्या फोटो साठी सोन्याची जाड साखळी, टकाटक गॉगल्स नसल्याने क्षमस्व. आमचे गाव पुणे नाहीं
29 Oct 2016 - 8:15 pm | संदीप डांगे
अवो, द्याचं कि फटू धाडून, आमच्याकडं एकसे एक फटूशाप एक्स्पर्ट हायेत, टका ला म्हैतीये!! ;)
30 Oct 2016 - 11:26 am | प्रकाश घाटपांडे
माझे प्रश्न
१) अतुत्तम सस्पेन्शन असलेली स्कूटर कोणती? जी पुण्यातील खड्यातून देखील तुमच शरीर व्यवस्थित अखंड ठेवेल.
२) मोटरसायकलवरुन कुटुंबवत्सल होण्यासाठी स्कूटरवर शिफ्ट झालेले कोण कोण आहेत?
३) स्कुटर बॅलन्सिंग च्या दृष्टीने असुरक्षित वाटते का?
४) एम ८० गाडी आता मिळते का? त्याच डिझाईन मधे उत्तम सस्पेन्शन असलेली मोटोस्कूटर कुणी काढली आहे का?
31 Oct 2016 - 10:52 am | श्रीरंग_जोशी
युनिकॉर्नची निवड केल्याबद्दल अभिनंदन.
अगोदरच प्रतिसाद द्यायचा होता पण सवड मिळाली नाही.
अकरा वर्षांपूर्वी मी स्वकमाईतून पहिली गाडी घेतली ती होती होंडा युनिकॉर्न. ती गाडी अजुनही सुस्थितीत आहे. माझा धाकटा भाऊ ती वापरतो. अंदाजे सव्वा लाख किमी चालली असावी. अजुनही त्याला दुसरी गाडी घेण्याची गरज वाटत नाही.
मी ही गाडी घेतली तेव्हा भारतातल्या तरुणाईला पल्सरचे फार वेड होते. माझ्या मते भारतात बेशिस्त व आक्रमक दुचाकी गाड्या चालवण्याची संस्कृती रुजवण्यात बजाज पलसर या गाडीचा मोठा वाटा आहे. त्या काळी या गाडीचा हॉर्नही इतका कर्कश असायचा की रस्त्यावरचे इतर दुचाकीस्वार दचकून अपघाताची शक्यता निर्माण व्हायची.
या धाग्यावर बहुसंख्येने होंडा युनिकॉर्नला समर्थन मिळत आहे हे पाहून समाधान वाटले.
4 May 2017 - 11:36 am | वेल्लाभट
जावा येतेय
overdrive.in/news/2017-jawa-350-ohc-and-660-vintage-launched-in-czech-republic/
4 May 2017 - 1:15 pm | अभ्या..
लुक इतका इंप्रेसिव्ह नाहीये. बाकी ओएचसी इंजिन आहे ३३० चे ते ठिक आहे पण असा रोडस्टर ऑर कॅफे रेसर लुक घ्यायचा असेल तर ह्या दोन अडीच लाखापेक्षा एन्फिल्डची काँटीनेंटल जीटी बेस्ट ऑप्शन आहे. रेट्रो डीझाईनला एवढा डिमांड नाहीये भारतात जेवढा बुलेटने उचलला. बुलेट पाह्यलेली/घ्यावी/वापरावी असे वाटणारी पिढी अस्तंगत होण्याआधी नवीन बुलेट आली. मध्यंतरात काही बुलेटवेड्यानी आणि पोलीसआर्मीवाल्यानी ती क्रेझ जिंदा ठेवली. त्यामुळे नवीन बुलेट आरामसे मार्केट ओढली. नॉर्मल १५० सीसी चे पाउण एक लाखाचे बजेट थोडे स्ट्रेच करुन बुलेट मिळतीय तेंव्हा तो शौक जड जात नाही.
जावा/यझदी वापरलेली पिढी मात्र नाहीये अॅक्टिव्ह सध्या. त्यामुळे कुतुहल किंवा अपेक्षा नाहीच शिवाय दोन अडीच लाखाला ३३० सीसी अन चांगला लुक असलेली ६६० सीसी चार पाच लाखाला कोणी घेणार नाही. जावा यझदीचा प्लस पॉइंट होता टूस्ट्रोक पॉवर आणि सोबत असलेली सिंप्लीसिटी. आता तोच युएसपी नाहीये आणि त्या युएसपीचे कौतुक राहिलेले नाही.
4 May 2017 - 2:28 pm | वेल्लाभट
गेल्या रविवारी एक ग्यांग बघितली आमच्याइथे. येझदी आणि राजदूत वाले होते सगळे. ड्युअल एक्झॉस्ट. कल्ला!
4 May 2017 - 2:42 pm | अभ्या..
मी स्वतः वापरलेली आहे यझदी घरातील. २०१० पर्यंत होती काकाची.
पण बाईक बद्दल प्रेडिक्शन कधीच चुकलेले नाहीत. ही मॉडेल्स चालणार नाहीत. महिंन्द्रा आणतेय म्हनल्यावर तर बिल्कुल नाही.
जुन्या जावा, आरडी ३५० ची क्रेझ चालेल कदाचित पण ती पॉवर फोरस्ट्रोकला आणने शक्य नाही.
टूस्ट्रोक आता लीगली बंदच आहे.
23 Nov 2021 - 6:02 pm | तर्कवादी
नमस्कार मंडळी
येत्या काही महिन्यात WFH संपून रोज ऑफिसला जाणे सुरू होईल असे दिसते. तसेच काही महिन्यात माझी आताची बाईक Hero Honda CD Dawn वयाची १५ वर्षे पुर्ण करेल. बाईक अजूनही मस्त चालते. आता सहसा दूरचे प्रवास होत नाहीत पण तरी नुकताच एक 400+ किमीचा प्रवास केला. इतके वर्षात परफॉर्मन्सचा काही प्रॉब्लेम नाही. पण आता थोडे व्हायब्रेशन वाढले आहेत असे वाटते. सिल्वर रंगातली CD Dawn दुर्मिळ , दिसायचीही छान पण आता जुणेपणा जाणवू लागला. आणि तसेच ही बाईक ईलेक्ट्रीक स्टार्ट नाही.
त्यामुळे १५ वर्षे पुर्ण करताना पुन्हा पासिंग करण्याऐवजी नवीन बाईक घ्यावी असा विचार करतोय.
मग नवीन घेत आहेच तर थोडे अपग्रेड करावे असाही विचार आहे. शाईनचा विचार करत होतो. पण माझ्या मित्रांपैकी कुणाकडे शाईन नाही.. पण काही ऐकीव मतांनुसार शाईनला काही प्रॉब्लेम्स आहेत (नक्की काय ते मला अजून समजले नाही) , गाडीचा खप तर प्रचंड आहे.(दुवा)
१२५ सीसीमध्ये दुसरा पर्याय सुपर स्प्लेंडर
दोन्ही गाड्यांबद्दलची मते जाणून घ्यायला आवडेल. किंवा 10 PS च्या आसपास पॉवर असलेल्या आणखी कोणत्या बाईकचा विचार करता येईल ?
तरी मिपाकर मंडळींनी मार्गदर्शन करावे.
अधिक माहिती :
- माझी उंची कमी असल्याने सीटची उंची कमी असावी (८०० मिमी च्या आसपास असणे गरजेचे आहे )
- मुख्यतः शहरात (पिंपरी-चिंचवड) चालवणे असेल पण छोट्या मोठ्या सोलो-रोड ट्रिप्स शक्य आहेत (१-२ वर्षांतुन एक)
- राईड मुख्यतः सिंगल सीट पण काहीवेळा (फक्त शहरात) पत्नीसोबतही - त्यामुळे दोघांना नीट बसता येईल इतके लांब सीट असणे गरजेचे आहे.
- वर्षाकाठी ४-६ हजार चालवणे होईल (कमीच पण जास्त नाही)
- मायलेजबद्दल फार अपेक्षा नाहीत ४५ - ५० सुद्धा चालेल.
- इतकी वर्षे CD Dawn सवय असल्याने कमी वजनाची बाईक घेण्याकडेच कल आहे (बाईकचे वजन १२० किलोच्या आसपासच असावे फार जास्त नको )
- मेन्टेनन्स सुलभ व शक्यतो वर्षातुन एकदाच करावे लागावे ही अपेक्षा.
- बाकी आधुनिक स्टाईल वगैरे फारशी आवडत नाही. तिरपे, उतार असलेले सीट तर अजिबात नको. त्याउलट CD Dawn, CD 100 SS , स्प्लेंडर+ , TVS Radeonयांचे लुक्स मला अधिक आवडतात . पण रंग व ग्राफिक्स उठावदार असलेले आवडेल . शाईनचे लुक्स तसे नसले तरी तिचे रंग आकर्षक आहेत आणि मला हव्या त्या पॉवर व वजन गटात सर्वाधिक खपाची बाईक असल्याने माझा कल शाईनकडे अधिक आहे. तर CD Dawn च्या इतक्या वर्षातील प्रचंड reliability मुळे हीरोच्या सुपर स्प्लेंडरचाही विचार करतो आहे.
23 Nov 2021 - 8:15 pm | कपिलमुनी
इलेक्ट्रिक बाइकचा विचार करा
24 Nov 2021 - 11:15 am | सुबोध खरे
डोळे मिटून शाईन घ्या.
मी युनिकॉर्न सुचवली असती पण ती गाडी फार उंच आहे. शाईन डिस्क ब्रेक (आणि सेल्फ स्टार्टर) सहित घ्या. जास्त सुरक्षित आहे.
अन्यथा कोणतेही होंडाचे इंजिन असलेली गाडी घ्या. पेट्रोल इंजिनात होन्डाचा हात धरणारे कुणी नाही. बजाज किंवा टीव्ही एस ची इंजिने तेवढी मुलायम नाहीत.
माझी युनिकॉर्न केवळ १३ वर्षे झाली आणि (मुंबईत असल्यामुळे) बॉडी गंजली म्हणून मी विकली.
आता डॉमिनार ४०० आहे
पण युनिकॉर्नची सर नाही
8 Dec 2021 - 4:35 pm | तर्कवादी
मंडळी
मी धागा वर आणल्यापासून बरीच चर्चा सुरु आहे.
पण मला Shine व SP 125 (शक्यतो BS VI) बद्दल विस्ताराने जाणून घ्यायचे आहे. इथे कुणाकडे असल्यास कृपया सविस्तर रिव्ह्यू टाकावा ही विनंती
सध्या मी Shine व Radeon या दोन बाईक्सचा जास्त विचार करतोय पण अजून दोन्हींचीहि टेस्ट राईड घेतली नाहीये.
धन्यवाद.
7 Feb 2022 - 7:51 pm | तर्कवादी
मंडळी ,
माझ्या प्रश्नावरील प्रतिसादांबद्दल सर्वांचे धन्यवाद.
Shine व Radeon हे दोनच पर्याय होते तरी बरेच दिवस गोंधळ कायम राहिला. Radeon च्या देखण्या रुपाने भुरळ पाडली होती आणि बाईकची उंची कमी असल्याने हाताळायलाही अधिक सोपी असा विचार होता. दोन वेळेस टेस्ट राईडही घेतली.
पण शेवटी अधिक पॉवरच्या Shine कडे पारडे झुकले आणि काल Shine घेतली. बुकींगच्या वेळेसच पुर्ण पैसे भरले आणि अक्सिस मॅट ग्रे या २०२२ मध्ये उपलब्ध झालेल्या नवीन रंगातली शाईन आठवडाभराने म्हणजे काल आणली. २०२२ मध्ये साईड स्टँड इंडीकेटर , सेन्सर आणि कट ऑफ (म्हणजे साईड स्टँड खाली केलेले असेल आणि बाईक चालू करुन गिअरमध्ये टाकली तर ती बंद होते) हे नवीन पैलू दिले गेलेले आहेत.
8 Feb 2022 - 5:24 pm | चौथा कोनाडा
हार्दिक अभिनंदन, तर्कवादी !
8 Dec 2021 - 10:47 pm | lakhu risbud
होंडा शाईन घ्या.
दुसरी कोणतीच बाईक तिच्या दर्जाच्या जवळ जाणारी नाही.
8 Dec 2021 - 11:26 pm | तर्कवादी
कृपया अधिक विस्ताराने रिव्ह्यू लिहू शकाल काय ?
23 Nov 2021 - 8:50 pm | चौथा कोनाडा
नविन बाईक निर्णयाबद्दल अभिनंदन !
दुसर्या कुणाला विकणार असाल तर लवकर विका, बरी किंमत मिळू शकते. आरटीओ नियमानुसार ट्रान्सफर करून घ्यायला विसरू नका.
आणि स्क्रॅप करणार असाल तर .... नियमाप्रमाणे स्क्रॅप करणार का ? प्रोसिजर समजून घ्यायला आवडेल.
आणि ....
तुमच्या लाईफस्टाईलला आणि चार्जींगच्या सोयीला झेपत असेल तर वीजबाईक घ्या, भविष्य तेच आहे !
24 Nov 2021 - 11:25 am | तर्कवादी
बहूधा कुणाला तरी विकेन आणि ट्रान्सफर केली जातेय याची खात्री करेनच किंवा मग एक्स्चेंज ऑफर चांगली असल्यास तसे करेन. माझ्या मते सुस्थितीत असलेली बाईक स्क्रॅप करणे योग्य योणार नाही - अशी चांगली बाई़क (वा कोणतीही चांगली वापरात येवू शकणारी वस्तू) स्क्रॅप करणे म्हणजे पर्यावरणाची हानी.
इलेक्ट्रीक बाईकचा पर्याय नको आहे - कारणे अनेक
- इलेक्ट्रीक बाईक खरं तर उपल्ब्ध नाहीच.(निदान मला तरी माहित नाहीत) ज्या आहेत त्या स्कूटर आहेत. आणि मला स्कूटर नकोय, आवडत नाही. हे सर्वात महत्वाचे कारण
- पण समजा इलेक्ट्रीक बाईकचे एखादे मॉडेल असेल तरी किंमत , एका चार्जिंगमध्ये किती चालणार (रेंज) , चार्जिंगची सोय करावी लागणे (फ्लॅटमध्ये राहणार्यांना हे कठीण) , बाहेरगावी फिरायला गेल्यास तिथे चार्जिंगची सोय मिळणे, बॅटरीचे आयुष्य आणि बॅटरीची किंमत ई अनेक गोष्टी आहेत. सध्या तरी इलेक्ट्रीक वाहन हा तितकासा आकर्षक पर्याय वाटत नाही. रे
30 Nov 2021 - 11:15 pm | रश्मिन
माझ्या बजाज पल्सर ला जून २०२० मध्ये १५ वर्षे झाली, त्यात २०१९-२० मी भारतात नव्हतो आणि मग आता परत आल्यावर कोव्हीड मुळे रि-पासिंग राहून गेले आणि आता करायला जावे तर ग्रीन टॅक्स भरून, मूळ गावी (जिथे RTO नोंदणी झाली आहे तिथे ) जाऊनच करावे लागेल अशी ३-४ जणांकडून माहिती मिळाली. हे नक्की तसेच आहे काय ? असल्यास, तेवढा उपद्वव्याप आता करावा लागणार आहे. काही तरी सोपीकरण झाले पाहिजे राव :-)
30 Nov 2021 - 11:19 pm | तर्कवादी
मला वाटते तुम्ही त्याच राज्यात असाल आणि सध्याच्या पत्त्याचे पुरावे असतील तर तुम्हाला सध्या राहता तिथल्या RTO मध्ये रि-पासिंग करता यायला हवे. तुम्ही स्वतः याबद्दलचे नियम वाचून पडताळून बघा हे बरे. लोक अनेकदा अचूक माहिती देतातच असे नाही.
1 Dec 2021 - 11:25 am | आग्या१९९०
काही तरी सोपीकरण झाले पाहिजे राव :-)
ज्या शहरातील आरटीओत गाडीचे रजिस्ट्रेशन झाले तेथेच जाऊन ग्रीन टॅक्स भरावा लागतो, ह्यासाठी गाडी तेथे घेऊन जावे लागते (गाडी तपासात नाहीत). मी गाडी न नेता फक्त चासी आणि इंजिनच्या नंबरवर कागद ठेऊन पेन्सिलने खरडून रितसर पैसे भरून काम करून घेतले. नवीन गाडी घेण्यापेक्षा स्वस्तात पडते.
8 Feb 2022 - 4:13 pm | शाम भागवत
मला वाटते, या अधिवेशनात याबद्दल नवीन मसुदा आलाय. संपूर्ण भारतात कुढेही नोंदणी झालेली असली तरी आता कुढूनही याबाबतची कामे होणार आहेत. बेंगलोरला घेतलेल्या गाडीची कामे पुण्यातूनही करता येणार.
हे कुठे वाचले ते आठवत नाही. अन्यथा लिंक नक्की दिली असती.
8 Feb 2022 - 4:18 pm | शाम भागवत
हां.
इथे वाचलं होतं.
हे सगळं नव्याने होणाऱ्या नोंदणीच्या संदर्भात दिसतंय.
24 Nov 2021 - 1:15 pm | तुषार काळभोर
कोणती बाईक घ्यावी - २०२१
असा नवा धागा काढावा ही विनंती. पाच वर्षात पुलाखालून बरंच पाणी गेलंय. जवळजवळ सगळ्या मोटारसायकली अन स्कुटरांची नवी व्हर्जन आल्याने "ही नको, ती चांगली " यात फरक पडला असणार.
अवांतर : माझी युनिकॉर्न १०+ वय, आणि ७५०००+ किमी होऊनही अजून झक्कास आहे.
वर्षाला पाच हजार किमी चालवणे = इलेक्ट्रिक गाडी घेणे व्यवहारिक नाही.
तुमच्या ज्या गरजा/क्रायटेरिया आहेत, ते बरेच सुस्पष्ट आहेत.
स्प्लेंडरचं सध्याचं चालू वर्जन आणि शाइन हे दोन्ही पर्याय तुम्हाला सर्वात सुटेबल वाटत आहेत.
24 Nov 2021 - 1:28 pm | तर्कवादी
जुन्या धाग्यावर जुनी माहिती राहिलंच पण नवीन माहितीही पोस्ट करता येईलच ना असा विचार करुन मी जुन्या धाग्यालाच पुनरुज्जीवीत केले.
म्हणजे सुपर स्प्लेंडर म्हणायचंय की स्प्लेंडर+?
24 Nov 2021 - 5:08 pm | तुषार काळभोर
१२५ असल्याने स्प्लेंडर+
ते पण ठीकच म्हणा. पण ९५प्रतिसाद झाल्याने लवकरच नवे प्रतिसाद दुसर्या पानावर जातील. वर जे दिसतील ते २०१६चे. अजून काही वर्षांनी कोणी धागा उघडला तर जुनेच प्रतिसाद दिसतील.
24 Nov 2021 - 1:42 pm | कपिलमुनी
कम्युटर प्रकारात सध्या ही बाईक सर्वोत्तम आहे.
सर्वात लांब कंफर्टेबल सीट आहे. उत्तम पिकअप आहे. रात्रीसाठी लाईट उत्तम आहे.
24 Nov 2021 - 2:07 pm | तर्कवादी
होय.. या बाईकचे लुक्स मला खूप आवडलेत. पण रिव्ह्यूज कसे आहेत माहीत नाही. शिवाय पॉवर थोडी कमी आहे (8.19 PS)
मी टेस्ट राईड तरी नक्की घेईन.
24 Nov 2021 - 9:11 pm | कपिलमुनी
अत्रुप्त आत्मा यांच्याकडे ही गाडी आहे , माझ्या अंदाजे वर्षभर तरी वापरत असावेत. त्यांच्याशी स<पर्क करून विचारू शकता
30 Nov 2021 - 10:53 pm | अत्रुप्त आत्मा
सध्या स्थितीत तीन वर्ष झालेली आहेत. ही गाडी मजबूत आणि आरामदायक आहे. शंभर ते 110 च्या स्पीडने पळू शकते. नऊ वेळा अवरेज चेक केलेल आहे. माझं चालवण रफटफ आहे. मला कायम 58 ते 63 च्या दरम्यान एवरेज मिळाले आहे. लाईट उत्तम आहे. सस्पेन्शन चांगली आहेत. परंतु मला या गाडी चा खरा परफॉर्मन्स कंपनीची फ्री-सर्वीस संपल्यावर मी एका खाजगी गॅरेजमध्ये तीचे रेग्युलर सर्विसिंग केल्यानंतर आला. चालवायला अतिशय कॉन्फिडन्ट आहे. जुनी cd हंड्रेड एस एस (जुन्या 4-stroke आवाज वाल्या सायलेन्सर ची) ज्यांनी चालवलेली आहे, त्यांनाच या गाडीची मजा झटकन कळू शकते. पळायला अजिबात त्रास देत नाही. त्या मनाने या सेगमेंटच्या इतर गाड्या पळताना काही वेळा दम टाकतात, तस हीचं होत नाही . कमी पावर असली तरी टीव्हीएस चा घोडा आहेच हिच्या मध्ये,तो दणदण पळतोच.
30 Nov 2021 - 11:11 pm | तर्कवादी
आपल्या प्रतिसादामुळे माझे या बाईककडे कल वाढला आहे.
आपण डिस्क ब्रेक घेतली आहे की ड्रम ब्रेक ?
नवीन BS VI मॉडेलमध्येही तोच परफॉर्मन्स मिळेल अशी आशा आहे.
30 Nov 2021 - 11:40 pm | श्रीरंग_जोशी
>> माझं चालवण रफटफ आहे
यावरुन तुमचा अॅक्टिव्हा चालवतानाचा किस्सा आठवला =)).
6 Dec 2021 - 7:35 pm | अत्रुप्त आत्मा
दु दु रंगांण्णा !!!
24 Nov 2021 - 1:48 pm | कपिलमुनी
बजाज ने २५० सीसी च्या दोन पल्सर लॉन्च केल्या आहेत.
7 Dec 2021 - 9:39 am | कंजूस
बाईक?
7 Dec 2021 - 9:43 am | कपिलमुनी
इलेक्ट्रिक बाईक ना अजिबात आवाज नसतो
7 Dec 2021 - 2:39 pm | प्रसाद_१९८२
>>इलेक्ट्रिक बाईक ना अजिबात आवाज नसतो<<
--
भ्रम आहे हा.
7 Dec 2021 - 11:51 am | कंजूस
पुरी येथे आहेत. फार छान वाटते. आवाज नाही.
पण विठ्ठला मंदिर, हंपी येथल्या मोठ्या गाड्या जरा उंउंउं ( गुरुजींचा ऊं ऊं वेगळा) असा आवाज करतात.
7 Dec 2021 - 1:08 pm | कंजूस
https://youtube.com/c/GeekyRanjitRidesVlogs
7 Dec 2021 - 3:19 pm | जेम्स वांड
डॉमिनार
🤣 🤣
7 Dec 2021 - 7:48 pm | सुबोध खरे
डॉमिनार
बद्दल काय ?
7 Dec 2021 - 7:52 pm | जेम्स वांड
घ्या म्हणलं आपली, इलेक्ट्रिक वगैरे चर्चेत एकदम सणसणीत गाडी सुचवली झालं.
8 Dec 2021 - 11:42 am | सुबोध खरे
माझ्या कडे आहे गेली ४ वर्षे.
महा शक्ती आणि सुरक्षा. ड्युएल चॅनेल ए बी एस आहे. स्लिपर क्लच असल्यामुळे वेगात चुकून खालचा गिअर पडला तरी काहीही होत नाही.
टयूबलेस जाड एम आर एफचे टायर आहेत.
पावसाळ्यात ब्रेक दाबला तर गाडी अजिबात न घसरता जागेवरच उभी राहते.
वेग प्रचंड येतो. माझि १२० च्या वर जायची हिम्मत झालेली नाही. या वेगाला सुद्धा गाडी रस्ता पकडून असते. पण एवढा वेग आपल्या शरीराला झेपणारा नाही. या वेगाला सुद्धा गाडीला अजून भरपूर शक्ती बाकी असते.
हेडलॅम्प मोटारसायकल मध्ये सर्वात उत्तम आणि स्वच्छ पांढरा प्रकाश सर्वदूर पर्यंत जाणारा आहे.
दोनच कमतरता
१) ऍव्हरेज २५-२७ च मिळते ( अर्थात माझे चालवणे शहरातच आहे)
२) इंजिन आवाज करते. ( लोकांना ठणाणा करण्यात धन्यता माननार्यांच्या यादीत मी नाही)
या अगोदर युनिकॉर्न होती. तिच्या इतके मुलायम इंजिन असलेली गाडी दुसरी नाही. केवळ १२ वर्षे झाली आणि बॉडी मुंबईच्या पावसात आणि दमट हवेत गंजली म्हणून विकली.
पण आजही पहिले प्राधान्य युनिकॉर्नलाच.
8 Dec 2021 - 12:08 pm | जेम्स वांड
बरंय प्रकरण, पण एव्हरेज वर हाय कंबखत झालं म्हणायला, आवाजाशी सहमत, आजकाल केटीएमवाल्या निब्बा निब्बी गॅंग्जनं जीव नकोसा केलाय रस्त्यानं पादरा पीर पीर आवाज करत गाड्या हाणत. त्यामानाने नवीन रॉयल एनफिल्ड रिफाईंड वाटल्या. थंडरबर्ड एक्स सिरीज नंतर त्यांनी जवळपास कात टाकली आहे म्हणायला हरकत नाही.
20 Mar 2022 - 11:38 pm | चेतन सुभाष गुगळे
मुंबईत पूर्व दृतगती मार्ग, पश्चिम दृतगती मार्ग, पूर्व मूक्त मार्ग, वांद्रे वरळी सागरी सेतू आणि अशा अनेक मार्गांवर फक्त चारचाकी वाहनांनाच परवानगी आहे. त्यामुळे बरेचदा असे होते की जिथे कारने १५ ते २० मिनीटांत जाता येईल तिथे पोचायला या अतिवेगवान दुचाकींना दीड तासांहूनही अधिक कालावधी लागतो.
अशा परिस्थितीत मुंबईत अनेकांनी डॉमिनॉर ४०० या साठ ते सत्तर हजारांत आणि रेनेगेडे कमांडो तीस ते चाळीस हजारांत पुनर्विक्री करिता उपलब्ध आहेत. अशीच एखादी डॉमिनॉर ४०० किवा रेनेगेडे कमांडो विकत घ्यायचा विचार चालू आहे.
21 Mar 2022 - 3:35 am | कपिलमुनी
रेनेगेडे कमांडो हा शुद्ध कचरा आहे.
21 Mar 2022 - 12:06 pm | चेतन सुभाष गुगळे
की इतर काही कारणांनी? जरा तपशिलात नमूद करू शकाल काय?
29 Mar 2022 - 1:36 pm | सुरिया
ह्या गाड्यांची मूळ किंमत आणि ही किमत बघूनच ठरवा की. कशाला तपशील लागतेत?
तुमचा ओव्हरॉल सिंहिणीपासून आजचा अॅटिट्युड बघता ही बाईक सर्वात उत्तम आहे.
1 Apr 2022 - 2:51 pm | चेतन सुभाष गुगळे
अकरा महिन्यांच्या आयडीने माझा अॅटिट्यूड ठरवायची आणि माझ्याकरिता वाहन सुचवायची गरज नाही. मी १३ वर्षांहून अधिक काळ बुलेट ३५० तीही फक्त किकस्टार्ट (जुनी उजव्या पायात गिअर लिव्हर असणारी) चालविली आहे.
21 Mar 2022 - 8:22 pm | चौथा कोनाडा
रोचक चर्चा
29 Mar 2022 - 11:49 am | चेतन सुभाष गुगळे
रेनेगेडे कमांडो ३०० आणि डॉमिनॉर ४०० या दोन्ही चालवून पाहिल्यात. रेनेगेडे जास्त व्हीलबेस मुळे यूटर्न घ्यायला अवघड आहे हे सोडलं तर जास्त त्रासदायक वाटली नाही. डॉमिनॉर मात्र फारच जड आणि जास्त शक्तिशाली वाटली पण नियंत्रणात ठेवण्यास अवघड वाटल्याने तिच्या इंजिनाच्या २५ टक्के ताकद देखील मला वापरता येणार नाही असे जाणवले. माझ्या आग्रहाखातर माझ्या सोबत टेस्ट ड्राईव्ह घेणारे माझे पोलिस दलातील मित्र जे माझ्याहून सहा वर्षे तरूण आणि रोज २ तास व्यायाम करुन फिट आहेत त्यांनी डॉमिनॉर केवळ काही सेकंदात ९५ किमी वेगाने चालविली पण मी मात्र १० मिनीटांनंतरही ताशी ७० किमी पेक्षा अधिक वेग गाठू शकलो नाही. I don't think it's my cup of a tea or say mug of bear.
29 Mar 2022 - 12:12 pm | सुबोध खरे
पूर्व दृतगती मार्ग, पश्चिम दृतगती मार्ग येथे दुचाकीसाठी परवानगी आहे
29 Mar 2022 - 12:41 pm | सुबोध खरे
फिटनेस आणि डॉमिनर चालवणे याचा काहीही संबंध नाही.
फुंकर मारली तरी उडून जातील असे टिनपाट तरुण सुद्धा बुलेट चालवताना दिसतात.
बाकी डॉमिनार केवळ स्वस्त मिळते म्हणून मुळीच घेऊ नका. एकतर त्याचे ऍव्हरेज २५ च्या आसपास आहे.
दुसरे म्हणजे शहरात चालवण्यास ती कठीण आहे.(रेनेगेड इतकी वाईट नसली तरी). वजन भरपूर आहे आणि सहज वळत नाही.
त्या ऐवजी होंडा युनिकॉर्न घ्या. सर्व बाबतीत उत्तम पडेल.
माझ्याकडे होंडा युनिकॉर्न होती आणि सध्या डॉमिनार आहे.
डॉमिनार सहज १५० ताशी किमी पर्यंत जाते. मी आतापर्यंत १२० पर्यंत नेली आहे त्यापुढे नेण्याचे धैर्य झाले नाही. परंतु १२० वेगाला सुद्धा गाडी अगदी स्थिर आणि सुरक्षित वाटते
1 Apr 2022 - 3:07 pm | चेतन सुभाष गुगळे
मला रेनेगेडे तुलनेने जास्त सुलभ वाटली (यूटर्न वगळता). सहज वळत नाही हा माझाही अनुभव पण मला वाटले की फक्त मलाच जमत नाही की काय? इतके लोक चालवतात ते कसे काय?
अॅव्हरेजची चिंता नाहीये. कारण वर्षांतून तीन किंवा चार लांब अंतराचे प्रवास करायचे आहेत. त्यावेळी चारशे ते पाचशे किमी एका दिवसात ही व कमी वेळ खर्चून इतकीच अपेक्षा आहे. बाकी वाहनाचा रोज वापर करायची गरज नाही. त्यामुळेच सुरुवातीला च खरेदी किंमत जास्त देऊन अधिक रक्कम गुंतविण्याची इच्छा नाही.
हीच अपेक्षा आहे बुलेट १२० ला फाटल्यासारखा आवाज काढायची. तेल गळती आणि इतरही समस्या अनुभवास आल्याने १२० क्रूझिंग करता आले नाही. ते जर डॉमिनॉर पूर्ण करीत असेल तर आळेफाटा - अहमदनगर सारख्या काही सुनसान रस्त्यांवर ही हौस वर्षातून चार पाचदा भागवायची इतकीच इच्छा आहे.
1 Apr 2022 - 3:16 pm | चेतन सुभाष गुगळे
ही माहिती मला मुंबईतील एका रेनेगेडे मालकानेच दिली. या कारणानेच तो ती फक्त शिर्डीला जायला वापरतो असे त्याने सांगितले.
1 Apr 2022 - 8:16 pm | सुबोध खरे
रेनेगेड या गाडीचे उत्पादन बंद झाले आहे आणि त्याचे सुटे भाग सहजासहजी मिळत नाहीत. एकंदर या गाडीची स्थिती डामाडौलच आहे.
हे वाचून घ्या https://www.financialexpress.com/auto/bike-news/um-motorcycles-shutting-...
5 Apr 2022 - 5:22 pm | चेतन सुभाष गुगळे
लिंकमध्ये दिलेला लेख वाचून तूर्तास रेनेगेडे विकत घेण्याचा विचार रद्द करीत आहे. बरीच शोधाशोध केल्यावर येझदी रोडस्टर हा एक चांगला पर्याय वाटला पण सेकंड हँडमध्ये मिळत नाही आणि नवीन वाहनाकरिता रु.२लाख चाळीस हजार इतके खर्च करावे लागत आहेत. वार्षिक पाच ते सहा हजार किमी वापराकरिता इतकी रक्कम खर्च करण्यापेक्षा मग मुंबई पासिंग जुनी डॉमिनॉरच विकत घ्यावी का असा विचार करत आहे.
7 Apr 2022 - 1:00 pm | चौथा कोनाडा
हरकत नाही.
शक्यतो ओळखीतून मिळते का ते पहा म्हणजे उत्तम.
सर्व्हिस चेकअप आणि काही दुरुस्त्या आधी करून घ्याव्या लागतीलच !
7 Dec 2021 - 8:19 pm | प्रचेतस
एनफिल्ड घ्या, सुख असतं सुख चालवणं म्हणजे.
8 Dec 2021 - 12:11 pm | जेम्स वांड
वरती म्हणल्याप्रमाणे थंडरबर्ड एक्स फॅमिलीनंतर रॉयल एनफिल्डनं वजन, रंग, सेफ्टी, राईट क्वालिटी इत्यादी सगळ्या परिमाणात कात टाकली आहे निव्वळ, कॉंटिनेंटल जीटी अन हिमालयनचा आपला एक क्लास आहे राव.
हिमालयन परवडत नसेल पण फील हवा असेल तर हिरो मोटरकॉर्पची एक्स-पल्स भारी आहे एकदम. आता तर ती २२० सीसी (स्टँडर्ड करीजमा सेटप) मध्ये आणल्यापासून उत्तम वाटू लागली आहे ती पण.
8 Dec 2021 - 1:39 pm | कपिलमुनी
२२० सीसी ? माझ्या माहितीनुसार २०० सी सी आहे ,सध्या ४ व्होल्व चे इण्जिन आणले आहे, गीयर रेशो शोर्ट केला आहे.
नवीन अपडेट मस्त आहे
8 Dec 2021 - 1:54 pm | जेम्स वांड
बेसिक डिस्प्लेसमेंट २२३ सीसी असावी करीजमा प्रमाणे, पण मी कन्फर्म नाही, नवीन asthetic डिझाईन लैच सुबक अन सुंदर आहे
9 Dec 2021 - 10:03 am | सुबोध खरे
नाही
याचे इंजिन १९९ सी सी ऑइल कूल्ड आहे करिझ्माचे २२३ सी सी चे एअर कूल्ड होंडा चे इंजिन होते.
8 Dec 2021 - 2:43 pm | प्रचेतस
हिमालयनला सुरुवातीला बर्याच तक्रारी होत्या, कमी दर्जाचे पार्ट्स, ऑइल लिकेज, पेट्रोल लिकेज, पेण्ट निघणे, नंतर हळूहळू त्यांनी त्या कमी केल्या. हिमालयन मात्र खूपच उंच असल्याने रायडरची उंची किमान पावणेसहा फूट हवी.
बाकी ही आमची सध्याची
8 Dec 2021 - 2:54 pm | जेम्स वांड
काय अस्सल चीज आहे राव ! आवडलीच
8 Dec 2021 - 7:06 pm | सौंदाळा
हिमालयन बघून खूप आवडत होती पण लडाख वारीत वरीला पास वर नवीन कोर्या हिमालयनने हिमालयातच चांगलाच दणका दिला. क्लासिक ३५० आणि ५०० जिथे आरामात चढत होत्या तिथे हिमालयनने मान टाकली तेव्हापासून ही बाईक डोक्यात गेली आहे.
8 Dec 2021 - 5:26 pm | नि३सोलपुरकर
एनफिल्ड घ्या ..१०० % सहमत .
8 Dec 2021 - 5:34 pm | जेम्स वांड
जुनी ३५० आहे, २०१२ मॉडेल, अजून एकदाही धोका दिलेला नाही गाडीनं, जबरी चालते हायवेला.
पण ताकद असेल तरच एनफिल्ड घ्यावी, तो प्रेमाचा मामला असतो, म्हणतात ना शेर पाला हैं तब खर्च तो होगा ही.
8 Dec 2021 - 6:57 pm | प्रचेतस
अगदी.
गर्लफ्रेंडसारखी काळजी घ्यावी लागते तिची तरच ती तुम्हाला साथ देते :)
8 Dec 2021 - 7:51 pm | जेम्स वांड
रोज पुसली का एक्सपीडिशनला धोका देत नाही ती, आपल्याकडे मोडीफिकेशनला काय नियम आहेत ? सुप्रीम कोर्टाचं एक रुलिंग आहे, स्ट्रक्चर, सेफ्टी, ओरिजिनल पेंट सोडून अस्थेटिक मोड्स चालतात का काहीसं, त्याची कॉपी मिळाली कुठं तर मजा येईल.
7 Dec 2021 - 8:35 pm | धर्मराजमुटके
माझ्या मित्राने बाईक विकून टाकली आणि रिक्षा घेतली. तो पुर्णवेळ रिक्षावाला नाहिये मात्र ओला / उबेर ड्रायव्हर अॅप मोबाईलमधे ठेवतो.
जिकडे जायचे तिकडचे भाडे घेऊन जातो , स्वत:च्या कामासाठी फुकटात प्रवास करतो आणि आणि वरुन पैसे पण कमावतो.
खिशात कॅश कमी पडली की जवळपास एखादी चक्कर मारुन २००-४०० रुपये घेऊन येतो.
चारचाकीपेक्षा कमी सुरक्षित पण बाईकपेक्षा जास्त सुरक्षित.
शिवाय नो पार्कींग किंवा कोठेही उभ्या असलेल्या बाईक ट्राफि़कवाले पटकन उचलून नेतात. रिक्षाकडे सहसा दुर्लक्ष करतात असा त्याचा अनुभव.
7 Dec 2021 - 9:27 pm | Bhakti
=)