body {background-image: url("https://i.postimg.cc/52VQjg83/bg-main.jpg");}
.navbar-fixed-top {
background-color: #000011;
border-bottom: 1px solid #111;
}
.node-info {background-color: #f5f5f5;padding:8px;}
.page-header {background-color: #008080;color: #ffffff;text-align:center;border-bottom: 0px solid #111;box-shadow:0 2px 5px 0 rgba(0,0,0,0.16),0 2px 10px 0 rgba(0,0,0,0.12);}
/* जनरल */
h1, h2, h3, h4 {font-family:'Eczar',serif}
p {font-family: 'Noto Sans', sans-serif; font-size:16px; text-align:justify;}
h5 {font-size:15px!important; text-decoration:underline;}
/* Hidden Items*/
.input-group {display: none !important;}
.page-header { padding-top:16px !important;}
/* फोटो */
.field-items img {background-color: white;border: 1px solid #eee;padding:6px;box-shadow:0 2px 5px 0 rgba(0,0,0,0.16),0 2px 10px 0 rgba(0,0,0,0.12);max-width:100%;height:auto!important;}
.author-type-posted, .field-items a:link {color:#660000;}
.left {float:left;display:inline-block;margin-right:10px;margin-top:16px;}
.right {float:right;display:inline-block;margin-left:10px;}
.center {margin: auto;}
.portrait { margin-bottom:10px;max-width:450px;}
.landscape { margin-bottom:10px;max-width:800px;}
.kavita p{text-align:center}
.title {text-align:center;margin-bottom:32px;margin-left:24px;margin-right:24px;}
.col-sm-9 {padding:16px;background-color:#fefefa;box-shadow:0 4px 10px 0 rgba(0,0,0,0.2),0 4px 20px 0 rgba(0,0,0,0.19)}
.anklogo {float:left; max-width:300px;margin-top:4px;margin-right:16px;}
.voilet {background-color: #9900cc;color:#ffffff;}
मिनेसोटातील प्रत्येक ऋतू आणि त्याबरोबर येणारे रंग मनाला मोहवून टाकतात. इथल्या हवामानात प्रामुख्याने चार ऋतू येतात. वसंत, ग्रीष्म, फॉल आणि बराचसा प्रदीर्घ असा हिवाळा. (अधिकृतपणे प्रत्येक ऋतू तीन महिन्यांचा असला, तरी इथे निम्मा फॉल व निम्मा वसंत हे हिवाळ्याचाच भाग बनतात.) हिवाळ्यात तापमान पुरेसे खाली गेल्यावर पहिल्या हिमवर्षावाचे कोण कौतुक लहान तसेच थोरांना वाटते. झाडांवर, रस्त्यांवर आणि घरांच्या छपरांवर हिमवर्षावाचा शुभ्र रंग फार सुंदर दिसतो.
गोठलेल्या तळ्यावर चालणारे कॅनेडियन गूझ.
हिवाळ्यातील सूर्यास्त
लेक आयटास्का. इथूनच महाकाय मिसिसिपी नदी उगम पावते. गोठलेले लेक आयटास्का आणि झुळझुळ वाहणारे मिसिसिपीचे पाणी.
साधारणपणे मार्च-एप्रिलमध्ये गोठलेला बर्फ हळूहळू वितळू लागतो. सगळीकडे पाण्याचे लोट वाहू लागतात. स्थलांतर केलेले पक्षी परतू लागतात. पहाटे पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू येऊ लागतो. हिवाळ्यात उशिरा होणार सूर्योदय आता लवकर होऊ लागतो. एवढेच काय डेलाइट सेव्हिंग सुरू होऊन एक तास लवकर उठावे लागते! जसजसा वसंत जोम धरतो, तसेच झाडांना पालवी फुटते. लवकरच विविधरंगी फुले बहरतात.
लेकवूड सेमेटरीतील ट्यूलिप्स.
खालील तीन छायाचित्रे मिनेसोटा लँडस्केप आरबोरेटममधील आहेत.
क्रॅब अॅपल्सचा बहर
तळ्यांमध्ये बदकांची जोडपी विहरू लागतात. पक्षीही आजूबाजूच्या झाडांमध्ये आपली घरटी बांधू लागतात. मिनेसोटामध्ये आवर्जून दिसणारे बिनविषारी गार्टर स्नेक बिळातून बाहेर येऊ लागतात. वातावरण गरम होऊन २५-३० अंश सेल्सियसच्या आसपास स्थिरावू लागते. अगदीच कडक ऊन पडले, तर साधारणपणे ४० अंश सेल्सियसपर्यंत जाते.
लेक सुपीरियरच्या किनार्यावरील डुलुथ येथील रोझ गार्डन
उन्हाळ्यातील लेक सुपीरियरचा एक बीच
लेक मिनिटाँकावरील एक दृश्य
घरामागील तळ्याकाठी आलेले हरीण
सप्टेंबरच्या मध्यापासून फॉलचा प्रभाव जाणवू लागतो. सफरचंद, कणीस, मोठाली भोपळी पिकून कापणीस तयार होतात. झाडांची पाने आता पिवळी पडू लागतात. या काळात पानांचे रंग झपाट्याने बदलतात. सभोवती पिवळा, लाल, नारिंगी रंगाची उधळण होते. रंगांची ही उधळण पाहून डोळ्यांचे पारणे फिटते. वातावरणात गुलाबी गारवा येऊ लागतो.
ऊबदार वाटायला गरम अॅपल सायडर आणि पंपकिन स्पाइस्ड लाटे उपयुक्त ठरतात.
बेकर पार्क रिझर्व
प्लिमथ क्रीक पार्क
ग्लिसन लेक
ल्युट्सन माउंटन
सप्टेंबरच्या शेवटी व ऑक्टोबरमधे कापणीचा हंगाम (हार्वेस्ट सिझन) असतो. या काळात जागोजाग भोपळ्यांची सजावट केलेली असते.
स्थानिक लोक अगदी सहजपणे बदलत्या हवामानाबरोबर बरोबर जुळवून घेत प्रत्येक ऋतूचा आस्वाद घेत असतात.
प्रतिक्रिया
3 Nov 2021 - 9:30 am | प्रसाद गोडबोले
वाह !
अप्रतिम फोटोज!
3 Nov 2021 - 11:05 pm | मुक्त विहारि
आमच्या हातात ही कला नाही ...
3 Nov 2021 - 11:16 pm | सौन्दर्य
अप्रतिम छायाचित्रे आणि तितकेच सुंदर वर्णन. थंडी जरा जास्त असली तरी निसर्ग मुक्तहस्ते रंगांची उधळण करताना दिसतोय. भेट देण्यासारखी जागा.
ह्या उलट ह्युस्टन म्हणजे जवळ जवळ मुंबईचे तापमान, फक्त हवा कोरडी असल्यामुळे घाम येत नाही. सहसा ५० डिग्री सेल्सिअसच्या खाली जात नाही पण कमाल मात्र ११० डिग्री सेल्सिअसपर्यंत जाते. ह्युस्टन तसे ट्री-फ्रेंडली शहर असले तरी मनोवेधक नाही.
4 Nov 2021 - 3:18 pm | अनन्त्_यात्री
सेल्सिअस?
4 Nov 2021 - 8:57 pm | Trump
ती अमेरिका आहे. फॅरेनहाईटवाले.
7 Nov 2021 - 11:59 pm | सौन्दर्य
चूकच झाली. मूळचा भारतीय असल्यामुळे डोक्यातले सेल्सिअस जातच नाही. प्लिज फॅरेनहाईट वाचावे.
8 Nov 2021 - 8:20 am | श्रीरंग_जोशी
तापमानाच्या विक्रमासंबंधीत एक माहिती: गेल्या वर्षीच्या ऑगस्टमधे कॅलिफोर्नियातील डेथ व्हॅलीमधे १३० अंश फॅ किंवा ५४.४ अंश से तापमानाची नोंद झाली.
स्रोतः The 130-Degree Fahrenheit Reading in Death Valley Ties for the Hottest Temperature Ever Reliably Recorded.
4 Nov 2021 - 12:01 am | सुक्या
अगदी शब्दशः सहमत ... ऋतू कसेही आणी कितीही बदलले तरी त्याची मजा घेता आली पाहिजे ...
छायाचित्रे अप्रतिम आहेत . .
4 Nov 2021 - 12:45 am | शशिकांत ओक
मस्त मूड बनवलात आपण जुइ...
4 Nov 2021 - 8:16 am | Bhakti
वाह जुइ,
मस्त फोटो आणि ऋतूरंग वर्णन!
नवीन नावही समजले.
4 Nov 2021 - 9:24 am | ज्ञानोबाचे पैजार
आणि त्या बरोबरीने येणारे वर्णन सुद्धा
नयनसुखद लेख आवडला
पैजारबुवा,
8 Nov 2021 - 7:54 am | तुषार काळभोर
रंगांची अगदी उधळण आहे!
4 Nov 2021 - 11:49 am | चौथा कोनाडा
मिनेसोटातील ऋतुरंग,सगळेच जबरदस्त आहेत.
कोणता जास्त आवडला सांगणे कठीण आहे !
तरीही
१) बेकर पार्क रिझर्व
२) हिवाळ्यातील सूर्यास्त
३) प्लिमथ क्रीक पार्क - अ
४) क्रॅब अॅपल्सचा बहर
५) घरामागील तळ्याकाठी आलेले हरीण
💖
हे अनुक्रमे आवडले !
4 Nov 2021 - 9:04 pm | सुरसंगम
वाह खुप छान !
4 Nov 2021 - 10:08 pm | MipaPremiYogesh
वाह सुंदर फोटो
5 Nov 2021 - 11:19 am | नचिकेत जवखेडकर
खूप छान फोटो!
8 Nov 2021 - 7:02 pm | अभिजीत अवलिया
नयनरम्य लेख.
8 Nov 2021 - 8:42 pm | मित्रहो
काय सुंदर फोटो. अप्रतिम वर्णन
9 Nov 2021 - 12:18 pm | अनिंद्य
फोटो पाहून अहाहा झाले, विशेषतः ट्युलिपचे !
16 Nov 2021 - 1:18 pm | सौंदाळा
अप्रतिम, नेत्रसुखद फोटो
16 Nov 2021 - 1:20 pm | श्वेता व्यास
खूप सुंदर प्रचि, खरोखर ऋतुरंग आहेत, मन प्रसन्न झाले.
17 Nov 2021 - 6:07 am | सुधीर कांदळकर
फॉल चा मोसम कधीही न पाहिलेल्या माझ्यासाठी ही दिवाळी भेटच. ऑटम या शब्दाचा अर्थ आमच्या शाळेतल्या एका मास्तराने पावसाळा असा सांगितल्यामुळे माझ्या छोट्याशा मेंदूत घोटाळा झाला होता. एका कॅलेंडरवर फोलचे चित्र पाहिले आणि विस्मित झालो. परदेशी जाऊन आलेल्या मित्रांकडून फॉलची वर्णने, पानांचे पिवळसर, नारिंगी, लालसर, तपकिरी असे विविध रंग धारण करणे भरभरून ऐकले.
मस्त लेखाबद्दल धन्यवाद.
26 Nov 2021 - 8:49 am | जुइ
सर्व प्रतिसादकांचे व वाचकांचे मनःपूर्वक धन्यवाद.
हा लेख लिहिताना सर्वात मोठे आव्हान होते की उपलब्ध असणार्या शेकडो फोटोजपैकी काहींची निवड करणे.
26 Nov 2021 - 9:24 pm | जेम्स वांड
हे फोटोज बघून तर अमेरिका एका सर्वाधिक दुष्काळी कालखंडातून जातोय असे भासत पण नाही, मिनेसोटा तर फारच सुंदर राज्य दिसते आहे, ते हरीण इतके मोकळे कसे फिरू शकते ? म्हणजे लायसन्स गेम म्हणून वगैरे हरणं मारत नाहीत का ? बेकायदेशीर आहे का मिनेसोटामध्ये ? खूप रिलॅक्स वाटतंय ते हरीण.
27 Nov 2021 - 9:43 am | जुइ
इतरांकडून जेवढे ऐकले आहे की इथे हंटींगचा सीझन असतो (स्थानिक प्रशासन तारखा जाहीर करते). तसेच ज्या प्राण्याची शिकार करायची असेल त्याचे परमिट घ्यावे लागते. बहुधा हरिणांसाठी एका माणसात एका सीझनमधे एकाच हरिणाची शिकार करायचे परमिट मिळते. निवासी भागात हरणांच्या हंटींगचे परमिट मिळत नसावे कदाचित. हंटिंगच्या तुलनेत दोन शहरांदरम्यान हायवेजवर वाहनांच्या धडकेने अधिक हरीण मृत्युमुखी पडत असावेत.
29 Nov 2021 - 2:36 pm | जेम्स वांड
हरणे पण मुक्त फिरू शकतात अन शिकारी पण आपली हौस पुरवू शकतात अशी व्यवस्था म्हणायची ही तर !.
ही तर विकासाची किंमत म्हणावी लागेल, पण अर्थातच अमेरिका असल्यामुळे अश्या केसेस मध्ये प्राणी वाचू शकण्याची शक्यता असल्यास ते किंवा किमान त्यांच्या मृतदेहांची विल्हेवाट तरी उत्तमच लागत असणार ह्यात शंका नाही.
3 Dec 2021 - 9:27 am | जुइ
गेली काही वर्षे अमेरिकेच्या पश्चिम किनार्यावरील व त्यांना लागून असलेली नैऋत्येकडील काही राज्य भीषण दुष्काळी कालखंडातून जात आहेत. काही ठिकाणी तर तळ्यांचे पात्र कोरडे होवून तीस-चाळीस वर्षांपूर्वी अपघातग्रस्त झालेल्या कार्स व त्यातील व्यक्तींचे अवशेष सापडले.
अॅरिझोना व नेवाडा राज्यांवरच्या सीमेवरच्या हूवर डॅमने बनलेल्या लेक मीड जलाशयाबाबतची ही जून महिन्यातली एक बातमी:
Lake Mead: largest US reservoir falls to historic low amid devastating drought
तुलनेत मिनेसोटा व आजूबाजूच्या राज्यांमधला दुष्काळ फारच सौम्य वाटतो. या वर्षी प्रथमच पाऊस कमी होऊन गवत पिवळे किंवा तपकिरी दिसू लागले होते. त्याखेरीज दर काही वर्षांनी हिमवर्षाव सरासरीपेक्षा कमी होवून इथे दुष्काळ पडतो. हिवाळ्यात पडलेला बर्फ नंतर वितळून पाण्याचा महत्त्वाचा स्रोत बनतो.
28 Nov 2021 - 10:42 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
खुप सुंदर. आता मिनेसोटात भटकंती करुन आलो असे स्वप्न पाहणे आले. निसर्गाची बहार अप्रतिम. लिखते रहो.
-दिलीप बिरुटे
30 Nov 2021 - 8:32 am | गणेशा
अप्रतिम फोटो.. छान वाटला लेख..
आणखिन फोटो असते तरी पाहताच बसावे वाटले असते...
वेळेअभावी दिवाळीतील हा दुसराच लेख वाचला..
आणि नक्कीच खुप आवाडला