body {background-image: url("https://i.postimg.cc/52VQjg83/bg-main.jpg");}
.navbar-fixed-top {
background-color: #000011;
border-bottom: 1px solid #111;
}
.node-info {background-color: #f5f5f5;padding:8px;}
.page-header {background-color: #008080;color: #ffffff;text-align:center;border-bottom: 0px solid #111;box-shadow:0 2px 5px 0 rgba(0,0,0,0.16),0 2px 10px 0 rgba(0,0,0,0.12);}
/* जनरल */
h1, h2, h3, h4 {font-family:'Eczar',serif}
p {font-family: 'Noto Sans', sans-serif; font-size:16px; text-align:justify;}
h5 {font-size:15px!important; text-decoration:underline;}
/* Hidden Items*/
.input-group {display: none !important;}
.page-header { padding-top:16px !important;}
/* फोटो */
.field-items img {background-color: white;border: 1px solid #eee;padding:6px;box-shadow:0 2px 5px 0 rgba(0,0,0,0.16),0 2px 10px 0 rgba(0,0,0,0.12);max-width:100%;height:auto!important;}
.author-type-posted, .field-items a:link {color:#660000;}
.left {float:left;display:inline-block;margin-right:10px;margin-top:16px;}
.right {float:right;display:inline-block;margin-left:10px;}
.center {margin: auto;}
.portrait { margin-bottom:10px;max-width:450px;}
.landscape { margin-bottom:10px;max-width:800px;}
.kavita p{text-align:center}
.title {text-align:center;margin-bottom:32px;margin-left:24px;margin-right:24px;}
.col-sm-9 {padding:16px;background-color:#fefefa;box-shadow:0 4px 10px 0 rgba(0,0,0,0.2),0 4px 20px 0 rgba(0,0,0,0.19)}
.anklogo {float:left; max-width:300px;margin-top:4px;margin-right:16px;}
.voilet {background-color: #9900cc;color:#ffffff;}
मोरया - चिंचोरे येथील 'जागृत देव'
कॅप्टन डब्ल्यू.एच. साईक्स यांनी २६ ऑक्टोबर १८१९ रोजी मुंबईतील एका भाषणात हा लेख वाचून दाखवला. त्याचे स्वैर रूपांतर सादर आहे. इंग्रजी राजसत्तेने भारतीयांना पारतंत्र्यात टाकले होते, मात्र काही अभ्यासू व शोधकार्याला वाहिलेले सेनेतील वरिष्ठ पदावरील अधिकारी आपल्या फावल्या वेळात रात्री-अपरात्री कंदिलाच्या अपुऱ्या प्रकाशात, स्थानिक लोकांची मराठी भाषा आत्मसात करून त्यांच्या संवादातून माहिती मिळवून ती लिटररी सोसायटीच्या सभेत सादर करताना वाचनात आले. या लेखात शेवटी इंग्रजांनी भारतीयांकडे मानभवीपणे पाहणे सोडायला हवे, भारतीयांच्या श्रद्धास्थानांची टिंगलटवाळी न करता त्यांच्या दृढ श्रद्धाभावातून अचाट कामे घडू शकतात यावर अंधश्रद्ध बनून नाकारता कामा नये, असा संदेश दिला आहे त्यामुळे मोरया गोसावींच्या अलौकिक व्यक्तिमत्त्वाची ओळख जास्त प्रभावी होते.
पूर्वी सेवाजीने (शिवाजींनी) महरट्टा (मराठ्यांचे) साम्राज्य स्थापन केले होते, पूना (पुणे) गावात एक गरीब पण सद्गुणी जोडपे आलेल्या भोगांना सामोरे जात जीवन जगत होते.
दीर्घ आयुष्यादरम्यान त्यांचे अत्यंत हालाखीत गरिबीचे जीवन होते. सरत्या आयुष्यात त्यांना आनंद देणाऱ्या संततीची इच्छा अपूर्ण राहिली होती. ते गुनपुट्टीचे (Gunputtiचे) (गणपतीचे) दृढ भक्त होते, अगदी बारीकसारीक रितीरिवाज कसोशीने पाळत असत, असे असूनही संतती नसल्याची खंत त्यांना होती. अखेरीस त्यांच्या चिकाटीने केलेल्या प्रार्थनेला फळ आले व गणपतीने संमती दिली आणि पतीला स्वप्नात एक मुलगा होईल, असा दृष्टांत दिला. (ते ऐकून) वृद्ध पत्नीने त्या मुलाला देवाला समर्पित करण्याचे पूर्ण वचन दिले, त्यामुळे त्यांच्या इच्छा पूर्ण होण्याचा आनंद त्यांना पाहिजे होता तो मिळाला. जेव्हा त्याची वृद्ध पत्नी गर्भवती झाली, तेव्हा काहींना आश्चर्य वाटले आणि कालांतराने गणपतीच्या आशीर्वादाने मुलगा झाला. (Lord - देव (हे आडनाव नव्हे) म्हणजे गणपती असे समजावे.) देवाच्या सन्मानार्थ मुलाचे नाव मोरोबा, (गणपतीचे एक नाव - मोरेश्वर) असे ठेवले गेले. या घटनेनंतर काही काळाने हे कुटुंब चिंचोर (चिंचवडच्या) सध्याच्या जागेच्या दोन कोसच्या (६-७ कि.मी. दूर), पीपुळगावला (पिंपळे?) गेले. मोरोबांच्या आईवडिलांच्या मृत्यूनंतर त्यांनी पिंपळगाव (Peepulgaun) सोडले आणि चिंचोरच्या सध्याच्या मंदिरापासून अर्ध्या मैलावर तातूर (Tatoor - ताथवडे?) येथे स्थायिक झाले. लहानपणापासून ते अभ्यासू, चिंतनशील आणि धार्मिक वृत्तीचे होते; कठोर तपस्येचा सराव करण्यात त्यांना आनंद होत असे आणि म्हणूनच त्यांनी केलेल्या व्रतांचा भंग झाला नाही. दर महिन्याला १८ कोस (३६ मैल - गूगल नकाशात ८२ कि/मी.) दूर चालत जाऊन (Morgow) मोरगांवच्या गणपतीचे दर्शन घेण्याचा प्रघात २२ वर्षे सतत पाळला. कोणावर छाप पाडण्यासाठी ते असे कठोर जीवनयापन करत नव्हते. याचा प्रत्यय आश्चर्यकारकरित्या अनुभवायला आला. तिथल्या (Patell) पाटलांना मोरोबांची धार्मिक विनम्र वागणूक, तपस्या याचा आदर वाटून ते दर रोज सकाळी दुधाचा रतीब घालत असत. एके दिवशी आज दूध यायला का उशीर होतोय हे पहायला मोरोबा पाटलांच्या घरी गेले. तिथे सामसूम पाहून त्यांनी घरात कोणी आहे का? म्हणून ओरडून विचारले. एक पोरसवदा मुलगी आतून म्हणाली, "मी एकटीच आहे. बाकीचे शेतावर कामाला गेले आहेत. मी आंधळी आहे. म्हणून आपल्याला दूध काढून द्यायला आज कोणी आले नाही." ते ऐकून मोरोबा म्हणाले, "एक चरवी घे आणि माझ्याबरोबर गोठ्यात चल." मुलीला ऐकून मजा वाटली. म्हणून तिने चाचपडत उंबरठा ओलांडताच तिला तिची दृष्टी आली!
ह्या गोष्टीचापुण्यात खूप गवगवा झाला. म्हणतात की गोष्ट शिवाजी महाराजांच्याही कानावर गेली. पण त्याचा विपरीत परिणाम होऊन लोक आपापल्या व्यथा घेऊन मोरोबांच्या पाठीमागे लागले. भाविकांनी त्यांच्या संथ आणि धार्मिक परिपाठाला न जुमानता वेळी-अवेळी येऊन बरे करण्यासाठी त्रास देऊ लागले. त्यामुळे मोरोबा तेथून अचानक निघून गेले आणि आज जिथे मंदिर(Pagoda) आहे तिथे पूर्वी अरण्य होते तिथे जाऊन राहू लागले. कठोर तपस्या करताना जेवणाखाणाची आबाळ होत असे. तरीही ते निग्रहाने दर महिन्याला मोरगांवच्या गणपतीच्या दर्शनाला जात असत. एकदा अगदी अशक्त वाटून त्यांना मोरगावला पोहोचायला रात्र झाली. बंद मंदिराच्या प्रांगणात ते बसून राहिले. रात्री त्यांच्या स्वप्नात प्रत्यक्ष गणपती सुहास्य वदनाने येऊन वर देत म्हणाले, "बा मोरेश्वरा, तुझी परीक्षा संपली. तू निष्ठेने माझी आराधना केलीस याचे फळ म्हणजे तुझे या मंदिरात यायचे कष्ट करायची या पुढे गरज नाही. तू माझे एक मंदिर बांधून त्यात माझी स्थापना करशील. इतकेच नव्हे तर तुझ्या सात पिढ्या तिथे ते मंदिर चालवतील."
पहाटे पडलेल्या स्वप्नाचे महत्त्व समजून मोरोबा तडक आणि मंदिराच्या गर्भगृहातील दरवाजा हाताने ढकलून गणपतीच्या मूर्तीचे दर्शन घेतले. आधी कोणी भक्तांनी मूर्तीच्या गळ्यात घातलेले हार सुकलेले पाहून ते निर्माल्य बाजूला ठेवून मूर्तीची साग्र पूजा केली. नवे फुलाचे हार घातले. भक्तिभावाने साष्टांग दंडवत घालून गणपतीचे रूप न्याहाळत बाहेर पडले. आपली तहानभूक संपली आहे असे जाणवले. नंतर नेहमीप्रमाणे पुजारी मंदिराचे कुलूप उघडायला गेले तर ते आधीच उघडलेले असल्याचे लक्षात आले. पाहतात तो गणपतीच्या गळ्यातील किंमती हार गायब आहे. ‘चोर, चोर’ म्हणून त्यांनी खूप ओरडाआरडा करून गाव जमवले. एका कोपऱ्यात मोरोबा झोपलेल्या अवस्थेत होते आणि आश्चर्य म्हणजे त्यांच्या गळ्यात तो किमती हार होता!
लोकांनी ते पाहून मोरोबांच्यां गळ्यातील हार काढून घेतला, तेव्हा त्यांना जाग आली व घडलेला प्रकार समजला. पण लोक ऐकून घ्यायला मन:स्थितीत नव्हते. त्यांनी मोरबांना व्यवस्थित बदडले. नंतर चोरीचा गुन्हा दाखल करण्यासाठी (पोलीस पाटील) दरोग्यासमोर नेले (लेखात हकीम म्हटलेले आहे. कदाचित तो पेशाने हकीम असू शकतो.) तेव्हा त्याने मोरोबांना कैदेत टाकले. हार काढून घेतला. त्या रात्री हकीम दरोग्याच्या पोटात एकदम दुखायला लागले. त्यात गणपतीने त्याला, "तू मोरबांना सोडून दे. त्याच्या गळ्यात मीच हार घातला होता. त्यांनी तो चोरलेला नाही. उलट माफी मागून त्यांचा हार त्यांना परत कर" असा आदेश दिला.
त्यानुसार कारवाई केली गेली आणि मोरोबा आपल्या जंगलातील जागेवर परतले. तिथे एक चमत्कार होऊन जमिनीतून एक दगड बाहेर आला, तोच सध्याच्या मंदिरातील स्वयंभू गणपती होय. आणि मोरोबा, अशा प्रकारे समाधानी झाले की देवाने चिंचोर (चिंचवड) येथे आपले निवासस्थान घेण्याचे वचन पूर्ण केले, एक भव्य मंदिर बांधण्यास सुरुवात केली; आणि त्यांच्या स्वतःच्या पुत्रामध्ये देवत्वाच्या अवताराबद्दलही जागरूकता निर्माण केली. नंतर असंख्य चमत्कार झाले, ज्यामुळे त्यांची प्रसिद्धी भारताच्या कानाकोपऱ्यात पसरली.
(लेखात मोरोपंतांनी विवाह कधी, कुणाशी केला, मुले किती झाली, त्यांना गोसावी ही उपाधी कधी मिळाली याचा उल्लेख आढळत नाही.)
प्रदीर्घ कारकिर्दीनंतर, मोरोबा, आपली वेळ आली आहे हे लक्षात घेऊन, जिवंत बसलेल्या स्थितीत, त्याच्या हातात शास्त्रवचन घेऊन; त्याचे समाधीस्थळ कधीही उघडू नये किंवा अडथळा आणू नये असे सकारात्मक आदेश देऊन समाधिस्थ झाले. जे लोक त्यांची आज्ञा न मानतील त्यांच्यासाठी सर्वात भयंकर दुर्दैवी घटना घडतील असे म्हटले गेले.
मोरोबा देव यांच्यानंतर त्यांचे पुत्र चिंतामण (इंग्लिश उच्चारण चिंतॅमुन) देव गादीवर आले, तेही वडिलांप्रमाणे प्रखर गणपतीभक्त आणि समजूतदार होते. या प्रकारे वडिलांच्या सन्मानासाठी दुसरी पिढी यशस्वी झाली.
चिंचवडच्या चार कोस अंतरावर देहू गावात तुकाराम (Tookaram) राहत होते, तुकाराम नावाचे (संत) म्हणजे जिवंत देवत्व होते. (भगवंताचे गान करून) ते सामान्य माणसाला समजेल अशा मराठी भाषेत काव्य (अभंग) गात. ते लिहून ठेवले जात असत.
असे दिसते की चिंचवड येथील चिंतामण त्यांच्या इतक्या जवळच्या भागात राहूनही तुकारामांच्या साहित्यिक प्रतिभेचा हेवा वाटत होता. (कदाचित प्रेरित होऊन गणपतीच्या दर्शनाला ते स्वत: येत नाहीत, तुकारामांनी (गणपतीऐवजी) विठ्ठलावर भक्ती केल्यामुळे नाराज होऊन चिंचवडच्या संस्थानात आणण्याचा प्रयत्न केला. तसे न घडल्याने चिंतामण म्हणू लागले की ‘तुकारामांच्या गाथा पोथ्या फक्त नष्ट होण्यासाठी योग्य आहेत; ते स्वतःला पुस्तकांचा स्वामी बनवण्याचा प्रयत्न करतात. (असे म्हणून) त्यांनी (आणि इतरांच्या पुढाकाराने) तुकारामांच्या लेखन वह्या एका गठ्ठ्यात बांधून खोल पाण्यात जड वजनाने बुडवल्या’.
या आपत्तीचा तुकारामांवर इतका संवेदनाक्षम परिणाम झाला की, त्यांनी सात दिवस अन्न-पाण्याचा त्याग केला, झोपले नाही, परंतु त्यांनी स्वतःच्या पुस्तकांच्या नुकसानाचे दुःख व्यक्त केले आणि (विष्णूचा अवतार) विठोबाला (Wittoba) प्रसन्न करण्यासाठी (धावा सुरू केला) वह्यांच्या पुनर्प्राप्तीसाठी सातव्या दिवशी विठोबाने मदत केली; आणि तुकारामांच्या अनंत आनंदासाठी अद्भुत घडले. ज्यांनी ती (घटना) पाहिली त्या सर्वांना आश्चर्य वाटले, पुस्तके पाण्याच्या पृष्ठभागावर उठली, ओलसर किंवा इतर दुखापतीपासून मुक्त!
चिंतामण देव (इथे देव हे आडनाव असावे) हे ऐकून, तुकोरामांशी वैरभाव संपवून विठोबा (दैवताला) मानायचे कबूल केले; आणि या घटनेनंतर ते चांगले मित्र बनले.
एके दिवशी चिंतामण यांनी तुकारामांना त्यांच्या बरोबर जेवण्यास सांगितले, त्यांनी ते आमंत्रण कृतज्ञतेने स्वीकारले. (समोर बसलेल्यांना उद्देशून ते (कॅप्टन डब्यु एच साईक्स) म्हणाले (असावेत) की असे मानले जाऊ नये की डिनर (आमंत्रण) कार्ड्स पाठवले नाही तर ते असभ्यतेचे लक्षण आहे) असभ्यचा अर्थ असा होत नाही. कारण चिंतामण गणपतीच्या उपासनेत व्यग्र असताना, स्वतःशी मनात विचार करतात की, "तुकाराम, आज मोरगांवच्या गणपती मंदिराला भेट देण्याचा विचार करत आहेत, ते माझ्याबरोबर जेवणाला येतील का? त्या वेळी त्यांनी असे ही (मनात) आणले की त्यांच्या पायातील जोड्याला दुरुस्ती हवी होती, म्हणून चांभाराची सोय व्हावी".
नेहमीपेक्षा जास्त वेळ घेतलेली त्यांची भक्तिपूर्ण प्रार्थना करून ते मंदिराबाहेरील आपल्या घरात आले. (पाहतात तो) तुकाराम तेथे आधीच आलेले दिसले! ते भुकेले होते. जेवणाची आतुरतेने वाट पाहत होते. ‘काय’ चिंतामण म्हणाले, “तुम्ही इथे कसे आलात? आणि मी तुम्हाला जेवणासाठी कधी आमंत्रित केले”?
तुकाराम म्हणाले ,“अहो, तुम्ही आम्हाला मंदिरात आमंत्रण दिले नाहीत? आणि तुमचा जोडे दुरुस्त करण्यासाठी चांभार पाठवावा म्हणाले नव्हता काय”?
“खरोखर”, चिंतामण म्हणाले, “मी तुम्हाला अलौकिक बुद्धिमत्तेला पूर्ण श्रेय देतो. चला, बसा आणि आपण रात्रीचे जेवण करू या”. त्यानुसार दोन ताटे मांडण्यात आली.
तुकारामांनी, ते बघून, दुसरे आणखी एक ताट आणले जावे अशी इच्छा व्यक्त केली; तसे ते मांडले गेले आणि रात्रीचे जेवण वाढले गेले.
हेवा, मत्सर, मूलभूत स्वभाव प्रत्येकाला असतात; त्यांच्यापासून कोणी मुक्त नाहीत. तुकारामांना चिंतामणांच्या कीर्तीचा हेवा वाटत होता आणि विठोबाशी त्यांच्या जवळीकेचा (व्यर्थ) अभिमान होता.
“आता”, तुकाराम म्हणाले, “आपण चांगल्या (व्यक्तीच्या) सहवासात जेवू शकतो. माझा देव विठोबाला, आपल्या बरोबर भोजन करण्यास प्रवृत्त करतो; आणि तुम्ही गणपतीला आवाहन करून जेवायला बोलवा".
“तुकारामांच्या (प्रार्थनेला प्रतिसाद देत) सुमारे पाच वर्षांचा एक लहान मुलगा अचानक दिसला आणि त्याने स्वतःला विठोबा म्हटले”!
ते पाहून, अरेरे! आपल्याला कोणत्याही परिस्थितीत गणपतीचे दर्शन घडवता आले नाही. असे वाटून निराशेने, चिंतामण एक पंच-पात्राला पकडून मंदिराकडे धावत गेले; तुकाराम त्यांच्या उदास चेहऱ्यावर हसत हसत मागे गेले. (मंदिरात)चिंतामणांना (अशी अनुभूती झाली की) त्यांचे नाक लांब झाले आहे. हत्तीच्या सोंडेत, कान (सुपासारखे) रूपांतरित झाले आहेत; पोटाचा घेर फुगला आहे!
त्यांच्या खांद्यावरून दोन अतिरिक्त हात बाहेर पडले, अशा प्रकारे त्यांच्या स्वतःच्या व्यक्तिमत्त्वामध्ये गणपती आपल्या रूपात स्वतःला दर्शवितो आहे याची अनुभूती आली. असे देवत्वाच्या अवताराचे सार्वजनिक प्रदर्शन यापूर्वी कधीही कोणी पाहिले नव्हते; (तिकडे) तुकारामांना आपल्या अभिमानाची व्यर्थता चांगलीच जाणवली. त्यांना वाटले की चिंतामणांचा योग्य आदर करायला हवा, म्हणून तुकारामांनी तीन वेळा जमिनीवर डोके टेकून म्हटले की देव (गणपती) नावाने चिंतामणांना देव या आडनावाने संबोधले जावे. परिणामी, तेंव्हापासून चिंतामण आणि त्याच्या वंशजांना देवच्या अधिकृत पदवीने सन्मानित केले गेले. त्यापूर्वी ते फक्त सौजन्याने संबोधले जात असे.
तुकाराम आता रात्रीच्या जेवणासाठी परतले, (अदभूत घटनांचा संदर्भ देत) मैत्रीपूर्ण गप्पांनंतर (जेवण झाल्यावर) एकमेकांनी निरोप घेतला; चिंतामणांना त्यांचे सोंड, कान आणि अतिरिक्त हात अदृश्य होत आहेत आणि त्याचे पोट त्याचे मूळ आकार पुन्हा सुरू करत आहे; विठोबा नाहीसा झाला आहे आणि तुकाराम येऊन गेले आहेत असे जाणवले.
चिंतामणांना (त्या काळातील प्रथेनुसार) आठ बायका केल्या, आणि त्यांना आठ मुलगे होते, त्यांनी त्यांचे वडील मोरोबांप्रमाणे जीव समाधी घेतली नाही, नैसर्गिक मृत्यूने मरणे पसंत केले. त्यांच्या देहाला सामान्य पद्धतीने (भडाग्नी) देण्यात आला.
एक दगड, ज्याला (भारतीय स्वयंभू) पाषाण म्हणतात, राखेतून (जमिनीतून) उद्भवला. जणू या घटनेचे स्मरण करण्यासाठी; की हा पुढील सहा पिढ्यांसाठी अनैसर्गिक घटना घडतील आणि नंतरच्या पिढ्यांना अशा प्रकारचे मानसिक सन्मान देणे बंद होईल.
चिंतामण देव यांच्यानंतर त्यांचा मुलगा (Narrain) नारायण देव (प्रथम) आला आणि त्याची कीर्ती दिल्लीपर्यंत पोहोचली. अलमगीर (बादशाह) ने त्यांच्या देवत्वाची परीक्षा घेण्यासाठी, गायीच्या मांसाचा एक तुकडा (हिंदूंचा तिरस्काराचा पदार्थ) काळजीपूर्वक अनेक कपड्यांमध्ये गुंडाळून (लपवून) दूत पाठवला. नारायणांच्या उपस्थितीत दूतधारकाने तबकात काय आहे ते सांगावे व मग उघडण्याची विनंती केली: दूताने उत्तर दिले की त्याला तसे करण्याचा अधिकार नाही, कारण नारायण देवाने न उघडून पाहता त्यात काय आहे ते सांगण्याची आज्ञा देण्यात आली आहे. नारायण देव यांनी पूजा साहित्य खाली ठेवून पूजेचे तीर्थ त्यावर शिंपडले.
बादशहाच्या भेटीचा (रुमाल) पूजेमध्ये वापरला आणि नंतर उरलेल्याची घडी उघडले. लो! (तो काय?) तेथे गोमांसाऐवजी जाईच्या (जेसॅमिन) ताज्या फुलांचा एक छान गुच्छ होता. ती फुले हाती घेऊन, नारायण देवांनी बादशाहला परत भेट म्हणून दूताला दिली. आलमगीराने (औरंगजेब) नारायण देवांचे देवत्व मान्य करून आठ गावे कायमस्वरूपी बहाल केली. देवांच्या असंख्य आश्रितांच्या समाधानासाठी आणि नारायण देवांची निरपेक्ष भावनेने केलेली सेवा निःसंशयपणे मानवतावादी होती.
नारायण प्रथम यांचे उत्तराधिकारी पुत्र चिंतामण देव द्वितीय, आपल्या पूर्वजांच्या पावलांवर पाऊल टाकून गणपतीची सेवा करून, अनेक चमत्कारांमधून (जीवनातील) समुद्री वादळात बुडणाऱ्या भाविक भक्तांच्या जहाजाला वाचवले.
(१) मोरोबा (२) चिंतामण प्रथम (३) नारायण प्रथम, (४) चिंतामण देव द्वितीय, आणि (५) धर्मेंद्र? (प्रथम) (६) नारायण द्वितीय यांनी पिढीजात दैवी प्रथांचे पालन केले. याच्या नंतरचा पुत्राने (७) धर्मेंद्र द्वितीयने आधीच्या पिढ्यांचे धार्मिक अनुसरण केले; पण या शेवटच्या (७व्या पिढीच्या) दुर्दैवाने त्याच्यावर शापाचा प्रभाव पडला. त्यात त्यांचे कुटुंब उद्ध्वस्त केले. मोरोबांना जिथे जिवंत गाडले होते त्या ठिकाणाहून (समाधीतून) कधीकधी वाद्यांचे आवाज ऐकायला येत (असत), म्हणून उत्सुकतेपोटी धर्मेंद्र द्वितीयने मोरोबाच्या पारंपारिक निषेधाची कल्पना असूनही, अपकृत्य केले. त्याने मोरोबांच्या समाधीची शिळा उचकटून काढली. त्यांनी आपल्या कुटुंबाच्या संस्थापकाला (मोरोबांना) बसलेल्या स्थितीत पाहिले, त्यांचे केस सैल आणि जमिनी(पर्यंत) वाढले होते, त्यांच्या हातात पुस्तक होते, गूढ रहस्यांच्या चिंतनात ते पूर्णपणे मग्न होते. त्यांनी (खणण्याच्या) आवाजांमुळे अस्वस्थ होऊन डोके फिरवले आणि ६व्या पिढीतील नारायण द्वितीयला पाहून उद्गारले, “अरे अधःपतिता! तू तुझ्या स्वतःच्या दुर्दैवावर शिक्कामोर्तब केले आहेस: तुला आणि तुझ्या मुलाला शाप असो, तुच्या नंतर तुमचे नाव (देवत्व) अस्तित्वात नसेल”!
हे ऐकून अत्यंत भीतीने आणि घाईत त्यांनी पुन्हा समाधीचे दार बंद केले गेले आणि दगडाला वितळलेल्या शिस्याने चिरेबंद सुरक्षित केले गेले. त्या क्षणापासून मोरोबांचा दैवी आत्मा पृथ्वीतलावरून निघून गेला आणि नारायण द्वितीयला केवळ मर्त्य सोडून गेला. तो मरण पावला, आणि त्याचा मुलगा धर्मेंद्र दुसरा गादीवर आला. त्याने तीन बायकांशी लग्न केले; परंतु, घातक शापांमुळे, त्याचे सर्व श्रम निरर्थक ठरले: सुमारे नऊ वर्षांपूर्वी ( म्हणजे सन १८१०च्या सुमारास) तो सातवी पिढीचा वारस शाप पूर्ण करून निपुत्र मरण पावला.
पण ब्राह्मणांनी, मंदिरातील मौल्यवान देणग्या जतन करण्याच्या स्तुत्य निर्धाराने आणि धार्मिक लोकांच्या विश्वासातून अजून लाभ मिळवण्याची आशा न बाळगता, देवाने त्याची शिक्षा रद्द केली आहे हे लोकांना पटवून देण्याचा प्रयत्न केला, (मोरया गोसावी - गजानन?) समाधानी आहेत आणखी काही काळ अवतार चालू ठेवा असा आदेश आहे, असे म्हणून त्यांनी धर्मेंद्रांचा एक दूरचा नातेवाईक, सुख(?)हरी नावाच्या मुलाची स्थापना गादीवर केली.
(देव - गॉड- गणपतीच्या आशीर्वादाने) वार्षिक मनोरंजन (उत्सव) प्रथा चालू सुरू राहील. प्रत्येक भाद्रपदातील शुक्लपक्षाच्या (गणेशचतुर्थीला), मार्गशीर्षांतील कृष्ण चतुर्थीला आणि दर महिन्याला एका रात्री ब्राह्मण (अन्नदानाची) प्रथा पाळली जाईल.
(या पुढील भागात सभेत उपस्थित इंग्रज सदस्यांना उद्देशून भारतीयांबद्दल कॅप्टन साईक्स भाष्य करतात असे दिसते)
काही (नास्तिकांच्या) मते ही मनोरंजक बाब असली तरी, असंख्य अतिथी, कधीकधी हजारोंच्या संख्येने, त्यांच्यासाठी महाप्रसादाची केलेली तरतूद कितीही मर्यादित प्रमाणात केली असली तरी, ती पुरेशी असते. कधीही अपुरी पडत नाही किंवा अनावश्यक उरत नाही. (अशी भारतातील देवांकडे - गणपतीकडे) शक्ती आहे. त्याचे महत्त्व शिष्यांच्या श्रद्धेवर अवलंबून असल्याने, गजाननाच्या शक्तीला पारावार नाही.
सुसंस्कृत युरोपीय लोकांनी असे म्हणू नये की, त्यांनी आपल्या (ख्रिस्ती) धर्माच्या सदगुणांचा, चालिरितींचा गौरव करावा आणि आशियाई (भारतीय) लोकांच्या धार्मिकतेची दिशाभूल करून द्यावी. दैवी शक्ती असलेल्या साध्या कपड्यातील माणसांचा राग करावा. त्यांच्या श्रद्धेची टिंगल करावी.
आम्ही (युरोपीय) लोक तत्त्ववेत्ता बनून (भारतीयांच्या) मनाची दुर्बलता, (अर्थिक) कमकुवतपणा, त्यांची भोळसर मूर्खता अशी अवहेलना करतो, अंध व्यक्तीला दृष्टी आली यासारख्या (अलौकिक) घटनांची अंधश्रद्धा म्हणून हेटाळणी करतो आणि त्याची विश्वासार्हता कशी मानावी म्हणून शोक व्यक्त करतो. असे (आम्ही युरोपीय) लोक कोणत्याही परिस्थितीत मनुष्याचे विरूपण (खोटेपण) निर्माण करू शकतो: पण (भारतात) जो अंधत्वाच्या घटनेचा उल्लेख करेल त्याची पवित्र श्रद्धाभावना अशा पुनरावृत्ती होणाऱ्या घटनांनी प्रभावित असावी. सामान्य मानवी उपभोगांपेक्षा वरच्या समजल्या जाणाऱ्या घटनांच्या समर्थनासाठी मोठ्या प्रमाणावर देणग्या मागितल्या जात आहेत आणि उत्सुकतेने स्वीकारल्या गेल्या आहेत, यासाठी वर्षानुवर्षे असंवेदनशीलता चालू ठेवावी का? अशी हाकाटी (आम्हा युरोपियन लोकांकडून) केली जाते आहे. परंतु (हेच लोक) आजच्या (१८१९सालच्या) काळातील जोहाना साउथकॉटच्या (ख्रिस्ती) अनुयायांच्या बाबतीत, श्रद्धा आणि विश्वासाच्या पायाशिवाय चमत्काराच्या घटनांवर विश्वास - श्रद्धा ठेवल्याशिवाय उपाय नाही असे म्हणतात तेंव्हा आपणही तितक्याच राक्षसी विश्वासार्हतेची आणि अंधश्रद्धेची साक्ष देतो हे विसरून चालणार नाही.
(मोरया) देवांचे कुटुंब अजूनही अस्तित्वात आहे; आणि सण नेहमीप्रमाणे साजरे केले जातात. परंतु आता (सध्या) जिवंत असलेल्या (मोरयांच्या) प्रतिनिधींना विशेष आदर दिला जात आहे किंवा सर्वसाधारणपणे ब्राह्मणांवर नेहमीपेक्षा जास्त श्रद्धा आहे का नाही याची मला कल्पना नाही.
(स्वाक्षरी केलेले)
डब्ल्यू एच साईक्स, कॅप्टन.
Transactions of the Literary Society of Bombay. Volume 3, Page 69 - 78 1823.
by Transactions of the Literary Society of Bombay.
(या लिटररी सोसायचीचे सभासद व्हायचे असेल तर दर वर्षासाठी त्या काळातील १०० रुपये सदस्य मूल्य होते. (म्हणजे २०० वर्षांनंतर त्याचे किती रुपये मानायचे ते वाचकांनी ठरवावे!)
[टीप. - एशियाटिक संशोधन पहा, खंड. व्हीईटी., पान. 383. - एड.]
मराठीत स्वैर अनुवाद. (कंसातील शब्द शशिकांत ओक यांचे)
अन्य जमवलेली माहिती
चिंचवड देवस्थान संस्थेच्या वेबसाईटवरून-
कर्नाटकातल्या बिदर जिल्ह्यात शाली नावाचे गाव आहे. त्यात वामनभट्ट शाळिग्राम आणि पत्नी पार्वतीबाई नांदत होते. देशस्थ ऋग्वेदी, हरितस गोत्राचे वैदिक वामनभट्ट श्रुतिस्मृतिपुराणोक्त गृहस्थाश्रमाचे काटेकोर पालन करत होते. अर्धे अधिक आयुष्य लोटले तरी पुत्रसंतान नाही म्हणून उदास झालेले वामनभट्ट घर सोडून निघाले. पत्नीबरोबर मजल-दरमजल प्रवास करत मोरगावला आले. त्यांना उशिरा मुलगा झाला, तोच मोरोबा ऊर्फ मोरेश्वर....
संजीवन समाधी - मार्गशीर्ष वद्य षष्ठी शके १४८३, साल १५६१.
चिंचवड ते मोरगाव ८२ किमी नकाशा
कर्नल विल्यम हेन्री साईक्स,
FRS (२५ जानेवारी १७९० - १६ जून १८७२) हे एक इंग्रजी निसर्गवादी होते ज्यांनी भारतात ब्रिटिश सैन्यासह सेवा केली होती आणि भारतीय लष्कराबरोबर राजकारणी, इंडॉलॉजिस्ट आणि पक्षितज्ज्ञ म्हणून त्यांच्या कार्यासाठी विशेष ओळखले जात होते. व्हिक्टोरियन सांख्यिकी चळवळीचे प्रणेते, रॉयल स्टॅटिस्टिकल सोसायटीचे संस्थापक, त्यांनी सर्वेक्षण केले आणि सैन्याच्या ऑपरेशनची कार्यक्षमता तपासली. भारतात सेवेतून परतल्यावर ते ईस्ट इंडिया कंपनीचे संचालक आणि एबरडीनचे प्रतिनिधित्व करणारे संसद सदस्य झाले. [1]
कॅप्टन डब्ल्यू एच साईक्स ...
त्यानी किर्की (खडकी) आणि पूना(येरवडा?) च्या लढाईत एका रेजिमेंटची कमांड केली होती आणि डोंगरी किल्ले काबीज करण्यात त्याचा सहभाग होता. १८१० पर्यंत ते हिंदी आणि मराठी भाषा बोलू शकत होते. २५ जानेवारी १८१९ रोजी ते कॅप्टन रँकवर काम करत होते. (कदाचित या काळात त्यांनी हा शोधनिबंध लिहिला असावा.) ते एशियाटिक सोसायटी ऑफ बॉम्बेचे संस्थापक सदस्य होते. [18]
{अनुषंगिक माहिती
- या सभेच्या सत्रात आणखी काही शोध निबंध सादर केले गेले होते. त्यातील एक सर्जन थॉमस कोट्स यांनी (पेशवाई संपुष्टात आल्यानंतर) सन १८२० सालच्या सुमारास पुण्याजवळच्या लोणीकंद गावाची निवड करून महाराष्ट्रातील एका खेड्यातील जीवन, समाजरचना याचा सूक्ष्म अभ्यासकरून एक ८०-९० पानांचा निबंध सादर केला होता.
१२५ वर्षांनी त्याच लोणीकंद गावाची समाजशास्त्राच्या अंगाने पहाणी करायला मुंबई विद्यापीठाचे डॉ. घुर्ये गोविंद सदाशिव व त्यांच्या अनुयायांनी पहाणी करून एक अहवाल सादर केला होता. तो कै. व्यंकटेश माडगुळकरांच्या वाचनात आला. त्यावर ‘नवे गाव’ शीर्षकाचा एक लेख 'साप्ताहिक तेजस्वी'मध्ये सन १९७०च्या सुमाराला प्रसिद्ध झाला होता. त्यांनी त्यांच्या अनुभवातील खेड्यातील जीवनाची तुलना करून लेख लिहिला होता. तो नंतर त्यांच्या 'चित्रे आणि चरित्रे' नामक एका पुस्तकात समाविष्ट केला गेला. ते पुस्तक अनपेक्षितपणे माझ्या (शशिकांत ओकांच्या) वाचनात आले. त्यातील एक वाक्याने, “... खेडी बदलू लागली, देश स्वतंत्र झाला आणि काळाने विलक्षण वेग घेतला. खेड्याचा कायापालट झाला असे आपण म्हणतो. हा कायापालट कसा झाला आहे, काय झाला आहे. ह्याचा नीट तपास घ्यायचा तर कोट्साहेबाने जसे कुठलेतरी एक लोणी गाव घेऊन त्यांचा सांप्रत वृतांत लिहिला, तशी महाराष्ट्रातील दहा-पाच खेडी घेऊन त्यांचा लिहिला पाहिजे. लोकांना भेटून, बोलून, प्रत्यक्ष स्थिती डोळ्यांनी पाहून आजच्या खेड्याचे चित्र रेखाटले पाहिजे....”? मला हे काम हाती घ्यायला प्रेरित केले. यथावकाश विमाननगरहून २५ कि.मी. लोणीकंद गावाला प्रत्यक्ष भेट देऊन तेथील सद्य परिस्थिती काय आहे आता तिथे दोनशे वर्षांनंतर त्या वास्तू, रस्ते, लोकजीवन याचा अहवाल सादर केला गेला. ‘माझे छंद’ २०२० च्या दिवाळी अंकात तो प्रकाशित केला गेला. ई - बुक स्वरूपात तो सध्या उपलब्ध आहे.}
प्रतिक्रिया
2 Nov 2021 - 11:32 pm | ज्ञानोबाचे पैजार
माहिती पूर्ण लेख आवडला, प्रचंड काम केले आहे तुम्ही आणि ते तितक्याच रंजक पद्धतीने आमच्या समोर ठेवले
पैजारबुवा,
8 Nov 2021 - 9:44 am | शशिकांत ओक
कर्नल साईक्स यांचा फोटो समाविष्ट केल्या बद्दल धन्यवाद...
3 Nov 2021 - 3:01 am | पाषाणभेद
इंग्रज अधिकार्यांच्या कामाच्या पद्धतीचा नमुना समोर आला.
तुकारामबोवा व चिंतामण देव यांची भेट हृद्य आहे.
3 Nov 2021 - 2:00 pm | चित्रगुप्त
लेख अतिशय अभ्यासपूर्ण आणि उत्कृष्ट आहे. मात्र लेखाच्या शीर्षकातून त्याची यथार्थ कल्पना येत नाही. काहीतरी धार्मिक (अंधश्रद्धायुक्त ?) लिखाण असावे असे वाटून माझ्यासारख्या वाचकांनी तो वाचण्याची शक्यता फार कमी आहे.
एका इंग्रजाने १८१९ साली केलेले हे संशोधन आहे हे शीर्षक वाचून कळायला हवे. अजून तसा बदल करणे शक्य असेल तर अवश्य करावा, असे सुचवतो.
3 Nov 2021 - 8:08 pm | मदनबाण
अतिशय उत्तम आणि माहितीपूर्ण लेखन !
मदनबाण.....
4 Nov 2021 - 10:26 am | शशिकांत ओक
इंग्रजीतील लेखाला मराठी भाषेचा बाज आणून आदर केला आहे आपल्याला तो माहितीपूर्ण वाटला म्हणून धन्यवाद.
3 Nov 2021 - 9:24 pm | मुक्त विहारि
लेख आवडला
4 Nov 2021 - 12:31 am | शशिकांत ओक
“पुण्याजवळ चिंचवडला जागृत देवस्थानाची स्थापना कशी झाली याचा २०२ वर्षापूर्वीचा वृत्तांत“
असा लांबलचक मथळा होता पण तांत्रिक अडचणींमुळे त्याला सडपातळ करता करता सध्याचे शीर्षक बनले...
...
4 Nov 2021 - 11:34 am | श्रीगुरुजी
अत्यंत व्यासंगी लेख! खूप नवीन माहिती मिळाली.
4 Nov 2021 - 3:53 pm | टर्मीनेटर
माहितीदायक लेख आवडला 👍
4 Nov 2021 - 5:14 pm | तुषार काळभोर
तुमचा लोणीकंद गावाचा लेखसुद्धा खूप अभ्यासाने लिहिलेला होता. (माझी नोकरी मागील दहा वर्षांपासून तिथेच असल्याने रोज लोणीकंद मध्ये जावे लागते.) लेखातील काही गोष्टी तत्कालीन गावात जशा होत्या तशा आताही आहेत. (मी माझे गाव लोणी काळभोर, मी राहतो ते हडपसर आणि माझे आजोळ हिवरे येथे पाहीले आहे). पण बऱ्याच गोष्टी अगदी नव्या होत्या. उदा. जनगणना आणि सारा यादी.
या लेखातील ढोबळ माहिती मोरया गोसविंविषयी वाचताना मिळाली होती. पण लेखातील तपशील पूर्णपणे नावे आहेत. युरोपियन लोकांनी भारतीय जीवनाविषयी लिहिताना येथील व्यक्ती, स्थळे, गावे यांची नावे त्यांना ऐकू आली, समजली तशी त्यांच्या भाषेत लिहिली. त्यामुळे अर्थ लावताना अभ्यास असावाच लागतो. (अन्यथा चिंचोरे गाव महाराष्ट्राच्या नकाशात शोधूनही सापडणार नाही!)
बऱ्याच युरोपियन संग्रहात शिवाजी महाराजांविषयी उल्लेख Sevaji, Sevajee, Sivagee असा वेगवेगळ्या प्रकारे असतो. त्यामुळे लाखो वस्तू, चित्रे आणि पत्रांतून आणि यादीतून शिवाजी महाराज यांच्याविषयी शोधणे कठीण होऊन जाते. (मनो आणि बॅटमॅन यांच्या मिपा तसेच इतर लेखांत तसे वाचले आहे.) त्यामुळे Gunputti, Pattell अशा नावांचा योग्य तो अर्थ लावून अतिशय सुगम रूपांतर तयार केले आहे.
खूप धन्यवाद..!
ता.क. ब्रिटिशकालीन कागदपत्रांतून तत्कालीन व सद्यकालीन भौगोलिक आणि सामाजिक स्थितीची तुलना करणे खूप रोचक असते. गुगल बुक्स मध्ये Hadapsar, Kalbhor असे शब्द शोधल्यावर बरीच अनवट माहिती मिळते. उदा. १८८० चा एक उल्लेख आहे. पुणे शहरात घरे दगडांची आहेत. हे दगड येरवडा टेकडीच्या मागे असलेल्या खाणीतून, हडपसर, मोहंमदवाडी येथील खाणीतून आणले जातात. (येरवडा टेकडीच्या मागे अशी खाण विश्रांतवाडी चौकात आहे. हडपसरला तुकाई टेकडीच्या मागे आहे. आणि दोन्ही अजूनही तशाच आहेत. तिथून जाताना कधीकाळी येथील दगडांनी पुण्यातील वाडे बांधले गेले होते, हा विचार रोमांचित करतो.)
तुमच्याकडून अजून अशा लेखांची प्रतीक्षा आहे. :)
5 Nov 2021 - 2:35 pm | शशिकांत ओक
आपण लोणीकंद गावाच्या आसपास कामानिमित्त येता हे वाचून आनंद झाला.
आपल्या सहकार्याने डॉ घुर्ये यांनी लोणीकंद गावाचा केलेल्या शोधकार्यातील बारकावे शोधायला हवे आहेत. कोरोनाच्या प्रादुर्भावातून व्यवस्थित सुटका झाली की आपल्या सहकार्याने काही करता येईल का? आपले विचार जाणून घ्यायला आवडेल. 9881901049
4 Nov 2021 - 6:39 pm | शशिकांत ओक
आपल्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करीन.
लोणी या नावामागे काय संदर्भ आहे ते आपणाकडून समजून घ्यायला आवडेल.
दगडांच्या खाणी... लोहगाव हवाईपट्टीलगतची खाण फारच भव्य आणि खोल होती १९८६ साली आलेल्या प्रचंड पाऊसधारांनी ती तळ्यात रूपांतरित झाली. संपूर्ण हवाईदलातील इमारतींचे बांधकाम यातून काढलेल्या पत्थर फोडीतून असावे. नाडीग्रंथ भविष्य प्रेमी कै वझे यांच्या एका मुलाने तिथे सिव्हिल इंजिनियर असताना ते बांधकाम पाहिले होते. असो.
6 Nov 2021 - 1:08 am | पाषाणभेद
त्याचप्रमाणे कोंढव्यातल्या हॉस्पीटल जवळच्या खडी मशीन चौकाचे काय? ह्या चौकाचे नाव खडी मशीन चौक आहे की खादी मशीन चौक?
खडी मशीन असे नाव असेल तर येथे पूर्वी खाणीतले दगड व त्याची खडी मिळायची काय? दगडांचे क्रशर येथे होते काय?
6 Nov 2021 - 7:08 am | सौंदाळा
तपशीलवार माहितीने भरलेला रंजक लेख आवडला.
या देवळात, परिसरात आठवड्यातून किमान एकदा तरी जाणे होते.
मोरया गोसावी समाधी मंदिरापासून जवळच मंगलमूर्ती वाडा आहे तेथे त्यांचे आजचे वंशज राहतात. तिकडेच वेदपाठशाला पण आहे. या वाड्यातील गणपतीचे देऊळ सुंदर असून सारसबागेतल्या गणपतीच्या देवळाची आठवण करून देते.
इतिहासात शिवरायांनी चिंचवडच्या देवांना जमिनीचा निवाडा देऊन न्याय व्यवस्थेत ढवळाढवळ केल्याने ताकीदपत्र दिल्याचे वाचले आहे.
देव आणि पेशवे यांचे संबंध मात्र चांगले असावेत. नारायणराव पेशव्यांचा खून झाला त्या दिवशी दुपारी ते देवांच्या वाड्यात जेवायला होते आणि केशरीभात खाल्ला असे उल्लेख वाचले आहेत.
चिंचवडगावचा मोरया गोसावी मंदिराच्या आजूबाजूचा एकूण परिसरच काही वर्षांपूर्वी सुंदर होता. आता वाडे पाडून बिल्डिंग करायचे काम चालू झाल्यापासून कशीही बांधकामे झाली आहेत. मात्र चार पाच वर्षांपूर्वी देवळाला लागून असलेल्या छोट्या बगीचाचा आता चांगलाच विस्तार केला आहे. तसेच या देवळापासून जवळच असलेले धनेश्वर हे महादेवाचे मंदिर पण सुंदर आहे.
मोरया गोसावी मंदिर परिसर सुंदर आणि स्वच्छ आहे पण कळवत्री दगडांनी बनलेल्या या देवळाचे कळस रंगवायला नको होते. विशिष्ट पद्धतीने प्रदक्षिणा घातली तर मुख्य समाधी, बाजूच्या वंशजांच्या समाध्या, शिवलिंग यांना व्यवस्थित प्रदक्षिणा होते. लहानपणी देवळाच्या मागेच संथपणे वाहणाऱ्या पवना नदीत पाय धुवून देवळात जायची पध्दत होती. पण तिकडे अपघात, आत्महत्या वगैरे प्रकार व्हायला लागल्यावर नदीवर जायचा रस्ता (छोटे दार लावून) बंद करून टाकला.
मोरया गोसावींच्या जन्म (का समाधी?) तिथीला (साधारण नोव्हेंबर, डिसेंबर) महिन्यात इकडे मोठा उत्सव असतो. आणि मंदिराशेजारी असलेल्या मोठ्या पटांगणात भव्य मांडव, स्टेज बनवून दर्जेदार कार्यक्रमांची रेलचेल असते.
7 Nov 2021 - 1:20 pm | शशिकांत ओक
मोरया गोसावी समाधी मंदिरापासून जवळच मंगलमूर्ती वाडा आहे तेथे त्यांचे आजचे वंशज राहतात.
त्या वंशजांनी हा लेख वाचून आपली प्रतिक्रिया द्यावी. आणखी काही माहिती त्या नंतरच्या काळात घडली असेल तर ती आपण मिळवावी. कदाचित त्यांनाही असे लेखन २०० वर्षापूर्वी केले होते हे माहित असेल.
14 Nov 2021 - 2:48 am | शशिकांत ओक
आपले मोरया गोसावी मंदिरात जाणे झाले का?
समजून घ्यायला उत्सुकता आहे.
8 Nov 2021 - 12:39 pm | Bhakti
लिखाण आवडले.एखाद्या प्रसिद्ध वंशावळीचा, अभ्यास छान रोचक वृत्तांतात मांडला आहे.भारतीय श्रद्धेचा आदर परकीयांनी केलेला फार कमी वाचनात येते, त्यामुळे ही माहिती चांगली वाटली.
8 Nov 2021 - 5:23 pm | aschinch
मोरया गोसावी हे आमचे कुलदैवत आहे आणि मी जरी बंगलोरला रहात असलो तरी दरवर्षी या मंदिराला भेट देतो. हा लेख अतिशय माहितीपूर्ण आणि वाचनीय आहे. आपण या लेखासाठी घेतलेले परिश्रम लक्षात येतात. खूप धन्यवाद आणि शुभेच्छा!
19 Nov 2021 - 11:45 pm | शशिकांत ओक
चिंंचोरेच्या मंदिर धाग्याने १३शेचा पल्ला गाठला याचा आनंद झाला. कोणाला शक्य असेल तर त्यांनी मंदिराच्या व्यवस्थापनाला ही माहिती सांगून कळवावे.
1 Dec 2021 - 2:57 pm | गुल्लू दादा
रोचक माहिती. धन्यवाद.
2 Dec 2021 - 10:32 am | कर्नलतपस्वी
धन्यवाद, माहिती पुर्ण संदर्भासहित स्पष्टीकरण लेख खूप आवडला.