body {background-image: url("https://i.postimg.cc/52VQjg83/bg-main.jpg");}
.navbar-fixed-top {
background-color: #000011;
border-bottom: 1px solid #111;
}
.node-info {background-color: #f5f5f5;padding:8px;}
.page-header {background-color: #008080;color: #ffffff;text-align:center;border-bottom: 0px solid #111;box-shadow:0 2px 5px 0 rgba(0,0,0,0.16),0 2px 10px 0 rgba(0,0,0,0.12);}
/* जनरल */
h1, h2, h3, h4 {font-family:'Eczar',serif}
p {font-family: 'Noto Sans', sans-serif; font-size:16px; text-align:justify;}
h5 {font-size:15px!important; text-decoration:underline;}
/* Hidden Items*/
.input-group {display: none !important;}
.page-header { padding-top:16px !important;}
/* फोटो */
.field-items img {background-color: white;border: 1px solid #eee;padding:6px;box-shadow:0 2px 5px 0 rgba(0,0,0,0.16),0 2px 10px 0 rgba(0,0,0,0.12);max-width:100%;height:auto!important;}
.author-type-posted, .field-items a:link {color:#660000;}
.left {float:left;display:inline-block;margin-right:10px;margin-top:16px;}
.right {float:right;display:inline-block;margin-left:10px;}
.center {margin: auto;}
.portrait { margin-bottom:10px;max-width:450px;}
.landscape { margin-bottom:10px;max-width:800px;}
.kavita p{text-align:center}
.title {text-align:center;margin-bottom:32px;margin-left:24px;margin-right:24px;}
.col-sm-9 {padding:16px;background-color:#fefefa;box-shadow:0 4px 10px 0 rgba(0,0,0,0.2),0 4px 20px 0 rgba(0,0,0,0.19)}
.anklogo {float:left; max-width:300px;margin-top:4px;margin-right:16px;}
.voilet {background-color: #9900cc;color:#ffffff;}
पणती
पणतीला उमगत नाही चांगलं-वाईट
कुरूप-सुंदर वा उजेड-अंधार
ती अविरत तेजाची साथ देत
सूर्याचं प्रतिबिंब होऊन चालत राहते
तिला समजत नाही दिवस-रात्र
चंद्र-तारे, तिचा प्रकाश तिलाच दिपवतो
कितीदा वाटतं तिला शांत व्हावं
दुसर्या कोणाच्या प्रकाशात जग बघावं
पण तिच्या प्रकाशात मातीला दिसते
दिवाळीसाठी काढलेली भलीमोठी रांगोळी
आकाशात चमकणारा दूरचा एक तारा
आणि एका छोट्याश्या पणतीची मोठ्ठी ज्योत
सई मांडे
(२४/१०/२०२१)
प्रतिक्रिया
2 Nov 2021 - 10:25 pm | ज्ञानोबाचे पैजार
सई तुझ्याकडे इतक्या लहान वयातच विलक्षण प्रतिभा आहे, दिवाळी टू दिवाळी ना लिहिता सुचेल तसे लिहित रहा, आम्हाला वाचायला आवडेल
पैजारबुवा,
9 Nov 2021 - 8:26 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सई तू अस्सेच लिहिते राहा. कविता आवडली.
-दिलीप बिरुटे
3 Nov 2021 - 3:21 am | पाषाणभेद
एका छोट्याश्या पणतीची मोठ्ठी ज्योत
हे खूप निराळे आहे!!
3 Nov 2021 - 7:03 am | गवि
सई, उत्कृष्ट काव्य. असेच आणखी येऊ दे. शुभेच्छा.
3 Nov 2021 - 11:44 am | किरण कुमार
छान विषय , आणि हाताळणी पण सुरेख
3 Nov 2021 - 12:04 pm | मुक्त विहारि
अशाच काही पणत्या आठवल्या
3 Nov 2021 - 12:08 pm | पियुशा
किती मस्त !
8 Nov 2021 - 12:35 am | श्रीगणेशा
कवितेचा अर्थ ज्याने त्याने उमगायचा, जाणवायचा असतो.
पण न राहवून नमूद करावेसे (विचारावेसे नाही) वाटले - ही कविता एका गृहिणीचं मनोगत असावं!
कविता आवडली.
10 Nov 2021 - 2:14 pm | चौथा कोनाडा
+१ श्रीगणेशा.
8 Nov 2021 - 2:19 pm | तुषार काळभोर
तुकोबांच्या आवलीने कविता लिहिली असती तर काहिशी अशीच असती.
8 Nov 2021 - 7:01 pm | प्राची अश्विनी
सुंदर!
8 Nov 2021 - 11:22 pm | बबन ताम्बे
आशयघन कविता. खूपच आवडली.
9 Nov 2021 - 8:17 am | चित्रगुप्त
ही कविता वाचून साधेपणातल्या सौंदर्याची प्रचिती आली. खूप छान.
9 Nov 2021 - 6:01 pm | मिसळलेला काव्यप्रेमी
तुमच्यासारख्या जाणत्यांकडून मिळालेल्या प्रोत्साहानाबद्दल सईकडून खुप खुप धन्यवाद!
9 Nov 2021 - 7:22 pm | अनन्त्_यात्री
स्वत: धन्यवाद देणे अधिक योग्य ठरले असते.
9 Nov 2021 - 10:59 pm | मिसळलेला काव्यप्रेमी
तिचं खात नाही अजुन इथे.
10 Nov 2021 - 1:56 pm | ज्ञानोबाचे पैजार
तिच्या नावानेच तर कविता प्रकाशित झाली आहे.
नसेल तर तिला प्रशांत काका कडून पासवर्ड घ्यायला सांग.
पैजारबुवा,
10 Nov 2021 - 2:14 pm | चौथा कोनाडा
बरोबर.
मागच्या दिवाळीतही http://misalpav.com/node/47851 या धाग्यावर तीच्या नावावर कविता प्रकाशित झाली होती !
हॅप्पी दिवाळी !
10 Nov 2021 - 2:27 pm | मित्रहो
खूप छान सुंदर कविता
हे भारी आवडले
11 Nov 2021 - 9:51 am | Bhakti
सुंदर लिहीलय.
15 Nov 2021 - 6:13 pm | श्वेता व्यास
प्रतिक्रिया वाचून कविता वयाने लहान मुलीने लिहिली आहे असे समजते, इतकी सुंदर कविता लिहिल्याबद्दल कौतुक ! लिहिते राहावे.
16 Nov 2021 - 2:06 am | गुल्लू दादा
लहान काव्यप्रेमीस खूप खूप शुभेच्छा.