चालू घडामोडी अश्विन शके १९४३ (ऑक्टोबर २०२१)

वामन देशमुख's picture
वामन देशमुख in राजकारण
7 Oct 2021 - 7:28 pm

शारदीय नवरात्रोत्सवाच्या सर्व मिपाकरांना मनःपूर्वक शुभेच्छा.

दसरा-दिवाळीच्या उत्सवी पर्वास सुरुवात होत आहे, त्यानिमित्ताने सर्व मिपाकरांवर श्री शारदा देवीची कृपा होवो.

प्रतिक्रिया

Rajesh188's picture

11 Oct 2021 - 6:55 pm | Rajesh188

शेतकऱ्यांना चिरडले तो व्हिडिओ त्याच्या अकाउंट वरून share केला होता का ?नसेल केला तर त्याच्या ह्या व्हिडिओ ला काहीच किंमत देण्याची गरज नाही.

Rajesh188's picture

11 Oct 2021 - 6:53 pm | Rajesh188

सरकार आणि पक्ष ह्या वेगवेगळ्या गोष्टी असल्याचं पाहिजेत.आपल्याच पक्षाचे सरकार लोकांविरुद्ध निर्णय घेत असेल,लोकांवर अन्याय करत असेल तर पक्षाचे कर्तव्य आहे त्याचा विरोध करणे.स्व पक्षाचे सरकार आहे म्हणून मतिमंद सारखं सरकार च्या चुकीच्या वर्तनाचे समर्थन पक्ष करत असेल त्या पक्षात आणि गाढवाच्या झुंडीत काय फरक आहे.

धनावडे's picture

11 Oct 2021 - 8:57 pm | धनावडे

मला तुमचं फार कौतुक वाटत, स्वतःची जरा पण न वापरता कस काय राहू शकता तुम्ही.

चंद्रसूर्यकुमार's picture

11 Oct 2021 - 9:24 pm | चंद्रसूर्यकुमार
चंद्रसूर्यकुमार's picture

11 Oct 2021 - 9:30 pm | चंद्रसूर्यकुमार

मी आज संध्याकाळपासून अनेक प्रतिसाद या धाग्यावर लिहिले आहेत पण दरवेळेस एरर येत आहे आणि माझा प्रतिसाद पोस्ट होत नाही तर नुसता मथळा येत आहे. इतर सभासदांचे प्रतिसाद पोस्ट होत आहेत. नक्की काय प्रकार आहे? की माझे विचार हल्ली मिपाच्या संपादकांना मान्य नाहीत म्हणून असे होत आहे?

हा पण प्रतिसाद पोस्ट होईल की नाही याची खात्री नाही.

राघवेंद्र's picture

11 Oct 2021 - 10:01 pm | राघवेंद्र

आला तुमचा प्रतिसाद

ज्ञानोबाचे पैजार's picture

12 Oct 2021 - 10:01 am | ज्ञानोबाचे पैजार

काहीही झाले की संपादक मंडळाच्या नावाने बोटे मोडायला सुरुवात करायची, मिपावर आजकाल हा नवा ट्रेंड बघायला मिळत आहे

प्रतिसाद प्रकाशित करताना काहीवेळा अडचणी येतात, विशेषतः मोबाईल वरुन प्रतिसाद दिले, त्यात स्माईलिंचा वापर केला, की फक्त विषय प्रकाशित होतो पण कॉमेंट मधले काही येत नाही असे बर्‍याच वेळा होते. जुन्या सदस्यांना किमान इतके तरी माहित असलेच पाहिजे.

तरीही जर का असा संशय होता, तर त्याचे निराकरण करण्याचे इतर मार्ग उपलब्ध आहेत. पण त्या मार्गांचा वापर न करता जाहिर पणे थेट संपादक मंडळाला जबाबदार धरण्यात आले आहे. जणु काही सगळे संपादक आपले कामधंदे सोडून चालु चिखलफेकीचे धागे २४ तास मोठ्या चवीने वाचत बसलेले असतात आणि अमुक सदस्याने प्रतिसाद दिला रे दिला की तो संपादित करतात.

या व्यतिरीक्त संपादक मंडळ निद्रिस्त आहे , भेदभाव करते, अमुक विचारांच्या / प्रकारच्या लोकांवरच कारवाई करते, काही सदस्यांना मोकाट सोडते, अमक्याबरोबर कट्टा केला की त्याचा आयडी उडत नाही अशा प्रकारच्या प्रतिक्रिया जाहिर पणे देण्याची जणू मिपावर अहमहिकाच लागलेली आहे.

आणि असे प्रतिसाद देण्यात मिपाचे अनेक जेष्ठ आणि माननिय सदस्य आजकाल धन्यता मानु लागले आहेत.

अशा सर्व सदस्यांना नम्र विनंती की त्यांनी आपल्या भावनांना आवर घालावा व प्रतिसाद प्रकाशित करण्याआधि कमीत कमी दोन वेळा वाचून काढावा व तारतम्याने विचार करुन मगच तो प्रतिसाद प्रकाशित करावा.

मिपावर आम्ही दोन घटका चांगल्या जाव्या, काहितरी छान वाचायला मिळावे या अपेक्षेने येतो, पण मिपा उघडले की समोर पहिल्यांदी येते ती चिखलफेकच. त्या मूळे इतर अनेक चांगले धागे खाली फेकले जातात. चांगल्या लेखकांचा उत्साहभंग होतो व वाचकांच्या पदरी पडते ती केवळ निराशाच.

कधी कधी तर ही चिखलफेक किळस यावी इतक्या खालच्या थराला जाते, इतकी की काही प्रतिसाद लिहिले तरी कसे असतील? असा प्रश्र्ण पडतो.

चालु चिखल फेकीच्या धाग्यांची अवस्था सध्या अति झाले आणि हसु आले इतकी केविलवाणी होत चालली आहे. तेव्हा सर्व चिखलकुस्तीगिरांना नम्र विनंती आहे की त्यांनी कृपया थोडा संयम बाळगावा.

हा प्रतिसाद केवळ चंसुकुंसाठी नसून अशा सर्व जेष्ठ आणि श्रेष्ठ माननिय सदस्यां करता आहे जे या चिखलफेकीत मोठ्या उत्साहाने सहभाग घेत असतात.

पैजारबुवा,

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

12 Oct 2021 - 10:23 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अगदी १०० % योग्य आणि महत्वाचा प्रतिसाद. सहमती आहेच. धन्यवाद.

-दिलीप बिरुटे
(मिपाकर)

गवि's picture

12 Oct 2021 - 10:33 am | गवि

पैजारबुवा .. +१११

मनातले लिहिलेत. धन्यवाद.

सुबोध खरे's picture

12 Oct 2021 - 10:38 am | सुबोध खरे

काही सदस्य कोणतेही पुरावे दुवे न देता बेफाट विधाने करत आहेत त्यावर संपादक मंडळ कोणतीही कृती करत नाही.

स्वतः कोणतेही लेख न लिहिता किंवा अभ्यासपूर्वक विचार न मांडता कोणत्याही धाग्यावर वाटेल ती विधाने करून चांगल्या धाग्यांचा विचका केला जातो आहे असे असून संपादक मंडळ काहीही करत नाही यामुळेच अशी धुळवड खेळली जाते असे मी स्पष्टपणे म्हणतो आहे.

चंद्रसूर्यकुमार's picture

12 Oct 2021 - 11:27 am | चंद्रसूर्यकुमार

स्वतः कोणतेही लेख न लिहिता किंवा अभ्यासपूर्वक विचार न मांडता कोणत्याही धाग्यावर वाटेल ती विधाने करून चांगल्या धाग्यांचा विचका केला जातो आहे असे असून संपादक मंडळ काहीही करत नाही यामुळेच अशी धुळवड खेळली जाते असे मी स्पष्टपणे म्हणतो आहे.

हे लक्षात न घेणार्‍यांनाच नि:पक्षपाती वगैरे म्हटले जाते.

चांदणे संदीप's picture

12 Oct 2021 - 10:50 am | चांदणे संदीप

काही सदस्यांसाठी मिपा हे व्यासपीठ फक्त आणि फक्त आपली मते मांडण्यासाठीच आहे असे दिसते. ना कोणत्या चांगल्या लेखांचा, काव्यांचा आस्वाद घ्यायचा ना स्वतः आपल्या लेखनातून कोणत्याही प्रकारची साहित्यनिर्मिती करायची. हे सर्व फुकट आहे किमान याची तरी जाण प्रत्येकाने ठेवावी अशी अपेक्षा आहे.

सं - दी - प

चंद्रसूर्यकुमार's picture

12 Oct 2021 - 10:50 am | चंद्रसूर्यकुमार

मान्य. काल मी तो प्रतिसाद बराच वेळ घालवून लिहिलेला होता आणि प्रकाशित करा वर क्लिक केल्यावर एरर येत होती. असे किमान दहा वेळा झाले असावे आणि त्याचवेळेस इतर सगळ्यांचे प्रतिसाद येत होते त्यामुळे तो उद्वेग होता.

हा प्रतिसाद केवळ चंसुकुंसाठी नसून अशा सर्व जेष्ठ आणि श्रेष्ठ माननिय सदस्यां करता आहे जे या चिखलफेकीत मोठ्या उत्साहाने सहभाग घेत असतात.

याचा अर्थ मी चिखलफेकीत सहभागी होत आहे असे थेट तुम्ही लिहिले आहे. असो. तुम्हाला काय वाटायचे असेल ते वाटू दे. त्यावर माझे नियंत्रण नाही. मी काल लिहिलेला एक प्रतिसाद तुम्हाला चिखलफेक वाटत असेल तर त्याच्या शेकडो नाही हजारो पटींनी शूर, कोर्डे वगैरे ५०-१०० आयडींनी केलेल्या चिखलफेकीविरूध्द तुम्ही कधी काही लिहिल्याचे कधी वाचनात आले नाही. हे म्हणजे आकंठ दारूत बुडलेल्यांना काही न बोलता चुकून एखादा घोट कधीतरी घेतला तर तो माणूस कसा दारूडा असे म्हटल्यासारखे झाले.

तेव्हा...

अशा सर्व सदस्यांना नम्र विनंती की त्यांनी आपल्या भावनांना आवर घालावा व प्रतिसाद प्रकाशित करण्याआधि कमीत कमी दोन वेळा वाचून काढावा व तारतम्याने विचार करुन मगच तो प्रतिसाद प्रकाशित करावा.

हे तुम्ही स्वतः केले आहे की नाही हा प्रश्न नक्कीच पडतो.

स्पष्टच लिहितो. दुसर्‍यांना चिखलफेकीत सहभागी असलेले वगैरे वाटेल ते लिहिण्यापूर्वी जरा आरशात बघा ही विनंती. आणि हे मान्य नसेल तर माझ्या प्रतिसादांना उत्तर द्यायची तसदी घेऊ नये ही पण विनंती.

बाकी सतत कोणाला तरी जज करणार्‍यांना फाट्यावर मारत आहे.

पूर्णविराम.

श्रीगुरुजी's picture

12 Oct 2021 - 11:35 am | श्रीगुरुजी

+ १

कागलकर वारंवार नवीन अवतार धारण करून येतो, यथेच्छ अर्वाच्य चिखलफेक करतो, चांगल्या लेखाची वाट लावतो, हकालपट्टी ओढवून घेतो आणि नंतर निर्लज्जासारखा परत येऊन तेच करतो. दुर्दैवाने फारसे कोणी त्याला विरोध करताना दिसत नाही. उलठ काही महाभाग त्याचे समर्थक आहेत.

ज्ञानोबाचे पैजार's picture

12 Oct 2021 - 1:25 pm | ज्ञानोबाचे पैजार

हे म्हणजे आकंठ दारूत बुडलेल्यांना काही न बोलता चुकून एखादा घोट कधीतरी घेतला तर तो माणूस कसा दारूडा असे म्हटल्यासारखे झाले.

यात काय चुकीचे आहे? आपण सहसा त्यालाच बोलतो ज्याच्या कडुन सुधारणेची अपेक्षा असते.

जेव्हा जेव्हा तुम्ही इथे काही चांगले लिहिले आहे तेव्हा तेव्हा मी तुमचे कौतुक देखिल केलेच आहे.

एखाद्या ज्ञानपिठ विजेत्या लेखकाने जर पिवळी पुस्तके लिहायला घेतली आणि तरी त्याचा कोणी निशेध करु नये अशी अपेक्षा असेल तर ते होणार नाही.

स्पष्टच लिहितो तुम्ही काय किंवा श्रीगुरुजी काय किंवा डॉ खरे काय तुमच्या सारख्या विद्वान लोकांकडुन माझ्या सारख्या सामान्य वाचकाची वेगळी अपेक्षा असते. तुम्हा लोकांची सध्या जी घसरगुंडी सुरु आहे ती पाहिली की वाईट वाटते. इतकीच विनंती की वेळेत स्वतःला सावरा आणि तुमच्या कडच्या ज्ञानाचा आम्हालाही आनंद घेउ द्या.

दुसरे काय लिहितात या कडे दुर्लक्ष करा थोडेसे, त्यांचे काय व्हायचे ते आपोआप होईलच.

या उप्पर जर तुम्ही धुळवड सुरुच ठेवली तर मी तुम्हाला सुध्दा काहीही सल्ला द्यायला येणार नाही याची खात्री बाळगा.

पैजारबुवा,

श्रीगुरुजी's picture

12 Oct 2021 - 1:38 pm | श्रीगुरुजी

धन्यवाद! अज्ञानी प्रतिसादांकडे कितीही दुर्लक्ष केले तरी काही वेळा ते असह्य होतं व त्यामुळे जरा तीव्र प्रतिसाद दिला जातो. पण यापुढे काळजी घेईन.

तुषार काळभोर's picture

12 Oct 2021 - 11:04 am | तुषार काळभोर

प्रतिसादाशी सहमत.

चिखलफेक, धुळवड यामध्ये काही अभ्यासू सदस्य सामील होतात, त्यामध्ये कधीकधी प्रतिसादाची पातळी किंवा दर्जा खालावतो, याचे वाईट वाटते.

टर्मीनेटर's picture

12 Oct 2021 - 12:02 pm | टर्मीनेटर

पैजारबुवा, प्रा. डॉ., गवि, चांदणे संदीप आणि तुषार काळभोर ह्यांच्याशी सहमत आहे 👍

नगरीनिरंजन's picture

11 Oct 2021 - 11:11 pm | नगरीनिरंजन

अनेक राज्यांना वेगळा दर्जा आहे.
काश्मीरचे ३७० काढल्यावर नागालँडमध्ये साहेबांना लगेच शांती करार करुन ३७१ए रद्द करणार नाही हे वचन द्यावे लागले.
नागा लोक म्हणतात की माना अथवा मानू नका आमचा ध्वज वेगळा.
https://m.economictimes.com/news/politics-and-nation/recognize-it-or-not-the-nagas-too-have-their-own-national-flag-nscn-im/articleshow/80316442.cms

ज्यांना एका देशात दोन ध्वज व राज्यांना वेगळा दर्जा चालत नाही असे शूरवीर काय करताहेत ते पाहणे मनोरंजक आहे.

श्रीगुरुजी's picture

11 Oct 2021 - 11:36 pm | श्रीगुरुजी

हे केलं का, मग ते का नाही केलं? ते केलं का मग ते दुसरं का नाही केलं?

समजा एकापेक्षा अधिक राज्यांना वेगळा दर्जा होता तर त्यातील सर्वात गंभीर प्रकरण व सर्वात मोठे राज्य काश्मीर होते. ते नुसते सीमेवरील राज्य नसून त्या राज्यातील बहुसंख्य नागरिक मुस्लिम होते व त्यातील काही जण सातत्याने पाकिस्तानमध्ये राज्य विलिनीकरणाची किंवा वेगळा देश करण्याची मागणी करीत होते. त्यांच्या या मागणीला पाकिस्तान सर्व प्रकारची मदत देत होता व त्यातून देशभर दहशतवादी हल्ले होत होते. त्यामुळे वेगळेपणाचे कलम हटविण्यासाठी याच राज्याला प्राधान्य देणे अत्यावश्यक होते.

बाकी नागालॅंडची काश्मीरशी तुलना केली तर लक्षात येईल की हे राज्य तुलनेने अत्यंत लहान आहे, येथील बरीच लोकसंख्या वेगळ्या धर्माची असली तरी ते मुस्लिम नाहीत जे कोणत्याच देशाशी (विशेषतः जेथे मुस्लिम अल्पसंख्याक आहेत तेथे) एकनिष्ठ नसतात, तेथील नागरिक उर्वरीत भारतात येऊन दहशतवादी हल्ले करीत नाहीत, आपल्याला नागालॅंड हा वेगळा देश म्हणून हवा किंवा हे राज्य चीनमध्ये विलीन करा अशी त्यांची मागणी नाही, नागालॅंडला लागून असलेल्या म्यानमारच्या लोकांचा धर्म व नागा लोकांचा धर्म वेगळा आहे, म्यानमारचे व भालताचे चांगले संबंध आहेत.

हे सर्व पाहता जर नागालॅंडला वेगळेपणाचे कलम दिले असेल तर ते काढून टाकण्याचे प्राधान्य काश्मीरला दिलेल्या ३७० कलमाच्या हकालपट्टीपेक्षा बरेच कमी आहे. भविष्यात योग्य वेळी ते सुद्धा होईलच.

संस्कृती ,भौगोलिक स्थिती,अशा अनेक स्थिती चा विचार करून राज्यांना विशेष दर्जा देण्याची घटनेत तरतूद आहे .नागालँड ला जो विशेष दर्जा दिला आहे तो कायदेशीर आहे त्याला राज्य घटनेची मंजुरी आहे..देशात अनेक राज्यांना असा काही ना काही दर्जा देवून त्यांच्या प्रगती चा मार्ग सोपा केला गेला आहे..बिहार पण विशेष राज्याचा दर्जा द्यावा म्हणून आग्रही आहे.गोवा ह्या राज्याला पण असा विशेष दर्जा आहे..
काश्मीर ला पण काही कारणास्तव 370 चे संरक्षण दिले होते..प्रतेक राज्याचे प्रश्न वेगळे आहेत आणि त्याची उत्तर पण वेगळी आहेत.
त्या साठी राज्य घटनेटच त्या वर उपाय दिला आहे.
सर्व राज्य एकसारखी आहेत ,सर्व राज्यांचे प्रश्न एक सारखेच आहेत असला बुद्धिहीन विचार फक्त अडाणी लोक च करू शकतात.

रात्रीचे चांदणे's picture

12 Oct 2021 - 7:49 am | रात्रीचे चांदणे

सर्व राज्य एकसारखी आहेत ,सर्व राज्यांचे प्रश्न एक सारखेच आहेत असला बुद्धिहीन विचार फक्त अडाणी लोक च करू शकतात.
सहमत, म्हणूनच काश्मीर आणि नागालँड यांची तुलना करणे योग्य नाही.

सुबोध खरे's picture

12 Oct 2021 - 10:28 am | सुबोध खरे

नागा लोक म्हणतात की माना अथवा मानू नका आमचा ध्वज वेगळा.

शिवसेनेचा ध्वज वेगळा आहे. शीख पंथाचा ध्वज वेगळा आहे.

पण ते ध्वज काही शासकीय किंवा राज्याचे अधिकृत ध्वज नाहीत.

एखाद्या फुटीरतावादी संघटनेने केलेलं विधान घेऊन त्याबद्दल तुम्ही येथे प्रश्न विचारता आहात याचा अर्थ स्पष्ट आहे

असो

Rajesh188's picture

12 Oct 2021 - 2:55 am | Rajesh188

गोवा राज्याला पण लागू आहे ते पाहिले राज्य करते मूर्ख होते म्हणून नाही तर आताचे सरकार सोडून भारतात सर्व केंद्र सरकार ही mature होती.
कलम 371 नुसार गोवा राज्याला विशेष अधिकार दिले गेले आहेत.

सरकारी मालकीची एक पण विमान कंपनी नसणार भारत हा एकमेव देश आहे.
क्या बात है.

प्रदीप's picture

12 Oct 2021 - 10:24 am | प्रदीप

पण अमेरिका, यू.के., फ्रान्स, जर्मनी, जपान, झालंच तर नॉर्वे, स्वीडन, मलेशिया, इंडोनेशिया इत्यादींपैकी - म्हणजे गैरकम्युनिस्ट अशा कुठल्या देशांची विमानसेवा सरकारी मालकीची आहे, हे कृपया व्यवस्थित माहिती घेऊन, व शक्य असले तर दुवे देऊन येथे सांगावे.

श्रीगुरुजी's picture

12 Oct 2021 - 11:30 am | श्रीगुरुजी

जगातील किमान १०० देशात एकही सरकारी विमान कंपनी नाही.

कोणतीही माहिती न शोधता, माहिती नसताना बिनडोकासारखी आपली मते फेकायची, त्यावरून मोदींना शिव्या घालायच्या आणि आपल्या बिनडोकपणाचे तावातावाने समर्थन करीत रहायचे हे काही जणांचे व्यवच्छेदक लक्षण आहे.

ही गॉन केस आहे.

सुबोध खरे's picture

12 Oct 2021 - 11:39 am | सुबोध खरे

ही गॉन केस आहे.

पण संपादक मंडळ त्याच्याकडे काणा डोळा करत आहे.

अशा सदस्यां मुळेच अनेक सदस्यांनी दिवाळी अंकासाठी लेख पाठवावे असे अजिबात वाटत नाही असे मला खाजगीत बोलून दाखवले आहे.

सुरिया's picture

12 Oct 2021 - 12:11 pm | सुरिया

दोन खरे आणि एक खोटे ह्यांच्या हेकटपणामुळे, सतत दुसर्‍याची लायकी काढण्यामुळे आणि आम्ह्ही तेवढे शहाणे अशा आविर्भावामुळे मिपावर लिहिणे सोडा, वाचूसुध्दा वाटत नाही असे कित्येक सदस्य खाजगीत बोलतात. त्यांचे खाजगी बोलणेसुध्दा ग्राह्य धरावे ही नम्र विनंती.

सुबोध खरे's picture

12 Oct 2021 - 12:33 pm | सुबोध खरे

त्यांचे खाजगी बोलणेसुध्दा ग्राह्य धरावे ही नम्र विनंती.

त्यांचे खाजगी बोलणे मान्य करून मी मिपा वर येणे थांबवतो

धन्यवाद

जगातील सर्व देशात airlines मध्ये सरकार ची काहीच भागीदारी नाही असे देश .
वायुदल ची विमान सोडून जगातील सर्व देशात सरकारी मालकीचे एक पण विमान नाही. असे देश आणि त्याची भारता शी तुलना
असा माझ्या पोस्ट च अर्थ आहे.
ज्यांनी उतावीळ होवून प्रतिसाद दिले आहेत..
त्यांना कम्युनिस्ट देश सोडून बाकी उर्वरित देशात सरकारी मालकीचे विमान असणाऱ्या(वायू दल पण सोडून ) देशांची यादी
यादी दिली तर ते जाहीर माफी मागणार आहेत का?

नक्कीच !

तुम्ही द्या यादी.

प्रदीप's picture

12 Oct 2021 - 2:05 pm | प्रदीप

सरकारी मालकीची एक पण विमान कंपनी नसणार भारत हा एकमेव देश आहे.

असे तुम्ही म्हटले आहे. ह्याचा सरळ अर्थ सरकारची भागी व त्याचा, त्या त्या विमान कंपन्यांवरील अंमल (कंट्रोल), असा अभिप्रेत असावा असे मलातरी वाटते. कारण खाजगी विमानसेवेत सरकारने पैसे गुंतवले, पण त्यात सरकारचा काहीही कंट्रोल नाही, तर ती निव्वळ गुंतवणूक ठरते, त्या पलिकडे काहीही नाही.

तेव्हा अशी उदाहरणे द्यावीत जिथे सरकारची भागी व अनुषंगाने कंट्रोलही आहे.-- निव्वळ गुंतवणूक नव्हे.

प्रदीप's picture

12 Oct 2021 - 8:16 pm | प्रदीप

'मी यादी दिली तर....' वगैरे डरकाळ्या फोडल्यावर तुम्ही आता नक्की यादी देणार, अशी भीति वाटते आहे व म्हणून वाट पहातोय.

प्रदीप's picture

13 Oct 2021 - 12:48 pm | प्रदीप

राजेश१८८, इथे 'मी नावे दिली तर माझ्यावर येथे ह्यासाठी टिका करणारे माझी माफी मागणार का' असे लिहून तुम्ही ह्या धाग्यावरून नाहीसे झालेला आहात.

आता तुम्ही दुसर्‍या एका धाग्यावर हजर आहांत असे पाहिले.

तेव्हा, आता एकतर नावे द्या (मी अगोदर नमूद केल्याप्रमाणे, ज्या विमान कंपन्यांत सरकारांचा हिस्सा व त्यांना निर्णय घेण्याची क्षमता आहे, अशाच फक्त-- नुसती बिन- निर्णयक्षमता असलेली गुंतवणूक नव्हे) अथवा चुकीची टिका केल्याबद्दल माफी मागा.

श्रीगुरुजी's picture

13 Oct 2021 - 1:19 pm | श्रीगुरुजी

राजेश१८८ यांनी नेहमीप्रमाणेच थापा मारून पलायन केले आहे.

प्रदीप's picture

13 Oct 2021 - 1:35 pm | प्रदीप

आणि त्यात नवे ते काय आहे?

आता दुसर्‍या धाग्यावर त्यांचे तेच नेहमीचे मतांचे बुडबुडे उडवणे सुरू झाले, तेव्हा मी त्यांना ह्याची पुन्हा आठवण करून दिली. त्यांचे त्यावर हे उत्तर आहे.

वास्तविक मी स्वतः कुणालाही माफी वगैरे मागावयास सांगत नाही. पण हे आव्हान त्यांनीच येथे केले होते. राजेश१८८ ह्यांना, त्यांनी केलेल्या बुडबुड्यांबद्दल माफी मागावयास कुणी सांगितली, तर इथे त्यांना दिवसातून अनेकवेळा ते करत बसावे लागेल.

चर्चेची पातळी का घसरते त्याचे मूळ ह्या असल्या बुडबुडी प्रतिसादांत आहे.

श्रीगुरुजी's picture

13 Oct 2021 - 2:23 pm | श्रीगुरुजी

अत्यंत मूर्ख माणूस आहे हा.

वाटेल त्या थापा मारायच्या आणि त्याचे पुरावे विचारले की धूम ठोकून पळ काढायचा हे १८८, आग्या वगैरेंचे व्यवच्छेदक लक्षण आहे.

रात्रीचे चांदणे's picture

13 Oct 2021 - 1:32 pm | रात्रीचे चांदणे

राजेश भाऊ कडून उत्तराची अपेक्षा ठेऊ नका. काहितरी प्रतिसाद द्यायचा आणि अंगलट आलं की पळ काढायचा हे त्यांचं धोरण आहे.

चंद्रसूर्यकुमार's picture

12 Oct 2021 - 11:41 am | चंद्रसूर्यकुमार

जगातील किमान १०० देशात एकही सरकारी विमान कंपनी नाही.

त्याहूनही मूलभूत मुद्दा म्हणजे सरकारी विमान कंपनी नसलेला भारत हा एकच देश असेल तरी नक्की काय बिघडेल? सरकारी विमानकंपनी असलीच पाहिजे असा नियम आहे का?

वामन देशमुख's picture

12 Oct 2021 - 10:27 am | वामन देशमुख

सरकारी मालकीची एक पण विमान कंपनी नसणार भारत हा एकमेव देश आहे.

ठीक आहे -

  1. सरकारी मालकीच्या विमान कंपन्या असलेल्या देशांची यादी द्याल?
  2. Alliance Air ही कंपनी कोणत्या देशाच्या सरकारच्या मालकीची आहे हे सांगाल?
  3. ऑस्ट्रेलिया सरकारच्या मालकीच्या विमान कंपनीचे नाव सांगाल?
  4. अमेरिका सरकारच्या मालकीच्या विमान कंपनीचे नाव सांगाल?
Rajesh188's picture

12 Oct 2021 - 1:35 pm | Rajesh188

वायुदल सोडून सरकारी मालकीचे एक पण विमान नाही असे देश .
देशातील airline मध्ये काहीच हिस्सेदारी नसणारे देश .
असा पोस्ट चा अर्थ आहे..

सुबोध खरे's picture

12 Oct 2021 - 10:33 am | सुबोध खरे

सरकारी मालकीची एक पण विमान कंपनी नसणार भारत हा एकमेव देश आहे.

बेफाट विधाने करायच्या अगोदर थोडा तरी वाचत चला

अलायन्स एअर हि एअर इंडियाची संलग्न कंपनी अजून तरी सरकारने विकलेली नाही जिच्या कडे डॉर्नियर आणि ए टी आर तर्हेची २० चालू विमाने आहेत.

त्या टोळक्यात नसणाऱ्या बाकी लोकांची मत वेगळी आहेत.

श्रीगुरुजी's picture

12 Oct 2021 - 10:06 am | श्रीगुरुजी

म्हणजे 'अहो रूपम् अहो ध्वनी'!

रावसाहेब चिंगभूतकर's picture

12 Oct 2021 - 10:50 am | रावसाहेब चिंगभूतकर

15 नोव्हेंबरपासून अदानींच्या बंदरांवर यापुढे इराण (Iran), अफगाणिस्तान (Afghanistan) आणि पाकिस्तानमधील (Pakistan) मालवाहू जहाजांना अदानी नियंत्रित बंदरांवर (APSEZ port) प्रवेशबंदी असेल. हा नियम अदानी समुहाकडून चालवल्या जाणाऱ्या सर्व बंदरांना लागू असेल. पुढील नोटीस येईपर्यंत या तीन देशांमधून येणाऱ्या जहाजांना अदानी पोर्टवर बंदी असेल.

चंद्रसूर्यकुमार's picture

12 Oct 2021 - 11:33 am | चंद्रसूर्यकुमार

15 नोव्हेंबरपासून अदानींच्या बंदरांवर यापुढे इराण (Iran), अफगाणिस्तान (Afghanistan) आणि पाकिस्तानमधील (Pakistan) मालवाहू जहाजांना अदानी नियंत्रित बंदरांवर (APSEZ port) प्रवेशबंदी असेल. हा नियम अदानी समुहाकडून चालवल्या जाणाऱ्या सर्व बंदरांना लागू असेल. पुढील नोटीस येईपर्यंत या तीन देशांमधून येणाऱ्या जहाजांना अदानी पोर्टवर बंदी असेल.

हे करताना इराणबरोबर तेल आणि इतर गोष्टींचा व्यापार आपण करतो त्याला फटका बसणार नाही याची काळजी घेतली जाईल ही अपेक्षा.

पाकिस्तान आणि तालिबानशासित अफगाणिस्तान या दोन देशांच्या जहाजांना बंदीच नाही तर पूर्ण देशांवरच अगदी कडकडीत बहिष्कार टाकला तरी कोणाला काही फरक पडेल असे वाटत नाही. इराणही धर्मांध असला, तिथूनही अंमली पदार्थांची तस्करी होत असली तरी त्याव्यतिरिक्त इतर उपयोगी गोष्टींचाही व्यापार आपण इराणबरोबर करतो.

सुक्या's picture

12 Oct 2021 - 12:12 pm | सुक्या

ही बंदी भारत सरकारची नसुन एका कंपनीच्या शिपिंग डॉक ची आहे. त्या देशांना भारतातील इतर पोर्ट वापरता येतील. अमेरीकेने निर्बंध लादल्या पासुन तशीही ईराण कडुन भारताची तेलाची आवाक कमी झाली आहे. या बंदीमुळे अगदी देशाच्या परराष्ट्र व्यवहारावर फरक पडु नये असे दिसते. तसेही ईरान काहीतरी खोड काढुन प्रेशर वाढवुन वड्याचे तेल वांग्यावर काढु शकतो.

खरं तर बंदर व्यवस्थापन हे कुरीयर कंपणीसारखे असतात. कुरीयर कंपणीला जसे पाकीटात काय आहे याच्याशी काहीही घेणे नसते तसे बंदर व्यवस्थापनाला कंटेनर मधे काय आहे याच्याशी काहीही घेणे देणे नसते. परंतु जी शिपमेंट पकडली गेली त्यात पेपर वर एक आणी आत भलतेच (टाल्क पावडर आहे सांगुन ड्रग ठेवले होते) पॅकिंग होते.

बघुया काय प्रतीक्रिया येते ती. ईराण तसाही घायकुतीला आला आहे. पण याचे उट्टे नंतर काढतीलच ...

चंद्रसूर्यकुमार's picture

12 Oct 2021 - 12:24 pm | चंद्रसूर्यकुमार

हो बरोबर. मुंद्रा बंदर गुजरातच्या किनार्‍यावर असल्याने इराणच्या जहाजांना ते सोयीचे पडत असेल. ओरिसाच्या किनारपटीवरील पारादीप किंवा बंगालमधील हालदिया बंदरांमध्ये असा निर्णय घेतला गेला असता तर त्यातून इराणच्या जहाजांना फारसा फरक पडला असता असे वाटत नाही. पण मुंद्रा पश्चिम किनारपट्टीवर आहे म्हणून त्याचे इराणसंदर्भात महत्व अधिक. अर्थात मुंद्रा हे एकच बंदर आहे असे नाही. कांडला किंवा मुंबई बंदरांचा पण इराणची जहाजे वापर करू शकतील.

इराणची जहाजे कोणते बंदर वापरतील याबरोबरच दुसरा एक मुद्दा महत्वाचा आहे. इराणी कंपन्या भारतात माल पाठवताना त्यांचे ठरलेले चॅनेल्स वापरूनच प्रत्येक वेळी माल पाठवत असतील असे म्हणायला जागा आहे. म्हणजे अबक ही इराणी कंपनी क्षयज्ञ या जहाज कंपनीमार्फत माल भारतात पाठवते आणि क्षयज्ञची जहाजे आतापर्यंत मुंद्रामध्ये येत असतील तर त्यांना ते बदलून दुसर्‍या बंदरात जहाजे पाठवावी लागतील. हे सगळे करण्यात नेहमीचा कंफर्ट झोन सोडून परत दुसर्‍या बंदराशी त्यांना डील करावे लागेल. मोठी मालवाहू जहाजे पूर्ण अनलोड करायला अनेकदा तीन आठवड्यांपर्यंतचाही कालावधी लागू शकतो. तेव्हा सांगायचा मुद्दा हा की ही प्रक्रीया तशी वेळकाढू असते. अशावेळेस नेहमीचे बंदर, ज्यांच्याशी व्यवहार करतो ते बंदरातले अधिकारी परिचयातले वगैरे कंफर्ट असेल तर ते जहाज कंपन्यांनाही चांगले पडेल. तोच प्रकार दुसरीकडे करायचा झाला तर शून्यापासून सुरवात करायला लागून त्यातून व्यापारावर परिणाम व्हायला नको.