आपल्याला माहीत असलेले काही छान दाक्षीणात्य सिनेमे सुचवावेत. सिनेमाच्या नावासोबत सिनेमाची कथा कशाशी निगडीत आहे हे देखील लिहावे. सिनेमा युट्युब वर असेल तर लिंक द्यावी. हिंदीत ऊपलब्ध आहे का तेही सांगावे.
आधीचे धागे पाहीले त्यात सिनेमांची नावे फार कमी आहेत. साऊथ सिनेमे कसे असतात ह्यावर चर्चा करायला हा धागा नाही. फक्त सिनेमा त्याची कथा कशावर नी लिंक वगैरे.
मी पाहीलेले काही. पहावेत असे सुचवेन.
-राक्षसन (तमीळ) हिंदीत मै हुं दंडाधीकारी - सायको किलर.
-फोरेन्सिक - बालगुन्हेगारी/ सायको किलर.
-सबसे बढकर हम १ - फॅमीली ड्रामा.
-रिअल जॅकपाॅट १ - संस्पेन्स. कथा हिंगलाज देवी मंदीर पाकिस्तान व काबूल ला घेऊन जाते.
-रिअल जॅकपोट २ - आजिबात पाहू नये.
-ह्रदय कळेयम -संपुर्णेश बाबूचा सुपर डूपर हीट सिनेमा. नक्की पहावाच. सिनेमा युगातील नवं काहीतरी. स्पूफ काॅमेडी (ह्याच्या छोट्या
क्लिप्स आपण ईतरत्र पाहील्याच असतील. सिनेमा हिंदीत ऊपलब्ध नाही. तेलूगूत आहे. तरी समजेल मस्ट वाॅच.
- हिरो नंबर झीरो.- स्पूफ कोमेडी. मस्ट वाॅच. (ईकी पीकी पोंकी ह्या गाण्याची क्लिप आपण पाहीलीच असेल नसेल पाहीली तर युट्युबला पहावीच.) हिंदीत ऊपलब्ध.
-दृश्यम २- दृश्यम १ पाहीलाच असेल. अनअधिकृत हिंदी डब युट्युब वर ऊपलब्ध.
दाक्षिणात्य सिनेमे सुचवा.
गाभा:
प्रतिक्रिया
2 Oct 2021 - 12:15 am | गॉडजिला
डॅशिंग डिटेक्टीव
एका लहान मुलाचा कुत्रा मृत होण्याच्या वरवर मामुली वाटणार्या घटनेतुन सुरु होतो… अफलातुन मसालेदार रहस्य अॅक्शनपट.
https://www.youtube.com/watch?v=R_MRs9G9BdM
2 Oct 2021 - 2:14 am | राघवेंद्र
शाळेतील एकतर्फी प्रेमाची कथा जानू. साधा सरळ चित्रपट. काहीही हाणामारी नाही.
2 Oct 2021 - 5:08 am | सोत्रि
दृश्यम २ (मल्याळम)
- (अण्णा) सोकाजी
2 Oct 2021 - 6:16 am | Bhakti
परवाच पाहिला.
मल्याळम आहे.आवडेल तुला.मधेच थोडी संथ होते.पण ड्रामा,इमोशन, सामाजिक समस्या सगळे आहे.
Hey I’m watching Raame Aandalum Raavane Aandalum. Check it out now on Prime Video!
https://app.primevideo.com/detail?gti=amzn1.dv.gti.4ccb8dd4-40ff-4374-8b...
2 Oct 2021 - 9:54 am | सतिश गावडे
सिद्धार्थ, जेनेलिया, प्रकाश राज अभिनित 2006 सालचा हा तेलुगू चित्रपट आहे.
चित्रपटाच्या नावाप्रमाणेच एक चांगले घर असते, सधन आणि संपन्न. वडिलांचा व्यवसाय व्यवस्थित चालू असतो, आई प्रेमळ गृहिणी असते.
मात्र सर्व साधारण भारतीय घरात जी समस्या असते तीच इथेही असते. मुलांनी कसं वागावं, काय करावं हे वडील ठरवत असतात. अगदी मुलाने कपडे कोणते घ्यावेत आणि केस कसे कापावेत हे ही वडील ठरवत असतात. मुलाला हे सर्व जाचक वाटत असते.
यथावकाश मुलगा मोठा होता, वडिलांच्या मर्जीनेच एका मुलीशी त्याचा साखरपुडा होतो. आणि अचानक कहाणीमध्ये ट्विस्ट येतो....
हलका फुलका, सिद्धार्थ आणि प्रकाश राज या ताकदीच्या अभिनेत्यांच्या अभिनयाची जुगलबंदी असलेला हा आवर्जून पाहावा असा नितांत सुंदर चित्रपट आहे.
चित्रपटातील गाणीही श्रवणीय आहेत, काही कळले नाही तरी ऐकत राहाविशी वाटतात.
2 Oct 2021 - 12:45 pm | गॉडजिला
सिध्दार्थ जेनेलिया चे चित्रपट सृष्टीत पदार्पण यातून झाले...
चित्रपटात ओसंडून अश्लीलता आहे. ३५+ लोकांनी अजिबात बघू नये.
चित्रपटात सिध्दार्थ संपूर्ण निवरस्त्र अवस्थेत भर वर्दळ असलेला रस्ता क्रॉस करतो असे दृश्य बॉडी डबल न वापरता देऊन बरीच धमाल अन् राळ उडाली होती.
चित्रपट भारताचा जेम्स केमेरोन अर्थातच शंकर.
संगीत अर्थातच फॉर्म असलेला ए आर रेहमान त्यामूळे एकही गाणे कंटाळा देत नाही व सर्वच गाणी एक से बढकर एक अन पूर्णपणे वेगवेगळी मुड सेटिंग असलेली पण मला अले अले विशेष आवडते
2 Oct 2021 - 12:49 pm | गॉडजिला
चित्रपट दिग्दर्शक भारताचा जेम्स केमेरोन अर्थातच शंकर.
कोणाला इंग्रजी वाचता येत नसेल तर चित्रपटाचे नाव आहे Boys साल २००३.
आमच्या काळी काय मस्त चित्रपट होतें...
2 Oct 2021 - 12:57 pm | चौथा कोनाडा
हे वाक्य
चित्रपटात ओसंडून अश्लीलता आहे. ३५+ लोकांनी अजिबात बघू नये.
आवडले !
2 Oct 2021 - 1:12 pm | अमरेंद्र बाहुबली
हिंदी डब नाही का?
2 Oct 2021 - 1:23 pm | गॉडजिला
पणं त्या संवादात मजा नाही जी सबटायटल भाषांतरात आहे व एक तर चांगल्या गाण्याची हिंदीत वाट तरी लावली आहे अथवा सरळ कापून टाकन्याचा उद्योग केला आहे.
2 Oct 2021 - 5:27 pm | रावसाहेब चिंगभूतकर
माझ्या मोबाईल मध्ये ही सगळी गाणी आहेत. डेटिंग, सरीगमे आणि मारो मारो ही माझी आवडती गाणी. बाकी जेनेलिया ने रितेश ला पसंत केल्यावर दिलात एक कळ उठली होती (माकडाच्या हातात .. वगैरे वगैरे). चित्रपट लागला असताना मी चेंनै मधेच होतो, पण पहायचा राहून गेला.
ता.क. हे 35+ काय समजलं नाही. हा चित्रपट बनवणारी मंडळी आता नक्कीच 35+ असणार. शिवाय वय हे रोमॅंटिसिझम चे मेजरिंग युनिट कधीपासून झाले?
2 Oct 2021 - 6:13 pm | सतिश गावडे
या दोघांनी "तुझे मेरी कसम" या हिंदी चित्रपटामधून एकत्र चित्रपट सृष्टीत पदार्पण केले होते.
2 Oct 2021 - 7:09 pm | सुरिया
आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे हा चित्रपट केवळ थिएअटरमध्येच पाहता आला लोकांना.
स्व. विलासरावांनी आपली सारी पुण्याई वापरुन चित्रपटाची पायरसी होऊ दिली नाही, थिएटर प्रिंट बनु दिली नाही, डिव्हीडी आली नाही की चॅनलवर दाखवला गेला नाही पिक्चर. आता यू ट्युअबवर आहे ती प्रचंड घाण थेटर कॉपी आहे.
2 Oct 2021 - 9:11 pm | गॉडजिला
रोमॅंटिसिझम चे मेजरिंग युनिट वय असते हे मी म्हटलेलेच नाही. बाकी जे सांगायचे ते सांगितले असल्याने याउपर काहीही नाही.
:) गाणी सगळीच मस्त आहेत पण मॅट्रिक्स मधुन बुलेट टाइम इफेक्ट मारधाडीची ची चलती सुरु झाल्यावर ती अॅक्शनमधे न वापरता अले अले सारख्या उडत्या प्रेमगीतात २००३ मधे वापरणे म्हणजे कहर होता व त्यात मला भावणारी चाल व जेनेलीआ पण खुप क्युट दिसत असल्याने ते गाणं फेवरीट आहे.. फुल्टु जबानी याद आहे वर्ड टु वर्ड.
2 Oct 2021 - 11:34 pm | सिरुसेरि
Boys चित्रपटातील ए आर रेहमानचे संगीत असलेली गाणी मस्त होती . त्यापैकी "अय्यो लव्ह इज फुल्ल ऑफ पेन " हे गाणे छान जमले आहे .
काही इतर लक्षात राहिलेल्या चित्रपटांमधील एक म्हणजे 'कन्नतिल मुथमित्तल' . याबद्दल पुर्वी लिहिलेली माहिती परत डकवत आहे . --
'कन्नतिल मुथमित्तल' हा मणीरत्नमच्या दहशतवाद/दहशतवादी या विषयांवर आधारीत असलेल्या चित्रपटांमधील एक गाजलेला क्लासिक चित्रपट आहे . रोजा ,बॉम्बे , दिलसे , रावण या मालिकेतला एक. एका तामिळ भारतीय कुटुंबामध्ये राहणारी अनाथ लहान मुलगी , तिला आपल्या खरया आईला भेटविण्यासाठी श्रीलंकेला ते कुटुंब घेउन जाते , व शेवटी एल टी टी मध्ये असणारया आईशी तिची भेट असे कथानक आहे . मणिरत्नम दिग्दर्शक - अभिनय - माधवन - नन्दिता दास - ए र रह्मानचे संगीत व अप्रतिम लोकेशन्स , फोटोग्राफी असे कॉम्बिनेशन एकदम जुळुन आले आहे .
https://www.misalpav.com/node/46978
https://www.misalpav.com/node/42653
3 Oct 2021 - 9:41 am | तुषार काळभोर
कॉलेजात सुरुवातीच्या वर्षांत कल्ट बनलेल्या पिच्चरांपैकी एक. (दुसरा रेहना है तेरे दिल में).
गर्लफ्रेंड आणि डेटिंग ही गाणी शेकडो वेळा रिपीट-रिपीट बघितलेली आहेत.
कोवळा सिद्धार्थ आणि त्याहून नाजूक जेनेलिया! जेनेलिया तेव्हापासून जी काळजात शिरली आहे, ती अजून तिथेच आहे!
3 Oct 2021 - 12:43 pm | गॉडजिला
अगदी अगदी... Maddy was awesome... at that time.
हा चित्रपट नेमका अपेक्षे इतका का चालला नाही कोणालाच फारसे समजलें नसेल.. पणं त्यावेळी पीसी चे युग सुरू झाले होते अन हा चित्रपट हमखास प्रत्येक स्टुडंट्स पीसी वरती स्टोअर असेच.
2 Oct 2021 - 1:12 pm | अमरेंद्र बाहुबली
सर्वांचे धन्यवाद. आणखी येऊद्या.
2 Oct 2021 - 1:24 pm | अमरेंद्र बाहुबली
आंबला हा विशाल चा असाच एक कोमेडी अधिक ड्रामा सिनेमा. टाईमपास म्हणून पाहण्यास चांगला.
2 Oct 2021 - 3:49 pm | भीमराव
अवने श्रीमन नारायण बघीतलाय का? नसेल तर आताच बघा.
तुनळीवर आहे
https://youtu.be/l4BXM7lcVQw
2 Oct 2021 - 4:06 pm | गॉडजिला
.
5 Oct 2021 - 12:10 am | hrkorde
जयरामचा हिंदी आवाज हेरी पॉटरमधल्या हिंदी वोलडेमोर्टच्या आवाजासारखा वाटला.
हिंदी voldemort dark lord चा आवाज ऋषभ शुक्लाचा आहे , महाभारतात शंतनूची भूमिका केली होती.
हा जयरामचा आवाज त्याचाच आहे का ?
9 Oct 2021 - 7:21 am | hrkorde
https://www.stupidgag.com/harry-potter-hindi-voice-dubbing-cast-2634
9 Oct 2021 - 7:59 am | सुरिया
Wow, मायुस मीना चा आवाज आपल्या मेघना एरंडे ने दिलाय.
बोलणारी टोपी तर आपला उदय सबनीस आहे. आणि इतर पात्रे पण केलीत त्यांनी.
मस्तच.
आपला निनाद कामत व्हॉईस ओव्हर मध्ये बराच प्रसिद्ध आहे. आयर्नमन वगैरे. जाहिरातीमध्ये बऱ्याच शेलेब्रिटीचे आवाज तोच देतो.
9 Oct 2021 - 12:44 pm | तुषार काळभोर
भारी यादी दिलीत.
आता प्रत्येक वेळी aragog, sorting hat आणि Vernon Dursley बघताना उदय सबनीस डोळ्यांपुढे येणार :)
अती अवांतर : अलादिन animation मालिकेत (नव्वदीच्या दशकात शुक्रवारी संध्याकाळी ४.०० ला लागायची) इयागो पोपटाचा आवाज अविनाश नारकरांचा होता.
हिंदी बाहुबली मध्ये प्रभाससाठी शरद केळकर ने आवाज दिलाय.
9 Oct 2021 - 1:12 pm | कॉमी
2 Oct 2021 - 4:12 pm | कुमार१
१. Anbirkiniyal तामिळ: अतिशीत खोलीत अडकलेल्या तरुणीची सुटका छान दाखवली आहे
२. होम: मल्याळम
आई-वडील व मुलांच्या पिढीतले अंतर, मतभेद , मोबाईलचे व्यसन इत्यादी
शेवट ऋदयस्पर्शी आणि
तीन तास लांबी मात्र अनावश्यक
2 Oct 2021 - 4:14 pm | कपिलमुनी
2 Oct 2021 - 5:17 pm | कंजूस
का Unexplored but good?
2 Oct 2021 - 6:11 pm | सतिश गावडे
एक पोलीस अधिकारी गुन्हेगारी संपवण्यासाठी गुन्हेगारांना सामील होतो, त्यांच्यातील एक बनून त्यांना एक एक करून संपवतो त्याची ही गोष्ट.
इथे महेश बाबू आणि प्रकाश राज या अभिनेत्यांच्या अभिनयाची जुगलबंदी आहे. महेश बाबूच्या देहबोलीसाठी पहावा असा हा चित्रपट आहे.
सलमान खान अभिनित Wanted हा हिंदी चित्रपट पोकिरीचा रिमेक आहे.
15 Years For Pokiri: Why The Mahesh Babu And Ileana Starrer Became An All-Time Industry Hit
2 Oct 2021 - 6:24 pm | वामन देशमुख
३० दिवसांत कसे प्रेम करावे अश्या मजेशीर नावाचा तेलगू चित्रपट -
नायक-नायिकेच्या पुनर्जन्मावर आधारलेली कथा काही फार विशेष नाही. पण त्यातलं निली निली आकासम् हे गाणं फारच मधुर आणि एकदा ऐकताच ठेका धरायला लावणारं आहे.
2 Oct 2021 - 7:10 pm | hrkorde
प्रीतीचे झुळझुळ पाणीच्या ओळी मागेपुढे करून वापरल्यात की काय ?
2 Oct 2021 - 7:13 pm | hrkorde
सोनू निगमचेही असेच एक गाणे आहे , त्याचा प्रायव्हेट अलबम होता
हो हो हो हो , अशी सुरुवात आहे, शब्द आठवत नाहीत
2 Oct 2021 - 7:54 pm | Bhakti
तेरा मिलना पल दो पल का?..हो हो हो~~
रच्याकने हे नीलीनीली गाणं मस्त आहे.
2 Oct 2021 - 7:54 pm | hrkorde
https://www.youtube.com/watch?v=RB8uRCLvchU
ह्याच्याही काही ओळी सारख्या वाटतात.
2 Oct 2021 - 6:31 pm | वामन देशमुख
बोम्मरिल्लू, पोकिरी, दुकडू, अतडू, हॅप्पी डेज् हे आणि असे अनेक तेलुगू सिनेमे पाहण्यासारखे आहेत.
2 Oct 2021 - 9:20 pm | गॉडजिला
बोमारिलु मधील बोम्मन गिस्ते माझ्या ऑल टाइम फेवरीटमधे येते. गाण्याची गोड चाल सुंदर चित्रीकरण आणि त्याच्या ओळीचा अर्थ सगळेच एकदम लाजवाब. :)
2 Oct 2021 - 9:23 pm | गॉडजिला
शांत पडुन चोकोलेट+ वाइन चा हलका हलका तरल अस्वाद घेत हे गाणे ऐकणे/पाहणे खुप सुखद अनुभव असतो.
2 Oct 2021 - 6:41 pm | वामन देशमुख
सुनील-सलोनीचा मर्यादा रामण्णा अवश्य पहा, तेलुगू कळत नसेल तरीही सिनेमा जवळपास संपूर्ण कळेल.
त्यातलं "मुलगी खिडकीजवळ बसलेली आहे" अश्या अर्थाचं गाणं आणि इतरही सर्वच गाणी मस्त आहेत.
या सिनेमाचा अत्यंत भ्रष्ट रिमेक म्हणजे हिंदीतला सन ऑफ सरदार.
2 Oct 2021 - 7:17 pm | hrkorde
ओखा क्षणम मस्त आहे
3 Oct 2021 - 6:50 am | फुटूवाला
मोहनलाल आणि विवेक ओबोरॉय चा चित्रपट
3 Oct 2021 - 6:52 am | फुटूवाला
पहिला पहिला अन आता दुसऱ्याच्या प्रतीक्षेत आहे. संजय दत्त आणि रविना टंडन आहेत KGF २ मध्ये. एप्रिल २०२२ ला येतोय.
3 Oct 2021 - 7:00 am | फुटूवाला
चालू करून काम करत बसतो मी :)
3 Oct 2021 - 10:05 am | तुषार काळभोर
शशीकुमार दिग्दर्शित. मूळ तमिळ नाव सुब्रमणियापुरम्. मल्याळम मध्ये त्याच नावाने आणि तेलुगू मध्ये अनन्तपुरम नावाने डब आहे. युट्यूब वर फक्त डब व्हर्जन्स आहेत. मूळ तमिळ पिच्चर प्राईमवर होता. आता प्राईमवर त्यासाठी एरॉसचं वाढीव पॅक घ्यायला सांगतात (माजलेत साले!!)
हिरो : जय, हिरॉईन : स्वाती
चित्रपटाची कथा १९८० सालच्या मदुराई शहरातील सुब्रमणियपुरम भागात घडते. एक स्थानिक नेता सोमू, त्याचा भाऊ कनुगू, त्याच्या आशिर्वादाने टपोरीगिरी करणारे पाच उनाड तरुण- अळगर (हिरो), परमन आणि अजून तिघे , सोमूची मुलगी स्वाती (हिरॉईन). राजकारण, विश्वासघात, प्रेम, मैत्री असा अतिशय मनोरंजक चित्रपट!
थीम व्हिडिओ :
कंगल इरंदल : अतिशय सुंदर गाणं
3 Oct 2021 - 1:09 pm | संगणकनंद
मात्र हे सर्व चित्रपट युट्युबवर पाहायला मिळतील का?
आणि इंग्रजी सबटायटल्स असतील का? वर कुणीतरी म्हटल्याप्रमाणे हिंदी डबिंगवाले "मन्ने तो खबर नथी" टाईप हिंदी त्या पात्रांच्या तोंडी घालून मजाच घालवून टाकतात.
3 Oct 2021 - 6:20 pm | hrkorde
आणि व्हिडिओत चेन्नै चे लोकेशन असते आणि डबिण्ग मध्ये डोंबिवलिचा इन्स्पेक्टर मालाडच्या चोराला धरायला बाइकने जात असतो
4 Oct 2021 - 9:32 am | शित्रेउमेश
अभिनेता विक्रम चा
१ . "I" - https://www.youtube.com/watch?v=xY3IRTNF8MA
Vikram and Samantha
२. "10 ka dum" - https://www.youtube.com/watch?v=Xlsd_dIbrpQ
10 Oct 2021 - 1:03 pm | चौथा कोनाडा
१० का दम पहायला सुरुवात केला , फारच दक्षिणी मसाला प्रवास पट, विस्कळीत पटकथा .... विविध सुंदर लोकेशन्स पण धरुन ठेवू शकली नाहीत.
.... मग अर्धा पाऊण पाहून सोडुन दिला.
तारारा, तरारा हे गाणं ( हिंदी ) हे छान वाटलं.
याच सिनेमातील एका गाण्याच्या शूटिंगसाठी पुण्यात अडीच कोटी रुपयांचा सेट उभारण्यात आला होता. याच्या साठी २.५ कोटी रु खर्च करण्आण्यार आले, गाणे चक्क ९ मिनिटाचे आहे असे उल्लेख विकिपेडियात वाचले, ते कोणते गाणे हे मात्र समजले नाही.
10 Oct 2021 - 1:21 pm | तुषार काळभोर
अवांतर :
शिवाजी द बॉस चित्रपटात दाखवलेले हॉस्पिटल, तसेच नंतर शिवाजी अमिताभ बच्चन (हिंदीत. तमिळ मध्ये एम जी आर) नावाने येतो ती जागा मगरपट्टा सायबर सिटी आहे. :)
10 Oct 2021 - 3:22 pm | गॉडजिला
हायला... डू आयडी.. रजिनी सिनेमात.
10 Oct 2021 - 5:38 pm | चौथा कोनाडा
आयला भारीच की !
रोबोचं ट्रेन मधल्या मारामारीचं शुटींग दापोडीच्या रेल्वे पुलावर करुन गेलेला रजनी !
4 Oct 2021 - 11:39 am | नि३सोलपुरकर
रामचरण आणी सामंथा अभिनित " रंगस्थलम" हा चित्रपट सुचवितो,सिनेमा हा नेहमी प्रमाणे गावातील जमिनदार ,रा़जकारण , वंचितांचे शोषण आणी नायकाचे त्याविरोधात बंड दाखवितो .
वि.सु : चित्रपटाची सुरुवात आणी शेवट चुकवु नका ....
नि३
4 Oct 2021 - 1:32 pm | टर्मीनेटर
मस्त धागा!
तेलगू चित्रपट हे तामिळ, मल्याळम आणि कन्नड पेक्षा खूप अधिक मनोरंजक असतात असा माझा अनुभव आहे. मुख्य म्हणजे मल्याळम मध्ये अति प्रमाणात आणि तामिळ मध्ये जाणवण्या इतपत ख्रिश्चन प्रोपगंडाचा प्रभाव दिसून येतो तर तेलगू मध्ये भारतीय सांस्कृतीक मूल्ये जपण्याचे केलेले प्रयत्न प्रकर्षाने जाणवतात. वडील आणि मुलगा/मुलगी, आई आणि मुलगा/मुलगी, मामा भाचे/भाची, काका आणि पुतण्या/पुतणी, आजोबा आणि नातू/नात ह्यांचे मधुर नातेसंबंध दाखवण्यातले त्यांचे कसब तर कौतुकास्पद असते.
मी ह्या धाग्यात प्रतिसादरूपात अधून मधून थोडी भर घालत जाईन, सुरुवात करतो २ चित्रपटांपासून.
१) हर दिन दिवाली. (Har Din Diwali - Prati Roju Pandage)
साई धरम तेज, सत्यराज (कटप्पाची भूमिका करणारा अभिनेता), राशी खन्ना, मुरली शर्मा आणि राव रमेश ह्यांच्या प्रमुख भूमिका असलेला मूळ तेलगू सिनेमा.
वडील आणि मुलगा (राव रमेश-साई धरम तेज) व आजोबा आणि नातू (सत्यराज-साई धरम तेज) ह्यांचे नाते संबंध, प्रेम, जिव्हाळा बघण्यासाठी हा चित्रपट पाहण्याची मी शिफारस करतो! खूप छान सिनेमा असून युट्युबवर हिंदीत उपलब्ध आहे.
२) अनारकली (Anarkali)
पृथ्वीराज सुकुमारन, प्रियल गोर, कबीर बेदी, बिजू मेनन, मियां जॉर्ज आणि संस्कृती शेणॉय ह्यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा मूळचा मल्याळम चित्रपट!
चित्रपटाचे बहुतांश चित्रीकरण नितांत सुंदर, निसर्गरम्य लक्षद्वीप बेटांवर झालेले आहे ,हे लोकेशन सिनेमात फारसे कधी बघायला मिळत नाही. शंतनू (पृथ्वीराज) आणि नादिरा (प्रियल गोर) ह्यांची हि थोडी प्रेमकथा आहे. एकदा पाहण्यासाठी हा चित्रपट नक्कीच चांगला आहे आणि प्रेमकथा आवडत नसल्या तरी लक्षद्विपच्या निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी हा चित्रपट बघण्याची शिफारस मी करत आहे.
आधी हा सिनेमा हिंदीत सलग स्वरूपात युट्युबवर होता, आता हटवलेला दिसतोय. अर्थात १० भागात तो आजही तिथे बघायला मिळतोय त्याची लिंक खाली देत आहे.
https://www.youtube.com/watch?v=i9qEPUYvVQk&list=PLzujVaGo7zJXHRmrC-31hh...
पुढच्यावेळेस आणखीन सुचवण्या घेऊन येईनात &#
6 Oct 2021 - 12:37 pm | सुरिया
.
ख्रिश्चन प्रपोगंडा मल्याळींचा आणि भारतीय सांस्क्रुतिक मुल्ये तेलुगुची. वावावा.
मल्याळी क्रिस्ती भारतीय नाहीत? त्यांची मुल्ये भारतीय नाहीत. चर्च दाखवले, ख्रिस्ती लोक दाखवले की ते भारतीय होत नाहीत का? आता केरळात आहेत बहुसंख्य क्रिस्ती मग त्यान्च्या कथेत येणारच ख्रिस्ती पात्रे आणि चर्च आणि कॉन्वेन्ट. तो प्रपोगंडा झाला का? पंजाबी पिक्चरमध्ये शीख येणार तसे मल्याळी पिक्चरात ख्रिस्ती येणारच. ते काही धर्मप्रसारासाठीच असतात असे आपल्याला वाटत असेल तर धन्य आहात. आणि ख्रिस्त्यांना आई बाप वडील मुलगी आणि इतर नाती नसतात क? त्यांच्या नात्याचे मधुर संबध दिसत नाहीत का? साधा मोहनलालचा दृश्यम घ्या. हिरो खरेतर ख्रिस्ती दाखवला आहे. जॉर्ज कुट्टी. त्यातले नाव सांगितले नाहीतर पूर्ण चित्रपटात तो कुठेच ख्रिस्ती वाटत नाही. लुंगी घालून दैनंदीन आयुष्यात जगणारा एक साधासुधा मल्याळी हेच दिसते. आपल्या कुटुंबासाठी काहीही करायला तयार होणारा एक कुटुंबाचा कर्ता पुरुष हिच भुमिका दृश्यम च्या दोन्ही चित्रपटात दिसली. ह्यात कुठे दिसला ख्रिश्चन प्रपोगंडा? त्याचे इतर भाषामध्ये रिमेक होताना फक्त नावे बदलली तरी कहाणी बदलावी लागली नाही इतके युनिव्हर्सल चित्रण बहुतंशी चित्रपटात असताना आपणास केवळ पात्रांमुळे प्रपोगंडा जाणवत असेल तर धन्य आहात. बाकी त्या राज्यातली धर्मांतरे हा वेगळा चर्चा करण्याचा विषय असेल पण हिंदू मुस्लीम ख्रिस्ती तिन्ही लोकांच्या सगळ्यात जुन्या (खरोखर अस्सल ही म्हणता येतील) परंपराचे चित्रण मल्याळी चित्रपटात जाणव्त असताना आपणासारख्या साक्षेपी प्रेक्षकाला त्यात प्रपोगंडा जाणवावा ह्याचे वाईट् वाटते.
6 Oct 2021 - 8:02 pm | टर्मीनेटर
.grid-container-1 {
display: grid;
grid-template-columns: auto auto auto;;
grid-template-rows: 33.33% 33.33% 33.33%;
grid-gap: 10px;
background-color: #eee;
padding: 10px;
}
.grid-container > div {
background-color: #fff;
}
इतके साधे-सोपे-सरळ वाटतंय का हे सगळं तुम्हाला? अर्थात तुम्हाला त्यात काही वावगे वाटत नसलयास त्याला माझी काही हरकतही नाहीये.
आपण किती वेळा केरळला गेला आहात, किती मल्याळम सिनेमे पाहिले आहेत आणि तिथली चित्रपट सृष्टी, त्यात काम करणारे किती सिने कलाकार आपल्या ओळखीचे आहेत वा त्या चित्रपट सृष्टीत कसे आणि कुठल्या थराचे राजकारण चालते हे आपल्याला माहित आहे ह्याची मला कल्पना नाही.
ह्या माझ्या विधानावर मी ठाम आहे कारण हे मत वर्तमानपत्रे, सोशल मिडियावरील फॉर्वर्डस वाचून बनलेले नसून खात्रीलायक माहिती असल्यानेच व्यक्त केले आहे. अर्थात त्याचे तपशीलवार स्पष्टीकरण देण्याची हि जागा नाही आणि तसाही तो विषय स्वतंत्र धागा काढण्याएवढा मोठा आहे.
तूर्तास केवळ तुमच्या माहितीकरता सांगतो, गेल्या २१ वर्षांत, मल्याळम (केवळ मल्याळमच नाही तर अल्प प्रमाणात तामिळही) रंगभूमीवरील नाटके, एशियानेट आणि कैराली ह्या वाहिन्यांवरील मालिका, राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये पारितोषिके मिळवलेल्या मल्याळम व इंग्रजी शॉर्टफिल्म्स, वेबसिरीज आणि कित्येक मल्याळम चित्रपटांमध्ये (त्यातला 'विरम (Veeram)' हा हिंदीसहित चार कि पाच भाषांत निर्माण झाला होता) अभिनय केलेला 'बिलास चंद्रहासन नायर' हा अभिनेता माझा अत्यंत जवळचा मित्र आहे.
बिलास चंद्रहासन नायर
ऍक्टिंग मध्येच करियर करण्याच्या ध्येयाने झपाटलेल्या बिलासने (आमच्या भाषेत "सोनीने") २१ वर्षांपूर्वी मुंबईहून केरळला प्रस्थान केले. सुरुवातीला उमेदवारीच्या काळात व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट/ डबिंग आर्टिस्ट म्हणून कामे करत करत आजच्या घडीला मल्याळम मनोरंजन क्षेत्रात त्याने चांगलेच बस्तान बसवले आहे, आणि त्याचा आम्हा मित्रमंडळींना सार्थ अभिमान आहे!
भौगोलिक अंतर वाढले असले तरी आमच्या मैत्रीत अजूनही कुठले अंतर आलेले नसून आम्ही एकमेकांच्या अगदी नित्य संपर्कात असतो. अधून मधून आमच्या भेटीगाठीही होत असतात.
असो, वरील सगळे रामायण तुम्हाला सांगण्याचा उद्देश एवढाच होता कि मी व्यक्त केलेले मत माझ्या जवळच्या मित्राकडून, तसेच त्यानेच ओळख करून दिलेल्या तिकडच्या काही स्त्री-पुरुष कलाकारांकडून मिळालेली खात्रीशीर माहिती आणि त्यांच्या प्रदीर्घ अनुभवावर आधारलेले आहे.
कळावे, लोभ असावा.
7 Oct 2021 - 12:10 am | hrkorde
मग तुमचा मित्र कसा काय तिकडे सुपरस्टार झाला ?
की प्रभू येशूने त्याच्यावरही कृपा केली ?
7 Oct 2021 - 11:05 am | hrkorde
मृगा मृगैः सङ्गमनुव्रजन्तिगावश्च गोभिस्तुरगास्तुरङ्गैः।
मूर्खाश्च मूर्खै: सुधियः सुधीभिः समानशीलव्यसनेषु सख्यम्॥
पंचतंत्र लब्धप्रणाश.
हरिण हरणांसह, गाई गाईंसह, घोडे घोडयांसह. मूर्ख मूर्खांसह आणि शहाणे शहाण्य़ांसह असतात. ज्यांच्यात स्वभाव आणि सवयी जुळतात त्याच्यात मैत्री होते.
7 Oct 2021 - 12:50 pm | चौथा कोनाडा
व्वा, टर्मीनेटररोचक माहिती,
यावर एक वेगळा धागा येऊ द्या. आमच्या सारख्या लोकांना मळ्याळी चित्रपटसॄष्टीची खुप माहिती आहे.
8 Oct 2021 - 1:24 pm | चौथा कोनाडा
खुप " *कमी " माहिती आहे हे लिहायचंच राहिलं राव !
7 Oct 2021 - 6:18 pm | सुरिया
वा. मस्तच.
इतका मोट्ठा माणूस आपल्या एका मिपाकराचा जवळचा मित्र आहे हि गोष्ट खचितच मनाला सुखावणारी आहे. श्रीयुत नायर साहेबांनी इकडे शिक्षण घेऊन त्यांच्या मूल स्थानी जाऊन जे यश मिळवले आहे तेही अर्थात अलौकिक आहे. त्यांची विविध क्षेत्रातली मुशाफिरी अगदीच बेमिसाल आहे......
पण .....
तुम्ही तुमच्या मुद्द्यावर, जो तुम्ही नायरसाहेबांचे आणि त्यांच्या काही मित्रांचे काही अनुभव ऐकून बनवले आहे त्यावर ठाम आहात तर जरा आपण जरा बोलुयात काय?
त्याअधी मी सांगतो की मी केवळ प्रेक्षक आहे. चित्रपट मला आवडतात, दाक्षिणात्य चित्रप्ट जरा जास्तच. बाकी त्या चारीही चित्रपटसृष्टीतील बर्याच जणांना मी ओळखतो पण त्यातील कुणीएही मला ओळखत नाहीत. कारण खरोखर मी एक सामान्य माणूस आहे.
सर्वप्रथम आपला मुद्दा आहे की "मल्याळम मध्ये अति प्रमाणात आणि तामिळ मध्ये जाणवण्या इतपत ख्रिश्चन प्रोपगंडाचा प्रभाव दिसून येतो" तर...
ह्यात प्रपोगंडा म्हणजे आपणास काय अभिप्रेत आहे? मला तीन शक्यता वाटल्या.
१) चित्रपटामधून ख्रिस्ति धर्माचा प्रसार
२) चित्रपटातून प्रसार नाही पण ख्रिस्ती पात्रे आणि वातावरण ह्याचे चित्रण.
३) चित्रपटसृष्टीत पडद्यामागे ख्रिस्ती धर्मीयाची कंपूबाजी.
तर पहिल्या मुद्द्यानुसार जर ते प्रसार करत असतील तर कायदेशीरच चित्रप्ट निर्मीती करुन त्यावर पैसा घालून (भले तो कसाही येवोपण कायदेशीर येवो) खर्च करत आहेत. पाहणे किंवा न पाहणे सर्वस्वी प्रेक्षकाच्या हातात आहे. जबरदस्ती नाहीच.
दुसर्या मुद्द्यानुसार सुध्दा हेच आहे. निर्मीती करणारे, दिग्दर्शन करणारे, कथा लिहिणारे, अभिनय करणारे आणि सहभागी इतर लोक जोपर्यंत पैसा घालून हे करत आहेत तेंव्हा त्याला नाकारायचे किंवा स्वीकारायचे हे प्रेक्षकांच्या हातात आहे.
राहता राहिला मुद्दा कंपूबाजीचा. हा अर्थात गंभीर मुद्दा आहे. एखाद्या धर्मीयाचे लोक फक्त धर्माचा विचार करुन कामे देत असतील आणि दुसर्या कुणा धर्मीयांना संधी मिळूच देत नसतील तर इतर धर्मीय पात्र लोक चिडणारच. पण तुमच्या मित्राचे खुद्द यशस्वी उदाहरण पाहता आणि इतरही बर्याच कलावंताचे काम पाहता ह्या आरोपात फारसे तथ्य नसावे. अगदी बॉलीवूडमधले नेपोटिझम वर झालेली चर्चा अशाच वळणाने गेलेली होती. त्यातील निश्कर्ष हाच निघाला कि पैसा घालणारे ठरवणार की कुणाला काय काम द्यायचे. मग ते स्वीकारायचे की नाकारायचे हे परत प्रेक्षकांच्या हातात आहे. मल्याळी चित्रपट केरळात चालतात हे गृहीत धरले तरी ५५ टक्के लोकसंख्या आहे हिंदूची. जवळपास २७ टक्के मुस्लीम आणि १८ टक्के ख्रिस्ती. केरळात आधीपासूनच शिक्षणाचे प्रमाण भारतात सर्वाधिक आहे. त्यातल्या त्यात ख्रिस्ती लोक शिक्षणात पुढारलेले आहेत. सिरीअन ख्रिस्त्यांसारख्या काही जातींनी तर बर्याच क्षेत्रात आणि फक्त केरळात नव्हे तर बाहेरही आपली विजय पताका रोवली आहे. साहजिकच कला, अभिनय आदी क्षेत्रात त्यांचा टक्का लोकसंख्येपेक्षा जास्त प्रमाणात दिसतो. कित्येक ख्रिस्ती लोक तर उलट म्हणतात की ख्रिस्ती धर्मावर टीका करणारे चित्रपटही मल्याळी भाषेत बनतात पण मुस्लीम किंवा हिंदू जसे धर्माविषयी चिकीच्या गोष्टीला कडाडून विरोध करतात तसे केरळी ख्रिस्ती करत नाहीत म्हणून ख्रिस्ती कथानके चालवली जातात. अर्थात ह्यातील कांगावा मलाही कळतो पण सध्यकालीन पद्मावत, केदारनाथ सारख्या चित्रपटांना मिळालेले अनुभव पाहता धर्म ही गोष्ट चित्रप्ताच्या बाबतीत किती नाजूक झाली आहे त्याचा अंदाज येतो. किंबहुना तेथिल इंडस्ट्रीमध्ये काही कंपूबाजी चालत असेल तर त्याचा फटका बसलेल्या लोकांचे अनुभव हे दुहेरी असू शकतात. यशस्वी असले तर इतर लोक "खाल्ल्या थाळीत घाण करणारा म्हणतील" किंवा अयशस्वी असेल तर "कोल्ह्याला द्राक्षे आंबट" तेंव्हा असे अनुभ हे ज्याचे त्याचे असणार. त्यातून त्याने काढलेल्या अर्थाला संपूर्ण सामाजिक मत बनवून ते तुमच्या मताच्या समर्थनार्थ त्याच्या ओळखी सामाजिक माध्यामावर दर्शवून प्रदर्शित करणे योग्य वाटत नाही.
जर हे योग्य वाट्त असेल तर एक आपल्या इथलीच घटना सांगतो, त्यावरचे तुमचे मत कळले तर मला तुमचे मत ठाम कसे बनले हे कळण्यास अधिक मदत होईल.
काहि काळापूर्वी दिग्दर्शन आणि पटकथेसाठी राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित मराठी दिग्दर्शक सुजय डहाकेने असे मत मांडले की मराठी टेलिव्हीजन आणि मनोरंजन क्षेत्रात ब्राह्मण ज्ञातीची प्रचंड कंपूबाजी चालते आणि त्यासाठी त्याने मराठी मालिकामधे एकतरी अब्राह्मण नायिका कलावंत दिसते का असा प्रश्न उपस्थित केला. मराठी इंडस्ट्रीने ह्या प्रश्नाला कडाडून विरोध केला. मालिकांमधून गाजलेला आणि नथूराम गोडसेच्या भुमिकेसाठी प्रेक्षकांची वाहवा मिळवलेला कलावंत सौरभ गोखले ह्याच्या फेसबुक कॉमेंटने तर फारच खळबळ उडाली. " स्वतःस अत्यंत प्रतिभावान आणि अभासू समजणारे दिग्दर्शक मा. सुजय डहाके.. आपण केलेली वक्तव्ये आणि विधाने यावर इतर कलाकारांनी आणि कलाक्शेत्रातील मान्यवरांनी स्पष्टीकरण द्यावे इतकी तुअम्ची लायकी नाही. पुन्हा याप्रमाणे जातीयवाद आणि जातीपातीचे राजकारण ह्या कलाक्षेत्रात घुसवण्याचा प्रमाद आपणाकडून घडल्यास आमच्या भावना सर्वासमक्ष आपल्या श्रीमुखावर उमटवण्यात येतील ह्याची नोंद घ्यावी"
मराठी कलाक्षेत्रातील बहुतांशी कलाकारांनी ह्याच भावनेने सुजय डहाके ह्यांना क्डकाडून विरोध केला व ह्या मुद्द्याच्या समर्थनार्थ ब्राह्मण सोडून अन्य जातीतील कलाकारांची नावे सादर केली.
आता हि घटना तर आपल्याच मायमराठीची आहे. आपल्या ओळखीचे कित्येक कलाकार मराठी चित्रपट, मनोरंजन आदी क्षेत्रात असणारच तेंव्हा ह्या प्रसंगाबद्दल आपले मत काय आहे? ते कळाले की आपल्या मायभाषेशिवाय इतर भाषेंना, आणि तेथिल सृष्टीला आपण कसे पाहतो त्याचा अंदाज येईल. आणि पुढील चर्चा करता येईल.
बाकी काय? लोभ आहेच. वृध्दींगत व्हावा ( मल्याळम चित्रपटावरही) हिच अपेक्षा.
धन्यवाद.
.
थिएटरच्या डोअरकीपरशीही ओळख नसणार एक सामान्य प्रेक्षक (कधी कधी पिटातून शिट्ट्याही असतात) ;)
7 Oct 2021 - 6:47 pm | कॉमी
उत्तम प्रतिसाद.
7 Oct 2021 - 7:20 pm | आग्या१९९०
सुरिया, तुमचा वरील प्रतिसाद वाचून मी खात्री करून घेतली,मी नक्की मिपाच वाचतोय ना? इतका मुद्देसूद आणि समतोल प्रतिसाद मिपावर वाचायला मिळणे दुर्मिळ झाले आहे. मस्तच!
7 Oct 2021 - 8:29 pm | गॉडजिला
इज धिस यु ?
अमेजिंग.
7 Oct 2021 - 8:23 pm | रंगीला रतन
लाल सेना एकत्र जमायला लागली म्हंजे घाव वर्मी लागला आहे. अजून बरंच काय लिहायचं होतं मला पण माझे प्रतिसाद हल्ली रोज च उडवले जातात :=)
7 Oct 2021 - 10:33 pm | कॉमी
6 Oct 2021 - 8:12 pm | कॉमी
पूर्णपणे सहमत.
6 Oct 2021 - 12:55 pm | नागनिका
happy days
कॉलेज जीवनावर आधारित आहे. मस्त आहे.
6 Oct 2021 - 1:01 pm | गॉडजिला
अरे हा कसा विसरलो...
तमन्ना ची येंट्री यातूनच झाली....
6 Oct 2021 - 10:58 pm | सतिश गावडे
अवांतर: तमन्नाचा चित्रपटसृष्टीतील प्रवेश 2005 सालच्या "चांदसा रोशन चेहरा" या हिंदी चित्रपटातून झाला होता, तेव्हा मुंबईत बऱ्याच ठिकाणी भिंतीवर या चित्रपटाचे पोस्टर पाहील्याचे आठवते.
या धाग्यात ही दुसरी वेळ असा चूकीचा संदर्भ येण्याची :)
6 Oct 2021 - 11:13 pm | गॉडजिला
पहीली चुक देखील आपण सांगाल ही अपेक्षा होती कृपया पुर्ण करावी.
10 Oct 2021 - 5:22 pm | टर्मीनेटर
तेलगू चित्रपटांमध्ये नायकाची भूमिका करणाऱ्या अनेक अभिनेत्यांपैकी माझे सगळ्यात आवडते दोन अभिनेते म्हणजे 'महेश बाबू' आणि 'रवी तेजा'.
ह्या दोघांचा एकही चित्रपट पाहायचा मी सोडला नसावा.
अनेक सुपरहिट 'अँक्शन-कॉमेडी' चित्रपट देणाऱ्या 'मास महाराजा' रवी तेजाने काही प्रेमकथा/Feel Good चित्रपटांतही काम केले आहे त्यापैकी मला आवडलेला एक चित्रपट सुचवतो.
ठोकर
रवी तेजा आणि भूमिका चावलाची प्रमुख भूमिका असलेला हा Feel Good चित्रपट.
(शाळेतल्या प्रेमकहाणीचा भाग थोडा संथ असूनही एकंदरीत सिनेमा चांगला वाटला.)
15 Oct 2021 - 8:53 pm | mangya69
https://www.youtube.com/watch?v=iGhqeaiK9rs
एक हिरो अमेय वाघ सारखा दिसतो