सुमारे १९८६ साली भारत सरकारने भारतीय भाषांसाठी संगणक कळफलक प्रमाणीत केला. त्याचे नाव इनस्क्रिप्ट. पुढे १९८८ आणि १९९२ साली त्यात सुधारणा केल्या. त्या काळी युनिकोड वगैरे नव्हते. पुढे युनिकोड आले त्यातही भारतीय भाषांसाठी सुधारणा झाल्या. परंतु तो पर्यंत भारतीय भाषांसाठी लिखाण करण्यासाठी अनेकांनी अनेक अप्रमाणित पद्धती विकसित केल्या होत्या जसे गमभन, बोलनागरी इत्यादी. अशीच आणखी एक सोय म्हणजे गुगल इनपुट टूल्स. AI आणि तत्सम तंत्रज्ञानाचा वापर करून विविध भाषांसाठी बनवलेली प्रणाली, जी अर्थातच प्रमाणित नाही
दुर्दैवाने आजही भारतीय भाषांमध्ये टंकणे कठीण पडते कारण प्रमाणीकरणाचा आणि त्याच्या प्रसाराचा अभाव. तसेच भारतात मिळणाऱ्या संगणकांचे कळफलक हे अमेरिकन असतात व भारतीय इनस्क्रिप्ट अक्षरे त्यावर नसल्याने प्रसारही होत नाही.
सुदैवाने युनिकोड मुळे जगातील सर्व भाषांना संगणकावर स्वतःची एक प्रमाणित लिखाण पद्धती तयार झाली आहे ,आज सगळ्या ऑपरेटिंग सिस्टिम्स युनिकोड सपोर्ट करतात तसेच त्या त्या भाषांमध्ये लिहिण्याची सोयही देतात. परंतु भारतीय भाषांमध्ये तरी हे लिहिणे अजून तितकेसे रुळले नाही.
आपल्याला मराठी वर्णमाला येत असेल तर हे टंकणे शिकणे फार सोपे आहे. रोज अर्धा तास या हिशेबाने ४-६ दिवसात बऱ्यापैकी जमू शकते. अर्थात टंकणे गुगल इनपुट टूल्स इतक्या वेगाने होत नाही परंतु या (गुगल इनपुट टूल्स) पद्धतीत काही स्पेसिफिक शब्द लिहिणे जरा कठीण जाते वेळी इनस्क्रिप्ट माहिती असणे फायद्याचे ठरते. रच्याकने गुगल इनपुट टूल्स पण इनस्क्रिप्ट ला सपोर्ट करते.
तर आज ह्या पद्धतीने काही कठीण शब्द कसे लिहायचे हे बघू. खरे तर मी माझ्या सोयीसाठी ह्या नोट्स तयार केल्या होत्या कारण मला ही माहिती कुठेच मिळाली नाही, खास करून मराठीतले विविध र चे प्रकार इत्यादी. इतरांनाही याचा फायदा होईल असे वाटल्याने इथे देत आहे. अजूनही कोणता शब्द तुम्हाला लिहिता येत नाही असे वाटत असेल तर प्रतिसादात विचारू शकता, मी उत्तर द्यायचा प्रयत्न करीन.
मराठी वर्णमाला
अ (D) आ (E) इ (F) ई (R) उ (G) ऊ (T) ए (S) ऐ (W)
ओ (A) औ (Q) अं (Dx) अः (D_) अॅ (D@) अॉ (|)
क (k) ख (K) ग (i) घ (I) ङ (U)
च (;) छ (:) ज (p) झ (P) ञ (})
ट (') ठ (") ड ([) ढ ({) ण (C)
त (l) थ (L) द (o) ध (O) न (v)
प (h) फ (H) ब (y) भ (Y) म (c)
य(/) र (j) ल (n) व (b) श (M)
ष ( < ) स (m) ह (u) ळ (N) क्ष (Shift + 7) ज्ञ (Shift + 5)
त्र (Shift + 6) क्ष (Shift + 7) श्र (Shift + 8) ऋ (+)
् (d) ा (e) ि (f) ी (r) ु (g) ू (t) े (s) ै (w)
ो (a) ौ (q) ं (x अनुस्वार) ः (_) ॅ (@) ँ (X) ॉ (\) ृ (=) ॄ (Left Ctrl + shift + u + 0944)
(0950 is a unicode character for ॐ , you can replace 0950 with any other code to type other unicode characters. List of all Devnagari unicode characters https://unicode.org/charts/PDF/U0900.pdf)
ॐ (Left Ctrl + shift + u + 0950)
ऽ (Left Ctrl + shift + u + 093d)
₹ (Left Ctrl + shift + u + 20b9)
कीबोर्ड लेआऊट
इनस्क्रिप्ट देवनागरी कळफलक असा दिसतो. हा देवनागरी वर्णमालेप्रमाणे organise केला आहे.
काही कठीण शब्द कसे लिहिता येतील याची उदाहरणे
कृष्ण (k=
पर्वत (hjdbl)
वृत्त (b=ldl)
हऱ्या (uJd/e)
नाऱ्या (vJd/e)
झिंदाबाद (Pfxoeyeo)
ऑफीस (|Hrm)
अॅपल (D@hn)
अत्युकृष्ठ (Dld/gk=<d")
त्राही (Shift + 6eur)
त्र्यंब्यक (Shift + 6d/xyd/k)
प्रत्येक (hdjld/sk)
ऋषी (+
स्वताः (mdble_)
हृदयात (u=o/el)
महाराष्ट्र (cueje<d'dj)
राष्ट्रीय (je<d'djr/)
प्रश्न (hdjMdv)
बँक (yXk)
अँड्रॉईड (DX[dj\R[)
कॅमेरा (k@csje)
भक्ती (Ykdlr)
धक्का (Okdke)
लॅपटॉप (n@h'\h)
ज्ञानेश्वर (Shift + 5evsMdbj)
एक्स्ट्रॉ (Skdmd'dj\)
द्रौपदी (odjqhor)
ऱ्हस्व (Jdumdb)
काँप्युटर (keXhd/g'j)
माझं (cePx)
चम्पा (;cdhe)
ब्रम्ह (ydjcdu)
क्षणीक (Shift + 7Crk)
इंट्रेस्टींग (Fx'djsmd'rxi)
वाङमय (beUc/)
विठ्ठल (bf"d"n)
विठ्ठल (bf"d 'Left Ctrl + Shift + u + 200c' "n)
हूर्र्र् (utjd 'LeftCtrl + Shift + u + 200c' jd 'Left Ctrl + Shift + u + 200c' jd 'Left Ctrl + Shift + u + 200c') मुद्दाम हलन्त पाहिजे असेल तर ही पद्धत वापरु शकता
प्रतिक्रिया
2 Sep 2020 - 10:41 am | निनाद
इतर सर्व देशात त्या त्या भाषेचे कळफलक विकले जातात. जर्मनी मध्ये दोइचे कळफलक असतात. तसेच फ्रेन्च कळफलत असतात.
मग भारतातही तसेच का असू नये?
भारतात भारतीय भाषांचे कळफलक विकणे सक्तीचे केले पाहिजे. (भाषा कोणती ते ग्राहकाला ठरवता येईल.)
यासाठी सरकार आदेश सहज काढू शकते.
2 Sep 2020 - 1:25 pm | टीपीके
अगदी अगदी
पण हे सरकारला सांगायचे कसे? पत्र? सोशल मीडिया? की आणखी काही?
3 Sep 2020 - 5:34 am | निनाद
तुमच्या /किंवा तुमच्या संपर्कात येऊ शकतील अश्या खासदाराला एक पत्र लिहा.
शिवाय असे अध्यादेश कसे काढले जातात - त्याला लागणारे कागदपत्र कोणते असतात ते पाहून त्याची तयार फाईल त्यांना देता येते का ते पाहा. फायदे एका ठिकाणी सर्वात आधी दिसतील असे लिहून काढा.
हीच कार्यप्रणाली आमदारासोबत मराठी भाषेतील कळफलक सक्तीचे करावेत म्हणून करा.
या आधी फेबुवर पान बनवा. ट्विटर हँडल बनवा.
योग्य तेव्हा मोदी आणि भाषा मंत्रालय मंत्री आणि विद्यापीठ कुलगुरू यांना टॅग करत रहा.
आंदोलन सुरू करा किमान दहा हजार लोक याच्याशी जोडले जातील असे पाहा.
आशा आहे काहीतरी घडेल.
3 Sep 2020 - 10:30 am | टीपीके
ह्म्म. प्रयत्न करतो
4 Sep 2020 - 4:27 am | निनाद
फेबु पान तयार केले की द्या इथे...
30 Sep 2020 - 6:07 am | निनाद
पुढे काय झाले, केले गेले याची उत्सुकता आहे.
30 Sep 2020 - 11:16 pm | टीपीके
नाही अजून नाही. सध्या काम फार वाढलंय.
तस एक पत्र तयार आहे पण पाठवले नाही अजून.
खरं तर मी fb वापरत नाही त्या मुळे fb पेज जरा बघावे लागेल काय असते आणि कसे वापरायचे.
26 Sep 2020 - 4:36 pm | Gk
इंग्रजी कीबोर्ड जास्त लागणारी अक्षरे मधल्या लायनीत आहेत , थोडी कमी चालणारी वर व खाली आहेत, q z x तर अगदी कोपऱ्यात आहेत , म्हणून इंग्रजी की बोर्ड लगेच आत्मसात होतो
तुमच्या लिपीत , अकार वगैरे वर , क ख ग वगैरे कुठेतरी मध्ये आहे , म्हणजे बोटे फार नाचवावी लागणार
27 Sep 2020 - 5:00 pm | टीपीके
एका हाताने टंकन करणार असेल तर नक्कीच त्रास होईल दोन हात वापरले तर मला नाही वाटत. अर्थात तुम्हाला असे का वाटते मला माहिती नाही पण आवड आपली आपली
27 Sep 2020 - 5:41 pm | Gk
तरीही अवघड वाटत आहे
29 Sep 2020 - 5:44 pm | चौथा कोनाडा
माझ्या माहिती प्रमाणे हा इन्स्क्रिप्ट मराठी की बोर्ड हा संशोधन करुन तयार केला आहे, त्यामागे नेहमी लागणारी अक्षरे, काना-उकार-मात्रा-अनुस्वार याचा रीतसर असा अभ्यास केला आहे त्यामुळे सरावानंतर अवघड जाऊ नये ! हजारो इन्स्क्रिप्ट मराठी की बोर्ड वापरतात !
आपल्या सारखे धेडगुजरी ज्यांना इंग्लिश की बोर्डची सवय झालेली आहे त्यांना अवघड वाटणारच !
(मी ही त्यात आलो)
5 Oct 2020 - 8:54 am | शाम भागवत
शेषन यांनी निवडणूक ओळखपत्रांवर भारतीय भाषांत मतदाराचे नाव आले पाहिजे असं ठरवल्याने हे सगळे संशोधन केले गेले. त्यासाठी सी डॅकनी पुढाकार घेतला होता. सी डॅकनी महासंगणक बनवलाय या उद्गारांवर ज्यांची प्रचंड टिंगलटवाळी केली गेली त्या डाॅ. विजय भटकरांनी 🙏 यात पुढाकार घेतला होता.
असो.
4 Oct 2020 - 11:06 am | पाषाणभेद
बरहात वार्याने असा शब्द कसा टाईप करायचा?
हे इनस्कीप्ट काय आहे?
गमभनच चांगले आहे पण ते आता सॉप्टवेअर अॅप्लीकेशन बंडल सुटचा भाग झालेले आहे.
4 Oct 2020 - 12:12 pm | टीपीके
इन्स्क्रिप्ट भारतीय भाषांसाठी प्रमाणीकरण केलेला एक कीबोर्ड लेआउट आहे. आयफोन आयपॅड वरती जर तुम्ही मराठी कीबोर्ड सिलेक्ट केला तर जो दिसतो तो हाच. विंडोज वरती ही तुम्हाला हाच लेआउट मिळू शकतो. आणि लिनक्सवर पण.
'Standard layout' is the keyword
6 Oct 2020 - 1:50 pm | टर्मीनेटर
हे पटतंय! कारण मला मोबाईलवर टंकन करायला खूप कंटाळा येतो तरी वेळप्रसंगी मराठीत टाईप करणे माझ्या आयफोनवर नक्कीच सोपे जाते. खालच्या प्रतिसादात शाम भागवत साहेबांनी "वार्याने"हा शब्द कसा लिहावा हे सांगितलय पण तो आयफोनवर कसा लिहावा ह्याबद्दल मार्गदर्शन कराल का? कारण मला वाऱ्याने, कष्टकऱ्याने, वारकऱ्याने असे शब्द त्यावर लिहिता येत नाहीत.
6 Oct 2020 - 2:28 pm | शाम भागवत
मी हे आयपॅड प्रोवरून टाईप करतोय.
इंग्रजी झेडच्या जागी आयपॅड इन्स्क्रिप्ट कीबोर्डवर अनुस्वार येतो. शिफ्ट की दाबली की तिथे “ऱ”येतो. त्या “ऱ” चा पाय मोडायचा मग नंतरचे व्यंजन टाईप करायचे.
6 Oct 2020 - 2:37 pm | टर्मीनेटर
हो, जमले....अतीव धन्यवाद.
👍
5 Oct 2020 - 8:41 am | शाम भागवत
vaaRyaane
किंवा
vARyAne
यात R हा कॅपीटल असतो. किंवा नुक्ता असलेला र.
बराहा पॅड मधे rx वापरायचो.
5 Oct 2020 - 6:16 pm | चौथा कोनाडा
बरहाचा की-बोर्ड ले आऊट आणि जोडाक्षरांची उदाहरणं इथं आहेतः
http://baraha.com/v10/help/Keyboards/dev_phonetic.htm
6 Oct 2020 - 11:48 am | Nitin Palkar
udghatan हा शब्द गुगल इन्डिक कि बोर्ड मध्ये उद्घाटन असा सर्रास टन्कला जातो आणि तसाच सध्या प्रचलित होत आहे...
6 Oct 2020 - 12:43 pm | शाम भागवत
😀
6 Oct 2020 - 1:10 pm | चौथा कोनाडा
इथं मिपावर देखील "उद्घाटन" असाच टंकला जातोय.
मिपावर अक्षराचा पाय कसा मोडायचा ?
(सध्या जे काही शुद्धलेखन, व्याकरण , मराठी भाषा रुढ होतेय ते बघवत नाही, मराठी काय सोप्पी आहे असं समजुन परभाषिक लोक मराठीवर अत्याचार करत आहेत )
6 Oct 2020 - 2:37 pm | शाम भागवत
याबाबतीत मनोगत हे संस्थळ अप्रतीम आहे.
पण तिथल्या नियमांच्या जाचाला कंटाळून ह्या संस्थळाची निर्मिती झाली आहे.
😀
एक्सेलमधे फाॅर्म्युला तयार करताना काहीवेळा “सर्क्युलर रेफरन्स” चा एरर मेसेज येतो. त्याची आठवण झाली.
😀
7 Oct 2020 - 4:34 am | निनाद
हा विषय कुणीतरी मनावर घेऊन unicode.org ला जरा लावून धरला पाहिजे म्हणजे character code tables बदलतील.
त्याशिवाय हे दुरुस्त होईल असे वाटत नाही. तसेच जे लोक फाँट बनवतात त्यांनाही याची जाणीव सारखी करून दिली पाहिजे. मला वाटते त्या प्रमाणे जोडाक्षर कसे दिसावे याची मांडणी unicode.org ठरवते.
0926 हा कोड आला की द अक्षर उमटते.
0927 हा कोड आला की ध, तसेच 0918 हा कोड आला की घ.
तथापि द्ध साठी कोड काय ते कळले नाही. तसेच द आणि घ यांचा एकत्रित कोड काय हे पण आकलन झाले नाही.
फाँट बनवतांना मग ते कसे उमटत जात असावेत यावर जाणकारांनी यावर प्रकाश टाकावा.
अधिक माहिती: https://unicode.org/charts/PDF/U0900.pdf
7 Oct 2020 - 5:54 pm | चौथा कोनाडा
+१
शासकिय पातळीवर मराठी विभागाचे लोक या संबधी काही हालचाल करत आहेत की नाही तेच कळत नाही.
मराठी संस्थळे, विद्यापीठ, पुस्तक प्रकाशक इ लोकांनी एकत्र येवुन या वर चर्चा घडवली तर अडचणी समजतील आणि त्यानुसार सुधारणा करता येतील.
6 Oct 2020 - 1:27 pm | सुमो
उद्घाटन
पाय मोडायचा असेल तर प्रमुख कीबोर्ड वापरा. 😐
6 Oct 2020 - 4:16 pm | Gk
इंग्रजी की बोर्ड हा कुणाला स्पर्धा म्हणून काढला नव्हता , तो वापरणार्याची गरज व निकड सुकर व्हावी म्हणून काढला होता,
त्यामुळे त्यात दाही बोटात कोणती अक्षरे जास्त वापरली जातात व कोणते बोट कुठवर पोचेल ह्याचा अभ्यास करून मग तो की बोर्ड बनला व लोकप्रिय झाला
इतर भाषेतले की बोर्ड हे केवळ अस्मिता म्हणून बनवले जात आहेत , किंवा इंग्रजीला स्पर्धा म्हणून , त्यामुळे ते सुकर नाहीत , तुमच्याच लिपीत कितीतरी केपीटल अक्षरांचा प्रयोग आहे , तो प्रत्येक वेळी अजून एक केप की वापरून पूर्ण करावा लागतो , याउलट इंग्रजी की बोर्ड वरून झ साठी सरळ jh दाबणे जास्त सोपे आहे
एके काळी स्पेशल मराठी बोर्ड होता , टाइप रायटरला , हे खरे आहे , तो त्याकाळी पूर्ण महाराष्ट्रात एकच होता , हेही खरे आहे , पण आता जग बदलले आहे , आता तसा अजून एक नवीन कीबोर्ड लक्षात ठेवने फारसे सोपे नाही , बोटांनाही अवघड जाईल
अस्मितेच्या नावाने प्रत्येक भाषेने नवा की बोर्ड हे म्हणजे न्यूटन च्या गोष्टीतल्या मांजराला एक भोक आणि पिलांना अजून एक भोक असा प्रयोग होईल
क्षमस्व
6 Oct 2020 - 10:00 pm | टीपीके
मुळीच पटलं नाही. क्षमस्व.
मग आपण देवनागरी अक्षरे सोडून रोमनच अक्षर वापरायची का?
6 Oct 2020 - 11:22 pm | Gk
https://www.youtube.com/watch?v=oBu0ibZD7p8
http://www.bhashaindia.com/
7 Oct 2020 - 1:49 pm | Gk
लोकांना कॉम्पुटर बाबतीत सोपे व फुकट हवे असते
पूर्वी श्रीलिपी विकत होती , तेंव्हा पायरेटेड व्हर्जन हुडकायला त्यांचे इनिस्पेक्तर गावोगावी फिरायचे व छापा घालून चोरीची श्रीलिपी मिळाली तर केस करायचे
म्हणून फ्लोपिवरून शिवाजी 01 , 02 वापरणे सोपे व बिना कटकटीचे होते
डॉक टू पीडीएफ आणि व्हाईस वरसा करायलाही किती खर्च आणि वेळ जायचा , आता सगळे मोबाईल वरून फुकट होते
आता मराठी लिप्याही फुकट व सोप्या असतील तर लोक तेच प्रेफर करतील
23 Nov 2020 - 1:33 pm | चौथा कोनाडा
इनस्क्रिप्ट टंकनचे मोबाइल अॅप्लिकेशन आहे का ?
23 Nov 2020 - 11:56 pm | टीपीके
ॲपलचा स्टँडर्ड कीबोर्ड इनस्क्रिप्ट आहे. आयफोनवर तोच असतो. गुगलचा स्टँडर्ड कीबोर्ड मात्र तो नाहीये. पण गुगल इनपुट टूल्स मधे मात्र इनस्क्रिप्टचा विकल्प आहे
30 Nov 2020 - 11:02 pm | चौथा कोनाडा
धन्यू टीपीके !
गुगल इनपुट टूल्सचा इनस्क्रिप्टचा पर्याय पाहिला, चांगला वाटत आहे पण त्याचा सराव होणे हिच मुश्किल गोष्ट आहे. संगणकावर बसले वर्षानुवर्षाच्या सरावानुसार फोनेटिक टंकनाकडे हात आपसुक वळतात. वेळेच्या मर्यांदानुसार इनस्क्रिप्टचा सराव हेच मोठे आव्हान होऊन बसले आहे.
या पार्श्वभुमीवर जर मोबाईल अॅपम्ध्ये इनस्क्रिप्टचा (ऑन-स्क्रिन) कळफलक मिळाला तर हातसंचावर सराव होऊन असे वाटते.
इनस्क्रिप्टच्या (ऑन-स्क्रिन) कळफलकासाठी कुणाला मागणी करावी लागेल ?
जाणकारांनी मार्गदर्शन केल्यास बरे पडेल.
26 Nov 2020 - 1:43 pm | शाम भागवत
मेसेज आता पाहिला. थोड्यावेळाने कळवतो.
26 Nov 2020 - 3:15 pm | शाम भागवत
"मराठी कीबोर्ड विथ मराठी स्टिकर" असे गुगल प्ले वर नाव आहे. एप्पल वाले या की-बोर्डवर खुष असतात. या की-बोर्डवर "ॲ" कसा काढायचा ते अजूनही मला कळलेलं नाही. तेवढी अडचण अजून सुटलेली नाही.
व्हाईस टायपिंग साठी "मराठी कीबोर्ड" -देश कीबोर्ड असे नाव आहे. हा पण अतिशय चांगला आहे. आपले उच्चार स्पष्ट असतील तर काहीही त्रास होत नाही. मात्र टाईप झालेले दुरुस्त करावयाचे असेल तर मात्र त्यांनी पुरवलेला की-बोर्ड खूप त्रासदायक वाटू शकतो. मग मी "मराठी कीबोर्ड विथ मराठी स्टिकर" हा कीबोर्ड तात्पुरता निवडतो.
गुगल प्ले वरून नाममात्र वीस रुपये भरून जाहिरात मुक्त प्रत मिळवता येते. हा दर काही महिन्यांपूर्वीचा आहे. पैसे देण्यासाठी भीमचा पर्याय नसल्याबद्दल मी नापसंती व्यक्त केली होती.
हा सगळा मॅसेज मी व्हॉईस टायपिंग वरून करत आहे.
17 May 2021 - 7:19 pm | टीपीके
https://play.google.com/store/apps/details?id=marathi.keyboard.marathi.s...
चार दिवसांपूर्वी इन्स्क्रिप्ट साठी हा किबोर्ड वापरायला सुरवात केली. सध्या तरी बरा वाटतोय
18 May 2021 - 1:20 pm | चौथा कोनाडा
धन्यु टीपीके !
माझ्या मोबाइलवर (रेडमी ९ प्राईम) वर उतरवून घेतला आहे.
वापरुन पाहतो.
3 Oct 2021 - 5:59 pm | चौथा कोनाडा
इन्स्क्रिप्ट अॅप वापरून मोबाइलवर मराठी टंकनाचे प्रयत्न केले,
पण मोबाईलच्या छोट्याश्या कळफलकावर टंकन करताना खुप गैरसोय वाटली.
कदाचित फोनेटीकला सरावलेली बोटे हे देखिल कारण असू शकेल.
सध्या मोबाइलवर गुगल मराठी आणि गरज भासल्यास स्वरलिपी अॅप वापरतो.
3 Oct 2021 - 6:08 pm | टीपीके
मला पण नाही आवडले हे अॅप, स्टेबल नाही वाटले, मी काढून टाकले. सध्या स्टिकर बनवणारा शोधतो आहे ;)
हे फार महत्वाचे कारण असू शकेल
5 Oct 2021 - 11:55 am | चौथा कोनाडा
हो आणि कॉम्प्युटरवर इन्स्क्रिप्ट वापरायचं असेल तर स्टिकर मस्ट आहेत !
27 Nov 2020 - 10:48 am | मित्रहो
छान माहिती आहे. इनस्क्रिप्टचा वापर कमी होता आणि अधिक कमी होत जाईल. पुढे लोक कदाचित व्हॉइस इनपुटचा वापर करतील.
मी इनस्क्रिप्ट वापरतो. मला किबोर्ड पाठ झाला आहे त्यामुळे मराठीत मराठीसारखे लिहताना त्रास होत नाही. गुगल इनपुट टुल्स वापरले तर प्रत्येक शब्दाचे स्पेलिंग तयार करुन लिहावे लागते त्यामुळे मला हे सोपे वाटते. कदाचित मेंदूला सवय झाली असेल. हल्ली काही ब्रॉउझर वर अॅ बरोबर दिसत नाही. तसेच पाँड हा शब्द (h + \ + x) असा टाइप केला तर पॉंड असा दिसतो बऱ्याचदा तो अनुस्वार दिसतच नाही म्हणून मग मी (h+e+x) पाँड असा टाइप करतो. हे चुकीचे आहे पण चालते
यावरुन VI editor विरद्ध इतर हा जुना वाद आठवला. अर्थात मी VI/ VIM वापरणारा परत तेच सवय. हल्ली फक्त Outlook . परवा मुलाचे बघितले तर Program Blocks आहेत ज्यात फक्त variable ची नावे लिहायची. हळूहळू टाइपिंगचे महत्व कमी होईल असे दिसते.
4 Oct 2021 - 11:52 am | गॉडजिला
हे घडणे संपुर्ण शक्य नाही कारण ध्वनी प्रदुषण न करता लिखाण करायची बाल मानवाला लावली जात असलेली सवय...
5 Oct 2021 - 2:03 pm | सुशान्त
संगणकावर टंकलेखन करण्यासाठी इन्स्क्रिप्ट ही पद्धत सोपी तर आहेच. मुख्य म्हणजे ती प्रमाणित आहे.
जेव्हा आपल्याला प्रशिक्षित मनुष्यबळाची आवश्यकता असते तेव्हा प्रमाणीकरणाचा उपयोग होतो. दुर्दैवाने मराठीचा भाषाव्यवहार हा वेगाने ऐच्छिक आणि अनौपचारिक क्षेत्रापुरताच मर्यादित होत चालल्याने प्रमाणीकरणाचे महत्त्व कमी होत चालले आहे.
सहध्वनिसंचावर (सेलफोनवर) उपलब्ध झालेली मौखिक टंकनाची सोय अर्थातच उपयुक्त आहे. पण मजकूर संपादित करायचा असेल तर त्यासाठी अजून तरी हातांचा वापरच मोठ्या प्रमाणावर होत आहे. अशा परिस्थितीत इन्स्क्रिप्टचा वापर करणे इष्ट आणि सोयीचे आहे. (ह्यातला सोयीचा भाग अर्थातच व्यक्तिसापेक्ष राहणार हे मान्यच आहे.) निदान मोठ्या प्रमाणावर मजकूर टंकावा लागतो अशा व्यक्तींना टंकलेखन शिकवताना तरी प्रमाणित आराखड्याचा उपयोग व्हावा अशी किमान अपेक्षा आहे.
ज्यांना मराठीची बाराखडी येते त्यांना टंकलेखनासाठी प्रथमतःच इन्स्क्रिप्ट शिकणे अतिशय सोपे आहे. त्यामुळे ज्यांना इच्छा असेल त्यांनी इन्स्क्रिप्ट शिकणे सोयीचे आहे ह्यात शंका नाही.
आपल्या लेखाला पूरक माहिती म्हणून जिज्ञासा असेल त्यांना विकिपीडियावरची इन्स्क्रिप्ट ही नोंद पाहता येईल.
5 Oct 2021 - 2:54 pm | टीपीके
5 Oct 2021 - 2:56 pm | टीपीके
धन्यवाद, तुम्ही माझे म्हणणे माझ्याहून चांगल्या पद्धतीने मांडले :)
5 Oct 2021 - 4:02 pm | सतिश गावडे
जर गुगल इंडीक हा फोनेटीक कीबोर्ड वापरुन माझे काम होत असेल तर मी "शास्त्रशुद्ध" इनस्क्रिप्ट कीबोर्ड का वापरावा?
आणि हल्ली बरेच जण तर बोलटंकन सुविधा वापरतात, त्या हे इनस्क्रिप्ट कसं बसवायचं?
5 Oct 2021 - 4:10 pm | टीपीके
सगा सर, तुम्ही आम्ही करतो तो जुगाड.
आणि शास्त्रशुद्ध पद्धत का वापरायची याचे कारण वर लिहिलेच आहे. तुम्ही मिपा वर वेगळी, माबो वर वेगळी, विंडोज वर वेगळी, ॲपल वर वेगळी, अँड्रॉइड वर वेगळी पद्धत वापरणार का लिहायला? इंग्रजी साठी असे करावे लागते का? मग मराठीसाठी का?
5 Oct 2021 - 4:22 pm | सतिश गावडे
प्रमाणिकरणाचा मुद्दा पटला. पण वापरकर्ते सवयीचे ध्वनीय टंकफलक सोडतील असे वाटत नाही. (आणि गुगल काही इनस्क्रिप्टच्या नादात गुगल इंडीक बासनात गुंडाळून ठेवेल असेही वाटत नाही)
ज्याचे इनस्क्रिप्टविना ज्याचे अडत असेल तोच इनस्क्रिप्ट वापरेल :)
5 Oct 2021 - 4:31 pm | टीपीके
गुगल ने दिलेली सोयही जुगाडच ना? :) अहो योग्य कळफलक मिळाला तर इनस्क्रिप्ट पण सहज रुळेल. इतकं नाही कठीण ते
5 Oct 2021 - 4:23 pm | अमर विश्वास
मी गुगुल इनपुट टूल वापरतो .... वापरायला फार सोपे वाटते
सवयीचा परिणाम दुसरे काही नाही
ऑनलाइन असल्याने डाउनलोड / इन्स्टॉल ची गरज नाही
अर्थात टायपिंग करताना ऑनलाईन असावे लागते हा प्रॉब्लेम आहेच.