सेंटर फॉर पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन या स्वयंसेवी संस्थेतर्फे दाखल करण्यात आलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली. पीएम केयर्स फंडाला एनडीआरएफमध्ये ट्रान्सफर करण्याचा आदेश दिला जाऊ शकत नाही, असं न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावताना म्हटलं.
सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की, प्राईम मिनिस्टर्स सिटीझन असिस्टेंट्स अँड रिलीफ इन इमर्जन्सी सिच्युएशन्स (पीएम केअर्स) फंडाला राष्ट्रीय आपत्ती निवारण निधी अर्थात नॅशनल डिझॅस्टर रिलीफ फंड (एनडीआरएफ)मध्ये विलीन करण्याची आवश्यकता नाही.
पी एम केअर फंड ची स्थापना कोरोना काळात करण्यात आली. आताच सरकारने जाहीर केलेय की तो निधी सरकारी नाही. किती पैसे जमा झाले? किती खर्च करण्यात आले? ह्याचा कुठलाही हिशेब देण्यास नकार देण्यात आलाय. कोरोना संकटात भरभरून दान देण्यात आलेल्या पैशांचे काय झाले ह्याचा हिशेब देण्याची नैतिक जबाबदारी भारत सरकारची आहे. ही जबाबदारी सरकार का पार पाडत नसावे?? नेमकं काय आणी का लपवण्यात येत आहे?? पैसे खर्च केलेत तर तसं देशातील जनतेस दाखवण्यात नेमकी काय समस्या आहे??
पीएम केअर्स या फंडातील ५० हजार कोटी रुपये गेले कुठे? असा प्रश्न कोंग्रेसने ऊपस्थित केलेत. ह्यात गोपनीय ठेवण्यासारखे नेमके काय आहे?
https://www.loksatta.com/desh-videsh/pm-care-fund-is-not-a-government-fu...
प्रतिक्रिया
30 Sep 2021 - 3:59 pm | Rajesh188
मध्ये कोणते पैसे खर्च केले जात आहेत.बंगाल मध्ये यूपी मधून गुंड प्रवृत्तीच्या लोकांना निवडणूक केलेस घेवून गेले त्या साठी पैसा कोठून खर्च केला गेला.
महाराष्ट्रात कंगना,अर्णव,राम कदम,राणे,फडणवीस काय फुकट तमाशा करत आहे का?
विविध प्रसार मध्यम bjp विरूद्ध काहीच बोलत नाहीत .
एक कारण ed, cbi ह्यांची भीती.
आणि दुसरे कारण होणारे नुकसान गैर कायदेशीर पने bjp देत असणार
30 Sep 2021 - 10:05 am | प्रसाद गोडबोले
=))))
मला खरेच पुढच्या निवडणुकांच्या नंतर तुम्हाला भेटायचं आहे सर !
बाकीच्यांचे सोडून दे , बहुतांश तर अशिक्षित आहेत , त्यांच्या विधानांमध्ये काहीही लॉजिकल फ्लो नाही, केवळ मोदी द्वेष आहे अन म्हणुन उगाच NDTV BBC LOKSATTA असले काहीतरी वाचुन प्रतिसाद टाईप करत असतात. स्वतःचे अॅनालिसिस नाही, स्वतःचे डेटा कलेक्शन नाही , स्वतःची काँक्रीट लाईन ओफ थिन्किन्ग नाही . त्यांचे प्रतिसाद मजा म्हणुन, फाट्यावर मारायला म्हणुन उत्तम असतात.
पण एखादे प्राध्यापकही त्यांच्या सुरात सुर मिळत आहेत हे पाहुन खरेच आश्चर्य वाटते.
मला खरेच पुढच्या निवडणुकांनंतर , राहुल गांधी , ममतादीदी, मायावती, ओवेसी किंवा खणता राजा वगैरे कोणी पंतप्रधान झाल्यावर तुम्हाला भेटुन तुम्हाला शुभेच्छा द्यायच्या आहेत !!
30 Sep 2021 - 12:41 pm | Rajesh188
आणि तुम्ही मोठे ज्ञानी आहात का.
घोकाम पट्टी करून कोणत्या तरी विषयात पदवी मिळाली म्हणजे माणूस ज्ञानी होत नाही.
हमाल होतो त्याला स्वतःची काहीच बुध्दी नसते.
जीवनाच्या मैदानात जो स्वतःचे साम्राज्य निर्माण करतो तो ज्ञानी असतो
कोणत्या तरी कंपनी नी दिलेल्या पगार रुपी पैशावर किंवा सरकार नी दिलेले पगार रुपी पैशावर जीवन जगणारे .
ज्ञानी नसतात.
30 Sep 2021 - 1:21 pm | प्रसाद गोडबोले
होय.
मला मुलभुत गोष्टी कळून चुकल्या आहेत . उदाहरणार्थ म्हणुन,
१. आर्थिक विषमता : मोदी सरकार असो की काँग्रेस सरकार , काही मोजक्या लोकांच्या हातात साधन संपत्ती एकवटलेली असणे हे कायमच रहाणार आहे , हा दोष भाजप सरकारचा नाही, ही नैसर्गिक स्थिती आहे.
२. भारतीय न्याय्य व्यवस्था : बाकी देशात काहीही चालो पण सुप्रीमकोर्ट बहुतांश वेळा ९९.९९% वेळा न्यायाला अनुसरते , पी. एम केयर मध्ये काहीही घोटाळा आल्याचा अजुनही ठोस पुरावा नाही, तुम्ही आणि तत्सम लोकं नुसताच धुरळा उडवण्यात व्यस्त आहात . काही घोटाळा असल्याचा पुरावा आला तर मोदी सरकारला कोणीही वाचवु शकणार नाही असा माझा ठाम विश्वास आहे. पण काहीच पुरावा नसताना नुसत्याच तोंडाच्या वाफा झाडणे हे फक्त मोदी द्वेषाचे अन हिंदु द्वेषाचे लक्षण आहे बाकी काही नाही.
३. बाकी तुमचा अन्य प्रतिसाद अवांतर आहे मुद्द्याला धरुन नाही म्हणुन फाट्यावर मारता येईल पण इथेही मोदी सर्कार्चे यश दाखवुन देणारी ही बातमी पहा : India adds 28 unicorns in 2021 to take total to 66; over 3.3 lakh people employed: Nasscom
मोदी ससरकार्च्या काळात भांडवल्शाहीला अन पर्यायाने उद्योजकतेला पुरक वातावरण निर्माण झाले आहे हे म्हणजे अगदी करतलामलक इतके स्पष्ट आहे.
मी परत एकदा पुनरुच्छार करतो : मोदी द्वेष करा , हिंदुद्वेष करा , पण इतकाही करु नका की स्वतःची लॉजिकल थिंकिंग कपॅसिटी पर्मनंट डॅमेज होउन वैयक्तिक नुकसान होईल . तुम्ही जरा नीट पाहिलेत तर तुमच्या लक्षात येईल की भाजपा मध्ये कोणीही राहुल गांधी , प्रियांका गांधी , मंमसिंग, सोनिया गांधीं, मायावती ह्यांचा द्वेष करत नाही, कदाचित ममता , ओवेसी , कन्हैया कुमार , उमर खालिद वगैरे महान नेत्यांबद्दल थोडासा द्वेष असेल, पण तोहि इतक्या मोजक्या लोकात आहे की बाहीच्या बहुतांश लोकांना त्याचा फरक पडत नाही. दुसर्या बाजुला मात्र , बहुतांश विरोधक मोदी- शहा-योगी- फडणवीस / आरेसेस / हिंदु ह्यांचा द्वेष ह्या केवळ एका मुद्द्यावर एकवटलेले आहेत.
असो , चालायचंच !
काळजी घ्या .
30 Sep 2021 - 1:55 pm | श्रीगुरुजी
***पुढे वाचली गीता . . .
1 Oct 2021 - 6:05 pm | चौथा कोनाडा
श्रीगुरुजी
***पुढे वाचली गीता . . .
हे वाचून खालील पीजे चिटकवायचा मोह आवरला नाही :
गीता आपल्या कारनी शहराबाहेर ड्राईव्ह करत होती.
मोकळा सुंदर रस्ता, सुर्यास्ताची वेळ, थंड हवा.
मग काय !
गाडी सुसाट !!
:
आणि अचानक वळणावर एक गाढव आडवं आलं.
गीतानी कर्ररररकचू्..न ब्रेक दाबला.
:
वाटलं आता जाऊन धडकतेकी काय .. !!
गीतानी डोळे घट्ट मिटून घेतले..
आणि.....
:
:
:
:
:
हुश्श.....!!!
:
:
::::::::....गाडी गाढवाच्या अगदी जवळ जाऊन, त्याच्या पुढचं थांबली. व अशाप्रकारे,
गाढवा पुढे
................,,,,,, वाचली गीता.
1 Oct 2021 - 11:57 pm | तर्कवादी
वा वा,... हलका फुलका, तरी टू द पॉइंट प्रतिसाद . ..गाढव कोण, गीता कोण , वाचली कशी सगळ कसं अगदी स्फटिकाप्रमाणे स्वच्छ (कोणत स्फटिक ते आता विचारु नका) :)
2 Oct 2021 - 12:54 pm | चौथा कोनाडा
विषय भरकटवण्यात
😊
आपलाही सहभाग नको का ?
30 Sep 2021 - 4:51 pm | Rajesh188
समजा ही मोजकीच श्रीमंत लोक ज्यांनी साधन संपत्ती स्वतः कडेच हडप करून ठेवलेली आहे ते हिंदू आहेत.
तरी राहिलेल्या हिंदू लोकांनी मुस्लिम धर्म स्वीकारला तर ही मोजकेच बोके धार्मिक उन्माद मध्ये समूळ नष्ट होतील किती ही श्रीमंत असेल तरी.
धार्मिक उन्माद तयार करून बोके कोणी खात असतात .
99% संपत्ती वर dalla मारून 99% लोकांना
( १% हे बनील बोके असतात) धर्माची ,राष्ट्र प्रेमाची अफू ची गोळी दिली जाते.
हेच सिद्ध होते.
30 Sep 2021 - 9:37 am | सुबोध खरे
१४० कोटी लोकांनी फक्त २५ रुपये दरडोई दिले तरी एवढे होतात
PM Cares Fund received Rs 3,076 crore in donations in just 5 days, shows audit report
https://www.indiatoday.in/india/story/pm-cares-fund-received-rs-3-076-cr...
30,76,62,58,096 यापुढे १२९ कोटी (१,२९,३४, ०८,४१२) रुपये म्हणजे काहीच नाही.
कशाला रडारड करताय?
सर्व सामान्य जनतेचा श्री मोदींना असलेला पाठिंबा पाहून लोकांची जळजळ होते आहे. पण त्याला इलाज नाही.
29 Sep 2021 - 10:27 pm | Rajesh188
कोणत्या कायद्या अंतर्गत बनवला आहे?
कोणत्याच कायद्या अंतर्गत बनवला नसेल तर हा फंड च बेकायदेशीर आहे देशाच्या पंतप्रधान ना असा कोणत्याच कायद्या अंतर्गत न येणारा फंड निर्माण करून लोकांकडून पैसे जमा करण्याचा अधिकार नाही.
29 Sep 2021 - 10:31 pm | सुक्या
मस्त . .
केस टाकता का मग कोर्टात?
29 Sep 2021 - 10:32 pm | hrkorde
कोविड काळात आमची हॉस्पिटल ड्युटी असल्याने पूर्ण लॉकडाऊनमध्ये 300 रु एडिशनल भत्ता मायबाप सरकारने दिला. मी हॉस्पिटलजवळच राहत असल्याने व पूर्वीपासूनच रोज रिक्षानेच जात असल्याने मला लॉकडाऊन करोना कशाचाच फरक पडला नाही, भत्ता मिळाला , शिवाय साथ जेंव्हा अगदी जोरात होती त्या काळात दोन टीम करून एक आड एक दिवस ड्युटी लावली होती ,म्हणजे ते दिवस घरीच आराम केला.
हे 111 रु अगदी नगण्य आहेत.
पी एम रिलीफ फ़ंड जीपेवर दिसला नाही.
30 Sep 2021 - 12:18 am | आग्या१९९०
मानलं कोरडेसाहेब तुम्हाला. इतका पारदर्शक देणगीदार पाहून उद्या आमटीत कितीही गूळ टाकला तरी गोड लागणार नाही आम्हाला.
30 Sep 2021 - 9:56 am | गॉडजिला
१०.२५ ला ₹१११/- देणगी देउन १०.३२ ला मिपावर स्क्रीन शॉट ?
30 Sep 2021 - 10:17 am | नि३सोलपुरकर
मान गये गॉजि , आपकी पारखी नजर और .........
हहपुरेवा .
30 Sep 2021 - 12:22 pm | अमर विश्वास
मान गये गॉ जी सर ...
जबरदस्त हसलो ..
कोरडे साहेबांचा स्क्रीनशॉट "Donation of the Century" म्हणून गिनेज बुकात जावा हीच शुभेच्छा
30 Sep 2021 - 12:59 pm | चौथा कोनाडा
कोरडे साहेब, तुमचं कौतुक करायलाच हवं या देणगीबद्दल !
आमचा पण एक सीएम केअर्स फण्ड आहे (सीएम म्हणजे मुख्यमंत्री नाही) त्याला ही द्या ना १५१ रु (फक्त) देणगी. तपशिल व्यनिने पाठवत आहे !
30 Sep 2021 - 4:59 pm | hrkorde
आज मोबाईलवर लिंक आली
त्यावर क्लिक करून ओटीपी टाकल्यावर पावती आली
30 Sep 2021 - 5:34 pm | गॉडजिला
अब तो आपको माननाही पडेगा.
1 Oct 2021 - 9:35 am | सुबोध खरे
१११ रुपयांचा गूळ टाकूनही तुमची आमटी आंबटच आहे कि झाली थोडी गोड
2 Oct 2021 - 9:04 pm | चामुंडराय
डॉ. गजानन विनायक कागलकर सर, लिहिण्याच्या आणि शेअर करण्याच्या भरात असे काही करता आणि पितळ उघडे पडते.
काळजी घेत जा नाहीतर ह्या आयडीला देखील Modiत जावे लागेल !!
3 Oct 2021 - 4:43 am | hrkorde
तुम्हीपण चामुंडराय नावाने पैसे भरा व इथे पावती लावा, चामुंडीमागची खरी मुंडी कोण आहे , हे जगाला समजेल
30 Sep 2021 - 6:30 pm | hrkorde
https://pmnrf.gov.in/en/online-donation
ह्याच्यावर QR code आहे , त्यावरून पीएम नॅशनल रिलीफ फ़ंडला जीपेने देणगी देता येते. पण जीपेच्या सर्च इंजिनात ते कुठेही मिळत नाही आहे. जीपेला तसे मेल लिहून मी कळवले आहे.
आता तो कोड एका मोबाईलवर किंवा पीसीवर ओपन करून मग तो दुसऱ्या मोबाईलने जीपेने द्यावा लागेल.
नेहरू फंडाला देणगी देण्यासाठी 2 ऑक्टोबरसारखा सुंदर दिवस नाही.
1 Oct 2021 - 10:40 am | मराठी_माणूस
सरकारी डोमेन नेम का वापरले ?
1 Oct 2021 - 12:13 pm | प्रदीप
सर्वच काही भरवावे लागणार आहे का?
फंडाचे प्रमुख विश्वस्त भारताचे पंतप्रधान आहेत. त्याचे सचिव पंतप्रधानांच्या हपिसातील जॉईंट सेक्रेटरी आहेत. हे कारण असावे.
पी. एम. एन. आर. एफच्या बाबतीतही हेच लागू आहे.
अधिक माहितीसाठी माझा हा प्रतिसाद पहावा.
1 Oct 2021 - 12:28 pm | मराठी_माणूस
सत्ता बदलल्यावर फंडाचे प्रमुख विश्वस्त कोण असतील ?
1 Oct 2021 - 12:38 pm | नावातकायआहे
" लॉजिकल " प्रश्न विचारु नयेत - आदेशानुसार ;-)
1 Oct 2021 - 12:53 pm | प्रदीप
काहीही माहिती न घेता, नुसतेच इथे प्रश्न विचारण्यांत काय हंशील आहे? 'दुनिया पोहोचू शकत नाही, तिथे मी जातोय, बघा' ह्या शहाणपणापलिकडे काही नाही.
तरीही ह्या खुसपटी प्रश्नाचे (जो मलातरी 'लॉजिकल' वगैरे अजिबात वाटत नाही- उलट तो अडाणीपणाचा वाटतो) उत्तर, माझ्या परीने देतो:
Constitution of the Trust :
Prime Minister is the ex-officio Chairman of the PM CARES Fund and Minister of Defence, Minister of Home Affairs and Minister of Finance, Government of India are ex-officio Trustees of the Fund.
The Chairperson of the Board of Trustees (Prime Minister) shall have the power to nominate three trustees to the Board of Trustees who shall be eminent persons in the field of research, health, science, social work, law, public administration and philanthropy.
[अधोरेखीकरण, माझे]
माझ्यासारख्या अतिसामान्य माणसाला तरी ह्यावरून असे दिसते की पंतप्रधान, संरक्षणमंत्री, गृहमंत्री व अर्थमंत्री हेच फंडाचे नेहमी विश्वस्त रहातील. ह्यांत सध्या कोण व्यक्ति ह्या पदावर आहेत, हे इथे अप्रस्तुत (इर्रेलेवंट) आहे. प्रत्येकवेळी, केंद्र सरकारांतील ते ते पदधारी, फंडाचे विश्वस्त असतील.
1 Oct 2021 - 1:35 pm | मराठी_माणूस
उत्तर देण्याचे बंधन नाही. मी किती दिडशहाणा हे दाखवण्या व्यतरीक्त काही नाही. एक साधा प्रश्न कीती झोंबला त्यावरुन सगळे लक्षात येते.
रागावर नियंत्रण ठेवता येत नसेल तर उत्तरे देउ नका.
1 Oct 2021 - 4:17 pm | प्रदीप
हा असला अडाणी प्रश्न मला झोंबल्याचे कारण काय? त्यांतून प्रश्नकर्त्याचा अडाणीपणाच (अजून तिखट शब्द वापरणार होतो, ते आवरत आहे) दिसला, बाकी काही नाही.
बाकी मला तर, कुठल्याही प्रश्नांना उत्तरे द्यायचे बंधन नाही, हे मात्र खरे आहे.
तुमचे चालूंदेत.
3 Oct 2021 - 2:57 pm | मराठी_माणूस
मनोरंजक थयथयाट.
स्वतःची *** वापरायची नाही, कुठुन कून्थुन लिंका गोळा करायच्या आणि इथे चिकटावायच्या.
उत्तरे देत चला , थयथयाटा मूळे खुप मनोरंजन होते.
3 Oct 2021 - 8:52 pm | प्रदीप
ज्या फंडाविषयी तुम्ही प्रश्न विचारत आहात, त्याच फंडांचे दुवे मी दिलेले आहेत. त्यावर माझी स्वतःची टिपण्णीही केली आहे. नुसते 'इथे पहा', तिथे पहा' असे केलेले नाही.
आता, त्या दुव्यांपासूनच सुरूवात करायची नाही, तर कुठून? मी मुख्य प्रवाहातील मीडियामधे काम करत नाही, काहीतरी स्वतःची अक्कल वापरून, नसलेले काहीही शोधून काढायला. का, तसलेच काही चटपटीत पाहून व ऐकून, साधे सरळ काही समजण्याची कुवत गेलेली आहे?
माझ्या उत्तरांत कसलाही थयथयाट वगैरे दिसून येत नाही. तुमच्या दुसर्या प्रश्नांत मात्र तद्दन मूर्खपणा दिसून येत आहे. पंप्र वगैरे दूर राहिले, हाऊसिंग सोसायटीच्या कमिटीने केलेल्या नियमावलीत, 'कमिटीचे सचिव आपल्या अखत्यारीत अमुकतमुक निर्णय घेतील' असा उल्लेख असल्यावर, 'पण, पण, पण मग पाटील त्या पदावरून पुढल्या वर्षी गेले की मग ते निर्णय कोण घेणार' असे तुम्ही बहुधा विचारत असणार.
वास्तविक 'बाकी मला तर, कुठल्याही प्रश्नांना उत्तरे द्यायचे बंधन नाही, हे मात्र खरे आहे.' हे मी लिहील्यावरतीही तुम्ही आता वैयक्तिक शेरेबाजी केली आहेत, तेव्हा हे उत्तर देत आहे.
5 Oct 2021 - 4:35 pm | मराठी_माणूस
वैयक्तिक व्हायला कोणी सुरुवात केली ते बघा. जसे उत्तेर तसे प्रत्त्युतर मिळणारच. कोणाही सोम्या गोम्याचे ऐकुन घेतले जाणार नाही.
2 Oct 2021 - 11:56 am | चौथा कोनाडा
लोकांची दिशाभूल करणे हाच एक उद्देश !
1 Oct 2021 - 1:18 pm | Rajesh188
PMNRF हा अधिकृत,कायदेशीर फंड असताना pm care फंड कशाला हवा?
जो कायद्यात बसत नाही बेकायदेशीर आहे.
1 Oct 2021 - 1:25 pm | सुबोध खरे
कायद्यात बसत नाही हे आपल्याला कोण दीड शहाण्याने सांगितले?
1 Oct 2021 - 1:35 pm | Rajesh188
हा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट म्हणून स्थापन केला आहे.
पण त्याची स्थापन भारतीय राज्य घटने नुसार झाली नाही.
लोकसभेत किंवा कोणत्याही राज्यात परित झालेल्या कायद्याचे त्याला समर्थन नाही
म्हणजे सरळ आहे बेकायदेशीर आहे.
1 Oct 2021 - 1:41 pm | सुबोध खरे
म्हणजे सरळ आहे बेकायदेशीर आहे.
सर्वोच्च न्यायालयाने Pm care fundला कायदेशीर ठरवलेले आहे
आपलॆ बुद्धिमत्ता दैदिप्यमान आहे.
श्री राहुल गांधींचे आपण गुरु होऊ शकाल
1 Oct 2021 - 2:30 pm | Rajesh188
लिंक देता का म्हणजे इथे सर्वांना नाच समजेल कोणत्या कायद्याने कोणत्या कलमा अंतर्गत pm care फंड हा भारत सरकार चा अधिकृत फंड आहे .
पंतप्रधान चे नाव वापरले आहे,भारत सरकार चे अधिकृत बोध चिन्ह वापरले आहे म्हणजे भारत सरकार चा ते अधिकृत फंड च असावा .
1 Oct 2021 - 6:16 pm | प्रसाद गोडबोले
राजेश , तुमचे सगळेच प्रतिसाद मजेशीर आहेत . लॉजिकल लाईन ऑफ अर्ग्युमेंट मध्ये कोणतेही असर्टेव्ह विधान केल्यावर ते सिध्द करणार्याची जबाबदारी विधान करणार्यावर असते , विधान खोडून काढणार्यावर नाही. तुम्ही म्हणाला आहात की "Pm care fund बेकायदेशीर आहे" तर त्याबद्दल तुम्ही पुरावे दिले पाहिजेत . ती तुमची जबाबदारी आहे. ते सोडून तुम्ही दुसर्यालाच पुरावे मागताय =))))
आमच्या कॉलेजात पी.एच.डीचा कोणेही विद्यार्थी त्याचा प्रबंध प्रकाशित करायचा तेव्हा समोर किमान ५ टेन्युअर्ड प्रोफेसर बसलेले असायचे त्याची विधाने खोडून काढायला. तुम्ही तिथे गेलात तर तुम्ही प्रोफेसरांनाच पुरावे अन लिन्क्स मागुन येडं कराल =))))
पण एकुणच हे सारं फार मजेशीर आहे हे . लॉजिक, एकॉनॉमिक्स, स्टॅटिस्टिक्स मधील तुमचे अगाध ज्ञान सर्वच प्रतिसादातुन ओसंडून वहात आहे !
=))))
3 Oct 2021 - 1:22 am | Rajesh188
डाटा,लॉजिक, चा प्रतिवाद योग्य नियमानुसार करण्यात अर्थ नाही.
कारण सरकार चे कोणतेच निर्णय जे आता पर्यंत ह्या सरकार नी घेतले आहेत.ते
डाटा,लॉजिक, ह्या नुसार तपासले तर पूर्णतः चुकीचे आहेत.
सरकार चा एक पण निर्णय देशाच्या हिताचा ह्या सरकार नी घेतलेला नाही .
देशात इतके कायदे आहेत की एकादी कृती एक कायदा गुन्हा ठरवत असेल तर दुसरा कायदा तीच कृती गुन्हा ठरवत नाही.
लॉजिक,डाटा ह्याच्या गोष्टी करूच नका.
स्वैर प्रतिवाद च आताच्या परिस्थिती मध्ये योग्य आहेत.
उगाच मोठ्या साजूक अपेक्षा ठेवू नका.
3 Oct 2021 - 10:26 am | प्रसाद गोडबोले
तर्कशुध्द विधान करण्याचा दर्जा जपणे , पुराव्याच्या कसोटीवर ताऊन सुलाखुन निघणारीच विधाने करणे हे कोणत्याही संतुलित बुध्दिमत्तेच्या माणासाचे लक्षण आहे.
देशात इतके कायदे आहेत की एकादी कृती एक कायदा गुन्हा ठरवत असेल तर दुसरा कायदा तीच कृती गुन्हा ठरवत नाही. हे असले जर तुमचे अंडर्स्टँडिंग असेल असेल , तर धन्य आहे ! =))))
तुमचा वरील प्रतिसाद हा तुमच्या विचारसरणीचे खणाखणीत स्वरुप दाखवत आहेच पण एकुणच सर्वच काँग्रेस समर्थकांच्या बौध्दिक वादविवाद करण्याच्या क्षमतेचे झालेले अधःपत्तन देखील दर्शवतो.
असला बाष्कळपणा करण्यात मला काहीही रस नाही. हे विधान म्हण्जे तुमच्या बालिषपणाचा परिपाक आहे ! आणि तुम्ही कान डोळे हे मोडीद्वेषाची हिंदुद्वेषाची झापडे लाऊन बंद केल्याने तुमच्या डोक्यात डेटा , लॉजिक , कंसिस्टंट अॅर्ग्युमेन्ट वगैरे घुसण्याची शक्यता नाही.
@गुरुजी म्हणाले तेच योग्य आहे ! -
" गाढवापुढे वाचली गीता , कालचा गोंधळ बरा होता "
2 Oct 2021 - 10:56 am | hrkorde
कोविड गेल्यावर पी एम केअर फंडाचे काय होणार ?
2 Oct 2021 - 11:08 am | आग्या१९९०
नवीन समस्या येणार नाही असे थोडेच आहे. ... हैं तो मुमकिन हैं.
2 Oct 2021 - 11:48 am | hrkorde
पीएम नेशनल रिलिफ फंड ला कोड स्कॅन करून जिपेने ७७७ रु दिले. आता ह्याची पावती कशी येते ते बघूया
2 Oct 2021 - 11:58 am | hrkorde
पीएम नेशनल रिलिफ फंड ला कोड स्कॅन करून जिपेने ७७७ रु दिले. आता ह्याची पावती कशी येते ते बघूया.
( नेहरु फंड)
गांधी जयंती व शास्त्री जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.
अजुन भाजपाच्या कुणाच्या अशा विश्वव्यापी जयंत्या साजर्या होत नाहीत. १९२५ पासून अजून कुणी नररत्न जन्माला येईना ??
6 Oct 2021 - 10:23 am | सुबोध खरे
पावती आली का?
6 Oct 2021 - 7:50 pm | सुबोध खरे
अजून नाही आली?