उकडहंडी

hrkorde's picture
hrkorde in पाककृती
27 Sep 2021 - 8:09 am

लागणारे जिन्नस:
एक कांदा, १ मोठा बटाटा, १ कच्चे केळ, लाल भोपळा १०० ग्रॅम, फरसबी ५० ग्रॅम, कांद्याची पात ४-५ कांदे, १ लहान रताळे, १ वांगे

१-२ चमचे मीठ, १-२ चमचे लाल तिखट, १/२ चमचा हळद, १/२ चमचा काळा मसाला, १/२ चमचे जिरे, २ लवंगा, दालचिनी, कढीपत्ता १०-१२ पाने. साखर अर्धा चमचा.

२ चमचे तेल

क्रमवार पाककृती:
१. सर्व भाज्या चिरून लांबलांब फोडी कराव्यात.

२. नॉन्स्टिक पॅनमध्ये सगळ्या फोडी, तेल,मीठ, तिखट, मसाला, हळद, जिरे, कढीपत्ता, दालचिनी, लवंगा आणि साखर घालून व्यवस्थीत हलवून घ्यावे.

३. नंतर मंद आचेवर भांडे ठेऊन झाकण लावून शिजवावे. पाणी अजिबात घालू नये.

४. पाच सात मिनिटानी एकदा भाजी खालीवर करावी. मसाला तळाला लागतो आहे, असे वाटले तर २-४ चमचे पाणी घालावे. पुन्हा झाकण लावून शिजवावे.

हा पदार्थ खरे तर मडक्यात करतात. मडक्यात भाज्या घालून घट्ट झाकण लावून आगीत शिजवतात. सोयामीटचे तुकडे स्वच्छ धुऊन पाण्यात १०-१५ मिनिटे भिजवावेत. त्यातले पाणी पिळून ते तुकडेदेखील भाजीत घातले तर छान लागतात. झटपट होणारा प्रकार आहे. काळा मसालाऐवजी रस्सम मसाला घातला तरी चव छान येते . कुठल्याही भाज्या चालतात. शक्यतो चार पाच तरी असाव्यात. पालाभाजी, भेंडी , कच्चा टोमॅटो वापरले तरी चव छान येते.

माहितीचा स्रोत:
'मिसळपाव' वरील गणपाभाऊंची उकडहंडी ....

पोपटी नावाचा असाच एक मडक्यात करायचा भाजीचा प्रकार आहे (म्हणे.) त्यात नॉन्व्हेज प्रकारही करतात.

======================================

यावेळी ह्याच उकडहंडीत अळुवडीचे रोलही टाकले होते. अळूच्या पानाना लावायला बेसन आणि चिंचेचा कोळ घालून मिश्रण तयार केले, ते लावून रोल केले. तेही मस्त शिजले. नंतर फक्त तुकडे केले.

1

2

3

प्रतिक्रिया

कंजूस's picture

27 Sep 2021 - 9:13 am | कंजूस

फक्त वाल नाहीत. ते असेही चांगले लागत नाहीत. म्हणजे तुरीच्या शेंगा लागतात तसे नाही. शिवाय अलिबागवाले कांदा लसुण ओलं खोबरं भरतात तेही वाईट लागते. गुजराती पद्धतीत कोनफळ ,/गराडु ,केळी, ओले बटाटे /लसुण ,वांगी,फल्ली पाकतात ते बरे लागते। मसाले वाढवतात शहरी उकडहांडी ऊर्फ ऊंधियो'मध्ये.

पण बरा पदार्थ आहे.( Immunity booster list मध्ये अजून एक.)

सुरिया's picture

27 Sep 2021 - 10:34 am | सुरिया

छान

रमेश आठवले's picture

27 Sep 2021 - 10:32 pm | रमेश आठवले

गुजराती लोकप्रिय उंधियु हा पदार्थ असाच करतात. शेतात मडक्यामध्ये करतात.

पोपटी नावाचा असाच एक मडक्यात करायचा भाजीचा प्रकार आहे (म्हणे.) त्यात नॉन्व्हेज प्रकारही करतात.

पोपटी मडक्यात केलेली भाजी नसते, आणि त्यातही जर कुणी "व्हेज पोपटी उर्फ मडक्यातील शाकाहारी भाजी" करत असेल, तर देव त्याचं भलं करो.

कंजूस's picture

28 Sep 2021 - 2:10 pm | कंजूस

खाल्ली आहे आणि अगदी सुरुवातीपासून सर्व केले जात असता पाहिले आहे. भांभुर्डीचा (हेच नाव ?)पाला उपटून आणून मडक्याचे तोंड बंद करून भाजणे वगैरे. पण ती वांगी, ते वाल काही आवडले नाहीत.
त्यापेक्षा विरार भागात केला जाणारा घेवडा/पापडी वांगी शेवगा शेंगा घालून केलेला चुलीवरचा रस्सा उत्तम लागतो.

सतिश गावडे's picture

28 Sep 2021 - 2:33 pm | सतिश गावडे

भांभुर्डीचा पाला असतो.
आमच्या भागात कधी वांगी नाही टाकत. तसेच व्हेज पोपटीही सहसा नाही लावत कुणी.

प्रामुख्याने मसाला लावलेले चिकनचे तुकडे, अंडी, बटाटे, वालाच्या शेंगा अशा गोष्टी असतात.

इरसाल कार्टं's picture

2 Oct 2021 - 11:57 am | इरसाल कार्टं

होय भांबुर्डीच. आणि ती चिकन आणि अंडी घालून केली जाते.

चौथा कोनाडा's picture

2 Oct 2021 - 12:00 pm | चौथा कोनाडा

झकास !

दीपक११७७'s picture

12 Oct 2021 - 5:28 pm | दीपक११७७

उत्तम!