श्रीगणेश लेखमाला २०२१ - पोपटांच्या दुनियेत

सर्वसाक्षी's picture
सर्वसाक्षी in लेखमाला
16 Sep 2021 - 2:29 pm

.galema {width:100%; background-color:#F0F8FF; box-shadow:0 2px 5px 0 rgba(0,0,0,0.16),0 2px 10px 0 rgba(0,0,0,0.12); text-align: center; font-size:24px; padding: 16px; margin-bottom:32px;}
.field-items {padding: 16px;border: 1px solid #eee;background-color:#FFF;text-align:justify}

श्रीगणेश लेखमाला २०२१

"पोपटांच्या दुनियेत"

पक्षी सर्वांनाच आवडतात. अर्थात मला ते मोकळे व स्वच्छंद जीवन जगताना पाहायला आवडतात. आकाशाला गवसणी घालणार्‍या पक्ष्यांना पिंजरारुपी तुरुंगात डांबून ठेवणे मला आवडत नाही.

आमच्या परिसरात सर्वत्र सर्रास आढळणार्‍या कावळे, चिमण्या, कबुतरे, साळुंक्या या पक्ष्यांव्यतिरिक्त अन्य २०-२२ प्रकारचे पक्षी जा ये करुन असतात, राहतात. मात्र बहुतेक सर्व पक्षी खूप सावध व बुजरे असातात, ते आपल्या घरात वा गजबजत्या परिसरात येत नाहीत. खंड्या, हळद्या, तांबट, वेडा राघू , मुनिया वगैरे अनेक पक्षी असपासच्या झाडांवर असतात पण ते सहसा खुल्यावर न येता दाट झाडीत, झाडाच्या पर्णराजीत येतात, अनेकदा उंच तारांवरही येतात.

या मानाने पोपट बरेच धीट. ते सावधपणे वावरतात पण बिनदिक्कत घरात वा घराच्या बाल्कनीत येतात, बाहेर लटकणार्‍या केबलवर बसतात. एकदा सरावले की रोज येऊ लागतात. आमच्या परिसरात आणि सहवासात येणारे आनंददायी पोपट हा नुसता लिहिण्याचा विषय नाही. या पोपटांचा वावर, करामती, गमतीजमती शब्दात सांगण्यापेक्षा मी दृकश्राव्य माध्यमातुन सादर करण्याचा प्रयत्न आहे.

पोपटांच्या नाना छबी आणि छोट्या चित्रफिती माझ्या निवेदनासह येथे देत आहे, माझी खात्री आहे, हे पोपट तुमचे मनोरंजन करतील.

-सर्वसाक्षी

प्रतिक्रिया

कुमार१'s picture

16 Sep 2021 - 3:42 pm | कुमार१

छान वेगळा विषय.

टर्मीनेटर's picture

16 Sep 2021 - 4:06 pm | टर्मीनेटर

छान विषय आणि व्हिडीओही सुंदर 👍

या मानाने पोपट बरेच धीट.

अगदी खरे! एका पोपट पाळणाऱ्या परिचितांकडे घरी येणाऱ्या (फक्त सुंदर दिसणाऱ्या) स्त्रिया/मुलींच्या खांद्यावर बिनधास्त जाऊन बसणारा कलंदर (कि बिलंदर?) पोपटही पाहिला आहे 😀

प्रचेतस's picture

16 Sep 2021 - 4:34 pm | प्रचेतस

कहर आहे हे =))

गॉडजिला's picture

16 Sep 2021 - 5:29 pm | गॉडजिला

असेच होणार.

रंगीला रतन's picture

16 Sep 2021 - 7:46 pm | रंगीला रतन

:P
व्हिडियो आवडला हे.वे.सां.न.

तुषार काळभोर's picture

16 Sep 2021 - 5:33 pm | तुषार काळभोर

ह्म्म्म

Bhakti's picture

16 Sep 2021 - 4:44 pm | Bhakti

मस्तच!
लपंडाव भारी रंगला होता 😊

सतिश गावडे's picture

16 Sep 2021 - 5:48 pm | सतिश गावडे

भारीच.
YouTube वर The Dodo नावाचे चॅनल आहे, त्यावर अशाच प्राण्यांच्या/पक्षांच्या माणसाळण्याच्या चित्रगोष्टी असतात. हे तुमचं कथन अगदी तसंच वाटलं.

राजेंद्र मेहेंदळे's picture

16 Sep 2021 - 7:28 pm | राजेंद्र मेहेंदळे

वा सर!! आपण फार भाग्यवान आहात की शहरात ईतक्या पक्ष्यांच्या सहवासात राहाताय. व्हिडिओ एकदम मस्त झालाय.

एक दोन सूचना- पोपटांना बदामाची कच्ची फळे (झाडावरुन खाली पडतात ती) आवडतात, नुसतेच चावतात किवा खातात ते माहित नाही. बाकी पेरु,मिरच्या,डाळी वगैरे तर खातातच. दुसरे म्हणजे त्यांना शक्यतो नैसर्गिक पदार्थच द्या, बिस्किटे वगैरे नको. साखर, मैदा,तेल वगैरे प्राण्यांना फार वाईट.

पु व्हि शु

फळे आणि मिरच्या आम्ही खायला घातल्याहेत पोपटांना. हिरवीकंच ताजी तिखट मिरची हे त्यांचं आवडतं खाद्य आहे. :-)

कंजूस's picture

16 Sep 2021 - 8:39 pm | कंजूस

समोरच्या इमारतीच्या बाल्कनीत एकाने बर्ड फीडर टागून त्यात सूर्यफूलबी टाकायला सुरुवात केली. हे बी पोपटच खातात. कावळे,चिमण्या ,साळुंक्या खात नाहीत ही जमेची बाजू. आठ दहा पोपट सकाळ संध्याकाळ येतात आणि खाणे दिसले नाही तर त्या ब्लॉकच्या टॉइलेट,कीचन,बाजूची खोलीच्या खिडकी ग्रीलवर लोंबकळून भयानक आरडाओरडा करतात. किरररर किईईईई कर्कश .

ज्ञानोबाचे पैजार's picture

17 Sep 2021 - 8:22 am | ज्ञानोबाचे पैजार

व्हिडिओ बनवण्याचे आणि निवेदनाचे कसब वाखाणण्या सारखे आहे. तुमच्या कडून असे अजून काही आले तर बघायला आवडेल.

पोपट उपद्रवी सुध्दा असतात. आमच्या सोसायटीत पहाडी पोपट येतात, ते एसी च्या पाईपचे ईन्शुलेशन कुरतडून टाकतात. घरटे उबदार करण्यासाठी आणि घरट्यातली गादी मउसर करण्या करता त्याचा उपयोग होत असावा.

खाणे जागेवर नसेल तर भयंकर दंगा करतात. खाली डोके वर पाय शेपटी करुन तारेला लटकून बसणे हा यांचा आवडता खेळ असावा.

कबुतरे पण यांना घाबरतात. सरळ अंगावर धावुन जातात कबुतरांच्या, बाकी कावळे आणि चिमण्या कबुतरांच्या नादाला लागताना दिसत नाहित.

पैजारबुवा,

कंजूस's picture

17 Sep 2021 - 11:55 am | कंजूस

मजा आली.

अनिंद्य's picture

17 Sep 2021 - 1:21 pm | अनिंद्य

सुंदर पोपट'पंछी' :-)

अप्रतीम! साक्षीकाकांचा धागा म्हणजे फोटोंची पर्वणी असणार या आशेनेच आलो होतो. एक वेगळाच अनुभव! खूप खूप आभार! :-)

तुषार काळभोर's picture

17 Sep 2021 - 1:59 pm | तुषार काळभोर

पोपट हा मोजक्या रंगीत पक्ष्यांपैकी एक. शिवाय टपोरे डोळे, बाकदार चोच (तीही लालचुटूक!) त्यामुळे तो जात्याच देखणा पक्षी आहे. अशा पक्ष्याचा इतका सहवास तुम्हाला मिळतोय, हे फारच भारी. 'सर्वसाक्षी' या नावाकडून ज्या तांत्रिक सफाईच्या जास्त अपेक्षा असतात, त्यादेखील नक्किच पूर्ण होतात. त्यामुळे एकूणच व्हिडिओ एकदम मस्त बनलाय!

पोपटांनी काही विशेष करामती सुरू केल्यावर साक्षीकाका लगेच जवळच्या हाआशी असलेल्या मोबाईल क्याम्राने शूटिंग करतात. पण ते पोर्ट्रेटमध्ये होतं .ते सुद्धा आडव्या मोबाईलने केल्यास सर्व जोडाजोड टिवीवर छान दिसेल. सुरुवातीची ओळखसुद्धा पुन्हा लँडस्केप मोड करून जोडता येईल.

सर्वसाक्षी's picture

17 Sep 2021 - 3:40 pm | सर्वसाक्षी

आपण म्हणता तसं उभं आडवं दोन्ही प्रकारे चित्रण आहे
एकसमान चौकट अधिक चांगली दिसली असती.
जर ठरवून एखाद्या विषयावर पट बनवायचा तर ते सहज शक्य आहे आणि आवश्यक आहे. माझे पोपट चित्रण चालूच असते. काही . शक्यतो कॅमेरा पण पटकन नजिकदृश्य वा क्षण टिपण्यासाठी मोबाईल बरा पडतो. मोबाईल आडवा धरून चित्रण केलं तर बघताना चौकट लहान दिसते, साहजिकच आपण उभी चौकट धरतो

आपले तसेच सर्व मिपाकरांचे मनःपूर्वक आभार

सौन्दर्य's picture

17 Sep 2021 - 11:13 pm | सौन्दर्य

अतिशय सुंदर चित्रण आणि विवेचन. मला देखील पक्ष्या-प्राण्यांची आवड आहे. ह्युस्टनला आमच्या परसदारी मी पक्षांसाठी खास मिळणारे दाणे व पाणी ठेवतो. तेथे कावळे, चिमण्या, कार्डिनल, ब्लु जे, व कबुतरे येतात. ज्या प्रमाणे पोपटाचे पिल्लू धीटपणे व विश्वासाने तुमच्या हातावर बसू लागले त्यावरून माझे निरीक्षण आठवले. आमच्या परसदारी कार्डिनल व ब्लू जे ह्यांची छोटी छोटी पिल्ले प्रथम यायला लागली तेव्हा ती बुजरी होती, जरा चाहूल लागली की उडून जायची. मात्र त्यांची पुढची पिढी बरीच धीट होती व क्रमाक्रमाने पुढच्या पिढ्या जास्तच धीट होत गेल्या. एकदा का त्यांचा विश्वास बसला की ते आपल्याशी फारच जवळीकेने वागतात असा माझा अनुभव आहे.

गोरगावलेकर's picture

18 Sep 2021 - 11:32 am | गोरगावलेकर

निवेदनही आवडले.

सर्वसाक्षी, व्हिडीओ अप्रतिम झाला आहे!

- (पोपटी) सोकाजी

गुल्लू दादा's picture

18 Sep 2021 - 9:59 pm | गुल्लू दादा

सुंदर आहे व्हिडिओ. सफर आम्हाला सुद्धा घडवून आणल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.

गणेशा's picture

19 Sep 2021 - 12:25 am | गणेशा

निव्वळ अप्रतिम...

सुंदर व्हिडीओ आणि कथन

मज्जा आली