श्रीगणेश लेखमाला २०२१ - चिरंजीवी (४)

ज्योति अळवणी's picture
ज्योति अळवणी in लेखमाला
15 Sep 2021 - 11:03 am

.galema {width:100%; background-color:#F0F8FF; box-shadow:0 2px 5px 0 rgba(0,0,0,0.16),0 2px 10px 0 rgba(0,0,0,0.12); text-align: center; font-size:24px; padding: 16px; margin-bottom:32px;}
.field-items {padding: 16px;border: 1px solid #eee;background-color:#FFF;text-align:justify}

श्रीगणेश लेखमाला २०२१

.......आणि बसलेल्या ठिकाणावरून शांतपणे उठून सिध्दार्थ टेकाड उतरून खाली जायला निघाला.

"साब, वो मेरा दोस्त बोला गाडी खराब है करके मै आया. मेरेकू लगाच आप इधरकू आएंगे करके." सिध्दार्थला समोरून येताना बघून समोर उभा असलेला तरुण बडबड करायला लागला. खरं तर त्याक्षणी तरी सिध्दार्थला कोणाशीही काहीही बोलायचं नव्हतं. त्याचं तसं लक्ष देखील नव्हतं त्या पोराच्या बोलण्याकडे. पण एकदम थांबून त्याने त्या पोराकडे बघितलं आणि म्हणाला; "अरे तुमको कैसे मालूम था मै इधर ही रहुंगा?"

"अरे साब, आप को देखकर समझ मे आता है के आप को भी वो भागवन मिले अभि अभि. आप ही सोचो साब, आपका गाडी एकदम फस्टक्लास चल राहा था. अभि भी गाडी खराब नही हुवा लेकिन बंद तो पड गया. तभी मेरा फ्रेंड इधर से ही गुजरा. फिर भी आप नही गया उसके साथ. साब..... आप ऊन महात्मन को मिलने का वरदान लेके आए है. लेकिन मै नही पुछुंगा क्या बात हुवा." तो पोरगा सिध्दार्थ सोबत गाडीच्या दिशेने चालत बडबडत होता. त्याचं लक्ष सिध्दार्थच्या बदलत्या चेहेऱ्याकडे नव्हतं. आपल्याच तंद्रीत तो बोलत होता.

"क्यों नही पुछोगे?" सिध्दार्थने आवाजावर ताबा मिळवत त्याला विचारलं. सिध्दार्थला राहून राहून आश्चर्य वाटत होतं की या मुलाला बरं माहीत मी या टेकाडावर असेन आणि इथे मला कोणीतरी भेटेल. भगवन म्हणतो आहे तो कृपाचार्यांना. काय आहे नक्की प्रकरण?

"अरे साब, किसींको याद नही रहाता ना के वो भगवन क्या बोलते करके. बस्! अपने मे खुश होता है आदमी उनके दर्शन करके. साब, उनका मन हो ना तो वो ही किसीं किसीं को रोक लेते है बात करने को. इधर के गांव मे सब को मालूम है. तभी तो मेरेकू मेरा दोस्त बोला.... भगवन वाली टीला पे जा... साब वही रहेंगे." तो अजूनही आपल्याच तंद्रीत बडबडत होता.

"कौन है वो? कूच तो मालूम होगा ना तुमको?" सिध्दार्थने परत एकदा त्याला विचारलं.

"साब.... कोई मिलता है यहा... भगवन है... बस्! इसके अलावा कोई कूच भी नही बोल सकता. अरे, साब, आप इतना पुछ रहे हो इसका मतलब आप भी मिले... तो आप बताओ ना कौन थे वे?" तो मुलगा थांबून सिध्दार्थकडे बघत म्हणाला.

"पता नही... लेकिन उनको मिलने के बाद ऐसा लग रहा है के उन महात्मन को फिर मिलु." सिध्दार्थ म्हणाला.

"अरे साब, एक बार मिले... जिंदगी सफल. इस याद के साथ जिना बहुत बडी बात है. वैसे आप इधर के लोगोंके अलावा किसीको ये बात बताएंगे तो कोई विश्वास नही करेंगा. तो बस् किसीं एसी पुण्य आत्मा से मिले इतना सोच के खुश हो जाना साब." बोलत बोलत दोघे गाडीजवळ पोहोचले होते. गाडीची परिस्थिती बघूनच तो पोरगा सिध्दार्थच्या दिशेने आला होता. गाडीजवळ त्याने दोन अजून हट्टी-कट्टी माणसं आणून ठेवली होती. सर्वांनी मिळून गाडी त्या दगडापासून लांब केली. समोरून पत्रा थोडा वाकडा झाला होता. एकूण नुकसान बघून तो पोरगा सिध्दार्थकडे आला आणि म्हणाला; "साब, बोलो तो गाडी ठीक करके दु? वैसे आप कंपनीमे भेजेंगे तो बहुत खर्चा होगा. मै कम पैसे मे करके दुंगा दो-चार घंटे मे." सिध्दार्थने घड्याळाकडे बघितलं आणि म्हणाला; "मतलब... ज्यादा से ज्यादा चार बजेतक तैयार होगी गाडी?" काम मिळतंय बघून खुश होत तो पोरगा म्हणाला; "अरे साब, उसके पेहेले ही देता हु."

सिध्दार्थ हसला आणि खिशातून दोन पाचशेच्या नोटा काढून त्याच्या हातात दिल्या आणि म्हणाला; "वो दो आदमी को देना. तेरा हिसाब बाद मे करता हु. चल, गाडी मै चलाउंगा."

त्या आड रस्त्यावरून गाडी घेऊन सिध्दार्थ त्या मुलाबरोबरो निघाला. सिध्दार्थला वाटलं होतं की मुख्य रस्त्याकडे घेऊन जाईल हा. पण उलट त्या मुलाने सिध्दार्थला अजून आतल्या बाजूला गावाकडे वळवलं.

"अरे, किधर जा रहे है हम?" एका विचित्र वळणा नंतर अजूनही पुढे काही दिसत नाहीय हे लक्षात आल्यावर सिध्दार्थ काहीसा साशंक झाला.

"साब, बस् पांच मिनिट. आगे मेरा गांव है. वही वो वेल्डिंग वाला है. उससे वेल्डिंग करवा के बाद मे कलर करके देता हु साब. डरना नही. लुटूंगा नही." त्याच्या बोलण्याने सिध्दार्थ हसला. थोडं पुढे गेल्यावर अगदी अचानक समोर काही घरं दिसायला लागली. तो मुलगा म्हणाला त्याप्रमाणे सिध्दार्थने गाडी वळवली आणि एके ठिकाणी आणून थांबवली. दोघे गाडीतून उतरले. सिध्दार्थ गाडीजवळच थांबला आणि तो मुलगा पुढे जाऊन एका माणसाला घेऊन आला. गाडीचं निरीक्षण करून त्या माणसाने मान डोलावली आणि तो परत गेला. तो मुलगा सिध्दार्थकडे आला आणि म्हणाला; "साब, आपका कोई किमती सामान होगा तो निकाल लेना गाडी से. चाबी उसको देना पडेगा. मेरे गांव का है; मुझे पुरा विश्वास है; लेकिन बाहरवलो सें हम खुद को बचाते है."

सिध्दार्थ हसला आणि त्याने एकदा गाडीत नजर टाकली. मागच्या सीटवरची ती खास पेटी त्याच्या नजरेस पडली आणि ती उचलून सिध्दार्थने गाडीची किल्ली त्या मुलाच्या हातात दिली.

"यार, थोडी भूक लगी है. कूच मिलेगा क्या खानेको?" सिध्दार्थने त्याला विचारलं.

"अरे साब, सबकूच मिलेगा. क्या चाहीये बोलो. आपको आपके फेव्हरेट मचान से कूच चाहीये तो वो भी मिलेगा. इधर पिछे के साईडसे निकलेंगे तो चलके जा सकते है वहा. तभी तो हमारे गांव के सब लडके उधर और आजूबाजूके हॉटेल मे काम कर सकते है." तो मुलगा हसत म्हणाला.

ते ऐकून सिध्दार्थला एकदम मजा वाटली. इथे काहीतरी मागवण्यापेक्षा आपणच जावं मचाण पर्यंत असं त्याच्या मनात आलं आणि तो म्हणाला; "मुझे रास्ता बता; मै मचान पे चलके जाता हुं. गाडी ठीक हो जाएगी तो तू उधर ही आना."

मुलाने बरं म्हणून मान हलवली आणि सिध्दार्थला त्याच्या मागून चलायची खुण करून तो चालायला लागला. सिध्दार्थ त्याच्या मागे जायला लागला. पाच-पन्नास घरांचं गाव असावं ते... त्याला बाहेरूनच वळसा घालून दोघे थोडे पुढे गेले आणि तो मुलगा थांबून म्हणाला; "देखो साब, ये झरना दिख रहा है ना... इसका साईड मत छोडना.. सिद्धा चलके जाएंगे तो आधे घंटेमे पोहोचेंगे आप मचान पे. वो माचान के बाजू मे जो झरना जाता है ना... जिधर उनका रेस्टोरेन्ट है... ये ही वो है."

सिध्दार्थने हसून 'बाय' असा हात हलवला आणि तो चालायला लागला. हातात फक्त एक पेटी होती. भुकेची जाणीव होती; पण त्रास होत नव्हता. झाडी देखील भरपूर होती त्यामुळे उन्हाचा त्रास देखील नव्हता. हे अचानक मिळालेलं एकटेपण सिध्दार्थला हवंस वाटलं. थोडं पुढे जाऊन त्याने मागे वळून बघितलं तर तो मुलगा मागे नव्हता. सिध्दार्थ काही क्षण तिथेच उभा राहिला आणि मग त्या ओढ्याच्या जवळ जायला लागला. थोडं खाली उतरून सिध्दार्थ ओढ्या जवळ आला आणि खळखळत्या निर्मळ पाण्याजवळ जाऊन त्याने तोंडावर पाण्याचे हबके मारले. खूप बरं वाटलं त्याला. ओंजळी भरभरून तो पाणी प्यायला आणि थोडं मागे होऊन जवळच्याच एका झाडाला टेकून बसला. तिथे त्या शांततेत त्याला खूप बरं वाटत होतं. कालपासून अचानक त्याच्या आयुष्यात जे काही घडायला लागलं होतं त्याबद्दल एकटेपणाने विचार करायला त्याला वेळच मिळाला नव्हता. त्यामुळे इथेच थोडावेळ बसून मन स्थिर झाल्यावर पुढे जावं; असं त्याने ठरवलं.

सिध्दार्थने डोळे मिटले आणि त्याच्या डोळ्यासमोर त्याच्या खोलीतील प्रसंग जसाच्या तसा उभा राहीला.

".......कोणीही कितीही दूषणे दिली तरी विवेकबुद्धिपासून ढळू नये.

........न्याय सम्मत संसार निर्मितीची उर्मी श्रीरामांच्या लक्षात आली आणि त्यांनी माझा हाच विचार पुढील पिढ्यांमध्ये मी रुजवावा यासाठी मला चिरंजीवित्व दिले.

.........आजच्या मानवाने स्वतःच्या ह्रासाच्या दिशेने पाऊल उचलले आहे; ते मागे फिरवणे शक्य नाही.

.........आज मी माझ्या उद्दिष्टापासून अनेक दशके दूर गेलो आहे... माझ्या आयुष्याच्या असण्याचे कारणंच संपले आहे. त्यामुळे मला हे माझे चिरंजीवित्व परत करायचे आहे."

'महात्मन बिभीषणांनी माझ्याजवळ आपलं मन मोकळं केलं होतं. मी नक्की काय करू शकणार होतो? आजवर मी हेच बघत आलो आहे की माझ्या आजूबाजूचे लोक या जुन्या कथांकडे केवळ अतिरंजित कहाणी म्हणून बघतात... आणि मग त्या कथांमधील जी चांगली कॅरेटर्स आहेत त्यांना देवत्व देऊन त्याच्याकडूनच काहीतरी मागत असतात. पण हे थोडं वेगळं नाही का.... की श्रीरामाच्या कालखंडातील एक व्यक्ती माझ्यासारख्या एका मर्त्य मानवाकडे काहीतरी मागते आहे. जो अनुभव भगवन बिभीषणांचा तोच अनुभव हस्तिनापुराचे राजगुरू श्री कृपाचार्यांचा. आज काय बरं म्हणाले ते.....'

''........त्या सर्वसाक्षी सर्वदाता परमेश्वराने... निसर्गाने.... जे दिलं ते आम्ही जपलं; जमेल तसं वृद्धिंगत केलं; त्याचं फलित काही अतींद्रिय शक्ती जागृत होण्यात झालं. वत्सा; आत्मविश्वास आणि स्वप्रजल्पनं.... स्वतःशी साधलेला संवाद.... ही दोन सुखी मानवीय आयुष्याची सत्य आहेत. मात्र आजचा मानव या दोन सत्यांपासून दूर जातो आहे; हे दुर्दैव आहे.

.........पंचमहाभूतांनी दिलेली शिकवण नाकारून आजच्या मानवाने स्वनिर्मितीची घमेंड करण्यास सुरवात केली आहे. त्यामुळे आता ज्ञान हे दान आहे आणि दाता आणि युयुत्सु दोघेही आपापल्या जागी योग्य असणे आवश्यक आहे; हे सार्वभौम सत्य लयाला जाते आहे."

'या दोन महान व्यक्तींनी माझ्याकडे काही मागावं इतका मोठा मी नक्कीच नाही; हे मला कळतं आहे. तरीही हे जगावेगळे अनुभव देखी फक्त मलाच येत आहेत; यात शंका नाही. पण मग ते का?'

सिध्दार्थच्या मनात विचारांची आवर्तनं सुरू होती. समोर वाहणारं झुळझुळतं पाणी आणि निरव शांतता यामुळे त्याची तंद्री लागली होती. हातातील पेटीवरून तो नकळत हात फिरवत विचार करत होता.... आणि अचानक त्याला जाणवलं की पेटी लाकडाची असूनही तप्त झाली आहे. त्याची तंद्री पूर्ण भंगली आणि त्याने घाईघाईने समोरच्या दगडावर पेटी ठेवली.

'नक्की श्लोक वेगळा आहे!' त्याच्या मनात आलं; आणि त्याने शांतपणे पेटीकडे बघितलं.

पेटीका तदीय बलि अस्तु नृपति महीस्वर्गात् !
वामनस्य पदे भवतु नरेश्वर: पाताल राज्य!

समोर दिसणारा श्लोक सिध्दार्थ परत परत वाचत होता. त्याच्या मेंदूमध्ये श्लोकाचा अर्थ प्रतीत होत होता; परंतु तरीही नवीन अनुभवासाठी त्याचं मन अजून तयार झालं नव्हतं.

'ही पेटी बलीची आहे जो पृथ्वी स्वर्गाचा नृपति होता; वामनाच्या पदस्पर्शाने तो पातालाचा राजा झाला.'

'म्हणजे आता मी तिसऱ्या चिरंजीविला भेटणार आहे! म्हणजे नक्की काय होणार आहे? कधी भेटणार आहे मी?' सिध्दार्थ खूप गोंधळून गेला होता. त्याने अस्वस्थपणे मान जोरात हलवली आणि उठून उभा राहिला. 'इथून निघालेलं बरं!' त्याच्या मनात आलं. सिध्दार्थ मागे वळला आणि दचकला. कारण त्याच्या मागे थोड्या अंतरावर एक अत्यंत जराजर्जर व्यक्ती बसली होती. सिध्दार्थने त्या व्यक्तीचं निरीक्षण केलं. त्याच्या मनात एक चुकार विचार डोकावला... 'बळी राजा तो हाच नव्हे ना?'

पण मग त्याच्याच मनाने त्याला फटकारलं. आजवर जे दोन चिरंजीव भेटले ते माध्यम वयातील जरी असले तरी तब्बेत अत्यंत उत्तम आहे हे त्यांच्याकडे बघून लक्षात येत होतं. बळी राजा तर वीर, पराक्रमी आणि असुर असूनही सत्शील होता. केवळ दिलेला शब्द पाळायचा म्हणून त्याने पृथ्वी आणि स्वर्गाचं राज्य सोडलं आणि कायमचा पातालधिपती झाला. त्याने मनात आणलं असतं तर पुन्हा एकदा पृथ्वी आणि स्वर्ग जिंकणं त्याला अवघड नव्हतं. पण आपण दिलेला शब्द खोटा पडू नये म्हणून तो कायम पाताळात राहिला. असा श्रेष्ठ कर्तृत्वाने महान असा राजा कुठे आणि समोरची वृद्ध व्यक्ती कुठे.'

सिध्दार्थने शांतपणे समोरची पेटी उचलली आणि तो त्या व्यक्तीच्या समोरून पुढे जाण्यास वळला.

"कोण? सिध्दार्थ? म्हणजे माझा अंदाज बरोबर होता तर. या अधू दृष्टीमुळे समोर नक्की कोण आहे ते कळत नाही. नीट ऐकू येत नाही; किंवा बोलणं देखील जड जातं. तू इथे आहेस हे माझ्या अतींद्रिय मनाने मला सांगितलं आणि त्या अनुषंगाने मी इथे आलो. पण बहुतेक तू शांत बसला होतास. त्यामुळे तुझं अस्तित्व जाणवत असूनही; तू नक्की कुठे आहेस हे कळत नव्हतं. बहुतेक तू इथून निघण्याच्या विचाराने उठलास आणि मला तुझ्या अस्तित्वाचा अंश जाणवला." ती व्यक्ती बोलत होती आणि सिध्दार्थ अवाक होऊन ऐकत होता.

"तुम्ही?" सिध्दार्थला प्रश्न करतानाच त्या प्रश्नातला फोलपणा लक्षात आला होता.

"होय! मीच पातालधिपती बळी. सिध्दार्थ... मला असं या परिस्थितीत बघून तुला आश्चर्य वाटणे अत्यंत स्वाभाविक आहे पुत्रा. माझी ही अवस्था का तेच तर सांगण्यासाठी इथवरचा प्रवास केला आहे मी. सिध्दार्थ, मी चिरंजीवी आहे; हे जितकं खरं आहे तितकंच खरं; किंबहुना महत्वाचं चिरंजीवित्व म्हणजे काय हे समजणं आहे.

कालाच्या अंतापर्यंत जगणं म्हणजे चिरंजीवित्व! शरीराचा अंशा अंशाने ह्रास होत असताना तो स्वीकारून एकट्याने जीवन कंठणं म्हणजे चिरंजीवित्व. आपल्या जवळचे सगळेच कालौघात यमसदनी जात असताना त्यांना निरोप देणं म्हणजे चिरंजीवित्व..... आणि मग आप्तस्वकीयांच्या नंतर देखील प्रत्येक पुढची पिढी आपापली जीवन मर्यादा स्वीकारत पुढच्या प्रवासाला जाताना बघणं म्हणजे चिरंजीवित्व." अत्यंत खोल आवाजात राजा बळी बोलत होता आणि नकळतपणे त्याच्या समोर जाऊन बसलेला सिध्दार्थ व्याकुळ नजरेने त्या जराजर्जर शरीराकडे बघत होता.

"महाराज पण आपण चिरंजीवी आहात... मग आपली अशी परिस्थिती कशी होऊ शकते?" अत्यंत कळकळीने सिध्दार्थने प्रश्न केला.

समोर बसलेला बळी राजा हसला.... "केविलवणं होतं का ते हास्य? की अत्यंत दुःख दडलं होतं त्या हास्यात? सिध्दार्थच्या मनात आलं.

"बाळ सिध्दार्थ, तू जो प्रश्न केला आहेस त्याचंच तर उत्तर मी दिलं अगोदर. पण तरीही परत एकदा तुला नीट सांगतो. असुर असूनही दानशूर म्हणून जगद्विख्यात होण्याच्या लालसेने मी पृथ्वी आणि स्वर्गावर अधिराज्य स्थापित केल्यानंतर मोठा यज्ञ केला. यज्ञानांतर मी दान देण्यासाठी उभा राहिलो आणि विष्णू रुपाला ओळखूनही आणि गुरू शुक्राचार्यांनी सांगून देखील मी तीन पाऊले जमिनी देतो; हे दान अर्ध्य देऊन सोडलं. मात्र तिसरे पाऊल स्वशिरावर धरण करतानाच मी ठरवलं होतं की भगवन विष्णू यांच्याकडून चिरंजीवित्व मिळवायचंच. त्याप्रमाणे मी स्वतः पाताळ राज्य स्वीकारून परत पृथ्वी किंवा स्वर्गाकडे बघणार नाही हा शब्द देतानाच वामनरुप धारी त्या सर्वेश्वराकडे मागणी केली की पाताळ राज्याच्या सीमेचे रक्षण स्वतः श्रीविष्णुच करतील. त्या मागणी मागे एकच विचार होता की विश्वरूप श्रीविष्णुच जर द्वारपाल असतील तर यमराज देखील आत येऊ शकणार नाहीत. याचा थेट अर्थ होतो की मला मृत्यू स्पर्श करू शकणार नाही. मी खुश होतो मागणी करताना... आणि श्रीविष्णु स्मितहास्य करत कीव करत होते माझ्या मर्त्य बुद्धिकुवतीची! मला माहीत आहे मुला तुला अजूनही लक्षात आलेलं नाही...

सिध्दार्थ, मुला, अरे मी यमराजाला माझ्यापर्यंत पोहोचण्यास मज्जाव केला; श्रीविष्णूंना माझ्या सीमेचे द्वारपाल करून. मात्र मर्त्य मानवाला हळूहळू का होईना शरीर ह्रास सहन करत वृद्धत्वाकडे वाटचाल करावीच लागते... हे त्याक्षणी विसरून गेलो होतो. पण विधिलिखित कोणाला टळतं का? बघ एकदा माझ्याकडे पुत्रा; मला कालांता पर्यंत मृत्यू तर नाही; परंतु शरीर ऱ्हास आहे.... माझे प्रियजन हळूहळू करत मला सोडून गेले आहेत; कालौघात माझ्या आजूबाजूची परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. यामुळे मी एकटा पडलो आहे; परंतु जगतो आहे.

अविवेकी अपेक्षा आणि राखून दिलेल्या चौकटीबाहेर चुकीच्या पद्धतीने पडल्यास काय होऊ शकते ते माझ्या इतकं चांगलं कोणीच सांगू शकणार नाही. पण दुर्दैवाने मला उमजलेलं हे सत्य मी पुढील मर्त्य मानवापर्यंत पोहोचवू शकत नाही; ते केवळ माझ्या या जराजर्जर शरीरामुळे. म्हणूनच तुला विनंती करण्यास आलो आहे की पुढील प्रवासात जेव्हा कधी तू त्या आदिशक्तीला भेटशील तर माझी व्यथा नक्की सांगावीस."

राजा बळी बोलण्याचे थांबले... त्यांचा श्वास फुलला होता आणि धाप लागली होती; ते पाहून सिध्दार्थ झट्कन पुढे झाला आणि त्यांना आधार द्यायला लागला. पण त्या परिस्थितीत देखील त्यांना हसू आलं आणि ते म्हणाले; "सिद्धार्थ, मला काहीही होणार नाही आहे. हा शरीरधर्म सहन करत जीवन कंठणार आहे मी. तू निघ! अजून खूप काही अनुभवायचं आहे तुला."

सिध्दार्थला त्यांच्या बोलण्याचा मतितार्थ कळला आणि हातातील पेटी सावरत एकदाही मागे वळून न पाहाता तो पुढे निघाला.

क्रमशः

श्रीगणेश लेखमाला २०२१

प्रतिक्रिया

अनन्त अवधुत's picture

15 Sep 2021 - 12:51 pm | अनन्त अवधुत

तुम्हि रोज न चुकता एक एक भाग प्रकाशित करताय, त्याबद्दल धन्यवाद.

रंगीला रतन's picture

15 Sep 2021 - 1:13 pm | रंगीला रतन

वाचतोय.
पुभाप्र.

दखल घेण्याजोगा माझा प्रतिसाद वाटत असेल तर हा भाग दखलही घेण्याजोगाही झाला नाही याची दखल घ्यावी.

एकुण्॑च कथानक वेगवान नाही… नेमकं काय व मुख्य म्हणजे कशासाठी नायकाचा प्रवास चालु आहे याबाबत वाचकांच्या मनात कोणतीही दिशा निर्माण करत नाही चार आण्याची कोंबडी अन बारा आण्याचा मसाला असा प्रकार झाला आहे जे काही सात चिरंजीवांना सांगायचे आहे ते एकदाच सर्वानी मिळुन एकत्र भेटुन शक्यतो एकोळीत सांगुन सिध्दार्थला मोकळे करावे.

कथानकाच्या पहिल्या भागात आपण सप्तचिरंजीवींचा उल्लेख न करता कथा थोडी खुलवुन लिहली असती तर उत्सुकता ताणली गेली ही असती आणी भेटलेले सर्व चिरंजीव होते हे शेवटी समजायला हवे असे काहीतरी गुंतवुन ठेवणारे प्रकरण हवे होते पण दुर्दैवाने पुढचा भेटणारा कोण याचे कुतुहल तयार होत नाही की त्याचे जे म्हणने आहे ते ही खोल विचारात पाडत नाही परीणामी आपल्या या कथेचा अपेक्षित परीणाम अजुन तरी होत नाही.

धन्यवाद.

(माझ्या आइ वडीलांचा चिरंजीव)
- गॉडजिला

ज्योति अळवणी's picture

15 Sep 2021 - 3:18 pm | ज्योति अळवणी

धन्यवाद

गॉडजिला's picture

15 Sep 2021 - 10:58 pm | गॉडजिला

काय माहित पुढील भाग या कथेबाबत माझी मागील सर्व मते बदलवून टाकेल ?

मी optimistic राहणे आणि वागणे पसंत करतो त्यामूळे पुभाप्र.

तुषार काळभोर's picture

15 Sep 2021 - 9:30 pm | तुषार काळभोर

आणि रोज एक भाग येतोय ते उत्तम! प्रत्येक चिरंजीवीची व्यथा आणि थियरी वेगळी आहे. एकूण सात जणांच्या बोलण्याचा आणि शिकवण्याचा सारांश काय असावा त्याची उत्सुकता आहे.
(दुसर्‍या भागात सिद्धार्थच्या आईच्या गुढ स्मितामागे काय अर्थ होता, याचीपण उत्सुकता आहेच!)

नावातकायआहे's picture

15 Sep 2021 - 9:40 pm | नावातकायआहे

पुभाप्र!

कपिलमुनी's picture

15 Sep 2021 - 11:15 pm | कपिलमुनी

लेखमाला उत्तम चालली आहे.
पुभाप्र

प्रचेतस's picture

16 Sep 2021 - 6:56 am | प्रचेतस

हाही भाग आवडला.

हम्म.
वाचत आहे, पुभाप्र.