बजेट ब्लुटूथ हेडफोन्स खरेदी २०२१
खरडफळ्यावर याबद्दल चर्चा झाली .
तिथले प्रतिसाद इकडे कॅापी करता येत नाहीत कारण ते मिपाधोरणाविरुद्ध आहे. त्यामुळे मुख्य मुद्दे लिहीत आहे.
या अगोदरचे मिसळपाव साइटवरचे मदनबाण यांचे हेडफोन्सचे धागे -
अनबॉक्सिंग ऑडियो टेक्निका ATH-M20X
https://www.misalpav.com/node/39198
अनबॉक्सिंग सेनहायजर सी एक्स ३.० -
https://www.misalpav.com/node/35455
------------------
अमेझोनवर फ्रीडम सेल आहे त्यातुन काल Zeb Thunder हेडफोन घेतला ७०० रुपयांना.
कनेक्टिविटी आणि इतर फीचर्स
१) यामध्ये ब्लुटूथ कनेक्टिविटी आहेच शिवाय वायरही जोडता येते ती दिलेली आहे. Battery down झाल्यास वायर्ड हेडफोन्स म्हणून वापरता येईल.
एका खोलीत फोन ठेवून घरात दुसऱ्या खोलीत हेडफोन्सने ऐकण्यात अडचण आली नाही. ब्लुटूथ रेंज चांगली आहे.
फोनला 'Zeb Thunder' या नावाने लगेच हुकप/ लॅाक होतो.
२) battery ६-९ तास अर्ध्या वॅाल्युम सेटिंगवर पुरेल लिहिलं आहे. हे तपासायचं आहे. चार्जिंग टाइम दीड तास आहे. एक amp 5 वोल्टस - 5 watts charger ने चार्ज करून पाहिलं.
३) आवाज 110 dB
पुरेसा मोठा आहे.
४) एफएम रेडियो सुविधा आतच आहे. टेस्ट केलं पण कोणतंही स्टेशन पकडलं नाही.
मोबाइल फोनमधले ओनलाईन रेडियो ऐकून पाहिले आवाज उत्तम आहे. एखादी प्लेलिस्ट ऐकत असल्यास हेडफोन्सवरच्या बटणाने गाणी बदलता येतात.
५) मेमरी कार्ड स्लॅाट आहे. कार्डावरची गाणी ऐकता येतील.
६) रचना
वजन १५० ग्राम. हलका. नाजुक.
लंबगोल padding च्या आत ४ सेंमिचे स्पीकरस/ ड्राइवरस आहेत. पट्टा कपाळाकडे किंवा मागे सरकत / सरकवता येत नाही. padding रेक्झीन गरम होते. त्यास सुती कापड लावायला हवे. तीन बटण्स आवाज कमी अधिक करायला किंवा गाणी बदलण्यासाठी, ब्लुटूथ/एफेम बदलण्यासाठी आहेत. एक ओनओफसाठी.
माइक्रोफोन चांगला चालतोय कॅाल्ससाठी किंवा गूगल असिस्टंट वॅाइस सुचनांसाठी. चांगला आहे.
७) साउंड क्वालटी. चांगली. स्पष्ट. Bass चांगला. बुस्टर नाही. बेस हाइ लो करायचे बटण नाही. ते फोनमधूनच करावं लागेल.
-------
" याचा bass कसा आहे?"
- यातले ड्राइवर्स ४० एमएमचे आहेत म्हणजे संगीत ऐकण्यासाठी ओके."
---------
"तीन प्रकारचे हेडफोन्स असतात.
१)इनइअर - कानात खुपसायचे. बाहेरील आवाज घुसत नाही. झोपून / कुशीवर
लोळून ऐकू शकतो. २)ओन इअर - कानावर बसतात. झोपून ऐकताना नेहमी छत बघावे लागते. बाहेरील गोंगाट ऐकू येतो. ३) ओवर द इअर - कानापेक्षा मोठे पण बाहेरचा गोंगाट कमी करतात. "
----
" पण हा zeb thunder कसा आवाज देईल? ट्रिबल , बेस ऐकता येईल का? आणि इंग्रजी चित्रपटातले संवाद ऐकायला उपयोग होईल का? Boat कंपनीचे हेडफोन्स कसे आहेत?"
------
" boat मध्ये दमदार bass आहे."
-----
"ओवर द इअर टाइपमध्ये दुकानात ब्लुटूथ वरायटीत २५००- ३००० किंमत आहे. त्यामुळे ७०० रु म्हटल्यावर घेतला."
--------
" ७०० रु ? चार्जिंग टिकायला हवे. वायर्ड बरे.
-----
"यात वायरची सोयही दिली आहे. "
--------
"आणखी काही हाइ एंड महागडे प्रकार आहेत त्यांचा realtime रिव्यु युट्युबवर geekyranjeet channel वर पाहा. यात active / dynamic noise cancellation असते. "
-----------
तर हा धागा बजेट हेडफोन्स माहिती करता समजु शकता.
प्रतिक्रिया
7 Aug 2021 - 3:33 pm | शाम भागवत
कंकाका,
धागा काढलात हे फार उत्तम केले.
7 Aug 2021 - 5:14 pm | चौथा कोनाडा
माहितीपुर्ण धागा. जे नविन लोक ब्लुटूथ हेडफोन्स घेऊ इच्छितात त्यांच्यासाठी उत्तम पर्याय !
६ महिन्यांपुर्वी मी baAt घेतलेत. मस्त आहेत !
7 Aug 2021 - 6:55 pm | कंजूस
आणि किंमत?
(६ महिन्यांपुर्वी मी baAt घेतलेत. )
8 Aug 2021 - 5:52 pm | चौथा कोनाडा
रु १२००
7 Aug 2021 - 9:56 pm | गॉडजिला
बोट म्हणजे बास... अन फक्त हेवी दर्जेदार बास... ज्याना संगीत ऐकायचे आहे त्यांना स्वस्तात मस्त मेजवानी म्हणजे बोट.
बोल्ट चे हेडफोन्स बोट ला थोडा चांगला पर्याय.
पीसी वर वापरायचे असतील तर कटाक्षाने ओवर द इअर ऑप्शन सर्वोत्तम.
फोन साठी इन इअर ऑप्शन उत्तम यात नोईज आयसोलेशन नसलेले हेडफोन्स देखिल मिळू शकतात. गच्च कानात बसण्याने कान खराब होत नाहित पण अतितीव्र वोल्युम्म राखल्याने कान बाद होऊ शकतात. 60% of maximum volume हा सर्वांत सुरक्षीत मार्ग आहे दीर्घकाळ कोणत्याही हेडफोन्सवर गाणी ऐकायला. कानात गच्च बसणाऱ्या हेडफोन्समूळे होणारे damage चटकन मात्र लक्षात येऊ शकते*
60% of maximum volume.
हे अवश्य बघा.
https://www.regainhearing.co.uk/blog/can-headphones-cause-hearing-loss/
नोईज आयसोलेशन म्हणजे नॉईज cancellation न्हवे. Noise cancellation चे हेडफोन्स बरेचं महागडे असतात.
संवाद ऐकण्यासाठी हेवी बास, थंडर बास वगैरे नसणारे बंद करायची सुविधा असलेले हेडफोन्स उत्तम १मोर पिस्टन व सोनी हे यामधे माझे आवडते ब्रँड आहेत इतरही अनेक चांगले हेडफोन्स आहेत पण सर्वच मी हाताळलेले नाहित शक्यतो ड्युल ड्राइवर वाले फोन संवाद अन संगीत दोन्हीसाठी चांगले साऊंड क्रिस्पिनेस संवाद ऐकायला आवश्यक त्यामूळे क्रिस्पिनेस हायलाईट करणारे हेडफोन घेणे हितावह. रेडमीचे हेडफोन्स रेडमी मोबाईल वर स्वस्तात उत्तम बास आणि क्रिस्पिनेस दोन्हीं देतात त्यामूळे रेडमीचा फोन असेल तर त्यांचे कोणतेही हेडफोन डोळे झाकून खरेदी केल्यास कुठलाही पश्चात्ताप होत नाही.
*वरील सर्व मते वैयक्तिक असून मी कुठल्याही ब्रॅण्ड सोबत संलग्न नाही
8 Aug 2021 - 7:37 pm | शाम भागवत
फक्त संवाद ऐकण्यासाठीचे कानावर बसणारे ₹५००० पर्यंतचे चांगले हेडफोन्स कोणते?
गाणी किंवा सिनेमे यासाठी नको आहेत.
बजेट अजून २-४ हजारांनी वाढवता येऊ शकेल.
युट्युबवरील मराठी व इंग्रजी व्हिडीओ ऐकणे हा मुख्य हेतू.
8 Aug 2021 - 8:08 pm | गॉडजिला
Sony WHRF400 Wireless Headphones
सुंदर आवाज अनुभव, २० तासाची बॅटरी पण चार्ज व्हायला ७ तास लागतात.
Bose QuietComfort
बोस कंपनी ऍपल ने विकत घेतली सोनी पेक्षा उत्तम* एकच दोष महागडे.
Sennheiser HD 201 Lightweight
प्राईस रेंजमधे सर्वोतकृष्ट, वायरलेस नाहित.
Philips SBCHL140/10 Ultra Lightweight
स्वस्त, थोडे नाजूक पण आवाजाचा क्रिस्पिनेस उत्तम, वायरलेस नाहीत. डोक्याला लावले आहेत याची जाणीवही होत नाही इतके हलके.
₹५००० मधे बरेचं पर्याय आहेत, वायरलेस हवेत की वायर्ड ?
8 Aug 2021 - 10:26 pm | शाम भागवत
वायरलेस.
१६-१७ फूटावरच्या टीव्हीला जोडायचे आहेत.
9 Aug 2021 - 6:51 am | कंजूस
टीवीतून blue tooth streaming आहे/असते का?
---------------
मी टीवीच्या एका स्पीकरची वायर कापून तिथे 3.5 mm audio jack लावला आहे. तिथून एक वायर लांबून फिरवून बसण्याच्या जागी आणखी एक jack ठेवला आहे. तिथे वायर्ड हेडफोन्स/ स्पीकर लावता येतो.( हेडफोन्स किंवा दहा वॉट्स स्पीकरसुद्धा ) या सिस्टमला वेगळी पॉवर वगैरे देण्याची गरज नसते. टिवीच्या ठिकाणी डिस्कनेक्टही करता येते. दुसऱ्या स्पीकरला फक्त स्विच टाकला आहे, तो चालू बंद ठेवता येतो. दुरून बातम्या वगैरे ऐकण्यासाठी सोय आहे . दहा वर्षे वापरत आहे. स्टिरिओ मिळणार नाही कारण एकच जोडला आहे.
हल्लीच्या LCD टीवीला मागच्या बाजूस एक 'home theatre audio outlet socket' असते ते या D I Y / जुगाड साठी कामाचे नाही. 'external speaker socket' असले तर वरची जुगाड/DIY सोपी होते.
( हा जुगाड आपल्यालाच करावा लागतो. रिपेरिंगवाले करून देत नाहीत. त्यांच्या मते impedance match होत नाही. पण जुन्या सीआरटी टीवीला कले आणि पाच वर्षांपूर्वी LCDलाही वापरत आहे. नेहमीप्रमाणे दायिकत्वास नकार लागू का काय म्हणयात ते.)
होम थिएटर सॉकेटमधून फक्त 1mV signal मिळतो तो त्या
स्पीकर सिस्टमला जोडल्यावर पॉवर वापरून चांगले स्टेरिओ आवाज मिळतील. ही सेफ आणि अधिकृत रेकमेंडेड पद्धत आहे.
9 Aug 2021 - 9:07 am | शाम भागवत
टीवीतून blue tooth streaming आहे/असते का?
हो आहे. (सोनी ब्राविया एक्स ८० एच.) बाकीच्या टीव्हींबद्दल माहीत नाही.
मुलाने बोट ४५० मागवला. तो आलाही लागलीच. जोडूनही पाहिला. १८ फूटांवरून चांगला चालतोय.
पण तरीही
नुसते ऐकण्यासाठी काही वेगळे मिळतंय का ते तपासतोय. असेल तर घ्यायचाय.
8 Aug 2021 - 11:35 pm | अमेरिकन त्रिशंकू
Bose QuietComfort
बोस कंपनी ऍपल ने विकत घेतली
ऑ.. हे कधी झालं म्हणे??
9 Aug 2021 - 1:10 am | गॉडजिला
पण यात तथ्य आहे असे (आता) वाटत नाही...
9 Aug 2021 - 9:11 am | शाम भागवत
तथ्य असो नसो.
किमती २० हजाराच्या पुढे आहेत त्यामुळे माझ्या दृष्टिने बाद.
टीव्हीवरचे कार्यक्रम ऐकण्यासाठी एवढे पैसे द्यावेसे वाटत नाहीत.
9 Aug 2021 - 2:46 pm | गॉडजिला
पुराणकाळी नोकिया महाराजांची चलती असता त्यांचे एक म्युझिक एडिशन मॉडेल आले होते त्यासोबत बोस हेडफोन फ्री होते. जी किंमत मॉडेल ची होती तीच किंमत हेडफोनची होती :) म्हणजेच हेडफोन खरोखर चकटफू देत होते.
16 Aug 2021 - 10:23 pm | विंजिनेर
त्यांना बीट्स म्हणायचं असेल...
9 Aug 2021 - 5:02 am | अनिरुद्ध.वैद्य
झकास आहे. ओव्हर द इअर वायरलेस मॉडेल घ्या, सगळी कामे एकत्र.
बॅकअप 10 12 तासांचा आहे.
फक्त मोठे असल्याने फिरायला घालून गेलात तर ऑड दिसतात, बाकी घरात वापरायला मस्त.
मी आधी कॉलिंगकरता वापरायचो, पण आता त्यात 3 वर्षांनी प्रॉब्लेम यायला लागलेत.
2500 हजार पूर्ण वसूल झाले :-)
9 Aug 2021 - 9:03 am | शाम भागवत
2500 हजार ??
बापरे
हे नाही परवडणार.
9 Aug 2021 - 9:34 am | कंजूस
राउंड इअरपीस आहेत. आणि 550 मध्ये लंबगोल आहेत. ते हलत नाहीत . म्हणजे पट्टा पुढे मागे जात नाही. काहींना तेच हवे असेल बहुयतेक. माझ्या zeb thunder वर काल 107.1 एफेमवर इंग्लिश गाणी ऐकून पाहिली. आवाज छान येतो आहे.
9 Aug 2021 - 3:21 pm | गॉडजिला
संवादासाठी चांगले,
बॅटरी ३०+ hours ,
दहा मिनिटे क्विक चार्ज करुन दीड तास चालतो.
लाऊड थंडर बास नाही, सॉफ्ट क्रिस्टल क्लिअर व्हॉईस.
वायर नाही बॅटरी संपली तर चार्ज कारणे हा एकमेव पर्याय.
9 Aug 2021 - 3:36 pm | शाम भागवत
Ok
धन्यवाद.
9 Aug 2021 - 6:36 pm | मदनबाण
कंजूस मामा, नविन हेडफोन्स बद्धल अभिनंदन ! :)
माझे धागे संदर्भा संबंधी दिले आहेत त्या बद्धल धन्यवाद _/\_
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : - Mahanubhavudu Full Video Song HD | Mahanubhavudu Video Songs | Sharwanand | Mehreen | Mango Music
10 Aug 2021 - 9:41 am | कंजूस
प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
मिपावरील त्याच प्रकारचे अगोदरचे धागे असतील तर लेखकांनी द्यावेत असे माझे मत आहे.
10 Aug 2021 - 10:37 am | कपिलमुनी
>> पट्टा कपाळाकडे किंवा मागे सरकत / सरकवता येत नाही.
ही अॅडजस्टमेंट फार गरजेची आहे. नहीतर कानाला फिट बसत नाही.
10 Aug 2021 - 12:13 pm | कंजूस
लंबगोल इअरपीसेस एका ठिकाणीच फिट्ट बसतात. नंतर पट्टा पुढे मागे होत नाही.
8 Sep 2021 - 9:07 am | जेम्स वांड
बोट रॉकर्स ३३५ वापरतो आहे, अक्षरशः रगेड आहेत एकदम, सिंगलचार्जवर दिवसभर फोन, संध्याकाळी येताजाता तासभर गाणी, विडिओ पाहणे इत्यादी हेवी वापर आहे, सहज ३.५-४ दिवस टिकते बॅटरी. वॉटर प्रूफ ते आयपीव्ही रेटिंग का काय असतं ते पण असावं (आता नीटसं आठवत नाही). मला तरी वर्थ वाटला किमतीला (२४००₹)
8 Sep 2021 - 9:12 am | जेम्स वांड
लेटेष्ट किंमत १५९९ (कमाल) वाचावी, परत काही कार्ड ऑफर्स, कुपन कोड्स असले तर वेगळेच.
9 Sep 2021 - 12:35 pm | रावसाहेब चिंगभूतकर
हे पहा
https://www.quora.com/What-is-something-nobody-tells-you-but-you-wish-yo...
9 Sep 2021 - 1:00 pm | कंजूस
यातले झाकणच बरे.
----------
आमचे एक म्हातारे काका होते त्यांना ऐकू येणे पन्नाशीतच बंद झाले होते. त्यांना एकदा बुचूवाले हेडफोन देऊन रेडिओ लावला तेव्हा खूप आनंद झाला. पंचवीस वर्षांनी गाणी ऐकली!!
9 Sep 2021 - 1:53 pm | रावसाहेब चिंगभूतकर
ते वाचून इतका धसका घेतला मी की ऑफिस च्या कामाचे सोडून हेडफोन्स वापरायचेच सोडून दिलेत मी. ऑफिस साठी सुद्धा ओव्हर द इयर वापरतो.
10 Sep 2021 - 9:20 am | गॉडजिला
पेनिक नाही होयचे.... विदा हवा विदा.
8 Sep 2021 - 9:50 am | कपिलमुनी
मी म्युट बटण असलेले वायरलेस हेडफोन शोधत आहे.
म्हणजे मीटिंग अटेंड करत असताना इतर कामे करता येतील.
बऱ्याच मीटिंगमध्ये श्रोता हीच भूमिका असते. कधी कधी दाद द्यावी लागते तेव्हा अनम्युट करून बोलता याबे.
तेवढ्यासाठी पीसी वर बसायला किंवा मोबाईल कॅरी करायला नको
8 Sep 2021 - 1:28 pm | शलभ
माझ्याकडे plantronics C320 wired headset आहेत. खूप भारी क्वालिटी. दिवसभर वापरले तरी स्ट्रेस येत नाही. त्याला mute button आहे. पण वायर्ड आहेत. तुम्हाला चालतील तर बघा. जवळपास 3 वर्ष वापरतोय.
Bluetooth मधे OnePlus Bullet Wireless हेडसेट आहेत. क्वालिटी मस्त. बॅटरी बॅकअप 7-8 तास वापर नॉन स्टॉप. मोबाईल आणि लॅपटॉप मधे स्विच करायला डायरेक्ट बटन आहे. एका सेकंदात device स्विच होतो. तो पण दीड वर्ष वापरतोय.
8 Sep 2021 - 1:30 pm | शलभ
माझ्याकडे plantronics C320 wired headset आहेत. खूप भारी क्वालिटी. दिवसभर वापरले तरी स्ट्रेस येत नाही. त्याला mute button आहे. पण वायर्ड आहेत. तुम्हाला चालतील तर बघा. जवळपास 3 वर्ष वापरतोय.
Bluetooth मधे OnePlus Bullet Wireless हेडसेट आहेत. क्वालिटी मस्त. बॅटरी बॅकअप 7-8 तास वापर नॉन स्टॉप. मोबाईल आणि लॅपटॉप मधे स्विच करायला डायरेक्ट बटन आहे. एका सेकंदात device स्विच होतो. तो पण दीड वर्ष वापरतोय.
8 Sep 2021 - 3:10 pm | कंजूस
मोबाईल आणि लॅपटॉप मधे स्विच करायला डायरेक्ट बटन आहे. एका सेकंदात device स्विच होतो
हे समजले नाही.
१) मोबाइलमधला ओनलाइन रेडिओ ब्लुटुथ कनेक्ट करून ऐकणे
२)लॅपटॉपमध्ये वेबिनॅार मीटिंग ब्लुटुथने जोडून ऐकणे
क्र (१) आणि (२) स्विचने बदलता येणे?
8 Sep 2021 - 7:31 pm | शलभ
Quick Switch13 lets you switch between two paired devices, such as your phone and laptop. Simply press the function button twice to switch.
एक बटन आहे ते दोन वेळा दाबले की मोबाईल वरून लॅपटॉप ला कनेक्ट होतं. परत दोन वेळा दाबले की लॅपटॉप वरून मोबाईल. मस्त feature आहे हे.
8 Sep 2021 - 7:59 pm | कंजूस
दोन डिवाईसला कनेक्टेड राहिला हेडफोन्स आणि एका बटणाने बदलता आले ओडिओ।
धन्यवाद शलभ!!
8 Sep 2021 - 8:35 pm | शलभ
_/\_
8 Sep 2021 - 10:02 am | कंजूस
ती बटणे असतात एका पॉडवर.
8 Sep 2021 - 10:39 am | कपिलमुनी
स्पीकर चा आवाज कमी जास्त होतो ,
मला माईक चालू बंद करायचा आहे.
8 Sep 2021 - 1:14 pm | चौथा कोनाडा
हेडफोन्स या विषयावरून आठवलं : सध्याचा सोमि ट्रेण्ड Viral Memes
8 Sep 2021 - 9:09 pm | Rajesh188
EMR वर पण विचार करणे गरजेचे आहे.वायरलेस हेडफोन सर्व च लोकांना गरजेचे नाहीत.
त्याचे धोके पण लक्षात घेतले पाहिजे.
वायरलेस च हेडफोन हवा हा हट्ट का?
8 Sep 2021 - 10:22 pm | कंजूस
काही वर्षांपूर्वी नवरात्री दांडियाचे लाउडस्पीकर संगीत रात्री दहानंतर बंद ठरवण्यात आले तेव्हा काही मंडळांनी ब्लुटूथ हेडफोन्स वापरले होते.
9 Sep 2021 - 1:28 pm | चौथा कोनाडा
हे भारी आहे !
अंतराचा प्रश्न छान सोडवला !
9 Sep 2021 - 10:27 am | सुबोध खरे
The federal government does set safety standards for the amount of radiation that can be emitted from consumer devices, and Bluetooth devices are well below that level—even when placed directly against the skin. Plus, Foster points out, the AirPod antenna that actually receives and transmits radio waves doesn’t sit inside the ear canal; it’s in the section that remains outside and extends down, below the ear.
Bluetooth devices also give off less radiation than cell phones—only about one-tenth or less, Foster points out. “If you also use a cell phone on a daily basis, it’s bizarre to worry about the hazards of these earphone
9 Sep 2021 - 10:32 am | सुबोध खरे
जाता जाता --आपण जो प्रकाश पाहतो तो पण EMR म्हणजेच इलेकट्रो मॅग्नेटिक रेडिएशन आहे. त्यामुळे कुणाचे डोळे खराब झाल्याचे ऐकलेले नाही.
किंवा आपण जी शेकोटीची उब घेतो ते सुद्धा EMR म्हणजेच इलेकट्रो मॅग्नेटिक रेडिएशनच आहे. त्यामुळे कुणाचे डोके बिघडलेले पाहिलेले नाही.
एखादे विधान करण्याच्या अगोदर त्याच्या सत्य असत्यतेचि पडताळणं करणे आपल्याला गरजेचे वाटत नाही का?
8 Sep 2021 - 10:10 pm | वामन देशमुख
मिपावर गंभीर चर्चा सुरु असताना असे प्रतिसाद अधूनमधून कॉमिक रिलीफ नामक हलकाफुलका अनुभव देऊन जातात!
😉
8 Sep 2021 - 10:25 pm | Rajesh188
एक तर तुम्हाला गंभीर आणि गमतीदार विषय ह्या मधील काहीच कळत नाही.
.काय एक एक सभासद आहेत .
8 Sep 2021 - 11:28 pm | गॉडजिला
आणि प्रतिसादक समजतात आणि तूर्त तेव्हढे पुरेसे आहे की...
8 Sep 2021 - 10:30 pm | कंजूस
उद्यम नावाचे शेतकी मासीक, दक्षता नावाचे पोलिस केसेसचे मासिक, रविवार पेप्रातले व्यंगचित्र अशी असत.
परंतू मिपावर सर्वच कॅामिक असल्याने कुणी गंभीर मुद्दे मांडून नटबोल्टस टाइट करतो.
8 Sep 2021 - 10:58 pm | Rajesh188
फक्त ड्रायव्हिंग करताना समजदार लोक वापरत असतात ते पण क्वचित .
मोबाईल वर बोलताना पण मोबाईल चा speaker मोड वापरतात कानाला मोबाईल पण लावणे टाळतात.
Pvt बोलण्यासाठी pvt जागेचाच वापर करतात.
गाणी ऐकण्यासाठी वायर वाला head phone किंवा सरळ sound system use करतात.