चालू घडामोडी - ऑगस्ट २०२१

चंद्रसूर्यकुमार's picture
चंद्रसूर्यकुमार in काथ्याकूट
5 Aug 2021 - 2:51 pm
गाभा: 

उत्तर प्रदेशात फेब्रुवारी-मार्च २०२२ मध्ये होणार असलेल्या विधानसभा निवडणुकांसाठी काँग्रेस पक्षाने पक्षाच्या सरचिटणीस आणि पक्षाच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधींच्या कन्या आणि पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधींच्या भगिनी प्रियांका वाद्रा यांना मुख्यमंत्रीपदासाठीच्या उमेदवार म्हणून जाहीर केले आहे. एक तर राहुल किंवा प्रियांकांना मुख्यमंत्रीपदासाठी उमेदवार घोषित करा हा आग्रह प्रशांत किशोरने २०१७ च्या विधानसभा निवडणुकांच्या वेळेसही धरला होता. तो त्यावेळी पूर्ण केला गेला नव्हता पण यावेळी तसे होत आहे असे दिसते.

प्रियांकांनी २०१७ पर्यंत केवळ आपल्या आईच्या रायबरेली आणि भावाच्या अमेठी लोकसभा मतदारसंघाच्या भागातच प्रचार केला होता. २०१७ मध्येही या लोकसभा मतदारसंघांच्या भागात असलेल्या १० पैकी अवघ्या २ जागा काँग्रेसला जिंकता आल्या होत्या. २०१९ च्या लोकसभा निवडणुकांसाठी प्रियांकांवर राज्याच्या पूर्व भागातील मतदारसंघांमध्ये प्रचाराची जबाबदारी देण्यात आली होती.

मागच्या वर्षी लॉक डाऊनच्या दरम्यान काँग्रेस पक्षातर्फे इतर राज्यात अडकलेल्या मूळच्या उत्तर प्रदेशातील मजुरांना राज्यात परत आणायला म्हणून शेकडो बस आणल्या पण त्या मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांच्या सरकारने राज्याच्या सीमेवर अडवून ठेवल्या असा दावा काँग्रेस पक्षाकडून करण्यात आला. त्या तथाकथित बसपैकी अनेक अस्तित्वात नव्हत्या तर अनेक नंबर प्लेट दुचाकींचे होते हे नंतर स्पष्ट झाले. असल्या नौटंकीवर पक्षाच्या रायबरेलीच्या आमदार अदिती सिंग यांनी प्रियांकांवर टीका केली. त्यानंतर अदिती सिंगना पक्षाने काढून टाकले. आता कदाचित २०२४ मध्ये अदिती सिंग भाजपकडून रायबरेली लोकसभा मतदारसंघातून सोनिया गांधींविरोधात निवडणूक लढवतील.

२०१९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसला उत्तर प्रदेशात स्वतः सोनिया गांधींची रायबरेली वगळता एकही दुसरी जागा मिळाली नव्हती. निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर ४ दिवसांनी म्हणजे २७ मे २०१९ रोजी नेहरूंच्या पुण्यतिथीनिमित्त लखनौच्या प्रदेश पक्ष कार्यालयात कार्यक्रम झाला होता त्यात पक्षाचे ज्येष्ठ नेते रामकृष्ण द्विवेदी यांनी राहुल-प्रियांकांच्या कार्यपध्दतीवर आक्षेप घेतला. त्यानंतर रामकृष्ण द्विवेदींना तडकाफडकी पक्षातून काढून टाकले गेले. रामकृष्ण द्विवेदी हे हाडाचे काँग्रेसवाले होते. जानेवारी १९७१ मध्ये त्यांनी काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून तत्कालीन मुख्यमंत्री त्रिभुवन नारायण सिंग यांच्याविरोधात गोरखपूर जिल्ह्यातील मनीराम विधानसभा मतदारसंघातून पोटनिवडणुक लढवली होती आणि त्यात त्यांनी मुख्यमंत्र्यांपेक्षा दुप्पट मते मिळवून मुख्यमंत्र्यांचा पराभव केला आणि खळबळ उडवली. त्यांनी कधीही पदाचा लोभ ठेवला नाही आणि केवळ पक्षाचेच काम केले. जवळपास ८८ वय असलेल्या रामकृष्ण द्विवेदींना प्रियांका-राहुलच्या कार्यपध्दतीवर आक्षेप घेतला हे महान पातक केल्याबद्दल पक्षातून काढून टाकण्यात आले. त्यानंतर काही आठवड्यातच रामकृष्ण द्विवेदींना कॅन्सरचे निदान झाले. पूर्ण जन्म काँग्रेसमध्ये घालवलेल्या द्विवेदींना आयुष्याच्या शेवटी पक्षातून काढून टाकले गेलेले जिव्हारी लागले. शेवटी मरताना तरी मला काँग्रेसवाला म्हणूनच मरू द्या अशी विनंती त्यांनी केली. त्यानंतर त्यांना पक्षात घेण्यात आले पण त्यांना काढले ही चूक झाली याविषयी चकार शब्द न बोलता त्यांना दुर्धर आजार झालेला असल्याने दया दाखवायला पक्षात घेतले गेले आहे अशाप्रकारचे स्टेटमेन्ट पक्षाकडून काढले गेले होते असे वाचल्याचे आठवते. त्यानंतर काही दिवसातच- २०२० मधील लॉक डाऊन सुरू होण्यापूर्वी चार दिवस रामकृष्ण द्विवेदींचे निधन झाले.

तर अशा आहेत प्रियांका वाद्रा. त्यांच्या उमेदवारीमुळे उत्तर प्रदेशात काय होते हे बघायचे.

Priyanka

प्रतिक्रिया

नावातकायआहे's picture

13 Aug 2021 - 3:10 pm | नावातकायआहे

खालील चेपू पोस्ट. वाचा!!

Dear all , me and my mother was on protest . I belive this page haven't collected proper information, and as well as we have received our all rights from government. Thank you for the postv

बाकी चालू द्या. ...........

Rajesh188's picture

12 Aug 2021 - 11:16 pm | Rajesh188

Bjp नी चमच्याना दूर करून स्वतः देशाची bjp विषयी काय मत आहेत ह्यांची दाखल घ्यावी..
बुध्दी चातुर्य दाखवून bjp बद्द्ल लोकांची मत चांगली आहेत असे चमचे दाखवत आहेत
पण सामान्य जनता बिलकुल ह्या पक्षावर विश्वास ठेवत नाही.
Bjp काळात हिंदू आर्थिक बाबतीत बिलकुल सक्षम झाला नाही. हिंदू आर्थिक बाबतीत जवढे काँग्रेस काळात सक्षम होते ते आता bjp काळात कमजोर झाले.
Bjp हिंदू हित वादी आहे ह्याची कोणतीच ग्राउंड रिॲलिटी अस्तित्वात नाही..
इंदिराजी नी कधीच चमचे पाळले नाहीत.चांडाळ चोकटी ला त्यांनी कधीच जवळ येवून दिले नाही.
पण मोदी साहेब च्या बाजूला सर्व चमचे,चांडाळ chokati जमा झाली आहे.

प्रदीप's picture

13 Aug 2021 - 8:04 am | प्रदीप

ह्या प्रतिसादांतील काही मौतिके:

* हिंदू आर्थिक बाबतीत जवढे काँग्रेस काळात सक्षम होते ते आता bjp काळात कमजोर झाले.
*इंदिराजी नी कधीच चमचे पाळले नाहीत.चांडाळ चोकटी ला त्यांनी कधीच जवळ येवून दिले नाही.

ह्या प्रतिसादाचा अमूल्य ठेवा, सर्वांनी जपून ठेवावा असा आहे.

नावातकायआहे's picture

13 Aug 2021 - 2:52 pm | नावातकायआहे

*इंदिराजी नी कधीच चमचे पाळले नाहीत.चांडाळ चोकटी ला त्यांनी कधीच जवळ येवून दिले नाही.

ह्याला तोडच नाही! सुवर्ण अक्षरांनी लिहुन ठेवावा असाच दावा आहे. सलाम!!!

रावसाहेब चिंगभूतकर's picture

13 Aug 2021 - 8:24 am | रावसाहेब चिंगभूतकर

http://dhunt.in/kti6a?s=a&uu=0xcae9973ebb9f99bd&ss=wsp

कोरोना निर्बंधांचा पंचतारांकित हॉटेलांना फटका, पुण्यातील दोन पंचतारांकित हॉटेल चक्क विकायला.

हिंजवडी तील हॉटेल फक्त 200 कोटी रुपयाला आहे. मुनिश्वर, 188, प्राडॉ, भुजबळ साहेब, आणि कोणकोण, कुणाला हवंय का? नंतर बोंबाबोंब नको की अदानी अंबानी ने विकत घेतलं म्हणून. आता आहे संधी तर घेऊन मोदींच्या मित्रांना दूर ठेवा महाराष्ट्रापासून. नंतर म्हणू नका सांगितलं नाही म्हणून.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

13 Aug 2021 - 9:20 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आमच्याकडे काही सरकारी मालमत्ता पडून असत्या तर त्या तर त्या विकून घेतली असती ही हॉटेलं.
जनता का बिस्वास, जनता का प्यार, और जनता का लिये नियमित थापा-थुपा यही हमारा काम है. :)

-दिलीप बिरुटे

रावसाहेब चिंगभूतकर's picture

13 Aug 2021 - 12:03 pm | रावसाहेब चिंगभूतकर

आयडी वळखला

भारीच हुशार तुम्ही.

आमच्याकडे काही सरकारी मालमत्ता पडून असत्या तर त्या तर त्या विकून घेतली असती ही हॉटेलं.
जनता का बिस्वास, जनता का प्यार, और जनता का लिये नियमित थापा-थुपा यही हमारा काम है. :)

भगवान आपको ऐसी मालमत्ता आपको जलदी ही दे यही हमारी प्रार्थना हय. फिर जब आपको हॉटेल मिलेंगा तो हमको जबरी डिस्काउंट देना आपकी डूटी हय.

आग्या१९९०'s picture

13 Aug 2021 - 10:02 am | आग्या१९९०

नंतर बोंबाबोंब नको की अदानी अंबानी ने विकत घेतलं म्हणून.
व्होडा - आयडिया घेता का? बिर्लाची ऑफर सरकारला स्वीकारायला सांगा. फुकट मिळतेय.

तालिबान एक एक शहर काबीज करत आहे हे आश्चर्य च आहे.अफगाणिस्तान ची सैन्य,पोलिस, एअरफोर्स मिळून तीन लाखाच्या आसपास सशस्त्र सेना आहे.अमेरिका,ब्रिटन, नाटो कडून त्या सैन्याला उत्तम प्रशिक्षण आणि उत्तम हत्यार पुरवलेली आहेत तरी ते तालिबान विरूद्ध लढताना दिसत नाहीत.सहज पराभव स्वीकारत आहेत.आणि सैन्याला दिलेली आधुनिक हत्यार तालिबान च्या हातात सूवत आहेत.
अफगाणी सैन्य लढत च नाही.
तालिबानी सर्व ग्रुप मिळून दोन लाख पण तालिबानी नाहीत..
तालिबान ला कोणी तरी नक्की मदत करत आहेत.
अफगाणिस्तान नेहमी अशांत असावा ,तालिबान च्या ताब्यात असावा ह्या मध्ये मोठमोठ्या देशांचा अंतस्थ हेतू असावा .
अशीच शंका येतेय .
नाही तर दोन लाख असलेले आणि अत्याआधूनिक
हत्यार पण जवळ नसलेल्या तालिबानी अतिरेक्यांना कधीच जमीनदोस्त केले गेले असते.

टीकोजीराव's picture

13 Aug 2021 - 2:38 pm | टीकोजीराव

अमेरिकन सैनिक 20 वर्ष तिथे राहून आणि 1 ट्रेलियन डॉलर खर्च करून पण तालिबान ला हरवू शकले नाही, यातच सर्व काही आले.

रावसाहेब चिंगभूतकर's picture

13 Aug 2021 - 2:58 pm | रावसाहेब चिंगभूतकर

अमेरिकन सैन्य हे जगातले सर्वात ताकदवान सैन्य आहे. त्यांचे सैनिक सर्वात जास्त अनुभवी, स्कील्ड, सामानाचा भरपूर पुरवठा केले जाणारे आणि सर्वात जास्त disciplined आहेत. पण बहुधा राजकीय पाठिंबा नसावा. जेणेकरून सैन्याचे हात बांधले गेले असावेत. तुम्हाला परकीय देशात आक्रमणकारी नाही असं दाखवायचं असेल तर तुमच्यावर बरीच बंधने येतात. अफगाणिस्तान हा एक धर्मशाळा प्रदेश आहे जिथे टोळीवाले, वेगवेगळ्या जमाती, त्यांचे वेगवेगळे अंतःस्थ उद्देश आणि एकमेकांबद्दल मुळातच वैर आहे. अमेरिकेशिवाय ते एकत्र राहणे अवघड आहे. मुळात हा देश असाच होता. त्यांना कोणीही वल्लभभाई पटेल मिळाला नाही. अमेरिकेच्या अथक प्रयत्नानंतर ही अफगाण सैन्याला आपण आपल्या देशासाठी लढतोय असं वाटत असण्याची शक्यता कमी आहे, कारण आक्रमणकारी त्यांचेच भाईबंद आहेत आणि मानसिकदृष्ट्या सबळ आहेत. हे कधी तरी होणारच होतं. अमेरिकेच्या राजकीय नेतृत्वाने मात्र आपली पुरती नाचक्की जगात करून घेतली आहे.

Rajesh188's picture

13 Aug 2021 - 3:39 pm | Rajesh188

सहज तालिबानी अतिरेक्यांच्या मुसक्या आवळल्या असत्या हे स्वच्छ आहे. पण कुठे तरी पाणी मुरत आहे.
अत्याधुनिक हत्यार ,अत्याधुनिक टेहळणी यंत्रणा,पैश्याचा पुरवठा,हा बाबतीत अफगाणी खूपच मागास आहेत.
कोणावर तरी अवलंबून आहेत.
पण हे मदत करणारे नक्की कोण?
पाकिस्तान असा पण भिकारी देश आहे त्यांची इतकी कुवत नाही.
बलाढ्य देशांचा तालिबानी लोकांना मर्यादित support असण्याची शक्यता जास्त आहे.
तालिबानी नी मर्यादा ओलांडून रशिया,अमेरिका,ब्रिटन ,चीन ,अशा बलाढ्य देशांना जेव्हा नुकसान पोचवेल त्या नंतर एका तासात च अफगाणिस्तान जगाच्या नकाशावर नसेल.
राख करून टाकतील हे देश.
आशिया हा नेहमीच अस्वस्थ असावा अशी इच्छा खूप रथी महा रथी न ची सुप्त इच्छा आहे.
आणि हेच कारण आहे तालिबान अस्तित्वात अजुन असण्याचे.

रावसाहेब चिंगभूतकर's picture

13 Aug 2021 - 3:12 pm | रावसाहेब चिंगभूतकर