1

मिसळपाव साईटवर फोटो देणे - जुलै २०२१

Primary tabs

कंजूस's picture
कंजूस in तंत्रजगत
8 Jul 2021 - 7:13 pm

मोबाईल फोटो अपलोड - जुलै २०२१

मिपावरचा फोटो धागा मिपा छायाचित्रण कला स्पर्धा २०२१- स्पर्धे करता नाही जोरात आहे.
ज्यांनी अजून फोटो दिले नाहीत त्यांनी द्यावेत.

पण फोटो इथे कसे द्यावेत अडचण वाटत असेल तर हा एक प्रयत्न.

फोटो देण्याची प्रक्रिया थोडक्यात अशी आहे --

मिसळपाव साईटवर स्वत:ची अशी स्टोरेज मेमरी सभासदांसाठी नाही. त्यामुळे आपल्या फोन / camera / pc मधले फोटो
A) कोणत्यातरी photo hosting / photo sharing / social media site वर अपलोड करावे लागतात.
B )तिथे फोटो अपलोड झाल्यावर त्यास 'public access' द्यावा लागतो. म्हणजे की त्याची URL ऊर्फ डिजिटल पत्ता मिळाल्यास कुणीही तो फोटो पाहू शकतो. त्या URL बऱ्याच विविध असतात. त्यातली 'direct image link' मिळवावी लागते. सर्वच साइटसमधून अशी लिंक मिळतेच असं नाही.
C) ती 'direct image link' मिळाल्यावर इथे फोटो देता येतो. म्हणजे की लेखन उघडल्यावर hosting site वरचा फोटो इथे उमटवला जातो. ती कृती शेवटी पाहा.

मागे यासंबंधी बरेच धागे आले आहेत ते वरील
प्रक्रिया ( B) बद्दल आहेत. धागे आणि त्यातील माहिती बदलल्यामुळे सतत अपडेट करावे लागतात. साईट्स बदलत राहातात.

काही साईट्स बंद होतात, ( tinypic ),
काहींचे domain reset होतात. (postimage ),
काही फ्री साईट्स बंद होऊन पेड झाल्यामुळे चालत नाहीत ( photobucket ),
काहींच्या फोटोंचे time stamp बदलतात( facebook group photo),
काही फोटो ठराविक काळानंतर ओटो डिलीट होतात ( facebook posts),
अशा विविध कारणांमुळे नवनवीन साईट्स शोधणे भाग पडते.

त्या जुन्या धाग्यांत

Google drive,
Google photos,
Flickr,
Post image,
Facebook,
Photobucket,
tinypic,
Onedrive,
Picasa

हे कसे वापरायचे ते आले आहे.

इतर काही आहेत काय?

मोबाईलवर camera ने फोटो काढले जातात.
समजा मोबाईलमधूनच कोणत्यातरी वरीलपैकी photo hosting / social media sites वर फोटो चढवून नंतर direct image link मिळवली तर मिपावर फोटो टाकता येतात. पण सर्वच साईट्सवरून image links मिळत नाहीत.

१) Dropbox
प्रसिद्ध साईट - फोटो होस्टींग/ स्टोरेज साईट आहे. फ्री वर्शनमध्ये 2gb स्टोरेज मिळते. अकाउंट नोंदवून फोटो चढवा. त्यावर शेअर लिंक मिळेल ती थोडीशी
https....www....dropbox dot com/s/.............../Photo......jpg?dl=0

अशी दिसेल. त्यात थोडा बदल करायचा. शेवटचा ? नंतर dl=0 बदलून raw=1 केले की झाली image link.

https....www....dropbox dot com/s/.............../Photo......jpg?raw=1

मूळ फोटोची साईज २-४ MB असली तरी शेअर होऊन लेखात दिसणारा फोटो मात्र १००- १५० kb पडतो.
-----------------

२) Imgur
फोटो शेअरिंग साईट / सोशल मिडिया साईट आहे. इतरांना फोटो दाखवण्याची साईट. फ्री आहे. स्टोरेज लिमिट नाही. अकाऊंट नोंदवून फोटो चढवा आणि post to imgur community public करा. त्या पब्लिश झालेल्या फोटोवरून कॉपी लिंक केली की झाली image link. या लिंकने लेखात टाकलेला फोटो हा मूळ मोठ्या साईजचाच येतो. तेवढा हाई रेझलूशनचा मोठा नको असेल तर फोटो एडिटिंग app वापरून अगोदरच लहान करून मग साईटवर चढवा. म्हणजे चार पाच MB चा फोटो अगोदरच 0.5/1.0/ 1.5 MB करून घ्यायचा.

-----------
३)Shutterfly
मोठी साईट . पण direct image link मिळत नाही. Page link मिळते.
------------------
४) Instagram
मोठी साईट . पण direct image link मिळत नाही.Page link मिळते.

-------------

चारही साईट्सची apps आहेत Android वर. पण मी मोबाईल ब्राऊजरवर साईटचे डेस्कटॉप पेज उघडून काम केले. यामध्ये फायदा असा की काम पटापट होते, फोल्डर बनवता येतात, कोणत्याही ओएस अथवा डिवाइसमधून काम होते.

----------------
५) mediafire
10GB free storage देणारी साईट.
मोठी साईट . Photo ,video, document storage. पण direct image link मिळत नाही. Page link मिळते.

----------------------
६) jumpshare
Free version 2 GB storage. Photo ,video, document storage. पण direct image link मिळत नाही. Page link मिळते.

------------

गूगल फोटोवरच्या लिंकमधून शेअर करायच्या फोटोची साइज कंट्रोल करणे.

समजा गूगल फोटोच्या सेटिंग्ज मध्ये अपलोड फोटो इन 'हाई रेझलूशन'(default ) ऐवजी 'फुल ओरजिनल ' केले आणि
3MB चा फोटो अपलोड केला तर तो क्लाउडला 3MBसाईजमध्येच राहातो. याची
लिंक काढून लेखात फोटो शेअर केला तर तो १००-१५० kB लहान येतो. तर लिंकमध्ये शेवटी w570_h750 असेल तर ते आकडे तिप्पट/चौपट/पाचपट केल्यास फोटो मोठ्या साईजचे येतात.
w1070_h1450, / w2070_h2850 वगैरे.

---------------
Trial/ error करून practise करणे.
________________________

( नेट सहाय्य : How to get a direct link to image and insert it into an email signature

आणि इतर साईट्स.)

_____________________
सूचना, बदल आणि दुरुस्ती यांचे स्वागत.

__________________________

फोटो अपलोडसाठी 'direct image link' ( = लिंक ) कोणत्याही प्रकारे मिळवलीत की ती लेखात वापरून फोटो देण्याचे दोन प्रकार आहेत.

अ)
मिपा लेखन बॉक्स उघडल्यावर म्हणजे वरती जी चित्रे आहेत त्यातल्या पहिल्या सुर्योदयाच्या चित्रावर टिचकी मारल्यावर
Insert / edit image box चा पॉप अप येतो.

फोटो उभा portrate mode साठी
Image URL = लिंक टाका,
Width x height
Width = 80%
height = हा रिकामा ठेवा.
Alternate text = फोटोचं नाव तात्पुरतं.

फोटो आडवा landscape mode साठी

Image URL = लिंक टाका,
Width x height
Width = 100%
height = हा रिकामा ठेवा.
Alternate text = फोटोचं नाव तात्पुरतं.
शेवटी
OK - बटण प्रेस करा.

ब ) template वापरणे
उभ्या फोटोसाठी template
फोटो क्रमांक * आणि मथळा
<img src="लिंक" width ="80%"/>

आडव्या फोटोसाठी template
फोटो क्रमांक * आणि मथळा
<img src="लिंक" width ="100%"/>

_________________
हेसुद्धा वाचा.
11 Best Image Hosting Sites for Personal to Business

====================

प्रतिक्रिया

गोरगावलेकर's picture

9 Jul 2021 - 7:54 am | गोरगावलेकर

निश्चितच उपयोगी ठरेल

टर्मीनेटर's picture

9 Jul 2021 - 4:50 pm | टर्मीनेटर

चांगली माहिती!
मोबाईलवर मिपा वापरणाऱ्यांकरता

https://postimages.org/

ही वेबसाईट वापरायला सुलभ आहे.

अर्थात सुरवातीला थोडं किचकट वाटलं तरी इमेजेस लोड होण्यासाठी लागणारा वेळ लक्षात घेता गुगल फोटोलाच माझी पाहिली पसंती असतें.

कंजूस's picture

9 Jul 2021 - 7:06 pm | कंजूस

पण माझे २०१४ सालच्या लेखातले फोटो दिसेनासे झाले. त्या लिंका तपासल्यावर मेसेज आला की डोमेन is reset by order from gov of india. मग लिंकेत किंचित फरक केला.
साधी सोपी साईट आहे.

कंजूस's picture

9 Jul 2021 - 7:14 pm | कंजूस

w आणि h बदलून मोठे करून पाहिले.

उपयुक्त माहिती. वाखुसाआ. :-)

चौथा कोनाडा's picture

9 Jul 2021 - 5:11 pm | चौथा कोनाडा

धन्यवाद, अतिशय उपयोगी माहिती आहे ही !

फ्लिकर वरचा शेअर्ड व्हिडो एम्बेड करायचा आहे इथे.
माहिती मिळालयास उत्तम !

टर्मीनेटर's picture

9 Jul 2021 - 5:55 pm | टर्मीनेटर

Upcoming Evo X release LeLUTKA Ford Head 3.1

चौथा कोनाडा's picture

9 Jul 2021 - 6:02 pm | चौथा कोनाडा

हो, असाच करायचा होता ....
.. थोडी खटपट केल्यावर जमलं मला !

😊

NMS_11_Video

थॅन्क्यू टर्मिनेटर !

टर्मीनेटर's picture

9 Jul 2021 - 6:08 pm | टर्मीनेटर

👍

मदनबाण's picture

9 Jul 2021 - 5:38 pm | मदनबाण

वाखुसा.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी : - A simple smile. That’s the start of opening your heart and being compassionate to others. :- Dalai Lama