पट्टदकल मंदिर समूह - जागतिक वारसा स्थळ

व्लॉगर पाटील's picture
व्लॉगर पाटील in भटकंती
31 May 2021 - 4:01 pm

पट्टदकल मंदिर समूह - जागतिक वारसा स्थळ

आम्ही कर्नाटकमध्ये हंपी फिरण्यासाठी गेलो होतो. हंपी पाहून झाल्यानंतर आम्ही तिथूनच जवळ असलेल्या "पट्टदकल" ही चालुक्य राजघराण्याची राजधानी पाहण्यासाठी तिथे पोहचलो. युनेस्कोने इ.स. १९८७ साली या ठिकाणी असलेल्या मंदिरांचा आपल्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश केला.

कर्नाटकातील मलप्रभा नदीच्या किनाऱ्यावर असलेल्या ‘पट्टदकल’ येथे चालुक्यकालीन वास्तुशैलीतील मंदिरे आहेत. ७ व्या शतकाच्या आरंभी सुरु झालेले मंदिरांचे बांधकाम ९ व्या शतकापर्यंत चालू राहिले. चालुक्यकालीन वास्तुतज्ज्ञांनी मंदिरे बांधताना निरनिराळ्या धाटणीच्या वास्तुशैलीत प्रयोग केले. भारतात प्रामुख्याने आढळणाऱ्या ‘द्रविड-विमन’ आणि ‘रेखा-नागर’ अशा दोन वास्तुशैलीतील मंदिरे येथे पाहायला मिळतात. त्यामुळे पट्टदकल मंदिर समूहाला तज्ज्ञांकडून ‘वास्तुकलेची कार्यशाळा’ असे संबोधले जाते. या वास्तुसमूहात एकूण १२ प्रमुख मंदिरे आहेत व ती पायवाटेने एकमेकांना जोडली आहेत. ही सर्व शिव मंदिरे असून त्यांच्या गाभाऱ्यात आजही चांगल्या स्थितीतील शिवलिंग आहेत.

जागतिक वारसा लाभलेलं ठिकण असल्या कारणाने आपल्या तिथे टिकेट्स घेऊन जावा लागत. तसेच स्वछ्तेच्या बाबतीत हि हे एक उत्तम ठिकाण आहे . हे एक खेडे गाव असल्या कारणांनी राहण्या साठी काही नियोजन करून आज काही प्लॅन असतील जवळपास २५ कि. मी . अंतरावर असलेल्या बदामी या ठिकाणी जावे. हा पण पट्टदकल येथे मिळणाऱ्या सुक्क्या भाकऱ्या , सोबत ३ ४ प्रकारच्या भाज्या आणि दही एक उत्तम मेजवानी नक्कीच अनुभव घ्या.

इथे पोहचण्यासाठी जवळच स्टेशन आणि बस स्थानक हे बदामी. जर तुम्ही बदामी ला थांबत असला तर, तिथून ३ जागतिक वारसा स्थळांना भेट देता येते -
१. बदामी
२. ऐहोळे
३. पट्टदकल

इथले मंदिरे पाहण्यासाठी आपला हा " Pattadakal - Harmonious Blend of Indian Architecture - UNESCO Heritage Temples - 4K Musical Journey" व्हिडिओ नक्की पहा आणि आपल्या प्रतिक्रया द्या .

प्रतिक्रिया

कंजूस's picture

31 May 2021 - 5:24 pm | कंजूस

इथून एक किमी( बदामिकडे) जैन मंदिर आहे त्यातले मोठे हत्ती सुंदर आहेत.
बाकी युनेस्को हेरिटेज साईट देण्याचे नियम काही किचकट असावेत. कारण पट्टडकलु ( हल्लीचे नाव) अगोदर दोनशे वर्षांपूर्वी चालुक्यांची राजधानी ऐवळी ( = ऐहोळे) येथे होती व तिथे याहीपेक्षा सुंदर मंदिरे आहेत. खिडक्यांच्या जाळ्या, छप्परे, आणि शिल्पे अतिसुंदर. दोन तीन किलोमीटर परिसरात तेरा उत्तम मंदिरे आहेत.
विडिओ पाहिला. विरुपाक्षाचा नंदी घेतला नाही? आतली रामायण महाभारतातील खांबांवरचे पट्ट फार सुंदर आहेत.

कंजूस's picture

31 May 2021 - 5:25 pm | कंजूस

इथून एक किमी( बदामिकडे) जैन मंदिर आहे त्यातले मोठे हत्ती सुंदर आहेत.
बाकी युनेस्को हेरिटेज साईट देण्याचे नियम काही किचकट असावेत. कारण पट्टडकलु ( हल्लीचे नाव) अगोदर दोनशे वर्षांपूर्वी चालुक्यांची राजधानी ऐवळी ( = ऐहोळे) येथे होती व तिथे याहीपेक्षा सुंदर मंदिरे आहेत. खिडक्यांच्या जाळ्या, छप्परे, आणि शिल्पे अतिसुंदर. दोन तीन किलोमीटर परिसरात तेरा उत्तम मंदिरे आहेत.
विडिओ पाहिला. विरुपाक्षाचा नंदी घेतला नाही? आतली रामायण महाभारतातील खांबांवरचे पट्ट फार सुंदर आहेत.

व्लॉगर पाटील's picture

31 May 2021 - 5:45 pm | व्लॉगर पाटील

धन्यवाद , अधिकच्या माहितीसाठी . हो वीरूपाक्ष नंदी खूप भव्य आणि एक शिला आहे, विडिओ एडिटिंग मध्ये तो भाग राहून गेला

गोरगावलेकर's picture

3 Jun 2021 - 11:37 am | गोरगावलेकर

मुलीने नुकत्याच केलेल्या भटकंतीमुळे पट्टडक्कल,ऐहोले, बदामी एका दिवसात फिरून होणे शक्य आहे असे समजले.
कंजूस यांच्या प्रतिसादातील हाच तो नंदी

चौथा कोनाडा's picture

3 Jun 2021 - 1:04 pm | चौथा कोनाडा

भव्य आहे नंदी !
+१

कंजूस's picture

3 Jun 2021 - 7:19 pm | कंजूस

पूर्ण दोन दिवस हवेत. किंवा दीड तरी नक्कीच.

गोरगावलेकर's picture

3 Jun 2021 - 10:43 pm | गोरगावलेकर

ते बदामी येथे मुक्कामी होते. सकाळी नऊलाच बदामी गुफा व परिसर पहिला. साडेबाराला पट्टडक्कलचा प्रवास सुरु. बदामी ते पट्टडक्कल फक्त अर्ध्या तासाचे अंतर आहे. दोन तास पट्टडकल दर्शन. तेथून ऐहोळे अर्धा तास. ऐहोळे दर्शन दोन तास. संध्याकाळी पाचला परतीचा प्रवास सुरु.
बाकी कसं पाहायचं ते प्रत्येकाच्या नजरेवर अवलंबून आहे. कोणाला दोन दिवसही पुरणार नाहीत.

कंजूस's picture

4 Jun 2021 - 9:37 am | कंजूस

कारण तरुण लोक पटापट चालतात.
अगदी सकाळी सातला बनशंकरी मंदिर, तलाव.
तिथून महाकूटा देवालय। पट्टडकल मार्गे ऐहोळे.
ऐहोळेतील म्युझिअम, दुर्गदेवी मंदिर, लाडखान मंदिरे, हुच्चमलिगे, रावणाफडी, डोंगरावरचे मेगुटी देवालयातील जुन्या कन्नडातील शिलालेख , परत खाली आणखी देवालय परिसर. ऐहोळे गावातील महाबळेश्वरा. ते पाहून
पट्टडकल. ती सर्व पाहून
बदामि. ( हे गावातच असल्याने शेवटी.)
बदामी गुंफा, (अगस्ती तलाव, भूतनाथ मंदिर, म्युझिअम, म्युझिअमच्या मागे डोंगरावर दोन शिवालये,मारुती मंदिर परत खाली यास वेळ लागतो आणि गाइड लोक हे गाळतात.)

एका दिवसात दमणूक होते आणि सर्व मंदिरेच असल्याने मुले आणि वयस्करांना नेऊ नये.

चौथा कोनाडा's picture

6 Jun 2021 - 12:51 pm | चौथा कोनाडा

खरं तर इथं एक आठवडा निवांत राहता आलं पाहिजे.
सोबत आपले समव्यसनी मित्र .. आपल्या सारखेच निवांत !
तिथला सुर्योदय, सुर्यास्त, रात्र, पहाट, रणरण दुपार अनुभवता आली पाहिजे !
इकॉनॉमीमध्ये छोट्याश्या घरात रहायचं, आपल्या एनर्जी प्रमाणे भटाकायचं, रेंगाळायचं हवे तितके फोटो वेळ देऊन काढायचे !
कसली मज्जा येईल ना !

चौथा कोनाडा's picture

3 Jun 2021 - 1:05 pm | चौथा कोनाडा

सुंदर व्हिडियो आणि माहिती ! जायचं आहे इथं.
आमचा कधी योग येणार हे देवाला ठावे !

व्लॉगर पाटील's picture

7 Jun 2021 - 10:26 am | व्लॉगर पाटील

धन्यवाद , हो अश्या ठिकाणांना नक्कीच भेट दिली पाहिजे , भारतीय स्थापत्यकलेचे जास्त माहितीसाठी .

अत्रुप्त आत्मा's picture

30 Jun 2021 - 1:07 pm | अत्रुप्त आत्मा

___/\___

Nitin Palkar's picture

24 Jul 2021 - 7:23 pm | Nitin Palkar

खूप छान व्हिडिओ. सुंदर माहिती. तज्ज्ञ, भटक्या प्रतिसादकांचे छानसे प्रतिसाद.