चालू घडामोडी - जून २०२१ (भाग २)

मदनबाण's picture
मदनबाण in काथ्याकूट
5 Jun 2021 - 8:27 pm
गाभा: 

गांधी भाऊ आणि बहिण यांना इतक्या वर्षां नंतर लक्षद्वीप या छोट्याश्या बेटाची अचानक आठवण येउन, अचानक काळजी उत्पन्न होउन त्यांनी टिवटिवाट केला, इतर संबंधीत मिडिया देखील चाटुकारितेची संधी दवडणार कसा ? पण अचानक कुठेतरी गडबड झाली... कारण याच लक्षद्वीप बेटावर त्यांच्या तिर्थरुपांनी [ या सहलीत राहुल आणि प्रिया़का देखील अर्थातच होते. ] कशी सहल केली होती आणि त्या सहलीसाठी इंडियन नेव्हीला कसे दावणीला लावण्यात आले होते याची माहिती बाहेर येउ लागली ! ती माहिती खालील व्हिडियोत आपणास पाहता येइल.

मग अचानक या दोघांना त्या ट्रीपची आठवण न येता त्या लक्षद्वीप बेटाची काळजी का वाटली असेल ? त्याचे उत्तर तुम्हाला खाली मिळाले तर पहा !

मदनबाण.....

प्रतिक्रिया

श्रीगुरुजी's picture

6 Jun 2021 - 12:05 am | श्रीगुरुजी

हे बंधुभगिनी ट्विटर मास्टर आहेत. काही कामधंदा नसल्याने दिवसभर ट्विट करीत राहणे एवढेच ते करतात.

ट्विटरने आपल्या राष्ट्राध्यक्षांचे ट्विट डीलीट केल्याने कालच नायजेरियाने आपल्या देशात ट्विटरवर बंदी घातली आहे. त्यामुळे त्या देशातून आता ट्विटरचे संकेतस्थळ मिळत नाही.

नवीन माहिती तंत्रज्ञान कायद्यावरून भारताने ट्विटरला शेवटचा इशारा दिला आहे. जर भारताने सुद्धा ट्विटरवर बंदी आणली तर हे बंधुभगिनी आपला वेळ कसा घालवतील?

बहुतेक मिपावर डु आयडी काढतील

Rajesh188's picture

6 Jun 2021 - 12:21 am | Rajesh188

देश विविध धर्म ,संस्कृती ,परंपरा असणारा आहे.
अंदमान मधील स्थानिक लोक ची जी संस्कृती आहे त्याच महत्व देशात असणाऱ्या बहुसंख्य हिंदू संस्कृती इतकेच महान आहे.
देशप्रेमी लोकांनी त्यांची विचारधारा देशावर लादू नये.

अजून लादायला सुरवात कुठे केलीय? लादायला सुरवात होईल त्या वेळी तुम्हाला कळवूनच केलं जाईल ते. खात्री बाळगा.

तेव्हा उत्तर भारत आणि दक्षिण ,पश्चिम भारतातील हिंदू चे एकमेका समोर विरोधी म्हणून उभे असतील .
उत्तर भारतीय हिंदू विचारधारा ,परंपरा. दक्षिण आणि पश्चिम भारतीय प्रगत हिंदू स्वीकारत नाहीत.
त्या पेक्षा सर्वांना त्यांच्या संस्कृती प्रमाणे राहू ध्या .
उगाच काही तरी बावळट विचार थोपवू नका

आनन्दा's picture

6 Jun 2021 - 8:11 am | आनन्दा

आयला मला वाटायचं की near death experience नंतर माणसे rational होतात म्हणून!

105 आमदार देणारा महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, या आधी भाजपचे राज्य असणारा राजस्थान हे पश्चिम महाराष्ट्रात येत नाहीत हे वाचून गंमत वाटली.

तुम्ही फारच बाळबोध विचार करता. प्रगत हिंदूंना अप्रगत करायचं नाहीये. त्यांना फक्त जागृत करायची गरज आहे. सर्व हिंदूंचे श्रद्धास्थान अयोध्या, मथुरा आणि काशी च आहे, जे उत्तर हिंदुस्थानात आहे. उत्तर, पश्चिम, दक्षिण, पूर्व आणि पुर्वोत्तर हिंदूंमध्ये बाहेरच्यांनी फरक आणि फूट लावण्याची कारस्थाने आतापर्यंत केली.

ती आता हाणून पाडली जातील.

शक्य तितक्या अहिंसक मार्गाने.

श्रीगुरुजी's picture

6 Jun 2021 - 9:02 am | श्रीगुरुजी

तुम्ही फारच बाळबोध विचार करता.

हे सर्वांनी केव्हाच ओळखलंय.

ती आता हाणून पाडली जातील.
ती हाणुन पाडण्याच्या आधी फूट पाडणारे किवा धर्म परिवर्तन करणारे यांची विचारसरणी तुम्हाला समजुन घेता येणे फार महत्वाचे असते. त्यांची तुमच्या विरुद्धची अवलंबली जाणारी कार्यपद्धती तुम्हाला वेळे वरच ओळखता आली पाहिजे आणि तुम्ही त्यावर वेळ न-दवडता मात देखील केली पहिजे.जर तुम्ही तुमच्या शत्रुला ओळखु शकत नसला आणि त्यांची कार्यपद्धती तुम्हाला समजुन येत नसेल किंवा ती समजुन घेण्याची तुमची मानसिकता नसेल तर तुमचा पराभव निश्चित असतो.
हिंदूस्थानात अश्या दोन मोठ्या घटना झाल्या,हिंदू समाज या दोन्ही वेळी ही गोष्ट समजु शकला नाही !
१] फाळणी :- अल्पसंख्यक म्हणुन मुस्लिम समाजाने धर्माच्या आधारावर त्यांचे वेगळे इस्लामी राष्ट्र मागितले याचा परिणाम म्हणुन पाकिस्तानची निर्मीती झाली.
या वेळी हिंदूंच्या हे लक्षात आले नाही की ,अल्पसंख्यक असुन देखील बहुसंख्यक हिंदूंच्या कत्तली आणि स्त्रिंयांवर बलात्कार करुन एका राष्ट्रनिर्मीती त्यांनी घडवुन आणली गेली.
२] हिंदू काश्मिरी पंडितांचे पलायन आणि स्वतःच्याच देशात निर्वासिताचे जगणे :- ही दुसरी मोठी घटना झाली, जेव्हा या राष्ट्रातील एका राज्यातुनच हिंदुंना पलायन करावे लागले आणि शासन व्यवस्था / हिंदू जनसमुदाय जणु काही अफुच्या नशेत असावा तसा निपचित पडुन राहिला आणि काश्मिरी पंडितांना कापले गेले त्यांच्या स्त्रिया पळवल्या गेल्या आणि अगणित बलात्कार झाले.
वरील दोन्ही घटनांमध्ये असलेली समानता म्हणजे बहुसंख्य असुन देखील हिंदू समाजास स्वतःच घरा सोबतच त्यांना स्वतःच्या स्त्रिया देखील गमावाव्या लागल्या आणि ही कृती घडवुन आणणारे अल्पसंख्यकच होते.
अश्या विचारधारेची समज आणि जाणिव आता तरी आपल्याला झाली पाहिजे, मी सुद्धा ते समजुन घेण्याचा प्रयत्न करत आहे आणि सध्या यासाठी खालील व्हिडियो पाहत आहे आणि इतरही वाचन करत आहे.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Today we must all be aware that protocol takes precedence over procedure. :- Irwin Corey

शाम भागवत's picture

6 Jun 2021 - 3:14 pm | शाम भागवत

फाळणीच्या संदर्भात मी असे कुठेतरी वाचल्याचे आठवतय की, कोणत्यातरी जनगणनेमध्ये धर्माची माहिती लिहीली जात असे. त्याबाबत गांधीजींनी असं काहीसं म्हणाले होते की,
हिंदू मुस्लिमांमधे भेदभाव व्हावा म्हणून इंग्रज प्रयत्न करत आहेत. यास्तव हिंदूंनी आपला धर्म नोंदवू नये. तर मुस्लिम लीगने मात्र मुसलमानांना आवर्जून आपला धर्म नोंदवायला सांगितला होता. त्यामुळे अनेक ठिकाणी हिंदू बहुसंख्य असूनही ते कागदोपत्री अल्पसंख्य ठरले. याचा खूप मोठा वाईट परिणाम फाळणीच्यावेळेस हिंदूवर झाला.

पण माझे हे वाचन फार पूर्वी म्हणजे बांगला देश स्थापनेच्या वेळेचे आहे. त्यावेळेस बंगालच्या इतिहासाबद्दल बरेच लेख वाचल्याचे आठवतंय. त्यामुळे मी आज खात्रीशीररित्या काही सांगू शकत नाही.

फाळणीच्या संदर्भात मी असे कुठेतरी वाचल्याचे आठवतय की, कोणत्यातरी जनगणनेमध्ये धर्माची माहिती लिहीली जात असे. त्याबाबत गांधीजींनी असं काहीसं म्हणाले होते की,हिंदू मुस्लिमांमधे भेदभाव व्हावा म्हणून इंग्रज प्रयत्न करत आहेत. यास्तव हिंदूंनी आपला धर्म नोंदवू नये.
‘मोहनदास कर्मचंद गांधी को महात्मा की उपाधि देने वाले स्वामी श्रद्धानंद सरस्वती के हत्यारे को खुद गांधी के बयान ने ही बचाया था। 1926 में जिस अब्दुल राशिद नाम के व्यक्ति ने उनकी हत्या की थी गांधी ने उसका बचाव ‘मेरा भाई’ कहकर किया था।’
आता तुम्ही जर ते तसं म्हणाले असतील तर का म्हणाले असतील ते आता समजले असेल !

वरती जो व्हिडियो आहे, तो संपूर्ण पाहिल्यावर मी दोन गोष्टी शोधल्या :-
१]अंडरस्टैंडिंग मुहम्मद : अली सीना द्वारा हिंदी पीडीऍफ़ पुस्तक

२] Wasim Rizvi :- वृक्षाचे मूळ धार्मीक शिक्षण आहे, तिथे जे शिकवले जाते त्याचे अर्थातच अनुकरण होइल. त्या शिकवणीत जर काही चुकीचे / दुसर्‍या धर्मा विरोधात/ राष्ट्रविरोधी शिक्षण दिले जात असेल तर अभ्यास क्रमातला तो भाग वगळला पाहिजे, हे वासिम रिझवी यांचे काही व्हिडियो पाहुन मला समजलेले सार !

जडं पे वार करो तो बडे से बडा पेड भी गिर जाता है |

माझा कोणत्याही युट्युब चॅनलशी कोणत्याही प्रकारचा संबध नाही, परंतु जे मी पाहतो ते इतरांना देखील पहाता यावे असाच माझा एकमेव प्रयास असतो, त्यातुन कोणी बोध घेतला तर अती उत्तम !
क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे !
तस्मात The Jaipur Dialogues यांनी क्राउड फंडिग चे आव्हाहन केले आहे आणि एक हिंदू म्हणुन त्यांच्या कार्यास जी काही मला मदत करता येणे शक्य होते ती मी केली आहे आणि त्यानंतरच मी हा प्रतिसाद इथे देत आहे. त्यांचे कार्य मोलाचे वाटल्यानेच ही मदत मला करावी वाटली.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Today we must all be aware that protocol takes precedence over procedure. :- Irwin Corey

प्रदीप's picture

6 Jun 2021 - 11:14 am | प्रदीप

सर्वसाधारणपणे, कुठेकी, म्हणजे, नुसतेच कामाच्या संदर्भातच नव्हे, तर अगदी इन्फॉर्मल मीटींग्स/ एकत्र जेवणे इत्यादी वेळीसुद्धा, सुसंकृत जगांत एक जगमान्य परिपाठ असा असतो की सर्व उपस्थितांना समजेल अशा भाषेंत सर्वांनी आपापसांत बोलावे. ह्यांतून एकमेकांबद्दल आदर असणे दर्शविले जाते.

इथे ते होत नसावे, म्हणून शेवटी तेथील व्यवस्थापनाला ते करून घेण्यास भाग पडले.

"Whereas maximum patient and colleagues do not know this language and feel helpless causing a lot of inconvenience. So it is directed (to) all nursing personnel to use only Hindi and English for communication

ह्यांत मला कसलाही मूर्खपणा दिसत नाही.

जाता जाता, पंजाबी, विशेषतः शीख्ग लोक स्वतःच जगच सर्व पंजाबीतून बोलू शकते, अशा समजुतीने सर्वत्र वावरत असतात, ते वेगळे.

युगपुरुषांना ह्या बाबतीत १००% पाठिंबा।

असे नाही केले तर अनेक सॉफ्टवेर कंपनी मध्ये फक्त तेलगू च बोलली जाईल। भाषा पेशंट ला समजायला पाहिजे। अर्थात कँटीन म्हद्ये कोण काय बोलतेय ह्यावर बंधन नसावे।

श्रीगुरुजी's picture

6 Jun 2021 - 1:05 pm | श्रीगुरुजी

शीख ज्या प्रदेशात स्थायिक होतात तेथील स्थानिक भाषा शिकतात असा माझा अनुभव आहे. पुण्यात शुद्ध मराठीत बोलणारे अनेक शीख पाहिले आहेत.

प्रचेतस's picture

6 Jun 2021 - 1:14 pm | प्रचेतस

पिंपरीतील सिंधी लोकही मराठीत बोलतात, समजा आपण चुकून त्यांच्याशी हिंदीत बोलायला लागलो तरी ते मराठी माणूस ओळखून स्वतःहून मराठीत बोलायला सुरुवात करतात.

प्रदीप's picture

6 Jun 2021 - 1:19 pm | प्रदीप

आमच्या येथे असलेल्या बहुतांश शीखांनीही येथील स्थानिक भाषा आत्मसात केली आहे. न करून सांगतील कुणाला, कारण ह्यांपैकी बहुतांश अगदी निम्नस्तरावर म्हणजे, हॉटेलांत व्हॅले पार्किंग, डिलीव्हरी देणारे इत्यादी कामे करतात. अन्य कुणी आहेत ते व्यापारउदीम करतात. त्यासाठी स्थानिक भाषा व्यवस्थित बोलता येणे आवश्यक आहेच.

पण ते जेव्हा इतर भारतीयांशी बोलतात तेव्हा ते हमखास पंजाबीतून बोलतात असा माझा आनुभव आहे. ह्याची हद्द एकदा सबवे स्टेशनवर झाली. मी पाहिले की एक थोडेसे वयोवृद्ध सरदारजी थोडे गोंधळलेले आहेत, त्यांना काही माहिती हवी आहे. तेथील रेल्वेच्या कंपनीच्या बूथवरील माणसाशी ते संभाषण करू शकत नाहीत-- ना स्थानिक भाषा येते, ना इंग्लिश. तेव्हा मी त्यांना मदत करण्याच्या दृष्टीने त्यांच्या जवळ गेलो. तात्काळ त्यांनी पंजाबीतून बोलण्यास सुरूवात केली. मी हिंदीतून बोलतोय व ते पंजाबीतून. असे थोडे झाल्यावर ते थोडे फ्रस्ट्रेट झाले व मला पंजाबीतूनच म्हणाले 'तुला पंजाबी येत नाही?"

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

6 Jun 2021 - 11:15 am | माईसाहेब कुरसूंदीकर

मल्लु नर्सेस आपापसात मल्याळंम बोलत असतील तर आक्षेप अस्सण्याचे कारण नाही. ज्याला मल्याळंम येत नाही अशा व्यक्तीशी नर्स मल्याळम कसे बोलणार? डॉ़क्टर्/पेशंटवर विनोद करुन्/काहीतरी बोलुन नर्सेस हसल्या असतील म्हणून हे रागाने केले असेल.
लोकांसमोर कुजबुजण्याची सवय आपल्यासारखी मल्लु लोकांना आहेच.

हेच म्हणणे आहे. मल्याळम येणाऱ्या व्यक्तीशी मल्याळम मध्ये बोलण्यात काय प्रॉब्लेम आहे ?

तुम्ही कॉर्पोरेट जगात बघितलं तर सर्वसाधारणपणे मिटिंग्ज, बरेच लोक एकत्र बोलत असताना लोक ज्या भाषेचे जास्त लोक असतील त्या भाषेत शिफ्ट होतात. म्हणजे उदाहरणार्थ चेन्नई मध्ये मिटिंग मध्ये लोक तामिळ बोलतात. पुण्यात मराठीत बोलतात. हे बऱ्याचदा अनवधानाने होते. पण त्याचा इतरांना त्रास होतो. अर्थात बहुतांश ठिकाणी लक्षात येताच पुन्हा इंग्लिश मध्ये पुन्हा संभाषण शिफ्ट केले जाते. पण हे सगळीकडेच केले जाते असे नाही. मी ऑफिस मध्ये हट्टाने इंग्लिश मध्येच बोलतो. जर मराठी सहकारी मराठीत बोलत असेल तरीही मी इंग्लिश च बोलतो ते याचसाठी की ऑफिस ची भाषा इंग्लिश आहे आणि तिथे प्रोफेशनल च वागले गेले पाहिजे.

प्रदीप's picture

6 Jun 2021 - 12:35 pm | प्रदीप

मी वर लिहीले आहे.

प्रदीप's picture

6 Jun 2021 - 12:39 pm | प्रदीप

दोन अथ्यवा अधिक मल्याळी नर्सेस आपापसांत जर, कामाच्या ठिकाणी,मल्याळींतून इतरांच्या समोर बोलत असतील, तर ते चुकीचे आहे. ते 'इतर', म्हणजे मल्याळी न समजणारे सहकारी अथवा इस्पितळातचे क्याएंट्स अथवा दोन्ही.

साहना's picture

7 Jun 2021 - 1:51 am | साहना

इस्पितळ हि ATC प्रमाणे संवेदनशील जागा आहे त्यामुळे सर्वानी एकाच भाषा आणि ती सुद्धा सर्वाना समजेल अशी बोलणे अत्यंत आवश्यक आहे.

यात काहीही चुक नाही ... परंतु ते जेव्हा समोरची व्यक्ती एखाद्या कंपणी ला रीप्रेजेंट करते तेव्हा हीच बाब चुकीची होते. मल्याळम येणाऱ्या व्यक्तीशी मल्याळम मध्ये जरुर बोलावे .. पण फावल्या वेळात .. लंच ब्रेक मधे ..

उदाहरण द्यायचे तर बघा :
तुमच्या टीम मधे ८ मल्याळम आहेत आणी २ मराठी आहेत. समजा मीटींग झाली . . सगळे मल्याळम मधे बोलले. त्या मल्याळम मीटींग मधे असे ठरले की उद्यापासुन तुंम्ही ८ तासा ऐवजी १२ तास काम करावे कारण तुमचे काम चांगले नाही. आता सांगा ... त्या मल्याळम मीटींग मधे तुम्हाला काय कळले ?

यात काय प्रॉब्लेम आहे ?

आग्या१९९०'s picture

6 Jun 2021 - 5:14 pm | आग्या१९९०

बंदी मागे घेतली.

प्रदीप's picture

6 Jun 2021 - 6:54 pm | प्रदीप

.

प्रदीप's picture

6 Jun 2021 - 7:12 pm | प्रदीप

उठवली गेलेली बंदी ह्याच दिल्लीतील एका सरकारी इस्पितळातील, मल्याळीतून बोलण्याविषयीची आहे.

ह्या सगळ्यामुळे प्रथम विनाकारण गहजब झाला-- मुख्य माध्यमांतून बातमी आली व नंतर सोशल मीडियावर ह्या तथाकथित घोर अन्यायाची हेटाळणी सुरू झाली.

ह्या बातमीनुसार, बंदी त्या इस्पितळाच्या नर्सिंग सुपरीटेंडेंटने घातली होती. ती अशी होती... "A complaint has been received regarding Malayalam language being used for communication in working places in GIPMER. Whereas maximum patient and colleagues do not know this language and feel helpless causing a lot of inconvenience. So it is directed to all Nursing Personnel to use only Hindi and English for communication otherwise serious action will be taken"

आता, बहुधा ह्यावरून विनाकारण झालेल्या गहजबामुळे, त्या संस्थेच्या प्रमुखाने, स्वतःच्या अखत्यारीत ती बंदी रद्द केली आहे. मला तरी हे पटत नाही. पण शेवटी विनाकारण उडालेल्या राळेपुढे मान तुकवणे, आपली जुनी प्रथा आहे.

जवळपास १४- १५ वर्षां पूर्वी जेव्हा मला कंपनीने डेन्मार्क मध्ये प्रोजेक्ट आणण्यासाठी आणि त्यासाठी आवश्यक असणार्‍या नॉलेज ट्रान्सफरसाठी पाठवले होते, तेव्हा तिथे जाण्याच्या आधी काही गोष्टी सांगितल्या, त्या मध्ये इतर गोष्टीं बरोबरच क्लायंट समोर आपासात चुकुनही भारतीय भाषेत [ जी आमची मातृभाषा असेल ] बोलण्यास मनाई केली होती, अश्या संभाषणामुळे समोरच्या व्यक्तीस तुमच्या वर्तणुकी बद्धल अविश्वास निर्माण होउ शकतो, त्यांना अस्वस्थाता येउ शकते.

त्या मल्याळी बायकांना अपासात त्यांच्या मातृभाषेत मोकळ्या वेळात जरुर गप्पा माराव्यात,परंतु पेशंट समोर तसे करणे योग्य नव्हे. याला आपण एक शिष्‍टाचार [ प्रोटोकॉल ] पाळणे म्हणु. इथे भाषा द्वेष नसुन रुग्णाचा नर्स विषयी असणारा विश्वास / आदर कमी होउ शकतो आणि भिती देखील उत्पन्न होउ शकते. ती टाळावी हे योग्य आहे.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Today we must all be aware that protocol takes precedence over procedure. :- Irwin Corey

त्यांनी त्यांच्याच भाषेत बोलावे समोरच्याला समजतं नसेल तर दुभाषी ठेवावेत.
मुंबई मध्ये ज्यांना मराठी येत नाही त्यांनी सरळ मुंबई सोडावी असे जाहीर केले की bimaru राज्यात कसा पोट शूळ उठतो.
बाकी भाषिक लोकांनी इंग्लिश शिकावी पण हिंदी शिकायची काहीच गरज नाही.

सुक्या's picture

7 Jun 2021 - 3:43 am | सुक्या

सहमत आहे ... तेज्यायला ... आम्ही उगाच हिकडं विंग्लीश मधे बोलतो ...
उद्यापासुन मराठी बोलतो हापीसात ... ज्यांना येत नाय .. त्यानं दुभाषी ठेवावेत ...

प्रोटोकॉल महत्वाचा आहे.

- ATC, पोलीस, डॉक्टर इत्यादींनी एकाच भाषेंत आणि सर्वाना समजेल असे बोलणे अत्यंत आवश्यक आहे. तुम्ही चीन किंवा जपान मध्ये सुद्धा ATC संभाषणे ऐकू शकता नेहमी इंग्रजीत असतात.
- पेशंट ला न समजणाऱ्या भाषेंत बोलते खूप खराब पद्धतीची बेडसाईड मेनर आहे.

युगपुरुषांच्या ह्या निर्याणाचे समर्थन. काँग्रेस आणि प्रधान सेवकांच्या पक्षाने इथे राजकारण करणे निर्लज्ज पणा आहे.

भारताचे IT मिनिस्टर सध्या जगभर ट्विटवर आपला सत्कार करून घेत आहेत. सन्माननीय आणि परमआदरणीय प्रधान सेवकांच्या शान मध्ये गुस्ताखी होऊ नये म्हणून नवीन भोळसट पणाचे नियम आणले ज्याला ट्विटर ने मानण्यास साफ नकार दिला आहे. ३ वेळा सदर मंत्र्यांनी विविध प्रकारे "वॉर्निंग" दिली ज्याला ट्विटर ने ढुंकून सुद्धा पाहिले नाही. उलट मंत्र्यांच्या आणि पार्टीच्या समर्थकांनीच मिळून मंत्रिमहोदयांनी शोभा इतकी वाढवली कि मंत्रिमहोदयांनी आपल्याच समर्थकांना ब्लॉक करण्याचे धोरण अवलंबले.

https://twitter.com/i/status/1401439269240000512

सध्या ट्विटर ने मंत्रीमहोदयांना इतकी सायलंट ट्रीटमेंट दिली आहे कि सर्व प्रकरण अवघड जागीच दुखणे बनले आहे.

ट्विटर अमेरिकन कंपनी असून भारतांत त्यांची एकूण गुंतवणूक नगण्य आहे त्यामुळे उत्पाटन करण्यासाठी भारत सरकारकडे काहीही नाही. फारतर ISP ला हाताशी धरून ट्विटर ची सेवा भारतीय नागरिकांना मिळू नये हा प्रयत्न भारत सरकार करू शकते पण त्यांत सुद्धा कोर्ट आणि नागरिक दोन्ही भारत सरकारचे प्लॅन खड्ड्यांत घालतील हे सरकारला स्वतःला ठाऊक आहे.

अवघड जागीचे दुखणे अश्यासाठी कि ज्या काली देशांतील सर्व मीडिया ह्यांच्या विरुद्ध होती तेंव्हा फेसबुक, ट्विटर इत्यादी माध्यमांतून विविध मतदार मंडळींनी प्रधान सेवकांचा उदो उदो केला आणि त्यांना उच्च शिखरावर नेवून पोचवले. शेफाली वैद्य पासून तेजिंदर पाल बग्गा पर्यंत आणि तेजस्वी सूर्यापासून अर्णव गोस्वामी पर्यंत विविध पार्टी धार्जिण्या लोकांचे करियर सोशल मीडिया मुळेच वर आले, नेहमीच्या माध्यमांनी ह्यांना बिस्कीट सुद्धा टाकले नसते. ट्विटर बंद केल्यास ऑपोसिशन पेक्षा ह्या प्रखर राष्ट्राभिमानी पक्षालाच नुकसान होण्याची शक्यता जास्त आहे. अमित मल्विय

उगाच रुल ऑफ लँड वगैरे थोथांड बोलून सदर मंत्री आता वारंवार अपमानित होत आहेत. एक गोष्ट चान्गली आहे ती म्हणजे वारंवार ह्या प्रकारे स्वतःची शोभा करून घेण्याची त्यांना खूप सवय आहे.

ट्विटर भारतांत बंद झाले तर अमित मालवीय ला आपला ५०% स्टाफ कमी करावा लागेल.

येथील कमेंट पहा
https://twitter.com/rsprasad/status/1401402295141634051

उगाच रुल ऑफ लँड वगैरे थोथांड बोलून
https://www.theguardian.com/media/2021/feb/23/facebook-reverses-australi...
पहा .. एका टीचभर देशाने ( ते सुद्धा पाश्चिमात्य भांडवशाही , समाजवादी नाही ) फेसबुक ला आपले नियम पाळायला लावले
याच देशाने काही वर्षपूर्वी सिगरेट विकणाऱ्या बलाढ्य कंपन्यांना देशाच्या जनतेने शिवकारलेलं " प्लेन पॅकेजिंग " चे नॉयम पाळायला लावले त्यामुळे
हिंमत असले तर रुल ऑफ लँड राबवता येते

श्रीगुरुजी's picture

7 Jun 2021 - 6:26 pm | श्रीगुरुजी

ट्विटरने आपल्या राष्ट्राध्यक्षांचे ट्विट डीलीट केल्याने परवा पासून नायजेरियाने आपल्या देशात ट्विटरवर बंदी घातली आहे. त्यामुळे त्या देशातून आता ट्विटरचे संकेतस्थळ मिळत नाही.

चंद्रसूर्यकुमार's picture

7 Jun 2021 - 6:58 pm | चंद्रसूर्यकुमार

https://www.statista.com/statistics/242606/number-of-active-twitter-user... वर दिले आहे की ट्विटरचे भारतात १.७५ कोटी अ‍ॅक्टिव्ह वापरणारे लोक आहेत. हाच आकडा अमेरिकेत ६.९३ कोटी आणि जपानमध्ये ५.०९ कोटी इतका आहे. वरकरणी असे वाटू शकते की ट्विटर वापरणारे भारतात अमेरिकेच्या २५% च लोक आहेत. पण गोम अशी की अमेरिकेची लोकसंख्या ३०-३२ कोटीच्या आसपास असेल तर अमेरिकेतले जवळपास २५% लोक आधीच ट्विटरवर अ‍ॅक्टिव्ह आहेत. तर भारतात हा आकडा दीड टक्का आहे. त्यामुळे भारतात यापुढे वाढीचा जास्त वाव आहे. आताच्या काळात असे कोट्यावधी लोक एखाद्या प्लॅटफॉर्मवर गोळा झाले की मग त्याचा मोनेटायझेशनचा मार्ग खुला होत असतो. नव्या अर्थव्यवस्थेत 'डेटा'ला अतोनात महत्व आहे. भारताचे महत्व ट्विटरला म्हणून आहे.

ट्विटरला काहीही सोने लागलेले नाही. मुळात असल्या वेबसाईट्स सुरू करायला फार खर्च येत नाही. प्रश्न असतो की ट्विटर आधीपासून असल्याने जास्त लोक तिथे असतात आणि नव्या साईटवर फार कोणी नसते. एका अर्थी 'नेटवर्क एक्सटर्नेलिटी'चा हा प्रश्न असतो. मागे व्हॉट्सअ‍ॅपच्या प्रायव्हसी पॉलिसीवर बोंबाबोंब झाल्यावर सिग्नल आल्याचा गवगवा झाला पण तिथेही तोच प्रश्न आला. तिथे नुसतीच प्रायव्हसी होती लोक नव्हते. तेव्हा ट्विटरचे स्थान अढळ दिसते ते त्यामुळे दिसते.

आपल्या देशाच्या कायद्याचे ट्विटर पालन करणार नसेल तर त्याला दणका द्यायलाच हवा. जेव्हा माझा देश विरूध्द परकीय हा प्रश्न असतो तेव्हा माझ्या देशाचे धोरण चुकत असेल तरी मी परकीयांच्या बाजूने जाऊ शकत नाही/शकणार नाही. १९६२ च्या चीन युध्दाच्या वेळेस माझा जन्मही झाला नव्हता. पण त्यावेळेस मी जर असतो आणि त्या प्रकारात नेहरूंचे कसे चुकले होते (फॉरवर्ड एक्सपान्शंन वगैरे) हे माहित असूनही चीनच्या बाजूने मी जाऊ शकलो नसतो/गेलो नसतो. नाहीतर आपल्यामध्ये आणि देशद्रोही कम्युनिस्टांमध्ये फरक काय राहिला? जर हा कायदा चुकीचा असेल तर सरकारला जो काही विरोध करायचा तो देशात करायचा. पण जेव्हा आपले विरूध्द परके हा प्रश्न येतो तेव्हा सगळ्यांनी आपल्याच लोकांच्या मागे उभे राहिले पाहिजे. पण आपल्याकडे मोदीद्वेष काही लोकांच्या इतक्या नसानसात भिनला आहे की असल्या गोष्टी समजायच्या पलीकडे ते गेले असतात. स्वच्छ भारत मिशन केवळ मोदींनी चालू केले म्हणून ते अपयशी व्हावे (जसे काही भारत स्वच्छ झाला तर रस्त्यावरची सगळी घाण यांच्या घरात येऊन पडणार आहे) म्हणून रस्त्यावर टमरेल घेऊन बसतील असे हे लोक आहेत ते इतका विचार कुठे करणार?

मोदींनी मागे मनकी बातमध्ये कू चा उल्लेख केला होता. हे कू ट्विटर होण्यापासून कित्येक योजने दूर आहे. मागे बघितले होते तेव्हा त्यांचे सर्च इंजिनच धड चालत नव्हते हे समजले. जे लोक कू वर आहेत हे माहित आहे त्यांची नावे शोधल्यासही ते लोक कू वर आहेत हे ते दाखवत नव्हते. हे कू नाहीतर दुसरे कोणते अ‍ॅप. ते बनवायला फार खर्च येत नसतो. प्रश्न लोकांचा असतो. जर एकदा चांगला फुलप्रूफ प्लॅटफॉर्म भारतात सुरू झाला आणि मोदी स्वतः त्याचे सदस्य झाले तर मग तिथे लोक एकत्र यायला फार वेळ लागू नये. या लोकांना काहीही वाटू दे पण मोदी आता भारतीयांच्या आयुष्यात मोठे आणि महत्वाचे स्थान घेऊन आहेत आणि लोकांचा मोदींवर विश्वास आहे. मोदींचे नोटबंदीसारखे काही निर्णय चुकले असतील पण त्या नोटबंदी आणि लॉकडाऊन सारख्या निर्णयांचा जवळपास प्रत्येक भारतीयावर परिणाम झाला होता तरीही मोदींवरचा विश्वास फार कमी झाला आहे असे वाटत तरी नाही. जे लोक इथे मिपावर आणि बाहेर बोंबा मारत असतात ते गेली ७ वर्षे तेच करत आहेत. तेव्हा सांगायचा मुद्दा म्हणजे असा प्लॅटफॉर्म भारतात आला आणि स्वतः मोदींनी तिथे अकाऊंट उघडला तर लोक जमणे हा महत्वाचा प्रश्न निकालात लागू शकेल.

ट्विटरला धडा शिकवता येऊ शकेल.

श्रीगुरुजी's picture

7 Jun 2021 - 7:57 pm | श्रीगुरुजी

+ १

उत्तम प्रतिसाद

आपल्या देशाच्या कायद्याचे ट्विटर पालन करणार नसेल तर त्याला दणका द्यायलाच हवा.
या बाबतीत आपण युरोपचा आदर्श डोळ्या समोर ठेवायला हवा. गुगला देखील दंड ठोठवण्यास ते मागेपुढे पाहत नाहीत. दुसरे उदाहरण म्हणजे चीन. त्यांनी तर सरळ सरळ सगळ्यांना फाट्यावर मारले आहे.सर्च इंजिन पासुन मेसंजर सगळ मेड इन चायना आहे.
कधी काळी माय स्पेस वर देखील लोक होते, ऑरकुटवर देखील लोक होते, फेसबुक देखील लोक होते आणि ट्विटर वर देखील लोक आहेत, वेळ लागतो पण लोकांनी प्लॅटफॉर्म बदलला. काहींनी अश्या प्लॅटफॉर्म्सना टाटा बाय बाय देखील करुन या व्हर्च्यअल स्पेस मधुनच बाहेर पडायचे ठरवले आहे आणि काही पडले देखील आहे.
आता ट्विटरचे म्हणाल तर त्यांना लयं माज आला आहे, ट्रम्प तात्यांना जे ब्लॉक करतात त्यातच त्यांची मस्ती आणि मजल दिसुन येते. हीच मस्ती आणि माज ते आज आपल्याला दाखवत आहेत.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- We must never forget or diminish the sacrifices of those who gave everything for this nation. :- Jim Walsh

> त्यामुळे भारतात यापुढे वाढीचा जास्त वाव आहे. आताच्या काळात असे कोट्यावधी लोक एखाद्या प्लॅटफॉर्मवर गोळा झाले की मग त्याचा मोनेटायझेशनचा मार्ग खुला होत असतो. नव्या अर्थव्यवस्थेत 'डेटा'ला अतोनात महत्व आहे. भारताचे महत्व ट्विटरला म्हणून आहे.

पोटापाण्यासाठी हाच धंदा मी करत असल्याने ह्यावर अधिकारीक पद्धतीने बोलू शकते तुम्ही जे म्हणता ते बरोबर असले तरी त्याला आणखीन बाजू आहेत. फेसबुक आणि गुगल भारत सरकारपुढे लोटांगण घालतील असे वाटत असले तरी ट्विटर कदाचित घालणार नाही.

> ट्विटरला काहीही सोने लागलेले नाही. मुळात असल्या वेबसाईट्स सुरू करायला फार खर्च येत नाही.

हे विधान आपल्या अज्ञानाचे प्रतीक आहे.

> आपल्या देशाच्या कायद्याचे ट्विटर पालन करणार नसेल तर त्याला दणका द्यायलाच हवा. जेव्हा माझा देश विरूध्द परकीय हा प्रश्न असतो तेव्हा माझ्या देशाचे धोरण चुकत असेल तरी मी परकीयांच्या बाजूने जाऊ शकत नाही/शकणार नाही.

हा मुद्दा वैयक्तिक असला तरी मी असहमत आहे. मी माझ्या देशवासीयांची आणि त्यांच्या स्वातंत्र्याची बाजू नेहमीच घेईन आणि भारत सरकारची बाजू फक्त "आपले सरकार" म्हणून कधीही घेणार नाही. मुळांत भारत सरकार ब्रिटिश राज २ आहे आणि ह्यांना पाठिंबा देणे सापाला दूध पाजणे आहे. लोकांची बाजू आणि सरकारची बाजू ह्यांत खूप फरक आहे.

> पण आपल्याकडे मोदीद्वेष काही लोकांच्या इतक्या नसानसात भिनला आहे

बरोबर आहे. मोदी द्वेष हि एक इंडस्ट्री बनली आहे तरी भक्त मंडळी हि नवीन कम्युनिस्ट बनली आहे. रशियांत पाऊस पडला तर म्हणे इथले कॉम्रेड छत्री उघडायचे. त्याच्या न्यायाने भक्त मंडळी सुद्धा वाट्टेल त्या पद्धतीने प्रधान सेवकांची चाटुकारिता करण्यात मग्न आहे. नवीन IT कायदे शेवटी कपिल सिब्बल ह्यांच्या कायद्याप्रमाणेच आहेत आणि राजाने कपडे घातले नाहीत हे कुणी सार्वजनिक रित्या बोलू नये ह्यासाठीच आणले आहेत. (हे मोदी करत आहे कि राज्य सरकार कि आणखीन कोणी हा मुद्दा गौण आहे. माकडाच्या हाती कोलीत देऊच नये. उद्या मोदी गेले आणि ममता आली तर मग आणखीन समस्या होऊ शकते)

> ट्विटरला धडा शिकवता येऊ शकेल.

बरोबर आहे. रवी शंकर प्रसाद आणि मोदी सरकार ह्यांनी हिम्मत दाखवून ट्विटर वर बंदी आणावीच. किंवा अमित मालवियाला सांगून भाजपचा IT सेल ट्विटर वर बंद केला तरी पुरेसा आहे. किंवा समस्त भाजप लोकांनी ट्विटर सोडून कु किंवा इतर कुठल्याही प्लॅटफॉर्म वर जावे.

असे ते करत नाहीत किंवा त्यांच्यात हिम्मत नाही म्हणूनच मी मंत्रीसाहेब आपली शोभा करून घेत आहेत असे म्हटले आहे. आणि दररोज माननीय मंत्री आणखीन रुदन करून स्वतःलाच अपमानित करून घेत आहेत.

समजा तुम्ही किंवा मी कुठला कायदा मोडला असता तर ह्याच सरकारने आम्हाला देशोधडीस लावले असते.

---

अवांतर : मोदी सरकारला ठाऊक आहे कि त्यांच्या मोदी ३.० साठी सोशल मीडिया अत्यंत महत्वाची आहे त्यामुळे फेसबुक किंवा ट्विटर देशांत असणे गरजेचे आहे. भारतांत कायद्याचे राज्य नाही आणि योग्य प्रकारचे कायदे नसल्याने कु किंवा इतर कुठलीही देशी कंपनी मेणबत्ती सुद्धा घेऊन उभी राहू शकत नाही.

त्याच वेळी मोदी सरकारला ह्या सर्व सोशल मीडिया कंपन्यांना शिस्तीत ठेवून गरज पडली तर त्यांना ब्लॅकमेल करता येईल असा कायदा पाहिजे. कारण इलेक्शन जवळ आले कि मोदी सरकार जी विविध टूलकिट्स काढेल त्यावर बंदी येणार नाही किंवा प्रतिस्पर्ध्यांच्या कारवाईवर बंदी येईल हे सर्व करायला पाहिजे म्हणून हा कायदा. जनतेचा डेटा वगैरे सर्व थोतांड आहे. ज्यांच्या खिशांत पैसे नाही त्यांचा डेटा काय डोंबलाचा महत्वाचा आहे ? त्याशिवाय भारत सरकारला कधी गरीब जनतेचा पुळका होता ? इथे फिसिकल सुरक्षाच नाही. कोणीही पोलीस आणि तर IAS तुमच्या श्रीमुखांत लाईव्ह भडकावतो आणि काय होते तर फार तर ट्रान्सफर. इथे ह्याच मूर्खांकडुन तारतम्य असलेले कायदे किंवा त्यांचा अंमल अपेक्षित ठेवणेच चुकीचे आहे.

प्रदीप's picture

8 Jun 2021 - 6:40 am | प्रदीप

पोटापाण्यासाठी हाच धंदा मी करत असल्याने ह्यावर अधिकारीक पद्धतीने बोलू शकते तुम्ही जे म्हणता ते बरोबर असले तरी त्याला आणखीन बाजू आहेत. फेसबुक आणि गुगल भारत सरकारपुढे लोटांगण घालतील असे वाटत असले तरी ट्विटर कदाचित घालणार नाही.

ह्याविषयी काही सविस्तर लिहीलेत तर बरे होईल.

आणि हा विषय 'भारत वि चायना' असा कमी आहे आणि 'जॉर्ज फर्नांडिसवाले सरकार वि कोकाकोला' असा जास्त आहे.

नाही. भारत विरुद्ध चीन हा सामना संपला आहे आणि चीन ट्रॉफी घेऊन घरी गेला आहे.

जॉर्ज फर्नांडिस विरुद्ध कोका कोला असेही नाही. मोदी सरकार जुन्या इंदिरा वगैरे प्रमाणे समाजवादी नाही, फक्त मूर्ख आहे. चुकीचा सल्ल्यावर निर्णय घेऊन रविशंकर मोकळे झाले आणि आता हे अवघड जागीचे दुखणे बनले आहे. रविशंकर फक्त गिधाडी धमक्या देत आहेत आणि त्यामुळे त्यांचे स्वतःचे हसे तर होत आहेच पण संपूर्ण देशाची नाचक्की होत आहे !

माझा स्वतःचा पाठिम्बा ट्विटरला आहे.

सहमत चंद्रसूर्यकुमार
जर हा कायदा चुकीचा असेल तर सरकारला जो काही विरोध करायचा तो देशात करायचा. १००%
हेच हेच कित्येकांना कळत नाही ... खास करून अर्बन नऍक्सल
आपण विधवा झालो तरी चालेल पण सवत रंडकी झाली पाहिजे अशी काहीतरी महान आहे ना तसेच
स्वच्छ भारत मिशन केवळ मोदींनी चालू केले म्हणून ते अपयशी व्हावे (जसे काही भारत स्वच्छ झाला तर रस्त्यावरची सगळी घाण यांच्या घरात येऊन पडणार आहे) म्हणून रस्त्यावर टमरेल घेऊन बसतील असे हे लोक आहेत
हाहा पुवा

साहना's picture

10 Jun 2021 - 5:49 am | साहना

> सरकारला जो काही विरोध करायचा तो देशात करायचा.

ह्याचा अर्थ मला तरी समजला नाही. ज्या लोकांना कायदा निरर्थक वाटतो ते येन केन प्रकारें माझ्या प्रमाणे विरोध करतच आहेत. घरांतील पाहुणे आवडत नाहीत म्हणून आपल्याच घराला कोणी आग लावत नाही. पाहुणा जाईल पण घर जाळून जाईल ते आमचेच. त्यामुळे ट्विटर विदेशी आहे म्हणून भारत सरकार आमच्या माथ्यांत दगड घालत असेल तो आम्ही का म्हणून सहन करावा ?

पण ते सोडून द्या, भारत सरकारने कायदा केला, मंत्र्यांनी ट्विटर ला ट्विटर वापरून धमकी दिली, ट्विटर ने भीक घातली नाही, आता मंत्र्यांनी काय करावे असे अपेक्षित आहे ? नाखुन मुदतवाढ करून धमकी २ द्यावी कि खरोखर ट्विटर ला हाकलून द्यावे ? आणि ते द्यायची कुवत नसेल तर त्याचा अर्थ आम्ही काय घ्यावा ? भारत सरकार आणि सदर मंत्री भ्याड आहेत हा ?

सुबोध खरे's picture

10 Jun 2021 - 11:55 am | सुबोध खरे

भारत सरकारने कायदा केला, मंत्र्यांनी ट्विटर ला ट्विटर वापरून धमकी दिली, ट्विटर ने भीक घातली नाही, आता मंत्र्यांनी काय करावे असे अपेक्षित आहे ? नाखुन मुदतवाढ करून धमकी २ द्यावी कि खरोखर ट्विटर ला हाकलून द्यावे ? आणि ते द्यायची कुवत नसेल तर त्याचा अर्थ आम्ही काय घ्यावा ? भारत सरकार आणि सदर मंत्री भ्याड आहेत हा ?

सरकारमधले सगळेच मूर्ख आहेत असा आपण अविर्भाव घेतला आहे ते काही पटत नाही.

तो आपला स्वतःचा विचार आहे.

सरकारने शेंडी तुटो व पारंबी तुटो असा पवित्रा घेतला तर ट्विटरची पळता भुई थोडी होईल.

पाकिस्तान मध्ये घुसून बॉम्ब फेकणे हे जितके धोकादायक होते त्याचा एक शतांश सुद्धा हे नाही.

तेंव्हा आपण जरा आपली मते इतकी टोकाची ठेवू नका.

Twitter meanwhile, is learnt to have approached the Centre seeking more time to comply with the new IT rules. The platform has also agreed to make key appointments in line with statutory requirements.

https://government.economictimes.indiatimes.com/news/policy/twitter-rele...

सुबोध खरे's picture

10 Jun 2021 - 11:56 am | सुबोध खरे

Twitter relents as Facebooks announces Spoorthi Priya as grievance officer for India

"देशात विरोध करायचा" म्हणजे काय हो ? त्यापेक्षा वेगळा विरोध काय असतो ?

रात्रीचे चांदणे's picture

7 Jun 2021 - 6:41 pm | रात्रीचे चांदणे

2018 च्या आसपास विजा आणि मास्टरकार्ड ह्या कंपन्यांनी भारतातली माहिती भारतातच ठेवायला नकार दिला होता. परंतु केंद्र सरकार आणि rbi समोर त्यांचं काहीही चाललं नाही. Twitter ही आढेवेढे घेऊन नवीन कायद्यासमोर मान टाकेल.

तो सर्वच कायदा मूर्खपणाचा होता आणि आहे. काही रियल इस्टेट मंडळींनी लॉबी करून सरकारला हा तद्दन मूर्खपणाचा कायदा काढायला भाग पाडले होते. हि मंडळी कोण आहेत हे तुम्हाला सर्च करून समजेल.

दुसरी गोष्ट म्हणजे व्हिसा, मास्टरकार्ड ह्यांनी जो विरोध केला होता तो बरोबर होता आणि त्यासाठी भारत सरकारने त्यांना पाहिजे ती सूट दिली होती. ह्या कायद्याने कुठल्याही भारतीयाच्या डेटा चे रक्षण तर झाले नाहीच पण विविध सेवा मात्र महाग झाल्या आणि रियल इस्टेट लोकांचा मात्र प्रचंड फायदा. ह्या कायद्याच्या तांत्रिक इम्प्लिमेंटेशन ची माहिती मला आहे कारण मी दररोज ह्या क्षेत्रांत काम करत आहे.

थोडक्यांत सांगायचे झाले तर तुम्ही काही आर्थिक व्यवहार करता त्याचा एक रिकॉर्ड बनतो. हा रिकॉर्ड इतर रिकॉर्ड सोबत तपासायला पाहिजे आणि किमान १०-२० वर्षे ठेवला पाहिजे (फ्रॉड वगैरे डिटेक्ट कारण्यासाठी किंवा कायदे पालनासाठी). जितका काळ जातो तितका हा डेटा कमी महत्वाचा होत जातो. पण पहिल्या काही सेकंदांत ते साधारण ९० दिवस पर्यंत हा अत्यंत महत्वाचा असतो आणि विविध सिस्टम सोबत तो वापरला जातो.

उदाहरण द्यायचे तर तुम्ही आज १०० व्हिटॅमिन च्या गोळ्या विकत घेतल्या आणि २४ तासांत पुन्हा तुम्ही त्याच गोळ्या विकत घेतल्या तर मास्तरकार्ड ह्याला फ्रॉड अलर्ट देईल. तुम्ही मुंबईत काही विकत घेतले आणि पुढील ८ तासांत दिल्लीत सुद्धा काही घेतले तर सुद्धा त्याला फ्रॉड म्हणता येऊ शकते. पुढील ७ दिवसांत तुम्ही जे काही विकत घेता त्यावर मशीन लर्निंग वगैरे करून तुम्ही त्यानंतर काय विकत घ्याल ह्याबद्दल कयास बांधलं जाईल (मी ह्या विषयावर काम करते). पण साधारण एक वर्षभरांत हा डेटा फक्त archive म्हणून ठेवला जाईल. ह्या डेटावर जी क्लिष्ट ऑपरेशन केली जातात त्यासाठी अनेकदा हजारो CPU आणि लक्षावधी मेगा बाईट्स मेमरी वापरून रिसर्च केला जातो त्यामुळे जिथे सर्व्हर्स चालवणे सोपे आहे तिथे डेटा प्रोसेस केला जातो (सध्या अमेरिकेतील ईस्ट कोस्ट आहे).

भारतीय कायद्याने भारतीय लोकांचा डेटा कुठेही पाठवला जाऊ शकतो पण पर्मनन्ट स्टोरेज साठी मात्र ९० दिवसानंतर तो फक्त भारतांतच ठेवला पाहिजे. अर्थांत स्टोरेज साठी भारतात आहे ह्याचा अर्थ इतर देशांतून त्याला ऍक्सेस नाही असे नाही, वाट्टेल तेंव्हा प्रोसेसिंग साठी त कुठेही नेला जाऊ शकतो फक्त स्टोर केला जाऊ शकत नाही. आधी ९० दिवसांचे लिमिट सरकारने ठेवले नव्हते. एकूण सिस्टम्स किती क्लिष्ट असतात ह्याची कल्पना सुद्धा बाबू मंडळींना नव्हती. ९० दिवसांचे लिमिट मिळाल्यानंतर मास्टरकार्ड असो किंवा बॅंक्स कुणालाही फरक पडत नाही. डेटा भारतांत ठेवायचा तर डेटा सेंटर पाहिजे आणि वीज पाहिजे आणि अंतर्राष्ट्रीय बॅण्डविड्थ पाहिजे. ह्या सर्वासाठी गुंतवणूक पाहिजे. हि सर्व सरकारी मित्रांना जाते. डेटा सेंटर साठी भारतांत काय भानगडी कराव्या लागतात ह्यावर मी एक स्वतंत्र लेख लिहू शकते पण ह्या कायद्याने रिअल इस्टेट सोडून कुणाचाच फायदा झाला नाही. उलट भारत एक डेटा डम्पिंग राष्ट्र झाले आहे.

पण इथे पोट भरले तर बकासुर कसला ? भारत सरकार तसेच त्यांचे मित्र ह्यांना लक्षांत आले कि प्रत्यक्षात वैयक्तिक डेटा महत्वाचा नाही. व्यैयक्तिक डेटा वापरून जे ट्रेंड्स आपण शोधतो (जिथे खरा रिसर्च जातो) ते महत्वाचे आहेत. म्हणजे ज्या "मुंबईत महिला सध्या ४८ वर्षांच्या आहेत त्यांना बुधवारी संध्याकाळी पिझ्झा खावासा वाटतो" ह्या प्रकारचे ज्ञान. ट्विटर असो किंवा फेसबुक शेवटी त्यांचा धंदा डेटा मधून ह्या प्रकारचे मॉडेल्स शोधण्यावर आहेत. पण हे मॉडेल्स समजा तुम्ही ह्या कंपन्यांकडून चोरले तर तुम्हाला डेटा चोरण्याची गरज नाही. भारत सरकार आता हे मॉडेल्स चोरण्याचा भानगडीत आहे नि हे मॉडेल्स सरकारी बाबूंना उपलब्ध करून द्यावेत अश्या प्रकारचे कायदे हि मंडळी आणत आहेत अशी ओरड आहे.

फेसबुक किंवा ट्विटर काही धुतल्या तांदळा प्रमाणे स्वछ नसल्या तरी भारतीय सरकार सुद्धा एखाद्या हलकट दरोडेखोरापेक्षा चांगले असे असे समजण्यासाठी काहीही पुरावा नाही.

चौकस२१२'s picture

8 Jun 2021 - 7:50 am | चौकस२१२

रोचक माहिती . साहना,,
- कायदा योग्य किंवा नाही व्यक्तिस्वातंत्र्य या गोष्टी बाजूला ठेवून वरील विषयासंबंधी अधिक तांत्रिक माहिती जरूर द्या.
"राष्ट्रीय ओळख पत्र " आणि त्याचे विविध प्रकार म्हणजे भारतातील आधार कार्ड किंवा अमेरिकेतील सोशल सिक्युरिटी नंबर , सिंगापुर मधील आय दि कार्ड
ऑस्ट्रेलीयत तसा प्रयत्न झालं होता पण जनतेने नाकारले पण तसेही सरकारला येथे इतर गोष्टीतुन डेटा लिंक मुले जनते बद्दल भरपूर माहिती असते ..

अमेरिकन सरकारने धूळफेक करून SSN जनतेच्या माथी मारला. विनोदाची बाब म्हणजे SSN सध्या social security सोडून सगळीकडे कामाला येतो. आज जी मुले जन्मली आहेत त्यातील बहुतेकांच्या नशिबी सोशल सेक्युरिटी असणार नाही कारण हि सिस्टम डबघाईला आली आहे.

बहुतेक पाश्चात्य राष्ट्रांत प्रायव्हसी हाय विषयाला महत्व असते कारण न्याय यंत्रणा काम करते. आपल्या इथे न्याय यंत्रणा खराब असल्याने कायदा काय आहे ह्या पेक्षा सरकार हा कसा मिसयूस करेल ह्यावर जास्त विचार करायला पाहिजे.

मुख्यमंत्र्यांचा कोर्लई येथील घोटाळा लपविण्यासाठी अनिश्चित काळासाठी गावबंदी; किरीट सोमय्या यांचा आरोप....

-------

"Indefinite Village Ban To Cover Up CMs Scam In Korlai Allegation Of Kirit Somaiya | मुख्यमंत्र्यांचा कोर्लई येथील घोटाळा लपविण्यासाठी अनिश्चित काळासाठी गावबंदी; किरीट सोमय्या यांचा आरोप" https://marathi.abplive.com/news/maharashtra/indefinite-village-ban-to-c...
---------

काय बोलावं, ते सुचेना....

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

7 Jun 2021 - 3:17 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आज दिनांक ७ जून २०२१ रोजी, ठीक सायंकाळी ५ मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी देशाला उद्देशून मार्गदर्शन करणार आहेत. तरी सर्वांनी आपापल्या टीव्ही, मोबाईलवर मौलिक विचारांचा लाभ घ्यावा.

मला वाटतं, ब-याच दिवसानंतर ही थेटभेट असल्यामुळे आता काही तरी मोठी घोषणा करतील. निरुपयोगी दिवाबत्तीचा टास्क असणार नाही. जनतेने काय करावे आणि काय करु नये, लशीबद्दल काही नवीन घोषणा किंवा काही नव्या योजना मांडून सरकारप्रती आणि स्वतःची प्रतिमा सुधारण्याचा एक नवा जुमला येण्याची शक्यता वाटते.

-दिलीप बिरुटे

श्रीगुरुजी's picture

7 Jun 2021 - 5:06 pm | श्रीगुरुजी

मोदींना ऐकण्यासाठी मोदीद्वेष्टेच जास्त कासावीस झालेत.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

7 Jun 2021 - 5:25 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मनोरंजन- कार्टून- गाण्यांचे कार्यक्रम, सनातन वाहिन्यांवरील बाबा-बुवांच्या प्रवचनाइतकाच आनंद टीव्हीदर्शन-भाषणामुळे या द्वेष्टयांना होत असावा म्हणून ते उतावीळ होत असावेत असे वाटते.

-दिलीप बिरुटे

श्रीगुरुजी's picture

7 Jun 2021 - 5:33 pm | श्रीगुरुजी

आनंद कसला? आपण जंगजंग पछाडूनही आपल्याला काळं कुत्रं सुद्धा विचारत नाही आणि मोदींची लोकप्रियता मात्र कायम आहे, या वैफल्यातून शिवीगाळ करण्यासाठी ते उतावीळ आहेत. तुमचा ट्विटरमास्टर नेता तर ट्विटर उघडून बसला असेल व मोदींचे भाषण ऐकता ऐकता टीका करणारी ट्विट्स लिहिणे सुरू असेल.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

7 Jun 2021 - 5:48 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

बाकी, फेकाफेकीवर सविस्तर आढावा थोड्या वेळाने घेऊ....!

-दिलीप बिरुटे

श्रीगुरुजी's picture

7 Jun 2021 - 6:23 pm | श्रीगुरुजी

भाषण सुरू व्हायच्या आधीपासूनच मोदींना झोडपणारी तुमची पोस्ट तयार असेलच. ती पोस्ट लगेच टाका.

Good joke.
मोदी ची लोकप्रियता कायम आहे असे it cell लाच फक्त वाटत.
त्यांना पण वाटत नाही पण तसेच लिहा तेव्हा च पैसे मिळतील अशी तंभी च असते.
लोक तर वाट बघत आहेत कधी निवडणुका येतात आणि मोदींची लोकप्रियता काय आहे हे त्यांना दाखवून देतो असे झाले आहे

निरुपयोगी दिवाबत्तीचा टास्क असणार नाही
"नेहमीच येतो मग पावसाळा " या उक्ती प्रमाणे रतीबाचा विरोध

कॉमी's picture

7 Jun 2021 - 5:38 pm | कॉमी

७५% लसी केंद्र स्वतः विकत घेणार हा स्तुत्य निर्णय आहे, आणि टीका मान्य करून सुधार करण्यात आली असे दिसते.

रामदास२९'s picture

7 Jun 2021 - 5:52 pm | रामदास२९

खरच स्तुत्य निर्णय.. राज्यान्ना आर्थिक शक्ति जास्त नसताना हा अधिकार देण चूक होते.. त्यापेक्षा केन्द्राने खरेदी करण चान्गला... नाहितर पन्जाब सरकार सारख होइल..

केरळ, बिहार, तेलंगणा, छत्तीसगड, पंजाब, मध्य प्रदेश मधील मंत्र्यानी सांगितले आहे की डिसेंटरलाइझड लस खरेदी ची मागणी त्यांनी कधीही केली नव्हती.
छत्तीसगडचे आरोग्य मंत्री म्हणतात की पहिल्या दिवसापासून आम्ही केंद्रीय खरेदी (centralised procurement) असावी ह्याच मताचे आहोत. कोणत्या राज्यांनी त्याविरुद्ध मागणी केली का हे माहीत नाही. जरी केली असली तरी केंद्राने त्याकडे दुर्लक्ष करायला हवे होते.

Chhattisgarh health minister TS Singh Deo said that his state had not asked to be allowed to procure vaccines. “We were saying from day 1 that there should be only one agency, the GoI, to purchase the vaccines. I don’t know any other state that wanted to buy on its own,” he said, adding that even if a state had requested for it, the Centre should not have blindly followed such advice.

नीती आयोगाने "राज्यांनी विनंती केल्यामुळे" हा निर्णय घेण्यात आला असे म्हणल्यावर ह्या प्रतिक्रिया आल्या आहेत.
https://www.google.com/amp/s/m.economictimes.com/news/india/states-deny-...

आग्या१९९०'s picture

7 Jun 2021 - 6:03 pm | आग्या१९९०

केरळ, बिहार, तेलंगणा, छत्तीसगड, पंजाब, मध्य प्रदेश मधील मंत्र्यानी सांगितले आहे की डिसेंटरलाइझड लस खरेदी ची मागणी त्यांनी कधीही केली नव्हती.
लसींचा तुडवड्याला केंद्राचा हलगर्जीपणा होता. अंगाशी आल्यावर राज्यांवर जबाबदारी ढकलली. असं तत्परतेने हक्काचा gst राज्यांनी मागितला तेव्हा दिला नाही,म्हणे राज्यांनी मागणी केली.

कॉमी's picture

7 Jun 2021 - 6:06 pm | कॉमी

अगदी अगदी.

रात्रीचे चांदणे's picture

7 Jun 2021 - 6:15 pm | रात्रीचे चांदणे

महाराष्ट्र, पंजाब दिल्ली आणि उत्तरप्रदेश सरकार ने लसी विकत घेण्यासाठी टेंडर काढली होती. हा decentralisation चा प्रकार नव्हता का?

कॉमी's picture

7 Jun 2021 - 6:26 pm | कॉमी

ते माझ्यामते केंद्राच्या निर्णयानंतर झाले ना ? त्याआधी कोणी मागणी केलेली काय ?

एकदा निर्णय झाल्यावर टेंडर भरण्याशिवाय पर्यायच नाही. नाहीतर टाळमटाळ केली असे वाटले असते.

आग्या१९९०'s picture

7 Jun 2021 - 6:33 pm | आग्या१९९०

राज्यांनी जागतीक टेंडर भरल्यावर लस उत्पादकांनी फक्त भारत सरकारशी बोलू, राज्यांशी नाही अशी भूमिका घेतल्याने केंद्र अडचणीत आले होते. राज्यांना अडकवला गेले आणि तोंडघशी पडले.

आणि केली असल्यास त्याकडे दुर्लक्ष करायला हव होतं.

प्रदीप's picture

7 Jun 2021 - 9:30 pm | प्रदीप

इथे पहा....

.

आणि हेच सद्गृहस्थ आता हे म्हणत होते...

.

राहुल गांधीचे म्हणणे ऐकून मोदींनी लस खरेदी राज्यांकडे काही प्रमाणात सोपवली असे म्हणणे नसेल तर याचा पॉईंट काय समजला नाही. राहुल गांधीला "Greater say" म्हणजे खरेदी करण्याची जबाबदारी असे म्हणायचे असल्यास त्याचे तेव्हाचे मत चुकीचेच होते.

आणि तो काय म्हणाला यापेक्षा राज्यांमधले मंत्री (काँग्रेस वा इतर वा भाजपशासित) काय म्हणतात हे अधिक महत्त्वाचे नाही काय ?

राहुल गांधी नीती आयोगाने म्हणल्याप्रमाणे कोणत्याही राज्य सरकारशी संबंधित नाही आहे.

सुक्या's picture

7 Jun 2021 - 9:53 pm | सुक्या

लय भारी . .
वकील म्हणुन नाव काढाल ...

कॉमी's picture

7 Jun 2021 - 9:55 pm | कॉमी

धन्यवाद.

प्रदीप's picture

7 Jun 2021 - 9:39 pm | प्रदीप

मला तुमचा हा कॅव्हिट आवडला, हां !

कॉमी's picture

7 Jun 2021 - 9:54 pm | कॉमी

हा caveat आहे, पण त्यात चुकीचे काय ? मी व्यक्तिष: सुरुवातीपासूनच केंद्राने जास्तीत जास्त खरेदी करावी मताचाच होतो. त्यामुळे अर्थातच त्याविरुद्ध मत मांडले असल्यास केंद्राने त्याकडे दुर्लक्ष करावे असेच मी म्हणीन !

राज ठाकरेंनी सर्वात पहिला केंद्राला पत्र लिहून राज्यांना औषध आणि ऑक्सिजन इत्यादी थेट विकत घेण्याचा हक्क मागितला होता तेव्हापासून मी त्याला आतार्किकच म्हणले आहे. प्रतिसाद सापडला नाही चटकन, नाहीतर दुवा दिला असता.

सुक्या's picture

7 Jun 2021 - 10:11 pm | सुक्या

ही राज्ये नसतील कदाचित .. परंतु जालावर सहज शोध घेतला तर बर्‍याच ठिकाणी या मागणीच्या लिन्का सापदल्या ..

उदा.
https://www.livemint.com/news/india/states-wanted-removal-of-restriction...

https://www.business-standard.com/article/current-affairs/centre-clears-...

आपल्या राज्याचे कोविड्वोलोजिस्ट मुख्यमंत्री "आमच्याकडे पैसा आहे ... एकरकमी पैसे भरायला तयार आहे" वगेरे वगेरे बाता मारत होते ..

मिंट मध्ये जी यादी दिली आहे ती राज्ये फ्री लसीकरण करणार आहेत त्यांची.
५०%-राज्य आणि प्रायव्हेट हा निर्णय झाला १९ एप्रिलला. यादीतल्या सर्वांच्या घोषणा पाहणे जमले नाही, पण केरळ आणि महाराष्ट्राची पाहिली असता अनुक्रमे २१ आणि २८ एप्रिल ला, म्हणजे धोरण घोषित झाल्या नंतर आहे. धोरण जाहीर झाल्यावर फ्री लसीकरणाची घोषणा करणे म्हणजे आम्ही ज्या थेट लसी मिळवू, त्या मोफत देऊ असा होतो. त्याचा लसी केंद्रांनी घ्याव्यात कि राज्यांनी घ्याव्यात या मतावर काही फरक पडत नाही. आणि, ५०%च लसी केंद्र घेणार म्हल्यावर आपापल्या क्षमतेनुसार लसी खरेदी करणे हे राज्यांना क्रमप्राप्त ठरले होते ,नाहीतर त्यांच्या नागरिकांचे नुकसान झाले असते. कारण सरळच कि आधीपेक्षा कमी लसी केंद्राकडून पुरवल्या जातील.मग, ज्या घेतल्या स्वतंत्र पणे घेतल्या जातील त्याही लसी लोकांना विनामूल्य दिल्या जातील असा त्या घोषणांचा अर्थ होतो.

त्यामुळे ह्या राज्यांनी स्वतंत्र लस खरेदीची मागणी केली होती असा नक्की निष्कर्ष काढता येत नाही. केरळ आणि मध्य प्रदेश या राज्यांनी सुद्धा फ्री लसीकरण घोषित केले म्हणून यादीत नाव आहे, पण त्यांच्या मंत्र्यानी स्पष्टपणे संगीतले आहेच की आम्ही केंद्राकडे अशी कोणतीही मागणी केली नव्हती.

त्यामुळे नक्की कोणत्या आणि किती राज्यांनी अशी मागणी केली होती ते अस्पष्टच आहे.

हि गोष्ट मोदी समर्थक सुद्धा मान्य करतील. दुसरी वेव्ह येणार नाही म्हटल्यावर कशाला उगाच खर्च म्हणून केंद्र सरकारने लसी घेतल्या नाहीत आणि प्रकरण अंगाशी येताच राज्य सरकारांना जबाबारदार धरले.

अगदी २ आठवडे मागे "health is a state subject" म्हणून ओरड करणारे चाटुकार मंडळी आज प्रधान सेवकांच्या थोर आणि ऐतिहासिक निर्णयाचे ढोल बडवत आहेत.

कॉमी's picture

7 Jun 2021 - 7:09 pm | कॉमी

मधल्या काळात एकूण सरकारी मशिनरी (राज्य+केंद्र) यांचा किती अतिरिक्त पैसा खर्च झाला, राज्य सरकारच्या खरेदी प्रक्रियेत किती जास्तीचा वेळ लागला, याची माहिती मिळायला हवी.

आग्या१९९०'s picture

7 Jun 2021 - 5:48 pm | आग्या१९९०

सर्वोच्च न्यायालयाने suo moto दाखल करून घेऊन, लासिकरणावरून केंद्राकडून स्पष्टीकरण मागितले. राज्य आणि केंद्राच्या लसी खरेदीच्या किमतीत तफावत का? आणि केंद्रच सर्व लसी खरेदी करून राज्यांना का देत नाही? ह्या दोन प्रश्नांमुळे केंद्र अडचणीत आले. ३० जूनला सुनावणी असल्याने त्यापूर्वीच सारवासारव करून पांढरे निशाण फडकावले. हा सोशल मीडियाचा विजय आहे. ९०० रुपयात खासगीमध्ये मिळणारी लस आता १५० रुपयात मिळणार. लुटमार नही चलेगी.

रामदास२९'s picture

7 Jun 2021 - 5:54 pm | रामदास२९

लुटमार नही चलेगी

खाजगी रुग्णालयान्ची ..
..
आणि लस जास्त उपलब्ध होइल

रात्रीचे चांदणे's picture

7 Jun 2021 - 6:11 pm | रात्रीचे चांदणे

ह्यात लूटमार कसली? अत्ता प्रत्येक डोस माघे जर फक्त 150 रुपये मिळणार असतील तर खासगी हॉस्पिटल्स लसी विकत घेतील का?

रामदास२९'s picture

7 Jun 2021 - 6:16 pm | रामदास२९

केन्द्राच्या खरेदी किमतीपेक्षा १५० रुपये जास्त... जर त्यान्चे खर्च भागत असतील तर का नाही घेणार??
आणि आधी घेतच होते कि...

SC ने सांगितल्यामुळे केले अशी आपत्ती ओढवण्याऐवजी आमचेआम्हीच केले, अशी स्ट्रॅटेजी दिसतेय.

आग्या१९९०'s picture

7 Jun 2021 - 6:28 pm | आग्या१९९०

हो, केंद्र सरकार गोंधळते हे वेळोवेळी सिद्ध झाले आहे. फार विचार न करता निर्णय घेते. नोटाबंदी,gst आणि आता लसीकरण.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

7 Jun 2021 - 7:13 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सहमत....!

-दिलीप बिरुटे

आग्या१९९०'s picture

7 Jun 2021 - 5:58 pm | आग्या१९९०

लसीकरण सर्टिफिकेटवर पंतप्रधानांचा फोटो छापणार नाही असे ममता बॅनर्जी म्हणाल्या होत्या. इतके मोठे नुकसान टाळण्यासाठी यू टर्न घेतला गेला.

श्रीगुरुजी's picture

7 Jun 2021 - 8:28 pm | श्रीगुरुजी

छत्तीसगडच्या बघेलने पण स्वतःचा फोटो छापलाय.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

7 Jun 2021 - 7:10 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

तर मंडळी, टीव्हीवर मुरारीबापूचं प्रवचन ऐकत होतो. च्यायनल बदललं आणि आदरणीय पंतप्रधान यांचं देशाला संबोधन सुरु झालेलं दिसलं. आपल्याला काय ऐकण्याशी मतलब. तर, इकडच्या तिकडच्या जगभरातल्या गावगोष्टी करुन मला वाटलं भाषणातलं मुळ मुद्दा येतो की नाही, असे क्षणभर वाटले. 'लसमहोत्सवाची' घोषणा झाल्याचे आपणास आठवतच असेल तर तो उत्सव काही झाला नाही. लशीच नव्हत्या तर तो उत्सव होणे शक्यच नव्हते. पंचेचाळीस वर्ष वयाच्या लोकांची प्रचंड ओढातान आणि हाल आपण अनेकांनी अनुभवले होते. आता पुढील भाग महत्वाचा आजच्या संवादात होता तो म्हणजे १८ वर्ष वयावरील नागरिकांची जवाबदारी सरकारने एकदाची घेतली. पूर्वी ही जवाबदारी राज्यांवर दिलेली होती. आता २१ जूनपासून नियोजन करुन लसीकरणास सुरुवात करण्यात येईल असे सांगितले. एवढेच आजच्या संबोधनाचं महात्म्य होतं. बाकी, आता भाषणंच इतकी वरच्यावर येत असतात की त्याचं काही महत्व उरलेलं नाही. कंटाळवाणी भाषणं असतात. एक प्रेस नोट दिली असती तरी चाललं असतं. पण जनतेला आपला विसर पडू नये म्हणून अशा गप्पा आवश्यक असतात.

पहिल्या प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे जनतेची मनधरणी आणि जनतेला खुश करण्यासाठी जे काही योजना आणता येतील ( पूर्ण होऊ की न होऊ) ते ते यापुढे केंद्रसरकारला आणावे लागतील. मला वाटतं, आपलं अपयश झाकण्यासाठी, प्रतिमा सुधारण्यासाठी असे नवनवे फॉर्म्युले यापुढे येत राहतील. बाकी, लस आपण तयार केली, उत्पादन केले वगैरे हे ऐकून डोळे भरुन आले. सर्व तरुण मित्रांनी रांगेत लस घ्यावी, गोंधळ करु नये. मास्क, सॅनिटाइजरचा वापर करावा. आपण आपली आणि कुटुंबाची काळजी घ्यावी. जय हिंद जय महाराष्ट्र.

-दिलीप बिरुटे

आग्या१९९०'s picture

7 Jun 2021 - 7:35 pm | आग्या१९९०

रडायची सवय काहीही केल्या जात नाही. मागील ६० वर्षाचे रडगाणे गायले. फक्त ६०% लसीकरण २०१४ पूर्वी झाले , कुठल्या लसिकरणाबद्दल बोलत होते? आणि भारतात कोविडवर बनलेल्या कोणत्या दोन लसी?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

7 Jun 2021 - 8:11 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>>भारतात कोविडवर बनलेल्या कोणत्या दोन लसी?

मला असं वाटतं. बांगलादेशाच्या स्वातंत्र्यलढ्याच्यासाठी जेव्हा असहकाराचं आंदोलन भारतात सुरु होतं. तेव्हाच कोवीशील्डची साथरोग नियंत्रण-प्रतिबंधात्मक उपायावर प्रास्ताविक तयार होतं, हस्तलिखिते उपलब्ध झाली की इथे टाकतो. ;)

-दिलीप बिरुटे

नावातकायआहे's picture

7 Jun 2021 - 8:25 pm | नावातकायआहे

ऑ??

श्रीगुरुजी's picture

7 Jun 2021 - 7:55 pm | श्रीगुरुजी

मोदींच्या भाषणानंतर द्वेष्टे नेहमीसारखेच चेकाळले आहेत. मोदी कसे चुकत होते व केवळ आम्ही सांगितल्यामुळे ते चुका सुधारत आहेत, हे सांगण्याची स्पर्धा सुरू झाली आहे. हे पाहून मोदी गालातल्या गालात हसत असतील. लांबवर दगड फेकायचा आणि ते पाहून काहीतरी खायचा पदार्थ असणार या समजुतीत तो सगळ्यांंच्या आधी आपण हस्तगत करावा म्हणून कुत्र्यांची झुंड त्या दिशेने पळत सुटते. मोदींच्या भाषणानंतर किंवा एखाद्या घोषणेनंतर तसंच होत आलंय आणि होत राहील.

कॉमी's picture

7 Jun 2021 - 8:00 pm | कॉमी

हाहा

आग्या१९९०'s picture

7 Jun 2021 - 8:51 pm | आग्या१९९०

लांबवर दगड "फेकायचा"
घोडा मैदान जवळ आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या समोर असे फेकून चालतं का बघू.

श्रीगुरुजी's picture

7 Jun 2021 - 9:28 pm | श्रीगुरुजी

बघा काय होतंय ते. तोपर्यंत सर्वोच्च न्यायालयाचा खुळखुळा खेळत बसा.

सॅगी's picture

7 Jun 2021 - 8:02 pm | सॅगी

आता काँग्रेसचे युवराज हसर्‍या चेहर्‍याने काय पॉझीटीव्ह ट्वीट करतात याकडे समस्त द्वेष्ट्यांचे लक्ष लागले असेल...तसेही वर काहींना पंतप्रधानांचे भाषण रडवे वाटले म्हणे :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

7 Jun 2021 - 10:54 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Manjool
व्यंगचित्र सौजन्य : MANJUL@MANJULtoons ट्वीटरवरुन साभार.

-दिलीप बिरुटे

कॉमी's picture

7 Jun 2021 - 11:04 pm | कॉमी

या मंजुल वर कारवाई करावी असे "भारतीय law enforcement agency"नी ट्विटर ला सांगितले आहे.
https://m.thewire.in/article/rights/centre-asks-twitter-to-take-action-a...

आग्या१९९०'s picture

7 Jun 2021 - 11:14 pm | आग्या१९९०

मंजुल कारवाई टाळू शकतो. ह्या व्यंगचित्रात टेबलाखाली जोडीला नेहरूपण दाखवायचे.

आपल्या थोर राष्ट्राच्या सार्वभौमतेला अश्या प्रकारे खाजगी आणि वैयक्तिक टीका करून मंजुळ ह्यांनी बट्टा लावला आहे. चीन पाकिस्तान अमेरिका आणि सौदी अरेबिया सर्वाकडून ह्यांनी पैसे घेतले असावेत. त्यामुळे अफवा पसरवण्याच्या कायद्याखाली किंवा राष्ट्रद्रोहाचा कायद्याखाली देशांतील सर्वांत दुर्गम असा भाग आहे तिथे ह्यांच्या विरोधांत फौजदारी गुन्हा दाखल केला पाहिजे. त्याशिवाय गुगल, ट्विटर इत्यादींनी ह्याला ban केले पाहिजे आणि ह्याचे सर्व OTP एका तासानेच डिलिवर होतील अशी शिक्षा द्यायला पाहिजे. म्हणजे कळेल कि विश्वगुरू राष्ट्राच्या प्रखर राष्ट्राभिमानी राजयोगीची खिल्ली उडवणे का चुकीचे आहे.

बिरुटे ह्यांनी शेअर करून ते सुद्धा ह्या गुन्ह्यात accomplice आहेत, त्यांना सुद्धा शिक्षा झाली पाहिजे. त्यांना प्रकाश जावडेकर ह्यांची मुलाखत १० वेळा पाहण्याची शिक्षा द्यावी.

ज्या मिपाकरांनी हे कार्टून पहिले आहे त्यांनी डोळे फिनाईल घालून धुवावेत.

लिओ's picture

7 Jun 2021 - 11:56 pm | लिओ

२०१४ पासुन इतिहास बदलत आहे.

२०१४ पुर्वी जर फक्त ६० % लसीकरण भारतात होत होते आणि २०१४ ते २०२१ या कालावधीत भारतातील लसीकरण हे ९०% च्या वर गेले आहे.

कदाचित हे बरोबर असेलच

जर २०१४ पुर्वी भारतात लसीकरण हे फक्त ६० % पर्यंत होत होते तर.............

२०१४ पर्यंत नुसत्या पोलिओच्या लसीकरणाचा दर सुध्दा १००% हा नक्कीच असु शकणार नाही. जर पोलिओच्या लसीकरणाचा दर ९०% पेक्षा कमी असेल तर २०१४ पर्यंत भारतात पोलिओ किती विदारक असता याची कल्पना करु शकाल काय ?

या दाव्यानुसार एखाद्याला अफ्रिकेत जाण्याआधी यलो फिव्हर ची लस घेण्यासाठी कित्येक दिवस ताटकळत बसावे लागेल.

इतिहास बदलणार काय ?

बंडाची  तयारी

हे भाजपा उ. प्र. च्या ट्वीटर वरील बदलेले चित्र पं प्र मोदींशिवाय,,,,

यावर वाद होऊ लागला म्हणुन पुन्हा ट्वीटरवर लावलेले चित्र
JuNe

सांगण्याचा उद्देश "मल्टि टास्कींग " ला तयार रहा.....

श्रीगुरुजी's picture

8 Jun 2021 - 12:01 am | श्रीगुरुजी

https://www.lokmat.com/mumbai/arrey-handed-over-286-hectare-land-forest-...

आरेची जागा वनविभागाला दिली. हा निर्णय आवडला.

निवडणुक आचारसंहिता सुरू असतानाही एका रात्रीत २६०० वृक्षांची कत्तल करणाऱ्या फडणवीसांची अत्यंत चीड आली होती. निदान आता त्या जागेतच पुन्हा वृक्षलागवड व्हावी.

कॉमी's picture

8 Jun 2021 - 9:32 am | कॉमी

काही दिवसांपासून ट्रम्पतात्या आपल्या मित्रांना "मी ऑगस्ट मध्ये पुन्हा सत्तेवर येईन, जेव्हा ballot लेखापरीक्षण अहवाल येईल." असे सांगतो आहे असे चर्चेत आहे.

एका फंडरेसिंग मध्ये तात्या म्हणाला- "रिपब्लिकन पक्ष सिनेट घेणार , व्हाइट हाऊस घेणार,आणि तुम्हाला वाटते त्याच्या आधी हे होणार."
किती स्वप्नरंजन करावे माणसाने ! रिपब्लिकन पक्षाने या व्यक्तीला स्वतःपासून दूर करण्याचे प्रयत्न केले पाहिजेत नाहीतर अवघड आहे, रिपब्लिकन पक्षासाठीच !

ट्रम्प तात्या सध्या हिमेश रेशमिया लेव्हल वर पोचले आहेत. इतका मिस्प्लेंस्ड सेन्स ऑफ इगो आहे कि त्यांच्या भोवतालची मंडळी ह्यांचा पोपट करत आहेत. हिमेश ने काही हिट गाणी देऊन खूप पैसे केले मग त्याच्याच मित्रांनी त्याला हिरो बनण्याचा सल्ला दिला आणि सर्वानी मिळून व्यवस्थित लुबाडले. आज सुद्धा बिचारा कर्जझझ्झ हिट झाला आहे आणि पोरी आपल्यावर मरतात ह्या गैरसमजूतीत जगतो.

कॉमी's picture

8 Jun 2021 - 11:21 pm | कॉमी

एकदम चपखल तुलना !

आज सुद्धा बिचारा कर्जझझ्झ हिट झाला आहे आणि पोरी आपल्यावर मरतात ह्या गैरसमजूतीत जगतो.

😂

नावातकायआहे's picture

8 Jun 2021 - 2:04 pm | नावातकायआहे

सत्तेत एकत्र नसलो तरी नाते तुटले नाही... :-)

सॅगी's picture

8 Jun 2021 - 2:22 pm | सॅगी

अहो कसे तुटणार? टिकवण्याखेरीज दुसरा पर्याय आहे तरी का?
"किंबहूना""माझे राज्य, केंद्राची जबाबदारी" अभियान राबवायचे असेल तर असे करावेच लागणार :)

त्याचा पहिला शोध घ्या.

चंद्रसूर्यकुमार's picture

8 Jun 2021 - 4:18 pm | चंद्रसूर्यकुमार

केंद्र सरकार अस्तित्वात आहे का

एक तांत्रिक प्रश्न. केंद्र सरकार अस्तित्वात नसेल तर शेतकर्‍यांना देशोधडीला लावणारे कायदे केले, कोरोना परिस्थिती व्यवस्थित हाताळली नाही वगैरे दिवसरात्र कोणाविरूध्द ठणाणा चालू असतो?

नावातकायआहे's picture

8 Jun 2021 - 4:26 pm | नावातकायआहे

माहित नाही.
असावे बहुतेक!

ते मोदी का कुणितरी निवडुन दिलेले पं.प्र. आहेत म्हणे.
असोत बापडे!

श्रीगुरुजी's picture

8 Jun 2021 - 5:06 pm | श्रीगुरुजी

केंद्र सरकार अस्तित्वात नसल्याने आज जगातील सर्वोत्तम मुख्यमंत्री शिष्टमंडळ घेऊन संयुक्त राष्ट्रसंघाच्या सरचिटणीसांच्या भेटीस गेले होते.

लाखो मजूर लोक चालत त्यांच्या गावी गेली .अंतर पण कमी नाही 1500 km पेक्षा जास्त.
योगी साहेबांच्या राज्यातील लोक पण चालत शहरा मधून गावी येत होते.सरकार नावाचे कुठेच अस्तित्व नव्हते.पोलिस राज चालू आहे असेच वाटत होते .
तेव्हा पासून भारताला केंद्र सरकार आहे का हा प्रश्न नेहमी पडतो.

श्रीगुरुजी's picture

8 Jun 2021 - 7:34 pm | श्रीगुरुजी

मग या प्रश्नाचे उत्तर काय आहे?

इंडियन एक्सप्रेसच्या एका अहवालानुसार दिसून आले आहे की कालच्या धोरणात्मक बदलाआधी जो कोटा खाजगी रुग्णालयांना होता, त्यातल्या ५०%+ जास्त लसी फक्त ९ खाजगी रुग्णालय साखळ्यांनी उचलल्या आहेत (फोर्टिस, रिलायन्स इत्यादी.). ह्या साखळ्या मेट्रो शहर आणि इतर मोठ्या शहारांमध्येच काम करतात.

उरलेल्या लसी ३००+ ऑड रुग्णालयांची घेतल्या असून त्यातलेही बरेचशे रुग्णालय शहरांमध्येच आहेत.

यावरून असे दिसते की जो खाजगी रुग्णालयांसाठी कोटा असतो तो बेसिकली शहरांसाठी असतो, ग्रामीण भागाचा त्यातील सहभाग नगण्य असतो.

https://indianexpress.com/article/india/covid-vaccine-doses-private-hosp...

रात्रीचे चांदणे's picture

8 Jun 2021 - 6:05 pm | रात्रीचे चांदणे

ग्रामीण भागात अजूनही 45 पेक्षा कमी वय असणाऱ्यांना लस मिळत नाही.

कॉमी's picture

8 Jun 2021 - 8:02 pm | कॉमी

शहरात सुद्धा १८-४४ स्लॉट मिळत नाहीये.

श्रीगुरुजी's picture

8 Jun 2021 - 7:47 pm | श्रीगुरुजी

चिनी विषाणूमुळे भारतात आजपर्यंत ३,५१,००० हून अधिक नागरिकांचा मृत्यु झाला आहे, त्यात महाराष्ट्रातील १ लाखाहून अधिक नागरिकांचा समावेश आहे. ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे.

कॉमी's picture

8 Jun 2021 - 9:41 pm | कॉमी
प्रदीप's picture

9 Jun 2021 - 9:48 am | प्रदीप

हे असले काहीबाही सर्वच बाजूंनी येथे टाकता येते. तुमच्याकडून ही अपे़क्षा नाही.

असली साधार/ निराधार चित्रे व मीम्स वगैरे इथे आपण टाकत बसलो, तर त्याला अंत नाही. तेव्हा, कृपया हे तुम्हीतरी टाळा.

कॉमी's picture

9 Jun 2021 - 11:57 am | कॉमी

असले काहीबाही इथे टाकले जात असतेच कि. काही बोलले कि सामना वाचतात, त्याचा "योग्य वापर" करून मग वाचतात इत्यादी प्रतिक्रिया इथे आल्या आहेत. त्यामुळे मी काही आधीच खूप वर असलेला बार खाली आणतोय असे मला वाटले नाही.

असो, नोटेड. पुढे होणे नाही.

समाधान राऊत's picture

8 Jun 2021 - 9:56 pm | समाधान राऊत

आजची भेट म्हणजे दिदींच्या जळजळीमुळे घेतलेली आत्म सांत्वना दुसरे काय !!

कॉमी's picture

8 Jun 2021 - 10:20 pm | कॉमी

१)केरळ मधील भाजपा अध्यक्षावर (सुरेंद्रन) बसपाच्या उमेदवारास निवडणुकीतून माघार घेण्यासाठी २.५ लाख रुपयांची लाच दिल्याचा आरोप झाला आहे. सुरेंद्रन ह्यांच्याविरुद्ध तक्रार सुरेंद्रन यांच्या विरुद्ध उभारणारे कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार रामेसन यांनी केली आहे. आरोप सुरेंद्रन यांनी अमान्य केला आहे.

२)तसेच, याच सुरेंद्रन व्यक्तीवर JRS पक्षाला NDA कडून निवडणूक लढवण्यासाठी १० लाख रुपयांची लाच JRS च्या अध्यक्षा जानु यांना दिल्याचा आरोप झाला आहे. आधी जानु यांनी १० करोड मागितले होते असे सुद्धा आरोपात आहे. हा आरोप jrs च्या खजिनदार व्यक्तीने केला आहे, आणि आरोपाचे समर्थन करणारी ध्वनिमुद्रिका सुद्धा आहे असे बातमीत म्हणले आहे. ह्या आरोपाला सुद्धा सुरेंद्रन यांनी धुडकावले आहे.

३) एका हायवे दरोड्यात २५ लाख रुपये चोरीला गेले म्हणून एका RSS सभासद व्यक्तीने तक्रार नोंदवली. त्या चोरीचा मग घेतल्यावर जास्त, म्हणजे ३.५ करोड रुपये सापडले. त्यामुळे काळा पैसा निवडणुकी साठी वापरला गेला आणि हवाला अश्या दोन शक्यता केरळ पोलीस तपासत आहेत.

केरळ भाजपामध्ये अंतर्गत दुही माजली आहे असे सुद्धा एक्सप्रेस लेखात बर्याच नेत्यांनी निनावी पणे कबूल केले आहे. या घटनेचा तपास करण्यासाठी भाजपने निवृत्त आणि भाजपाशी संबंधित IAS अधिकाऱ्यांचे पॅनल बनवले आहे.

पूर्व राज्य भाजप अध्यक्ष पद्मनाभन म्हणतात-

Senior leader and former party state president C K Padmanabhan said that everyone has to pay a price for their act. “That is nature’s law,” he said. “Nature as well as politics has become dirty — that’s all I want to say on World Environment Day.”
कॉमी's picture

8 Jun 2021 - 10:24 pm | कॉमी

एका "वरिष्ठ भाजप नेत्याने" निनावी राहण्याच्या अटीवर असे कबूल केले की हायवे दरोड्याचे प्रकरण पक्षातल्याच एका फळीने घडवून आणले होते. जर पक्ष एकत्र असता तर हे उघडकीस आलेच नसते !

“The highway robbery case would not have come out had the party been united. It got exposed only because of factionalism,” the leader said, adding that the ‘robbery’, which some alleged as stage-managed, got reported to the police only because the rival faction “realised” the funds did not reach them or their candidates. “Now it has become a major embarrassment for the BJP and the RSS, because RSS leaders’ names are also dragged into it,” the leader pointed out.

श्रीगुरुजी's picture

8 Jun 2021 - 10:28 pm | श्रीगुरुजी

ज्या राज्यात एकाही भाजप उमेदवाराला अनामत रक्कम वाचविण्याएवढी मते सुद्धा मिळणे अवघड आहे, त्या राज्यात पैसे वाटून भाजप उमेदवार कशासाठी पैसे वाया घालवितील?

आग्या१९९०'s picture

8 Jun 2021 - 10:30 pm | आग्या१९९०

म्हणजे इतर ठिकाणी पैसे वाटतात मतांसाठी.

कॉमी's picture

8 Jun 2021 - 10:43 pm | कॉमी

निनावी वक्तव्य करणाऱ्या मंत्र्यांना माहित.
बघायचं, तपासात काय येतंय का पुढे.

श्रीगुरुजी's picture

8 Jun 2021 - 10:49 pm | श्रीगुरुजी

१० कोटी मागितले पण शेवटी १० लाख दिले, हा आरोप वाचून हसू आवरले नाही. हे सर्व आरोप अत्यंत हास्यास्पद वाटतात.

कॉमी's picture

8 Jun 2021 - 11:00 pm | कॉमी

हसू येणे आणि हास्यास्पद वाटणे - काहीच हरकत नाही. भाजपाने स्वतः हे आरोप गंभीरपणे घेतले आहेत.

आणि हास्यास्पद गोष्टी कधीकधी घडत असतात. त्या १० लाख रुपयांची एक ऑडियो टेप पण आहे असा आरोप आहे, हे विसरून चालणार नाही. (एक्सप्रेस लेखात आतमध्ये दुवा आहे, तो देतो-
https://indianexpress.com/article/india/new-headache-for-kerala-bjp-audi...)

श्रीगुरुजी's picture

8 Jun 2021 - 11:49 pm | श्रीगुरुजी

असल्या ऑडिओ टेप्सला तसा काही अर्थ नसतो. बघूया काय होतंय ते.

कॉमी's picture

8 Jun 2021 - 11:54 pm | कॉमी

http://toi.in/RixAzY26

आग्र्याच्या एका खाजगी रुग्णालयातून एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यात इस्पिटलाचा मालक म्हणत आहे की "एक मॉक ऑक्सिजन ड्रिल करूया, कोणते पेशंट ऑक्सिजन नसले तर मरतील हे कळेल"

या मालकावर वर आता २२ रुग्णांच्या मृत्यूला जबाबदार असल्याचा आरोप होत आहे. (कारण तो म्हणतो- मॉक ड्रिल के बाद २२ छट गये) त्या आरोपात तथ्य नाही असे समोर आले तरी रुग्णाला असे तडफडवणे हे मानवतेला काळिमा फासणारे कृत्यच आहे.

नर्स ने भरलेल्या सिरींज कचऱ्यात टाकल्या आणि ती नर्स मुसलमान होती म्हणून कान टवकारून आणि घसा फाडून ओरडणाऱ्या लोकांना यात व्यक्तीचा धर्म पहावा वाटणार नाही अशी शंका आहे. बघूया, काय म्हणतात द्वेष्टे मंडळी.

https://youtu.be/Z0TLArCJdhA

नावातकायआहे's picture

9 Jun 2021 - 12:42 pm | नावातकायआहे

दोन्ही प्रकार वाईट च. पण सोइस्कर गल्लत केली आहे.

हे वाचा

“Since everyone had been saying that oxygen must be used judiciously we decided to adjust levels to see if we could use less. We identified 22 patients who required high flow oxygen. We had sleepless nights over oxygen supply and this was our experiment to stabilise supply. We did not cut off oxygen as is being said everywhere. There is no irreversible impact of lowering oxygen supply,”

आणि हे ही वाचा.

“We get to hear rumours like vaccines sterilise people or that it’s Modi’s ploy to control the Muslim population,” he said, however, adding that “educated Muslims have come forward and got vaccinated”.

धर्मामधे हराम असे कुणाचेतरी कुठेतरी वाचुन लसी कचरा कुंडीत फेकणे ह्याचे समर्थन कसे करणार?
नर्स शिक्षित नव्हती काय का तिला लसीचे महत्व कळाले नव्हते?

धर्मामधे हराम असे कुणाचेतरी कुठेतरी वाचुन लसी कचरा कुंडीत फेकणे ह्याचे समर्थन कसे करणार?

कशावरून निष्कर्ष काढला ? जसे तो डॉक्टर म्हणतो मी काही केले नाही, तसे ती नर्स सुद्धा फार्मसी मालक मुद्दामून मी मुस्लिम असल्याने मला टार्गेट करतोय असे म्हणत आहे. धर्मामध्ये हराम हे वाचून केलं हा निष्कर्ष काय आधारावर? मुळात त्या नर्सने सुद्धा असे काही करणे अमान्य केले आहे..

असं काहीही आगापिछा नसताना कोणालाही जिहादी म्हणणे हे चूक आहे. हाच मुद्दा मला वरील बातमी देऊन दाखवायचा होता. जसे तो डॉक्टर काय म्हणतो हे पाहण्याची कर्टसी दिली तशी त्या नर्सला पण दिली जावी, हाच मुद्दा मला मांडायचा होता.

त्या मॉक ड्रिल मुळे कोणी दगावले नाही ही चांगली बातमी आहे.

नावातकायआहे's picture

9 Jun 2021 - 3:24 pm | नावातकायआहे

संधी नक्कीच दिली जाइल. पण ह्याच ताईंनी २५ मे ला कबुली जवाब दिला आहे.
अचानक जवाब बदल व धर्माचा संबंध कुठुन आला?
त्यांची फार्मावाल्या बरोबर काय खुन्नस होती जि त्यांनी गुलदस्त्यात ठेवली आहे?

साक्षिदार पण आहे.

Anu, who goes by a single name and was on duty with Khan on 22 May, said she saw Khan disposing of syringes without using them. “I could see she’s not pushing the injection properly. A patient also asked her to vaccinate him properly after he saw Khan just pricking him with a needle.

२९ सापडल्या. किती फेक्ल्या असतील काय माहित :-(
त्या २९ जणांना प्रमाणपत्र पण मिळाले (मोदींच्या फोटो सकट :-) )
अल्पसंख्यांचे (?) कार्ड खेळले कि बर्याचदा सर्व खोटे आणि निष्प्रभ करायचा मार्ग बराचसा मोकळा होतो किंवा होत असे.

असो.

बादवे: माझ्या प्रतिसादात मी जिहाद हा शब्द वापरलेला नाही ह्याची क्रुपया नोंद घ्यावी.

कॉमी's picture

9 Jun 2021 - 3:38 pm | कॉमी

तुम्ही जिहाद शब्द वापरला नाही मान्य. पण नर्सने जे केले ते धार्मिक पुस्तकात वाचून केले असे तुम्ही मानून चालला आहात.

असो.

नावातकायआहे's picture

9 Jun 2021 - 4:21 pm | नावातकायआहे

धार्मिक पुस्तकात च वाचून असे नाही.
मध्ये असे काय झाले कि विचारात आणि क्रुतीत बदल झाला

खानताईंनी स्वत:चे हि जानेवारीत लसीकरण करुन घेतले असेही वाचले!

इत्यलम.

मागच्या आठवड्यातील एक बातमी द्यायची राहिली. केरळ सरकारने अल्पसंख्यांकांसाठीच्या शिष्यवृत्त्यांमध्ये ८०% मुसलमानांना आणि उरलेल्या २०% ख्रिश्चनांना द्यायचा वादग्रस्त आदेश २०१५ मध्ये काढला होता. २०१६ मध्ये विजयन यांचे कम्युनिस्ट सरकार आल्यावरही तो कायम राहिला होता. तो आदेश घटनाबाह्य आहे असे म्हणत केरळ उच्च न्यायालयाने तो आदेश रद्द केला आहे.

एकूणच कम्युनिस्ट आणि धर्मांध यापैकी दोघेही सत्तेत नसतात तोपर्यंत त्यांचे गळ्यात गळे असतात. अशावेळी धर्म ही अफूची गोळी आहे वगैरे गोष्टी कम्युनिस्ट बासनात गुंडाळून ठेवत असतात. भारत देशात ही परिस्थिती आहे. पण या दोघांपैकी एक गट सत्तेत आल्यास दुसर्‍याला अगदी दयामाया न दाखवता चिरडतो हे अनेक ठिकाणी बघायला मिळेल.

कॉमी's picture

9 Jun 2021 - 11:54 am | कॉमी

धर्म हि अफूची गोळी आहे हे एकुलते एक म्हणून बघायला गेले तर बरेच आउट ऑफ कंटेक्सट घेतलेले वाक्य आहे. त्यात उलट मार्क्स धर्म हा गरीब, दु:खित आणि पीडितांच्या दु:खावरचे मलम आहे असे म्हणतो. म्हणजे, हे पर्टीक्युलर वाक्य खरेतर धर्माकडे सहानुभूतीचा नजरेतून बघते. बाकी धर्म म्हणजे गरिबांना आपले अन्याय सहन करायला लावण्यासाठी बनवलेली आणि पसर्वलेली गोष्ट वैगेरे मार्क्सची मते आहेतच, नो डाऊट.

"Religion is the sigh of the oppressed creature, the heart of a heartless world, and the soul of soulless conditions. It is the opium of the people."

आणि न्यायालयाने आदेश रद्द केला त्याचे स्वागत आहे.

बरेच आउट ऑफ कंटेक्सट घेतलेले वाक्य आहे.

हे माहीत न्हवते... ही रुपेरी किनार खरोखर स्वागतार्ह.

बाकी धर्म म्हणजे गरिबांना आपले अन्याय सहन करायला लावण्यासाठी बनवलेली आणि पसर्वलेली गोष्ट

नक्किच, गरीबच का श्रीमंतही धर्माच्या दबावाखाली दबलेच जातात अशी सुधारणा हवी.

नाही, दाबले तर सगळेच जातात. पण आपल्यावर होणारे अन्याय विसरण्यासाठी धर्म मदत करतो, असं मार्क्स म्हणतो. स्पेसिफिकली, क्रान्ती करणारा वर्ग, प्रोल्स (proletariat) यांना तात्पुरती शांती देऊन क्रान्ती करण्यापासून रोखतो. मार्क्स या शांततेला illusory happiness म्हणतो- भ्रामक शांती. त्यामुळे मला ही भ्रामक शांती काढून घ्यायची आहे, जेणेकरून त्यांना खरी शांतता मिळेल- असे तो म्हणतो.
त्यापलीकडे मार्क्स ला अध्यात्म आणि धार्मिकतेबद्दल काहीही द्वेष नव्हता, उलट आयुष्यात ह्या गोष्टी गरजेच्या आहेत असे तो म्हणे. फक्त ह्या गोष्टी करायच्या असतील तर आधी शारीरिक आणि मटेरियल गरजा भागवणे आवश्यक आहे असे त्याचे म्हणणे होते.

ओपियम रुपकात बसवायचे झाले तर-ओपियम मुळे वेदना विसरून व्याधी कडे न बघणाऱ्या माणसाला ओपियम सोडण्यास वळवावे, जेणेकरून व्याधींकडे पहिले जाईल, निराकरण होईल . त्यानंतर व्याधी निराकरण झाल्यावरसुद्धा ओपियमचा आनंद आनंदासाठी घेण्यास कोणाची हरकत असायचे कारण नाही.

शाम भागवत's picture

9 Jun 2021 - 1:20 pm | शाम भागवत

त्यानंतर व्याधी निराकरण झाल्यावरसुद्धा ओपियमचा आनंद आनंदासाठी घेण्यास कोणाची हरकत असायचे कारण नाही.

खूपच आशादायी व सुंदर वाक्य आहे. आवडले.
.
पण
ओपिअम शिल्लक राहील अशी तुम्हाला आशा वाटते?
कदाचित ओपिअम औषधालाही शिल्लक राहणार नाही अशीही अवस्था येऊ शकते.
खरतर सगळ्या व्याधी व अन्याय संपल्यावर ओपिअमची गरजच का भासावी?

किंवा
खरतर मार्कस् वाद एवढ्या सर्वोच्च उंचीवर गेल्यावर ओपिअमच्या बाजूने कोणितरी बोलायची शक्यता तुम्हाला वाटते?
शिवाय त्याला अजिबात विरोध न होता सगळे जण स्वखुषीने ती वक्तव्ये आनंदाने ऐकतील असं तुम्हाला खरोखरीच वाटते?

का
मार्कस् वाद एवढ्या सर्वोच्च उंचीवर गेल्यावर, ओपियमच्या बाजूने बोलायची कोणाची हिंम्मत होणार नाही अशी परिस्थिती असायची शक्यता असेल?

असो. तुमच्या विचारांचा आदर आहेच. पण जगातील कम्युनिस्ट, हुकुमशाही, एक पक्ष पध्दती व विरोधी विचारांचा केला जाणारा बिमोड वगैरे बद्दल आत्तापर्यंत जे काही थोडसं आकलन झालंय त्यावर आधारित मनात शंका आल्या व त्या मांडल्या इतकेच.
🙏

मी एक सोशालिस्ट डेमोक्रॅट आहे. सोशालिस्ट हा शब्द खरेतर चुकीचाच, कारण आम्ही वेल्फेअर स्टेट पुरस्कर्ते आहोत. सोशालिस्ट हा शब्द अमेरिकन राजकारणातल्या अति उजव्या निओ लिबरल लोकांनी आम्हाला घ्यायला लावला, ते असो. वेल्फेअर स्टेट म्हणजे सोशलिझम पासून मैलोन मैल दूर आहे, आणि खऱ्या सोशलिझमच्या वाटेतला अडसर आहे. मार्क्स मी ज्याचा पुरस्कार करतो त्याला बुरज्वा ओपीएट म्हणला असता, धर्मासारखंच !

तर, मी डेमोक्रॅट सुद्धा आहे. म्हणजे लोकशाही चा पुरस्कर्ता. कोणत्याही धर्म/विचारांवर जबरदस्तीने बंदी आणणे हे मला पटणार नाहीच.

पण हे मी नक्की सांगीन, जर धर्मामुळे स्वतःच्या आयुष्यातील दुःखांचा स्वीकार करून, मोक्ष/स्वर्ग/आफ्टरलाईफ वर लक्ष लागत असेल तर त्यातली आतार्किकता दाखवून देणे क्रमप्राप्त आहे. तार्किक प्रश्न विचारणे ह्यात काही गैर नाही. जर त्यातून धर्म नैसर्गिकरित्या संपून गेले तर मला अश्रू ढाळायचे कारण दिसणार नाही हे खरे. मात्र, दंडुका दाखवून धर्म पालन थांबवणे हे तिरस्करणीय वाटतेच.

त्यासोबत हेही समजणे आवश्यक आहे की मार्क्स जेव्हा धर्म म्हणतो, त्याच्या डोळ्यासमोर प्रिडोमिनंटली ख्रिश्चन धर्म असतो. मार्क्स काय म्हणत होता याचे एक उदाहरण म्हणून व्हिन्सेंट व्हॅन गॉग या माधुरी पुरंदरे अनुवादित पुस्तकातील घटना सांगतो. (पुस्तक हाताशी नाहीये, कदाचित काही पैलू निसटले सुद्धा असू शकतात.)

व्हिन्सेंट कोळसा खाणकामगारांच्या वस्तीत प्रिचर/प्रवचनकार म्हणून नेमला गेला होता. तिथे त्यांचे भयंकर आयुष्य पाहून तो मुळापासून हादरून गेला. अत्यंत हलाखीत ते जगत होते. त्यामुळे त्यांच्या सेवेत व्हिन्सेंटने स्वतःला झोकून दिले. त्याच्या पगाराचे सर्व पैसे तो त्यांच्यासाठी खर्च करू लागला, स्वतःचे आरामातले भाड्याचे घर सोडून भाडे वाचवण्यासाठी कामगारांच्या सारख्या खोपट्यात तो राहू लागला. घरी वापरण्यासाठी कोळसा मिळावा म्हणून त्यांच्यासारखेच दगडांच्या (कचऱ्याचा) ढिगात हात पाय खरचटवून कोळसा शोधू लागला. थोडक्यात, बायबल मधले अमूर्त विचार कोळसा कामगारांना पोहोचवण्यापेक्षा त्याला कामगारांचे भौतिक आयुष्य बदलणे कित्येक पट जास्त महत्वाचे वाटले. पण प्रिचर पदाची शोभा घालवली म्हणून एव्हनजेलिस्ट कमिटीने त्याचा हुद्दा काढून घेतला. थोडक्यात, व्हिन्सेंट कडून अपेक्षित होते ते इतकेच कि खाण कामगारांना प्रवचने देऊन त्यांना शांत ठेवणे. त्यांना मानसिक समाधान देणे, जमल्यास वैद्यकीय शुश्रूषा देणे. पण त्यांच्या भीषण परिस्थितीला अधोरेखित करणे हे त्याच्याकडून आजिबात अपेक्षित नव्हते. त्याऊलट, त्यांना "धीर" देणे आणि चालू परिस्थिती स्वीकारण्यास मदत करणे हे त्याचे अपेक्षित काम होते.

ही घटना ओपीयेट रुपकातून पाहिल्यास तुम्हाला मार्क्सचे मत समजेल अशी आशा करतो. त्याचा आक्षेप धर्मावर नाही, तर त्याच्या ह्या उद्देशयावर आहे. धर्म नष्ट करणे हा त्याचा उद्देश नाही. धर्मामुळे मिळणारी आश्वत्तता भौतिक समाधानाशिवाय कशी पोकळ आहे हे दाखवणे त्याचे उद्दिष्ट आहे. आणि ते मलासुद्धा मनापासून पटते.

हीच तर खरी गंम्मत आहे तिकडे तत्ववेत्ते तिकडच्या धर्मावर प्रहार करतात अन इकडले तो हवेतीत तीर अत्यंत आदराने स्व्तःमधे सामावुन घेतात आणी त्याहुन वाइट म्हणजे तो तीर जगातील सर्वधर्मावर सोडला आहे असे इकडचेही तिरासमोर मान तुकवणारे मानतात...

फक्त भारताचा विचार केला तर मुळातच इथल्या धार्मीक (?) संस्कृतीतील उत्तमांनी कधीच उजवे डावे बघितले नाही तर फक्त योग्य अयोग्याची फिकीर केली म्हणूनच आर्य चाणक्य चंद्रगुप्ताला सर्व सरकारी अधिकार्‍यांची मालमत्ता ठरावीक वर्षांनी सतत जप्त केली जावी आणी त्यांचे त्यांच्या हुद्यानुसार पुनर्वसन करत रहावे अशीही सुचना देतो आणी ना ती डावी ठरवली जाते

कॉमी's picture

9 Jun 2021 - 3:08 pm | कॉमी

आपला इतिहास आणि संस्कृती पाश्चात्त्यांपेक्षा अत्यंत वेगळी आहे, त्यामुळे पाश्चात्त्य तत्वज्ञान तोलताना आपल्या परिस्थितीचा विचार होणे गरजेचे आहे.

पण प्रोब्लेम हा आहे की जे व्याधीमुक्त आहेत त्यांनाही मार्क्सवादीयांच्या रोषाला सामोरे जावे लागते त्याचे काय ?

चंद्रसूर्यकुमार's picture

9 Jun 2021 - 2:02 pm | चंद्रसूर्यकुमार

पण प्रोब्लेम हा आहे की जे व्याधीमुक्त आहेत त्यांनाही मार्क्सवादीयांच्या रोषाला सामोरे जावे लागते त्याचे काय ?

आणि मार्क्सवाद हीच व्याधी असेल तर?

गॉडजिला's picture

9 Jun 2021 - 2:07 pm | गॉडजिला

आणि मार्क्सवाद हीच व्याधी असेल तर?

अशक्य कारण ही बाब दैवी (अथवा निसर्ग निर्मीत) नसल्याने तो अपुरा, अप्रगत अथवा प्रसंगी कुचकामीही असु शक्तो... पण व्याधी नक्किच नाही. मानव निर्मीत प्रत्येक गोष्ट ही आधुनीक विज्ञाना इतकीच प्रयोगशील बाब आहे ज्यात सातत्याने सुधारणा करुन प्रगती साधता येउ शकते

चंद्रसूर्यकुमार's picture

9 Jun 2021 - 2:10 pm | चंद्रसूर्यकुमार

अशक्य कारण ही बाब दैवी (अथवा निसर्ग निर्मीत) नसल्याने तो अपुरा, अप्रगत अथवा प्रसंगी कुचकामीही असु शक्तो... पण व्याधी नक्किच नाही. मानव निर्मीत प्रत्येक गोष्ट ही आधुनीक विज्ञाना इतकीच प्रयोगशील बाब आहे ज्यात सातत्याने सुधारणा करुन प्रगती साधता येउ शकते

सहमत. फक्त यात गोम अशी की मार्क्सवादात सुधारणा केल्यास तो 'मार्क्सवाद' राहणार नाही तर ती सुधारीत आवृत्ती मध्याच्या डावीकडे न राहता उजवीकडे सरकेल. :)