नमस्कार !
सोशल मिडीयावर विशेष करुन व्हॉट्सॅप्प वर अनेक फॉरवर्ड्स येत असतात. बहुतांश मजेशीर ,विनोदी आणि क्वचित दुर्लक्षणीय असतात मात्र काही मात्र खुप गंभीर असतात. अनेक तर माथी भडकवणारे देखील असतात. कित्येक तर केवळ पोकळ अफवा आणि काहीच्या काही क्लेम्स असतात.
एक सुज्ञ सुशिक्षित नागरिक म्हणुन कोणत्याही ऐकीव माहीतीवर विश्वास ठेवायचा नाही ही आपली जनरल पॉलीसी ( सर्वसाधारण नीती) असली तरीही सर्वच विषयांचा अभ्यास करणे शक्य नसते . प्रत्येकवेळी फॅक्ट चेक करणे शक्य होत नाही. पण मिपावर मात्र अनेक क्षेत्रातले जाणकार अभ्यासु लोकं आहेत . त्यांच्या माहीतीवरुन किमान थोडेतरी सत्यशोधन करता येईल म्हणुन हा चर्चेचा धागा काढत आहे.
चर्चेचे स्वरुप साधारणपणे व्हॉट्सअॅप्प/ सोशल मीडीया वर आलेला फॉरवर्ड , आपली शंका आणि त्या निमित्ताने थोडीफार चर्चा करुन सदर फॉरवर्ड खरा की खोटा हे ठरवणे असे असावे असे वाटते , अर्थात स्ट्र्क्चर फ्री फ्लोटिंग असावे.
अवांतर : काहीकाही फॉरवर्ड्स सत्यासत्यता तपासुन पहाण्याच्या लायकीचेही नसतात ते टाकु नयेत इतकी सौजन्याची मर्यादा पाळावी असे वाटते .
प्रतिक्रिया
15 May 2021 - 8:49 pm | प्रसाद गोडबोले
आज व्हॉट्सॅप्प वर आलेला हा फॉरवर्ड : ह्यात किती खरे खोटे असावे ?
काल तेरावा होता.....!
पहिल्या दिवशी 490 MT पासून सुरू झालेली ऑक्सिजनची मागणी दुसऱ्या दिवशी 590 MT, तिसऱ्या दिवशी 700 MT, चौथ्या दिवशी 770 MT असं करत पाचव्या दिवशी 970 MT पर्यंत पोचली!
सहाव्या दिवशी या 'दिल्ली पॅटर्न' विषयी शंका आल्याने केंद्र सरकारकडून राज्य सरकारच्या सर्व हॉस्पिटलचे ऑक्सिजन ऑडिट करण्यासाठी परवानगी द्यावी, अशी कोर्टात विनंती करण्यात आली.
सातव्या दिवशी दिल्ली सरकारची ऑक्सिजनची डिमांड चक्क निम्म्यावर आली!
आठव्या दिवशी ऑक्सिजन ऑडिटला केजरीवाल सरकारने कोर्टात कडाडून विरोध केला.
नवव्या दिवशी आम आदमी पार्टीच्या नेत्यांच्या घरूनच शेकडो ऑक्सिजन सिलिंडर दिल्ली पोलिसांनी जप्त केले.
दहाव्या दिवशी तर कमाल झाली - जे केजरीवाल सरकार 75000 ऍक्टिव्ह केसेस असताना 700 MT ऑक्सिजन केंद्राकडे मागत होते, ते आता ऍक्टिव्ह केसेस 13000 ने वाढून 83000 झाल्यावर 118MT कमी म्हणजे फक्त 582 MT ऑक्सिजन पुरेसा असल्याचे सांगत होते.
अकराव्या दिवशी तर दिल्लीत पोचलेल्या ऑक्सिजन पैकी 74 MT 'आम्हाला नको' म्हणत परत पाठवला गेला, म्हणजे नंतर 'आम्ही इतके इमानदार आहोत की गरज नव्हती तेंव्हा ऑक्सिजन आम्ही परतसुद्धा पाठवला होता मायलॉर्ड', असंही म्हणता येईल!
बाराव्या दिवशी पुरवठादारांना केजरीवाल सरकारने मेल पाठवून 112.5 MT ऑक्सिजन पाठवूच नका, असा आदेश दिला. पण इतरही कोणाला देऊ नका सांगत त्यांच्याकडेच साठा करून ठेवायला संगीतलं. म्हणजे उद्या अंगलट आलं की 'आम्ही घेतलाच नव्हता' म्हणायलाही तयार!
आता हाईट तर ही झाली आहे की पहिल्या दिवशी 490 MT वरून सुरू झालेला यांचा प्रवास जो पाचव्या दिवशी 970 MT वर पोचून कोर्टात मोदींच्या नावाने शंख करण्यापर्यंत आला होता, तो सहाव्या दिवशी 'ऑक्सिजन ऑडिट' ची मागणी मोदी सरकारने करताच.. आता 'तेराव्या' दिवशी आजुबाजूच्या राज्यांना हवा असेल तर कृपया संपर्क करा, आम्ही आमच्याकडे पडून असलेला अतिरिक्त ऑक्सिजन द्यायला तयार आहोत.. इथपर्यंत आला आहे!
इमानदारीचा पोपट कधीच मेला होता. ऑक्सिजन देऊन त्याला जिवंत करायचा प्रयत्न पण फेल गेला आहे. काल तेरावा होता. फुकट पाणी, वीज आणि वायफाय च्या आशेने मतदान करणारी दिल्लीत जी 'फ्रीलोडर जमात' होती, ते पण आता या पोपटाच्या मृत्यूनंतर शॉक मध्ये आहेत. 'दुनिया मे सिर्फ केजरीवाल इमानदार है जी' चे ग्राईप-वॉटर यांनीच रोज वॉट्सअप्प वरून इतरांना पाजले होते.
तीन दिवसांपूर्वी महाराष्ट्र मॉडेलचा खोटारडेपणा एक्सपोज करत मुंबई हायकोर्टाने ठाकरे सरकारचे वाभाडे काढले होते. दोन दिवसांपूर्वी केरळ मॉडेल च्या आडून मोदींची बदनामी करायचा 'अजेंडा' एक्सपोज होईल या भीतीने धूळ खात पडलेला एक लाख रेमडेसिव्हीरचा स्टॉक पिनारयी विजयनने केंद्राला परत केला. काल दिल्ली मॉडेल काय आहे, हे लोकांच्या नीट लक्षात आलेलं बघून सिसोदिया यांनी केंद्राकडे ऑक्सिजन मागायचा सोडून उलट इतर राज्यांनाच हवा असल्यास तो पाठवायचा 'मनाचा मोठेपणा' दाखवला..
आता तुम्हाला महाराष्ट्र, केरळ, दिल्ली मॉडेल काय आहेत हे समजलं असेल, तर मोदींच्या मागे भक्कमपणे उभे रहा. मोदींची बदनामी करण्याच्या नादात, लोकांच्या जीवाशी खेळून देशाचीच बदनामी करण्याच्या कारस्थानाला अजिबात बळी पडू नका. अशा हलकटपणावर मौन बाळगून या कारस्थानी लोकांना बळही देऊ नका कारण तुमचं मौन त्यांची हिम्मत अजून वाढवते!
'एकटे मोदी करोना विरुद्धचे युद्ध जिंकू शकत नाहीत' असं नवाब मलिक तीन दिवसांपूर्वी बोललेच होते. याचा अर्थ सोपा आहे - फक्त एकच माणूस तुमच्यासाठी निकराने किल्ला लढवत आहे.. समजून जा!
15 May 2021 - 9:01 pm | प्रसाद गोडबोले
व्हॉट्सॅप्प वर आलेल्या ह्या फॉर्वर्ड खालील लेखकाचे नाव :
15 May 2021 - 9:11 pm | निपा
असे messages ला मी बघत सुद्धा नाही . इथे message वाचून असे वाटते कि खरेच असेल सर्व . पण खरा आहेय कि खोटा हे ठरवायला खूप analysis करावं लागेल . ते सर्व करणं प्रत्येक message च्या बाबतीत अवघड आहे .
इथे बराच डेटा असला तरी एकही कॉउंटर argument नसल्यामुळे काहीही अर्थ उरात नाही ... मोस्टली हा सिलेक्टिव बायस च्या कॅटेगोरीतला वाटतो
15 May 2021 - 8:58 pm | Vichar Manus
आज व्हाट्सअप्प वर आलेला फॉरवर्ड, किती खरा आहे ?
कोणी हे सांगू शकेल का एशियाई देशात फ़क्त भारतातच ही कोरोणाची दूसरी लाट का आली? ती ही मार्चच्या दुसऱ्या आठवड्यापासून? पाकिस्तान, बांग्लादेश, भूटान, नेपाल, म्यांमार, थायलैंड, अफगानिस्तान, श्रीलंका या देशांची भौगोलिक परिस्तिथि ही भारत देशा सारखीच आहे, मग तिथे का दूसरी लाट नाही?
इतर एशियाई देश सिंगापूर, मलेशिया, वियतनाम, अरब देश ताइवान, मंगोलिया, किर्गिस्तान, उछ्बेकिस्तान या देशांची भौगोलिक परिस्तिथि थोड़ीफार भारत देशासारखीच आहे. तिथे ही दूसरी लाट नाही,
का? का? का?
का हे देश जास्त Disciplined आहेत?
का तेथील नागरिक जास्त सुशिक्षित आहेत?
का तेथील आरोग्य व्यवस्था भारतापेक्षा चांगली आहे?
काय म्हणायचे आहे तुम्हाला?
पाकिस्तानमधील, बांग्ला देशातील लोक जास्त डिसिप्लिनड आहेत? तेथील आरोग्य व्यवस्था चांगली आहे?
भूटान, नेपाल आपल्या पेक्षा पुढारलेले देश आहेत?
मंगोलिया, अरब देश जास्त सुशिक्षित आहे? मग फ़क्त आणि फ़क्त भारतातच दूसरी लाट कशी?
या देशात आपल्या पेक्षा लसीकरण कमी आहे. यातील काही देशात लोकसंख्याची घनता आपल्यापेक्षा कितीतरी जास्त आहे. आरोग्यसेवेसाठी तर यातील बरेच देश भारतावर अवलंबून आहेत.
पाकिस्तानातील, बांग्लादेश, श्रीलंका, भूटान, नेपाल, अरब देशमधील हजारों लोक दर महिन्याला भारतात उपचारासाठी येतात.
#मग दूसरी लाट भारतातच का?
फेब्रुवारी पर्यंत भारत जगाला लस आणि औषधे, पीपीई किट, मास्क पुरवित होता. मग 15 ते 20 दिवसात परिस्तिथि इतकी विरुद्ध कशी झाली? संगती लक्षात घ्या.
ट्रम्प गेल्या गेल्या भारतावर लक्ष केंद्रित केले गेले, यात औषधि लॉबी, शस्त्रास्त लॉबी, ऑइल लॉबी आणि चीन व चीनला सामिल असणारी अमेरिका, यूरोप मधील लॉबी यानी भारताकडे लक्ष वळवले, टार्गेट मोदी सरकार
का?
तर मोदिनी भारत आत्मनिर्भर करुन लस, औषधे, शस्त्रे निर्यात करायला चालू केली, तसेच इलेक्ट्रिक गाड्याना चालना दिली, एक लाख चार्जिंग स्टेशन येत्या तीन वर्षात ऊभी राहणार आहेत. तेल निर्यात सर्वात जास्त अमेरिका आणि त्यांच्या कंपन्या करतात.
खूप काही लिहायचं पण मर्यादा आहेत....
आता संगती बघा
1 नक्सलनी स्फोट घडवून आनला.
2 लगेच दूसरी लाट येतेयची ओरड चालू आणि लाट धडकली
3 मोदी, शहा निवडणुकीत बिज़ी झाल्या झाल्या लाटेची तीव्रता वाढली तिही कांग्रेस प्रणीत राज्यात.
4 किसान आंदोलन जे जवळ जवळ संपले होते ते परत चालू झाले
5 जो देश औषधे, लस निर्यात करत होता त्याच्यावर फ़क्त एक महिन्यात बाहेरच्या देशातून मदत मागावी लागली
6 आंतरराष्ट्रीयअर्थ संस्थानी भारताचा GDP 12 ते 16 % होईल असे फेब्रुवारी मधे जाहिर केले आणि दोन महिन्यात भारताची अर्थ व्यवस्था रसातळाला गेली
7 जो चीन गुडग्यावर आला होता त्याने बॉर्डर बोलनी बंद केली
8 माध्यमवर मोदी विरोधी लाट आणली गेली
Is This Second Wave or Planned Biological War against India?
पूर्वी युद्ध दगड, धोंडे यानी खेळली जात, नंतर तीरकामटे, भाले, तलवारी आल्या, नंतर बन्दुका, तोफा आल्या, नंतर अणुबम आणि रासायनिक अस्त्रे आली. यात दोन्ही बाजूचे नुकसान होते. बायोलॉजिकल युद्धात फ़क्त जनता मारली जाते, कमकुवत केली जाते, एक पीढ़ी शाळेत न जाता वरील वर्गात जातीय म्हणजे ज्ञानाचा -र्हास, तरुण पीढ़ी कोरोनामुळे कमकुवत होतीय म्हणजे पुढील मिळणाऱ्या संपत्तीचे नुकसान, उद्योग धंदे बंद म्हणजे आत्मनिर्भर बंद म्हणजे देश कमकुवत, मध्यम वर्ग गरीब रेषेच्या खाली जाणार आणि गरीब जमिनीत जाणार, जो देश 4 क्रमांकाची अर्थ व्यवस्था बनला होता तो माहित नाही किती क्रमांकावर फेकला जाईल
हे Pandemic नाही तर बायोलॉजिकल युद्ध आहे......
जगात सरळ सरळ दोन भाग पडत चालले आहेत चीन लाल कम्युनिस्टच्या बाजूचे आणि इस्रायल, भारत, ऑस्ट्रेलिया, जापान व इतर ट्रम्प गेल्या गेल्या अमेरिकेतील लाट ओसरली आशियातील इतर राष्ट्राकडे सौदी, कुवैत, जापान वगैरे सोडून गमाविन्यासारखे काहीच नाही ते गरीब आहेतच तिथे ना पहिली लाट आली ना दूसरी..
- विश्राम परब
15 May 2021 - 9:52 pm | निपा
हा message पहिल्या आर्ग्युमेंट वर खरा उतरत नाही .
- मलेशिया : http://www.e-mjm.org/2021/v76n1/third-COVID-19-wave.pdf
- बांग्लादेश : https://www.dhakatribune.com/bangladesh/2021/04/17/experts-bangladesh-s-...
आपली लस काही आत्मनिर्भर नाही . आपण production मध्ये नो. १ आहोत .
असे बरेच काही डिससेक्ट करता येइल या message मध्ये, वेळ असेल तर.
आणि हो हा "चीन गुडग्यावर आला होता" हे खूपच हास्यास्पद आहे . कुठं चीन कुठं आपण . सॉरी पण हेच सत्य आहे , आपली तुलना चीन सोबत अजून तरी नाही होयू शकत.
15 May 2021 - 9:43 pm | चौकटराजा
मी स्वतः: गेले अडीच वर्ष एकाही ग्रुपचा मेम्बर नाही. जे लिस्ट मध्ये आहेत त्यांना कृपया फॉरवर्ड मेसेज पाठवू नयेत असे फर्मावले आहे ! करोनाच्या बाबतीत अनेक डॉक्टर लोक देखील काहीही हा श्री सारखी माहिती देत आहेत .कुणाचा कुणाला मेळ नाही ! त्यातल्या त्यात बरे आहे की होमिओ वाले सर्वावर आमच्याकडे औषध आहे असा प्रचार करीत असतात ते " करोना " वर मात्र गप्प आहेत. काढा, वाफ ,गोमूत्र शेण,,कांदा, रामबाण वनस्पती व आता देशी दारू असे पराक्रम आयर्वेद वाले करीत आहेत . हे सारे मी यू ट्यूब चे बोलत आहे ! व्हॉटस ॲप वरकाय उच्छाद असेल कुणास ठावूकी !