कोविड१९ : खवळलेल्या विषाणूशी उपायांचे युद्ध

कुमार१'s picture
कुमार१ in काथ्याकूट
2 Apr 2021 - 10:10 am
गाभा: 

ok

या विषयाचे आधीचे संदर्भ :

१. हात, जंतू, पाणी आणि साबण
२. कोविड१९ घडामोडी : समज,गैरसमज

.कोविड १९ : व्याप्ती आणि भवितव्य
४. कोविड १९ : वर्षपूर्ती आणि लसीकरण
........................
पूरक विषय : पल्स ऑक्सीमीटरचे गमभन
.......
31 डिसेंबर 2019 रोजी जागतिक बारसे झालेल्या कोविड१९ या आजाराने अद्यापही आपला पिच्छा सोडलेला नाही. मध्यंतरी काही काळ आपण त्याच्यावर कुरघोडी केल्यासारखे वाटत होते. परंतु आता तर तो विषाणू विविध अवतार बदलून आलाय. या बदललेल्या अवतारांची काही रुपे जरा जास्तच त्रासदायक होत आहेत. दरम्यान जागतिक पातळीवर लसीकरण व्यापक स्वरूपात होत आहे. औषधोपचारांच्या दृष्टीनेही संशोधन चालू आहे पण अद्याप रामबाण असा उपाय सापडलेला नाही. एकंदरीत पाहता भारतात या आजाराची दुसरी लाट आली आहे असे म्हटले जाते. काही युरोपीय देशांनी तर त्यांच्याकडे ‘तिसरी लाट’ आली असे म्हटले आहे.

या लेखमालेच्या मागच्या भागामध्ये एका वाचक महोदयांनी निरोपाद्वारे अशी सूचना केली, की इथे चर्चेदरम्यान दिली जाणारी महत्त्वाची माहिती ही प्रतिसादांच्या रूपाने असल्याने ती विस्कळीत स्वरूपात राहते. तेव्हा अशी माहिती एकसंध वाचायला मिळाल्यास बरे होईल. त्यावर अन्य काही वाचकांशीही विचारविनिमय झाला. तसेही असा माहितीपर धागा सुमारे तीन महिने जुना झाला की त्याच्या चर्चेची जागा बऱ्यापैकी फुगलेली असते. त्यामुळे मागच्या पानांवर जाऊन काही बघायचे झाल्यास ते बऱ्यापैकी कष्टप्रद होते. यावर विचार करून मी असा एक पर्याय काढला आहे. मागच्या धाग्यातील चर्चेदरम्यान आलेली महत्त्वाची उपयुक्त माहिती संपादित करून इथे एकसंध स्वरूपात लिहीत आहे. त्यानेच या धाग्याची सुरुवात करतो.

ही महासाथ आटोक्यात आणण्यासाठी आपल्याला तीन आघाड्यांवर लढायचे आहे :
१. लसीकरणाच्या माध्यमातून प्रतिबंध
२. औषधोपचार आणि
३. सामूहिक आरोग्यशिस्त आणि प्रशासकीय उपाय.

गेल्यावर्षीच्या अखेरीस विविध उत्पादकांच्या लसी बाजारात उपलब्ध होऊ लागल्या. त्यातील काहींना संबंधित देशांच्या औषध प्रशासनाने मान्यता दिल्यानंतर लोकांचे लसीकरण सुरू झाले. भारतातील लसीकरण साधारण जानेवारीमध्ये सुरू झाले. भारतात सध्या दोन प्रकारच्या लसी उपलब्ध आहेत या दोन्ही स्नायूंमध्ये इंजेक्शन द्वारा घ्यायच्या आहेत :

१. कोविशिल्ड : ही ‘सिरम’ने तयार केलेली असून त्यात अन्य वाहकविषाणू आणि प्रथिन-कोड हे तंत्रज्ञान वापरले आहे.
२. कोवाक्सिन : हे भारत बायोटेकने तयार केलेले असून त्यात निष्प्रभ विषाणूशी संबंधित तंत्रज्ञान वापरलेले आहे.

दोन्ही लसींचे दोन डोस घ्यावयाचे आहेत. कोवाक्सिनच्या बाबतीत ते एक ते दीड महिन्याच्या अंतराने, तर कोविशिल्डच्या बाबतीत पहिल्या डोसनंतर दीड ते दोन ( जास्तीत जास्त तीन) महिन्यांपर्यंत दुसरा डोस घेतलेला चालेल, असे संबंधितांनी जाहीर केले आहे.
अमेरिकेत मुख्यतः फायझर आणि मॉडरना या दोन कंपन्यांच्या लसी वापरल्या जात आहेत. त्या दोन्ही अत्याधुनिक अशा एम-आरएनए तंत्रज्ञानावर आधारित बनवल्या आहेत. त्याही इंजेक्शनद्वारच घ्यायच्या आहेत.

अमेरिकेत फायझर व भारतात कोवाक्सिनच्या संदर्भात २ डोस घेऊन झाल्यानंतर तिसरा डोसच्या आवश्यकतेबाबतचे शास्त्रीय प्रयोग सुरु झालेत.
कुठलीही लस परिपूर्ण नसते. त्यामुळे स्वतः लसवंत झाले तरीही संबंधित रोगजंतूचा संसर्ग होऊ शकतो. परंतु त्या परिस्थितीत लसीकरण झाल्याचे स्वतःला प्रत्यक्ष व इतरांना अप्रत्यक्ष फायदे असे मिळतात :

१. लस घेतलेल्या व्यक्तीस तो संसर्ग जर झालाच तरी त्याचा परिणाम सौम्य असतो. तिच्या शरीरात विषाणूची घनता व आक्रमकता खूप कमी राहते.
२. वरील व्यक्तीद्वारा ते विषाणू पसरवण्याची शक्यता राहते, पण तिचे प्रमाण खूप कमी असते.

अर्थात इंजेक्शनद्वारा दिलेल्या लसीमुळे इतरांना होणारा रोगप्रसार थांबेल की नाही, हे अद्याप सिद्ध झालेले नाही.
या संदर्भात अमेरिकेत एक महत्त्वाचे संशोधन चालू झाले आहे. त्यामध्ये बारा हजार महाविद्यालयीन तरुणांचा समावेश केलाय. दोन टप्प्यांत त्यांना मॉडर्नाची लस दिली जाईल. त्या प्रत्येकाजवळ एक ‘इ-डायरी ऍप’ असेल. यातील प्रत्येकजण स्वतःच्या नाकातून रोज स्वाब घेईल. तसेच ठराविक काळाने त्यांचे रक्तनमुनेही तपासणी जातील.
पुढच्या टप्प्यात या तरुणांचे कुटुंबीय आणि जवळचे लोक यांचीही संबंधित तपासणी केली जाईल. सुमारे पाच महिन्यानंतर या अभ्यासाचे निष्कर्ष हाती येतील.

लसीकरण मोठ्या प्रमाणावर झाल्यानंतर लोकांच्या वैयक्तिक अनुभवांची देवाणघेवाण होत आहे. त्यातील एक महत्वाचा मुद्दा असा:

लस दिल्यानंतर इंजेक्शनच्या जागी दुखले, जागा लाल झाली आणि थोडा ताप आला, म्हणजे ‘चांगलेच’ झाले. याचा अर्थ लस काम करीत आहे”, अशी एक सामान्य समजूत (मिथक) असते. ( नो पेन, नो गेन कन्सेप्ट).

यासंदर्भात बराच शास्त्रीय अभ्यास झालेला आहे. लसींच्या विविध प्रकारानुसार अगदी भिन्न स्वरूपाचे अनुभव आलेले आहेत. लोकांमध्ये ताप येण्याचे प्रमाण तर सहसा २५ टक्‍क्‍यांवर जात नाही. एकंदरीत विदा पाहता वरील मिथक शास्त्रीयदृष्ट्या काही सिद्ध झालेले नाही.
लसीमुळे शरीरात निर्माण होणारी प्रतिकारशक्ती ही प्रतिपिंडे (Ab) आणि T संरक्षक पेशी या दुहेरी स्वरूपाची असते. ती व्यक्तीनुसार कमीअधिक प्रमाणात निर्माण होते. आपले शरीर आणि पर्यावरण यांच्याशी संबंधित अनेक घटकांवर ती अवलंबून असते.

करोना-2 च्या जनुकीय बदलाने सुमारे १६ नवे विषाणू-अवतार अस्तित्वात आले आहेत. त्यापैकीहे पूर्वीच्या तुलनेत अधिक संसर्गजन्य आहेत. त्यापैकी चौघे सद्य लसींना मध्यम प्रमाणात विरोध करणारे (evaders) आहेत, तर एक अल्प विरोध करणारा आहे.
सद्य लसी या अजूनही विषाणूला भारी आहेत असे तज्ञ म्हणताहेत. पण बहुतेक मोठ्या उत्पादकांनी विषाणूच्या बदलानुसार लसीमधील तांत्रिक बदल सुरू केलेले दिसतात.
शेवटी सतत बदल करत राहण्याऐवजी एकच सर्वसमावेशक (युनिव्हर्सल) लस करता येईल का, याचा उहापोह चालू आहे.
इंजेक्शनद्वारा दिलेल्या लसीमुळे शरीरात केंद्रीय प्रतिकारशक्ती चांगली निर्माण होते. परंतु श्वसनमार्गात स्थानिक प्रतिकारशक्ती फारशी निर्माण होत नाही. ही शक्ती देखील महत्वाची असते कारण मुख्यत्वे तिच्यामुळे एखाद्या व्यक्तीकडून दुसरीस होणारा रोगप्रसार आटोक्यात येतो. त्यादृष्टीने अशा काही लसींचे संशोधन सुरु आहे. भारतातील परिस्थिती अशी आहे:

१. भारत बायोटेकने नाकाद्वारे घ्यायची लस बनवली असून त्याचे मानवी शास्त्रीय प्रयोग सुरू झालेले आहेत.
२. प्रेमास बायोटेकने तोंडातून घ्यायच्या कॅप्सूलच्या माध्यमातून लस विकसित केली आहे. तिचे प्राणीप्रयोग यशस्वी झालेले आहेत.

लसींच्या जोडीने उपचारांवरही संशोधन सातत्याने चालू आहे. त्यापैकी नवीन घडामोडी :
१. १० फेब्रुवारी रोजी अमेरिकेच्या औषध प्रशासनाने Bamlanivimab and Etesevimab (Antibodies) या औषधांच्या संयुक्त वापराला आपत्कालीन वापराची परवानगी दिली.
सौम्य ते मध्यम आजार असलेल्या रुग्णांना हे दिल्यास आजार रोखला जातो.

2. Monlupiravir : हे औषध तोंडाने घ्यायची गोळी असून त्याचे सध्या दुसऱ्या टप्प्यातील रुग्णप्रयोग काही ठिकाणी चालू आहेत. ते औषध शरीरात गेल्यानंतर करोना विषाणूचे पुनरुत्पादन थांबवते. अधिक अभ्यासांती चित्र स्पष्ट होईल. तोंडाने घ्यायची गोळी हा तिचा महत्त्वाचा फायदा राहील.

३. Favipiravir (गोळी) या औषधाला भारतात ‘आपत्कालीन वापराची परवानगी’ या आधीच मिळालेली आहे. काही रुग्णांना त्याचा चांगला उपयोग होत आहे. तरीसुद्धा त्याच्या उपयोगितेचा पुरेसा विदा अजून उपलब्ध नाही. त्याच्या वापराबाबत तज्ञांत मतांतरे आहेत. रुग्णास जर मूत्रपिंडाची सहव्याधी असेल तर हे औषध काळजीपूर्वक द्यावे लागते.

४. Ivermectin : हे पूर्वापार जंतावरील औषध कोविड रुग्णांसाठी भारत आणि दक्षिण आशियात बर्‍यापैकी वापरलं जातं आणि त्याचे अनुभव चांगले आहेत. मात्र WHOने त्याचा सरसकट वापर करू नये असे म्हटले आहे; सध्या ते फक्त शास्त्रीय रुग्णप्रयोगादरम्यान वापरले जावे असे सुचविले आहे.

वैद्यकाच्या अन्य उपचारपद्धतींमध्ये कोविड संबंधी काही संशोधन पुढे गेलेले असल्यास संबंधित जाणकारांनी जरूर भर घालावी.
महासाथ नियंत्रणात आणण्यासाठी लसीकरण आणि उपचारांच्या जोडीने मूलभूत त्रिसूत्री आणि गर्दी टाळण्याची शिस्त दीर्घकाळ ठेवावी लागेल.

....
तर असा आहे हा गेल्या २ महिन्यातील घडामोडींचा परामर्श. खरं म्हणजे ही महासाथ जर या वर्षाच्या प्रारंभीच बरीचशी आटोक्यात आली असती तर या विषयावरील वाढत्या चर्चेचे काही कारण नव्हते. परंतु निसर्गाला अजून तरी हे मंजूर नाही असे दिसते. त्यामुळे सध्या तरी वैज्ञानिक व संबंधित सामाजिक घटनांचा आढावा घेणे एवढे आपण करूया. नेहमीप्रमाणेच प्रश्न, पूरक माहिती आणि व्यक्तिगत अनुभव अशा विविधांगी चर्चेचे स्वागत आहे.
…………………………………………………

प्रतिक्रिया

ॲबसेंट माइंडेड प्रोफेसर's picture

2 Apr 2021 - 10:47 am | ॲबसेंट माइंडेड ...

लेख आवडला. चर्चा वाचायला आवडेल.

प्रचेतस's picture

2 Apr 2021 - 11:46 am | प्रचेतस

उत्तम लेख.
लस आणि उपचार, दोन्ही पद्धतींचा घेतलेला आढावा आवडला.

कुमार१'s picture

2 Apr 2021 - 4:37 pm | कुमार१

अ‍ॅ मा व प्रचे.
धन्यवाद !
..................
कुठलाही विषाणू निसर्गानुसार जनुकबदल करतच राहणार आणि त्याचे नवे अवतार येणार. यासंदर्भात वैज्ञानिक Daniel Reeves यांनी एक गणिती प्रारुप समोर ठेवले आहे. ते असे :

समजा, विषाणूच्या नव्या प्रकाराने एका व्यक्तीस बाधित केलंय आणि ही व्यक्ती समाजात त्रिसूत्रीचे पालन न करता वावरते आहे.
१. जर का तिचा संपर्क एका वेळेस अन्य एकाच व्यक्तीशी आला, तर विषाणूचा नवा प्रकार दुसऱ्यात जातो पण ‘बाय चान्स’ (संख्याशास्त्रानुसार) तो मरण्याचीही शक्यता बरीच असते.

२. पण जर ही बाधित व्यक्ती एका वेळेस पाच जणांच्या संपर्कात आली आणि त्या सर्वांना बाधित केले, तर आता नवा विषाणू जगण्याची व फोफावण्याची शक्यता बरीच वाढते.

३. त्याही पुढे जाऊन ही व्यक्ती एका वेळेस 20 जणांच्या संपर्कात आली तर प्रसारित झालेला विषाणू म्हणून पुढे जगतो तर जगतोच, आणि कालांतराने निसर्गात बलाढ्य होतो.

सारांश : त्रिसूत्री आणि विशेषतः समूह नियंत्रण सध्या महत्त्वाचेच. जनुक बदललेल्या विषाणूवर नियंत्रण आणण्याचा तो पण एक मार्ग असतो.

कोविड लस व नन्तर यासम्बन्धी समज गैरसमज याविशयी
.

चौकटराजा's picture

2 Apr 2021 - 5:22 pm | चौकटराजा

.

चामुंडराय's picture

4 Apr 2021 - 5:34 am | चामुंडराय

सध्या कायप्पा वर एका डॉक्टरांचा मेसेज फिरतो आहे IGg antibodies बद्दल. १०, १२, २०, २८ वगैरे आकडे दिले आहेत.
हे काय आहे?

किती पाहिजे IGg antibodies?

कुमार१'s picture

4 Apr 2021 - 9:26 am | कुमार१

आपल्याला कुठलाही जंतुसंसर्ग झाला की काही दिवसांत आपले शरीर प्रतिपिंडे (Ab) तयार करते. ती एकूण ५ प्रकारची असतात.

त्यापैकी IgG व IgM ही प्रमुख असतात. कोविडमध्येही ही तयार होतात. अर्थात ती रक्तात मोजणे ही काही रोगनिदान चाचणी नव्हे. ती आढळली याचा अर्थ संसर्ग होऊन गेलेला आहे.

ती मारक व अ-मारक अशा २ प्रकारची असतात. यापैकी नक्की कुठली मोजली आहेत, चाचणी पद्धतीचे परिमाण कुठले, हे सर्व माहित असल्याशिवाय नुसत्या आकड्यांना काही अर्थ नाही.

मुक्त विहारि's picture

4 Apr 2021 - 6:13 am | मुक्त विहारि

वाखूसा

चौकटराजा's picture

4 Apr 2021 - 10:09 am | चौकटराजा

आजच्या महाराष्ट्र टाइम्स मध्ये डॉ उज्ज्वला दळवी यांचा प्रदीर्घ लेख विषाणू या संबंधी आला आहे तो सर्वानी सावकाश ,समजून घेत घेत अवश्य वाचावा ! काहीतरी वेगळे थ्रिल म्हणून न शिजवता मांसाहार करणे हे विषाणू मनुष्य देहात संक्रमित करण्याचा राजमार्ग आहे हे त्यांनी अधोरेखित केले आहे ! ( एच आय व्ही रिसस माकडे संबंध असाच आलेला काय ? )

कुमार१'s picture

4 Apr 2021 - 4:33 pm | कुमार१

चौरा
तो लेख इ आवृत्तीत दिसत नाही.

चौकटराजा's picture

4 Apr 2021 - 5:37 pm | चौकटराजा

जमल्यास फोटो काढून व्हाट्सअप वर पाठवतो !! )

नाही दिसत लेख तिथे.आणि मांस पूर्ण शिजवल्यावर जंतू मरतात ..मला वाटत बरेच विषाणूही मरतात ,तेव्हा संसर्गाचा धोका कच्च्या मांसामुळेच होऊ शकतात.

नाही दिसत लेख तिथे.आणि मांस पूर्ण शिजवल्यावर जंतू मरतात ..मला वाटत बरेच विषाणूही मरतात ,तेव्हा संसर्गाचा धोका कच्च्या मांसामुळेच होऊ शकतात.

Rajesh188's picture

4 Apr 2021 - 10:20 am | Rajesh188

कोणत्याही डॉक्टर नी, विचारवंतांनी,विज्ञान विषयात लेखन करणाऱ्या लोकांनी.
पूर्ण अभ्यास,भक्कम पुरावे,मोठ्या संख्येनी अभ्यास करून आलेला निष्कर्ष नसेल तर असल्या संवेदनशील मुद्द्यावर लेखन करून ती प्रसारित करू नये.
Dr दलवी ह्यांनी किती लोकांचा अभ्यास करून मांसाहार विषयी मत मांडले आहे.
त्यांच्या कडे भक्कम पुरावा आहे का.
की त्यांना वाटत म्हणून मांसाहार आणि विषाणू चा संबंध जोडला आहे.

चौकटराजा's picture

4 Apr 2021 - 4:14 pm | चौकटराजा

मांसाहार व विषाणू यांचा थेट संबंध नाही ! मांस कच्चे खाणे किंवा प्राण्यांशी शरीर संबंध यातून विषाणू माणसात संक्रमित होतो याविषयी जागतिक स्तरावर संशोधन झाले आहे . त्याचा आधार घेऊन डॉ दळवी यांनी लेख लिहिला असावा !

आनन्दा's picture

5 Apr 2021 - 8:43 am | आनन्दा

संम ला विनंती आहे की या आयडीला आपले अर्धवट मत कुठेही व्यक्त करायला मनाई करण्यात यावी..
पहिले पहिले मजा वाटत होती.
पण आता सगळीकडे तोडलेले असले तारे बघून वैताग यायला लागला आहे.

कुमार१'s picture

4 Apr 2021 - 10:20 am | कुमार१

चौरा,
धन्यवाद
...

एच आय व्ही रिसस माकडे संबंध असाच आलेला काय ?

>>

याचे विवेचन मी आधी इथे केलेले आहे :
https://misalpav.com/node/43784

मुळात हा खतरनाक विषाणू माणसात आला कुठून याचे संशोधकांना कुतूहल होते. हा शोध घेता त्याचे मूळ मध्य व पश्चिम आफ्रिकेत सापडले. तेथील चिम्पान्झी आणि अन्य काही माकडांना त्याचा संसर्ग होतो. २०व्या शतकाच्या मध्यात या प्रदेशांत माणसे वृक्षतोडीसाठी ट्रकने जाऊ लागली. त्या दरम्यान ती तेथील वन्य जिवांच्या शिकारी आणि त्यांचे मांसभक्षण करू लागली. त्यातूनच कधीतरी एखाद्या HIV संसर्ग झालेल्या मांसातून हा विषाणू माणसाच्या संपर्कात आला. अशा तऱ्हेने बाधित झालेल्या माणसातून तो समाजात आला आणि पुढे जगभर फैलावला.

Rajesh188's picture

4 Apr 2021 - 1:45 pm | Rajesh188

बाधित व्यक्ती च्या किती वेळ संपर्कात आल्यावर संक्रमण होवू शकत.
नॉर्मल दोन चार मिनिट संपर्क पण बाधित करू शकतो का.
आणि संसर्ग होणे बाधित लोकशी संबंध आल्यावर कशावर अवलंबून असते.
प्रतिकार शक्ती चांगली असेल तर संसर्ग होत च नाही की symptron तीव्र नसतात.
नक्की काय.

Rajesh188's picture

4 Apr 2021 - 1:45 pm | Rajesh188

बाधित व्यक्ती च्या किती वेळ संपर्कात आल्यावर संक्रमण होवू शकत.
नॉर्मल दोन चार मिनिट संपर्क पण बाधित करू शकतो का.
आणि संसर्ग होणे बाधित लोकशी संबंध आल्यावर कशावर अवलंबून असते.
प्रतिकार शक्ती चांगली असेल तर संसर्ग होत च नाही की symptron तीव्र नसतात.
नक्की काय.

कुमार१'s picture

4 Apr 2021 - 3:42 pm | कुमार१

राजेश

बाधित व्यक्तीच्या कितीकाळ पेक्षा निकटचा किंवा वारंवार संपर्क जास्त महत्त्वाचा आहे.
तसेच बाधित व्यक्ती किती प्रमाणात बाधित आहे हे महत्त्वाचे.
त्याचबरोबर ती शिंकत अथवा खोकत असेल तर ते अधिक घातक ठरते.

ज्या व्यक्तीला संसर्ग होईल तिच्या एकंदरीत प्रतिकारशक्ती आणि सहव्याधी आहेत किंवा नाही, यावर पुढील भवितव्य ठरेल

मुक्त विहारि's picture

4 Apr 2021 - 6:28 pm | मुक्त विहारि

घटा घटाचे रूप आगळे,

त्यामुळे एकाच वयोगटातल्या, सारखीच प्रकृति असलेल्या माणसांना पण, हा विषाणू बाधित करेलच असेही नाही आणि बाधित करणार नाहीच, असे ठोस काही सांगता येत नाही....

जसे की, एकाच मात्यापित्याच्या पोटी जन्म घेतलेल्या एका व्यक्तीला कॅन्सर होतो तर इतरांना नाही...

माझ्या मावशीला कॅन्सर झाला होता पण, तिच्या इतर भावंडांना नाही ...

प्लेग, देवी, काॅलरा ह्या साथीच्या रोगांत पण, हे आजारपण प्रत्येकाला झाला नाही...

चौकटराजा's picture

5 Apr 2021 - 9:42 am | चौकटराजा

आजच्या "म टा " मध्ये एका रखवालदाराने कुत्र्याबरोबर अनैसर्गिक चाळे केल्याची बातमी आली आहे ! रुचिवैचित्र्य असावे पण किती ... ? असेच चाळे आफ्रिकेत कोणीतरी माकडाबरोबर करून एक आय व्ही माणसात आणला असेल की नाही ...?

मी मुंबईत राहत असताना एका प्राणी रक्षक संघटनेकडे माझा संबंध होता. कुत्र्याचा बलात्कार (मानवाकडून) हि फारच कॉमन गोष्ट होती. सादर संघटना दिवसाला किमान १५ भटक्या कुत्रांना मदत करत होती आणि आठवड्याला किमान एक तरी कुत्री अशी मिळायची जिची दुखापत पाहून हिच्या सोबत कुकर्म केले गेले आहे हे समजायचे. मग किमान दोघा लोकांना (दोन्ही रखवालदार होते) पकडून पोलिसांच्या तावडीत दिले होते आणि एकाला तर चान्गली मोठी शिक्षा सुद्धा झाली होती. एकटा राजकीय कनेक्शन वापरून सुटला.

Rajesh188's picture

5 Apr 2021 - 10:23 am | Rajesh188

स्त्री सोडून बाकी कोणत्या ही प्राण्यांशी सेक्स ची भावना निर्माण होणे.
स्त्री स्त्री सेक्स ची भावना निर्माण होणे
पुरुष पुरुष सेक्स ची भावना निर्माण होणे.
ही सर्व विकृत मनोवृत्तीची लक्षण आहेत.
त्या मधून वाईट च रिझल्ट येईल.

कुमार१'s picture

5 Apr 2021 - 11:19 am | कुमार१

विविध रुग्णालयांमध्ये गेली दीड वर्ष डॉक्टर्स आणि त्यांचे सहकारी प्रत्यक्ष कोविडचे रुग्ण हाताळत आहेत. ते करत असताना स्वतःच्या संरक्षणासाठी त्यांना पीपीइ तत्त्वावरील संपूर्ण पोशाख घालावा लागतो. हा पोशाख घालून काम करणे हे अजिबात सुखावह नाही हे आपण जाणतो.
एव्हाना यासंदर्भात अशा पोशाखाने आरोग्य सेवकांवर होणाऱ्या परिणामांचा देखील पुरेसा अभ्यास झालेला आहे. अशा पोशाखाचे व्यक्तीवर आणि त्याच्या कामावर होणारे दुष्परिणाम आता उजेडात आले आहेत. त्याचा हा आढावा.

१. एन ९५ मास्क्स: यांच्या रचनेत आतील हवेचा दाब बाहेरीलपेक्षा कमी होत असतो आणि त्यामुळे ते घातलेल्या व्यक्तीस कष्टप्रद श्‍वसन करावे लागते.
२.काम करतानाचे दृष्टीक्षेत्र कमी होते तसेच श्रवण मर्यादाही येतात. यातून शल्यक्रिया करताना बराच तोटा होऊ शकतो.

३. स्पर्श संवेदना कमी होते.
४. पोषाखामुळे उष्णतावाढ आणि शरीरदाह होऊ शकतो.

५. हलक्या दर्जाच्या उपकरणांमुळे अंगावर घट्टे पडणे वगैरे जखमा देखील होतात.
६.या सगळ्यांचा एकत्रित परिणाम म्हणजे संबंधिताच्या शारीरिक व मानसिक आरोग्यावरही दुष्परिणाम होतो. काम केल्यानंतर प्रचंड शीण जाणवतो.

७.काही जणांना त्या पोशाखाच्या बंदिस्तपणामुळे गुदमरुन भीती देखील वाटते. काही वेळेस डोके हलके पडणे आणि बोटांना मुंग्या येणे हे देखील आढळले आहे.
८.सहकार्‍यांशी आवश्यक संवादावर विपरीत परिणाम होतो. अन्य सहकाऱ्यांना डॉ ची देहबोली समजणे अवघड होते.

९. हातांच्या अशा कौशल्यपूर्ण कामांवर दुष्परिणाम होतो.
१०. अखेरीस संपूर्ण पोषाख चढवणे आणि उतरवणे हेही खूप कटकटीचे काम असते. कित्येकदा पोशाख काढण्याच्या प्रक्रियेतून देखील अनेक डॉक्टर्स आणि सहकाऱ्यांना जंतूसंसर्ग झालेला आहे.

कुमार१'s picture

5 Apr 2021 - 11:20 am | कुमार१

वर उल्लेख केलेल्या आरोग्य सेवकांना अजूनही बराच काळ असा पोशाख घालून वावरावे लागणार आहे. त्यादृष्टीने त्याचे दुष्परिणाम कमी करण्याचे प्रयत्नही विविध पातळ्यांवर चालू आहेत त्यापैकी काही उपाय असे :

१. उष्णतादाह होणार नाही व बाष्प कमीतकमी साठेल अशी पोशाखांची रचना
२. संबंधितांनी डोळ्यांचे , मानेचे व हातांचे विशिष्ट व्यायाम काम करता करता अधूनमधून करणे.

३. हा पोशाख घातल्यामुळे एरवीपेक्षा त्याच कामास जास्त वेळ लागणार आहे याची सर्वांनीच दखल घेणे.
४. अशा पोशाख उत्पादनाचा दर्जा चांगल्या प्रतीचा राहील हे पाहणे.

चौकटराजा's picture

5 Apr 2021 - 12:53 pm | चौकटराजा

पावसाळ्यात एक संध असा रेनकोट घातला की आपला चेहरा जरी उघडा असेल तरी त्वचेला कमालीचा त्रास होतो !!

कुमार१'s picture

5 Apr 2021 - 9:13 pm | कुमार१

नुकतीच मला महाराष्ट्र कोविड विशेष वैद्यक कृती दलाची रूग्णांसाठीची 23 मार्च 2021 ची सुधारित मार्गदर्शक तत्त्वे मिळाली. त्यातील सर्वांना उपयुक्त असा निवडक भाग इथे टप्प्याटप्प्याने देईन.

पहिला तक्ता याप्रमाणे :
ok

लई भारी's picture

6 Apr 2021 - 8:52 pm | लई भारी

माहितीपूर्ण लेखमालिकेत भर. आपण निवडलेला फॉरमॅट चांगला आहे.
आपण म्हणालात त्याप्रमाणे दुर्दैवाने हा विषाणू प्रसार चालूच आहे त्यामुळे यावर अजून चर्चा करावी लागते आहे.

हा nature.com वरचा एक चांगला लेख वाचला होता म्हणजे आधीची गृहीतके कशी बदलत आहेत त्यामुळे सगळीकडेच कसा गोंधळ उडतोय याबद्दल थोडे लिहिले आहे. आपल्याकडे सगळ्या गोष्टी संशयाने बघितल्या जातात त्या पार्श्वभूमीवर गरजेची माहिती.

कुमार१'s picture

7 Apr 2021 - 7:43 am | कुमार१

ल भा,

तुम्ही एक चांगला दुवा दिलेला आहेत. धन्यवाद.
बरेच दिवसांनी तुमची भेट झाली.
त्या दुव्यामध्ये बरेच काही चांगले मुद्दे विचार करण्याजोगे आहेत.
सावकाशीने वाचायला घेतो.

कुमार१'s picture

7 Apr 2021 - 12:18 pm | कुमार१

जागतिक आरोग्य दिनानिमित्त उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा !

कुमार१'s picture

21 Apr 2021 - 9:41 am | कुमार१

कोविडच्या धुमाकूळानंतर एक लक्षात आले आहे की आता दीर्घकाळ या विषाणूसोबत जगावे लागणार आहे. त्यादृष्टीने लसीकरणावर अधिकाधिक लक्ष केंद्रित करावे लागेल. सध्याच्या लसीमधील मर्यादा आणि दुष्परिणाम लक्षात आल्यामुळे आता त्या सुधारण्यासाठीचे भावी संशोधनही एकीकडे चालू झाले आहे. या संशोधनातून खालील सुधारणा करण्याचे योजिले आहे :

१. सामान्य वातावरणाच्या तापमानात स्थिर राहतील अशा लसी बनवणे.
२. लसीची मात्रा कमीत कमी राहील आणि शक्यतो एकच डोस पुरेल यादृष्टीने प्रयत्न.

३. इंजेक्शनविरहित लसी : याचे ७ प्रकारचे प्रयोग चालू आहेत. या नाकातून वा तोंडातून घ्याव्या लागतील.
४. करोना विषाणूंच्या सर्व ज्ञात जातीजमाती मिळून एकच सर्वसमावेशक लस करणे.

५. इन्फ़्लुएन्ज़ा आणि करोना या दोन्ही विषाणूंच्या विरोधातली संयुक्त लस निर्मिती

पाचही सुधारणा अगदी गरजेच्या आहेत आणि त्यांमुळे कोरोनाविरुद्धच्या लढाईला बळ मिळेल.
हे लवकर होवो ही प्रार्थना!

अनेक अज्ञात जिवाणू विषाणू पृथ्वी वर असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
विविध प्राणी ,पक्षी ह्यांच्या मध्ये अज्ञात विषाणू,जिवाणू असू शकतात ते कधी स्वतः मध्ये बदल करून माणसात संक्रमण करतील.
मला तर सर्वात जास्त भीती वाटते आहे ती ही .
माणूस चंद्र, मंगळ,विविध धूमकेतू,आणि स्पेस मध्ये जात आहे.ह्या अवकाश वारी मधून कधी पृथ्वी ला अगदी अनोळखी असलेला विषाणू ,जिवाणू पृथ्वी वर येवून हाहाकार majvu नये.
फक्त sars ला डोळ्या समोर ठेवून संशोधन करण्या पेक्षा .
विषाणू आणि जिवाणू वर अतिशय डिटेल संशोधन निरंतर चालू असावे. आणि त्याच बरोबर मानवी शरीराची प्रतिकार शक्ती कशी अभेद करता येईल ह्या वर संशोधन निरंतर होत राहिले पाहिजे.

चित्रगुप्त's picture

25 Apr 2021 - 1:44 pm | चित्रगुप्त

मानवी आरोग्यासाठी हजारों वर्षांपूर्वीच योग-आयुर्वेद यांची निर्मिती केली गेलेली आहे. त्यांची कास आतातरी धरणे अत्यावश्यक झालेले आहे. (औषधे हा आयुर्वेदाचा फक्त एक लहानसा भाग आहे). महर्षी पतंजलींनी योगसूत्रात संपूर्ण आयुष्य आणि ब्रम्हांडाची उकल करुन ठेवलेली आहे. पतंजली योगसूत्रांबद्दल ओशोंचे विवेचन उत्तम आहे.

कुमार१'s picture

23 Apr 2021 - 4:46 pm | कुमार१

ताजी बातमी :
"ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया अर्थात DGCI ने आपत्कालीन वापरासाठी झायडस कॅडिला (Zydus Cadila) कंपनीच्या 'विराफीन' (Virafin) या औषधाला कोरोनाच्या उपचारांसाठी आपत्कालीन वापरासाठी मान्यता दिली आहे. "

हे औषध त्वचेखाली इंजेक्शनद्वारे एकाच डोसमध्ये घ्यायचे आहे.
Pegylated Interferon alpha-2b असे त्याचे शास्त्रीय नाव आहे.

कुमार१'s picture

26 Apr 2021 - 1:47 pm | कुमार१

कोविडच्या राष्ट्रीय पातळीवरील एका कार्यशाळेत सहभागी झालो होतो. त्यातून समजलेले उपयुक्त मुद्दे:

१.घरी पल्स ऑक्सीमीटरने मोजणी करताना नेहमी हाताचे मधले बोटच वापरा; तर्जनी नको.
कुठलीही लक्षणे नसताना मापन कमी आले तर लगेच अस्वस्थ होऊ नये. १ मिनिटाच्या अंतराने ३ मापने घ्यावीत व त्याची सरासरी बघावी. काही वेळेस उपकरण बदलूनही मापन वेगळे येते.

२. ज्याना कोविड होऊन गेला आहे त्यांनी लस कधी घ्यावी याचे एकच एक उत्तर नाही. लक्षणे ओसरल्यानंतर एक ते तीन महिने या मुदतीत कधीही घेतलेली चालेल ( पहिला डोस असो अथवा दुसरा).
३. आजाराच्या सौम्य अवस्थेत अँटिबायोटिक्स अजिबात घेऊ नयेत; त्यांची गरज नाही.

४. रेमडेसिविर हे फक्त रुग्णालयात दाखल असलेल्या व ऑक्सिजन द्याव्या लागणाऱ्या रूग्णांसाठीच वापरावे. प्रत्यक्ष आजाराचे दहा दिवस उलटून गेल्यावर त्याचा उपयोग होत नाही.
५. लक्षणे असून rtpcr -ve आल्यास पुन्हा करावी. सलग दोनदा -ve आल्यासच डॉ HRCT चा निर्णय घेतील. रुग्णांनी स्वतःहून HRCTचा आग्रह करू नये.

६. जे रुग्ण सौम्य आजाराचे असून घरीच आहेत त्यांना स्वतःहून पोटावर झोपून कुठलाही फायदा होत नाही. पोटावर काही काळ झोपविण्याचा उपाय हा फक्त रुग्णालयात दाखल व ऑक्सिजन लावलेल्या रुग्णांसाठीच आहे.

तुषार काळभोर's picture

26 Apr 2021 - 2:38 pm | तुषार काळभोर

अधिकृत डॉक्टरांच्या अधिकृत कार्यशाळेतील हे अधिकृत मुद्दे व्हायरल करणे जास्त उपयुक्त आहे.

कुमार१'s picture

27 Apr 2021 - 11:36 am | कुमार१

हात तुटलेला रुग्ण >> शस्त्रक्रिया >> रुग्णाला कोविडबाधा >> यशस्वी उपचार.

जे जे हॉस्पिटल मधील सर्व डॉक्टर चमूचे हार्दिक अभिनंदन !

बापूसाहेब's picture

27 Apr 2021 - 12:48 pm | बापूसाहेब

सुखद बातमी. डॉक्टरांचे कौतुक करावे तितके थोडे..

कुमार१'s picture

28 Apr 2021 - 8:06 am | कुमार१

ही पहा परदेशातील बनावट औषधविक्री :

एका अमेरिकी कुटुंबाने कोविडवर रामबाण उपाय म्हणून "Miracle Mineral Solution," असले एक बनावट औषध गेले वर्षभर कित्येकांना विकले व लाखोंचा धंदा केला.
वास्तविक हे पचनसंस्थेला त्रासदायकच प्रकरण होते. अखेरीस या कुटुंबाला अटक झालेली असून आता त्यांच्यावर खटला चालेल.

कठीण आहे - विकणारे आणि विकत घेणारे पण !

(U.S. District Court, Southern District of Florida: "Case 21-20242-CR-ALTONAGA/TORRES.")

आग्या१९९०'s picture

28 Apr 2021 - 8:23 am | आग्या१९९०

आपली जनता थोडक्यात बचावली अशा बोगस औषधापासून. WHO ने मान्यता दिली असा दावा केला होता ,वेळीच WHO ने खुलासा केला ते बरे झाले.

विवेकपटाईत's picture

1 Oct 2021 - 3:06 pm | विवेकपटाईत

WHO कुठल्याही औषधाला मान्यता देत नाही. प्रत्येक देशातील स्वास्थ्य विभाग मान्यता देतो. तुम्ही ज्या औषधी विषयी म्हणतात त्या कॉरोनील ला मान्यता आपल्या देशाच्या स्वास्थ्य विभागाने दिली आहे. त्या औषधीचे निर्माण WHO निर्धारित मापदंडानुसार झाल्याने WHO प्रमाणपत्र ( ज्या देशांत WHO मापदंड स्वीकृत आहे) अर्थात १५५ देशात निर्यातीची अनुमती आपल्या देशातील स्वास्थ्य विभागाने दिली. शंका असेल तर आरटीआई करून तथ्य तपासू शकतात. देशातील कोट्यावधी लोकांनी हे औषध घेऊन प्राण वाचविले. कॉरोनील विरुद्ध अफवा पसरवून रुग्णांना भ्रमित करून किती लोकांचे प्राण गेले याचा हिशोब करणे गरजेचे. बाकी लाखो मेडिकल कार्यकर्त्यांनी हेच औषध घेतले आहे त्यात हजारो डॉक्टर हि आहेत.

कॉरोनील हे एक मात्र औषध आहे ज्याच्या घटक पदार्थांवर अनुसंधान झालेले आहे आणि जागतिक दर्जाच्या मेडिकल जर्नल मध्ये प्रकाशित झाले आहे. स्वत: तपासू शकतात. https://www.patanjaliresearchinstitute.com/covid-19.php२०२१
1. Balkrishna, A.; Pokhrel, S.; Varshney, A. Tinocordiside from Tinospora cordifolia (Giloy) May Curb SARS-CoV-2 Contagion by Disrupting the Electrostatic Interactions between Host ACE2 and Viral S-Protein Receptor Binding Domain. Combinatorial Chemistry & High Throughput Screening 2020.

https://europepmc.org/article/med/33172372
https://pubmed.ncbi.nlm.nih.gov/33172372/

2. Balkrishna, A.; Solleti, S.K.; Verma, S.; Khandrika, A.; Varshney, A. Calcio-Herbal Medicine Divya-Swasari-Vati Ameliorates SARS-CoV-2 Spike Protein-Induced Pathological Features and Inflammation in Humanized Zebrafish Model by Moderating IL-6 and TNF-α Cytokines. Journal of Inflammation Research 2020, 13, 1219.

https://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC7783203/
https://pubmed.ncbi.nlm.nih.gov/33414643/

3. Balkrishna, A.; Solleti, S.K.; Verma, S.; Varshney, A. Application of Humanized Zebrafish Model in the Suppression of SARS-CoV-2 Spike Protein Induced Pathology by Tri-Herbal Medicine Coronil via Cytokine Modulation. Molecules 2020, 25, 21, 5091.

https://www.mdpi.com/1420-3049/25/21/5091
https://pubmed.ncbi.nlm.nih.gov/33147850/

4. Balkrishna, A.; Thakur, P.; Singh, S.; Chandra Dev, SN.; Jain,V.; Varshney, A.; Sharma, RK. Glucose antimetabolite 2-Deoxy-D-Glucose and its derivative as promising candidates for tackling COVID-19: Insights derived from in silico docking and molecular simulations. Authorea 2020

https://www.authorea.com/doi/full/10.22541/au.158567174.40895611

1. Balkrishna, A.; Tomer, M.; Verma, S.; Joshi, M.; Sharma, P.; Srivastava, J.; Varshney. Phyto-metabolite profiling of Coronil, a herbal medicine for COVID-19, its identification by mass-spectroscopy and quality validation on liquid chromatographic platforms. Journal of Separation Science 2021

https://analyticalsciencejournals.onlinelibrary.wiley.com/doi/full/10.10...
https://pubmed.ncbi.nlm.nih.gov/34510772/

2. Balkrishna, A.; Sharma, P.; Joshi, M.; Srivastava, J.; Varshney, A. Development and validation of a rapid high-performance thin-layer chromatographic method for quantification of gallic acid, cinnamic acid, piperine, eugenol, and glycyrrhizin in Divya-Swasari-Vati, an ayurvedic medicine for respiratory ailments. Journal of Separation Science 2021

https://analyticalsciencejournals.onlinelibrary.wiley.com/doi/full/10.10...
https://pubmed.ncbi.nlm.nih.gov/34101986/

3. Balkrishna, A.; Bhatt, A.B.; Singh, P.; Haldar, S.; Varshney, A. Comparative Retrospective Open-label Study of Ayurvedic Medicines and Their Combination with Allopathic Drugs on Asymptomatic and Mildly-symptomatic COVID-19 Patients. Journal of Herbal Medicine 2021, 100472.

https://www.sciencedirect.com/science/article/pii/S221080332100052X
https://pubmed.ncbi.nlm.nih.gov/34055580/

4. Balkrishna, A.; Khandrika, L.; Varshney, A. Giloy Ghanvati (Tinospora cordifolia (willd.) Hook. f. & Thomson) Reversed SARS-CoV-2 Viral Spike-protein Induced Disease Phenotype in the Xenotransplant Model of Humanized Zebrafish. Frontiers in Pharmacology 2021, 12, 534.

https://www.frontiersin.org/articles/10.3389/fphar.2021.635510/abstract
https://pubmed.ncbi.nlm.nih.gov/33953674/

5. Balkrishna, A.; Devpura, G; Tomar, B.S.; Nathiya, D.; Sharma, A.; Bhandari, D.; Haldar, S.; Varshney. A, Randomized placebo-controlled pilot clinical trial on the efficacy of ayurvedic treatment regime on
COVID-19 positive patients.Phytomedicine 2021, 84, 153494.

https://www.sciencedirect.com/science/article/pii/S0944711321000362
https://pubmed.ncbi.nlm.nih.gov/33596494/

6. Balkrishna, A.; Mittal, R.; Sharma, G.; Vedpriya, A. Computational Insights of phytochemical Driven Disruption of RNA dependent RNA polymerase Mediated replication of Coronavirus: A Strategic Treatment Plan against COVID-19. New Microbes and New Infections 2021, 100878

https://www.sciencedirect.com/science/article/pii/S2052297521000421
https://pubmed.ncbi.nlm.nih.gov/33815808/

7. Balkrishna, A.; Raj, P.; Singh, P.; Varshney, A. Influence of Patient-Reported Treatment Satisfaction on Psychological Health and Quality of Life Among Patients Receiving Divya-Swasari-Coronil-Kit Against COVID-19: Findings from a Cross-Sectional “SATISFACTION COVID” Survey. Patient Preference and Adherence 2021, 15,899

https://www.dovepress.com/influence-of-patient-reported-treatment-satisf...
https://pubmed.ncbi.nlm.nih.gov/33958858/

8. Balkrishna, A.; Haldar, S.; Singh, H.; Roy, P.; Varshney, A. Coronil, a Tri-Herbal Formulation, Attenuates Spike-Protein-Mediated SARS-CoV-2 Viral Entry into Human Alveolar Epithelial Cells and Pro-Inflammatory Cytokines Production by Inhibiting Spike Protein-ACE-2 Interaction. Journal of Inflammation Research 2021, 14,869

https://www.dovepress.com/coronil-a-tri-herbal-formulation-attenuates-sp...
https://pubmed.ncbi.nlm.nih.gov/33758527/

9. Balkrishna, A.; Pokhrel, S.; Singh, H.; Joshi, M.; Mulay, V.P.; Haldar, S.; Varshney, A. Withanone from Withania somnifera attenuates SARS-CoV-2 RBD and host ACE2 interactions to rescue spike protein induced pathologies in humanized zebrafish model. Drug Design, Development and Therapy 2021, 15, 1111.

https://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC7961299/
https://pubmed.ncbi.nlm.nih.gov/33737804/

10. Balkrishna, A.; Mittal, R.; Vedpriya, A. Computational Evidences of Phytochemical Mediated Disruption of PLpro Driven Replication of SARS-CoV-2: A Therapeutic Approach Against COVID-19. Current Pharmaceutical Biotechnology 2021, 22, 10.

https://www.eurekaselect.com/187816/article
https://pubmed.ncbi.nlm.nih.gov/33176643/

11. Balkrishna, A.; Pokhrel, S.; Varshney, A. Phyto-compounds from a rather poisonous plant, Strychnos nux-vomica, show high potency against SARS-CoV-2 RNA-dependent RNA polymerase. Current Molecular Medicine 2021.

https://europepmc.org/article/med/33602083
https://pubmed.ncbi.nlm.nih.gov/33602083/

12. Balkrishna, A.; Shankar, R.; Srivastava, A.; Joshi, B.; Mishra, R.K. Role of traditional medicines as a challenge for Coronavirus (Covid-19). Indian Journal of Traditional Knowledge (IJTK) 2021, 19, S 118-S 123

http://14.139.47.23/index.php/IJTK/article/view/35902

कुमार१'s picture

30 Apr 2021 - 10:46 am | कुमार१

कोविडोत्तर बुरशीजन्य आजार

सध्याच्या लाटेत वरील आजाराचे काही रुग्ण आढळत आहेत. त्याची कारणमीमांसा :
मधुमेह/ सहव्याधी >> कोविड होतो (मध्यम ते तीव्र) >> रुग्णालयात स्टिरॉइड्स किंवा Tocilizumazb चे उपचार >> कोविड बरा होतो पण प्रतिकारशक्तीचे खच्चीकरण होते >> बुरशीजन्य आजार.

या आजाराची सुरुवात नाक व सायनसेस मध्ये होते. तिथून तो डोळे वा अन्यत्रही पसरू शकतो.
म्हणून कोविड बरा झाल्यानंतर सहव्याधीग्रस्त रुग्णांचे बारकाईने निरीक्षण करणे महत्त्वाचे.

रंगीला रतन's picture

30 Apr 2021 - 11:30 am | रंगीला रतन

माझे दोन नातेवाईक पहील्या लाटेत कोवीडग्रस्त झाले होते. त्यात एक स्त्री व एक पुरूष असुन दोघांचे वय ३० च्या आत आहे. आता त्याना आजारातुन बरे होउन वर्ष झाले असेल पण दोघांना जॅाइंट पेनचा खुप त्रास होतोय. कोवीडोत्तर काही जणांना असा त्रास होतो का? आपल्याही माहीतीत अशी उदाहरणे आहेत का?

कुमार१'s picture

30 Apr 2021 - 11:51 am | कुमार१

रंगीला

तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे.
असे रुग्ण प्रत्यक्ष माझ्या पाहण्यात नाहीत. परंतु कोविडचे दीर्घकालीन परिणाम शरीरातील सात महत्त्वाच्या अवयवांवर / यंत्रणांवर होतात.
त्यानुसार काही रुग्णांच्या बाबतीत सांधेदुखी आणि स्नायूंचा अशक्तपणा ही लक्षणे दीर्घकाळ राहू शकतात

रंगीला रतन's picture

30 Apr 2021 - 12:06 pm | रंगीला रतन

काही रुग्णांच्या बाबतीत सांधेदुखी आणि स्नायूंचा अशक्तपणा ही लक्षणे दीर्घकाळ राहू शकतात
बापरे!

गॉडजिला's picture

30 Apr 2021 - 7:58 pm | गॉडजिला

परंतु कोविडचे दीर्घकालीन परिणाम शरीरातील सात महत्त्वाच्या अवयवांवर / यंत्रणांवर होतात.
नको नको. आता तर स्वप्नातही घराबाहेर पडायचे धाडस करणार नाही. चटकन लस घ्यावी आणी ठेवीले अनंते तैसेची राहावे...

रंगीला रतन's picture

30 Apr 2021 - 8:22 pm | रंगीला रतन

असेच म्हणतो. फक्त एक बदल- मला लस पण नको!

कुमार१'s picture

3 May 2021 - 6:07 pm | कुमार१

आपल्यातील काही जणांना अथवा त्यांच्या नातेवाईकांना मध्यम अथवा तीव्र आजारासाठी रुग्णालयात दाखल करावे लागलेले आहे. अशा रुग्णांच्या गरजेनुसार विविध प्रयोगशाळा रक्ततपासण्याही केल्या जातात. एव्हाना मुख्य निदान चाचणी (rt-pcr) बद्दल सर्वांना पुरेशी माहिती आहेच. त्या व्यतिरिक्त केल्या जाणाऱ्या पूरक चाचण्यांचे महत्त्व दाखविणारा तक्ता :
ok

कुमार१'s picture

8 May 2021 - 7:19 pm | कुमार१

भारतीय INMAS-DRDO यांनी विकसित केलेल्या 2- D-ग्लुकोज या औषधास आपल्या औषध नियंत्रकांनी आपात्कालीन मान्यता आजच दिलेली आहे. हे औषध फक्त विषाणूबाधित पेशिंमध्येच जाते आणि तिथे विषाणूंची वाढ थांबवते.

मेडिकल ऑक्सिजनचे उपचार चालू असलेल्या रुग्णांसाठी हा एक चांगला पूरक उपचार आहे.

https://www.thehindu.com/news/national/dcgi-approves-anti-covid-drug-dev...

माहितगार's picture

10 May 2021 - 3:28 pm | माहितगार

रोचक आणि अभिनंदनीय, या बद्दल अधिक माहिती वाचण्यास आवडेल.

आणि एक बाळबोध प्रश्न मार्केट मध्ये जे ग्लुकॉन डी च्या नावाने ग्लुकोज मिळते (बहुधा वेगळे असावे चुकभूल देणे घेणे) त्यात आणि यात नेमके काय साम्य आणि भेद आहेत ?

कुमार१'s picture

10 May 2021 - 4:50 pm | कुमार१

मागा,
चांगला प्रश्न. कोणीतरी विचारेल असे वाटलेच होते !

ठीक आहे. या औषधाचे पूर्ण नाव लिहू :
२- deoxy-ग्लुकोज.

आपल्या नेहमीच्या ग्लुकोजमध्ये ऑक्सिजनचे सहा अणू असतात. त्यातील एक कमी केला की झाला २-deoxy-ग्लुकोज तयार.
हे पावडर स्वरूपातच आहे त्यामुळे पाण्यात विरघळून तोंडाने घ्यायचे आहे हा एक मोठा फायदा आता. हे पेशीं मध्ये गेल्यावर काय होते ते पाहू.

प्रत्येक पेशीला आपल्या शरीरातील ग्लुकोजची उर्जानिर्मिती आणि पर्यायाने जगण्यासाठी गरज असते. वरील औषध जेव्हा आपण रुग्णास देऊ तेव्हा ते फक्त विषाणूबाधित पेशींमध्येच पोहोचेल. त्या पेशीमध्ये या औषधापासून ऊर्जानिर्मिती होऊ शकत नाही आणि नेहमीच्या ऊर्जानिर्मितीत ते खोडा घालते. पर्यायाने त्या पेशींचा नाश होईल व त्याच बरोबर त्यांच्यातील विषाणूचा देखील.

रात्रीचे चांदणे's picture

10 May 2021 - 5:11 pm | रात्रीचे चांदणे

धन्यवाद, अतिशय महत्वाची माहिती तुम्ही देत आहात. परंतु ह्या औषधाची उपलब्धता सध्या किती आहे, मेडिकल मध्ये ते उपलब्ध आहे का? की अजून काही दिवसांनी ते उपलब्ध होईल?

कुमार१'s picture

10 May 2021 - 5:26 pm | कुमार१

वृत्तपत्रीय बातम्यांनुसार त्याचे विपणन ११/५ पासून होऊ शकेल.

२- deoxy-ग्लुकोज हे सध्या मार्केट मध्ये मिळणार्‍या ग्लुकॉन डी पेक्षा जरासे वेगळे आहे नविन आहे किंमत थोडी जास्त राहील हे समजण्यासारखे आहे पण या वृत्तानुसार किंमत खासगी क्षेत्रासाठी जवळपास हजार रुपये ठेवली जाणार आणि गव्हर्नमेंटला जरासे कंसेशन.

शहरी मध्यमवर्गीय लोकांना हजार रुपये किंमत अधिक वाटणारही नाही, पण शासकीय आरोग्य व्यवस्था नसलेला खूप मोठी लोकसंख्या ग्रामीण भागातून रहाते जिथे लस आणि ऑक्सीजन पुरवठा येते वर्षभर तरी पोहोचणार नाही त्यांना अल्पशी आशा २- deoxy-ग्लुकोज निर्माण होईल असे वाटले होते पण प्रत्यक्षात तसे होताना दिसत नाही. एका कुटूंबात पाच जणांना कोविड झाला शासकीय डिस्पेंन्सरी उपलब्ध नाही पण खासगी डॉक्टर उपलब्ध असेल तर पाच हजार मोजावे लागतील?

मार्केट मध्ये मिळणार्‍या ग्लुकॉन डी आणि २- deoxy-ग्लुकोज च्या उत्पादन प्रक्रीयेत असा नेमका किती फरक असणार आहे? येते वर्षभर तरी मागणी कमी रहाण्याची शक्यता नाही त्यामुळे स्केल ऑफ एकॉनॉमीक्स नाही असेही म्हणता येत नाही. उत्पादक कंपनीला संशोधनावरही खर्च करावा लागलेला नसणार.

कुमार१'s picture

29 May 2021 - 7:45 am | कुमार१

२- deoxy-ग्लुकोज च्या उत्पादन प्रक्रीयेत असा नेमका किती फरक असणार आहे?

>>>

याचे अभ्यासपूर्ण उत्तर औषधनिर्माण शास्त्रातील तज्ञ व्यक्ती देऊ शकेल.
मलाही जाणून घ्यायला आवडेल.

सुधीर कांदळकर's picture

10 May 2021 - 6:42 am | सुधीर कांदळकर

प्रश्नचिन्हाला या लेखातून नेमके आणि त्वरित उत्तर मिळाले. हे .औषध कसे काय काम करीत असेल हा तो प्रश्न होता. धन्यवाद

mucormycosis हि डोळ्यांना बाधणारा गंभीर बुरशीजन्य आजाराबद्दल माध्यमात चर्चा दिसते आहे. कोविड होऊन गेलेल्यांना खासकरून डायबेटीस असणार्‍यांना प्रतिकारशक्ती कमी असताना हा गंभीर आजार संभवत असावा असे बातम्यांवरून वाटते.

सर्वसाधारण हवेतूनही श्वसनावाटे बाधा होऊ शकत असावी, पण विशेषतः दमट आणि धूळ असलेल्या भागात मास्कचा आणि डोळ्यांसाठी सुरक्षीततेचे उपाय करणे श्रेयस्कर असावे असे वाचलेल्या माहितीवरून वाटले पण डॉक्टर मंडळींकडून प्रिव्हेंशन च्या दृष्टीने अधिक माहिती घेणे आवडेल.

मला आंजावर मिळालेले काही दुवे
* https://indianexpress.com/article/explained/mucormycosis-in-covid-patien...
* https://en.wikipedia.org/wiki/Mucormycosis
* https://www.cdc.gov/fungal/diseases/mucormycosis/risk-prevention.html
* https://www.cdc.gov/mold/faqs.htm (बुरशीप्रमाण कमी ठेवण्याचे उपाय)

शाम भागवत's picture

10 May 2021 - 7:46 pm | शाम भागवत

इथे लिहीली आहे तेच.

30 Apr 2021 - 10:46 am | कुमार१

कुमार१'s picture

10 May 2021 - 4:52 pm | कुमार१

इथे लिहीली आहे तेच.

30 Apr 2021 - 10:46 am | कुमार१

माहितगार's picture

10 May 2021 - 8:12 pm | माहितगार

धन्यवाद डॉ. कुमार,

आणखी दोन प्रश्न

१) खरे म्हणजे बुरशी जन्य आजाराने डोळे गमवावे लागणे हे वाचूनच कसेसे होते, त्यामुळे ततसंबंधी वृत्ते खरे म्हणजे डिटेल मध्ये वाचली नाहीत. पहिल्या कोविड लाटे पेक्षा बुरशी लागणचे प्रमाण या वेळी अधिक का आहे आणि चर्चेत असलेली बुरशी लागण स्वतः संसर्गजन्य नाही असे वाचण्यात आहे (चुभूदेघे) तर मग कोविड लागण झालेल्यांनी मागच्या लाटेत घेतली गेलेली काळजी या लाटेच्या वेळी घेतली जात नाही आहे अशी काही शक्यता आहे ?

२) दुसरे तर दुसरी लाट आधी पेक्षा मोठी असूनही पुर्नलागण विषयक आणि सेरोसर्वे विषयक फारश्या बातम्या वाचनात आल्या नाहीत, पण पुर्नलागण विषयक आणि सेरोसर्वे विषयक काही नवीन संशोधन अलिकडे पुढे आले आहे का?
(मागच्या वेळेपेक्षा माझे वाचनही कमी झाल्यामुळे लक्ष गेले नाही का माहित नाही त्यामुळे आधी चर्चा होऊन गेली असल्यास वरील प्रमाणे दुवा दिला तरी चालेल.)
आपल्या सातत्यपूर्ण माहितीपुर्ण मार्गदर्शनासाठी अनेक आभार

कुमार१'s picture

10 May 2021 - 8:56 pm | कुमार१

मागा
1.

बुरशी लागणचे प्रमाण या वेळी अधिक का आहे

तूर्त माझ्यासमोर तुलनात्मक विदा नाही. पण काही शक्यता अशा वाटतात :

दुसऱ्या लाटेमध्ये अधिक माणसे आजारी पडणे, अधिक रुग्णालयात दाखल करावी लागणे आणि ऑक्सिजनचे उपचार अधिक प्रमाणावर करावे लागणे या गोष्टी दिसून आल्यात.

आता बुरशीजन्य आजार होण्याची तीन कारणे पुन्हा बघू :
१. स्टिरॉइडचा अधिक डोसमध्ये व अधिक काळ वापर
२. रुग्णाचे अतिदक्षता विभागातील अधिक काळ वास्तव्य
३. काही रुग्णांच्या ऑक्‍सिजन उपचारादरम्यान ह्युमिडीफायर्स वापरतात. त्यातील पाणी निर्जंतुक केलेले नसणे.

वरील घटक या लाटेत कारणीभूत ठरले असावेत.

हाच प्रश्न होता.कारण समजलं.

गोंधळी's picture

10 May 2021 - 8:58 pm | गोंधळी

२ दिवसांपुर्वी आमच्या सोसाटीत राहणार्या एका ज्येष्ठ सदस्याचे लसीचा दुसरा डोस घेतल्या नंतर गुंतागुंत होउन निधन झाले. त्या आधी त्यांची प्रक्रुती चांगली होती.
अशा अजुन १/२ केसेस ऐकण्यात आल्या त्यामुळे आईला अजुन लस देण्याबाबत निर्णय होत नाही आहे.

कुमार१'s picture

10 May 2021 - 9:27 pm | कुमार१

गोंधळी,

जर एखाद्या व्यक्तीस विशिष्ट रसायनांची तीव्र ऍलर्जी असेल तर अशा व्यक्तीने ही लस घेऊ नये असे अधिकृत माहितीपत्रक सांगते. याची प्रत्येकाने स्वतःबाबत खातरजमा करावी.
लसीनंतर गंभीर दुष्परिणाम आणि मृत्यू यांचे प्रमाण अत्यल्प आहे. तरीसुद्धा मनात काही शंका असेल तर सर्वप्रथम तुमच्या नेहमीच्या डॉक्टरांशी सल्लामसलत करा आणि मग निर्णय घ्या.

कुमार१'s picture

11 May 2021 - 9:47 am | कुमार१

२.
भारताचे तिसरे राष्ट्रीय सिरोसर्वेक्षण 17 डिसेंबर ते 8 जानेवारी 2021 दरम्यान झाले. त्याचा विदा इथे उपलब्ध आहे
https://www.bbc.com/news/world-asia-india-55945382

माहितगार's picture

11 May 2021 - 12:50 pm | माहितगार

धन्यवाद, आणखी गुगलींग केल्यावर हे तीन वृत्त दुवे मिळाले , , ,

आपण थकलो तरी वीषाणू थकत नाहीए, सेरो सर्वेवरून अजून एका लाटेची शक्यता वाटतीए कदाचित तोपर्यंत ऑक्सीजन उपलब्धता आणि २ डी औषधाची उपलब्धता होईल पण मोठी जनसंख्या कोविडोत्तर दुष्परिणामांना झेलणार असेल असे दिसते.

एका सेरोसर्वेचे निरीक्षण कोविड होऊन गेलेल्यातील २० टक्के लोकांच्या अँटीबॉडीज प्रमाण सहामहिन्यानंतर कमी होते म्हणजे लस घेतली नाहीतर कोविड जोखीम कॅटेगरीत ते पुन्हा जातील?

कुमार१'s picture

11 May 2021 - 1:24 pm | कुमार१

होय, जोपर्यंत महासाथ चालू आहे तोपर्यंत जोखीम राहील.
कालांतराने विषाणू मित्रवत होण्याची वाट पहायची.

डॉ.हर्ड इम्यनिटी कशी मिळू शकेल,१४% लसीकरण झाले आहे.लसीकरणाशी संबंध कसा जोडला आहे?

कुमार१'s picture

12 May 2021 - 12:39 pm | कुमार१

सामूहिक प्रतिकारशक्ती हा अगदी किचकट विषय आहे. मुळात तो एक गणिती अंदाज असतो.

जेव्हा विषाणूचा संसर्ग दर एक लाख लोकांमागे फक्त एक व्यक्ती इतका कमी होतो, तेव्हा आपण हा आजार काबूत ठेवला आहे असे म्हणता येईल. सध्या इसराइल त्या अवस्थेत आहे( ०.८ प्रति एक लाख लोक).

किती टक्के लसीकरणाने अशी शक्ती येईल हे कोविडबाबत वादग्रस्त झालेले आहे.
उदाहरणार्थ अमेरिकेसंबंधी हा एक दुवा आहे :

Reaching ‘Herd Immunity’ Is Unlikely in the U.S., Experts Now Believe
https://www.nytimes.com/2021/05/03/health/covid-herd-immunity-vaccine.html

Bhakti's picture

12 May 2021 - 1:40 pm | Bhakti

सध्या इसराइल त्या अवस्थेत आहे( ०.८ प्रति एक लाख लोक).
तिथे ही अवस्था ,उपलब्धी अशीच राहो जेणेकरून कोवीड युद्धासाठी एक उत्तम उदाहरण होईल.
https://www.bbc.com/news/health-56722186

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

12 May 2021 - 11:54 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

च्यायला, या करोना महामारीच्या. करोना घडामोडींनी प्रत्येक दिवशी काही तरी नवीन येतं. भारतात गेल्या ऑक्टोंबरात सापडलेल्या करोनाचा बी. १.६१७ हा उत्परिवर्तीत विषाणू वेगाने पसरत असून त्यामुळे जगभरातच जोखीम झाली आहे. (अधिक वृत्त)

-दिलीप बिरुटे

कुमार१'s picture

12 May 2021 - 12:13 pm | कुमार१

बी १.६१७ बद्दल वैज्ञानिकांत मतभेद आहेत.

दुसरी बाजू :
१. या प्रकारात एकूण पंधरा जनुकीय बदल झालेले आहेत. त्यापैकी ठराविक दोघांचा ठळकपणे उल्लेख करून त्याला ‘डबल mutant’ असे चुकीचे नाव माध्यमांनी रूढ केले.
२. आता वरील जे दोन बदल आहेत त्यातील एक जुनाच (कॅलिफोर्नियावाला) आहे. तर दुसऱ्या बदलाचे जीवशास्त्रीयदृष्ट्या विशेष महत्त्व नाही.

३. म्हणून बी १.६१७ मुळेच भारतातील दुसरी लाट जोरात पसरली का, हे ठामपणे म्हणता येत नाही. या प्रकाराला गरजेपेक्षा जास्त प्रसिद्धी दिली गेली आहे.

सुखीमाणूस's picture

12 May 2021 - 10:18 pm | सुखीमाणूस

हा विषाणु उपप्रकार भारतिया आहे आणि जणु मोदि जबाबदार आहेत अशी जागतिक बदनमी झाली तर हवीच आहे.

चीन ने कधिही विषाणु फैलावाची जबाबदारी घेतली नाही.
आपले मोदी राजकिया विरोधक बाहेरच्या देशात मुलाखती देउन देउन देशाची बदनांमी करुन घेतील.

खरतर माझ्यासारख्या सामन्य व्यक्तीला असा प्रश्न कायम पडतोय की २०२० ल साथ आटोक्यात होती म्हणजे भारतियान्ची प्रतिकार्शक्ती नक्किच चान्गली आहे.
भारताच अपेक्शीत नुकसान होत नाही म्हणुन जनुकिया बदल करुन नवीन उपप्रकार तयार झाला असावा का?(नैसर्गिक, अनैसर्गिक?)
शेवटी विज्ञान असल तरी काही गोष्टिन्चा उलगडा होणे ही वेळ लागणारी प्रक्रिया आहे.

माहितगार's picture

12 May 2021 - 10:51 pm | माहितगार

दिव्यकिर्ती म्हणून व्लॉगरचा एक युट्यूब व्हिडीओ आला आहे. अफवां आणि चुकीची माहिती पसरवण्यापासून वाचण्याच महत्व या गृहस्थांनी छान विषद केल आहे. वैद्यकीय इन्फ्रास्ट्रक्चर कमी पडणे आणि सुपरस्प्रेडर इव्हेंट यावरून सरकारवरही टिका आहे पण जबाबदारीने केलेली टिका आहे. सोबत समाजाच्या बेजबाबदारपणावरही बोट ठेवले आहे.

या युट्यूबमध्ये ०.०१ ते १८ हा वयोगटाकडे दुर्लक्ष करण्यामुळे वीषाणू नियंत्रण कठीण रहाण्याचा मुद्याकडे लक्ष वेधले आहे आणि आणखीही काही मुद्द्यांकडे चांगले लक्ष वेधले आहे.

युट्यूब मधील कायमस्वरूपी वीषाणू हाकलून लावण्या बद्दल सूर अंशतः अटळतावादी वाटला त्यांचा अटळतावाद तेवढा योग्य वाटला नाही. टोकाच्या अटळतावादामुळे जन सहाकार्य आणि वैश्विक सहकार्य कमी रहाण्याचा धोका संभवू शकतो.

कुमार१'s picture

13 May 2021 - 8:45 am | कुमार१

माहितीबद्दल आभार !

सुखीमाणूस's picture

13 May 2021 - 12:09 pm | सुखीमाणूस

https://www.cnbc.com/2021/05/13/seychelles-most-vaccinated-nation-on-ear...

ही बातमी काळजी उत्पन्न करणारी आहे...

अभिजीत अवलिया's picture

13 May 2021 - 10:52 pm | अभिजीत अवलिया

https://www.loksatta.com/desh-videsh-news/covishield-vaccine-central-gov...

कोविशिल्ड लसीच्या दोन डोसमधलं अंतर पूर्वी ४ ते ६ आठवडे होते. त्यानंतर ते वाढवून ६ ते ८ आठवडे आणि आता पुन्हा वाढवून १२ ते १६ आठवडे करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.
या दोन डोसमधील गॅपमागचं लाॅजिक काय आहे?
जर १२ ते १६ आठवड्यांचा गॅप चालत असेल तर अगोदर हा गॅप कमी का होता?

कुमार१'s picture

14 May 2021 - 7:32 am | कुमार१

कोविशील्डच्या अधिकृत माहितीपत्रकानुसार सुरुवातीस दोन मात्रामधले अंतर चार ते सहा आठवडे असे होते. परंतु परदेशात झालेल्या अभ्यासानुसार, ते बारा आठवड्यांपर्यंत ठेवल्यास अधिक प्रतिकारशक्ती मिळते असा विदा त्यांच्याकडे होता.

मात्र आता आपल्याकडे जे सोळा आठवड्यापर्यंत केले आहे त्यासंबंधीचे शास्त्रीय कारण माहीत नाही.

मात्र आता आपल्याकडे जे सोळा आठवड्यापर्यंत केले आहे त्यासंबंधीचे शास्त्रीय कारण माहीत नाही.

त्यामागे लसींचा तुटवडा हे अशास्त्रीय कारण असावे :)

अभिजीत अवलिया's picture

14 May 2021 - 9:19 am | अभिजीत अवलिया

शक्यता तीच वाटतेय. किंवा लोकांची तशी समजूत होण्याचा धोका आहे.
दुसरा डोस ६ ते ८ आठवड्यात घेतला नाही तर दोन्ही डोस पुन्हा घ्यावे लागतील असे मधे ऐकिवात होते. आता ३-४ महिन्याचा गॅप चालेल म्हणतायत. जर हा गॅप नक्की चालत असेल तर ठीक नाहीतर दोन्ही डोस मिळालेली जनता परत मोकाट उंडरायला मोकळी आणि प्रत्यक्षात प्रतिकारक्षमता जास्त नसल्याने अजून एक दोन लाटा यायच्या.

कुमार१'s picture

15 May 2021 - 8:14 am | कुमार१

Ivermectin : मतभिन्नता

भारतात गोवा आणि उत्तराखंड या दोन राज्यांच्या सरकारांनी तेथील लोकांना हे औषध प्रतिबंधात्मक म्हणून देण्याचा निर्णय घेतलेला आहे. गोव्यात ते 18 वर्षावरील लोकांना तर उत्तराखंडमध्ये दोन वर्षावरील सर्वांना (गरोदर व स्तन्यदा सोडून) देण्याचे ठरले आहे.

डब्ल्यूएचओ आणि खुद्द या औषधाची निर्माती कंपनी Merck यांनी हे औषध कोविड संदर्भात देण्यास विरोध दर्शविला आहे !

माहितगार's picture

18 May 2021 - 5:50 pm | माहितगार

श्री. राहुल मराठे,

लेख खूपच रोचक आणि माहितीपूर्ण आहे. मागच्या वर्षीच्या साथ काळात एका परिचयातील रिटायर्ड इंजिनीयर प्राध्यापक महोदय मास्क न बांधलेल्या अवस्थेत भेटले असता मी त्यांना मास्क बांधण्यास सुचवल्यावर त्यांनी मला पाच मायक्रॉनचाच फंडा देऊन ते वीषाणू गुरुत्वाकर्षाणाने जमिनीवर जातात असा फंडा दिला . मी हा लेख तेव्हा वाचलेला नव्हता पण सर्वसाधारण हवा पुरेशा वजनाच्या जसे की पाला पाचोळा वस्तुही बर्‍यापैकी दूर नेते आणि गुर्त्वाकर्षणाचा प्रभाव नंतर येतो हे प्राध्यापक महोदयांना सांगण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी माझे म्हणणे मनावर घेतले नाही.

एनीवे हाँगकाँगने अधिक यशस्वीपणे व्हायरस मॅनेजमेंटसाठी व्हेंटीलीएशन वर लक्ष पुरवले व्हेंटीलीएशनच्या मुद्याबद्दल फारशी जनजागृती नाही भारतातील कोट्यावधी शॉप्स आस्थापना असंख्य जागांमध्ये व्हेंटीलिएशनची काळजी घेतलेली नसते. लोकही या मुद्द्याबाबत अलर्ट नसतात. भारतातील लसीकरण पूर्ण होई होई पर्यंत तिसरी लाट येऊन जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

कुमार१'s picture

16 May 2021 - 12:57 pm | कुमार१

कोविडोत्तर बुरशीजन्य आजार एव्हाना सर्वांच्या परिचयाचा आहे. कोविडमुळे प्रतिकारशक्तीचे खच्चीकरण होते आणि त्यानंतर अन्य प्रकारचे सूक्ष्मजंतूही पेशींवर हल्ला करू शकतात. अशाच जंतूपैकी Cytomegalovirus हा विषाणू गंभीर आजार घडवू शकतो. सुरुवातीस तो फुफ्फुसांना इजा करतो. परंतु आटोक्यात आला नाही तर शरीरातील बहुतेक महत्त्वाच्या अवयवांना इजा करतो आणि परिस्थिती बिकट होते.

नुकतेच निधन पावलेले खासदार राजीव सातव हे अशा प्रकारच्या आजाराला बळी पडले.
आदरांजली.

कुमार१'s picture

18 May 2021 - 10:22 am | कुमार१

ताजी बातमी
करोना उपचारांमधून प्लाझ्मा थेरपीला वगळण्यात आलं; केंद्र सरकारचा मोठा निर्णय

पद्मश्री डॉ. केके अग्रवाल यांचे करोनामुळे निधन, लसीचे घेतले होते दोन्ही डोस
https://www.loksatta.com/desh-videsh-news/padma-shri-dr-kk-agarwal-dies-...

नवीन केसेस कमी होत आहेत पण म्रुतांचा आकडा वाढत आहे असे दिसतय.

कुमार१'s picture

20 May 2021 - 7:52 am | कुमार१

आत्ताशी त्याचं वितरण सुरू झाल्याची बातमी वाचली आहे.
चाचणी प्रयोगांदरम्यान त्याने रुग्णालयात दाखल व्यक्तींसाठी फायदा दाखवलेला आहे.

आता प्रत्यक्ष वापर झाल्यानंतर काही दिवसांनी विदा उपलब्ध होईल.

कुमार१'s picture

21 May 2021 - 10:25 am | कुमार१

पांढऱ्या बुरशीचा आजार (Candidiasis)

प्रतिकारशक्ती खच्ची झालेल्या रुग्णांमध्ये या प्रकारचा आजार होऊ शकतो. असे काही मोजके रुग्ण सध्या बिहार मध्ये आढळले आहेत( https://www.loksatta.com/desh-videsh-news/after-black-fungus-mucormycosi...).
कोविड रुग्णांना याचा धोका होऊ शकतो.

या आजारात घशामध्ये असे चित्र दिसते
ok

याच्या उपचारासाठी clotrimazole, miconazole, or nystatin, fluconazole
या प्रकारची औषधे वापरली जातात.

Bhakti's picture

21 May 2021 - 11:44 am | Bhakti

For Corona treatment WHO सुधारीत गाईडलाईन नुसार
https://www.ndtv.com/video/shows/trending-tonight/remdesivir-dropped-fro...
फन्गल इन्फेक्शन भारतातच अधिक आहेत का?
स्टेराइडचा अति आणि अयोग्य वापर याला महत्वाचे कारण दिसते.

कुमार१'s picture

21 May 2021 - 12:24 pm | कुमार१

फन्गल इन्फेक्शन भारतातच अधिक आहेत का?

>>

त्यासंबंधी इथे काही माहिती आहे. त्यानुसार मार्च अखेरीस जगातील एकूण बुरशी रुग्णांपैकी 70 टक्के भारतात होते. परंतु इथे मेख आहे.

ही महासाथ सुरू होण्यापूर्वी या बुरशीजन्य आजाराचे प्रमाण आधी बघू. दोन देशांची तुलना इथे दिलेली आहे.

रुग्णसंख्या प्रति लाख लोक अशी आहे :
भारत 14
ऑस्ट्रेलिया 0.06

या वर्षाखेरीस विस्तृत विदा आल्यावर अधिक भाष्य करता येईल.

Bhakti's picture

21 May 2021 - 2:26 pm | Bhakti

या वर्षाखेरीस विस्तृत विदा आल्यावर अधिक भाष्य करता येईल.
माहितीसाठी धन्यवाद.

कुमार१'s picture

22 May 2021 - 11:50 am | कुमार१

ज्येष्ठ पर्यावरणवादी कार्यकर्ते सुंदरलाल बहुगुणा यांचे शुक्रवारी करोना संसर्गाने निधन झाले. ते ९४ वर्षांचे होते.

आदरांजली !

“वृक्ष म्हणजे प्राणवायूची बँक” असे त्यांचे वचन आहे.

तुषार काळभोर's picture

22 May 2021 - 4:27 pm | तुषार काळभोर

सुंदरलाल बहुगुणा यांना श्रद्धांजली

कुमार१'s picture

22 May 2021 - 5:53 pm | कुमार१

कोविड उपचारांमुळे म्युकरमायकोसिस वाढत नाहीय, तर व्हायरसमध्ये म्युटेशन झालय, नवीन स्ट्रेन आलाय.

हा नवीन स्ट्रेन स्वादुपिंडाच्या बीटासेल्सवर परिणाम करतोय. त्यामुळे रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण वाढतेय.
त्यामुळे म्युकरमायकोसिसचे रुग्ण वाढतायत" असे डॉ. तात्याराव लहाने यांनी सांगितले.

सुबोध खरे's picture

22 May 2021 - 7:46 pm | सुबोध खरे

हा नवीन स्ट्रेन स्वादुपिंडाच्या बीटासेल्सवर परिणाम करतोय.

या बद्दल काही माहिती उपलब्ध आहे का?

डॉ. तात्या राव लहाने हा माणूस विश्वासार्ह राहिलेला नाही.

राजकारणी माणसांना लस देण्यासाठी हि व्यक्ती त्यांच्या घरी जाते (याचे अनेक फोटो वृत्तपत्रात आले होते) हे एकंदर वैद्यकीय व्यवसायाच्या प्रतिष्ठेला साजेसे नाही.

आणि अशी लस घरी दिल्याबद्दल मुंबई उच्च न्यायालयाने सरकारवर ताशेरे सुद्धा ओढले होते.

बाकी भारतात अनिर्बंधित मधुमेहाचे कोट्यवधी रुग्ण असताना या महामारीच्या अगोदर कुणाला म्युकरमायकोसिस का झाला नाही याचे डॉ लहाने उत्तर देतील का?

बुरशी जन्य आजार हे आपली प्रतिकार शक्ती कमी झाल्यामुळे होतात हे वैद्यकशास्त्राला वर्षानुवर्षे माहिती आहे.

अवयव रोपण, अनेक कर्करोग विशेषतः रक्ताचा ( ल्युकेमिया) किंवा अस्थिमज्जा रोपण (bone marrow transplant) अशा रोग्यांमध्ये असे रोग होताना अशा रुग्णालयात काम केलेल्या माझ्या सारख्या अनेक डॉक्टरांनी वर्षानुवर्षे पाहिलेले आहे.

बहुसंख्य करोना च्या रुग्णांना डेक्सामेथासोन हे स्टिरॉइड जीव वाचवण्यासाठी दिले जाते त्यामुळे त्यांच्या रक्तातील साखर वाढते विशेषतः मधुमेह असलेल्या.

याशिवाय टोसिलीझूमॅब किंवा बॅरिसीटीनिब हि औषधे सायटो काइन स्टॉर्म मध्ये असामान्य वाढलेल्या प्रतिकारशक्तीला थंड करण्यासाठी औषधे दिली जातात यामुळे बुरशीजन्य आजार होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणावर वाढते.

तेंव्हा या दोन्ही औषधांचा एकत्रित परिणाम म्हणून रक्तातील साखर वाढते वर प्रतिकारशक्ती कमी होते म्हणून बुरशीचा प्रादुर्भाव बराच वाढतो.

तेंव्हा करोना मुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते हे सत्य असले तरी त्यामुळे म्युकरमायकोसिस होतो असे ठामपणे म्हणता येईल का याविषयी शंका वाटते.

कुमार१'s picture

22 May 2021 - 7:50 pm | कुमार१

त्यामुळे म्युकरमायकोसिस होतो असे ठामपणे म्हणता येईल का याविषयी शंका वाटते.

+१११

कुमार१'s picture

22 May 2021 - 7:58 pm | कुमार१

या महामारीच्या अगोदर कुणाला म्युकरमायकोसिस का झाला नाही

>>> आधीही हा आजार भारतात वाढत होता असे हा २०१९ चा संदर्भ म्हणतो .
.......

" In reality, a rising number of cases are reported from India [5,10,16,17]."

माहितगार's picture

23 May 2021 - 8:41 am | माहितगार

मी वैद्यकीय तज्ञ नाही (वैद्यकीय तज्ञांच्या ज्ञानाबद्दल विशेष आदर आहेच) पण तार्किक उणिवांकडे लक्ष ठेऊन असणार्‍यांपैकी आहे. आणि विज्ञानावर विश्वास असणार्‍यांनी तर्कांबाबत सावध असणे श्रेयस्कर असावे असे वाटते. खालील ओळी अ‍ॅड होमिनेम या तार्कीक उणीवेच्या एका उपप्रकारात मोडत असाव्यात.

डॉ. तात्या राव लहाने हा माणूस विश्वासार्ह राहिलेला नाही.

राजकारणी माणसांना लस देण्यासाठी हि व्यक्ती त्यांच्या घरी जाते (याचे अनेक फोटो वृत्तपत्रात आले होते) हे एकंदर वैद्यकीय व्यवसायाच्या प्रतिष्ठेला साजेसे नाही.

आणि अशी लस घरी दिल्याबद्दल मुंबई उच्च न्यायालयाने सरकारवर ताशेरे सुद्धा ओढले होते.

एखाद्या विषयावरील भाष्य करण्याचा नैतिक अधिकार हा विश्वासार्हतेवर अवलंबून असतो हे मान्य आहेच. पण तर्कशास्त्रानुसार विश्वासार्ह नसलेला/ नैतिक आधिकार नसलेला माणूस प्रत्येक वेळेस खोटेच बोलेल असे गृहीत धरता येत नाही. समुद्रातल्या चक्रीवादळाची बातमी इतरबाबतीत विश्वासार्ह नसलेल्या माणसाने देऊन जहाज बंदरात आणण्याचे सुचवले पण व्यक्ती विश्वासार्ह नाही म्हणून नाकारले पण चक्रिवादळाची बातमी तर बरोबर होती आणि जहाज आणि त्यातील माणसे बुडाली असेही होऊ शकते. त्यामुळे प्रत्येक जोखिमीच्या शक्यतेचा शहानिशा व्यक्तिच्या विश्वासार्हतेची बाब बाजूस ठेऊन केली जाणे श्रेयस्कर आणि गरजेचे असू शकते किंवा कसे.

कोरोना व्हायरसच्याच बाबतीत वुहान मधून वेगळ्या व्हायरसची शक्यता व्यक्त करणार्‍या डॉक्टरवरचेच आधी तोंड बंद करण्याचा प्रकार चिनी मंडळींनी केला आणि त्याचे परिणाम अखील मानव भोगतो आहे. करोना व्हायरस एअरबोर्न असण्याचे लक्षात न येणे, मास्कची गरज वेळीच लक्षात घेता न येणे याही गोष्टी तार्कीक उणीवेमुळेच घडल्या. आणखीही बरीच उदाहरणे पँडेमीक हाताळणीत दिसून येतात.

एकीकडे तात्याराव लहाने वैद्यकीय उपचारांबद्दल लावल्या जाणार्‍या गालबोटाची जबाबदारी झटकण्या साठी व्हायरस म्युटेशन कडे बोट दाखवत असण्याची शक्यता नाकारता येत नाही. (तात्यारावांच्या दाव्यातही तार्कीक उणिवेची शक्यता नाकारता येत नाही)

दुसरीकडे व्हायरस मुटेशनच्या परिणामाने श्युगरलेव्हल वाढण्याची शक्यता शंका जरी आली तरी वैज्ञानिक पद्धतीने तपासल्याशिवाय फेटाळणे श्रेयस्कर ठरत नसावे किंवा कसे. सांगण्याचा मुद्दा वैज्ञानिक दृष्टीकोणासाठी, तात्यारावांचे इतर बाबीतील वागणे आणि त्यांनी व्याधीबाबत केलेली तक्रार यांची गल्लत करणे श्रेयस्कर नसावे किंवा कसे.

सुबोध खरे's picture

26 May 2021 - 7:36 pm | सुबोध खरे

तेंव्हा करोना मुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते हे सत्य असले तरी त्यामुळे म्युकरमायकोसिस होतो असे ठामपणे म्हणता येईल का याविषयी शंका वाटते.

हि शेवटची ओळ वाचली का?

बाकी डॉ. तात्याराव लहाने यांच्या बाबत असलेली इतर माहिती सार्वजनिक जालावर उघड करणे मला श्रेयस्कर वाटत नाही.

म्हणून मी येथेच थांबतो.

सुबोध खरे's picture

26 May 2021 - 7:40 pm | सुबोध खरे

हा नवीन स्ट्रेन स्वादुपिंडाच्या बीटासेल्सवर परिणाम करतोय.

या बद्दल काही माहिती उपलब्ध आहे का?

हे माझे पहिलेच वाक्य आहे.

मी बऱ्याच वैद्यकीय गटांमध्ये याबद्दल विचारणा केली आणि जालावर/ वैद्यकीय नियतकालिकात शोध घेतला असता असे उत्परिवर्तन झाले आहे याचा कोणताही पुरावा मला सापडला नाही.

( एवढ्या लवकर असा खात्री लायक पुरावा सापडेल हि शक्यता जरा कमीच आहे)

पण मला सापडला नाही म्हणजे तो नाहीच असेही मी विधान केलेले नाही.

बाकी चालू द्या

माहितगार's picture

26 May 2021 - 9:47 pm | माहितगार

आपल्या वैद्यकीय दृष्टीकोणाबद्दल कोणतेच प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले नाही कारण तसा संबंधीत ज्ञानाधिकार मला नाही.

एकीकडे तात्याराव लहाने वैद्यकीय उपचारांबद्दल लावल्या जाणार्‍या गालबोटाची जबाबदारी झटकण्या साठी व्हायरस म्युटेशन कडे बोट दाखवत असण्याची शक्यता नाकारता येत नाही. (तात्यारावांच्या दाव्यातही तार्कीक उणिवेची शक्यता नाकारता येत नाही)

माझ्या प्रतिसादातून उपरोक्त वाक्यही स्पष्ट केले आहे. तात्यारावांच्या इतरही उणीवा असतील पण संबंध नसलेल्या ठिकाणी त्यांचा संबध लावणे विज्ञानास आणि तर्कशास्त्रास अनुसरुन आहे का याची खात्री करणे श्रेयस्कर असावे एवढाच काय तो मुद्दा मी मांडला आहे.

प्रा.डॉ. ते अनेक इतरही मित्रवर्यांच्या लेखनावरही वेळोवेळी तार्कीक मर्यादा दाखवण्याची वेळ येते तेव्हा तसे आपपर भाव न ठेवता खीसपाडणे हा आमच्यासारख्या कुरुंदकरी बाण्याच्या लोकांचा स्थायीभाव असतो.

बाकी आपल्या वेळोवेळच्या ज्ञान आणि मार्गदर्शना बद्दल आदर आहेच. 'हेल्दी' चर्चेसाठी अनेक आभार.

कुमार१'s picture

23 May 2021 - 8:48 am | कुमार१

विश्लेषण आवडले.

माहितगार's picture

23 May 2021 - 8:58 am | माहितगार

_/\_

कुमार१'s picture

23 May 2021 - 10:01 am | कुमार१

सौम्य ते मध्यम कोविडमध्ये (अधिक धोका असलेल्या रुग्णांसाठी) उपचारासाठी casirivimab and imdevimab या दोन प्रतिपिंडाच्या मिश्रणाच्या औषधाला भारतीय औषध नियंत्रकांनी नुकतीच मान्यता दिलेली आहे.

आता सिप्लातर्फे हे औषध भारतात टप्प्याटप्प्याने उपलब्ध केले जाईल.

माहितगार's picture

23 May 2021 - 1:06 pm | माहितगार

विज्ञान प्रगतीपथावर आहे हि आनंदाची गोष्ट आहे अर्थात उपचार उपलब्ध झाले तरी हॉस्पीटलचा आश्रय हा शेवटचा पर्याय रहावा म्हणून कोविड काळजी घेण्याची त्रिसुत्री जनतेने किमान अजून दिडएकवर्षेतरी गंभीरपणे पाळणे गरजेचे आहे असे वाटते.

*** नमनाला वाडगेभर १ ***
प्रथमतः वैज्ञानिक दृष्टीकोणात आस्था ठेवणारी मंडळी, लसिकरणाबाबत 'अतार्किक अनाठायी संशयवाद' न बाळगता लसीकरणावर भर देतात. सद्य विज्ञानास उत्तम दर्जा अधोरेखित करणारे लसिकरण साध्य करण्यास पाचेक वर्षांचा तरी कालावधी अभिप्रेत असतो तरी सुद्धा, कोविड १९ साथीच्या बाबतीत इतर विश्वासार्ह वैद्यकीय उपचारांअभावी लसीकरण किमान परिक्षणांवर स्विकारावे लागले आहे; आता पर्यंत उपलब्ध लसींची परिणामकारकता लसीपरत सर्वसाधारणपणे ७० ते ९० टक्के आहे, म्हणजे १० ते ३० टक्के लोक लसीकरण झालेले असूनही कोविड १९च्या जोखिमीस सामोरे जाऊ शकतात, पण तरीही सर्वसाधारणपणे ७० ते ९० टक्के लोक लसिकरणातून काही ना काही प्रमाणात आरोग्य सुरक्षा प्राप्त करणार हे सर्वांना विदीत आहेच. त्यामुळे लसिकरणाच्या कोणत्याही मर्यादेची चर्चा झाली म्हणून लसिकरणाचा उपलब्ध मार्ग सोडू नये हे वेगळे सांगणे न लगे.
*** नमनाला वाडगेभर २ ***
आता जरा मर्यादांची चर्चा या बीबीसी वृत्तानुसार सेचिल बेटे आणि चिली देशातील काही बर्‍यापैकी लसिकरण साध्य केलेल्या भागातही लसिकरण झालेल्या व्यक्तीही काही प्रमाणात (२० टक्क्याच्या आसपास ?) कोविडने बाधीत झालेल्या आणि त्यातील इतर व्याधी सुद्धा असलेल्यांना अधिक वैद्यकीय निरी़क्षण आणि उपचारांची गरज भासलेली आहे असा वृत्तांवरून अंदाज येतो. जेव्हा सद्य लसिंची परीणामकारकता ७० ते ९० टक्के एवढी मर्यादीत आहे म्हणजे हि आकडेवारी आश्चर्यकारक नाही. आपल्याकडे भारतातही एकतर एवढ्या मोठ्या लोकसंख्येचे लसिकरण साध्यकरण्यासाठी बर्‍यापैकी कालावधी जाणार आहे, शिवाय १८ पेक्षा कमी वयाचे लसिकरण शक्य होण्यास अधिकचा कालावधी लागणार आहे आणि तो पर्यंत कोविडची अजून एखादी लाटेची साधार शक्यता तज्ञमंडळी व्यक्त करत आहेत.
***नमनाला वाडगेभर ३***
दुर्दैवाने करोना वीषाणूंचा प्रसार वायूजन्य मार्गाने अधिक दूरवर होतो हे वैज्ञानिक वैद्यकीय जगाने स्विकारण्यास अधिक कालावधी लागला. त्या संदर्भाने या , वृत्तांचे वाचन उपयूक्त असावे. वीषाणू आणि इतर पॅथोजेन्सच्या वायूजन्या प्रसाराची चर्चा करणार्‍या स्वतत्र धागा लेखाची तज्ञमंडळींकडून होण्याची गरज असावी असे वाटते. ज्यात एकुण कोविडशिवाय इतर कोण कोणते वीषाणू आणि पॅथोजेन वायूजन्य पद्धतीने पसरतात इत्यादीचा समावेश असावा असे वाटते.

*** जे मला समजले ते ***
तुर्तास विषय मला जेवढा समजला तेवढ्यात वायूजन्य याचा अर्थ घर दुकाने ऑफीस मॉल हॉटेले इत्यादी सर्व ठिकाणी खिडक्या दारे बंद करून न बसता बाह्यवातावरणातील हवेसोबत अधिक चलनवलन कसे होऊ शकेल हे पाहिले पाहिजे. अवघड शब्द प्रयोगाचे कारण हवा खेळती राहण्यासाठी केवळ सिलींग फॅन लावणे पुरेसे नसावे क्रॉस व्हेंटीलिएशन ची बंद जागेतील हवा बदलली जाण्याची गरज असावी, एक्झॉस्ट फॅन आणि पेडेस्टल फॅन्सच्या मदतीने आतली हवा घालवून ताज्या नव्या हवेस प्रवेशाचा वाव देणे महत्वाचे असावे . अशा सार्वजनिक आणि व्यापारी जागा जिथे हवा बदलली जात नाही एक्झॉस्ट फॅन आणि पेडेस्टल फॅन्सचा पुरेसा वापर नाही त्या ठिकाणचा वावर लसिकरण झालेल्यांनीही टाळणे पण विशेषत; ज्यांना इतर व्याधी आहेत आणि लसिकरण अद्याप झालेले नाही त्यांनी टाळणे श्रेयस्कर असावे. मोकळ्या जागीही गर्दी करूनये आणि कुठे गर्दी असेल तर गर्दीत जाऊ नये. अर्थात कुणाला भेटायचे असल्यास बंद जागे पेक्षा मोकळ्या हवेत भेटणे श्रेयस्कर असावे. मास्कची गरज गर्दी नसलेल्या मोकळ्या जागे पेक्षा बंदीस्त जागा आणि गर्दी असलेल्या मोकळ्याजागां मध्ये अधिक असावी.

लॉकडाऊन उठले तरीही अजून येते दिडेकवर्ष तरी क्रॉस व्हेंटीलिएशन नसलेल्या जागी खरेदी पेक्षा मोकळ्या मैदानावर गर्दी नसलेली एक्झिबीशन किंवा गर्दी न घडवता माल विकणारे फिरते हातगाडी आणि टेम्पोवाले, डोअर डेलिव्हरी मागवणे हे अधिक चांगले पर्याय असावेत. बंद रेस्टॉरंट पेक्षा सॅनिटाईज केलेले गर्दी नसलेले गार्डन रेस्टॉरंट असे पर्याय अधिक श्रेयस्कर असावेत असे वाटते.

*डिसक्लेमर: मी वैद्यकीय तज्ञ नाही, चुभूदेघे.

कुमार१'s picture

25 May 2021 - 4:36 pm | कुमार१

एक सुंदर लेख

डॉ. एम. सिद्धेश्वर आणि डॉ. त्रिशला शहा-सिंघवी यांच्या सद्यस्थितीतील कामाबद्दलचा.
त्यातले ‘वॉर अँड पीस’ मधले हे उद्धृत छानच !

‘काळ आणि संयम हे जगातील सर्वात मोठे योद्धे आहेत'.

राहुल मराठे's picture

25 May 2021 - 11:43 pm | राहुल मराठे

कोविड ची लास घेतल्यानंतर ४५ दिवस मद्यपान करू नये अशी जी बातमी होती त्या बद्दल कोणी माहिती सांगू शकेल काय

राहुल मराठे's picture

25 May 2021 - 11:44 pm | राहुल मराठे

लस

कुमार१'s picture

26 May 2021 - 8:01 am | कुमार१

रा. म.

लसीनंतर 45 दिवस मद्यपान नको या संदर्भात संशोधन झालेले नसून तसा काही निष्कर्ष उपलब्ध नाही.
काही तज्ञांच्या मते लस घेण्याअगोदर दोन दिवस व घेतल्यानंतर दोन आठवडे हे टाळावे. (https://www.diabetes.co.uk/news/2020/jan/people-who-receive-covid-19-vac...)

यावर एक सविस्तर प्रसिद्ध प्रतिसाद मी यापूर्वीच दिलेला आहे. जमल्यास शोधा.

कुमार१'s picture

1 Jun 2021 - 9:40 am | कुमार१

सौम्य ते मध्यम कोविडच्या उपचारांसाठी Sotrovimab या नव्या अँटीबॉडी इंजेक्शन उपचाराला अमेरिकी औषध प्रशासनाने नुकतीच आपत्कालीन मान्यता दिली.

गेल्या काही महिन्यात विषाणूचे जे नवे ६ उपप्रकार आलेले आहेत (भारतातील धरून) त्यांच्या विरोधात हे औषध चांगले काम करते असे अभ्यासात दिसले आहे.
GSK हा उद्योग लवकरच हे औषध भारतातही उपलब्ध करून देण्याच्या मार्गावर आहे.

तुषार काळभोर's picture

1 Jun 2021 - 4:02 pm | तुषार काळभोर

Covid आजारासाठी दाखल असलेल्या रुग्णाच्या नातेवाईकांना रुग्णालय औषधे 'शोधून' आणायला का पाठवतात? कात्रज पासून निगडीपर्यंत औषध शोधत फिरणारे किंवा दिसेल त्या माध्यमातून औषधे आहेत का, अशी साद घालणाऱ्या नातेवाईक, मित्रांचे संदेश पाहून वाईटही वाटतं आणि रुग्णालयांचा रागही येतो.

गॉडजिला's picture

2 Jun 2021 - 4:47 pm | गॉडजिला

चायला या रुग्णालयाचे contacts जास्त असणार की रुग्णाचे ?

रुग्णाला औषध इथून विकत घ्या हा आग्रह वजा सल्ला ठीक आहे पण सोय तुमची तुम्ही करा म्हणजे काय ? भलतीच आत्मनिर्भरता अपेक्षित ठेवत आहेत...

वामन देशमुख's picture

3 Jun 2021 - 6:24 pm | वामन देशमुख

माझे व माझ्या पत्नीचे वय हे १८-४५ या वयोगटात मोडते. मी कोविन अ‍ॅपवरून कोवॅक्सीन / कोवीशिल्ड इ साठी नोंदणी करण्याचा अनेकवेळा प्रयत्न केला पण स्लॉट काही मिळाला नाही. तेलंगाना शासनाच्या सध्याच्या लसीकरणाच्या कार्यक्रमानुसार, अजून अनेक दिवस तरी मिळण्याची शक्यता दिसत नाही.

तथापि, एका खाजगी कंपनी मार्फत, या महिन्यात आम्हाला स्पुतनिक ही लस घेण्याची संधी आहे.

  • स्पुतनिक लस घ्यावी का?
  • ही लस कुणी मिपाकराने घेतली आहे का?
  • ही लस घेणे सुरक्षित आहे का?

मला मत / सल्ला हवा आहे.

हा प्रतिसाद या धाग्यावर अयोग्य वाटत असल्यास क्षमस्व.

डॉ. गोडबोले यांच्या मते तरी ही लस सेफ आहे.

कुमार१'s picture

3 Jun 2021 - 7:32 pm | कुमार१

प्रत्यक्ष अनुभव नाही .
स्थानिक डॉक्टरांचा सल्ला घेऊन ठरवा

कुमार१'s picture

5 Jun 2021 - 8:49 am | कुमार१

दुसरी लाट नियंत्रणात आल्याचे केंद्र सरकारचे निवेदन

१)लसीकरण
.
ते फक्त कमी लोकांचे झाले आहे.
२)लॉक डाऊन
हे कारण असू शकते पण perfect अमलबजावणी ह्यांची पण झाली नाही लोक फिरत च होती.
३) नैसर्गिक रीत्या व्हायरस कमजोर झाला.
ह्या कारणाचा जरूर विचार करावाच लागेल.
४)उपचार
हा प्रकार लाट कमी झाली ह्या साठी विचारात घेण्याची गरज नाही.
चुकीचे उपचार,औषधाची टंचाई असे अनेक मामले खूप प्रसिद्ध आहेत.

बघू आता तज्ञ,डॉक्टर,सरकार कोणाला श्रेय देत आहेत दुसरी लाट संपत आली त्या साठी.

कुमार१'s picture

15 Jun 2021 - 5:20 pm | कुमार१

पहाडमूळ (म्हणजेच व्हेलव्हेटलीफ) नावाने ओळखल्या जाणाऱ्या या वनस्पतीचा सार्क कोव्ही-२ विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी फायदा होऊ शकतो.
- भारतामधील केंद्र सरकाच्या अखत्यारित असणाऱ्या औद्योगिक आणि वैज्ञानिक संशोधन परिषदेचे संशोधन चालू.

कुमार१'s picture

15 Jun 2021 - 5:21 pm | कुमार१

सार्क कोव्ही-२ >>> सार्स असे वाचावे.

कुमार१'s picture

25 Jun 2021 - 9:33 pm | कुमार१

Tocilizumab या दाहप्रतिबंधक औषधाला रुग्णालयात दाखल असलेल्या (तीव्र) covid-19 रुग्णांच्या उपचारासाठी अमेरिकी औषध प्रशासनाने आज मान्यता दिली.

यापूर्वी हे औषध वापरले जातच आहे. आज त्याच्यावर कोविडसाठी मान्यतेची मोहर उमटवली गेली. हे जुने औषध असून यापूर्वी संधिवात आणि अन्य काही तत्सम आजारांसाठी वापरले जाते.

सध्या भारतात हे आयात करावे लागते.

कुमार१'s picture

29 Jun 2021 - 6:34 pm | कुमार१

अमेरिकेच्या मॉडर्ना लसीला भारतात परवानगी; DGCI नं दिली लस आयातीसाठी मंजुरी!

ही एम आर एन ए प्रकारची आहे.

कुमार१'s picture

2 Jul 2021 - 6:45 pm | कुमार१

लसीचे दोन डोस भिन्न प्रकारच्या तंत्रज्ञानाचे घेऊन लस मिश्रणाचे काही प्रयोग चालू आहेत. काही युरोपीय देशांमधील प्रयोगांमध्ये उत्साहवर्धक निष्कर्ष आढळले आहेत. अर्थात अजून हे प्रयोग बऱ्याच मोठ्या प्रमाणावर झाल्याशिवाय निष्कर्ष काढता येणार नाहीत.

तरीसुद्धा एक रोचक बाब त्यातून पुढे आलेली आहे. कोविशिल्ड प्रकारच्या लसीमुळे शरीरात T -सेल्सची निर्मिती चांगली होते. तर फायझर प्रकारच्या लसीमुळे शरीरात अँटीबॉडीज अधिक चांगल्या प्रमाणात तयार होतात. त्यामुळे भविष्यात या दोन लसींचे मिश्रण देण्याबाबत अधिक विचार करता येईल.

विषाणूच्या बदलत्या नव्या उपप्रकारांविरुद्धही अशा प्रकारचे मिश्रण अधिक उपयुक्त ठरू शकेल ठरू शकेल, असा प्राथमिक अंदाज आहे. अर्थात अधिक संशोधनाची गरज आहे.

शाम भागवत's picture

26 Jul 2021 - 1:25 pm | शाम भागवत

माझ्या एका नातेवाईकाने कोव्हॅक्सीनची लस घेतली. त्यामुळे म्हणे त्याला व्हिसा मिळायला त्रास होतोय. कोविशिल्ड लस घेतलेल्यांना मात्र व्हिसा मिळू शकतो.

कुमार१'s picture

26 Jul 2021 - 1:51 pm | कुमार१

कोव्हॅक्सीनच्या बाबतीत विसा मिळताना संबंधित देशागणिक वेगवेगळे धोरण आहे, असे बातम्यातून समजते.

Nitin Palkar's picture

2 Jul 2021 - 7:34 pm | Nitin Palkar

अतिशय सुंदर लेख आणि माहीतगारांचे पूरक प्रतिसाद आणि सर्वात महत्वाचे म्हणजे प्रत्येकाच्या शंकेचे केलेले माहितीपूर्ण निरसन यामुळे लेखाची उपयुक्तता वाढली आहे.
नवनवीन विषयांवर लिहिण्यासाठी शुभेच्छा.
_/\_

कुमार१'s picture

9 Jul 2021 - 6:02 pm | कुमार१

प्रोत्साहनासाठी धन्यवाद

कुमार१'s picture

9 Jul 2021 - 6:01 pm | कुमार१

जगभरात या सक्ती संदर्भात न्यायालयीन दावे दाखल होत आहेत.
हा एक भारतातील :

https://www.livelaw.in/news-updates/allahabad-high-court-plea-relaxation...

कुमार१'s picture

19 Jul 2021 - 8:47 pm | कुमार१

ऑलिंपिक नगरीतील covid + लोकांची संख्या १५ पर्यंत पोहोचली आहे. त्यात 3 खेळाडूंचाही समावेश आहे.

बातमी

कुमार१'s picture

23 Jul 2021 - 10:48 am | कुमार१

डेल्टा उपप्रकाराच्या आगमनानंतर जो नव्याने धुमाकूळ झाला त्यासंदर्भात डेल्टाचा अधिक अभ्यास केल्यानंतर खालील गोष्टी समजल्या आहेत :

१. शरीरात विषाणूने प्रवेश केल्यानंतर प्रत्यक्ष आजार होणे याचा कालावधी पूर्वीच्या प्रकारांच्या तुलनेत कमी आहे (साधारण चार दिवस).
२. या प्रकाराची प्रजननक्षमता वेगवान आहे.

३. डेल्टाबाधित व्यक्तीच्या शरीरात विषाणूची घनता पूर्वीच्या प्रकारांच्या तुलनेत १२६० पट अधिक आहे.

वरील सर्व कारणांमुळे डेल्टा प्रकार हा अधिक रोगप्रसारक ठरला आहे.

https://www.nature.com/articles/d41586-021-01986-w

कुमार१'s picture

24 Jul 2021 - 8:17 pm | कुमार१

खोलीच्या सामान्य अथवा उष्ण तापमानात व्यवस्थित टिकून राहणाऱ्या लसीची निर्मिती करण्याचा प्रकल्प भारतात Mynvax यांनी हाती घेतला आहे अशी लस यशस्वी झाल्यास तिची साठवण अतिशय सोपी राहील .

शुभेच्छा !

कुमार१'s picture

2 Aug 2021 - 10:08 am | कुमार१

सद्य लसींवर मात करणारे विषाणूचे नवे प्रकार का उद्भवतात, यावर सध्या अभ्यास चालू आहे. असे नवे प्रकार निर्माण होण्यामागे तीन महत्त्वाची कारणे अशी असतात :

1. लसीकरणाची गती मंद असणे
2. संसर्ग झालेल्या लोकांचे प्रमाण जास्त असणे
3. विषाणूच्या उत्परिवर्तनाची गती जास्त असणे.

हे विचारात घेता असे नवे उपप्रकार निर्माण होऊ नयेत म्हणून आपण काय करू शकतो ?

1. लसीकरणाची गती शक्य तितकी वाढवणे
2. जरी एखाद्या प्रदेशात बहुसंख्यांचे लसीकरण झालेले असेल तरीसुद्धा मूलभूत त्रिसूत्रीचे पालन चालूच ठेवणे.
हे पालन जितके जास्त काळ आपण चालू ठेवू तितके फायदेशीर राहील.

COVID विषयी विज्ञान जगतात कोणतेच ठाम
निष्कर्ष नाहीत.
विज्ञान जग द्विधा अवस्थेत आहे.
विषाणू जन्य आजार पृथ्वी वर अनेक वेळा येवून गेले पण त्यांचा मुक्काम काही वर्ष च होता होता.
कोणत्याच आधुनिक उपचार वीणा ती साथ निघून पण गेली.
Corona व्हायरस काही खूप वेगळा असेल ह्याची शक्यता 0 आहे.
नैसर्गिक नियमांना अनुसरून च त्याचे वर्तन आहे.
फक्त आता विज्ञान जगताला ग्रहण लागले आहे.
म्हणून उलट sulat बातम्या येत आहेत.
सायन्स अलर्ट वर लेख पण आला आहे.
आताचे विज्ञान नवीन अंध श्रद्धा निर्माण करत आहे.
डोळे झाकून विज्ञान वादी होवू नका.

कुमार१'s picture

7 Aug 2021 - 4:29 pm | कुमार१

जॉन्सन अँड जॉन्सनच्या सिंगल डोस कोविड-१९ लसीला भारतात आपातकालीन वापरास मंजुरी देण्यात आली आहे.

मराठी_माणूस's picture

7 Aug 2021 - 9:09 pm | मराठी_माणूस

रोज पेपर मधे नवीन रुग्ण, बरे झालेले रुग्ण वगैरे नियमीत पणे येत असते त्यात नवीन रुग्णांपैकी किती जणांनी व्हॅक्सीन घेतले होते ते का दिले जात नसावे

सुबोध खरे's picture

12 Aug 2021 - 9:57 am | सुबोध खरे

माझे अनेक मित्र अमेरिकेत डॉक्टर आहेत.

त्यांनी एकमुखाने हेच सांगितले आहे कि त्यांच्याकडे आता येणारे ९५ % अत्यवस्थ रुग्ण हे लस न घेतलेले आहेत.

आपण यातून बोध घेणे आवश्यक आहे.

गवि's picture

12 Aug 2021 - 10:09 am | गवि

बरोबर.

मात्र ५% अत्यवस्थ लोक लसीकरण झालेलेही आहेत हा आकडा पूर्वीच्या समजुतीपेक्षा वाईट आहे.

सुबोध खरे's picture

12 Aug 2021 - 10:48 am | सुबोध खरे

नाही, याचा अर्थ तसा नाही.

उरलेल्या ५ % पैकी बहुतेक लोकांना दुसरा कोणता तरी आजार आहे ज्यासाठी प्रतिकारशक्ती कमी झालेली / केलेली आहे. उदा मूत्रपिंड आरोपण केलेले आहे किंवा ल्युकेमियाचे उपचार चालू होते किंवा दमा संधिवात सारख्या रोगांसाठी स्टिरॉइड चालू होते. अशा लोकांनी लस घेतली तरी त्यांना संपूर्ण संरक्षण मिळत नाही.

पदमश्री डॉ के के अगरवाल हे असेच एक उदाहरण आहे.
एस एल इ या प्रतिकारशतीच्या आजारासाठी ते अनेक वर्षे स्टिरॉइड्स घेत होते. त्यामुळे दोन डोस घेऊनही त्यांच्या शरीरात पूर्ण प्रतिकार शक्ती तयार होऊ शकली नव्हती आणि रुग्ण सेवा करीत असल्यामुळे त्यांना मिळालेली विषाणूंची मात्र इतर सामान्य माणसांपेक्षा जास्त होती यामुळे त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

आता लक्षात आले. दिलासा मिळाला. धन्स..!

मराठी_माणूस's picture

13 Aug 2021 - 11:41 am | मराठी_माणूस

असे असेल तर इतर आजार असणार्‍या (कोमॉर्ब.) लोकांना लस घ्यायला प्रोत्साहीत कसे करणार ?

सुबोध खरे's picture

13 Aug 2021 - 12:12 pm | सुबोध खरे

इतर आजार असलेले सगळेच लोक याला बळी पडतात असे नव्हे. तर बळी पडतात त्यापैकी मोठी संख्या हि अशा लोकांची आहे.
लस घेतली नाही तर असे इतर आजार असलेले लोक फार मोठ्या संख्येने बळी पडतील.

मराठी_माणूस's picture

13 Aug 2021 - 11:39 am | मराठी_माणूस

हे लोकां पर्यंत कसे जाइल ?
लागण झालेल्या/ मृत्युमुखी पडलेल्या मधे डोस घेतलेले आणि न घेतलेले यात वर्गीकरण करणे आणि ते लोकांपर्यंत पोहचवणे हे फारसे अवघड नाही.
लोकांना त्यातुन बोध घेणे सोपे होइल.

कुमार१'s picture

9 Aug 2021 - 4:36 pm | कुमार१

कोविड लस : क्लिनिकल ट्रायल डेटा खुला करा; याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकारला नोटीस

योग्यच.

कुमार१'s picture

13 Aug 2021 - 12:17 pm | कुमार१

पूर्ण लसीकरण झालेल्या लोकांनाही डेल्टा उपप्रकाराचा संसर्ग होतो हे खरे आहे. या संदर्भात एक अभ्यासपूर्ण लेख इथे आहे. त्यात जगातील चार प्रगत राष्ट्रांमधील काही संशोधन दिलेले आहे.

लस घेऊनही डेल्टाचा संसर्ग झालेल्या बऱ्याच लोकांचा विविध ठिकाणी अभ्यास होत आहे. त्यातील निष्कर्षांवर तसे एकमत नाही. तरीसुद्धा इंग्लंडमध्ये झालेल्या एक लाख लोकांचा अभ्यास मार्गदर्शक ठरेल. त्या अभ्यासामध्ये असे लक्षात आले, की लसीकरण झालेल्या ज्या लोकांना डेल्टा संसर्ग झाला त्यांच्या शरीरातील विषाणूची घनता ही (लसीकरण न झालेल्या लोकांपेक्षा तुलनेत) बरीच कमी होती. हा मुद्दाही महत्त्वाचा आहे. जितकी शरीरातील विषाणू-घनता कमी राहील तितका व्यक्तिगत त्रास आणि सामाजिक रोगप्रसारही आटोक्यात राहिल.

लस घेतलेल्या लोकामध्ये किती antibody निर्माण झाल्या आहेत ह्याची टेस्ट मोठ्या प्रमाणात करणे का अशक्य आहे.
एक पूर्ण जिल्हा किंवा मुंबई सारख्या शहरातील लस घेतलेल्या प्रतेक व्यक्ती मध्ये covid विरोधी antibody किती निर्माण झाल्यात ह्याची टेस्ट सहज केली जावू शकते.आणि त्या मुळे कन्फर्म रिझल्ट पण मिळेल .
पण का असे केले जात नसावे.
आपण काही कोटी लोकांचे लसीकरण करू शकतो तर एक दोन कोटी लोकांची टेस्ट पण करू शकतो.
लस नक्की किती काम करतेय ते पण माहीत पडले असते.

मी दोन्ही डोस घेतले आहेत आणि माझ्या शरीरात covid विरूद्ध किती antibody निर्माण झाल्या आहेत हे जाणून घ्यायचे आहे.
कोणती टेस्ट करावी लागेल?

कुमार१'s picture

13 Aug 2021 - 12:59 pm | कुमार१

त्या चाचणी ची माहिती आहे
https://www.metropolisindia.com/coviprotect-test?utm_source=MD&utm_mediu...