India Deserves Better - १. सायकल, पर्यावरण, धोरणे आणि सरकरी उदासीनता

गणेशा's picture
गणेशा in राजकारण
25 Sep 2019 - 7:23 pm

मी स्वता सायकल चालवतो आणि त्या समस्या खुप जवळुन पाहतो आहे, म्हणुन सायकल बद्दल थोडेसे प्रथम बोलतो आहे.

Under a green initiative, the Government should promote cycling as an environment-friendly means of transport, thereby reducing congestion and pollution, especially in big cities. Also, the Government can run campaigns which could show our nation in a positive light, stating that we have a low carbon footprint, as compared with other nations.

Unfair tax, Excise Duty and import export incentives :

खरे तर , सायकल आणि तत्सम इको फ्रेंडली ट्रान्स्पोर्ट गोष्टी सरकारने टॅक्स फ्री करायला हव्यात , किंवा त्याला प्रोमोशनल केले पाहिजे. पण निवडनुकीच्या खैरातीचा टाईम वगळता, सायकल ला कधीच स्वस्त वाहन असे बिरुद मिरवता आले नाही.
मी जी सायकल २०१७ ला २८००० ला घेतली(ही मध्यम सायकल आहे, बसिक पण म्हणु शकता) त्याच हायब्रिड सायकलची किंमत आता २ वर्षात ३९००० झाली आहे, दुकान दाराला विचारले असता टॅक्स मुळे येव्हडेच उत्तर मिळते. तसे गेल्या महिन्यात सायकल वरील टॅक्स कमी झाला आहे असे ऐकले आहे, पण त्यामुळे कुठल्याही किंमतीत मात्र उतार आलेला दिसला नाही.

भारतात १००० लोकांमागे फक्त ९० लोक सायकल चालवतात. आणि हे खेद जनक आहे.
सरकारचे धोरण तर मला कळतच नाही. वाहन उद्योगाला मंदि , पेट्रोल - डिझेल वर वाढवलेले टॅक्स हे सगळे आपल्या समोर असताना, या विना पेट्रोल आणि पर्यावरण पुरक गोष्टीला मुद्दामुन प्रोत्साहन मिळत नाहिये असेच आता वाटत आहे.
माझ्या मनाला तर राहुन राहुन याला जबाबदार पेट्रोलियम पुरवठा दार देश, कार आणि बाईक मॅन्युफक्चरर , पेट्रोलियम पदार्थावरुन मिळत असलेला भरमसाठ टॅक्स आणि मुजोर, आपलेच खरे माणणारे ढिम्म नेते आणि सरकारी यंत्रना कारणीभुत वाटत आहे. आणि का नसावी ?

सबकुच मुमकीन है तो यहा क्या हुआ भाई ? कुठ घोड पेंड खायला गेले ?

कामावर सायकल घेवुन जायला लागलो तर शॉवर पासुन ते वेगळ्या पार्किंग समस्येला तोंड द्यावे लागले .. का ? वाहतुकीसाठी सायकल वापरास प्राधान्य देताना कंपण्याना काहीच अटी घातल्या जावु नये ? का फक्त कंपण्याच्या अटी आपण आणि सरकरणे मान्य कराव्यात ? उलट भरमसाठ वाढणारी शहरे .. अनधिक्रूत बांधकामे आणि वेगाणे वाढणार्या कंपण्या या बरोबरच वाहणे आणि पोलुशन वाढत आहे, अश्या वेळेस , इतर विकासाच्या गप्पा मारण्या पेक्षा येणार्‍या समस्येला तोंड देण्याची ताकद आणि पर्याय आपल्या दिसत नाहीये का ?

Separate Lane

The first and the foremost thing that the government needs to do is make the roads safe for cyclists. The roads of our country are full of rash drivers, law breakers and short tempered people. In such a situation, it becomes imperative to have a separate lane for the people commuting on cycles. This will ensure their security, help them in avoiding the pollution from the cars, and give a better way of avoiding the traffic

ज्या स्मार्ट सिटी मध्ये आमच्या पुणे आणि पिंपरी चिंचवड चे नाव आहे, तेथे सायकल साठी सेपरेट लेन धड नाही. जेथे आहेत तेथे अतिक्रमण आहे, मग ते टपर्‍यांचे असुद्या, गाड्यांचे असुद्या नाही तर इतर कश्याचे(कचर्‍याचे म्हणायचे आहे, पण आपण स्वच्छ भारत अभियान अंतर्गत काम करतोय, आणि त्यातही स्मार्ट सिटीमध्ये राहतोय, म्हणुन या अभियानाचा आणि स्मार्ट पणाचा आब जावु नये म्हणुन कचरा हा शब्द मागे घेतो). सरकारी यंत्रना, महानगरपालिका झोपले आहेत काय ? या सगळ्या कडे त्यांच्या पाहण्याचा दृष्टीकोण असा तो काय ?

रस्त्या रस्त्या वर खड्डे आहेत , निट चालता येत नाहिये , गाड्यांचे अक्सिडेंट वाढलेत(ह्या बद्दल विस्त्रुत बोलत नाही आताच, तो एक वेगळाच विषय आहे) ,
२०१६ च्या आकडेवारीनुसार (नंतरची आकडेवारी पब्लिश केली गेली असेल तर कृपया सांगा) २३.९ % अक्सिडेंट टु व्हिलर मोटर चे झाले आहेत आणि सायकलचे फक्त ०.९ %. तरीही सायकल चालविन्या साठी लोकांच्या मनात भीती आहे , का तर फक्त या ढिम्म सरकारी यंत्रणा , लाचखावु लोक, आणि बेसिक रस्ते आणि लेन नसल्याने सायकलचा वापर सरकारला वाढवता आला नाही.

आणि सरकार ह्या विषयात १०० पैकी १० % मिळवुन पुर्ण पणे तोंडावर आपटुन नापास झाले आहे ( १० % लाजे खातर दिलेले आहे, आपलेच सरकार आहे जावुद्या).
ज्यांना कोणाला मोदी है तो मुमकीन है ची हाळी द्यायची आहे, त्याने क्रुपया मन की बात किंवा चाय पे चर्चा अश्या कार्यक्रमात तरी असल्या गोष्टींकडे लक्श द्यायला सांगारे आपल्या या मसिहा ला ..

So I am again saying : #India_Deserves_Better

बाकी या विषया वर तुर्तास थांबतो ... पुन्हा लवकरच भेटु...

प्रतिक्रिया

बरोबर आहे. सायकलीवर जनता आली. तर वाहन उद्योग मंदीत जाईल. रोजगार कमी झाले म्हणून अर्थशास्त्रज्ञ ओरड करतील. पेट्रोल डिझेल मुळं मिळणारा जबरदस्त महसूल कमी होईल. वगैरे वगैरे. रस्ते चांगले केले तर लोक काम कमी प्रवास जास्त करतील. गाड्या खराब झाल्या नाहीतर छोटे गॅरेजवाले, स्पेयरपार्ट विकणारे बेकार होतील ना.

जॉनविक्क's picture

25 Sep 2019 - 8:53 pm | जॉनविक्क

होस्पिटल कशी चालणार

सुधीर कांदळकर's picture

26 Sep 2019 - 7:22 am | सुधीर कांदळकर

प्रथम प्राधान्य मिळून रस्त्यावर, कराबाबत आणि एकूण किंमतीवर भरपूर सवलती मिळाल्या पाहिजेत.

चांगला, वेगळा विषय, धन्यवाद.

गणेशा's picture

28 Sep 2019 - 3:33 pm | गणेशा

paan evdha anti govt,Tula aasa mhanaycha aahe ka ki adhi chya govt ne khup kama kelet tu je vishay mandato tyawar? Nasel taar stop blaming & just put your thoughts n expectations.

>> मला एक सांग, आधीच्या आणि नंतरच्या सरकारचा प्रश्न येतोच कुठे ? ज्या गोष्टींबद्दल आणि अपेक्षे बद्दल मी लिहिले आहे, ते माझ्या सरकारणे पुर्ण करावे किंवा त्या बाबत निदान धोरण ठरवावे ही माझी अपेक्षा. यात आधीच्या सरकारणे काम केले नाही तर या सरकारला पण प्रश्नच विचाराचे नाही असे आहे का ? आणि मी एक स्पष्ट सांगतो, आधीचे आणि आताचे दोन्ही माझीच सरकारे आहेत , नव्हे आपल्या सर्वांचे पण तसेच आहे. भाजप सरकार काही जणांचे , कॉन्ग्रेस सरकार काही जनांचे असे नसते. नव्हे मोदी हे पुर्ण देशाचे पंतप्रधान आहेत, त्यामुळे सद्य राज्य सरकार ,भारत सरकार आणि महानगरपालिका या सर्वांना एक मतदार म्हणुन मी गेल्या ५ वर्षां बद्दल प्रश्न विचारणे लगेच blaming and anti government असे का होते आहे.
बर्याच जनांचे आधीच्या सरकारणे काय केले ? असे जे म्हणने आहे ते त्या काळात बोलायचा प्रश्न होता.
आणि सद्य परिस्थीती मध्ये आहे त्या सरकारला प्रश्न विचारायचा की मागच्या ? आणि आजच्या सरकारला कधी पर्यंत प्रश्न विचारायचे नाही हे त्या सरकारणे जाहीर पणे सांगावे, १० वर्षे ? १५ वर्षे की ७० वर्षे ? मागच्या सरकारणे काही केले नाही हे भांडवल करायचे की योग्य गोष्टींसाठी पर्याय निवडायचा हे सरकारच्या हातात आहे.

मला स्वताला कुठलाच प्लॅटफॉर्म नाही माझे म्हणने मांडण्याचा, म्हणुन ह्या सोशल साईट चा मला वापर करावा लागत आहे, नाही तर मी डायरेक्ट समोरा समोर पण प्रश्न विचारले असते.. ( आणि हा मार्ग मअला योग्य वाटला, कारण सरकार्/त्यांच्या आयटी सेल आपल्याला पाहिजे तश्या जाहिराती या माध्यमा मधुनच लोकांपर्यंत पोहचवत आहेत )
------------------
you talk abt slow down in auto sector, so, definitely it is not the time to promote cycle. Already auto industry is going though big shift to move on BS6 & electric enabled. And both of them are on green initiative too.

-->>
जसे आपल्या माननिय फायनान्स मिनिस्टर निर्मला सितारामन यांनी सांगितले की ओला उबेर मुळे पण वाहन उद्योगात मंदी आलेली आहे, जसे ते चुकीचेच आहे, तसेच सायकलमुळे वाहन उद्योगाला फटका बसु शकतो हे म्हणने पण हास्यास्पद आहे. इलेक्ट्रिसिटी वर चालणारी वाहने काय आणि पेट्रोल डिझेल वर चालणारी वाहणे काय दोन्ही वीज किंवा तेल लागणार्‍या गोष्टी वापरतील, एलेक्ट्रिक वाहन प्रदुषण कमी करेल हे बरोबर, मग त्या इलेक्ट्रिक वाहनांवर ग्रीन इनिशिएटीव्ह म्हणुन टॅक्स कमी हवा की नको ? पण सर्वात जास्त टॅक्स एलेक्ट्रिक इंजिन्वर आकारणे जाणे म्हणजे चुकीचे धोरण वाटत नाही का आपल्याला ?

All our big cities are spreaded like anything
>> माझा पुढचा मुद्दा हा कचरा व्यवथापण यावर होता, पण आता ह्या मुद्द्या वर लिहिन , नक्की वाच

my office from home is 26KM & is the case for majority & home to office & vice versa is the biggest commute we follow & in this scenario cycle is not the solution for majority.
>>
प्रथमता एक लक्षात घेण्या जोगे आहे, मी सायकल हीच सर्वांनीच चालवावी आणि वाहणे चालवु नयेत असे कुठलेही विधान करत नाही. फुकटचा सल्ला पण नाही. पण ज्यांना सायकल वापरायची आहे , अश्या लोकांना त्याकडे परावृत्त करण्यात ही सरकार अपयशी ठरले आहे, कारण आताचे रस्ते आणि सायकलींच्या किंमती आणि त्यावरील टॅक्स. आणि माझा हाच मुद्दा आहे. जास्तीत जास्त लोक सायकल कडे आले की आपोआप प्रदुषण आणि ट्रॅफिक या वर कंट्रोल येवु शकतो असे मला वाटते.

बाकी सायकल कम्युट ही प्रत्येकाच्या क्षमते नुसार असते, मी स्वता फुरसुंगी ते रहाटनी असे ३० कीमी सायकल ने केलेले आहे. आताच्या रोडच्या परिस्थीतीत मला तर टुव्हीलर ने पण नको वाटते ..
मुळात सायक्ल ही फक्त पर्यावरण नाही तर स्वताच्या फिटनेस साठी पण उपयोगी आहेच. तु जर १० किमी सायकल चालवली तरी लक्षात येइल ते १ किमी चालण्यासारखे असते फक्त( हे व्यक्तिसापेक्ष आहे, नसेल पटत तर सोडुन देणे)

बाकी सायकल ला वेगळॅए लेन असलल्यास त्यामुळे सायक्ली नक्कीच जास्त रोड वर दिसतील, आणि फक्त ऑफिस ला जाणारे आपण हे डोळ्यापुढे न ठेवता शाळाअ कॉलेजातील विद्यार्थी पण आपण का लक्षात घेवु नये ? १८ वर्षांपर्यंत लायसेन्स मिळत नसते बाईक चालवण्याचे. सो त्यांना शाळेत ़ओलेज ला जायला पण ते उपयोगी होयीलच .
म्हणुन मेजॉरीटी आणि फलाना या बद्दल मला न बोलता, सायकल, त्यासाठीची लेन आणि त्याचे टॅक्स या संधर्भात सरकार ने काय पाउले उचलली हे कळएच पाहिजे . आणि येथे भारत खुप मागे पडलेला आहे, उलट सायक्ल चालवणे हे आपल्या साठी नाहीच अशीच लोकांच्यात भावना होउन बसत आहे.. आणि हे तरी बदलले पाहिजेच.

Otherwise you are end up with doing same thing, using social networking for anti govt, with lac of facts.
>>
माझा मुद्दा anti government पेक्षा good governance कसे असेल याकडे जास्त कललेला आहे. पण हा पाण्याचा दृष्टीकोन पण आहे.
जर माझ्या सारकारणे माझ्या शहारात, रोड व्यव्स्थीत केले आणि छोटीसी सुरक्षित सायकल लेन जेथे कुठलेही अतिक्रमण नसेल आणि सायकल सारख्या वाहनांना टॅक्स कमी केला अशी मागणी केली कोणी तर ती रास्त आहे, आणि गेल्या ५ वर्षात या वर कुठलेही निटसे पाउल उचलले गेले नाही तर त्या बाबत सरकार शुद्धीत आहे का असा डायरेक्ट सवाल म्हणजे नक्कीच anti government नाही.

बाकी फॅक्ट काय देवु, येथे १० किमी वर असणार्‍या ऑफिस साठी फोर व्हिलर ला १ ते १:३० लागतो आहे, त्यावरुन रोड, ट्रॅफिक , पर्यवरण आणि लागणारे पेट्रोल याची कल्पना करावी बस. ह्या पेक्षा मोठी वस्तुस्थीती काय दाखवु ?

---- गणेश जगताप

नविन सरकारने काय पावले उचलली? ह्याचा आढावा घेणे
रोचक ठरेल...

गणेशा's picture

6 Apr 2021 - 8:37 am | गणेशा

Oh,जुने धागे.. ( एक विनंती.. हसदेव आणि इतर धागे पण वाचावेत आणि त्यावर पण मते द्यावी..
---

प्रश्न नक्कीच बदलले नाहीत.. आणि माझी मानसिकता नक्कीच बदलली नाहीये..

सायकल.. तिच्यावरील tax आणि त्याच बरोबर पेट्रोल आणि त्याच्यावरील tax आणि महागाई दोन्ही भरपूर वाढले आहेत..

जी सायकल ८००० ला येत होती ती १२००० रुपये ला झाली आहे..
सायकल लेन आणि त्याच्या समस्या अजूनही तश्याच आहेत..

आणि यावेळेस चे सरकार हि या बाबतीत तितकेच fail आहे..

नगरापालिके चा कारभार पैसे कमवणे आणि चांगले रस्ते उकरून नविन आणखिन चांगले रस्ते करणे असे चालुच आहे..

आणि लोकांची आणि आपली मानसिकता.. कोणते सरकार भारी यात गुंतून पडून समस्यावर बोलताना हि कोणते सरकार आहे त्यावर मतं बदलण्याची झाली आहे..
नगरापालिका, राज्य सरकार आणि केंद्र सरकार कोणी हि involve असुद्या..
आणि काँग्रेस असो वा भाजपा किंवा राष्ट्रवादी असो वा शिवसेना..
हे प्रश्न सुटत नाहीये.. आणि कोणालाच मुळ धाग्यातील मते बदलावण्याची इच्छा नाही...

म्हणुन मला अजूनही same वाटते..

India deserves better...

एक रूपयांची, "झुणकाभाकर", पचवून झाली आहे, त्यामुळे हे सरकार काहीही करणार नाही, हे आधीच माहिती होते आणि पुढेही काही करणार नाही...

माझे हे कुठले हि धागे.. Fact नुसार आहेत.. आणि ते सामाजिक मुद्दे घेऊन आहेत.. राजकीय धुराळा हा उद्देश नक्कीच नाही..
त्यामुळे हे प्रश्न आणि त्याबद्दल बोलल्यास उत्तम..त्या अनुषंघाने राजकीय कामे आणि उदासीनता आल्यास नक्कीच लिहावे

पण हे सरकार ते सरकार असले हे व्यक्ती बरोबर बदलते आहे..
पण ह्या समस्या सुटलेल्या नाहीत ह्याचे वाईट वाटले पाहिजे..
कोणते सरकार आहे त्यावर आपली मतांसाठी पाठ थोपटून घेण्यात काय हाशील आहे?

आणि तुम्हाला माहिती साठी सांगतो..
सायकल वर tax केंद्र सरकार वाढवत आहे.. रस्ते राज्य आणि नगरापालिका यांच्या कक्षेत येत आहेत.. आणि हे सगळे मिळून हे प्रश्न सोडवण्यास असमर्थ आहेत..

कृपया राजकीय एकोळी लिहून तुम्ही धाग्यांना राजकीय धुराळ्यात रूपांतर करू नका हि विनंती..

प्रतिसाद नसले तरी चालतील (जसे हसदेव आणि शहरीकरण धागे )
पण राजकीय धुरळा.. काँग्रेस कशी भारी.. मोदी कसे भारी असल्याशी मला येथे काही देणेघेणे नाहीये..

सामाजिक काय काय प्रॉब्लेम असतील आणि त्याचे राजकीय पडसाद यावर लिहिलेले आवडेल..

मुक्त विहारि's picture

6 Apr 2021 - 11:14 am | मुक्त विहारि

सरकार बदलले तरी प्राॅब्लेम आहे तसाच राहिला ...

गणेशा's picture

6 Apr 2021 - 9:00 am | गणेशा

तूर्तास हे धागे लिहिणे मी थांबवले होते.. त्याचे कारण समस्या सुटली असे नसून कोविड मुळे, राज्य - केंद्र सगळ्यांची अवस्था वाईट झालेली आहे..
कोणाकडेच जास्त पैसे नाहीत.. आणि आरोग्य.. शिक्षण हि प्राथमिकता आहे आणि त्याकडे त्यांना बघावे लागत आहे..

तरीही माझे स्पष्ट मत या आधी दिले आहेच..

असो थांबतो.. इतर धागे..

शिक्षण.. लोकसंख्या आणि शहरीकरण.. शेती.. हसदेव.. बलात्कार.. मेळघाट..
यात कसले हि बदल झालेले नाहीत.. तुमची मते तुम्ही लिहू शकता जर तुम्हाला बदल झाला तर..

आणि आता काय झाले.. हे विचारणे योग्य आहे..
पण हे प्रश्न कुठलाही पत्रकार.. नागरिक कोणत्याही सरकारला विचारात नाही हे दुःख वेगळेच आहे..

असो.. त्यामुळे इतर कुठल्याही धाग्यावर तेच तेच लिहून त्याला वरती ठेवत नाही..

परिस्थिती जैसे थे आहे..
म्हणूनच india deseves better...