शेअर ट्रेडिंग मध्ये मार्जिनचा वापर - दुधारी तलवार कि विन-विन?

बिटाकाका's picture
बिटाकाका in काथ्याकूट
27 Mar 2021 - 11:35 pm
गाभा: 

गणेशा यांच्या शेअर मार्केटची बाराखडी भाग ० या धाग्यावर मार्जिन या विषयावर थोडी चर्चा झाली होती. त्या अनुषंगानुसार हा मार्जिन प्रकार जरा विस्ताराने उदाहरणासह पाहू म्हणजे मग ठरवता येईल ती दुधारी तलवार आहे की (माझ्या मतानुसार) विन-विन आणि त्यामानाने अतिशय कमी धोकादायक परिस्थिती आहे. मार्जिन समजण्यासाठी त्याबाबतीत वापरल्या जाणाऱ्या अजून काही व्याख्या समजणे आवश्यक आहे.

समजा माझ्याकडे २५,००० रु. आहेत आणि मी माझ्या अभ्यासानुसार अबक कंपनीचा शेअर ज्याची किंमत ५०० रु. आहे तो घ्यायचा ठरवलं आहे. आता माझ्याकडे असलेल्या २५,००० रु. त त्या कंपनीचे ५० शेअर्स घेता येतील. पण अबक कंपनीच्या शेअर वर माझा विश्वास असल्याने मला अधिक शेअर्स, समजा १०० शेअर्स, घेण्याची इच्छा आहे परंतु माझ्याकडे तेवढी रक्कम, ५००X१००=५०,००० नाहीयेत. म्हणून मी मार्जिन घेण्याचे ठरवतो.

आता मी आधी म्हटल्याप्रमाणे प्रत्येक कंपनीच्या कामगिरीनुसार ब्रोकरेज हाऊस त्या कंपनीचे इनिशीयल मार्जिन टक्केवारी (initial margin percentage) ठरवतात. समजा आपल्या अबक कंपनीची अशी इनिशीयल मार्जिन टक्केवारी ३५% आहे. याचा अर्थ जर मला १०० शेअर्स घ्यायचे असतील तर मला १००X५००=५०,००० च्या ३५ टक्के, म्हणजेच ५०,०००X०.३५=१७,५००रु. इनिशीयल मार्जिन म्हणून भरावे लागतील. उरलेले ३२,५००रु. ब्रोकरेज हाउस मला मार्जिन म्हणून पुढच्या ३६५ दिवसांसाठी देईल. या मार्जिन रक्कमेवर माझे ब्रोकरेज हाऊस १३% व्याज घेते (इतर ब्रोकरेज हाउसेस चे सध्याचे व्याजदर माहीत नाहीत). म्हणजेच एक लाखाला दिवसाला साधारणपणे ३० ते ३५ रु. म्हणजेच आपल्या वरच्या उदाहरणात ब्रोकरेज हाउस ने दिलेल्या ३२,५००रु. वर दिवसाला साधारणपणे ११ ते १२ रु., महिन्याला साधारणपणे ३२५रु. म्हणजे २ महिने शेअर्स ठेवले तर साधारणपणे ६५०रु.

आता ब्रोकरेज हाउस अजून दोन गोष्टी मेंटेन करते.
१. मिनिमम मार्जिन टक्केवारी (minimum margin percentage) - हे देखील इनिशीयल मार्जिन टक्केवारी प्रमाणे प्रत्येक शेअर साठी ठरवले जाते. ही टक्केवारी साधारणपणे २० ते ४० टक्के असते. समजा आपल्या अबक शेअर साठी ही टक्केवारी ३०% आहे. ही टक्केवारी वापरून मिनिमम मार्जिन काढले जाते. मिनिमम मार्जिन = ब्रोकरेज हाउस ने दिलेले मार्जिन + त्या रक्कमेच्या ३०% (minimum margin percentage). आपल्या उदाहरणात ब्रोकरेज हाउस ने मला ३२,५०० रु. दिले आहेत. म्हणजेच माझे मिनिमम मार्जिन ३२,५०० + (३२,५००x०.३=९,७५०) = ४२,२५० असेल.

२. अवेलेबल मार्जिन (available margin) = मूळ व्यवहाराची रक्कम +/- नफा/तोटा (नफा असेल तर +, तोटा असेल तर -).

अवेलेबल मार्जिन आणि मिनिमम मार्जिन मधील अंतर खूप कमी झाले तर ब्रोकरेज हाऊस तुम्हाला अजून स्वतःचे मार्जिन भरण्यासाठी आठवण करून देईल. जर असे अधिकचे मार्जिन भरले नाही आणि जर तुमचे अवेलेबल मार्जिन हे मिनिमम मार्जिनला टच झाले किंवा खाली आले तर ब्रोकरेज हाउस तुमचे शेअर्स उडवून टाकेल.

आता या माहितीनुसार आपल्या शेअर्स च्या बाबतीत काय घडू शकते ते पाहू. आपण असे गृहीत धरू की अबक कंपनीच्या बाबतीतला माझा अंदाज घेताना असा होता की हा शेअर पुढील २ महिन्यांत २०% वाढून ६०० ला जाणार आहे. आता २ महिन्यांनी समजा तो तसा ६०० ला पोहोचला आणि माझे लक्ष्य (टार्गेट) साध्य झाले तर मी तो शेअर विकून टाकेन. मग पाहू माझा किती फायदा होईल.
(६००x१००=६०,०००(विक्रीची किंमत)) - ३२,५०० (ब्रोकरेज हाऊस चे मार्जिन) = २७,५००. यातून माझी मूळ रक्कम (इनिशीयल मार्जिन) १७,५०० आणि व्याजाचे ६५० वजा केले तर माझा नफा हा २७,५००-१७,५००-६५० = ९,३५०रु. असेल (यात ब्रोकरेज आणि एक्सचेंज टॅक्सेस धरलेले नाहीत.). दोन महिन्यांऐवजी ६ महिन्यांनी लक्ष्य (टार्गेट) साध्य झाले तर व्याज ६५० ऐवजी १९५०रु. जाईल, म्हणजेच फायदा २७,५०० - १७,५०० - १९५० = ८१५० रु. असेल.

आता दुसरी शक्यता अशी आहे की तो शेअर वर जाण्याआधी खाली गेला. समजा दोन महिन्यात हा शेअर ५०रु. पडून ४५० ला गेला. आता बघू माझे जास्तीत जास्त नुकसान किती होईल. वर काढल्याप्रमाणे आपले मिनिमम मार्जिन रु. ४२,२५० आहे. शेअर ५० रु. ने पडल्याने माझा सध्याचा तोटा ५०x१००=५,०००रु. आहे. म्हणून वरच्या अवेलेबल मार्जिन च्या सूत्रानुसार माझे अवेलेबल मार्जिन = ५०,०००-५,०००=४५,०००रु. आहे. मी जेव्हा शेअर घेतला होता तेव्हा माझा नफा/तोटा ० होता, म्हणून तेव्हा हेच अवेलेबल मार्जिन ५०,००० - ०=५०,०००रु. होते. शेअर पडत गेला तसे मिनिमम मार्जिन आणि अवेलेबल मार्जिन यातील अंतर कमी होत गेले. आता ते २,५०० रु. आहे. म्हणजेच शेअर आणखी २५ रु. ने पडल्यास (२५x१००=२,५००) हे अंतर ० होईल. म्हणून ब्रोकरेज हाउस तुम्हाला सूचना करेल की तुम्हाला हा शेअर ठेवायचा असेल तर अधिकचे मार्जिन भरा. ही रक्कम तुम्ही तुमच्या मनाने कितीही भरू शकता. म्हणजे आपल्या उदाहरणात शेअर ७५रु. ने पडल्यावर अवेलेबल मार्जिन मिनिमम मार्जिन ला जाऊन पोहोचले आहे. पण माझा अंदाज जर असा असेल की हा शेअर अजून १०रु. पेक्षा जास्त ने पडणार नाही आणि तिथून रिकव्हरी करेल, तर मी १०×१०० = १,०००रु. भरेन. जेणेकरून माझे अवेलेबल मार्जिन वाढेल, पर्यायाने मिनिमम मार्जिन आणि अवेलेबल मार्जिन मधील अंतर वाढेल आणि आपला शेअर उडणार नाही. थोडक्यात हा आपला महितीपूर्वक निर्णय (informed decision) असेल. या रिकव्हरीची वाट बघण्यासाठी माझ्याकडे एक वर्षातील उरलेले १० महिने असतील. अर्थात प्रत्येक महिन्याला साधारणपणे ३२५रु. व्याज माझ्या अपेक्षित नफ्यातून कमी होत राहील.

याउलट जर तुम्ही अधिकचे मार्जिन भरले नाही तर मात्र तुमचा शेअर ७५रु. पडल्यावर (वरील गणितानुसार), ४२५रु. ह्या सध्यकिमतीवर (मार्केट प्राईस वर) ब्रोकरेज हाऊसकडून उडवला जाईल. आता यात किती नुकसान झाले? तर ७५×१०० = ७,५०० रु. (हे थेट नुकसान) + दोन महिन्यांच्या मार्जिनच्या व्याजाचे ६५० = ८, १५०रु. इथे सर्वात अधोरेखित करण्यासारखी गोष्ट म्हणजे, ब्रोकरेज हाउसेसनी मिनिमम मार्जिन आणि अवेलेबल मार्जिन च्या माध्यमातून ठरवलेला तुमचा जास्तीत जास्त लॉस (if you don't take informed decision to keep the stock by adding additional margin).

म्हणजेच आपण मार्जिन सुविधेने स्वतःच्या २५,००० रु. पैकी १७,५०० + ६५० (व्याज) = १८,१५०रु. वापरून ९,३५० रु. फायदा किंवा ८,१५०रु. तोटा होण्याच्या शक्यता निर्माण केल्या. याव्यतिरिक्त माझ्या मूळ रक्कमेतील उरलेले २५,००० - १८,१५० = ७,८५० रु. इतर शेअर्स मध्ये वापरायला मोकळे राहिले.

आता हेच जर, मी मार्जिन नसते वापरले तर काय झाले असते ते बघू. माझ्याकडे २५,००० रु. होते. त्यात अबक कंपनीचे ५००रु. प्रमाणे ५० शेअर्स येतील ( हे शेअर्स डिलिव्हरी मोड मध्ये असतील). जर तो अपेक्षेप्रमाणे १००रु. वर गेला तर फायदा ५०×१००=५,०००रु. होईल. जर तो खाली गेला आणि ब्रोकरेज हाउसप्रमाणे आपणही तो ४२५ रु. सध्यकिमतीवर तो विकून टाकला तर तोटा ७५×१००= ७५००रु. होईल. म्हणजेच मार्जिन न वापरता, स्वतःकडील २५,००० रु. त आपण ५,००० रु. नफा किंवा ७,५०० रु. तोट्याची शक्यता निर्माण केली. मार्जिन न वापरण्यात फायदा असा की तुम्हाला वेळेचे बंधन राहणार नाही. जर एक वर्षापर्यंत तुमचे लक्ष्य साध्य नाही झाले तरी तुम्ही त्याला २, ३ कितीही वर्षे ठेऊ शकता. नुकसान असे की मार्जिन वापरल्यामुळे मोकळे राहिलेले ७,८५०रु. इथे मोकळे राहणार नाहीत.

चौकस२१२ यांच्या गणेशा यांच्या धाग्यावरील प्रश्नाचे उत्तर -

मी आयसीआयसीआय चे ३ इन १ अकाउंट वापरतोय, निदान त्यात तरी मार्जिन हे एक वर्षासाठी दिले जाते. इतर ब्रोकर्सच्या बाबतीत हा कालावधी मला माहित नाही. वर्षाच्या शेवटी, मार्जिन कॉल आलेला नसेल तरी तुमचे शेअर्स विकले जातील. जर तुम्हाला त्यापुढेही हे शेअर्स ठेवायचे असतील तर अशा मार्जिन शेअर्स ना मार्जिन रक्कम भरून डिलिव्हरी मध्ये रूपांतरित करणे ३६५ व्या दिवसापर्यंत शक्य आहे. म्हणूनच मी वर उल्लेख केला की मार्जिन हे लॉंग टर्म ट्रेडिंग साठी नसून शॉर्ट टर्म आणि इन्ट्राडे ट्रेडिंग साठी आहे.

मला अपेक्षा आहे की मी वरील उदाहरणाला न्याय देऊ शकलोय, पण तरीही काही त्रुटी राहिल्या असल्यास जाणकारांनी त्या दुरुस्त केल्या तर आनंदच होईल. माझ्यामते तरी शॉर्ट टर्म साठी मार्जिन ही अतिशय मदतकारक सुविधा आहे. खासकरून बाजारातील प्रत्येक डाउन हा एक संधी असते. चांगल्या कंपन्यांचे शेअर ग्लोबल प्रेशर, नफेखोरी इ. अनेक कारणांमुळे पडतात. पण मुळत: भक्कम (fundamentally strong) असल्यामुळे लगेच रिकव्हरही होतात. अशावेळी मार्जिन वापरून, आपल्याकडील कमीत कमी पैशात जास्ती शेअर्स खरेदी करून, काही दिवसांत बाजार सुधारला की शेअर काढून टाकून नफा घेणे हे खूप फायदेशीर असते हा माझा वैयक्तिक अनुभव आहे. शिवाय माझे पैसे जास्त दिवस अडकून राहण्याची रिस्क कमी असते.

यावर अजून भरपूर चर्चा करता येऊ शकते, माझ्या अल्पमतीने मी लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. याव्यतिरिक आधीच घेतलेले शेअर्स हेही मार्जिन म्हणून दुसरे शेअर्स घेण्यासाठी वापरता येतात (ज्याला शेअर्स ऍज मार्जिन असे म्हणतात), त्यावर उहापोह पुढील लेखात करता येईल.

प्रतिक्रिया

गणेशा's picture

28 Mar 2021 - 12:13 am | गणेशा

भारी सांगितले आहे..
मिनिमम मार्जिन आणि अवेलेबल मार्जिन हे तर जबरदस्त explain केले आहे..

मला मिपावर लेखमाला सुरु केल्यावर खात्री होतीच कि माझ्या ज्ञानात नक्कीच भर पडेल.. आणि तुमच्या मुळे ती इच्छा लवकरच साध्य झाली..त्याबद्दल धन्यवाद

मुक्त विहारि's picture

28 Mar 2021 - 7:53 am | मुक्त विहारि

माहिती बद्दल धन्यवाद

मला शेयर बाजार ह्या प्रकरणात रस नाही, पण योग्य त्या व्यक्तीला, ही माहिती पाठवली आहे...

समीर वैद्य's picture

28 Mar 2021 - 11:58 am | समीर वैद्य

मी पण आयसीआयसीआय डायरेक्ट चे ३ इन १ अकाउंट उघडले आहे नुकतेच. कोणी मार्गदर्शन करू शकेल का... मी अगदीच नवखा आहे ह्या क्षेत्रात.

मागील दोन ते तीन महिन्यात सोन्याचे भाव प्रचंड वाढले ह्याचे कारण काय?
आणि दुसरा.
Covid मुळे अर्थव्यवस्था डब्यात असताना .किती तरी कंपन्या खड्यात गेलेल्या असताना.
शेअर मार्केट का तेजीत आले त्याचे कारण काय?
कृत्रिम पने बाजार मंदीत आणि तेजीत आणायची क्षमता काही टोळ भैरव लोकात आहे
असा त्याचा अर्थ मी तरी काढलेला आहे.

गणेशा's picture

29 Mar 2021 - 8:39 am | गणेशा

उत्तर खाली दिले आहे

अमेरिकेत फेडरल रिझर्व चे व्याजदर कमी आहेत त्यामुळे भारतीय शेअर बाजार ही परदेशी (F I I ) गुंतवणूकदारांसाठी चांगली संधी आहे. सध्या मार्केट मध्ये भारतीय रिटेल गुंतवणूकदारांची गुंतवणूक वाढलेली आहे.आजच्या घडीला F I I पेक्षा जास्त आहे.गुंतवणूक करणारे जास्त आणि विक्रीसाठी शेअर कमी त्यामुळे साहजिक कंपन्या बंद/तोट्यात असून देखील शेअर मार्केट तेजीत आहे.हा कृत्रिम फुगवटा आहे.तो फुटेल की नाही? कधी फुटेल?याबद्दल आताच काही सांगणं शक्य होणार नाही.रिअल इस्टेट मध्ये जशी बुम येऊन गेल्या काही वर्षात भावात फारशी वाढ झालेली नाही तशी अवस्था शेअर बाजाराची होणार आहे.मोठी मंदी येण्याची शक्यता आहे.गुंतवणूक करताना सावध करावी

हे नक्की का?

सर्वसामान्य माणसे, चांगला धंदा करत आहेत...

दारू विक्री जोरदार सुरू आहे

बार ओसंडून वहात आहेत

जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा नाही

आमचा भाजीवाला एका दिवसांत, दुप्पट पैसे कमावतो

विडी, सिगरेट इत्यादि व्यसने मुबलक प्रमाणात आहेत आणि लोकं खरेदी पण करत आहेत

रिक्षावाले, फेरीवाले मनसोक्त लुबाडत आहेत

जागा खरेदी विक्री पण कमीअधिक प्रमाणात सुरू आहे

सोने-चांदी, खरेदी पण सुरू आहे

इलेक्ट्रॉनिक वस्तू, (मोबाईल, टीव्ही इत्यादि) यांची पण विक्री चांगलीच होत आहे.

सुतार, प्लंबर, इलेक्ट्रिशियन, हे सतत बिझी आहेत

कंपन्या सुरू आहेत

वाहन उद्योग पण चांगला धंदा करत आहे

मोबाईल रिचार्ज करायला, केबल नेटवर्क घ्यायला, लोकांकडे पैसे आहेत
----------

श्री गावसेना प्रमुख's picture

30 Mar 2021 - 1:15 pm | श्री गावसेना प्रमुख

प्रत्येक महिन्याला सरकार एक लाख कोटी कर वसुलते आहे तरी हि अर्थव्यवस्था खड्ड्यात आहे..

शाम भागवत's picture

29 Mar 2021 - 8:29 am | शाम भागवत

बिटाकाका,
उदाहरण देताना फायद्याच्या वेळी १०० शेअर्स घेतले व तोट्याच्या वेळेस फक्त ५० घेतले असं कसं करून चालेल?नवख्या माणसाला तुलना करायला अवघड जाऊ शकते.

माझ्या समजूतीप्रमाणे मार्जीन हा प्रकार बहिर्गोल भिंगासारखा आहे. फक्त जे आहे त्याच वर्धन करणं, एवढच बहिर्गोल भिंग जाणते. तद्वत, मार्जीन आपला नफा अथवा तोटा काही पटींनी वाढवते.

थोडक्यात शेअरबाजारातील नफा, बाजाराच्या नियमीत अभ्यासावर ठरत असतो. हाव व भिती यावर आपण आपल्यावर मिळवलेले नियंत्रण, आपले यश आणखी वाढवते व टिकवते. अभ्यासातून आत्मविश्वास व त्या आत्मविश्वासाद्वारे हे नियंत्रण मिळवता येते, अशी माझी समजूत आहे. यश मिळायला लागल्यावर अनेक जणांचा आत्मविश्वास हा अती आत्मविश्वासाकडे झुकतो. तेही टाळायला लागते.
🙏

शा वि कु's picture

29 Mar 2021 - 11:42 am | शा वि कु

उदाहरण देताना फायद्याच्या वेळी १०० शेअर्स घेतले व तोट्याच्या वेळेस फक्त ५० घेतले असं कसं करून चालेल?नवख्या माणसाला तुलना करायला अवघड जाऊ शकते.

फायदा आणि तोटा दोन्ही उदाहरणात शेअरची संख्या १००च आहे की.
फक्त भाव वाढताना १०० न वाढला, आणि कमी होताना ५० ने पडला.

बिटाकाका's picture

29 Mar 2021 - 11:50 am | बिटाकाका

वाचण्यात गल्लत झाली असावी आपली. मी फायद्याच्या वेळेस १०० आणि तोट्याचा वेळेस ५० असे घेतलेले नाहीत. मी मार्जिन वापरले तर उपलब्ध असलेल्या आहे त्याच पैशात १०० घेता येतात विरुद्ध मार्जिन नाही घेतले तर त्याचा पैशात ५० च शेअर घ्यावे लागतात असे उदहारणात सांगितले आहे. शिवाय या दोन्ही केस मध्ये फायदा किती आणि तोटा किती हे विश्लेषण करण्याचा प्रयत्न केला आहे. सांगण्याचा मुद्दा एवढाच होता की, मलातरी मार्जिन घेतल्याने व्याजाचा अतिरिक्त भुर्दंड याव्यतिरिक्त दुसरा कुठलाही तोटा दिसत नाही. अर्थात, व्याजाचा भुर्दंड हा मार्जिन वापरल्यामुळे ऍम्प्लिफाय होण्याची शक्यता असणाऱ्या फायद्याच्या किंवा तोट्याचा प्रमाणात नगण्य असल्याने मला तरी तो खऱ्या अर्थाने भुर्दंड वाटत नाही.
************
अर्थातच शेअर बाजारातील नफा तोटा हा अभ्यासावरच अवलंबून आहे यात दुमत नाही. परंतु त्याचा मार्जिन घेणे ना घेणे याच्याशी काहीही संबंध नाही. एकदा अभ्यास करून अमुक एक शेअर घ्यायचा ठरवला की मग तो मार्जिन ने घ्यावा की स्वखर्चाने डिलिव्हरी घ्यावी हा प्रश्न असेल. आणि वरच्या उदाहरणात मी मार्जिन विरुद्ध डिलिव्हरी यातील नफा तोटा अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला आहे.

शाम भागवत's picture

29 Mar 2021 - 3:43 pm | शाम भागवत

हो.
वाचण्यात गल्लत झाली.
फायदा अथवा तोटा दोन्ही वेळेस १०० रूपये आहे असे गृहित धरले तर नक्की तुलना करता येईल असे म्हणावयास पाहिजे होते.

उगा काहितरीच's picture

29 Mar 2021 - 8:31 am | उगा काहितरीच

उदाहरण थोडे क्लिष्ट वाटले. (माझा आळशी पणा बाकी काही नाही.)
२५,००० ऐवजी १००० रुपये आहेत आणि शेअर समान वर खाली गेला (१० रुपये वर /१० च रुपये खाली) तर किती नफा तोटा होईल हे कुणी सांगितलं तर बरं होइल.
शेअर ट्रेडिंग करत असलो तरी आत्तापर्यंत मार्जिन नाही घेतले आहे कधी. आणि म्हणावा तसा फायदा पण नाही झाला. जे पण शेअर विकत घेतलेत त्याचीच किंमत खूप कमी झाली. (उदा. अशोक लेलँड , येस बँक वगैरे) त्यामुळे थोडा उत्साह कमी झालेला आहे.

बिटाकाका's picture

29 Mar 2021 - 11:54 am | बिटाकाका

तुमच्याकडे १००० रु. आहेत त्याचे तुम्हाला मार्जिन वापरून शेअर घ्यायचे आहेत की मार्जिन न वापरता? आणि तुम्ही घेऊ इच्छित असलेल्या शेअर ची अंदाजे सध्याची किंमत सांगितलीत तर मी तुम्हाला १० रुपये वर/खाली गेला तर किती फायदा/तोटा होईल हे सांगू शकेन.

उगा काहितरीच's picture

30 Mar 2021 - 5:48 am | उगा काहितरीच

खालचं उदाहरण वाचलं. कळालं बरचसं. बेसिकली तुम्ही म्हणताय कि, स्वतःचे १०० रुपये टाकून शेअर विकत घेण्यापेक्षा ३५च रुपये टाका व बाकि ६५ रुपये मार्जीन घ्या. हा मुद्दा व्यवस्थित लक्षात आला नव्हता माझ्या. बराचसा पटण्यसारखा असला तरी अनुभव, वेळ व खूप जास्त संयम आवश्यक आहे असं वाटतंय.
बरेचसे लोक विचार असा करतात की आपली क्षमता जेवढी असेल तर त्यावर जास्तीत जास्त मार्जीन घेऊन व्यवहार करायचा.
रच्याकने शेअर मार्केट चा जेवढा अभ्यास करावा तेवढा कमीच वाटतोय. BA/Bcom/BE वगैरे सर्वश्रुत डिग्री कोर्सेस सारखी bachelor in share market वगैरे डिग्री असायला हवी. शालेय स्तरावरच (आठवी- दहावी) एखादा विषय असायला हवा. आपल्याकडे अर्थसाक्षरता खूपच कमी आहे असं वाटत आहे.

गणेशा's picture

29 Mar 2021 - 8:39 am | गणेशा

@ राजेश जी,

मागील दोन ते तीन महिन्यात सोन्याचे भाव प्रचंड वाढले ह्याचे कारण काय?

सोने हे कामोडिटी मध्ये येते आणि माझा कामोडिटी बद्दल अभ्यास शून्य आहे. तरीही थोड्या प्रमाणात जे वाचले ते सांगतो आहे..

सोन्याची किंमत वाढणे हे बऱ्याच गोष्टींवर अवलंबून असते, डॉलर, आंतरराष्ट्रीय बाजार हे पण त्याला कारणीभूत आहेत.
बऱ्याचदा मार्केट पडत असेल तर लोकं त्यातून पैसे काढून सोन्यात गुंतवणूक करतात.. आणि जिकडे खरेदी वाढते तिकडे किंमत वाढते..
सोने गेल्या तीन महिन्यात मात्र पडले आहे..feb २०२० पासून मात्र दिवाळी पर्यंत सोन्याच्या किंमतीत खुप वाढ झालेली होती..कारण feb पासून market मध्ये मंदी आलेली होती म्हणुन सोन्यात गुंतवणूक झाली.

आणि दुसरा.

Covid मुळे अर्थव्यवस्था डब्यात असताना .किती तरी कंपन्या खड्यात गेलेल्या असताना.
शेअर मार्केट का तेजीत आले त्याचे कारण काय?
कृत्रिम पने बाजार मंदीत आणि तेजीत आणायची क्षमता काही टोळ भैरव लोकात आहे
असा त्याचा अर्थ मी तरी काढलेला आहे.

नाईलाजाने हे खरे आहे, मार्केट कृत्रिम रित्या मंदीत आणि तेजीत आणले जातात. पण जेंव्हा आपल्या हे लक्षात येते तेंव्हा सबुरी हाच सल्ला.. कारण या कृत्रिम वाढी नंतर किंवा मंदी नंतर मार्केट correct होते आणि आपली entry exit त्या नुसार झाली पाहिजे..

मार्केट हे operator base असल्याने किंवा मोठे मोठे investor जेथे पैसे लावत जातात तेथे किंमत वाढते..
ह्याच कारणासाठी fundamental stocks खुप गरजेचे असतात, कारण ते अश्या वातावरणाचा जास्त effect त्यांच्यावर होऊ देत नाही..

अलीकडे कृत्रिम पद्धतीने विनाकारण तेजीत आणलेले stocks होते,ruchi soya, yes bank आणि alok ind.

आणि म्हणूनच व्यवस्थित अभ्यास करून market मध्ये येणे उत्तम..
आणि long term fundamental मध्ये गुंतवणूक असणे safe सुद्धा आहे.
Penny stocks त्यामुळे मी कधीच विकत घेत नाही. ते operate करणे सोप्पे असतात.

अवांतर :
अभ्यास म्हणुन नाही पण उत्कृष्ट सिरीज म्हणुन तुम्ही sony liv वरील harshad mehata ची सिरीज बघा.. मनोरंजन तर जबरदस्त होईल... अलीकडील ती हिंदी सर्वात उत्कृष्ट मालिका वाटते मला - the scam

बिटाकाका's picture

29 Mar 2021 - 12:17 pm | बिटाकाका

सहमत.

याची दोन करणे अशी की १. बाजारातील मुळत: भक्कम (fumdamentally strong) असलेले शेअर्स ऑपरेटर ड्रिवन शक्यतो असत नाहीत. आणि याच एका कारणास्तव शेअर घेताना त्या शेअरच्या fundamental details चा अभया करणे आवश्यक होऊन बसते. एखादा शेअर वर जातोय तर का जातोय, त्या कंपनीचे मागचे रिझल्ट्स त्या वाढीशी अनुरूप आहेत का? त्या कंपनीचे येऊ घातलेले प्रोजेक्ट्स कशे आहेत, त्यातून कंपनीला भविष्यात कसा फायदा होऊ शकतो, त्यांचा सध्याचा कॅशफ्लो, भविष्यातील इंवेस्टमेंट्स, acquisitions, sale out या आणि अशा अनेक गोष्टी आपल्याला एखादा भक्कम शेअर ठरवायला मदत करतात. अशा भक्कम मूळ असणाऱ्या शेअर्स मध्ये ऑपरेटर सहभाग कमी असतो. २. सेन्सेक्स म्हणा किंवा निफ्टी हे निर्देशांक त्यात सहभागी असणाऱ्या ठराविक ब्लू चिप कंपन्यांच्या शेअरच्या भावावर आधारित आहे. या ब्लू चिप कंपन्या मूलतः भक्कम असणाऱ्या कंपन्या आहेत, जसे की इन्फोसिस, विप्रो, टीसीएस, टाटा मोटर्स, महिंद्रा आणि महिंद्रा, एसबीआय, कोटक महिंद्रा, ऍक्सिस बँक इ. या कंपन्यांचे भाव वधारत असल्याने निर्देशांक वधारत आहेत. आता या कंपन्यांचे निर्देशांक माझ्या मते तरी भविष्यातील आश्वासक आर्थिक वाढीमुळे, रिटेल आणि एफआयआय यांच्या गुंतवणुकीत होत असलेल्या वाढीमुळे वर जात आहेत.
*********
गणेशा म्हणतात त्याप्रमाणे ऑपरेटर ड्रिवन शेअर्स बाजारात आहेतच आहेत पण ते निर्देशांक वर जाण्यात हातभार लावत नाहीत. असे ऑपरेटर ड्रिवन शेअर्स हे त्याच्या वाढत्या ग्राफ मूळे अधिक आकर्षित करतात पण त्यांचा अभ्यास केल्यास अशा शेअर्स ला ओळखून त्यांच्यापासून दूर राहणे सोपे जाते. जर खूप अभ्यास शक्य नसल्यास शक्यतो ब्लू चिप्स शेअर्स ना चिकटून राहावे.

गणेशा's picture

29 Mar 2021 - 9:07 am | गणेशा

FII/DII INVESTMENTS हे सुद्धा मार्केट तेजीत किंवा मंदीत जाण्यास कारणीभूत ठरतात.

Foreign institutional investments (fii ) किंवा domestic institutional investments (dii ) हे दिवसाला कितीतरी करोड ची उलाढाल आपल्या market मध्ये करत असतात.
जर तुम्ही short term साठी shares घेत असाल तर या दोघांच्या movement चा सुद्धा अभ्यास केला पाहिजे nse च्या साईट वरती किंवा money control वर तुम्हाला यांची रोजची उलाढाल दिसेल..
म्हणजे असे institutional investments पैसे टाकत असतील market मध्ये, तर मार्केट मधील shares च्या price वरती जातात.

AMC कंपनी असलेले थोडक्यात mutual fund manage करणारे पण shares मध्ये खरेदी विक्री करतात त्यामुळे हे सारे अभ्यासने गरजेचे असते..

अमर विश्वास's picture

29 Mar 2021 - 12:10 pm | अमर विश्वास

मार्जिन चा वापर उत्तम समजावला आहे ..

मार्जिन ही दुधारी तलवार आहे (स्वतः चा अनुभव ) ... जपून वापरायला हवी

नव्याने ट्रेडिंग / इन्व्हेस्टमेंट करणाऱ्यांनी दूरच राहावे हे उत्तम
आणि हो ..... स्टॉप लॉस चा वापर जरूर करावा ...

शाम भागवत's picture

29 Mar 2021 - 3:46 pm | शाम भागवत

सहमत.
रिस्क रिवॉर्ड रेशो नीट कळल्याशिवाय मार्जिन वापरू नये असे वाटते.
बिटाकाकांनी उदाहरणात १:२ रेशो घेतला आहे.
असो.

बिटाकाका's picture

29 Mar 2021 - 7:07 pm | बिटाकाका

हे १:२ कळले नाही. कुठे घेतला आहे असा रेशो हे सांगाल का?
***********
अजून एक प्रयत्न करूयात, तुम्ही एका अबक कंपनीचा शेअर आणि त्याची एक्स ही सध्यकिंमत सांगा जो तुमच्या कडे असलेल्या वाय या रक्कमेत तुम्ही डिलिव्हरी म्हणून घ्याल आणि झेड एवढा वर चढल्यावर किंवा पडल्यावर तुम्ही नफ्यात किंवा तोट्यात बाहेर पडाल. या एक्स, वाय, झेड किमतींवर आधारित उदाहरणासाठी आपण स्वतःच्या पैश्यातला नफा/तोटा काढू आणि मार्जिन घेतल्यावरचा नफा तोटा काढू म्हणजे चित्र अजून थोडे स्पष्ट होईल.
***********
आपल्यापैकी काही सभासदांना मार्जिन ही दुधारी तलवार वाटते (थोडक्यात जोखीम वाटते), तर ते का वाटते हे जाणून आणि समजून घेण्याची मला नक्कीच इच्छा आहे. मी मार्जिन वापरायला लागून बराच कालावधी उलटून गेलेला आहे आणि मला हे जाणून घ्यायला नक्की आवडेल की मी यात एखादी निसटती बाजू सोडलेली आहे कि कसे.

शाम भागवत's picture

29 Mar 2021 - 8:25 pm | शाम भागवत

मी रिस्क रिवॉर्ड रेशो म्हणालोय. तुम्ही हे शब्द नक्कीच वापरलेले नाहीत. हे मान्य.
पण
तुम्ही तुमच्या उदाहराणांत शेअर ५०० वरून ६०० जाईल असं म्हणताय. म्हणजेच तो शेअर १०० रूपयांनी वाढणार आहे असे म्हणताय असे वाटतय. त्याला नक्कीच काही टेक्निकल आधार असणार आहे हे ही मान्य. हे झाले रिवार्ड.
पुढे तुम्ही म्हणताय की, हा शेअर वाढायच्या ऐवजी ५० रूपयांनी घसरला तर काय होईल? याचाच अर्थ ५० रूपये खाली सपोर्ट आहे असा मी घेतला व तिथे स्टॉपलॉस लावलेला आहे असे मी समजून घेतले.
याचाच अर्थ नुकसान झाले तर एक रूपयाचे होते, पण नफा झाला तर मात्र तो २ रूपयांचा होतो.

मी मार्जिन वाईट आहे असं काही म्हणत नाहीये. किंवा तुम्हाला विरोधही करत नाहीये. पण ज्याला सपोर्ट व रेझिस्टंट या संज्ञा नीट कळलेल्या नाहीत व ट्रेड घ्यायच्या अगोदर रिस्क रिवार्ड रेशो नीट कळलेला नाही, त्याने मार्जीनचा वापर करणे धोक्याचे ठरू शकते असे मला म्हणायचे आहे. कारण मार्जिन हे बहिर्गोल भिंगासारखे काम करते. आपली हुशारी अथवा मूर्खपणा जे काही असेल ते वाढवण्याचे काम करते.

यास्तव आपली जेवढी कुवत आहेत तेवढेच शेअर घेऊन व्यवहार करावेत. १० पैकी ७ बरोबर यायला लागल्यावर मार्जिनचा उपयोग करायला काही हरकत नसावी. थोडक्यात तुमच्या सारखे ज्ञान व अनुभव ज्यांना असेल त्यांनी मार्जीनचा वापर जरूर करावा. नवख्याने याचा उपयोग करू नये एवढेच सुचवायचे आहे

बिटाकाका's picture

29 Mar 2021 - 9:48 pm | बिटाकाका

नाही, नाही, कृपया गैरसमज करून घेऊ नका. विषय विरोधाचा नाही. मला फक्त समजून घ्यायचे आहे की मार्जिन हा प्रकार जोखिमाचा का आणि कसा?
***********
रिस्क रिवॉर्ड रेशो १:२ चा घेतलेला नाहीये किंवा स्टॉप लॉस ही लावलेला नाहीये. वरील उदाहरणात आपण तोटा ५० चा नाही तर ७५ चा धरलेला आहे. तो तसा धरण्याचे कारण रेशो नाहीये तर, मिनिमम मार्जिन चे गणित आहे. आपण उदहारणात घेतलेल्या मिनिमम मार्जिन च्या (जे ब्रोकरेज हाउस ने ठरवलेले असते) टक्केवारीनुसार शेअर ७५ ने पडल्यावर मिनिमम मार्जिन ला पोहोचतो. आता १:१ रेशो आणण्यासाठी शेअर ७५ ऐवजी १०० रु. ने पडू द्यायचा असेल तर आपल्याला अधिकचे मार्जिन =५०० गुणिले २५ = १२,५०० रु. अधिकचे मार्जिन भरावे लागले असते. त्यापेक्षा आपण असे करू, १:१ रेशो आणण्यासाठी आपण नफा आणि तोटा दोन्ही ५० रु. एवढंच धरू. मी तेच उदाहरण खाली परत मांडतो, मार्जिन घेऊन आणि मार्जिन न घेता.
************
समजा माझ्याकडे २५,००० रु. आहेत. मी बाजारात उतरायचे ठरवतो. अभ्यास करतो, आणि एक अबक कंपनीचा शेअर, ज्याची सध्यकिंमत ५०० रु. आहे, आणि जो पुढील दोन महिन्यात ५० रु. ने वाढण्याची शक्यता आहे आणि जास्तीत जास्त ५० रु. पडल्यावर मला बाहेर पडायचे आहे असा माझा अभ्यास सांगतो, असा शेअर घेण्याचे ठरवतो. आता इथे एक मुद्दा परत अधोरेखित करतो की हा शेअर घेण्याचे ठरवेपर्यंत आणि त्याचा फायदा तोटा ठरवेपर्यंत, मार्जिन कुठेही चित्रात येत नाही. मार्जिन चित्रात येते ते शेअर्स कसे घ्यायचे आणि किती घ्यायचे हे ठरवताना.

मार्जिन न घेता
तर, माझ्याकडे २५,००० रु. आहेत. या २५,००० रुपयात, ५००रु. प्रति शेअर प्रमाणे, ५० शेअर मला खरेदी करता येतील. हा शेअर जर ५० रु. वर गेला तर माझा फायदा ५०×५० = २,५००रु. आणि जर शेअर ५०रु. ने पडला तर माझा तोटा ५०×५० = २,५००रु.

मार्जिन घेऊन
आता तेच वरचे ५० शेअर्स, मार्जिन सुविधा वापरून घेताना कसे गणित होते ते पाहू. ५००×५०= २५,००० च्या व्यवहारात इनिशीयल मार्जिन (लेखातील गणितानुसार) म्हणून मला २५,०००×०.३५ = ८,७५० रु. भरावे लागतील. उरलेले १६,२५०रु. ब्रोकरेज हाउस भरेल. आता दोन महिन्यांनी हा शेअर वर गेल्यावर माझा फायदा ५०×५०=२,५०० वजा दोन महिन्यांच्या व्याजाचे साधारणपणे २००रु. = २,३०० रु.
आता मिनिमम मार्जिन च्या गणितानुसार या आपल्या व्यवहारात मिनिमम मार्जिन २१,१२५रु. इतके येईल. म्हणजेच ब्रोकरेज हाउसच्या मते माझ्या सध्याच्या इनिशीयल मार्जिननुसार माझा जास्तीत जास्त तोटा ३, ८७५रु. असेल. म्हणजेच प्रति शेअर ७७.५रु. आपण तर ५० ने खाली गेल्यावरच विकायचे ठरवले असल्याने आपल्याला कुठलेही अधिकचे मार्जिन भरावे लागणार नाही. समजा दोन महिन्यांत ५० रु. ने पडल्यावर आपण शेअर विकून टाकला तर आपला तोटा ५०×५०=२,५०० अधिक व्याजाचे २०० = २,७००रु.

म्हणजेच मार्जिन न वापरता, स्वतःचे २५,०००रु. वापरून आपला फायदा/तोटा=२,५००/२,५०० आणि मार्जिन सुविधा वापरून, स्वतःचे फक्त ८,७५०रु. गुंतवून फायदा/तोटा= २,३००/२,७००रु. शिवाय उरलेले स्वतःचे १६,२५०रु. मार्जिनमध्येच वापरून त्याच कंपनीचे अधिकचे किंवा इतर कंपनीचे शेअर्स घेण्याची आणि त्यातून नफा कमावण्याची संधी हा फायदा वेगळाच.
***********
हेच गणित सर्व शेअर्सला लागू असल्याने, यात जोखीम का व कशी येईल हे समजून घेण्यास मी उत्सुक आहे.

तुम्ही मुळ धाग्यात आणि ह्या प्रतिसादात दोन्ही मध्ये व्यवस्थित सांगितले आहे..
जर अनुभव आणि आपल्यावर कंट्रोल असेल तर तुम्ही म्हणता तो मार्ग योग्य वाटत आहे.

पण अनुभवाची कमी आणि अभ्यास कमी असल्यास किंवा stop loss वगैरे लावण्याची सवय नसल्यास किंवा हा व्यवहार जास्त न कळल्याने share वरती आल्यावरच विकू या असल्या मानसिकतेत
मला वाटते इतर जण जोखीम म्हणत आहेत ती अशी असावी :

समजा, माझ्याकडे २५००० रुपये आहेत, आणि माझा अभ्यास कमी आहे, मी जर मार्जिन घेतले तर मला ६५% रक्कम broker देईल. म्हणजे मी एकाच कंपनीचे जिचा भाव ५०० रुपये आहे तिचे ५० shares न घेता आणखिन अंदाजे ३३ shares घेईल.

म्हणजे ३३* ५०० = १६५०० रुपये मला broker मार्जिन म्हणुन ने दिले.
जर share चा भाव दोन महिन्यात १०० रुपयाने पडला ( आपण येथे जास्तीचे मार्जिन लागले नाही असे मान्य करू )
तर मला त्या shares मध्ये तोटा होईल

२५००० - [((५०+३३) * ४०० ) - १६५०० - व्याज ३५७ ]= ८६५७ रुपये

म्हणजे जवळ जवळ ३५% (अंदाजे मोजले आहे )भांडवल मी या सौद्यात घालवलेले असेल.

पण जर मी मार्जिन घेतले नसते तर

२५००० - (५०* ४०० ) = ५०००
म्हणजे फक्त मला २०% तोटा झाला असता.

म्हणजे जर माझे भांडवल १ लाख असते तर मी अंदाजे ३५०००
रुपये घालवले असते.
आणि एका share मधून ३५ % loss हा जास्त असल्याने ते जोखीम म्हणत असतील.
समजा आणखीन मार्जिन टाकुनही हा shares पडत गेल्यास आणि व्याज वाढत गेल्यास loss मधील तफावत हि वाढत जाणारी राहिल.
त्यामुळे हि जोखीम प्रत्येकाला वाटत असेल.

अवांतर -
[ मी स्वतः कधीही मार्जिन घेतलेले नाही. जेंव्हा माझ्याकडे ४-५ वर्षांनी वेळ असेल, लोन बऱ्यापैकी संपलेली असतील तेंव्हा मी speculative /मार्जिन /options यांचा विचार करेल.. तो पर्यंत माझा portfolio निदान ५ लाखाचा झालेला असेल
परंतु व्यवस्थित अभ्यासाने केल्यास तुम्ही म्हणता तो फायदा जरूर आहे.
माझे ८०% पेक्षा जास्त short term shares बरोबर असतात तरीही अनुभव हा महत्वाचा आहेच ]

बिटाकाका's picture

29 Mar 2021 - 11:32 pm | बिटाकाका

ओके, धन्यवाद गणेशा. थोडक्यात आहे मार्जिन म्हणून घे जास्तीचे शेअर्स ही मानसिकता अधिकच्या लॉस ची शक्यता निर्माण करते ही जोखीम काही लोकांना वाटते. फेअर एनफ!
*************
माझे म्हणणे असे आहे की तुम्ही स्वतःच्या पैशाने ५० घेणार होतात ना मग तेच ५० मार्जिनने घ्यावेत. मी वरच्या प्रतिसादात दोन्ही केस मधील नफा तोटा काढून दाखवला आहे ज्यात फार मोठी तफावत नाही. स्वतःवर नियंत्रण नसेल तर उलट मार्जिन च्या केस मध्ये, एकतर स्वतःचे कमी पैसे गुंतून पडतील, वरून त्या कमी पैश्याच्या ४०-४५% च्या वर नुकसान होणार नाही याची काळजी ब्रोकरेज हाउस घेईल. आणि उरलेले पैसे इतर शेअर्स मध्ये गुंतवून डायव्हर्सिफिकेशन सुद्धा करता येईल.

गणेशा's picture

29 Mar 2021 - 11:55 pm | गणेशा

बरोबर.

तुमचे हे अनुभवाचे बोल आहेत.आणि ते बरोबरच आहेत.

परंतु सर्व लोक असे नसतात, खास करून अभ्यासाचा कंटाळा, न्यूज वर विश्वास ठेवणारे..त्यांना असे वाटते हा अमुक share( example आपण airtel घेऊ) खुप वर जाणार आहे, सगळ्या ब्रोकरेज हाऊस ने airtel ला green signal दिलाय. असे म्हणुन जवळ जवळ ६०० रुपयाच्या वर हा share ते घ्यायला जातात, त्यांची मानसिकता नसते diversified nature ची त्यांना ते shares कसे हि हवे असतात, मग ते मार्जिन सहित घेतात,कधी कधी तर बाहेरील लोन घेऊन पैसे टाकतात आणि आता ५ महिने झाले तरी तो share ५०० ला अडकलेला असतो..

मी स्वतः २०-२५ जणांना(काही आधी share market करत होते )त्यांना फुकट सगळे शिकवले आहे, काही जणांनी लाखो कमावलेत पण काही जण लालच मुळे आणि diversified, consistent नसणे, news वर किंवा अभ्यास न करता ऐकीव माहितीवर विश्वास ठेवून loss ला आहेत

एक उदा देतो.

माझा मित्र sandip, ८ वर्षे मार्केट मध्ये होता, खुप loss सहन करून सोडून दिले होते, मला हि त्याने नको येऊ असेच सांगितले होते, मी यशस्वी झाल्यावर त्याने माझ्याकडून शिकून घेतले..
आणि त्याप्रमाणे त्याने २ लाखावर ४० हजार कमवले हि.
नंतर त्याला दुसऱ्या मित्राने सांगितले हे बकवास आहे, option मध्ये कसे रोज ५-१० हजार मिळतात वगैरे, आणि याने mf पण मोडून ३ लाख options ला टाकले..
३ चे ५ लाख त्याने दिड दोन महिन्यात केले, माझ्या मागे पण लागला होता, हेच कसे बरोबर, तू हे कर, अभ्यास लागत नाही, index मध्ये फक्त वर खाली होते त्यात लगेच book करायचे पैसे, एक मिनिटात १००० रुपये वाढतात, तू काय महिन्याला फक्त ५००० काढतोय.
आणि एकाच महिन्यात त्याने ५ लाखाचे ६० हजार केले आणि market बंद केले.
--==-

मार्केट हे असे आहे कि त्यातून कसे पैसे निर्माण करायचे हे ज्याचे त्याचे वेगवेगळे लॉजिक आहे.. आणि प्रत्येक जण बरोबर असतो..
पण confidance हा तेंव्हाच येतो जेंव्हा तुम्ही अभ्यास करून असता. अनुभव, timing अभ्यास, consistency महत्वाचे.

--

मी स्वतः अजून फक्त zerodha वापरत असल्याने वर्षाचे मार्जिन बहुतेक त्यात मिळत हि नाही..
भविष्यात full stack broker कडे account काढेल बाकी गोष्टीं साठी..

बिटाकाका's picture

30 Mar 2021 - 12:20 pm | बिटाकाका

तुमच्या मतांशी सहमत आहे.
************
ब्रोकरेज हाउसेस ची तुलना, फायदे/तोटे, उपलब्ध असलेल्या सुविधा, प्लॅटफॉर्म (ऍप, वेबसाईट) चा सुटसुटीतपणा याच्यावरही एक लेख होऊ शकतो.

राजेंद्र मेहेंदळे's picture

29 Mar 2021 - 1:47 pm | राजेंद्र मेहेंदळे

समोरच्या वाण्याकडे चुकुन ३-४ रुपये राहिले की संध्याकाळी देउन टाकतो, उद्याचा काय भरवसा? आणि लक्षात कोण ठेवणार?
अशी जिथे आपली गत तिथे मार्जिन प्रकरण भलतेच जड वाटतेय. सरळ आपल्या पैशाने खेळावे, जीत्/हार काहीही झाली तरी आपला आपल्याला ताप.

मार्जिनच्या टक्केवारीपेक्षा जास्त नुकसान झाल्यावर पैसे भरावे लागतात. तोपर्यंत तुमचे मार्जिन खाल्ले जाते.

मार्जिनची आयडिया तीच आहे. नुकसान किती होऊ शकते ह्याचा कॉन्झर्व्हेटिव्ह अंदाज काढतात, आणि तितके पैसे तुमच्याकडून आधीच घेऊन ठेवतात. त्यापेक्षा जास्त नुकसान झाले तर तुम्हाला भरावे लागेल.

अगदी ब्ल्यू चिप स्टॉक मध्ये मार्जिनच्या वर पैसे भरायला लागले असे कितीदा होत असावे ? मार्जिन वापरणाऱ्यांचे काही अनुभव ?

बिटाकाका's picture

29 Mar 2021 - 7:34 pm | बिटाकाका

मला हा मुद्दा जरा समजला नाही. आपले स्वतःचे भरलेले मार्जिन इतका लॉस झाल्यावर नाही, तर त्यापेक्षा बऱ्याच आधी तुम्हाला शेअर ठेवायचा असेल तर अधिकचे मार्जिन भरावे लागेल. वरच्या उदाहरणात पहायचे झाले तर आपण मूळ ५०,००० रु. च्या व्यवहारात इनिशीयल मार्जिन म्हणून स्वतःचे १७,५०० रु. भरले होते. आकडेमोडीनुसार मिनिमम मार्जिन ४२,५०० रु. आले होते. म्हणजेच आपले ७,५०० रु. एवढे नुकसान झाल्यावरच आपल्याला अधिकचे मार्जिन भरून शेअर ठेवायचा आहे की आता लगेच काढून टाकून ७,५०० तोटा बुक करायचा आहे हे दोन पर्याय उभे राहतील. म्हणजेच आपल्या मूळ रक्कमेच्या (१७,५००) साधारणपणे ४० ते ४२ टक्के (७,५००) एवढे नुकसान झाल्यावर, आहे त्या इनिशीयल मार्जिनमध्ये हे जास्तीत जास्त शक्य नुकसान आहे असे ब्रोकरेज हाउस गृहीत धरते. म्हणजेच तुमचे सगळेच्या सगळे इनिशीयल मार्जिन (किंवा खरेतर ४०%) पेक्षा जास्त इनिशीयल मार्जिन बुडण्याची शक्यता शून्य होते, नाही का? जर शेअर आणखी काही काळ ठेवणे इष्ट वाटत असेल तर आपण तितके अधिकचे इनिशीयल मार्जिन भरायचे असते. समजा आपण रु. ३,००० इतके अधिकचे मार्जिन भरले तर आपले इनिशीयल मार्जिन २०,५०० रु. इतके होईल जे व्यवहार फायद्यात पूर्ण झाला तर आपले आपल्याला परत मिळणारच. तोटा झाला तर तोट्याची रक्कम वजा करून परत मिळणार.
************
याव्यतिरिक्त तुम्हाला वेगळे काही म्हणायचे होते का?

अमर विश्वास's picture

29 Mar 2021 - 4:05 pm | अमर विश्वास

मार्जिनच्या वर पैसे भरायला लागले असे कितीदा होत असावे ?

माझ्या बाबतीत असे घडलेले नाही ... याचे प्रमुख कारण मी स्टॉपलॉस वापरतो ...
त्यामुळे किती लॉस सहन करायचा (maximum loss) याची पातळी आधीच निश्चित केलेली असते ...

याचा मुख्य फायदा म्हणजे ओव्हर ऑप्टिमिजम मुळे शेअर ची किंमत कमी होत असली तरी अजून वाट पाहू ... अजून थोडी वाट पाहू
असे होत नाही ... लॉस बुक करायचा बाहेर पडायचे ....

You Win Some ... You loose some

शाम भागवत's picture

29 Mar 2021 - 4:16 pm | शाम भागवत

खरंय.
हे वाट पाहू प्रकरणच पुरती वाट लावते. जेवढा शेअर चांगला तेवढ्याप्रमाणात वाट पाहाण्याचा विचारांचा जोर वाढतो.

बिटाकाका's picture

29 Mar 2021 - 7:15 pm | बिटाकाका

स्टॉपलॉस शी सहमत!
*********
ओव्हरऑप्टिमीजम हा नक्कीच धोका आहेच पण माझ्यामते हा ओव्हरऑप्टिमीजम गणितीक विश्वासात बदलण्यासाठी विविध टूल्स आणि विश्लेषण पद्धतींचा अभ्यास नक्कीच उपयोगाला येतो. म्हणजे कुठे बाहेर पडायचे आणि पडलोच तर तिथेच किंवा कुठे परत आत शिरायचे हे समजायला मदत होते. अर्थात स्टॉपलॉस हा शॉर्ट टर्म आणि इंट्राडे साठी जास्त परिणामकारक आहे. लॉंग टर्म शेअर ला स्टॉपलॉस ला पोहोचावे लागणे म्हणजे तो शेअर निवडण्यात झालेली खूप मोठी चूक अधोरेखित होते.

प्रदीप's picture

29 Mar 2021 - 9:38 pm | प्रदीप

इथे पहा (अर्थात, हे अतिशय टोकाचे लिव्हरेज केल्याने झाले आहे).

बिटाकाका's picture

29 Mar 2021 - 10:03 pm | बिटाकाका

अगदी बरोबर, हा प्रकार जवळजवळ फ्रॉडच्या बरोबर आहे. अतिरेक वाईटच! काही बिलियन डॉलर्स म्हणजे टू मच!

हा लेख लिहल्या बद्दल आपले खुप खुप आभार!
हा लेख वाचला नसता तर मला हे कधीच कळले नसते की लेव्हरेज ईतके दीवसही वापरले जाउ शकते. तरी म्हणतो ते ईंटरस्ट ईंटरस्ट काय बोलतात ते! मी लेव्हरेज फक्त ईंट्राडे साठी वापरले आहे.

प्लीज पुढच्या वेळी फ्युचर सेगमेन्ट मध्ये जी नावे लिहलेली असतात उदारणार्थ :
BANKNIFTY 21 MAY 27 FUT 5 NSE
TATAMOTORS 21 MAY 29 FUT 5 NSE

व फक्त फ्युचर बद्दल एक लेख लिहा प्लीज त्याचा ईंट्रो थोडा सविस्तर व फ्युचर प्रॅक्टीकली कसे विकत घ्यायचे, कोणता अंदाज असतोते लाँग कींवा शॉर्ट करण्यामागे ते प्लीज लिहा.
मागे एकदा एका कोर्स दरम्यान अशी माहीती दीली जात होती की: तुम्ही २ लाखाचे मार्जिन दीवसभरासाठी घेउ शकता व त्यात टाटामध्ये ईंट्राडे करु शकता, हवेच तर आर्धे टाटाचे व आर्धे विप्रोचे असे घेउन दोन लाखचा उपयोग करु शकता. मार्जिन ४० ते ५० हजार ठेवा. मी माझा डाऊट विचारायला गेलो, ते बोलले 'हा बोला' आणि तेव्हाच ती झुम मिटिंग काही कारणांंमुळे बंद झाली (फक्त माझ्या पीसीवर) ती अर्धा पाउन तासने सुरु झाली.
माझा डाउट असा होता की लेव्हरेज घेउ शकतो पण ते एका ट्रेड पुरते व एका शेअर पुरते, म्हणजे ५० टाटा घेउ शकतो माझ्या असलेल्या लेजर बॅलेन्स वर पण त्या जागी मी २०० घेतले लेव्हरेज वर. ते सांगत होते की तुम्ही ५० हजार मार्जिन ठेउन २ लाख लेव्हरेज घ्या (सौदे टाकायच्या आधी) मग त्यातल्या ३० हजाराचे टाटा घ्या एक लाखाचे विप्रो घ्या बाकी ७० हजाराचे बायोकॉन घ्या पण दीवसाच्या शेवटी सर्व सौदे पुर्ण करा. अस करता येत?

मार्जिन बदल बोलताना हे बोलणे अतिशय जरुरीचे आहे ते म्हणजे आपण नक्की कोणत्या गोष्टीतील मार्जिन ( किंवा लिव्हरेज ) म्हणतोय

भारतात शेअर बरोबर शेअर फुचर हि आहेत आणि दोन्ही साठी उपलब्ध मार्जिन लिव्हरेज हे वेगळे असते त्यामुळे आधी नमूद करावे कि कशाबद्दल आपण बोलणार आहोत ते नाहीतर गोंधळच गोंधळ ( आणि हो फुचर आणि ऑप्शन याचा तर अजिबात गोंधळ घालू नये दोन वेगवेगळे प्राणी आहेत ते फार वेगळे )

१) शेअर घेणे विकणे , फक्त दिवसापुरते मार्जिन ल ( इंट्राडे किंवा ) यात शेअर म्हणजे प्रत्यक्ष शेअर त्यावर आधारित सिंगल शेअर फुचर्स नाही ते वेगळे )
इंट्राडे साठी सर्वसामान्यालाही बरेच लिव्हरेज मिळू शकते १: x५,१० कितीही मिळू शकत असे असे दिसतंय पण डिलिव्हरी असेल तर ते ३५:६५ किंवा तत्सम असते त्यापेक्षा जास्त सर्वसामान्याला मिळेल कि नाही शंका आहे
२) शेर किंवा इंडेक्स किंवा कमोडिटी वर आधारित फुचर असतात त्या "फुचर " या प्रॉडक्ट मध्ये असे लिव्हरेज अंतर्भूतच असते आणि त्यावर इंट्राडे आणि जास्त दिवसांसाठी अतर्किट लिव्हरेज मिली सहकते
अमेरिकेतील उदाहरण देतो ( ङोलर रुपये हे गौण आहे फक्त गणित )
खालील सर्व प्रोडक्त्त हे एकाच गाष्टींवर बेतलेले आहेत
S& P हि इंडेक्स समजा ३००० ला चालू आहे तर
१) त्यावर आधारित एक्सचेंच ट्रेडेड ई टी एफ = SPY एस पी वय असतील तर त्यासाठी ३०००कx ५० =$१५०,००० लागतील असतील तर दिवसाचे जास्तीत जास्त १:४ लिव्हरेज मिलेल, डिलिव्हरी असेल तर १:१ जास्त नाही म्हणजे आपले स्वतःचे ७५,००० $lagtil

२) ए मिनी फुचर ES = १ फुचर = ३००० x $५० = $१५०,००० एवढे एक्सपोजर , दिवसासाठी $1000 डिपॉझिट वर ट्रेड करू शकता णजे लिव्हरेज १५०,००० / 1000 पण तेच जर ती पोसिशन अनेक दिवस ठेव्याची असेल तर १ फुचर साठी साधारण $१३,००० डिपॉझिट लागेल म्हणजे लिव्हरेज १५०,००० / 13,000
म्हणजे फुचर मध्ये "अंगभूत " लिव्हरेज एक्सचेंज नीच दिलेलं आहे , मार्जिन लोन नाही

चौकस२१२'s picture

30 Mar 2021 - 10:41 am | चौकस२१२

झालेल्या चर्चेतून मी हा पुढील मांडतो ( यात स्टॉप लॉस वगैरे मुद्दे बाजूला ठेउयात )
- मार्जिन ( दिवसासाचे किंवा अनेक दिवसांचे ) हि दुधारी तलवार आहे याचाच साधा अर्थ असा होता कि मार्जिन चा वापर केल्याने फायदा आणि तोटा दोन्ही "द्विगुणित ( १:१ धरू ) ) होऊ शकतो, मार्जिन म्हणजे कर्ज एवढा साधा अर्थ.. मग त्याचे फायदे आणि तोटे दोन्ही आले .. म्हणून दुधारी
...१:१ असे लिव्हरेज धरुयात १ रु शेअर क्स १०० शेअर घेतले ,
श्रीमान अ = मार्जिन ५० + आपले ५० , १०% फायदा झाला तर एकूण फायदा आपल्या ५० रु वर १० रु म्हणजे २०% ( यात व्याज ० असे धरू सध्या )
श्रीमान ब = मार्जिन घेतले नाही म्हणजे आपले १०० रु १०% फायदा झाला तर एकूण फायदा आपल्या 10 रु वर १० रु म्हणजे 1०% ( यात व्याज ० असे धरू सध्या )
याचे उलट झाले तर श्रीमान अ यांचे जास्त नुकसान होईल असे सरळ गणित आहे

बिटाकाका मग यात धोका नाही का जास्त? मला तुमचा मुद्दा कळला नाही ..( हा हे मान्य कि माजीं वापरून तुम्ही विविधता अनु शकता आणि धोका कमी करू शकता )
तुम्ह वरचे १रू गुणिले १०० शेअर चे उदाहरण घेऊन ( १:१: लिव्हरेज ) सांगाल का

चौकस२१२'s picture

30 Mar 2021 - 10:43 am | चौकस२१२

श्रीमान ब = मार्जिन घेतले नाही म्हणजे आपले १०० रु १०% फायदा झाला तर एकूण फायदा आपल्या 100 रु वर १० रु म्हणजे 1०% ( यात व्याज ० असे धरू सध्या )
याचे उलट झाले तर श्रीमान अ यांचे जास्त नुकसान होईल असे सरळ गणित आहे
आधी लिहताना चूक झाली

बिटाकाका's picture

30 Mar 2021 - 12:08 pm | बिटाकाका

ओके. तुम्ही १:१ म्हणजे ५०% लिव्हरेज म्हणताय असे गृहीत धरतो.

मार्जिन घेऊन, श्री अ.
स्वतःकडे ५०रु. होते. प्रति शेअर १ रु. प्रमाणे, ५०% लिव्हरेज वापरून, १०० रु. किंमतीचे १०० शेअर्स घेतले. शेअर १०%, म्हणजेच प्रति शेअर ०.१ रु. ने वाढला तर माझा नफा १०रु., म्हणजेच ५० रु. गुंतवून १० रु. मिळवले. याउलट जर शेअर १०%, म्हणजे प्रति शेअर ०.१ रु. ने पडला, तर माझा तोटा १०रु., म्हणजेच ५० रु. गुंतवून १० रु. तोटा. (व्याज गृहीत धरलेले नाही)

मार्जिन न घेता, श्री ब
स्वतःकडे १००रु. होते. प्रति शेअर १ रु. प्रमाणे, कुठलेही लिव्हरेज न वापरता, १०० रु. किंमतीचे १०० शेअर्स घेतले. शेअर १०%, म्हणजेच प्रति शेअर ०.१ रु. ने वाढला तर माझा नफा १०रु., म्हणजेच १०० रु. गुंतवून १० रु. मिळवले. याउलट जर शेअर १०%, म्हणजे प्रति शेअर ०.१ रु. ने पडला, तर माझा तोटा १०रु., म्हणजेच १०० रु. गुंतवून १० रु. तोटा.

आता एक गल्लत माझ्या लक्षात येतेय ती अशी की बहुतेक तुम्ही गुंतवणुकीच्या प्रमाणात परताव्याची टक्केवारी गृहीत धरत आहात आणि मी प्रत्यक्ष रक्कम. म्हणजेच तोट्याच्या केस मध्ये श्री. अ यांनी ५० रु. गुंतवून १० रु. नुकसान करून घेतले जे गुंतवणुकीच्या २०% आहे. याविरुद्ध श्री अ यांनी १०० रु. गुंतवून १० रु. नुकसान करून घेतले जे गुंतवणुकीच्या १०% आहे.
आता टक्केवारीला महत्व द्यायचे की प्रत्यक्ष रुपयांना हा वैयक्तिक प्रश्न असू शकतो. करण दोन्ही केस मध्ये रुपयांच्या स्वरूपात अगदी सारखा नफा तोटा होतोय, तो म्हणजे १०रु. प्रत्यक्ष फरक असेल तो व्याजाचा आणि ते शॉर्ट टर्म साठी परताव्याचा तुलनेत परवडेबल असते.

मी वैयक्तिक रित्या तरी प्रत्यक्ष रक्कमेला महत्व देतोय. म्हणजेच अगदी सारखा नफा तोटा असताना मी माझे स्वतःचे सगळे पैसे अडकवण्यापेक्षा ५०% अडकवतो आणि उरलेले ५०% दुसरीकडे वापरून परत तेवढीच संधी निर्माण करतो.
********
तुमचे उदाहरण समजण्यात अजूनही माझी काही गल्लत होतेय का?

चौकस२१२'s picture

31 Mar 2021 - 11:43 am | चौकस२१२

ओके. तुम्ही १:१ म्हणजे ५०% लिव्हरेज म्हणताय असे गृहीत धरतो.
हो बरोबर उद्धरण सोप्पे ठेवण्यासाठी पण ५०% लिव्हरेज नाही तर १ ला 1 लिव्हरेज असे म्हणणे जास्त अचूक होईल ५० रुपये आपले + ५० रुपये कर्ज ..असो पुढे
आपल्याला माझे म्हणे कळले आहे पण आपण परत टंक लेखन करताना जरा गोंधळ झालाय असे वाटते

मुख मुद्दा हा आहे "आता टक्केवारीला महत्व द्यायचे की प्रत्यक्ष रुपयांना."
.
साधारण गुंतवणुकीचा लेखाजोखा करतांना एकूण जगात मोजण्याचा मापदंड हा टक्केवारीला असतो .. कुठंही बघा ! म्हणून हा प्रश्न वयक्तिक ना राहता जगात कसे मोजले जाते त्याप्रमाणे बघावा असे वाटते
थोडक्यात
अ आणि ब दोघांनी हा इ एकूण "एक्सपोजर " १०० रु चेच घेतले आहे आणि ती उंटवणूक १०% वर किंवा खाली गेली
अ यांनी ५०% मार्जिन घेतले तर त्यांना २०% नफा किंवा तोटा होऊ शकतो ( + उरलेले ५०रू ते इतर कामासाठी वापरू शकतात कीव इतर गुंतवणुकीसाठी )
बी यांनी मार्जिन घेतले नाही तर त्यांना १०% नफा किंवा तोटा होऊ शकतो (काही उरलेले नाही )
असा सुद्धा हिशोब आहे ..म्हणून फक्त विन विन असे म्हणता येणार नाही , लूज लूज असे सुद्धा होऊ शकते .. एवढेच माझे म्हणणे आहे

बिटाकाका's picture

31 Mar 2021 - 5:15 pm | बिटाकाका

ओके, फेअर एनफ. ज्याचा त्याचा दृष्टिकोन. माझा वैयक्तिक दृष्टिकोन असा की माझ्या खिशातुन काय जातंय आणि खिशात काय परत येतंय. टक्केवारी ने मला वैयक्तिक तरी काही फरक आतापर्यंत तरी पडलेला नाही. माझ्या खिशातून ५० गेले काय आणि १०० गेले काय दोन्ही मध्ये १० चा नफा/तोटा येण्याची शक्यता असेल तर मी ५० च गुंतवेन आणि बाकीचे ५० इतरत्र, असा माझा वैयक्तिक दृष्टिकोन म्हणा ना.
***********
मार्जिन विन-विन ह्या निष्कर्षाला अजून मी नक्कीच पोहोचलेलो नाही, पण दुधारी कशी हे जाणून घेण्याची उत्सुकता मात्र नक्कीच आहे. तुमच्यासह अनेक जाणकार आणि अनुभव घेतलेले लोक मार्जिन ला दुधारी मानत आहेत तेव्हा त्याला नक्कीच काहीतरी बाजू असणारच. फक्त ती मला माझ्या अनुभवाने सापडलेली नाही. गणेशा म्हणतात तसे, इथे अनेक जाणकार असल्याने, नक्कीच शिकता येईलच.

चौकस२१२'s picture

31 Mar 2021 - 6:50 pm | चौकस२१२

दुधारी कशी = झाला फायदा तर जास्त आणि झालं तोटा तर जास्त एवढे साधे लिव्हरेज चे गणित आहे साहेब...संधी पण आहे धोका पण आहे

मी जेवहा १:१ लिव्हरेज घेतले होते तेव्हा माझे ६०,००० गेले तेच लिव्हरेज घेतले नसते तर ३०,००० गेले असते ..
जो चांगला ट्रेडर आहे तो/ती याचा जास्त फायदा करून घेऊ शकते/ तो पण खराब ट्रेडर असेल तर जास्त फटका बसू शकतो ...

शेअर मध्ये तर जास्तीत जास्त ३०:७० असे लिव्हरेज करता येते पण मार्जिन करन्सि ट्रेडिंग (एफ क्स) मध्ये तर काही (चालू ) ब्रोकर १:५०० एवढे लिव्हरेज देतात ..
लोक भुलून जाऊन घेतात आणि म्हणूनच काही वर्षांपूर्वी अमेरिकन सरकारने असे मार्जिन १:५० जास्तीत जास्त असा नियम काढला तो उगाच नाही ( आज , माल्टा, रशिया असल्या देशातील ब्रोकर तुम्हाला १:१००० पण लिव्हरेज देतील )
अजून एक गोष्ट मार्जिन संबंधी .. मार्जिन वर जेवहा शेअर घेतले जातात तेवहा ब्रोकर त्या शेअर चा उपयोग स्वतःच्या इतर अंतर्गत ट्रेडिंग साठी करू शकतो ( शॉर्ट साठी भाड्याने देणे ) जरी "ते तुमच्या नावाने असले तरी "
म्हणजे ५० + ५० असे सर्व १०० शेअर त्याच्या वापरास्तही असतात .. उद्या तो बुडाला तर एक वेगळाच वांदा.. बर ते जाऊदे
भारतीय मार्जिन बद्दल ३ प्रश्न होते
( परत १:१ एवढेच लिव्हरेज धरू )
१) स्वतःकडे आधीच शेअर असतील तर त्याचं % एवढे मार्जिन लोन घेता येते ( १०० चे शेअर तर अजून ५० कर्ज घेऊन एकूण १५० चे शेअर्स घेणे ) कि ज्याला लोन अगेन्स्ट शेर असे म्हणले जाते हे कळले... पण खालील शक्य आहे का?
२) खात्यात १०० रु आहेत त्याचे अजून शेअर घेतलेले नाहीत आणि मार्जिन लोन मिळत असेल तर एकाच वेळीस १००+५० शे शेअर घेणे
१) आणि २) मध्ये ब्रोकर ला एकूण धोका तेवढाच असतो त्यामुळे इतर देशात हे दोन्ही एकच मानले जाते .

प्रश्न ३) "प्रोटेक्टड equity लोन" यात शेअर घेणे साठी लागणारी रक्कम १००% कर्जांनी दिली जाते अर्थात त्याआधी आपल्याला ब्रोकर ला २ गोष्टी द्याव्या लागतात
- कर्जाऊ रकमेवरील संपूर्ण व्याज + शेअर प्रोटेक्ट करण्यासाठी त्याच स्ट्राईक चा पुट ऑप्शन चाय खरेदीच किंमत
- म्हणजे घेतलेला शेअर जरी ऑप्शन संपेपर्यंत ० ला गेला तरी यात ब्रोकर ने दिलेलं कर्ज १००% परत करता येते कारण पुट ऑप्शन घेतलेले असतो...
असे लोन फक्त मी ऑस्ट्रेलीयत बघितले आहे इतर कोठे नाही भारतात असे काही आहे का?
यावर कोणाला उत्सुकता असले तर हि लिंक बघा https://www.westpac.com.au/personal-banking/investments/loans/equity-loan/

गणेशा's picture

31 Mar 2021 - 8:57 pm | गणेशा

चौकस जी,
थोडे मध्ये बोलतो..

चौकस जी, तुम्ही म्हणताय ते कळते आहे. योग्य आहे. माझे हि तसेच म्हणणे असल्याने मी मार्जिन घेत नाही.

परंतु बिटाकाका फक्त मार्जिन बद्दल न बोलता त्या सोबत diversification चे बोलत आहेत.त्यामुळे ते म्हणतायेत ते सुद्धा थोडी risk वाढवून बरोबर आहे ( मी स्वतः ते करणार नाही लगेच )

उदा.

जर माझ्याकडे २५००० रुपये असतील आणि मला ५०० रुपयांचे ५० shares येत असतील तर ते म्हणतायेत तुम्ही ५० shares च घ्या (फक्त त्यातील ६५% share मार्जिन ने घ्या )
आपण सोप्पे जावे म्हणुन ५०% shares (२५ shares )मार्जिन ने घेतले असे समजू.

म्हणजे १२५०० मध्ये माझ्याकडे ५० shares आले.
(यातले २५ shares मार्जिन ने आहेत )

आता राहिलेले १२५०० असेच मी वेगवेगळ्या shares मध्ये अर्धे अर्धे मार्जिन घेऊन गुंतवले. तर मी जेथे एका कंपनीचे shares घेणार होतो तेथे
२ किंवा त्या पेक्षा जास्त कंपनी चे shares घेतो आहे. शिवाय मुळ कंपनीचे जेव्हडे shares मला घ्यायचे आहेत ते तर मी घेतलेले आहेच.

अश्या पद्धतीत, मला व्याज जास्त लागेल.. पण त्याच वेळेस माझी ५०% amount इतर share मध्ये diversified झाल्याने माझी risk probability कमी झाली आणि profit मिळण्याची probability पण वाढली...

त्यामुळे त्यांना मार्जिन हे win win वाटते आहे. कारण मुळ share पडला तर तो तसाही पुर्ण २५००० रुपये घेऊन तेव्हडेच नुकसान करून देणार होता. म्हणजे व्याजाचे थोडे जास्त पैसे देऊन, मी तो लॉस इतर ठिकाणी भरून काढू शकतो.. किंवा सगळीकडे मला profit झाल्यास माझा जास्त फायदा होतो.

तुम्ही म्हणता आहात तेथे तुम्ही, तुमच्याकडे असलेली २५००० रुपये आणि मार्जिन मिळते आहे म्हणुन (५०% मार्जिन धरू, सोप्पे जाण्यासाठी )
तुम्ही पुर्ण ३७५०० रुपये invest केल्याने तोटा पण त्याच पटीत होतो आहे असे म्हणता आहे.

माणुस जनरली त्याला एक stock वर जाईल वाटत असेल तर त्यात जास्त रक्कम टाकू इच्छितो, ह्या लालसेवर कंट्रोल केल्यास तो आहे त्या पैश्यात diversified nature करू शकतोय आणि ते हि पाहिजे तो share तितकाच घेऊन असे त्यांना म्हणायचं आहे..

होप मी बरोबर बोललो आहे..

- गणेशा

बिटाकाका's picture

31 Mar 2021 - 9:29 pm | बिटाकाका

अगदी बरोबर!
*********
लालसेवर नियंत्रण मिळवणे हा बाजारात टिकण्यासाठी गरजेचा अविभाज्य घटक आहे आणि त्याला मार्जिनशी किंवा इतर कुठल्याही घटकाशी न जोडता त्यावर जास्तीत जास्त अंमलबजावणी करणे सोयीस्कर. मार्जिन हे एक कर्ज आहे, घर, कार किंवा इतर कुठलेही कर्ज घेताना जसा व्यवहारिक विचार होतो तोच इथेही व्हावा असे मला वाटते.
************
लालसा हा प्रकार लॉंग टर्म साठी किती त्रासदायक आहे माहीत नाही (कारण मी स्वतः लॉंग टर्म करत नाही) पण शॉर्ट टर्म साठी आणि त्याहूनही विशेष इन्ट्राडे साठी खूपच महत्वाचा आहे असा माझा अनुभव आहे. एक्झिट प्राईस ठरवताना अतिआशावाद नेहमी नडतो. बरेच वेळेस ग्राफ्सही अजून वाढेल असंच दाखवतात पण घडते नेमके उलटे. ग्लोबल प्रेशर, विक ग्लोबल क्यूज इ. गोष्टींनी मार्केट करेक्शन करते आणि मग आपल्याला वाटत राहते की एक्झिट केले असते तर बरे झाले असते. म्हणून हळू हळू लालसा नियंत्रण करत योग्य वेळेला एक्झिट करणे किंवा नफा काढून घेऊन ट्रेलिंग स्टॉपलॉस वापरणे हे हळूहळू आत्मसात करत आहे. हळू हळू ती सवय होऊन जाईल.

बिटाकाका's picture

31 Mar 2021 - 8:58 pm | बिटाकाका

"आहे मार्जिन म्हणून घे जास्तीचे शेअर्स" ही मानसिकता अधिकच्या लॉस ची शक्यता निर्माण करते ही जोखीम काही लोकांना वाटते असे वर एका प्रतिसादात गणेशा यांच्या विश्लेषणानंतर लक्षात आल्याचे नमूद केले आहेच. पण तो मार्जिन चा नाही तर मानसिकतेचा प्रश्न आहे असे मला वाटते. मी वैयक्तिकरित्या माझी "लालसा" हा माझा बाजारातील सर्वात मोठा शत्रू मानतो. माझ्या आतापर्यंतच्या नुकसान झालेल्या केसेस मी बघितल्या आणि मला लक्षात आले कि ४०-५०% वेळेस मी अधिक फायद्याच्या लालसेने शेअर योग्य किंमतीला न काढणे, किंवा अधिकच्या फायद्याच्या लालसेने अधिकचे शेअर्स घेणे अशा चुका केल्या. काही वेळेस अधिकच्या फायद्याच्या लालसेने पार्शियल प्रॉफिट/ट्रेलिंग स्टॉपलॉस वगैरे गोष्टी न करून पुढे वेळ किंवा पैसा ह्या दोन्ही बाबतीत नुकसान करून घेतले. ह्या बाबतीत मी हल्ली कटाक्षाने सुधारणा करण्याचा प्रयत्न करतो.
************
माझा मुद्दा असा आहे की मार्जिन टाळून आहे त्या स्वतःच्या पैशात तुम्ही शेअर घेणारच आहेत ना, मग त्या पैशात जितके शेअर येणार होते तेवढेच शेअर मार्जिन ने घेतल्यास रिस्क कमी होते आणि फायद्याची शक्यता वाढते.
************
प्रश्न १ आणि २ कळाले नाहीत. म्हणजे तुम्ही सांगताय ती माहिती कळाली पण प्रश्न के ते समजले नाही. मी ऑप्शन्स/फ्युचर्स करत नसल्याने प्रश्न ३ चे उत्तर माहीत नाही. पण इक्विटीच्या केस मध्ये मिनिमम मार्जिन (वर लेखात उदाहरण दिलेच आहे, मिनिमम मार्जिन हे नेहमी ब्रोकर ने दिलेल्या कर्जापेक्षा जास्तच असते आणि तुमच्या पोझिशनचं बाजार मूल्य मिनिमम मार्जिनच्या खाली येऊ शकत नाही) चा वापर करून ब्रोकरेज हाउसेस स्वतःचे १००% पैसे नेहमी सुरक्षित ठेवतात.

चौकस२१२'s picture

1 Apr 2021 - 6:08 am | चौकस२१२

************
माझा मुद्दा असा आहे की मार्जिन टाळून आहे त्या स्वतःच्या पैशात तुम्ही शेअर घेणारच आहेत ना, मग त्या पैशात जितके शेअर येणार होते तेवढेच शेअर मार्जिन ने घेतल्यास रिस्क कमी होते आणि फायद्याची शक्यता वाढते.
% वारी मध्ये रिस्क वाढते असे माझे म्हणणे आहे कमी कशी?
१०० वर समजा मी १०% रिस्क घ्यालाय तयार आहे तर माझे १० बुडतील ( मार्जिन नसेल तर)
तेच जर मार्जिन घेतले वर पण १०च बुडतील ( आपल्या पद्धतीने बघितले तर ) पण % मध्ये माझा २०% तोटा झाला कारण मी ५० रुपये टाकेल होते
( उरलेले ५० काय करतील हे बाजूला ठेवले पाहिजे कारण त्यात फायदा किंवा तोटा दोन्ही होऊ शकतो )

श्री गावसेना प्रमुख's picture

30 Mar 2021 - 1:29 pm | श्री गावसेना प्रमुख

चिन मध्ये अगदी रस्त्याच्या बाजुला असलेल्या न्हाव्याला सुद्धा कर्ज देउन मार्केट मध्ये गुंतवणुक करायला भाग पाडले( भविष्यात होणार्या फायद्याविषयी बोलुन)
आता असे मार्जीन देऊन इथे ही सेम होत आहे...अश्याने बनावटी बुम येते आणी जेव्हा फुगा फुटतो तेव्हा कर्जबाजारी झालेला असतो.
नपेक्षा जेव्हा पैसे येत जातील तेव्हा किंवा एस आय पी ने हि खरेदी होउ शकते.

एच डी एफ सी तर ७५% मार्जीन देते पण जेव्हा आपले पंचवीस संपतात तेव्हा ते विकुन मोकळे होतात..

अमर विश्वास's picture

30 Mar 2021 - 2:21 pm | अमर विश्वास

चीन मधे काय घडले माहित नाही

पण भारतात केवळ मार्जिन मुळे बनावटी बूम येते हे म्हणणे म्हणजे नळाच्या आशीर्वादाने पाऊस पडतो असे म्हणण्यासारखे आहे (पुलंची क्षमा मागून )

एकतर रिटेल इन्वेस्टर्स इनफ्लो फक्त ४२% आहे. त्यातले फक्त २०% मार्जिन वापरतात म्हणजे एकंदरीत पूर्ण मार्केटच्या ८ ते ९% फक्त ....

त्यामुळे बूम वगैरे काही येत नाही

चौकस२१२'s picture

31 Mar 2021 - 11:47 am | चौकस२१२

नसेल येत बूम ठीक ( अर्थत (आपण हे गृहीत धरताय कि इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर मार्जिन वापरता नाहीत! ) फक्त प्रश्न असा आहे कि मार्जिन चे फायदे तोटे दोन्ही समजवून घयावे .. कोणी फक्त फायदे किंवा फक्त तोटे विचारात घेऊ नये

मार्जिन ही अतिशय मदतकारक सुविधा आहे. खासकरून बाजारातील प्रत्येक डाउन हा एक संधी असते

"संधी" असते जेव्हा एखादयकडे गुंतवयाला पैसे शिल्लक असतात तेव्हा !
दुर्दैवाने सर्व "इन्व्हेस्टमेंट गुरु " हेच नेहमी सांगतांना ऐकलंय...
मग असे विचारावेसे वाटते कि "भाऊ माझे पैसे आधीच गुंतवलेले असतील तर हि कशी बरे संधी मला??
स्वानुभव : जि ई आणि इंटेल चे शेअर मार्जिन वर घेतले होते ४०% खाली गेले . लूज लूज झाले होते ....

चौकस२१२'s picture

1 Apr 2021 - 6:01 am | चौकस२१२

गणेश / बिताकाकाक आपलं डिव्हर्सिफिकेशन चा मुद्दे मान्यच आहे आणि तो विचार करण्यासारखा आहे
पण मूळ मुद्दा असा आहे कि डिव्हर्सिफिकेशन संधी बाजूल ठेवली (परत डिव्हर्सिफिकेशन बाजूल ठेवू कारण त्या उरलेली ५० मधून जे तुम्ही वेगळे बाजारात घालाल त्यातही तोटा होऊ शकतो फक्त नफाच होऊ शकतो असे कसे म्हणणार ) तर समसमान तुलना ( मार्जिन , मार्जिन नाही ) तर यात जसे विन विन असू शकते तसे लूज लूज होऊ शकते हे मांडले कारण सुरवातीला तरी आपण फक्त विन विन असे सुरु केलेत म्हणून .! आणि दुसरी तलवार नसावी असे म्हणालात म्हणून )
आणि परतावा हा जगभर टक्केवारीतच मोजलं जातो भले तुम्ही नसाल मोजत
असो हे सर्व वाचून / चर्चेतून ज्याला मार्जिन म्हणजे काय हे माहित नसेल तर त्याला मार्जिन चे फायदे आणि तोटे दोन्ही समजले तर बरेच आहे

गणेशा's picture

1 Apr 2021 - 7:52 am | गणेशा

चौकस जी,

मी तुम्हाला रिप्लाय देण्या अगोदर वरती लिहिलेले आहे, हि दुधारी तलवार वाटते .. कारण तुमचे जास्तीचे म्हणजे ३५% नुकसान होते मार्जिन घेतल्यावर, ( जर तुम्ही तुमच्या १००% amount वर ६५ %जे मार्जिन घेतले तर )
मार्जिन न घेता नुकसान २० % च होते.

जरी तुम्ही ५०-५०% चे share घेतले तर ४०% नुकसान होईल. आणि मार्जिन न घेता २०% ( म्हणजे ५०० चा share १०० ने पडला तर )

पण जर राहिलेल्या पश्याचा विचार करता त्यात हि नुकसान झाले तर तुम्हाला हे जास्तीचे नुकसान सहन करावेच लागेल..हा मार्जिन चा तोटा आहेच.

चौकस२१२'s picture

1 Apr 2021 - 8:56 am | चौकस२१२

बरोबर गणेश... म्हणूनच मार्जिन हि दुधारी तलवार हे जग मान्य करत .. (घेणे ना घेणे ज्याचा त्याचा प्रश्न हे बरोबर )
असो चांगली चर्चा झाली ..

मार्जिनच्या बाजूने एकच मुद्दा आहे. बर्‍याच वेळेस मार्जिनवरील ब्रोकरेज कमी असते.

मार्जिनबद्दल एवढी माहिती नव्हती. सुरेख माहिती दिलीत.
धन्यवाद.
मुळ विषय सुरु करणारे गणेशा यांनादेखिल अनेक धन्यवाद.

फक्त एक गोष्ट, जी आधी "शाम भागवत" यांनी सुद्धा सांगितली होती-

आता हेच जर, मी मार्जिन नसते वापरले तर काय झाले असते ते बघू. माझ्याकडे २५,००० रु. होते. त्यात अबक कंपनीचे ५००रु. प्रमाणे ५० शेअर्स येतील ( हे शेअर्स डिलिव्हरी मोड मध्ये असतील). जर तो अपेक्षेप्रमाणे १००रु. वर गेला तर फायदा ५०×१००=५,०००रु. होईल. जर तो खाली गेला आणि ब्रोकरेज हाउसप्रमाणे आपणही तो ४२५ रु. सध्यकिमतीवर तो विकून टाकला तर तोटा ७५×१००= ७५००रु. होईल.

१. एकुण समभाग घेतले- ५०
२. प्रत्येक समभागाची किमत- ५००
३. एकुण गुंतवणुक= १. x २. = ५० x ५००= २५,०००

घटनाक्रम १- फायदेशीर घटनाक्रम
४. प्रत्येक समभागाची किंमत वाढली इतक्या रकमेने- १००
५. एकुण समभाग घेतलेले होते- (वरील १. वरुन)- ५०
६. एकुण फायदा= ४. x ५. = १०० x ५०= ५०००

घटनाक्रम २- तोट्याचा घटनाक्रम
७. प्रत्येक समभागाची किंमत कमी झाली इतक्या रकमेने- ७५
८. एकुण समभाग घेतले होते- (वरील १. वरुन)- ५०
९. एकुण तोटा= ७. x ८. = ७५ x ५० = ३,७५०.

तोटा होइल ३,७५०/-
७,५००/- नाही.

असो. मार्जिनचा फायदा वेगळ्या पद्धतीने होतो, हे बाकी चर्चेतून आपण लक्षात आणून दिलेलेच आहे.
पुन्हा एकदा अनेक धन्यवाद.

चौकस२१२'s picture

11 Jun 2021 - 1:27 pm | चौकस२१२

तुलना करायाची तर "फायदेशीर घटनाक्रम" आणि "तोट्याचा" यात वेगवेगळे टक्केवारी का धरली आहे? ते कळले नाही. एकदा १०० आणि एकदा ७५ ?

बिना मार्जिन : स्वतःची गुंतवणूक २५,०००
५०० चाय शेअर वर १०० नफा झाला,,, तर २५ वर ५ नफा = २५% नफा

५०० चाय शेअर वर १०० तोटा झाला तर,,, २५ वर ५ तोटा = २५% तोटा

५०% मार्जिन घेतले तर स्वतःची गुंतवणूक १२,५००+ १२,५०० उधार
५०० चाय शेअर वर १०० नफा झाला तर १२,५ वर ५ नफा = ४०% नफा
५०० चाय शेअर वर १०० तोटा झाला तर १२,५ वर ५ नफा = ४०% तोटा

सारांश काय मार्जिन हि दुधारी तलवारचआहे , साधे गणित आहे !
हा हे मान्य कि मार्जिन घेतल्यामुळे उरलेले १२.५ इतर ठिकाणी गुंतवता येतात पण याचा अर्थ हा होत नाही कि ते उरलेले १२.५ फक्त नफा कमावतील
तिथेही तोटा होऊ शकतो
मार्जिन ने भले भले गोत्यात आलेले आहेत .. त्यामुळे पाऊल जपून टाकणे , स्वतःवर विश्वास असेल तर घ्या उडी.. आणि मार्जिन चे "गोडवेच फक्त" गाणारे हे विसरतात कि बुलिश / तेजी असलेल्या बाजारात अर्हताःतच मार्जिन चा फायदा होणार !
आणि शेवटी % वारी मध्येच परतावा मोजला जातो जगभर

गोंधळी's picture

11 Jun 2021 - 3:00 pm | गोंधळी

पण सेबीच्या नविन नियमांनुसार सप्टेंबर नंतर मार्जिन व्यवहार बंद होणार आहेत हे खरे आहे का?
असे झाले तर छोटे गुंतवणुकदार आहेत त्यांच नुकसान आहे.

अमर विश्वास's picture

11 Jun 2021 - 5:40 pm | अमर विश्वास

मार्जिन चे व्यवहार पूर्वीप्रमाणेच चालू आहेत.
फक्त upfront margin requirement चे percentage बदलले आहे

गोंधळी's picture

12 Jun 2021 - 9:22 am | गोंधळी

पहिले margin requirement चे percentage २०% होते परंतु सेबी ने वाढवत ७५% केले आहे व सप्टेंबर नंतर १००% होणार आहे.
म्हणजे पहिले तुमच्या खात्यात २० रु. असतील तर तुम्हाला १०० ते १२० रु. पर्यंत मार्जीन मिळत असे पण सप्टेंबर नंतर तुम्हाला १०० रु चे शेर व्यवहार करायचे असल्यास तुमच्या खात्यात १०० रु रोख असली पाहीजे.

From March 1, 2021, Sebi has hiked the upfront margin requirement to 50 per cent from 25 per cent, and this has impacted trading volumes. In the next two phases, Sebi plans to take this limit to 75 per cent by the end of August and then 100 per cent by September

(बदल- लहान गुंतवणुक्दार = छोटे ट्रेडर्स)

जर पुरेसा वेळ दिला (-अभ्यास आणि तयारीसाठी) आणि योग्य मार्गदर्शन असेल, तर बाजारामधून एका स्थिर परताव्याची अपेक्षा करता येते. त्या पातळीची तयारी ज्यांची असेल, त्यांच्यासाठी तेजी आणि मंदी सारखीच असते. दोन्ही परीस्थितीत ते उत्पन्न मिळवतात. मार्जिन हे अशा लोकांसाठी फायदेशीर आहे.

आग्या१९९०'s picture

11 Jun 2021 - 3:15 pm | आग्या१९९०

मार्जिनमुळेच छोट्या गुंतवणूकदारांचे नुकसान होते.