अनुभव, शिक्षण, गावगाड्या मधे घालवलेले बालपण आणी सद्यस्थितीत अतंरजाला वर उपलब्ध असलेले आणी विषयानुसार संकलीत केलेल्या माहिती वर आधारीत लेख. ज्याचे श्रेय त्याला. उद्देश फक्त विसाव्याच्या क्षणांचा सदुपयोग.
शुद्धलेखन, भाषा वैगेरे चुका शोधत बसू नये कारण उद्दिष्ट साफ आहे.
" खट बायलेशी पडली गाठ – म्हणता उठ मेल्या चटणी वाट "
मित्रांनो, आता पर्यंत अभंग, दोहे, सुभाषितं, आध्यात्म ,प्रवास वर्णन किवां शास्त्रीय संगीताच्या सारख्या किचकट काहिशा कंटाळवाण्या विषयांवर लिहीले. उपदेशात्मक, उदबोधक आणी अवांछित लेख तुमच्यावर थोपले. कधी चांगले तर कधी काहींच्या डोक्यात सुद्धा गेले असतील. लई शानपत्ती मारतोय आसही कुणाकुणाला वाटलं असेल, मनातल्या मनात. XXX ........ आसो आज जरा काही वेगळे बोलू कदाचित आवडेल. मला वाचायला आणी माझ्या भाषेत लिहायला आवडते. " तू कर वटवट, मी हाय निगर गट !" या म्हणी प्रमाणे मित्र म्हणून तुम्हीच माझे पहिले वाचक . कुणी निंदा कुणी वदां तुम्हाला "बोअर" करायचा माझा धंदा.
मालवणी मधे म्हण आहे " येरे दिसा नी भररे पोटा " म्हणजे कसलीच प्रगती न होता दिनक्रम चालू रहाणे. सध्या महामारीमुळं ही म्हण चांगलीच लागू पडतीय. तेव्हा आज मराठी भाषेतील गमतीदार म्हणींचा आनंद घेऊ.
कुठलीही भाषा ही एखाद्या सुंदर स्त्री सारखी सर्वागांनी नटलेली आसते. उपमा, अलंकार, उखाणे, वाक्प्रचार, म्हणी इत्यादी भाषेची आभूषणे. कमी शब्दात, परिस्थितीचा अन्वयार्थ अथवा तत्संबंधी सूचक, समर्पक, कालातीत भाष्य व्यक्त करणारा लोकपरंपरेने वापरला जाणाऱ्या अर्थपूर्ण शब्द समूहांना 'म्हण' असे म्हणतात. यात उपमा, रूप, पर्यायोक्ती, विरोधाभास, यमक, अनुप्रास अशा विविध भाषा अलंकारां सोबत ठसकेदार रचनेचा वैशिष्ट्यपूर्ण उपयोग केलेला असतो.म्हण' शब्द समुहात बऱ्याचदा ध्वन्यार्थ हा वाच्यार्था पेक्षा निराळा असू शकतो. जसं " मुठभर घुगऱ्या, सारी रात मचमच !"
म्हणी या दैनंदीन अनुभव व व्यवहाराचे संक्षिप्त पण प्रत्ययकारी निरिक्षणे असतात. जे हजार शब्दातही मांडता येणार नाही तेच म्हणी चार शब्दात मांडतात. तो समाजाच्या समग्र शहाणपणाचा संचय असतो. म्हणी या लोकोक्ती असतात. म्हणीचे निर्मितीश्रेय कुणा एकास देता येणार नाही.
म्हणीमध्ये जीवनातील विशिष्ट अनुभव, माहिती, सत्य व उपदेश साठवलेला असतो. म्हणीच्या विचारांत मार्मिकता असते. जे वाक्य किवा वचन वारंवार म्हणण्यात येते ती 'म्हण'होय. म्हणी समाजाचा आरसाच आहेत. मानवाच्या चांगल्या वाईट प्रवृत्ती, आचार -विचार, नानाविध चालीरीती ,निरनिराळी नातीगोती इ.चे प्रतिबिंब त्यांत पडलेले असते. समाजातील सर्व थरातील लोकांना 'म्हणी ' आवडतात . म्हणींच भाषा वैभव सुद्धा भौगोलिक स्थान व मानवी स्वभावाचे कंगोरे प्रतिबिंबित करते आसं मला वाटतं. कोकणी, मालवणी, पुणेरी ,वर्हाडी,अहिरणी आशा वेगवेगळ्या ठिकाणी त्यांची मांडणी वेगळी जरी आसली तरी मतितार्थ तोच आसतो. काही सौम्य, सभ्य, भाषेची मर्यादा संभाळून तर काही थेट खड्या बोललेल्या. अगदी अक्षम्य अश्लील भाषेचा प्रचुर उपयोग केलेल्या सुद्धा .
मराठी भाषेतील पुस्तकी, सुसंस्कृत ,संस्कारी थोडक्यात सोज्वळ म्हणी अनेक पुस्तकातून आपण शाळेत शिकलोय. आपला जरी तालुक्याच ठिकाणआसलं तरी अवती भोवतीच्या चोवीस वाड्या़ हे आपल वैभव. या ग्रामीण भागातून येणाऱ्या मित्रांनी, गावकर्यांनी आणी नेहमीच बुद्धिबळातल्या उंटा सारखे तिरक्या चालीचे ,अनुभवांनी रापलेल्या आपल्या मागच्या पिढीने बोलीभाषेतून येणाऱ्या म्हणी आपल्याला थेट शहाणपण यावे म्हणून वारसा हक्काने सुपूर्द केल्या.पुढं शिक्षणा करता, नोकरीच्या शोधात शहरात आलो. हा वारसा आपल्या डोक्यातून बाजुला पडला. गावगाड्याचे म्हणींच्या रूपातील शहाणपण शिवराळ, मिश्कील ,बेरकी आणी बिलंदरपण आहे. पंचतत्रातील गोष्टीं इतक्याच या इरसाल म्हणी उदबोधक वाटतात. या प्रसंगी डोळ्यात झणझणीत अंजन पण घालतात.
म्हणी भाषेचे सौंदर्य वाढवितात. या
म्हणींना स्वतःचा डौल असतो, त्यांच्या वापराने भाषेला टवटवीतपणा, बिलंदरपणा यामुळे संभाषण चटपटीत होते व नेमक्या जागी वार करतात. ग्रुप मधील महिला सदस्यांची उपस्थिती बघता असभ्य म्हणी वगळून लेख सभ्य करण्याचा प्रयत्न केला आहे. तसं बघता या म्हणी जास्त सटिक आणी सरळ मर्मावर घाव घालतात. कधी कधी अगदी नाकाला मिर्ची झोबंते. कदाचित हाच भाव गावाकडची लोकं जरा वेगळ्या शब्दात व्यक्त करतील.
आगदी मोठे लेखक सुद्धा या शिवराळ म्हणी सर्रास वापरताना दिसतात. उदाहरणार्थ नस्ती उठाठेव करणार्याला ही म्हण लागू पडते. "शिंच्या, कुल्या वर पाणी टाक म्हंटलंन तर खाली काय लोबंकाळतय म्हणून खंय
पुसतोस! "
काही म्हणी जातीवाचक शब्दांचा वापर असूनही जातीवाचक नसतात. त्या त्या जाती पेशाचे समाजाचे व्यक्ती गुण अवगुण विशेष खुबीदारपणे उघड करतात. जातीवाचक म्हणून अवडंबर न माजवता गावरान भाषेचा मिश्कील गोडवा आणी शहाणपण अनुभवायचा प्रयत्न करा. हे शहाणपण शिकायला कुठल्याही शाळेत जाण्याची गरज नाही.आयुष्यातील टक्के टोणपे सहजच शिकवून जातात. आपल्या पूर्वजांनी जाती कशा सर्व समावेशक आणी समाजाभिमुख आहेत या म्हणीतून दाखवले आहे.
म्हणी मराठी बोलीभाषेतील आहेत,त्यामुळे शब्द ओबडधोबड आणीअसभ्य सुद्धा , परंतु त्यातला अर्थ मात्र उच्च दर्जाचा बोध देणारा असतो. म्हणी ग्रामीण असल्या तरी त्या मार्मिक, उच्च कोटीचा शहाणपणा देतात. म्हणून प्रत्येक म्हण विचारपूर्वक वाचली पाहिजे, ऐकली पाहिजे.
सोज्वळ आणी गावरान म्हणी मधला फरक म्हणजे " सौ सुनार की एक लोहार की " , दोन्हींचा अर्थ एकच पण परिणाम मात्र गोळी आणी इजंक्शन सारखा. पुणेरी मिसळ आणी कोल्हापुरी मिसळ यात जसा फरक, म्हणजे बघा
एखाद्या ची औकात काढायची आसेल तर
"घरात नाही दाणा अन बाजीराव म्हणा " आसं म्हणतात. या म्हणी चा उदेश एखाद्या ची परीस्थिती आणी स्वभाव यातील विरोधाभास दाखवण्यासाठी. याला समान अर्थी म्हणी वानगीदाखल बघा त्यांच्यात तिखटपणा कीती आहे ते.
पुणेरी
" हातात नाही दमडा, घ्यायला चालला कोंबडा " (स्वाद खऊट)
कोल्हापूर
" टेरीवर हाणा पण पाटलीण म्हणा" ( चव ताबंडा पांढरा)
मालवणी
" खिशात नाय दमडी आणि खावची हा कोंबडी "
विदर्भ ,वऱ्हाडी
" पोटाला नाही आटा अन म्हणे गांXला उटणं वाटा " ( हेटाळणी चा स्वर)
खानदेशी (अहिरणी)
" खिशात नही कवडी, नी वणी बाजार भवडी."
" निधी न भंडारा, नी गावभर डोम्बारा."
हल्लीच्या सुधारलेल्या भाषेत " आरे तुझा पगार किती तु बोलतोस कीती ".आता इथच थाबंतो नाहितर मर्यादा भंग केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात येवू शकतो.
कोकणातल्या म्हणी या पुण्यातल्या म्हणींपेक्षा वेगळ्याच आहेत. खानदेशातील म्हणी ह्या विदर्भात किंवा मराठवाड्यातील म्हणींपेक्षा वेगळ्या आहेत. मराठी विदर्भ, मराठवाडा, खानदेश, कोकण, आणी पश्चिम महाराष्ट्रात बोलली जाते. म्हणतात बोलीभाषा दर विस मैलावर बदलते.त्यामुळे भाषेच बदलतं रुप आणी भाषा सौदंर्य आसलेल्या सर्वच म्हणी जागे अभावी देणं शक्य नाही. आज आपण देशावर आणी वऱ्हाडात प्रचलीत म्हणी काय सांगतात ते बघू.
संकलन अर्थात इंटरनेटवर प्रसिद्ध झालेल्या विविध लोकांच्या ब्लॉग वरून केलं आहे तेव्हा त्यांचे धन्यवाद.
म्हणणारानं म्हण केली, वाचणाराला अक्कल आली. माझं बापड्याच काय "
मला कोण नवाजी, घरचाच बुवाजी ! " सारखी अवस्था. नवाज नाहीतर नका नवाजू पण लेख मात्र दमान, बैजवार वाचा.
जातीवाचक म्हणी वानगी दाखल :
रिकामा न्हावी भिंतीला तुंबड्या लावी
कोणाला कशाचं आणि माळणीला लसणाचं!
बामणाच्या घरी लेहण आणि महाराच्या घरी गाण वाजीवणं.
ढुंगणा खाली आरी आणि चांभार पोर मारी
बाजारात तुरी अन भट भटणीला मारी
धनगर बसला जेवाया अन ताका संग शेवया
चांभाराच्या देवाला खेटरांची पूजा
तेली काढी धारोधार खुदा नेई एकच बार
तेलीण रूसली अन अंधारात बसली
नळी फुंकली सोनारे इकडून तिकडे गेले वारे
बामणाची बाई कासोटा लेई
हलवायाच्या घरावर तुळशीपत्र
बामण सोवळा अन घरात ओवळा
इतर
गाड्या बरोबर नळ्याची यात्रा
आली मनाला तर गेली शेणाला, नाही तर बसली उनाला !
लाखाची बसविली घरी अन दमडीची चकरा मारी!
गावचा बळी, परगावचे गाढवं वळी !
खायला आधी, झोपायला मधी, आणि कामाला कधी मधी
काम नाही कुठं , नाकात घाली बोटं !
आकाबाईच्या म्हशी अन बोकाबाईला उठाबशी !
काडीचा चोर पण जीवाला घोर !
दुसर्या ची कढी अन धाऊ धाऊ वाढु!
कडू कारलं तुपात तळलं, साखरेत घोळल,अन
गटकन गिळलं,तरी कडू ते कडूच !
मान ना पूस ,अन घरात घूस !
सरड्याची धाव कुपाटी पसतोर !
चोराला मेसाई धार्जिन !
एकच कोंबडं पण तेबी सदा लंगडं !
मुठभर घुगऱ्या, सारी रात मचमच !
मी नाही त्यातली, कडी लावा आतली !
खाली मुंडी, पाताळ धुंडी !
ये ग कळी, बस पाठकुळी !
उघड्या शेजारी नागडं गेलं, सारी रात हिवानं मेलं !
बारा घोंगडी आणि एक टांगडी बराबर !
शेंबूड माझ्या नाकाला अन मी हसतो लोकाला ! !
ह्याचं दार त्याचं दार, बाई माझ्या तोडात मार !
करायचा बटका, खायचा कुटका !
हाडाचा केला मनी, रक्ताचं केलं पाणी, तरी आखरीला नाही कुणी !
आली सुगी फुगले गाल, आखाडा सरावनात माग तसे पुढे हाल !
धनगराचं कुत्रं शेळ्यापाशी ना मेंढ्यापाशी !
घरी ना दारी, चालला बिनघोरी !
ऊस माळ्याचा, भांडण कोल्ह्याची !
सलाम दादांनं सलाम केला आणि लुकलुक बाईचा पराण गेला !
उपटला तर कांदा, नाहीतर पात !
नाजूक नार, तिला चाबकाचा मार !
देव आला द्यायला, पदर नाही घ्यायला !
देव गेलता हागायला अन त्यो गेला नशीब मागायला!
ज्याचं करावं बरं त्योच घेतो खुदळ खोरं !
साजेल ते ल्यावं अन पचल ते खावं !
अंगा परीस बोंगा अन कुठं चालला सोंगा !
घरासारखा गुण, सासू सारखी सून !
घरा घरा गुण कसा,आलेला पाहुणा त्योबी तसा!
मला कोण नवाजी, घरचाच बुवाजी !
दिड दिसात कोल्हा ऊसात !
आठाणे महिना सावकास का होईना !
करडीला कीड न्हाई, वकट्याला मरण न्हाई! !
सण ना वार,न कर्त्याला बुधवार !
घरची भिईना अन बाहेरचीला वागू देईना !
सासू ना सासरा, जांच ह्यो तिसरा !
म्हाताऱ्याला आलं बाळसंअन तरण्याचं झालं कोळसं!
पडल्या मघा तर चुलीपुढं हागा,नाहीतर ढगाकडे बघा.
घरचीला होईना बाहेरचीला बघवना !
दिवसभर घरी, दिवे लावून दळण करी!
हिचा नखरा, त्यांच्या चकरा !
कुणबीणीच्या लुगड्यात माती, मारवाडनीच्या नाकात मोती !
आगी शिवाय कढ नाही, माये शिवाय रड नाही !!
हातात नाही दमडा, घ्यायला चालला कोंबडा!
येळला केळं, वनवासाला सिताफळं !
साता घरची सनकाडी, नांदतं घर ओस पाडी!
भिंगरी मागं भवरा, तू का र कावरा बावरा ?
तू कर वटवट, मी हाय निगर घट्ट !
गावचा बळी, परगावचे गाढवं वळी!
इज्जतवान इज्जतिपायी मेलं, नागवं म्हणतं मलाच भेलं!
गाव जळाला हनुमान येशी बाहेर!
सोंग आलं सजून,दिवटी गेली इजून!
गुरू वाघ पारावर,चेला त्याच्या उरावर!
भल्याभल्यांचं झालं हाल, माकड म्हणतं माझीच लाल.
असला तर देस भला,ना तर परदेस भला!
शेतात खत, गावात पत, आणि घरात एकमत रहावं!
बीडीचा केला नाद, गंजीला लागली आग
भिडं भिडं पोट वाढं!
माय पुण्याची, भावकी उण्याची वाटेकरी असती!
सीताबाईनं केलं रामायण, धुरपतीनं केलं महाभारत!
घास व्हटाकडं अन पाय पोटाकडंच वळत्यात !
नवरा म्हणू नै आपला,साप म्हणू नै धाकला !
गळ्यात माळ पोटात काळ !
इचार ना पूस, घरात घूस !
देव नाही देव्हारी धुपाटनं उड्या मारी
वऱ्हाडी बोली
सकवार सई अन् बोरातली अई’,
‘मनात नाई नांदनं अन् पोवाडे बांधनं’,
‘हिडग्याले देली गाय धावू धावू गोठानावर जाय’ ........
वऱ्हाडी बोली जशी नजाकतदार अन् कुर्रेबाज आहे तशीच ती शालीन व कुलवंतही आहे. वऱ्हाड अन् सोन्याची कराड’ (कराड म्हणजे किनारा. कुऱ्हाड नव्हे!) असे वर्णन. वऱ्हाडी बोलीचं लिखित रूपही आकर्षक आहे. परंतु तिचा खरा रुबाब आणि ठसका तिच्या उच्चारणात आहे. किंचित हेल काढून तिचा मूळ लहेजा सांभाळत वऱ्हाडी लोक बोलतात तेव्हा तिची खुमारी ऐकणाऱ्याच्या लक्षात येते.
‘हं, पोट्टेहो, बानातला ‘न’ म्हना.’
पोरंही मग बानातला ‘न’ म्हणतात.
‘हं, शाब्बास. अशानं तुमचं याकरन कप्प व्हते. सध्याच्या काळात मकरंद अनासपुरे, भारत गणेशपुरे, संकर्षण कऱ्हाडे यांनी या भाषेला वऱ्हाडा बाहेर प्रसिद्धीला आणली.
‘ज्या भाषेत जास्तीत जास्त तिखट, झणझणीत म्हणी असतील ती भाषा श्रेष्ठ!’ वऱ्हाडी याही निकषावर उतरते. वऱ्हाडीतल्या ठेच्या प्रमाणेच , काही वानगीदाखल खाली देतय ना बाप्पा.
लेक माहा टिकोबा चारी बैले इकोबा,
रांधता येईना वले लाकडं,
दिवस मावळला टेकळ्याले गधे जुपले छकळ्याले,
आईबाई नाळली, शेजारीन जोळली, कामावक्ती आईबाई, कामसरलं तं नातं नाही, आंगावर पळली गोम ते उचलीन कोन?, कामाले दंदी खायाले आंदी,
नोट करे गोठ चिल्लर करे इचार,
हेल्याच्या टकरीत वावराचा नास
केळी केळी येदना, घाव तिथं वावधना
तोंड पाह्य़लं गवरीवाणी, कुखू लेते मव्हरीवाणी
नवझणं मुऱ्हाळी डांगरी चोळी
खेळवण लडती कोल्डे डोळे, ऐका चलवादीचे चाळे
आवस पुनव पाळते, व्हळीच्या गवऱ्या जाळते
भुतामव्हरं मुताचा दिवा
शेजीचा नवरा घडीभर देखला, निदाणीचा जीव एकला
झाकापाका केला, काका कुठीसा गेला?
मालवणी म्हणी
मालवणी माणूस फणसासारखा म्हणजे वरून काटेरी पण आतून खूप गोड आणि रसाळ असतो, मच्छिंद्र कांबळी यांनी या भाषेला देशावर आणले. त्यांनी आपल्या भद्रकाली प्रोडक्शन या कंपनी द्वारे वस्त्रहरण सारखी अफलातून धमाल विनोदी नाटके रंगभूमीवर सादर केली. मालवणी म्हणी खड्या भाषेत बोललेल्या. काही तुमच्या करता संकलीत केल्यात.
नदी आधी व्हाणो, कढलल्यो बर्यो
भोपळन बाय पसारली नी पाटचे गुण इसारली
मिठाक लावा नी माका खावा .
मेल्ल्या म्हशीक पाच शेर दूध .
येरे दिसा नी भररे पोटा
येवाजलला साधात तर दळीदार कित्याक बाधात – योजना साध्यच न झाल्यास चांगले दिवस कुठून येतील?
लिना लिना नी भिकार चिन्हा – (लिना=लिहिणे) पुर्वी शाळेतल्या शिक्षणावर फारसा विश्वास नसायचा.
वसाड गावात एरंड बळी – (वसाड=ओसाड, एरंड=उंच वाढणारे उपयोगशून्य झाड) उपलब्धतेनुसार वापर.
वेताळाक नाय बायल, भामकायक नाय घोव – ओढून ताणून जमलेली जोडी.
सरकारी काम, तीन म्हयने थांब
सरड्याची धाव वयपुरती
सात पाच रंभा नी पाण्याचा नाय थेंबा – (रंभा=नटुन थटुन मिरवणार्या बायका) सभोवताली कामचुकार माणसेच असतील तर कामं कशी होतील?
हळ्कुंडाच्या पदरात शेळ्कुंड – (हळकुंड=हळदीची कांडी; शेळकुंड=गोवर्या) चांगल्याच्या पदरी वाईट पडणे.
हात पाय र्हवले, काय करु बायले – अगतिक – असहाय्य होणे.
हो गे सुने घरासारखी – ज्या लोकां बरोबर रहायच आहे त्यांच्याशी जुळुऊन घेतलेलं योग्य.
देणा नाय घेणा आणि कंदिल लावन येणा – नस्ती उठाठेव कित्या करा .
काप गेला भोका रवली – (काप – कानातलो दागिनो) । वैभव संपले आणि भकास खूणा र्हवले.
मोठ्या लोकंची वरात आणि हगाक सुद्धा परात
हगणार्याक नाय तरी बघणार्याक होई लाज
कापाड न्हेला बायन आणि चींधी नेली गायन – (कापाड – बरी साडी) बरा काय होता तेचो दानधर्म केलो आणि उरलला चोरयेक गेला.
कपाळार मुकुट आणि खालसुन नागडो – फक्त दिसाकच भपकेदार.
कोंबो झाकलो म्हणान उजवाडाचा रव्हत नाय – खरा काय ता भायर येतालाच.
दोडकार्याचा कपाळात तिनच गुंडे – किती प्रयत्न केलो तरी परिस्थिती काय बदलत नाय.
केला तुका – झाला माका
कोको मिटाक जाता मगे पावस येता.
दिस गेलो रेटारेटी आणि चांदण्यात कापूस काती
आवस रडता रोवाक आणि चेडू रडता घोवाक
जेच्या मनात पाप तेका पोरा होती आपोआप
जेच्या खिशात आणो तो म्हणता मीच शाणो
भेरा म्हणता तेरा आणि माजाच तूनतुना खरा
आपली मोरी आणि मुताक चोरी?
गायरेतले किडे काय गायरेतच रवनत नाय
आवस सोसता आणि बापूस पोसता
अंधारात केला पण उजेडात इला
कायच नाय कळाक – बोको गेलो म्हाळाक
एक कानार पगडी आणि घराक बायल उघडी
येळार येळ – शीगम्याक खेळ
घरासारखो गुण, सासू तशी सून
चल चल फुडे तीन तीन वडे
चव नाय रव धनगरा पोटभर जेव
चुलीतला लाकूड चुलीतच जळाक होया
शेजारणीचा रस्सा आणि पोळयेचा काढून बसा
उडालो तर कावळो बुडलो तर बेडूक
मडकेत कडी पाटी जीव ओढी
घरणी बरोबर वाकडा ता खायत चुलीतली लकडा
पडलो तरी नाक वर
एक मासो आणि खंडी भर रस्सो
खिशात नाय दमडी आणि खावची हा कोंबडी
धाक नाय दारारो, फुकटचो नगारो
तरण्याक लागली कळ आणि म्हाताऱ्याक इला बळ
वसावसा खान आणि मसणात जाणा
दुकान नाय उघडला, तो इलो उधारेक
नावाजललो गुरव देवळात हगलो
राती राजा आणि सकाळी कपाळार बोजा
डाळ भात लोणचा कोण नाय कोणचा
देव गेल्लो हगाक आणि ह्यो गेल्लो अक्कल मागाक
तुमचा तुमका आणि खटपट आमका?
गाढवा गुळ हगती तर घोरपी भीक कित्या मागती?
सुने आधी खावचा, लेकी आधी लेवचा
वरये दितय तुका गावकार म्हण माका
शेजारी पाजारी मड्याक आणि पावणे सोयरे वड्याक
बघून बघून आंगण्याची वाडी
अरदो मिरग सारण गेलो आणि म्हारणीच्या झिलान उतव बांदलो
कोणाची जळताहा दाडी आणि तेच्यार कोण पेतयता इडी
बारशाक वारशी नसाय आणी अवळात बसलो देसाय
पानवेलीच्या धर्मान शेगलाक पाणी
होळयेक पोळी आणि शिमाग्याक गाळी
खट बायलेशी पडली गाठ – म्हणता उठ मेल्या चटणी वाट
आवाशेचो जल्म आणि तसलाच कर्म
रागान केला रायता – तेका मेळला आयता
इलय तरी वडे नाय इलय तरी वडे
रानात भय वाघाचो आणि गावात भय गावकाराचो
प्रतिक्रिया
16 Mar 2021 - 7:23 am | कंजूस
बऱ्याच माहिती नव्हत्या.
16 Mar 2021 - 8:21 am | उपयोजक
लेख लिहून झाला की मराठी भाषेचे चांगले ज्ञान असलेल्या कोणाकडून तरी तपासून घेऊन मगच प्रकाशित करावा. किंवा सं.मं मदत करेल का?
बाकी लेख छान.
16 Mar 2021 - 8:24 am | गणेशा
आवडला लेख..
16 Mar 2021 - 9:06 am | रंगीला रतन
म्हणी आवडल्या.
16 Mar 2021 - 9:10 am | मुक्त विहारि
छान माहिती
16 Mar 2021 - 9:17 am | आनन्दा
बऱ्याच म्हणींच्या काही कथा पण असतात..
जसे तेल गेले तूप गेले..
त्यावर पण थोडा प्रकाश टाकता आलाय तर टाकावा.
क्रमशः करायला हरकत नाही असे म्हणतो.
16 Mar 2021 - 5:54 pm | मुक्त विहारि
ही प्रत्यक्षांत अनुभवलेली कथा आहे....
मराठी मुखवटा उतरला, हिंदुत्वाचे कातडे निसटले, आता हाती उरली ती फक्त फरफट....
आमच्या एका मित्राच्या बाबतीतील किस्सा आहे... मित्राची बदनामी होईल,म्हणून नाव सांगणार नाही...
राजकारणाचा आणि वरील कथेचा काही संबंध नाही...
17 Mar 2021 - 1:04 am | कर्नलतपस्वी
मराठी मुखवटा उतरला, हिंदुत्वाचे कातडे निसटले, आता हाती उरली ती फक्त फरफट....
वेळ लागला पण समजलं कारण पिंड वेगळा
16 Mar 2021 - 10:23 am | Bhakti
माझी मैत्रीण कायम म्हणी वापरते तिची आठवण आली.ती अमराठी भाषिक आहे..भांडणात तिच्या म्हणी ठरलेल्या असतात..
-तू 'थाली का बैंगन'
-तू 'बिन पेंदी का लोटा'
:)
17 Mar 2021 - 1:25 am | कर्नलतपस्वी
दलबदलू, ऐसा आदमी जिसका कोई सिद्धांत ना हो।
16 Mar 2021 - 10:23 am | Bhakti
माझी मैत्रीण कायम म्हणी वापरते तिची आठवण आली.ती अमराठी भाषिक आहे..भांडणात तिच्या म्हणी ठरलेल्या असतात..
-तू 'थाली का बैंगन'
-तू 'बिन पेंदी का लोटा'
:)
16 Mar 2021 - 10:36 am | कुमार१
आवडला लेख.
16 Mar 2021 - 12:02 pm | बापूसाहेब
मस्तच.. !!!
16 Mar 2021 - 2:46 pm | प्रचेतस
शुद्धलेखन तरी आवश्यक आहे असे वाटतं.
शीर्षकातलं आग आग म्हशी वाचून म्हशीच्या पाठी कुणी जळतं लाकूड घेऊन पळाल्यागत वाटतं.
16 Mar 2021 - 3:17 pm | ॲबसेंट माइंडेड ...
तपस्वी साहेब तुम्ही वाचनीय लिहीता म्हणुन तुमच्याकडुन चांगल्या म्हणजे शुद्घ लेखनाची वाचक अपेक्षा करतात. त्यात चुक वाचकांची नाही. लेख आवडला पण तेवढे शुद्धलेखनाचे जमवता आले तर बघा.
16 Mar 2021 - 7:05 pm | कर्नलतपस्वी
उपायोजक,प्रचेतस ,अँबसेटं माइन्डेड आपल्या सुचनांशी सहमत आहे ,प्रयत्न करतोय. प्रतीसादा बद्दल धन्यवाद
पण कसं आहे ना
"दिस गेलो रेटारेटी आणि चांदण्यात कापूस काती"
आता " हत्ती गेला आणि शेपूट राहीलयं", आसो
16 Mar 2021 - 9:10 pm | प्रकाश घाटपांडे
" पोटाला नाही आटा अन म्हणे गांXला उटणं वाटा " हे " पोटाला नाही आटा अन म्हणे *टाला उटणं वाटा " अस ऐकल होत. इथे अनुप्रास ही साधला जातो
17 Mar 2021 - 10:58 am | आनन्दा
तो शब्द वर्हाडात प्रचलित नाही.
मराठवाड्यापासून या साठी Xल्ला हा शब्द वापरातात.
17 Mar 2021 - 11:42 pm | सुरिया
मराठवाड्यातील ह्याचीच अत्यंत ग्राम्य आवृत्ती म्हणजे " उठत नाही *ला, म्हने *वायला चला"
17 Mar 2021 - 1:34 pm | सिरुसेरि
म्हणी आवडल्या . अशाच काही लक्षात राहिलेल्या म्हणी -
- खिशात नाही आणा , मला बाजीराव म्हणा .
- माळावर बोंबलायला पाटलाची परवानगी कशाला .
- अनवाणी आणी अक्कडबाज
- गोरा गोमटा आणी कपाळ करंटा
17 Mar 2021 - 5:23 pm | अनन्त्_यात्री
व्यावहारिक शहाणपणाचा गाळीव अर्क. काही लक्षात राहिलेल्या म्हणी/ वाक्प्रचार:
भिडे भिडे, पोट वाढे
भीड भिकेची बहीण
वाजतं गावाकडं, पळतं शिवाराकडं
धन्याचं नाव गन्या, चाकराचं नाव रुद्रोजीबुवा
शष्प खरवडून मढं हलकं थोडंच होणार?
घरच्या भीतीनं रान घेतलं, तिथं गावचं तडिपार भेटलं
17 Mar 2021 - 11:33 pm | सौन्दर्य
शष्प खरवडून मढं हलकं थोडंच होणार? ह्यातील 'शष्प' म्हणजे काय ?
17 Mar 2021 - 11:36 pm | सुरिया
प्युबिक हेअर
18 Mar 2021 - 8:07 am | प्रचेतस
शष्प म्हणजे गवत/ गवताचं पातं. त्याचा अश्लील अर्थ कधी झाला कोण जाणे.
शष्पाद म्हणजे गवतावर चरणारे प्राणी.
18 Mar 2021 - 8:57 am | प्रकाश घाटपांडे
ये हरियाली और ये रास्ता अशा टाईपच्या सादृष्यतेतून
18 Mar 2021 - 8:44 pm | अनन्त्_यात्री
दोन्ही अर्थ मोल्सवर्थ तसेच वझे शब्दकोशात आहेत.
17 Mar 2021 - 8:03 pm | आग्या१९९०
घरच्या भीतीनं घेतलं रान, तिथं भेटला मुसलमान, अशी म्हण आहे.
17 Mar 2021 - 11:38 pm | सौन्दर्य
लेख खूपच छान आणि माहितीप्रद आहे. खुपश्या म्हणी थोड्याफार फरकाने सर्वत्रच प्रचिलित आहेत. माझी आजी बोलताना पाच वाक्यांमागे एकतरी म्हण वापरायची आणि तीच सवय मला लागली आहे.
१९६५च्या आसपास 'सोबत' किंवा 'मार्मिक'मध्ये एक म्हण वाचली होती, थोडी अश्लील असली तरी हल्लीच्या घराणेशाहीच्या राजकारणाला ती समर्पक आहे म्हणून उदघृत करतो, म्हण अशी होती 'लाडका लेक देवळी हागे व ढुंगण पुसायला महादेव मागे'
19 Mar 2021 - 9:43 pm | टर्मीनेटर
हीच म्हण मी कोकणात वेगळ्या शब्दात ऐकली आहे -
"लाडाची गुरवीण मंदिरी हागे, ढुंगण धुवायला महादेव मागे"
😌
बाकी कर्नल साहेब म्हणींचे संकलन आवडले हो 👍
18 Mar 2021 - 2:53 am | कर्नलतपस्वी
वाचणार्यांनी प्रतिसाद दिला , चांगला वाईट, कसाही आसो तर लिहिणारा धन्य होतो. वाचकांच्या प्रतिक्रिया म्हणजे लेखकाला साहित्य अकादमी, ग्रॅमी, आँस्कर वगेरे. सर्व वाचकांचे मनःपुर्वक आभार. तर "दाद",म्हणजेच प्रतीसाद दररोजच्या आयुष्यात किती महत्वाचा पुढील लेखात वाचा.
18 Mar 2021 - 6:18 pm | सौन्दर्य
ज्या प्रमाणे स्टेजवरून कला सादर करणाऱ्याला टाळ्या-शिट्या हव्या असतात त्याच प्रमाणे लेखाला प्रतिसाद आवश्यक असतो. त्याने लेखकाचा हुरूप वाढतो, तज्ञ मंडळींकडून चागले सल्ले मिळतात, नवीन माहिती मिळते व चांगले स्नेही, मित्र/मैत्रिणी देखील भेटतात.
कर्नलसाहेब, लिहिते रहा आम्ही वाचत राहू.
18 Mar 2021 - 11:12 pm | पाषाणभेद
प्रतिसादखेचक लेख आवडला.
शुद्धलेखनाबद्दल:-
होते काय की जो लेखक असतो तो त्याच्या फ्लो मध्ये लिहीत जातो. तो काही भाषाशास्त्रज्ञ नसतो. अन येथे ऑनलाईन लिहायचे म्हणजे ते प्रूफ चेक न होता लिहावे लागते.
थोडक्यात, मुळ लेखकाकडून शुद्धलेखनाची अपेक्षा बाळगू नये. अशुद्ध लेखन, काना मात्रा उकार वेलांटीला क्षमा असावी.
19 Mar 2021 - 3:35 pm | आंद्रे वडापाव
अजून एक जातीय वाचक म्हण.
सोनार शिंपी कुलकर्णीअप्पा,
यांची संगत नकोरे बाप्पा .
21 Mar 2021 - 7:15 pm | सौंदाळा
आई आजारी बाप पुजारी
उदाहरण (इंटरनेट वर खूप पूर्वी वाचले होते)
प्रधान (राजाला) : महाराज शेजारच्या राज्याचे महाराज पश्तूनकेतू त्यांच्या सात अक्षौहिणी सैन्यासहित आपल्या राज्यावर आक्रमण करण्यासाठी निघाले आहेत.
राजा : प्रधानजी, उद्याच्या वसंतोत्सवाची तयारी कुठवर आली आहे?