प्रायव्हसी – भाग ३

उपाशी बोका's picture
उपाशी बोका in काथ्याकूट
25 Jan 2021 - 4:25 am
गाभा: 

आंतरजालावर किंवा एकंदरीत जर प्रायव्हसी जपायची असेल तर मग प्रायव्हसी आणि सोय (Privacy Vs convenience) हा महत्वाचा मुद्दा ठरतो. प्रायव्हसी जपण्यासाठी तुम्ही स्वतःची सोय किती बघता किंवा कितपत गैरसोय तुम्हाला मान्य आहे, यावर तुमची प्रायव्हसी अवलंबून आहे.

Zone 1 सोपे, सहज शक्य. (या गोष्टी नक्कीच करा)

  • तुमची माहिती चोरीला जाऊ नये म्हणून सर्वप्रथम सुरक्षित पासवर्ड वापरले पाहिजेत. त्यासाठी शक्यतो अक्षरे, नंबर्स आणि स्पेशल कॅरॅक्टर्स वापरावीत. उदा. Goreg@on104 दुसरा सोपा पर्याय म्हणजे ३ शब्द एकत्र करून पासवर्ड बनवा. उदा. SareeLaptopPurse
  • HowSecureIsMyPassword.net ही साइट वापरून तुम्हाला कळू शकेल की किती वेळात तुमचे पासवर्ड ओळखू येऊ शकतील, म्हणून शक्य तितके कठीण पासवर्ड्स वापरा.
  • खरी माहिती देण्याची गरज नाही, तिथे खोटी माहिती द्या. म्हणजे उदा. जन्म तारीख १ जानेवारी द्या, तुमच्या शाळेचे नाव काय विचारले तर बॉम्बे स्कॉटिश द्या, जरी ती शाळा कधीही बघितली नसेल तरी चालेल.
  • सर्व ठिकाणी एकच पासवर्ड वापरू नका. पासवर्ड सुरक्षित ठेवण्यासाठी पासवर्ड मॅनेजर वापरा. शक्यतो Free and Open Source Software (FLOSS) मी KeePassXC वापरतो, पण बरेच पर्याय उपलब्ध आहेत.
  • पासवर्ड मॅनेजरचा एकच पासवर्ड लक्षात ठेवावा लागेल आणि तो अतिशय कठीण असा निवडा. पासवर्ड मॅनेजरची फाइल मी क्लाउडमध्ये (Nextcloud) मध्ये ठेवतो, ज्यामुळे मला ती कुठूनही (डेस्कटॉप, लॅपटॉप, फोन वगैरे) उघडता येते.
  • २ फॅक्टर ऑथेंटिकेशन (2FA) नेहमी वापरा, विशेषतः फायनान्शियल ट्रान्झॅक्शनसाठी. यामध्ये तुम्हाला माहीत असलेली गोष्ट (म्हणजे पासवर्ड) आणि तुमच्या जवळ असणारी गोष्ट (म्हणजे फोनवरील OTP किंवा andOTP, FreeOTP, Authy सारखी Authenticator app किंवा YubiKey सारखी वस्तू) या दोन्ही बाबी वापरल्या जातात.
  • गूगल क्रोम ब्राउजर अजिबात वापरू नका. फोनवर डकडकगो ब्राउजर किंवा फायरफॉक्स फोकस ब्राउजर वापरा. (प्ले स्टोरमध्ये उपलब्ध आहे). त्यामुळे जाहिराती आपोआप दाबल्या जातील आणि तुम्हाला त्यासाठी अजून काही करावे लागणार नाही.
  • डेस्कटॉप आणि लॅपटॉपसाठी Firefox browser in incognito mode वापरा. फायरफॉक्स ब्राउजरसोबत पुढील अ‍ॅडऑन नक्की वापरा. uBlock origin, DuckDuckGo Privacy Essentials, Privacy badger, Ghostery – Privacy Ad Blocker, Adblock plus, HTTPS everywhere.
  • For firefox browser, use following Privacy settings: Enhanced Tracking Protection = Custom, Delete cookies and site data when Firefox is closed, Send websites a “Do Not Track” signal = Always, never save logins and passwords for websites, Autofill addresses = No, Autofill credit cards = No, History = Never remember history, clear history, cache and clear frequently, Enable HTTPS-Only Mode in all windows = Yes, Check permissions for location, camera, microphone etc.
  • गूगल वापरण्याऐवजी डकडकगो किंवा स्टार्टपेज सारखे सर्च इंजिन वापरा.
  • Virtual Private Network (VPN) वापरा, शक्यतो Paid VPN ( Mozilla VPN, NordVPN or ExpressVPN ) जर फ्री हवे असेल तर ProtonVPN फोनवरपण VPN वापरता येते.
  • सोशल मिडियावर खरी माहिती देऊ नका. Fake info on social media, hide real information
  • सोशल मिडियावर अनोळखी व्यक्तींबरोबर मैत्री करू नका.
  • सोशल मिडिया अ‍ॅपच्या परमिशन्स बघा आणि अनावश्यक परमिशन्स थांबवा. (उदा. फेसबुक)
  • खरी माहिती दिली तरी सर्वांना दाखवायची गरज नाही. फोटो टाकले तर हल्ली त्याचा उपयोग सर्रास Face recognition साठी होतो, ते लक्षात असू द्या. विशेषतः लहान मुलांचे फोटो टाकताना.
  • फोनवरील अ‍ॅपच्या परमिशन्स बघा आणि अनावश्यक परमिशन्स थांबवा. फोन सॉफ्टवेअर अपग्रेड झाले की सर्व सेटिंग्ज पुन्हा तपासून बघा.
  • शक्यतो तुमचा खरा फोन नंबर खाजगी ठेवा. अमेरिकेत असाल तर Google voice वापरू शकता. (iNumbr आता बंद झाली आहे). जर Google voice वापरणे शक्य नसेल तर खाजगी १ फोन नंबर आणि इतरांसाठी दुसरा नंबर ठेवू शकता.
  • तुमचा इमेलचा पत्ता पण जपा. अन्यथा तिथेपण खूप स्पॅम येऊ शकते. स्पॅम न येण्यासाठी माझ्याकडे उपाय आहे. तो म्हणजे स्वतःचे डोमेन घेणे, प्रत्येकासाठी वेगळा इमेल पत्ता तयार करणे, उदा: amazon@mydomain hdfc@mydomain etc. आणि मग catch all email वापरणे. मला जवळजवळ शून्य स्पॅम इमेल येतात.
  • लोकेशन शेरिंग बंद करा आणि ब्लूटूथ वापरात नसताना बंद करा. याचा दुहेरी फायदा म्हणजे बॅटरीपण जास्त टिकेल.
  • जी अ‍ॅप वापरत नाही ती फोनवरून काढून टाका. काही अ‍ॅपमधून, वापरात नसतानासुद्धा तुमच्या नकळत माहिती बाहेर पाठवली जाते.
  • लॅपटॉपच्या वेबकॅमला चिकटपट्टी लावून किंवा सरकती पट्टी लावून बंद करून ठेवा.
  • अलेक्सा किंवा गूगल होम सारखे डिव्हायसेस, जे तुमचे बोलणे सतत ऐकत असतात, ते वापरू नका.

Zone 2 किचकट (थोडे कष्टदायक, पण महत्वाचे) यापैकी शक्य तितक्या गोष्टी नक्की करा.

  • different logins and passwords for each site, no biometric
  • hide real email, switch email provider from gmail
  • for texting, iMessage or signal messenger signal.org (open source)
  • गूगलसारख्या कंपन्या इमेलमधील माहिती वाचतात. शक्यतो प्रायव्हसी जपणार्‍या इमेल कंपन्या वापरा. उदा. Protonmail, lavabit, mail fence or own server
  • Google cloud, Dropbox ऐवजी nextCloud, Mega.nz वापरा
  • iPhone or stock android phone
  • wipe storage free space often, Use eraser or shift + delete
  • हार्डडिस्कसाठी encryption वापरा
  • फोनसाठी encryption वापरा, ज्यामुळे फोन हरवला किंवा चोरीला गेला तरी तुमचा खाजगी डेटा सुरक्षित राहील.
  • तुमचा बायोमॅट्रिक डेटा सुरक्षित ठेवा. फोन अनलॉक करण्यासाठी बोटाचे ठसे अथवा चेहरा वापरू नका.
  • राउटर (Router) चा डिफॉल्ट पासवर्ड बदला.
  • Hide router SSID, ज्यामुळे तुमचे नेटवर्क लपून राहील आणि सहजासहजी इतरांना दिसणार नाही.
  • गूगल क्रोम अथवा क्रोमियम ब्राउजर अजिबात वापरू नका.
  • pause google tracking, location, search history, youtube history
  • use privacy extension in video
  • disable flash in browser
  • ब्राउजरमध्ये जावास्क्रिप्ट रन करू नका. जावास्क्रिप्ट असुरक्षित नाही, पण मुख्यतः जाहिराती दाखवण्यासाठी आणि युजर डेटा गोळा करण्यासाठी तिचा दुरुपयोग केला जातो.
  • क्रेडिट कार्ड वापरताना शक्य असेल तर Virtual credit card number वापरा, अथवा privacy.com वापरा.

Zone 3 कठोर (त्रासदायक आणि कठीण)

  • विंडोजऐवजी लिनक्स (GNU/Linux) ऑपरेटिंग सिस्टीम वापरा.
  • फोन अ‍ॅप्स F-droid स्टोरमधून घ्या
  • फोनसाठी Custom ROM (Lineage OS or Copperhead OS) वापरा.
  • SSH and PGP वापरा.
  • no PC location/Bluetooth
  • Password on BIOS
  • Password on Drives
  • Delete google data, use email bomb
  • गूगलचे कुठलेही प्रॉडक्ट वापरू नका आणि त्यापासून शक्य तितके दूर रहा.
  • सोशल मिडियाचे व्यसन सोडा आणि त्यापासून दूर रहा. (उदा: फेसबुक, ट्विटर, लिंक्डइन, ईंस्टाग्रॅम वगैरे)
  • Tor browser वापरा. (Firefox focus or orbot or orfox, Red onion for apple devices)
  • Spend money in cash, prepaid cards or Crypto currency e.g. bitcoin, ethereum, litecoin (use coinbase, don't use real info)
  • Truecrypt or Veracrypt वापरा.
  • Yubikey or Nitrokey वापरा.
  • स्मार्टफोन वापरू नका, फक्त कॉलसाठी किंवा टेक्स्टसाठी वेगळा फोन वापरा, Faraday bags वापरा.
  • Spoof MAC address
  • आंतरजालावर खोटी आयडेंटिटी तयार करा ज्यात खोटी माहिती दिलेली असेल.
  • आंतरजालावर स्वतःची खरी आयडेंटिटी नष्ट करा (हे कठीण असले तरी अशक्य नाही, उदा: PMB वापरणे). त्यासाठी स्वतःच्याच इमेलसाठी इमेल बाँब, खोटे फोटो वापरा.

थोडक्यात तुमची खाजगी माहिती जपणे हे तुमच्या स्वतःच्याच हिताचे आहे. त्यामुळे होणारे फायदे:१. तुम्हाला फोनवर/काँप्युटरवर जाहिराती दिसणार नाहीत, घरात रद्दी जाहिराती येणार नाहीत किंवा जाहिरातींचे फोन कॉल येणार नाहीत्/कमी येतील.२. तुमची फायनान्शियल माहिती अधिक सुरक्षित राहील.३. या सर्व गोष्टीत वाया जाणारा वेळ वाचेल.४. नकळत होणारा, तुमचा मनस्ताप कमी होईल.

शेवटी जाता जाता:मराठी आंतरजालावरील मिसळपाव आणि ऐसीअक्षरे या टीम्सचे मी आभार मानतो की ज्यांनी अजूनही पैशाच्या मोहाला बळी पडून जाहिराती दाखवायला सुरुवात केलेली नाही. मायबोली सारखी साईट जाहिराती दाखवते. मी त्यांना कळकळीची आणि नम्र विनंती केली होती कृपया मायबोलीवर जाहिराती दाखवून युजर एक्स्पिरियंस आणि मुख्य म्हणजे युजर प्रायव्हसीचा विचका करू नका आणि त्यांचा खर्च करण्याची तयारीसुद्धा दाखवली होती. पण त्यांना जाहिराती दाखवून उत्पन्न कमवण्यात जास्त रस आहे, त्यामुळे मी तो नाद सोडला.

जाहिरातीतून उत्पन्न मिळवणार म्हणजे साईट्स अर्थातच युजर डेटा गूगल सारख्यांना या-ना-त्या प्रकारे देणार, हे साहजिकच आहे. पैसे मिळावेत म्हणून युजर प्रायव्हसी वेशीवर टांगणार्‍या अनेक इतर साईट्स काही कमी नाहीत. या अश्या पार्श्वभूमीवर मिसळपाव टीमचे म्हणून पुन्हा एकदा आभार आणि शुभेच्छा.

प्रतिक्रिया

मराठी_माणूस's picture

25 Jan 2021 - 9:14 am | मराठी_माणूस

मिसळपाव वर URL च्या ठीकाणी "Not Secure" असे का दिसते ?

"गूगल क्रोम ब्राउजर अजिबात वापरू नका"

फक्त जाहीराती टाळण्या साठी का ?

तुमची इच्छा असो वा नसो, गूगल युजरचा डेटा जमा करते म्हणून. गूगल किती डेटा गोळा करते, हे बघण्यासाठी whotracks.me ही साइट बघा. याव्यतिरिक्त निव्वळ उदाहरण म्हणून क्रिप्टोग्राफी प्रोफेसरची ही पोस्ट आणि ही पोस्ट वाचा. इंटरनेटवर अजून माहिती मिळेल.

भुजंग पाटील's picture

26 Jan 2021 - 3:45 am | भुजंग पाटील

"Not Secure" असे दिसते कारण मिसळपाव सर्व्हर वर सिक्युरिटी सर्टिफिकेट नाहिये.
आणि त्यामुळे कोणतेही एन्क्रिप्शन न होता साध्या टेक्स्ट फॉर्मॅट मध्ये डाटा एक्स्चेंज होतो.

दुसर्‍या साईट चे ढापलेले किंवा एक्स्पायरी डेट निघुन गेलेले सिक्युरिटी सर्टिफिकेट असले तरी " "Not Secure" असे दिसते.

LetsEncrypt (opensource) Verisign किंवा Thawte सारख्या कम्पन्या साईटची शहनिशा करून सर्टिफिकेट देतात.

वेब ब्राउसर वापरणारे मशिन (क्लायंट) आणि सर्व्हर ह्यांच्यामधील माहितीची देवाणघेवाण कोणत्या प्रोटोकॉलनुसार होते ह्यावरून ती माहितीची देवाणघेवाण "Not Secure" किंवा "Secure" आहे हे ठरते.

http हा प्रोटोकॉल (क्लायंट) आणि सर्व्हर ह्यांच्यमधील माहितीची देवाणघेवाण प्लेन टेक्स्ट पद्धतीने करतो तर
https हा प्रोटोकॉल (क्लायंट) आणि सर्व्हर ह्यांच्यमधील माहितीची देवाणघेवाण एन्क्रीप्टेड टेक्स्ट पद्धतीने करतो

त्यामुळे https://www.misalpav.com/ ही URL वापरल्यास माहितीची देवाणघेवाण "Secure" असेल तर

http://www.misalpav.com/ ही URL वापरल्यास क्रोम "Not Secure"असे दाखवेल.

- (एन्क्रीप्टेड & Secure) सोकाजी

भुजंग पाटील's picture

26 Jan 2021 - 10:24 am | भुजंग पाटील

http स्किम https ला ऑटो रिडायरेक्ट व्ह्यायला हवी ती होत नाहिये.

मराठी_माणूस's picture

26 Jan 2021 - 12:07 pm | मराठी_माणूस

धन्यवाद.
पण "Not Secure" अशा साइट्स सुरक्षततेच्या दृष्टीने कशा असतात

साहना's picture

26 Jan 2021 - 1:24 pm | साहना

https आहे म्हणजे संकेतस्थळ SSL नावाचे तंत्रज्ञान वापरत आहे. हल्ली सर्वच ब्राऊसर https नसेल तर नॉट सेक्युर अशी वॉर्निंग देतात पण त्यामुळे घाबरून द्यायची गरज नाही.

SSL तंत्रज्ञानाचे दोन भाग आहेत.

१. संकेतस्थळ कुणाकडून येते ह्याची सिद्धता. (authentication)
२. ज्या माहितीची देवाण घेवाण होत आहे ह्याची गुप्तता. (encryption)

https नसेल तर त्या संकेतस्थळावरील तुमची माहिती ची देवाण घेवाण हॅकर्स, तुमचा ISP इत्यादी लोक पाहू शकतात.

http म्हणजे थोडक्यांत पोस्ट कार्ड पाठविण्यासारखे आहे तर https म्हणजे सीलबंद लिफाफ्यांत रजिस्टर्ड पोस्ट ने पत्र पाठविण्यासारखे आहे.

लॉगिन करताना https नसेल तर लॉगिन करू नये. क्रेडिट कार्ड इन्फो वगैरे देताना https नसेल तर देऊ नये.

गुगल आणि इतर मोठ्या कंपन्या अत्यंत वेगाने https ला प्रमोट करत आहेत त्यामुळे काही वर्षांत बहुतेक साईट्स ssl वापरतील.

सौंदाळा's picture

25 Jan 2021 - 9:47 am | सौंदाळा

सर्वच लेख उत्तम आहेत.
झोन १ मधले सर्वच पर्याय वापरतो, झोन २ मधले खूपच कमी आणि झोन ३ तर नाहीच.
तरीही बँका, मोबाईलचे सिम घेताना, नवीन गाडी घेताना अश्या काही ठिकाणी खरी माहिती द्यावीच लागते आणि ती निर्लज्जपणे विकली जाते. मागे मोदकाने याबद्दल त्याचा अनुभव लिहिला होता.

बोका's picture

25 Jan 2021 - 11:29 am | बोका

उत्तम लेख, धन्यवाद.
लॅपटॉपवर फायरफॉक्स साठी एक उपयुक्त एक्स्टेंशन आहे. Firefox Multi-Account Containers.
https://addons.mozilla.org/en-GB/firefox/addon/multi-account-containers/
हे वापरुन वेगवेगळ्या प्रकारच्या साईट्स साठी वेगेवेगळे कप्पे तयार करता येतात. जसे एक फेसबुकसाठी, एक बँकिंग साठी, एक शॉपिंगसाठी ...
एका कप्प्यातील कुकीज इतर कप्प्यांना वाचता येत नाहीत.

ज्ञानोबाचे पैजार's picture

25 Jan 2021 - 11:45 am | ज्ञानोबाचे पैजार

बरीच नवी माहिती मिळाली...

झोन १ त्यातल्या त्यात बरा आहे पण २ आणि ३ मधल्या बर्‍याच गोष्टी करणे अशक्य आहे (माझ्या सारख्या सामान्य माणसा करता ज्याला नव्या टेक्नोलॉजी बद्दल फारशी माहिती नाही) बरं इतके सगळे केल्यानंतरही कोणी आपली माहिती चोरु शकणार नाही याची खात्री नाही.

हा लेख वाचून डोक्याला शॉट लागला आता या सगळ्या नव्या संज्ञांची माहिती मिळवणे क्रमप्राप्त आहे.

अज्ञानात सुख असते ह्याचा प्रत्यय वारंवार येतो.

पैजारबुवा,

खुपच उपयुक्त नवीन माहिती मिळाली.. शक्य तेवढे नक्की सुचवलेले उपाय वापरणार..अक्च्युली गुगल शिवाय पान हालत नाही.पण तो खूप माहिती चोरतो याचा अनुभव कायम येतो.

कुमार१'s picture

25 Jan 2021 - 2:53 pm | कुमार१

बरीच नवी माहिती मिळाली.

उत्तम लेख. यातील थोड्याफार गोष्टी करतो. जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करणार.

गोंधळी's picture

25 Jan 2021 - 6:27 pm | गोंधळी

व्हॉट्सॲप ची डेटा पॉलिसी भारतासाठी वेगळी तर युरोपसाठी वेगळी आहे. युरोप मध्ये डेटा शेरींग वर कडक निर्बंध आहेत.
भारतात या संबंधी युरोप सारखा कडक कायदा नाही.

मुक्त विहारि's picture

25 Jan 2021 - 9:24 pm | मुक्त विहारि

माहिती बद्दल धन्यवाद

अंतु बर्वा's picture

25 Jan 2021 - 10:56 pm | अंतु बर्वा

धडाधड येणार्या सर्व पॉप अप्सना एकही अक्षर न वाचता अलाऊ चा ऑप्शन क्लिक करणारं पब्लिक पाहिलं की हसावं की रडावं कळत नाही. सगळीकडे अशा सर्व सेटिंग्स बंद करव्यात ज्यामुळे कन्विनियन्स सोडुन आपण इतर काहीच पाहत नाही.. उदाहरणार्थ गुगल मॅप वापरताना, प्रत्येक वेळी पत्ता टाकावा लागु नये म्हणुन अथं पासुन इतिपर्यंत सर्व हिस्ट्री सेव करण्याची परवानगी देणे.
गाडीत अँड्रॉईड ऑटो वापरताना वॉईस असिस्टंट वापरत नाही. त्यामुळे गाडी चालू असताना पत्ता टाकता येत नाही. गाडी थांबवुन टाईप करुन टाकावा लागतो पण गुगलने माझं गाडीतलं प्रत्येक संभाषण ऐकण्यापेक्षा ते मला सुरक्षित वाटतं. सिरी, अलेक्सा, हे गुगल वगैरे वापरत नाही. इच्छा नसताना वॉईस एनेबल्ड उपकरणं (जसं स्मार्ट टीव्ही) घ्यावी लागतात कारण आताशा ते नसलेली उपकरणं बनतच नाहीत, पण घेताना ते फिचर डिसेबल करता येतयं ना याची खात्री करुनच घेतो.

अनेक वर्षें मी ऑनलाईन ऍड क्षेत्रांत काम केले आहे आणि भाषा वापरून अत्याधिक चांगल्या जाहिराती लोकांना दाखवणे हे माझे मुख्य काम होते. काही अत्यंत नामवंत आणि विख्यात कंपन्यांसाठी आणि त्यांच्या बरोबर काम करून त्यांच्या तांत्रिक क्षमतांची मला खूप चांगली माहिती आहे.

इथे मी काही गोष्टी नमूद करू इच्छिते.

प्रायव्हसी हा विषय फक्त ऑनलाईन जगतापुरता नसून प्रत्यक्ष जीवनांत हा खूप खूप महत्वाचा आहे. गुगल किंवा फेसबुक इत्यादी तुम्हाला चांगल्या जाहिराती देण्यासाठीच तुमची माहिती वापरतात. कुणीही माणूस किंवा त्यांचा कर्मचारी तुमचा वैयक्तिक डेटा पाहू शकत नाही किंवा तुम्हाला इजा पोहचू शकत नाही. तुमच्या आरोग्याची माहिती गुगल कडे जास्त सुरक्षित असून तुमचा डॉक्टर ती माहिती कुणाला तरी बेकायदेशीर पणे विकेल ह्याची शक्यता जास्त आहे.

त्यामुळे काहीही सेवा वापरताना आधी कंपनीचे नाव पाहावे. त्याशिवाय ओपन सोर्स मध्ये फक्त नामवंत कंपन्या जसे फायरफॉक्स आणि शक्यतो अमेरिकन किंवा स्विस कंपन्याच्याच सेवा वापराव्यात कारण ह्या दोन्ही देशांत प्रायव्हसी आणि डेटा विषयीचे नियम जास्त चांगले आहेत.

भारतांत ऑनलाईन पेक्षा ऑफलाईन प्रायव्हसी जास्त महत्वाची आहे.

१. भारतातील केमिस्ट मंडळी आपण कुठली औषधें घेता हे कुणालाही बिनदिक्कत सांगतात त्यामुळे औषधे नेहमी (विशेषतः अँटी डिप्रेसंट वगैरे) रोख वापरून घ्यावीत आणि जो तुम्हाला प्रत्यक्ष ओळखत नाही अश्या माणसाकडून घ्यावीत.

२. डॉक्टर मंडळी सुद्धा भारतात इतर लोकांचे खाजगी माहिती आपल्या मित्रांबरोबर शेर करतात. इथे आपण नक्की. काय करू शकतो हे ठाऊक नसले तरी एकतर डॉक्टर सोबत चांगली रेलशनशिप ठेवावी नाहीतर निनावी पद्धतीने सेवा घ्यावी. गुप्तरोग, स्त्रीरोग, गर्भपात इत्यादी विषयांत हे महत्वाचे आहे. (माझ्या मते इथे भारत सरकारने काही कायदे आणि ट्रेनिंग डॉक्टर लोकांसाठी घालून दिली पाहिजेत)

३. भारतांत जर सध्या कुठली दळिद्री सेवा (प्रायव्हसीच्या दृष्टीने) असेल तर ती म्हणजे बॅंक्स. ह्यांच्यात अगदी कुणीही कर्मचारी इतर लोकांचा बेलेन्स पाहू शकतो. हल्ली लग्नाचे सूत जुळले की मंडळी कुटुंबातील कुणालाही वधू किंवा वराचे बँक बॅलन्स पाहायला सांगतात. तथाकथित डेटा प्रायव्हसी इथे सर्वांत महत्वाची आहे पण स्टेट बँक सारख्या बड्या सरकारी कँसर ला कोण थांबवेल हा फार मोठा प्रश्न आहे.

प्रायव्हसी हे भारतांत अनाथ मूल आहे आणि ह्याला कुणीच वाली नाही. ह्याचा सर्वांत वाईट परिणाम होतो तो तरुण मुलींवर. वाट्टेल तिथे केमेरा बसवणे, वाट्टेल तिथे फोटो आणि आयडी मागणे, पत्ता आणि फोन नंबर सर्वत्र मागणे ह्या गोष्टींमुळे स्टॉकींग आणि केटफिशिंग भारतात अत्यंत सोपे बनले आहे.

अगदी वाईट अनुभव आला आहे मला पण.

मी कधी ICICI च्या NRO/NRE अकाउन्ट मध्ये मोठी रक्कम डिपॉझीट केली की लगेच दुसर्‍याच एका इन्व्हेस्ट्मेण्ट कम्पनीचे व्हाट्सॅप मेसेजेस यायला सुरुवात होते, त्यांच्या थ्रु पैसे इन्व्हेस्ट करण्यासाठी.
पहिल्यांदा वाटले की योगायोग असेल. पण पॅटर्न आला लक्षात २-३ वेळा असे झल्यानंतर.

गुगल किंवा फेसबुक इत्यादी तुम्हाला चांगल्या जाहिराती देण्यासाठीच तुमची माहिती वापरतात. कुणीही माणूस किंवा त्यांचा कर्मचारी तुमचा वैयक्तिक डेटा पाहू शकत नाही किंवा तुम्हाला इजा पोहचू शकत नाही

हे समजणं किंवा समजून घेणं खुप महत्वाचं आहे. त्यामुळे 'गुगल डेटा चोरतं' ह्यांसारखी विधान करताना त्यातला फोलपणा लक्षात येऊ शकेल.

- (डीजीटल फुटप्रींट तयार करणारा) सोकाजी

खूपच उपयोगी लेख आहे. या माहितीपूर्ण लेखाबद्दल अनेक आभार.
स्टेट बँकेत काम करणारा माझा (आता दिवंगत) एक नातेवाईक सांगायचा की बँकेसंबंधी सगळे काम आयपॅडवरूनच करावेत, त्यात अँटीव्हायरस वगैरेची गरज नसून ते अगदी सुरक्षित असते वगैरे. यात कितपत तथ्य आहे ?

सोत्रि's picture

26 Jan 2021 - 7:23 am | सोत्रि

इंटरनेटवर मिळणार्‍या सर्व सेवा जर पेड झाल्या तर ह्या एकंदरीत माहितीच्या प्रायव्हसीच्या सर्व समस्या चुटकीसरशी सुटतील.

पण तोच कळीचा मुद्दा आहे की कितीजण ह्या पेड सर्व्हिसेससाठी तयार आहेत? युट्युब 'सबस्क्रीप्शन बेस्ड जाहिरात फ्री' सेवा देते किती जणं पैसे देऊन ही सेवा वापरत आहेत?

इंटरनेटवर आपणच आपला डीजीटल फुटप्रींट करत असतो. आणि तो तयार व्हावा अशाच पद्धतीने इंटरनेटवर मिळणार्‍या सर्व सेवा डिझाईन केलेल्या असतात. इंटरनेट कंपन्या सर्व सेवा जर फुकट देत असतील तर त्यांचा उत्पन्नाचा सोर्स काहीतरी असावा लागेल ना? आपणच स्वतःहून पुरवलेला डीजीटल फुटप्रींट हाच त्या सेवा पुरवठा करणार्‍या कंपन्यांचा उत्पन्नाचा सोर्स असतो. त्या कंपन्यांनी तो वापरणे त्यात काही गैर आहे नाही कारण तो आपणच पुरवलेला असतो.

लेखात सांगितलेली HowSecureIsMyPassword.net ही साईट वापरून किती जणांनी आपापले पासवर्ड चेक केले? ते करतना ती साईट पासवर्डचा डेटाबेस बनवत असेल असे कितीजणांच्या डोक्यात आले? किंवा त्या माहितीचा वापर कसा केला जाईल ह्यावर विचार केला?

'अ ऐवजी ब ही सेवा वापरा कारण ब सेवा पुरवठादार माहितीचा गैरवापर करत नाही' ही तर डीजीटल अंधश्रद्धा झाली कारण आज जे सुपात आहेत ते उद्या जात्यात येणारच कारण there's no such thing as a free lunch.

काचेच्या घरात रहायचे आणि प्रायव्हसी हवी म्हणून दुसर्‍यांनी डोळे मिटून घ्यावे अशी अपेक्षा करण्यासारखं आहे हे.

&#128515

- (डीजीटली पब्लीक) सोकाजी

चौकटराजा's picture

26 Jan 2021 - 9:46 am | चौकटराजा

आपली प्रायव्हसी दोन दिशानी सम्पुष्टात येते ! एक म्हणजे आपण स्वतः होऊन व्यक्त होतो म्हणून व दुसरे कोणीतरी तुमचे काही रेकॉर्ड चोरतो म्हणून ! फेसबुक वरची प्रायव्हसी ही समस्या आमन्त्रण मिळाल्यासारखे आपण वागतो म्हणून. अशा साईटचा उपयोग करताना आपले अकौन्ट हॅक होणे आपल्या १०० टक्के हातात नाही. त्याचा दुरुपयोग करून एखादी गुन्हेगार टोळी तुम्हाला अडकवू शकते व पोलिसांचा ससेमिरा पाठीस लागू शकतो. असा प्रकार हॅकर जितका चलाख,ज्ञानी व मुख्यतः अनैतिक तितका सहज होऊ शकतो.

आता दुसरा प्रकार तुमचा पी सी चा हॅक होऊन तुमचे अर्थव्यवहार , तुम्ही बेकायदेशीर वापरलेली सॉफ्टवेअर , तुमची चित्रे यांची माहिती हॅकर ला होणे ! गुगल वापरल्याने गुगलच अशा हॅकर चे काम करते काय हा माझा प्रश्न आहे !

तुमचे व्यवहारच मुळी असे असले पाहिजेत की त्यांची माहिती कुणाला मिळाली तर तुम्हाला फारशी इजा पोहोचू नये .

मी सहस्त्र भोजन घातले की महिन्या भरात माझ्या घरावर एक चोरांचा दरोडा तरी पडेल किंवा आयकर वाल्यांची धाड ! यात गुगल चा संबंध आला कुठे ?

रीडर's picture

27 Jan 2021 - 8:09 am | रीडर

उपयुक्त माहिती

प्राची अश्विनी's picture

27 Jan 2021 - 10:18 am | प्राची अश्विनी

तिनही भाग अतिशय माहितीपूर्ण होते. धन्यवाद.

Rajesh188's picture

18 Feb 2021 - 12:12 am | Rajesh188

खूप च छान आणि उपयोगी माहिती

कंजूस's picture

19 Feb 2021 - 6:42 pm | कंजूस

बाब्बो. आत्ता काय करायचं?