तसा चोख असतो
ताळा आमचा ,
दिसा -मासाच्या गणिताचा.
कुणाची तरी वाट बघत,
जागलात,
काही उत्तर रात्रीचे प्रहर.
ते ही वळते केलेत ,
संधीकालाच्या वजावटीत.
ओंजळीत चेहेरा झाकून रडलात ,
ते ही होरे जमा धरलेत,
ग्रहणाच्या हिशेबात.
तसा चोख असतो
ताळा आमचा ,
दिसा -मासाच्या गणिताचा.
उरलं सुरलं केलं वळतं
घसार्याच्या आकडेवारीत
तसे काही बाक़ी नाही
देण्या घेण्याच्या हिशेबात . तसा चोख असतो
ताळा आमचा ,
दिसा -मासाच्या गणिताचा.
(मुठभर राखुंडी हातात ठेवून
आयुष्य म्हणाले,
हीच काय ती गंगाजळी
इतक्या वर्षाच्या ताळेबंदात )
प्रतिक्रिया
2 Mar 2017 - 11:39 am | चांदणे संदीप
रामदासकाकांच्या कवितेवर प्रतिसाद लिहायला मी पैला! :D
बाकी, कविता डेंजोर! (तसाच, माझा प्रतिसादही..! ;) )
Sandy
2 Mar 2017 - 12:14 pm | अॅस्ट्रोनाट विनय
आवडली
2 Mar 2017 - 7:14 pm | पैसा
:)
3 Mar 2017 - 9:10 am | अत्रुप्त आत्मा
आवडली.
3 Mar 2017 - 9:27 am | यशोधरा
सुरेख!!
3 Mar 2017 - 9:49 am | गवि
प्रणाम सर ... _/\_
3 Mar 2017 - 10:55 am | वेल्लाभट
सुरेख
3 Mar 2017 - 4:20 pm | किसन शिंदे
अतिशय सुरेख
4 Mar 2017 - 8:42 am | पिलीयन रायडर
__/\__
22 Jan 2021 - 6:38 pm | NAKSHATRA
सुरेख!!