WhatsApp च वापरणार की सिग्नल,टेलिग्रामवर जाणार?

उपयोजक's picture
उपयोजक in काथ्याकूट
11 Jan 2021 - 3:30 pm
गाभा: 

WhatsApp ची नवीन पॉलिसी देत बसत नाही.कारण आतापर्यंत ती पाठ झाली असेल.काहीजणांना वाटतंय हे नवीन धोरण धोक्याचं आहे; काहीजण म्हणतायत आधीच नागवे झालो आहोत अजून काय नागवे करणार? वगैरे. याच अनुषंगाने आलेल्या दोन फेसबुक पोस्ट पहा.
------------------------------------------------
*#व्हॉट्सअपची_नवीन_पॉलिसी*

सोशल मीडिया जायंट असलेल्या व्हॉट्सअपने आपली नवीन टर्म्स अँड प्रायव्हसी पॉलिसी जाहीर करून करोडो वापरकर्त्यांना धक्का दिलाय. आम्ही सांगतो ते मान्य करा, अथवा अकाउंट डिलिट करू अशी गोड भाषेत धमकी दिल्याने वादळ उठले आहे. याशिवाय या प्रायव्हसी पॉलिसीमुळे आपला डेटा आता सुरक्षित असेल का अशी वापरकर्त्यांना चिंता वाटते आहे. कित्येकांनी व्हॉट्सअपला कायमचा राम राम ठोकून टेलिग्राम किंवा सिग्नल वर शिफ्ट होण्याची तयारी केली आहे. खरंच हे भीतीदायक चित्र आहे का? चला तर मग जाणून घेऊया…

*आधी आपण व्हॉट्सअपची नवीन पॉलिसी नक्की काय आहे ते समजून घेऊ.*

आतापर्यंत आम्ही तुमचा डेटा सुरक्षित ठेवतो असा दावा करणाऱ्या व्हॉट्सअपने नवीन प्रायव्हसी पॉलिसीनुसार वापरकर्त्यांचा डेटा फेसबुक आणि इन्स्टाग्रामसोबत शेअर करण्याचे ठरवले आहे. आता हा डेटा म्हणजे कोणता? तर आपले नाव, आपला नंबर, आपला डीपी, लोकेशन, आपले आर्थिक व्यवहार, एकमेकांना दिलेले पत्ते, शेअर केलेले व्हिडीओ, कॉन्टॅक्टस, आपली राजकीय मते, ज्या ग्रुपमध्ये आहोत त्या ग्रुपची माहिती, त्या ग्रुपची मानसिकता, आपला आयपी एड्रेस… सगळंच!

*हा आपला पर्सनल डेटा मिळवून फेसबुक नक्की काय करणार?*

फेसबुकने इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअप विकत घेऊन या तिन्ही कंपन्यांना एकाच छताखाली आणलंय. या तिन्हीवरचा डेटा जमा करण्यासाठी डेटा सेंटर्स उभारली आहेत. या डेटाचा उपयोग टार्गेटेड ऍडव्हरटाइजिंग आणि पॉलिटिकल कॅम्पेनसाठी केला जाईल. उदाहरणार्थ, तुम्ही व्हॉट्सअपवर कुणासोबत लॅपटॉपविषयी चर्चा कराल तर तुम्हाला फेसबुक लॅपटॉपच्या जाहिराती दाखवायला सुरुवात करेल. व्हॉट्सअपने नुकतेच स्वतःचे UPI व्हॉट्सअप पेमेंट लाँच केले आहे. त्यावर होणाऱ्या व्यवहारावर सुद्धा बारीक नजर असेल.

जर तुम्ही एखाद्या पक्षाचे समर्थक असाल तर निवडणुकीच्या प्रचारात तुम्हाला टारगेट करून प्रचार केला जाईल. अधिक विस्ताराने सांगायचं तर समजा मी 'अबक' पक्षाचा समर्थक आहे आणि माझ्या मतदारसंघातील 'अबक' पक्षाचा उमेदवार सोशल मीडियावर स्पॉन्सर्ड कॅम्पेन करत असेल तर फेसबुक त्याची जाहिरात आधी मला दाखवेल. मी त्याला सकारात्मक प्रतिसाद देईन. या माझ्यासारख्या अनेकांच्या सकारात्मक प्रतिसादामुळे उमेदवाराची कॅम्पेन सफल होईल आणि फेसबुकलाही पैसा मिळेल. काही वेळा हे उलट पण होऊ शकतं. आपली राजकीय मते बदलण्यासाठी विरुद्ध बाजूच्या उमेदवाराच्या जाहिरातीचा भडिमार आपल्यावर केला जाऊ शकतो. जो पक्ष जास्त पैसा देईल, फेसबुक त्याचं! बरं, इथपर्यंत ठीक आहे, पण हा डेटा जर फेसबुक तिसऱ्याच कंपनीला विकत असेल तर ते जास्त भयानक असेल.

*व्हॉट्सअप साठी टेलिग्राम/सिग्नल हा पर्याय आहे?*

हे तर जास्त रिस्की असणार आहे. व्हॉट्सअपचा डेटा सध्या फक्त मालक कंपनी असणाऱ्या फेसबुककडे जातोय. पण टेलिग्राम हे ओपन सोर्स ऍप असल्याने यावरचा डेटा कुठेही जाऊ शकतो. त्याचा कुणीही गैरवापर करू शकतो. टेलिग्राम ही मुळात रशियन कंपनी होती. तिने आपले बस्तान नंतर बर्लिनला हलवले, नंतर व्हाया इंग्लंड ती आता दुबईला स्थित आहे. टेलिग्रामचे सर्व्हर्स सध्या दुबईमध्ये आहेत. आणखी एक पर्याय सिग्नल या ऍपचा सांगितला जातो. या ऍपची निर्मिती ऍक्टन नावाच्या व्यक्तीने केली आहे. हा ऍक्टन म्हणजे व्हॉट्सअपचा सहसंस्थापक. फेसबुकने व्हॉट्सअप विकत घेतले तेव्हा हा राजीनामा देऊन बाहेर पडला होता. सिग्नल हे ऍप तुलनेने अत्यंत नवखे असल्याने त्यांच्या पॉलिसी कश्या असतील ते आज सांगता येणार नाही. थोडक्यात, व्हॉट्सअप सोडून दुसरीकडे जाणे म्हणजे आगीतून फुफाट्यात जाण्यासारखे आहे.

*मग आता करायचं तरी काय?*

लक्षात घ्या, सध्याच्या युगात प्रायव्हेट असं काहीही राहिलेलं नाही. तुम्ही ज्या ज्या साईटवर जाता तिथे तिथे तुमचा डेटा गोळा केला जातो. तुम्ही जे जे ऍप वापरता तिथेही तुमचा डेटा गोळा केला जातो. जस्ट डायल, इंडियामार्ट यासारख्या साईटवर रजिस्टर करताय? त्यावर रजिस्टर केलेल्या प्रत्येकाचा डेटा मार्केट मध्ये उपलब्ध आहे. नौकरी डॉट कॉम वर रिझ्युम अपलोड करताय? त्या प्रत्येक कॅण्डीडेटचा डेटा मार्केटमध्ये उपलब्ध आहे. ट्रु कॉलर वापरत असाल तर तुमच्या नंबरसकट तुमच्या कॉन्टॅक्ट लिस्टमधल्या प्रत्येकाचा नंबरचा डेटा मार्केटमध्ये उपलब्ध आहे. हे सगळे लपून डेटा गोळा करतात आणि विकतात. फरक एवढाच की, व्हॉट्सअप हे राजरोसपणे सांगून करत आहे. शक्यतो आपली अत्यंत वैयक्तिक माहिती व्हॉट्सअप चॅट मध्ये देणे टाळावे हाच सध्या तरी एकमेव उपाय. जर फारच भीती वाटत असेल तर इंटरनेटचा वापर पूर्णपणे बंद करणे हा शेवटचा पर्याय!

*अनुप कुलकर्णी*
*सोशल मिडिया मॅनेजर*
*स्मार्ट मिडिया सोल्युशन्स*
*#अनुपानंद*
----------------------------------------------

जोक मारून झालाय तर आता शिरेसली लिहीते. हे लिहीण्याची माझी टेक्निकल पात्रता शून्य आहे पण गेली सात वर्षं युकेत काम केल्यामुळे Data Protection Act 1998 आणि GDPR सारख्या डोकेखाऊ कायद्यांविषयी जवळून माहिती मिळाली. आमची ॲाफशोर (म्हणजे युके आणि EEU बाहेर कुठलंही लोकेशन, अगदी अमेरीका सुध्धा) ॲाफिसेस ही या दोन कायद्यांचं पालन करणारी असणं आमच्यावर बंधनकारक होतं आणि आहे त्यामुळे याविषयी वाचन, चर्चा आणि ग्राऊंड लेव्हलला काम केलेलं आहे

आता तुला काय कळतं यातलं हा प्रश्न बाजुला काढल्यावर मुळ मुद्दा!

WA च्या नव्या डेटा पाॅलिसीचं भ्या वाटतंय? तर मग सांगते की या क्षणी तुमची अख्खी जन्मकुंडली, इतिहास, भूगोल हा इंटरनेट वर उपलब्ध आहे. डिप/डार्क वेबच्या अंधाऱ्या दुनियेत हा डेटा वाट पाहतोय ते कोणीतरी त्यावर बोली लावायची. हे डार्क वेब गुगल सर्चवर सापडत नाही. याला ॲक्सेस करायचे मार्ग वेगळे पण ते करायच्या भानगडीत पडू नका एवढंच सांगेन. पण आपण इतके गरीब आहोत की आपल्या डेटावर बोली लावायचे कष्ट कोणी घेत नाही

गेली आता भिती? सिंह दिसला की कुत्र्याची भिती कमी होते असं वाटलं म्हणून विचारतेय

या मानाने मार्कदादा झकरबर्ग तुमचा डाटा शिस्तीत, सांगुनसवरून घेऊन तो ‘स्टोर’ करताहेत. ह्यात आणि एका नाॅन एथिकल हॅकरने तो ‘हॅक’ करणं यात तेवढाच फरक आहे जेवढा करण जोहर आणि क्रिस्तोफर नोलन मधे आहे. झकरबर्ग काय करेल डेटाचं? तर तो तुम्हाला टारगेटेड ॲड्स दाखवेल म्हणजे काय तर तुमच्या मित्रांबरोबर तुम्ही गोव्याला जायचा ग्रुप उघडला की तो गोवा टुरीजमच्या ॲड दाखवेल कारण त्या वायझेडला हे कुठं ठाऊक की तुम्ही नुसते प्लान करता, जात नै ते?

किंवा तो हो डेटा घेईल आणि इतर १०० मिलीयन लोकांबरोबर ॲड करेल आणि त्यातून एका ठरावीक डेमोग्राफिकचं राजकीय मत, गोष्टी विकण्या-विकत घेण्याचे पॅटर्न्स जमा करून मोठ्या कंपन्यांना विकेल. इसमे कंपनीयोंका घाटा, तेरा कुछ नही जाता

जेव्हा फेबु, गुगल सारख्या मोठ्या कंपन्या तुमचा डेटा जमा करतात तेव्हा त्या डेटाचं प्रोटेक्शन आणि सिक्युरीटीची मोठ्ठी जबाबदारी त्याच्यांवर असते आणि यासाठी त्यांची आयटी टिम दिवसरात्र कामही करत असते. हा डेटा एका एक्सेल शीट मधे मावणारा नसतो तर करोडो खर्च करून मोठ्या डेटासेंटर्समधे स्टोर असतो. ही हॅक होऊ शकत नाहीत का? होऊ शकतात पण त्याची शक्यता कमी आहे. ह्याने मार्कभाऊ झकरबर्ग यांची रातोंकी नींद हराम व्हायला पाहिजे, तुमची नै. म्हणजे बघा. तुमचा पगार तुम्ही तुमच्या बेड खाली ठेवता का? नाही ना? बॅंकेत ठेवता ना? मग बॅंकेचा राखणदार तुम्ही निवडता का? की स्वत: जाता रोज कंदील घेऊन रात्री रखवाली करायला. ते बॅंकेचं काम आहे ना? तसंच यालाही डेटा बॅंकच समजा

अजून भ्या वाटतंय?
मग,

- learn online hygiene. कुठला डेटा सोशल मिडीया वर शेअर करायचा कुठला नाही ते शिका. घरचा ॲड्रेस, आई वडिलांचं नाव (हे बरेचदा सिक्रेट प्रश्न असतात), पॅन कार्ड, आधार कार्ड हे असे डिटेल्स टाळावेत

- जाहीरातींचा भडीमार झाला तर ती व्हाॅट्स ॲप सारखं absolutely amazing communication tool फ्रि मधे वापरायची किंमत समजा. जाहिरात दिसली की विकत घेतलं अशी तुमची अवस्था असेल तर data privacy is least of your problem dude

- राजकिय मतं - नो कमेंट्स. व्हाॅट्स ॲपचे लेख वाचून तुम्ही सारासार विचार करण्याची कुवत गमवत असाल तर data privacy is least if your problem dude

अजून भ्या वाटतंय?

मग एक वळकटी बांधा आणि हिमालयात रहायला जा

हुश्श दमले बै

© *हिमाली कोकाटे*
Sr. Project Manager, Capegemini UK
----------------------------------------------

सर्वात श्रीमंत एलॉनभाऊ म्हणतात सिग्नल वापरा. काहीजण म्हणतात टेलिग्राम वापरा.आज या दोन्ही अॅप्सची पॉलिसी वापरकर्त्यांची माहिती पेरेंट कंपनीला देणार नाही अशी असली तरी ती उद्या तशीच राहील याची खात्री काय?
वापरकर्त्यांची संख्या खूप कमी होऊन आपलंच नुकसान होईल हा विचार झकेरबर्गनी केला असेलच ना?
खरच नवी पॉलिसी कितपत धोकादायक आहे? WhatsApp वापरकर्त्यांना उबग आणेल का?
काय मत आहे तुमचं यावर?

प्रतिक्रिया

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

11 Jan 2021 - 4:39 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

-काय मत आहे तुमचं यावर?

ऑलरेडी आपण ज्या दिवशी नेटवर कनेक्ट झालो त्याचदिवशी आपलं असं पर्सनल काही राहिलेलं नाही. आपलं पर्सनल काय काय फेसबूकवर येईल त्याची मला उत्सुकता आहे. 'वॉट्सॲप' असा काही डाटा फेबू वर वा अन्य त्यांच्या माध्यमांवर प्रकाशित करेल ज्याचा मला त्रास होईल तेव्हा
वॉट्सॲप अकाउंटच डिलीट करेन असं माझं धोरण आहे. (अजून धोरण काही नक्की नाही)

वॉट्सॲपवर आपण यापुढे काय काळजी घ्यायची या विषयावर लक्ष केंद्रीत केले पाहिजे. असे व्यवहार, विचार, फोटो, आणि असे आदान प्रदान जे सर्व वॉट्सॲप पाहात आहे, असे समजून यापुढे वागायचे आणि ती ही आपली सर्व माहिती जगजाहीर करणार आहे अशा सर्व गोष्टी 'वॉट्सॲप' वर टाकायच्या नाहीत अशी काळजी घ्यायची.

आपल्याला न सांगता वॉट्सॲप सध्या आपली काय माहिती घेईल आपलं लोकेशन, आपलं कोणतं सिम आहे. नेटडाटा, आपलं फोन मॉडल, ऑपरेटिंग सिस्टिम, ब्राउजर, आयपी पत्ता, फोन क्रमांक, मोबाइल बॅटरी, सिम कार्ड सिग्नल्स, आपली भाषा, कॉल्स, वाट्सअप ग्रुपची माहिती, प्रोफाइल फोटोज, आपण ऑनलाइन केव्हा असता, आपण शेवटी वाट्सपचा उपयोग केव्हा केला. आपण कोणाशी बोलता, किती बोलता. आपली फोनची सेटिंग कशी असते. मोबाइलवरील एप्लीकेशन आणि वाट्सप अजून काय काय लुटेल त्याचं आपल्याला किती नुकसान आहे, याची जो पर्यन्त कोणी भयंकर फळं भोगत नाहीत (फक्त तो मी नसावा) तो पर्यन्त वाट्सपवर काळजी घेऊन असू.

आमचं एप्लीकेशन वापरायचं तर तुम्हाला आमच्या अटी मान्य कराव्या लागतील हे जरी खरे असले तरी प्रायवसी अशी जगजाहीर होतेय असे म्हणून कोर्टकचे-या व्हाव्यात, टर्म आणि कंडीशन्स बदलाव्यात अशी अपेक्षा करूया.

वरील धाग्यात कमीत कमी दहा प्रतिसाद टाकण्यासाठी रुमाल टाकून ठेवत आहे. (अटी लागू)

-दिलीप बिरुटे

प्रचेतस's picture

11 Jan 2021 - 4:54 pm | प्रचेतस

व्हॉट्सअ‍ॅपची काही क्रॅक्/मोडीफाईड व्हर्जन्स पण उपलब्ध आहेत असे समजते. नव्या प्रायव्हसी पॉलिसीमुळॅ ही व्हर्जन्स बंद होतील काय? किंवा नवी पॉलिसी झुगारुन देऊन ह्या व्हर्जन्सवर व्हॉट्सअ‍ॅप वापरता येईल काय हे आपणास माहित असल्यास सांगावे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

11 Jan 2021 - 7:33 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

नव्या पॉलिसी ते झुगारु शकत नाहीत आणि मोडीफाय व्हर्जन्स बंदही होणार नाहीत. सध्याच्या उपलब्ध प्लॅटफॉर्मवरच ते सुरु राहील.

-दिलीप बिरुटे

उपयोजक's picture

11 Jan 2021 - 7:33 pm | उपयोजक

प्रायवसी अशी जगजाहीर होतेय असे म्हणून कोर्टकचे-या व्हाव्यात, टर्म आणि कंडीशन्स बदलाव्यात अशी अपेक्षा करूया.

अनुमोदन.
पण शेवटी धंदा करायला बसलाय झुकरबर्ग. हे ही विसरुन चालणार नाही.माहिती विकली नाही तर त्याचा धंदा कसा व्हावा?

"जगजाहीर"?

म्हंजी काय रे भाऊ?

कंजूस's picture

11 Jan 2021 - 5:07 pm | कंजूस

जे जे फुकट ते ते सुंदर.
सर्व वापरतो।
वाटसप - मिडिया आणि। कॅाल्स.
टेलग्राम - फुल रेझलुशन फोटो पाठवणे. मालिका उतरवणे अजून नै केलं
वाइबर - जपानमध्ये कॅाल
इमो - कत्तारमध्ये कॅाल
गूगल कॅाल
माइक्रोसोफ्ट कॅाल
इमेल - पाच सर्विस प्रवाइडरस
काही राहिलं का?

उपयोजक's picture

11 Jan 2021 - 7:34 pm | उपयोजक

फुल रिझोल्युशनच्या फोटोसाठी फ्लिकर नि इन्स्टाग्राम वापरा.

गणेशा's picture

11 Jan 2021 - 5:24 pm | गणेशा

मी काहीही न वाचता, policy accept केल्या होत्या.

त्यामुळे जे करायचे ते करा..
आर्थिक सोडून बाकी ढवळा ढवळ नको फक्त..
बाकी विशेष काही phone मध्ये करत नाहीच..

चौथा कोनाडा's picture

11 Jan 2021 - 5:30 pm | चौथा कोनाडा

पुर्वी मुघल, ब्रिटिशांचे गुलाम होतो आणि आता व्हॉटअप, फेसबुक सारख्या परकिय व्यापारी सॉफ्टवेरचे गुलाम.
..... ..... ..... ..... आणि गुलामांना चॉईस नसतो !

उपयोजक's picture

11 Jan 2021 - 7:36 pm | उपयोजक

मिल के मुकाबला करेंगे तो बदल होगा काय??

चौथा कोनाडा's picture

11 Jan 2021 - 8:23 pm | चौथा कोनाडा

होऊ शकतो.
सक्षम पर्याय आणि फेबु-व्हॉटसपची कोंडी करायला पाहिजे.

कंजूस's picture

11 Jan 2021 - 6:40 pm | कंजूस

जरा आता कुठे स्मार्टफोन हातात पडु लागले आणि वाटसप खेळु लागले सिनिअर सिटिझन तर बंद करा बंद करा?!

व्हाॅट्स ॲप वापरणे बंद करणार.
टेलिग्राम :- बराच काळ वापरत आहे, परंतु त्याचा वापर हा फक्त कंटेंट डाउनलोडसाठीच करतो, मला टेलिग्राम चे सर्वात आवडणारे फिचर म्हणजे तुम्ही तुमचा मोबाइल क्रमांक हाईड करु शकता, याचा फायदा वेगवेगळ्या विषया वरचे ग्रुप्स जॉइन करुन सुद्धा तुमचा नंबर जग जाहीर होत नाही.
टेलिग्राम ओपन सोर्स नाही हा मला न आवडलेला गुण मात्र फिचर्सच्या बाबतीत सध्या सगळ्यात वरचढ. एनक्रिप्शन कीज सर्व्हरवर असतात.

सिग्नल :- हे देखील बराचकाळ मोबल्यात वास्तव्य करुन आहे,पण वापरात नाही. मस्क मामां सारखेच स्नोडेन बुवा देखील याचा वापर करतात आणि दोघेही याचा वापर करण्यासाठी आग्रही आहेत. मस्क मामा फेसबुकवर खुन्नस खाउन आहेत हे सर्वश्रुत आहेच, आता त्यांना काडी करायची अजुन एक संधी मिळाली आणि त्यांनी ती चुकवली नाही. एक ट्विट आणि सिग्नलचा डेटाबेसचा लोड विक्रमी वेगाने वाढायला लागला. मला न आवडलेला गुण म्हणजे नंबर हाईड करण्याची सोय नाही, मात्र हे ओपन सोर्स असल्याने यापुढे व्यक्तिगत वापरासाठी याला निवडणार आहे. एन्क्रिप्शन कीज मोबाइल /पीसीवर राहतात.

दोन्ही मध्ये बग्स येतात आणि सुधारले देखील जातात, भविष्यात त्यांच्याकडे युजरचा डेटा कायदेशीर पद्धतीने मागितल्यास त्यांना बहुधा तो ध्यावा देखील लागु शकेल परंतु आत्ता पर्यंत या बाबतीत सिग्नलचा इतिहास हा अधिक उत्तम असल्याचे जालावरुन समजते.

टेलिग्रामच्या जागी सिग्नल का ? = फारच कमी मेटाडेटा स्टोअर केला जातो. [ या विषयावर अधिक माहितीसाठी जालावर भ्रमंती करावी. ]

जाता जाता :- सेशन या मेंसेंजला चांगले भविष्य दिसत आहे, पण सध्या तरी सिग्नल पकडणे महत्वाचे आहे ! :)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- If You Had My Love... :- Jennifer Lopez

व्हाॅट्स ॲप वापरणे बंद करणार.
काही काळ वापरणे पूर्णपणे बंद केले होते पण सध्या काही कारणास्तव किमान वापर ठेवला आहे, इतर महत्वाच्या कामासाठी मात्र केवळ सिग्नल वापरत आहे.
फेसबुक परत आपली पॉलिसी परत जबरदस्ती लागु करण्याच्या त्यांच्या धोरणावर परत आलेला असुन मला याचा छोटासा पॉपअप मेसेज अधुन मधुन दिसतो.
फेसबुक माचो असल्याने मला जितके दिवस त्यांची पॉलिसी टाळता येणार आहे तितके दिवस ती टाळणार आहे.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-Billa 2 - Madurai Ponnu Song Video | Yuvanshankar Raja

मुक्त विहारि's picture

3 Mar 2021 - 1:12 pm | मुक्त विहारि

मी माझे Documents आता, What's App, Signal वगैरे Appचा वापर करून पाठवत नाही...

Facebook तर बंदच करून टाकले आहे....

चौकटराजा's picture

11 Jan 2021 - 8:20 pm | चौकटराजा

फार पूर्वी " ब्लू थन्डर " नावचा चित्रपट आला होता ! त्यात पोलिसान्च्या हेलीकोप्टरच्या मशीनमधे मोटारीच्या आर टी ओ नम्बरवरून तुमची २० वर्षे जुनी असली तरी क्र्राईम हिस्टरी मिळण्याची सोय असल्याचे दाखवले आहे ! आता तर काळ फार पुढे गेला ! माझ्या मते आपले वर्तन फक्त सेक्स हा विषय सोडला तर त्यात प्रायव्हेट काही असावे असे आपल्याला वाटावेच का ...? सेक्स तरी का .....? तर त्यासम्बन्धी काही कायदे जगात अस्तित्वात आहेत म्हणून ! त्यात नुसत्या दन्डाने सुटता येत नाही म्हणून .. त्यात दुसर्या व्यक्तीच्या मान्यतेचा... वैवाहिकपणाचा.. रोगाचा...जाणतेपणाचा सम्बन्ध आहे म्हणून !

सुजित पवार's picture

11 Jan 2021 - 8:38 pm | सुजित पवार

व्हाॅट्स ॲप वापरणे बंद करणार नाहि, सध्या तरि.
मला शुल्क आकरले तरि चालेल. शुल्क भरा अथवा प्रायव्हसी पॉलिसी स्विकारा असा पर्याय हवा.

चौथा कोनाडा's picture

11 Jan 2021 - 8:47 pm | चौथा कोनाडा

शुल्क भरून सुद्धा माहिती चोरली तर ?

सुजित पवार's picture

13 Jan 2021 - 9:53 pm | सुजित पवार

चोरि झालि तर आपन काय करु शकतो? कोनते तरि माध्यम वापरावे लागेलच.

मुक्त विहारि's picture

11 Jan 2021 - 10:07 pm | मुक्त विहारि

What's App बंद करणार आहे....

अभिजीत अवलिया's picture

11 Jan 2021 - 10:15 pm | अभिजीत अवलिया

माझ्यासरखे जे व्हाटसअप वापरतात पण फेसबुक अकाउंटच नाही त्यांना कुठे अॅड दाखवणार?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

11 Jan 2021 - 11:06 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

फेसबुकवर तुम्ही असा की नसा, तुमच्या माहितीशी त्यांना मतलब आहे, तुमची माहिती शेयर करायला तुम्ही कशाला हवे त्यांना तिकडे. तुमच्याकडील उपयोगी माहिती ते इतरांना पुरवत राहतील. फक्त तुम्हाला माहिती होणार नाही इतकेच... असे वाटते.

-दिलीप बिरुटे

उपयोजक's picture

11 Jan 2021 - 11:51 pm | उपयोजक

तुम्हाला व्हॉटसअॅपच्या स्टेटसमधे जाहिराती दाखवणार.शिवाय इन्स्टाग्राम, फेबु मेसेंजर हे वापरत असाल तर तिथेही कदाचित दाखवतील.

वाटसप/टेलिग्रामसाठी एकच नंबर दोनचार डिवाइसांत रेडी ठेवण्यासाठी फरक आहे.

श्रीरंग_जोशी's picture

11 Jan 2021 - 11:29 pm | श्रीरंग_जोशी

मी काही वर्षे व्हॉट्सअ‍ॅप वापरले तरी मला ते आवडत नव्हते कारण.

  • व्हॉट्सअ‍ॅपमध्येही आपला फोन क्रमांक सार्वजनिक होणे खूप सहजपणे होते. या प्रकाराची (फोनवर इन्स्टन्ट मेसेंजर) मुहूर्तमेढ रोवणार्‍या ब्लॅकबेरी मेसेंजरमध्ये हे कधीच शक्य होत नाही.
  • दुसरे म्हणजे भारतीय वापरकर्त्यांनी व्हॉट्सअ‍ॅपचा केलेला अतिरेकी वापर (अनेकांसाठी इन्स्टंट मेसेजिंग ऐवजी इंटरनेट म्हणजे बहुतांशी व्हॉट्सअ‍ॅप). अमेरिकेत सुरुवात होऊनही अमेरिकन लोक याचा फारसा वापर करतानाही दिसत नाहीत.

सुदैवाने व्हॉट्सअ‍ॅपनेच तीन वर्षांपूर्वी ब्लॅकबेरी फोनवर चालणे बंद केले अन माझ्यासाठी सुंठीवाचून खोकला गेला ;-).
व्हॉट्सअ‍ॅपचे इतर पर्याय म्हणून ब्लॅकबेरी मेसेंजर एन्टरप्राइझ सुचवतो.

श्रीरंग_जोशी's picture

12 Jan 2021 - 12:39 am | श्रीरंग_जोशी

फेसबुकचा भरपूर वापर करत असलो तरी केवळ ब्राऊझरमधून त्यांचे कोणतेच अ‍ॅप इन्स्टॉल केलेले नाही.

आधीपासून तिन्ही मेसेंजर्स चा वापर सुरु आहे. वापरत नाही तो म्हणजे घाणेरडा फेसबुक मेसेंजर.

- व्हाट्सअँप => भारतातील काही मंडळी वापरतात म्हणून वापरावा लागतो. नोटिफिकेशन mute करून ठेवलेय.
- टेलिग्राम => बहुतेक मित्र मंडळी ह्यावर आहेत.
- सिग्नल => फक्त खास मित्र लोक वापरतात

माझ्या मते सर्वप्रथम फेसबुक अकाऊंट पूर्ण पणे बंद करावा. मेसेंजर चे नवीन पर्याय बाजारांत येणार आहेत.

कंजूस's picture

12 Jan 2021 - 7:04 am | कंजूस

फेसबुक माध्यमातून मोबाईल पेजला मिळत नव्हते . नंतर मिळू लागले. पोस्ट्सच्या अध्येमध्ये जाहिराती. पण आता तशा जाहिराती वाटसपला नाही तर एक काच ठेवणार. एका बाजूने दिसतं दुसऱ्या बाजूचं तसं.

-----------
टेलिग्रामही देईल जाहिराती. सोय देणार तर काही किंमत मोजावी लागणारच.

मराठी_माणूस's picture

12 Jan 2021 - 8:39 am | मराठी_माणूस

वर उल्लेख केलेल्या अ‍ॅप सारखे एक ही अ‍ॅप भारता मधे तायर होउ शकत नाही का ?

पिनाक's picture

12 Jan 2021 - 9:14 am | पिनाक
पिनाक's picture

12 Jan 2021 - 9:14 am | पिनाक

आहे तर !

https://www.elyments.com/

उपयोजक's picture

12 Jan 2021 - 9:19 am | उपयोजक

https://play.google.com/store/apps/details?id=com.namastebharat

Made In India ची सुरुवात करुया.
अमेरिकन अँप वाँटसप च्या ऐवजी भारतीय अँप नमस्ते भारत स्विकारुया.

*नमस्ते भारत अँप मध्ये वाँटसप पेक्षा जास्त फंक्शनस् आहेत*
१)यात १६ एम्. बी.पेक्षा जास्त ५० एम्. बी.चा व्हिडीओ पाठवू शकता.
२)यात word, excel आणि Adobe च्या फाईल्स पण पाठवू शकता.
३) यात २०० जण ग्रुप मध्ये अँड करता येतात.
४)कोणताही आकार नाही.
पूर्णपणे मोफत.
५)वाँटसप सारखेच चालते.कांहीही फरक नाही.
आजच Namaste Bharat स्विकारुन देशसेवेला सुरुवात करुया.
सर्व मित्र मैत्रीणींना,नातेवाईकांना कळवा आणि नमस्ते भारत वरच एकमेकांना भेटा.
*भारत माता की जय!*

मराठी_माणूस's picture

12 Jan 2021 - 9:24 am | मराठी_माणूस

धन्यवाद.

मग हेच WA वर व्हायरल करुन लोकांना कळवायला हवे.

पिनाक's picture

12 Jan 2021 - 9:30 am | पिनाक

माझ्या मते whatsapp वापरावे पण आपले संपूर्ण ट्रॅकिंग useless करण्याचे मार्ग आहेत. इन फॅक्ट, गूगल आपली किती माहिती ट्रॅक करते हे पाहिलं तर तुम्हाला धक्का बसेल. पण तरीही काही गोष्टी करता येतातच.
- गूगल चं पूर्ण ट्रॅकिंग बंद करण्याचे options गूगल देते. ते वापरा.
- chrome ऐवजी duckduckgo browser वापरा
- माझे सर्व ठिकाणी वेगवेगळे प्रोफाईल्स आहेत. वेगवेगळ्या नावाने, वेगवेगळ्या जन्मतारखेसकट आणि वेगळी इमेल वापरून. जोडा व्हाट्सअप्प आणि फेसबुक आणि करा analysis.
- फेसबुक फक्त browser वापरून उघडायचा ऑपशन आहे.
- इन्स्टाग्राम वापरतच नाही आणि फेसबुक कधी तरी दोन महिन्यातून एकदा उघडतो.
- काही न ट्रॅक करणाऱ्या ऑपरेटिंग सिस्टिम्स पण आहेत, पण ते जाऊदे
- जिमेल नको वाटत असेल तर प्रोटॉनमेल सारखी secure इमेल सर्व्हिस आहे. वापरून पहा.
या निमित्ताने privacy वर चर्चा सूर झाले हे ही कमी नाही.

साहना's picture

12 Jan 2021 - 11:00 am | साहना

** सूचना **

उगाच मेक इन इंडिया आहे म्हणून काहीही मेसेंजर अप इन्स्टॉल करू नका. काही काळ थांबा. फेसबुक किंवा गुगल कडे आपला कितीही डेटा असला तरी तो बहुतांशी १००% सुरक्षित असतो. पण त्यांच वेळी शनिवारी सुरु करून मंगळवारी गायब होणाऱ्या कंपनी कडे काहीही सुरक्षित असू शकत नाही.

भारतांत डेटा संबंधी कायदे नाहीत आणि फ्रॉड कंपन्यांची सध्या खूपच चालती आहे. निव्वळ तुमचे कॉन्टेक्स चोरून विकण्यासाठी अनेक मेसेंजर कंपन्या आपली अँप्स प्रमोट करणार आहेत.

थोडा काळ थांबावे, कंपनी कुठली आहे, त्यांचे HQ कुठे आहे, इन्वेस्टर्स कोण आहेत हे थोडे वाचूनच ऍप्प इंस्टाल करावे. झोहो हि भारतीय कंपनी माझ्या मते जगांतील सर्वांत चांगल्या कंपनी पैकी असून लवकरच त्यांचे मेसेंजर अँप येणार आहे.

हे वाचा : https://restofworld.org/2020/all-the-data-fit-to-sell/ [ Inside India's dark data economy ]

पिनाक's picture

12 Jan 2021 - 11:04 am | पिनाक

संपूर्ण सहमत

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

12 Jan 2021 - 12:24 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

---- उगाच मेक इन इंडिया आहे म्हणून काहीही मेसेंजर अप इन्स्टॉल करू नका.

या वाक्याशी सहमत. उगाच काहीही भारताचं म्हणून किंवा सेफ म्हणून काहीही इंस्टॉल करू नका. काही काळ वाट पाहूया. वाट्सप काही जीवनमरणाच्या प्रश्न नै ये.

भारतीय लोक, म्हणजे जगभरातले लोक तसेच असतील, काहीही व्हायरल करायला नंबर एक. दुसरं काहीच काम नाही. आलं की ढकल संप्रदायातले. आज सकाळी असंच एक दळण आलं. पूर्ण टाकत नाही.

"A poor villager's son from Uttar Pradesh who passed from IIT with a gold medal has created an app called Signal
.....

Also WhatsApp will be shut down in six months because their servers are not able to handle the traffic''

- Jai Hind -

अजून मधल्या मॅटरमधे इथे नासा आणि यूनेस्कोने पहिल्या क्रमांकाचे app म्हणून कसा गौरव केला वगैरे... च्यायला कसलं सुचतं लोकांना काहीही.
असो.

-दिलीप बिरुटे

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

12 Jan 2021 - 5:00 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

हा हा हा.
त्यात नासा/एम आय टी/गूगल वगैरेचे भारतियाना भन्नाट वेड आहे. १५/१६ वर्षपुर्वी उत्तर प्रदेशातील एका मुलाने 'लंडनला जाउन नासाची परीक्षा दिली आहे. अशीच परीक्षा अब्दुल कलाम ह्यानी दिली होती" अशी बातमी चॅनेल्सवर येत होती. तो मुलगा अर्थातच "गरीब शेतकर्याचा व नियमाप्रमाणे "उच्च शिक्षणासाठी पैसे नव्हते" वगैरे.
शेवटी खुलासा झाला- की मुलगा पैसे घेउन कुठेतरी मजा करयला गेला होता. पैसे संपल्यावर तोंड कसे दाखवायचे.. मग अशी ही कथा बनवली. आई वडिलानी ही कथा मग पत्रकाराना जशीच्या तशी सांगितली. स्थानिक पत्रकारानी मग ती देशभर नेली.

फुटूवाला's picture

15 Jan 2021 - 6:41 am | फुटूवाला

शनिवारी सुरु करून मंगळवारी गायब होणाऱ्या

मिसळपाव, सारखी स्वतःची साईट बनवायची.

हे सगळ्यात सेफ राहील, असे वाटते.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

12 Jan 2021 - 12:30 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मन:पूर्वक शुभेच्छा. इंजॉय.

-दिलीप बिरुटे

मुविकाका तो ही फार काही सेफ पर्याय नाही! शेवटी ती साईट कुठे तरी होस्ट करावी लागेल, आणि त्या होस्टिंग कंपनीला त्यांच्या सर्व्हर वरील डेटाचा पूर्ण access असेल. ती माहिती (मूल्यवान असेल तर) ते इतरांना विकू शकतातच की! अर्थात बराचसा खर्च करून स्वतःच्या सर्व्हरवर आणि जागेत ती साईट होस्ट केली तर नक्कीच डेटा सुरक्षित राहील म्हणा, पण एवढी हौस कोणाला असेल कि नाही काय माहित 😀
टीप: मी स्वतः वेब होस्टिंग सर्व्हिस प्रोव्हाइड करत असलो तरी कुठ्ल्य्शी ग्राहकाची कुठलीही माहिती इतरांना विकत/पुरवत नाही!

मुक्त विहारि's picture

12 Jan 2021 - 4:47 pm | मुक्त विहारि

घरच्या 100-200 माणसांसाठी, हे योग्य ठरेल.

सध्या तरी, आर्थिक दृष्ट्या, कितपत परवडेल? ह्याचा अंदाज घेत आहोत.

ही closed site असल्याने, virus येण्याची शक्यता कमी.

आपला डेटा कोणाच्या हातात पडतो त्यावर सगळे अवलंबून आहे/असेल. फार पर्सनल आणि सेन्सिटिव्ह माहिती शेअर करत नसतील त्यांनी चिंतीत होऊन व्हॉट्सॲप वापरणे बंद करणे मला तरी योग्य नाही वाटत. डेटा प्रचंड मौल्यवान वस्तू झाली आहे हे खरेच आहे आणि चुकीच्या व्यक्तींच्या हाती तो पडणे नक्कीच धोकादायक ठरू शकते. त्यामुळे जरा जपून वापर करणे श्रेयस्कर!
ह्यातले काही धोके दाखवणारा युट्यूब वरचा (The Return of Abhimanyu) हा dubbed सिनेमा अवश्य बघा, केवळ मसालेदार नसून बराच वास्तववादी आहे.

https://www.youtube.com/watch?v=REdVA3_ORk0

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

12 Jan 2021 - 12:39 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

जग अधिक सुंदर/सुरक्षित बनवणे, आंतर्जालाचा प्रसार करणे वगैरे बोलायच्या गोष्टी आहेत. फेसबूक असो टेलिग्राम.. तुमच्या व्यक्तिगत आवडी-निवडी व ईतर संभाषण data analytics कंपन्याना विकणे हाच त्यांचा पैसे मिळवण्याचा मार्ग आहे.मग रविवारी डोंबिवलीला मिटक्या मारत पिझा खाल्ल्ला की कल्याण-डोंबीवलीच्या पिझा हट्/डोमिनोझमधुन दर शनिवारी/रविवारी जीमेलवर येणार्या 'खास ऑफर्स' वाचायच्या.
त्यात जे जे मोफत ते सर्व उत्तम ही भारतीय मानसिकता. 'डोक्यावर कोणते तेल वापरतो ते 'साफ' होण्यासाठी कोणते एरंडेल वापरतो.. फुकट मिळतेय
म्हंटल्यावर भारतीय नागरिक कोणतीही माहिती देण्यास तयार असतात.

मुफ्त का चन्दन घिस मेरे नंदन

चौकटराजा's picture

12 Jan 2021 - 4:59 pm | चौकटराजा

इथली सर्व माणसे आपला डेटा इतका गुप्त ठेवण्यासाठी का झटत आहेत?जणू ही अँप्लिकेशन वापरण्यात काही सोय नाही ना आनंद ! एक पोस्टमन तुमचे कार्ड वाचू शकतो की नाही ? आपण या सर्व सोयींचा वापर घाणेरड्या हेतूसाठी केला तर आपल्याला काही त्रास होईल ना ? जाहिरातीचा मारा टीव्ही वर नसतो का ? मग त्याविरुद्ध आघाडी का नाही ? समजा मी समाजवादी विचाराचा आहे तर समाजवादाचे कट्टर शत्रू ती माहिती वापरून माझी सुपारी मारेकर्याना देण्याची शक्यता किती व ती असेलच तर ती १९७५ साली हे काहीच नव्हते त्यावेळी नव्हती का ? भारत देशात मतदान गुप्त असूनही कोट्यावधी लोक राजरोसपणे एखाद्या पक्षाचे सभासदत्व पत्करतात की नाही ? मग शिक्रेट काय राहिले ? आपण म्हंजे कोणीतरी व्हीही आय पी असून आपलली फळाची आवड निवड , कपड्याची आवड निवड , आवडता रंग ई माहिती कुणाला कळू नये त्यासाठी इतका आटापिटा काय म्हणून ? ती कळ ली तर काय फरक पडतो ? विवाह जमवून देणार्या संस्था तर आजकाल तुम्हाला अनुवांशिक जडण घडण कशी आहे हे ही विचारतात त्या इथे माहिती नाकारून पहा काय होते ते ! नोकरी करताय .. आपले छंद , इतर कला ,कसब याचा उल्लेख कशासाठी करता मग ?

मुक्त विहारि's picture

12 Jan 2021 - 5:12 pm | मुक्त विहारि

साध्या साध्या गोष्टींवरून, एखाद्या कुटुंबाची, गावाची, राष्ट्राची, मानसिकता समजू शकते.

एखाद्या राष्ट्राला कोंडीत पकडण्यासाठी, ह्याच सामान्य माणसाच्या मानसिकतेचा आढावा, घेतला जाईल.

जगाची शस्त्रे बदलत आहेत.

चौकटराजा's picture

12 Jan 2021 - 6:31 pm | चौकटराजा

ती मानसिकता पकडण्यसाठी फेसबुक चाच डेटा हवा कशाला.... ? भारतीय माणसाची मानसिकता भाविकतेच्या अंगाने जाते हे सूर्यप्रकाशाइतके स्वच्छा सत्य एक उदाहरण म्हणून पुरेसे आहे. ( नुकताच देवळे उघडावी म्हणून भक्तानी केलेला टाहो आपण पाहिलाच की ) स्थान महात्म्य...... ( तीर्थक्षेत्र ई ) काल महात्म्य ( मूहूर्त ई ) व्यक्ती महात्म्य ( फु शा आं ) याचे नाव भारतीय माणूस . ते झुकरबर्गचेच कशाला सान्गायला हवे ! भारतात भा ज पा ला कोणत्या जाती मते देतात हे फेसबुक नसल्यापासून लोकाना माहीत आहेच की ! भोगीला हरबरा महाग होतो ,खण्देनवमीला झेन्डू महाग होतो ,दिवाळी आली की खाद्यतेले महाग होतात ! अमुक अमुक पुढारी बोलतो एक मनात एक असा आहे ,तमुक पुढारी रोखठोक आहे ! कोण तेल लावलेला पैलवान आहे. राजकीय माणसान्च्या फायली एकमेकाकडे असतात त्यामुळे निर्णायक शिक्षा कुठल्याच राजकीय माणसाला होत नाही ! ( कॉमनवेल्थ गेम भ्रश्टाचारचे काय झाले ? ) लोकपाल चे काय झाले ? ही सारी सिक्रेट्स काय फेसबुक सान्गते का?

मुक्त विहारि's picture

12 Jan 2021 - 11:17 pm | मुक्त विहारि

फेसबुक वरील लेख वाचून, मते ठरवणारी खूप लोक आहेत...

Bhakti's picture

13 Jan 2021 - 1:02 pm | Bhakti

बरोबर

चौकटराजा's picture

13 Jan 2021 - 3:06 pm | चौकटराजा

फेसबुक प्राधान्याने लोक कशासाठी वापरतात ते पाहू !
१. मी अमुक अमुक होटेल मधे एन्जोय करतोय हे जगाला दाखविणे
२.माझ्या आईचा ,वडिलान्चा, मुलाचा मुलीचा पत्नीचा आमच्या लग्नाचा वाढदिवस जगाला कळावा म्हणून
३. आम्ही केलेली ट्रीप
४. आमचे गावाकडचे घर फार्म हाउन्स , शेतमळा जगाने पहावा म्हणून
५ आमची मान्जरी व्याली तिला दोन कन्या व दोन पुत्र झाले हे जगाला कळावे म्हणून
६. माझ्या केटरिग, रंगकाम म आकौंट रायटिन्ग ई ची जाहिरात फुकट करता येते म्हणून
७. पूर्वी कसे चान चान दिवस होते असा नोस्टाल्जियाचा राग आळवता यावा म्हणून
८ मी कारावके वर म्हटलेले गाणे ऐका मण्डळी , त्या बरोबर माझी मुलगी तीही कारवके वर गाणे म्हण्ते बरे हे दाखविण्यासाठी फेसबुक
९ आम्ही घेतलेला नवा अ‍ॅपलचा फोन माझ्या नवर्याने मला बर्थ्डे गिफ्ट म्हणून दिला हे सर्वाना कळावे म्हणून
१०. चित्पावन , लाख मराठा , सी के पी , इ जात हा बेस धरून केलेले ग्रूप .. त्यावर मला पूजेला भटजी हवेत, अम्बाजोगाईला रहायची काही सोय आहे का ? एकदा घरी गणपति ला हलवल्यावर त्याची आरती घाटावर करावी का ? शास्त्रात काय सान्गितले आहे ? कोकणस्थ असून बोडण नाही असे कोणाचे घराणे आहेच का असल्या चौकशा !
११ बबड्याला चांगला चोपला पाहिजे ते मला तर त्या येडपट आईच्याच कानाखाली वाजवाविशी वाटते येथवर स्वतः चा राग मोकळा करणे
१२ कळविण्यास आनन्द वाटतो की माझ्या चुलत भाचीचा साखरपुडा काल सम्पन्न झाला...... मग अभिनन्दनाची रान्ग.
१३. माझे आजोबा वयाच्या ९८ व्या वर्षी वारले ... मग आर आय पी किन्वा भावपूर्ण श्रद्धान्जलीची रांग
वरील तेरा आयटम मधे स्वतः ची मते बनवायला कुठे जागा आहे ........ ? की ज्या मतांमुळे मी एखादे सरकार उलथवू शकेन ? आपण लई मोठ्ठे आहोत हा ज्याचा गोड गैरसमज आहे त्याला मात्र मी यातून क्रांतिकारी कार्य करणार आहे असे वाटणे स्वाभाविक आहे !!
माझ्या परिचयातील व नात्यातील ९५ टक्के लोक फेसबुक वर फक्त वर्षाचा आपला वाढदिवस साजरा व्हावा व आपला अहन्कार त्यामुळे सुखावावा यासाठी मेम्बर झालेले आहेत ! मग यू "मेड माय डे .. असे घासून तयार झालेले वाक्य टाकायचे की मग शुभ दीपावली , ह्याप्पी न्यू यर साठी कधीतरी उगवायचे असा खाक्या असतो !

टवाळ कार्टा's picture

13 Jan 2021 - 9:29 pm | टवाळ कार्टा

यात पाउट, नवीन साडी, "फेबुफ्लेक्स"फेम सतरंज्या उचलणारे, एकदा केलेल्या ट्रिपची फोटोमधून दहादा झैरात करणारे हे सगळे अ‍ॅडवा :)

उपयोजक's picture

12 Jan 2021 - 10:57 pm | उपयोजक

प्रतिसाद नक्कीच विचार करण्यासारखा आहे.

लोकं पॅनिक का झालेत कारण whatsapp वाल्यांनी कमीतकमी सांगितलं तरी आहे आम्ही असा असा डेटा कलेक्ट करतो, त्याने लोकांना जरा शुद्धी आलीये

पूर्वी GDPR वगरे येण्याच्या आधी कसाही डेटा कलेक्शन करायच्या वेबसाईट आणि अँप्स.

बाकी किती तरी application एकतर unsecured आहेत आणि त्यांचे सर्व्हर कोणीपण होस्ट केलेले असतात मग डेटा लीक होणं इ. गोष्टी घडतात.

बऱ्याच वेळा ToS मध्ये न declare केलेला पण डेटा कलेक्ट केला जातो कंपन्यांकडून. Worst examples are Facebook and Google. मागच्या वर्षी पर्यंत तर गूगल असिस्टंट, cortana इ. चे रेकॉर्डिंग ऐकायला employees ठेवलेले expose झाल्यानंतर त्याचा consent गुगल आणि मायक्रोसॉफ्ट ने लोकांना पाठवलं आणि त्या एम्प्लॉईस ना रातोरात फायर केलं. असले खूप उदाहरणं सापडतील.

पण मग इतकाच स्वतः चा डेटा सेन्सिटिव्ह वाटत असेल तर मग Android/विंडोज सारखे क्लोजड सोर्स ऑपरेटिंग सिस्टीम वापरून घोर चूक करत आहात.

कुठलं का अँप्लिकेशन असेना, सेन्सिटिव्ह डेटा असा unencrypted पाठवू किंवा स्टोर करू नये (7-zip AES256, Bitlocker, VeraCrypt इ. वापरावं), android मध्ये सगळ्या अँप्स ना सगळ्या परमिशन न बघता देऊ नये इ. सध्या गोष्टी करणं सुद्धा पुरेसं असतं. हे डिजिटल हायजीन पाळलं पाहिजे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

12 Jan 2021 - 4:31 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

XX फाटली वाटतं सरळ सरळ त्यांची, म्हणून जरा ब्याकफुटवर आलेत आहेत असे वाटते.

चलो देर आये दुरुस्त आये म्हणू या.....!

-दिलीप बिरुटे

मुक्त विहारि's picture

12 Jan 2021 - 5:08 pm | मुक्त विहारि

मार्क झुकेरबर्ग, हा अतिशय हुषार मनुष्य आहे.

तुषार काळभोर's picture

12 Jan 2021 - 8:11 pm | तुषार काळभोर

यांच्या दोन्ही प्रतिसादाशी पूर्ण सहमत.

इतर बऱ्याच गोष्टींप्रमाणे प्रायव्हसी बाबतीत पाश्चात्य लोकांचं अंधानुकरण चालू आहे. WhatsApp, फेसबुक अन झुकेरबर्ग ला शिव्या घालणाऱ्यांपैकी निम्म्या लोकांना नक्की काय चाललंय अन त्याचे काय परिणाम होणार आहेत त्याची सुतराम कल्पना नाही.
आणि बाकी निम्मे privacy anxiety ने ग्रस्त झाल्यासारखे वागत आहेत.
आपली डिजिटल फुटप्रिंट आणि आपल्या "खाजगी" गोष्टी यात लोक गल्लत करतात.

प्रा डॉ यांच्या पहिल्या प्रतिसादात लिहिल्या नुसार तुम्ही इंटरनेट शी कनेक्ट झाला की तुमची गोपनीयता संपते. मग व्हॉट्सॲप वापरा किंवा नका वापरू. त्यांनी नवी पॉलिसी जाहीर करो वा गुपचूप डेटा गोळा करो. गुगल वापरा किंवा बिंग किंवा डकडकगो किंवा आणखी काही. सिग्नल किंवा डकडकगो तुम्हाला सांगून विकत नाहीत, एवढंच काय ते मानसिक समाधान. आपला मुलगा बाहेर मद्यपान करतो हे माहिती असून आपल्या समोर तर नाही ना करत, यात वाळूत डोकं खुपसलेल्या शहामृगासारखे आपण दुर्लक्ष करतो.

मी स्वतः समाज माध्यम वापरात नाही, पण ते त्यातून होणाऱ्या स्व पूजक लोकांना अन ९९% खोट्या माहितीच्या भडीमाराला वैतागून. बाकी गुगल वा व्हॉट्सॲप च्या बागुलबुवा ला घाबरण्यापेक्षा सध्यातरी त्यांचा उपयोगच होतोय.

अनन्त अवधुत's picture

13 Jan 2021 - 1:33 am | अनन्त अवधुत

करणदीप आनंद, Vice President, Head of Workplace at Facebook App यांनी आपल्या एका फेसबुक पोस्टद्वारे या बदलांबद्दल माहिती दिली आहे

PSA: Questions about WhatsApp?

After responding to a few hundred relatives and friends, figured it might be easier to...Posted by Karandeep Anand on Saturday, January 9, 2021

हा पोस्टचा दुवा

इंटरनेट वरती फक्त यु ट्युबच सोप्या पध्द्तिने चांगल राहलय व्यक्त होण्यासाठी,नवीन काही चांगल शिकायला..कारण तिथे व्हाटसपवर ,फेसबुकवर काकी,मावशी,आत्या फार हेरगिरी आणि कसले कसले मोठे मोठाले मेसेज करतात ;(,त्या पेक्षा दूरध्वनी केलेला चांगल ना. टेलीग्राम सध्या शिकतेय.व्यावसायिक संदेश वहनासाठी प्रत्येकाच स्वतंत्र सोफ्टवेअर पाहिजे.लॉकडाऊन पासून फेसबुकवर जाहिरातबाजीचा वीट आलाय.ब्राउसरहूनच फेबु पाहते.जवळच्या मित्रमैत्रिणींसाठीच व्हाटसप वापरते.आपल्या माहितीचा वापर जाहिरातीचा भडीमार करण्यासाठी होणार असेल तर नकोच हे सोशल मेडीया!!

-(हळूहळू सोशल मेडियापासून संन्यास घेऊ इच्छिणारी भक्ती)

मुक्त विहारि's picture

13 Jan 2021 - 1:27 pm | मुक्त विहारि

सहमत आहे

बर्‍याच विनोदी प्रतिक्रिया वाचल्या ! त्या वाचुन मला मिपावरचा हा [ हेल्मेटसक्ती ] प्रसिद्ध धागा आठवला ! वाचकांनी त्या धाग्याचा लुफ्त लुटावा ही विनंती ! :)))
असो...
व्हाॅट्स ॲपच्या एका प्रायव्हसी पॉलिसीमुळे त्यांनी स्वतःचीच कशी मस्त ठासुन घेतली ते पाहुन लयं आनंद झाला. तसेही टेक जायंट मोकाट सुटले आहेत हे आता आपल्या समोर असुन अगदी आरश्या सारखे स्पष्ट देखील दिसते. त्यात फेसबुक ची अपकिर्ती ही अधिक आहे. मुक्त विचार स्वातंत्र्याचा गळा घोटणे हे काही वर्षात याच टेक कंपन्यांनी केले आहे, तसेच युजर्सच्या व्यक्तीगत माहितीचा जमेल त्या मार्गाने [ भलेही तो चुकीच्या पद्धतीने / नीतिमत्ता फाट्यावर मारुन ] माग काढला आहे.
या निमित्त्याने लोकांमध्ये प्रायव्हसी या गंभीर विषया संबंधी जागरुकता वाढली या बद्धल मी व्हाॅट्स ॲप चे आभारच मानीन ! :)

ज्या लोकांना खरंच या विषयात रस असेल त्यांनीच खालील दुवे उघडण्याचे कष्ट घ्यावेत ही विनंती ! :-
‘If You Build for India, You Build for the World’: Signal Co-Founder Brian Acton on WhatsApp and Future of Private Messaging
The Underworlds Of Whatsapp
Big blow to WhatsApp! Several top company executives move their account to Signal

जाता जाता :- जर तुमचा जी-मेल आयडी तुम्ही अ‍ॅमॅझॉनच्या साईटवर दिला असेल तर तुम्ही खरेदी केलेल्या सामानाची यादीच गुगल [ जी-मेल ] बनवते, हे तुम्हाला ठावूक आहे का ? यावर अधिक माहिती मिळवण्यासाठी gmail purchase history असा सर्च करावा.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Jenny from the Block (Official Music Video) :- Jennifer Lopez

मुक्त विहारि's picture

13 Jan 2021 - 11:21 pm | मुक्त विहारि

मनापासून धन्यवाद

मुक्त विचार स्वातंत्र्याचा गळा घोटणे हे काही वर्षात याच टेक कंपन्यांनी केले आहे

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Zoo Zoo Zoobie Zooby... :- [ Dance Dance (1987) ]

उपयोजक's picture

13 Jan 2021 - 7:54 pm | उपयोजक

WhatsApp

चौकटराजा's picture

13 Jan 2021 - 8:54 pm | चौकटराजा

हे झाले तर समस्या काय आहे ? जो पर्यन्त मी नको त्या ठिकाणी जात नाही तो पर्यन्त मला गुगल मॅप ची मदतच होत असते असा माझा अनुभव आहे ! मी श्रीमंत असेन तर मला फालतू मोबाइलची जाहिरात माझ्या समोर आली तर का आवडेल ? मला भारी मोबाइलचीच जाहिरात हवीच असते ! फक्त सोशल मीडियामधून आर्थिक व्यवहार जो वर मी करीत नाही तोवर माझी कुठलिही माहिती मी अगदी ट्रम्प ला देखील थेट द्यायला तयार आहे !! मला तरी आतापावेतो अशा जाहिरातीच्या लिंक्स चा फायदाच झालेला आहे !! आता सुरक्षित्तेचे म्हणाला तर डिकास्टा म्हणतात त्याप्रमाणे कोणतीही मेल १०० टक्के सुरक्षित नाही ! मी त्यावर अशी पुस्ती जोडेन की मग पोस्टकार्ड चालू करा आणि पोस्टमन ते झाडाच्या सावलीत बसून वाचण्याचीही आपोआप सोय होऊ द्या !

गोंधळी's picture

13 Jan 2021 - 9:38 pm | गोंधळी

वरील गोष्टी या आधीपासुनच होत आहेत. सर्वात जास्त डेटा तर गुगल घेत आहे.
सरकारने यावर निर्बंध आणायला पाहीजे कारण आर्थिक बाबतीत हे धोकादायक आहे.

धर्मराजमुटके's picture

13 Jan 2021 - 9:37 pm | धर्मराजमुटके

मी व्हॉटसअ‍ॅप वापरायचे अगदी कमी करुन ते फक्त कामापुरतेच वापरतो. साधारण २-३ वर्षांपुर्वीच टेलिग्राम वापरणे चालू आहे व ते मला जास्त आवडते. व्हॉटसअ‍ॅप न आवडायचे कारण म्हणजे तिकडची मंडळी समोरच्याला अगदी सळो की पळो करुन सोडतात. फोन नाही लागला तर सरळ व्हॉटसप ऑडीओ/व्हिडिओ कॉल करतात. समोरच्याला आपला फोन घ्यायचाय की नकोय त्याची पण पर्वा नाही.
मात्र एखादा भारतीय कसा बाहेरच्या देशात गेला की शिस्तीत वागतो आणि भारतात आल्यावर कसा गाडीतून रस्त्यावर कचरा फेकतो अगदी तस्सीच मानसिकता व्हॉटसअ‍ॅप आणि टेलिग्राम वर आहे. म्हणजे व्हॉटसअ‍ॅप वर चाळे करणारा तोच माणुस टेलिग्राम वर अगदी शिस्तीत कसा वागतो हे कोडे मला अजुनही उलगडले नाही.

शिवाय लॉकडाऊन मधे टेलिग्राम ने भरपुर चित्रपट, मालिका बघण्याचा आनंद मिळवून दिला. त्यामुळे माझी पहिली पसंद पहिल्यापासूनच टेलिग्राम आहे. शिवाय हे मोबाईल वरुन काढून टाकले तरी डेस्कटॉप / लॅपटॉप वर चालूच राहते हा अजून एक फायदा.

उपयोजक's picture

14 Jan 2021 - 12:04 am | उपयोजक

टेलिग्रामचे दोन प्रमुख तोटे
१) चॅटींगसाठी टेलिग्राम वापरणार्‍यांची संख्या व्हॉटसअॅपच्या तुलनेत खूप खूप कमी आहे अजूनही.केवळ pdf वगैरे दस्तावेज आणि सिनेमांच्या लिंक्स यस दोनच गोष्टींसाठी टेलिग्राम सर्वाधिक वापरले जाते.
२) टेलिग्राम जेष्ठ नागरीकांसाठी वापरण्यास काहीसे किचकट आहे.

प्रकाश घाटपांडे's picture

14 Jan 2021 - 1:32 pm | प्रकाश घाटपांडे

मात्र एखादा भारतीय कसा बाहेरच्या देशात गेला की शिस्तीत वागतो आणि भारतात आल्यावर कसा गाडीतून रस्त्यावर कचरा फेकतो अगदी तस्सीच मानसिकता व्हॉटसअ‍ॅप आणि टेलिग्राम वर आहे. म्हणजे व्हॉटसअ‍ॅप वर चाळे करणारा तोच माणुस टेलिग्राम वर अगदी शिस्तीत कसा वागतो हे कोडे मला अजुनही उलगडले नाही.

मानसशास्त्रज्ञांनी यावर लिहिले पाहिजे

असे आहे की प्रेक्षकच नसतील किंवा फार कमी असतील तर नर्तक नृत्य कोणापुढे करणार? ;) शिवाय टेलिग्रामला काही असे सेटींग्ज आहेत की विशिष्ट शब्द सदस्याने टाईप केल्यास टेग्रा त्याला काढून टाकते किंवा काही दिवस लिहायला मनाई करते.

श्रीरंग_जोशी's picture

13 Jan 2021 - 10:21 pm | श्रीरंग_जोशी

मायक्रोसॉफ्ट्ने मराठी शीर्षक असलेले काय झालं अ‍ॅप काही वर्षांपासून सुरू केले आहे.

व्यावसायिकांसाठी सशुल्क दिसत आहे.
कुणी वापरले असल्यास अभिप्राय कळवावा.

YouTube,fscebook, WhatsApp,gmail .
Hya सर्व सुविधा फुकट देण्यात काही तरी उद्येश नक्कीच आहे.
जाहिराती आणि त्या मधून येणारा पैसा हे कारण फक्त सांगायला आहे.
खरा इन्कम तर वेगळ्याच मार्गाने होत असणार .
त्या मधील एक मार्ग म्हणजे डाटा विकणे.
सर्व लोकांची पर्सनल माहिती मिळवण्यासाठी अनंत ग्राहक आहेत.
एक उत्पादक कंपन्या आहेतच आणि राजकीय पक्ष पण आहेत.
अमेरिकेत fb नी निवडणुकीत ह्या माहितीचा वापर केला असा आरोप झालेला च आहे.
अशी पण Gmail सोडले तर बाकी ऍप काही गरज नाही.
असा विचार करणारी लोक असतात एकदा दारूचा व्यसनी असेल तर त्याला अजून फुकट दारू पाजा आणि पूर्ण व्यसनाच्या आहारी गेल्यावर त्याच्या मालमत्तेवर हक्क सांगा.
ही application हेच करत आहेत.

सतिश गावडे's picture

14 Jan 2021 - 7:40 pm | सतिश गावडे

त्या मधील एक मार्ग म्हणजे डाटा विकणे.

हो आपला डाटा विकणे हाच त्यांचा व्यवसाय असतो. If You're Not Paying for It; You're the Product.

डेटा विकणे नाही हो. डेटा वर प्रोसेसिंग करून ट्रेंड ठरवतात ते. आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरून तुम्ही काय आहात ते ठरवतात ते. तुमचं प्रोफायलिंग करतात. पुण्यात कोथरूड मध्ये रहाणारे मराठी म्हणजे जसं चितळे मधूनच मिठाई घेणार, तसं वेगवेगळ्या parameters वापरून तुमच्या खरेदीबद्दल, मतांबद्दल, खर्चाच्या पॅटर्न बद्दल, आवडी निवडींबद्दल ते अंदाज बांधतात आणि मग हा अंदाज तुमच्या भागातल्या, शहरातल्या, राज्यातल्या, देशातल्या कोट्यवधी लोकांचा काढून त्यातून ते कुठला बिझनेस कसा आणि कुठे वाढवता येईल याचा अंदाज विकतात. डेटा ला महत्व नाही, इंफॉर्मशन ला आहे.

सतिश गावडे's picture

15 Jan 2021 - 12:25 am | सतिश गावडे

बरं :)

टवाळ कार्टा's picture

14 Jan 2021 - 1:47 am | टवाळ कार्टा

कबुतरं वापरा, सगळ्यात बेष्ट :)

मुक्त विहारि's picture

14 Jan 2021 - 10:12 am | मुक्त विहारि

दुर्दैवाने, ज्या वेगात आणि ज्या निष्काळजी पणाने, आपण आपली वैयक्तिक माहिती, आंतरजालावर टाकत आहोत, ते बघता, हे पण दिवस दूर नाहीत.

जाॅन विक, चॅप्टर वन...

दुसरा पर्याय असा आहे की, स्वतःची साईट सुरू करणे.

उपयोजक's picture

14 Jan 2021 - 10:44 am | उपयोजक

चा धोका आहे.शिवात कबुतरांच्या शिटण्यामुळे श्वसनाचे त्रास होतात म्हणे.

Rajesh188's picture

14 Jan 2021 - 1:55 pm | Rajesh188

जेव्हा पासून fb WA च जन्म झाला आहे तेव्हा पासून हे हाच उद्योग करतात
आजच करत आहेत असे काही नाही
.. मुळात ह्या कंपन्यांचा जन्म च ह्या साठी झाला आहे.
आताच WA/fb चे धंदे बाहेर आल्या सारखी लोक react का होत आहेत.
कोणते भारतीय ऍप येत आहे का बाजारात?
देशप्रेम व्यक्त करायला असेल मुद्धे लागतात आपल्याला.
भारतीय ऍप आले तरी त्यांना WA/fb सारखेच वागावे लागेल तेव्हा ते फुकट सेवा देवू शकतील
सशुल्क केले तर लोक वापरणार नाहीत..
आणि
विकतचे देश प्रेम इथे कोणाला नको आहे.

गामा पैलवान's picture

14 Jan 2021 - 3:20 pm | गामा पैलवान

उपयोजक,

आजून थोडी वर्षं थांबलात तर हा निजीत्वभंग काहीच नाही असे शोध निघतील. नव्हे, निघालेच आहेत. त्याला आयोटी अर्थात Internet of Things म्हणतात.

या तंत्रज्ञानात खाजगी असं काहीही नसतं. ज्याच्यावर बारकीशी चिप चिकटू / रुतू शकते अशी कुठलीही वस्तू आंतरजालाशी जोडली जाऊ शकते. यांत अर्थात तुमचं शरीरही आलं. एव्हढंच नव्हे तर त्यात तुम्ही खात असलेल्या अन्नपदार्थांचा प्रत्येक घास, तुमची औषधं, एखाद्या कारणामुळे किंवा कारणाविना झालेला तुमचा मन:क्षोभ इंवा तुम्हाला झालेला आनंद, याची नोंद ठेवण्यात येईल. हो, तुमची विष्ठाही त्यांत आली. आणि तुम्ही किती मिलीलीटर वायू सोडलांत ते ही नोंदण्यात येणार.

वेलकम टू < ........ >. (गाळलेल्या जागा भरा.)

आ.न.,
-गा.पै.

स्वलिखित's picture

14 Jan 2021 - 4:42 pm | स्वलिखित

अन कबुतराने चिठ्ठी दुसऱ्याला दिली मजी

दुसरी पहिल्यापेक्षा जास्त पण सुन्दर असू शकते

उपयोजक's picture

14 Jan 2021 - 6:54 pm | उपयोजक

फेसबुक आपल्यावर लक्ष ठेवतंय, व्हॉट्स ऍप आता आपला डेटा स्टोअर करणार, मग आपल्या इंटरेस्टनुसार आपल्यावर जाहिरातींचा भडिमार होणार... हे सगळं ठीक आहे.
पण,
एखाद्या वेबसाईटवरून एखादा शर्ट घेतल्यावर परत परत तोच शर्ट समोर दिसावा ही आर्टीफिशियल इंटिलीजन्सची कोणती पातळी म्हणावी? कोण बसलंय तिथं प्रोजेक्टरच्या मागे? अरे वांग्या, बायकोसाठी एखादी साडी किंवा कुर्ता घेतल्यावर महिन्याभराने परत तीच साडी किंवा कुर्ता घेतला तर त्याचे परिणाम कळतात का तूला? त्या झुक्याला म्हणा, स्वतः च्या बायकोसोबत असं करून दाखव एकदा! मला सांगतोय..!
पुरुष मूर्ख असतात पण इतके नाहीत रे. काहीतरी व्हेरायटी दाखव लेका! निदान त्या फोटोतली बाई तरी बदल. एखाद्यावेळी त्याला भुलून परत तीच साडी घेऊ आम्ही. नाहीतर निदान नेत्रसुख तरी मिळेल.
बरं ते 'स्टॉप सीईंग धिस ऍड' केलं तर गूगल आपल्यालाच विचारतंय ऑलरेडी पर्चेस्ड का म्हणून!! रताळ्या, तूच बिल पाठवलंस ना मेलवर? गूगल पे वापरलं तर वीस रुपये कॅशबॅक हे गाजर पण तूच दाखवलं ना?
आणि हे म्हणे इंटेलिजंट!!
क्या इंटेलिजंट बनेगा रे तू ?
मला तर त्या ओला,उबेर अन झोमॅटोच्या जाहिराती सुद्धा कळत नाहीत. महिन्यातून जास्तीत जास्त एकदा मी ओलाकॅब वापरतो ही माहिती तर ओलाच्या त्या डेटाबेस का काय म्हणतात त्यात असेल ना! मग ट्वेन्टी परसेन्ट डिस्काउंटवाले मॅसेज दिवसातून चारवेळा मला पाठवण्यात काय हशील? ओला डिस्काउंट देतंय म्हणून कोणी गावभर भटकतं का? म्हणजे असे पण लोकं आहेत का जगात? असतील तर, कौन हैं ये लोग? कहा से आते है ये लोग?
एकदा पनीर टिक्का खाल्ल्यावर दुसऱ्यादिवशी परत पनीर कोण खातं? मग बेस्ट पनीर इन दी टाऊन वालं नोटिफिकेशन आज कश्यासाठी? आणि हे जर बेष्ट होतं तर काल का नाही खाऊ घातलंस रे झोमाट्या? की एकदा ह्या जोश्याच्या नरड्यात रबरासारखं पनीर कोंबल्याशिवाय हा काही सुधारणार नाही अशी काही सुपारी घेतलीये ह्यांनी?
रेड बस ह्या ऍपवरून समजा उद्याचं तिकीट बुक केलं तर बसमध्ये बसेपर्यंत दर एक तासाने रिमायन्डर येते. 'हॅव यु पॅक्ड युअर बॅग्स. डोन्ट फरगेट टू टेक वॉटर' असे मॅसेजेस येतात. अरे तुला काय करायचंय सोन्या? नसत्या चौकश्या! बरं समजा 'नो' असा रिप्लाय केला तर तू काय घरी येणार आहेस का कपड्यांच्या घड्या घालून द्यायला?
ही अजिबात अतिशयोक्ती नाहीये. याहून कहर म्हणजे 'चॅट विथ युअर को-पॅसेंजर' असे मॅसेजसुद्धा येतात. त्यात एक लिंक दिलेली असते. आयुष्यात कधीच न भेटलेल्या आणि परत कधीच भेटण्याची शक्यता नसलेल्या माणसाशी नेमक्या कोणत्या विषयावर बोलणं अपेक्षित आहे? "बाबा रे मी डब्ब्यात थालीपीठ घेतलंय. तू मेतकूट- भात घेऊन ये बरं का", हे बोलायचं का? मला एवढंच सुचू शकतं.बरं एखादी 'सुबक ठेंगणी' असती तर बोललोही असतो पण ती जमात आजकाल नामशेष झालीये.
असो. तर हे सगळं कस्टमरबेस मजबूत करण्यासाठी असतं असं कळलंय.
आता एखाद्या कस्टमरने ऑनलाइन मजबूत बत्ता मागवून स्वतः चा मोबाईल भुगा होईपर्यंत कुटला नाही म्हणजे मिळवलं!
समाप्त

©चिनार शशिकांत जोशी

उपयोजक's picture

15 Jan 2021 - 9:27 am | उपयोजक

डेटा सिक्युरिटी आणि सोशल नेटवर्कींग मधील मानसिक द्वंद्व. - भाग १ व २
-------------------------------------------
साधारणपणे कोणतीही सोशल मिडीया अ‍ॅप्लीकेशन्स मोफत असली तरी आपली थोडी माहिती गोळा करत असतात. याची परवानगी आपण जेव्हा ती अ‍ॅप्लीकेशन्स डाऊनलोड करतो तेव्हाच घेतलेली असते. पण या प्रत्येकाच्या काम करण्याच्या पद्धतीत आणि डेटा गोळा करण्याच्या पद्धतीत पुष्कळ फरक असतो.

व्हॉट्सअ‍ॅप हे इन्स्टंट मेसेजींग अ‍ॅप आहे की जे आपल्या फोन नंबरशी जोडलेलं असतं. आपण त्यामार्फत प्रायव्हेटली आणि ग्रुपमधे आपल्या मित्रमंडळींशी आणि कुटुंबियांशी गप्पा मारू शकतो. अल्पावधीतच याच्या युजर फ्रेंडली स्वरुपामुळे आणि वापरण्याच्या सोप्या पद्धतीमुळे हे अ‍ॅप खूपच पॉप्युलर झालं. आपण फोटो, व्हिडीओ शेअर करणार म्हणजे मग ते तर त्या अ‍ॅपला अ‍ॅक्सेस करता आले पाहिजेत म्हणून त्याची परवानगी घेतली जाते. तुम्ही तुमच्या संपर्कातील व्हॉट्सअ‍ॅप युजर्सशी चॅट करता, ग्रुप तयार करता म्हणून तुमचे कॉन्टॅक्ट्सही अ‍ॅक्सेस करण्याची परवानगी मागीतली जाते.

यात तुम्ही युजर नेम फेक लिहू शकता, स्टेट्स काहीही टाकू शकता त्यामुळे तुमची प्रायव्हसी धोक्यात येत नाही. आय पी अ‍ॅड्रेस घेणे हे देखील ठीक आहे. यात तुमचे पर्सनल चॅटींग हे एन्ड टू एन्ड एन्क्रिप्टेड असते. म्हणजेच व्हॉट्सअ‍ॅप ते वाचत नाही आणि सेव्ह देखील करत नाही. पण तुम्ही गुगल ड्राईव्ह वर बॅक अप घेतलात तर तो एन्क्रिप्टेड नसतो. पण व्हॉट्सअ‍ॅप तुमची माहिती कोणालाही शेअर करत नव्हतं. जरी शेअर केली तरी ती एकाकी असायची.

फेसबुक ही अशी सोशल नेटवर्कींग साईट आहे की जिथे तुम्ही तुम्हाला अपरिचित लोकांशी देखील इंटरॅक्शन करु शकता. लेख, छोटा मजकुर, फोटो, व्हिडीओज, लिंक्स शेअर करण्या बरोबरच फेसबुकचे गट, फेसबुक पेजेस देखील तयार करु शकता. आणि समविचारी, एकाच प्रकारची आवड असलेले लोक किंवा एकाच भागात रहात असलेले लोक एकमेकांशी कनेक्ट होतात. यातही बरेच बदल होत गेले आणि फेसबुकने आपण नक्की काय शेअर करतोय, कुणाशी शेअर करतोय हे पाहून त्या संबंधीची माहिती प्रोसेस करुन काही बिझनेसेसना शेअर करुन आपल्याला त्यासंबंधी जाहेराती दाखवण्यास सुरुवात केली.

पण हे तितक्यावरच थांबलं नाहीये. फेसबुक आपल्या पोस्ट्स देखील टेक्स्ट प्रोसेसींग अल्गॉरिदम्स वापरोन एखादं अकाउंट रिस्ट्रीक्ट करायचं की नाही हे देखील ठरवायला लागलेय. सहाजिक आहे फेसबुकचा डेटा एन्क्रिप्टेड नाहीये. पण फेसबुक मधे सेटींग्जमधे जाऊन आपण प्रायव्हसी सेटींग्ज अशी ठेवू शकतो की आपला सेन्सीटीव्ह डेटा अ‍ॅक्सेस केला तरी शेअर केला जात नाही. बरं तिथे देखील तुम्ही फेक युजर नेम वापरणं आणि खरी माहिती न टाकणं असं करु शकता. वारंवार तुम्ही तुम्ची हिस्ट्री डिलीट करु शकता म्हणजे ती माहिती फेसबुक शेअर करु शकत नाही.

२०१४ मधे फेसबुकने व्हॉट्सअ‍ॅप विकत घेतलं. त्यावेळी जरी त्यांनी हे सांगीतलं होतं की आम्ही दोनही अ‍ॅप्सचे स्वरुप स्वतंत्रच ठेवणार आहोत. त्यानंतर फेसबुकने अकाउंट सिक्युरीटी साठी ओटीपी पाठवणे यासाठी म्हणून फोन नंबर्स फेसबुक अकाउंट्सना जोडून घेतले. म्हणजे वेब व्हर्जन आणि फेसबुक अ‍ॅप एकमेकांशी व्यवस्थीत कम्युनिकेट करतील. यातच डिमॉनेटायझेशन मुळे २०१७ पासून ऑनलाईन आणि डिजीटल पेमेंट्स वाढले. त्यात अनेक ई-कॉम्र्स कंपन्या निघाल्या. तसेच डिजीटल पेमेंट्स साठी अ‍ॅप्स देखील निघाली. गुगल पे जसं अलं तसंच व्हॉट्सअ‍ॅप पे पण आलंय. लोक ऑनलाईन खरेदी जास्त करु लागलेत.

व्हॉट्सॅप हे इन्स्टंट मेसेजींग अ‍ॅप असल्याने त्यावर बिझनेस ट्रॅन्झॅक्शनचे मेसेजेस यायला लागले. म्हणजे फेसबुक वरील जाहीराती वरुन तुम्ही काही खरेदी केलंत तर त्याचं पेमेंट वेगवेगळ्या डिजीटल पेमेंट्सच्या माध्यमातून होते. हेच पेमेंट जर व्हॉट्सअ‍ॅप पे च्या माध्यमातून झाले तर ...... तुम्ही तुमच्या बॅंक अकाउंटचे डिटेल्स त्यावर देत असता. गुगल पे मधे देखील हेच आहे. इथे सगळे प्रॉब्लेम्स चालू होतात. कारण तुमच्या अकाउंटमधले तुमचे डिटेल्स म्हणजे तुमचं नाव आणि अकाउंट नंबर खरे असतात. तुमचा मोबाईल नंबर बॅंकेच्या अकाउंटशी जोडला गेलेला आहे. त्यामुळे तुम्ही कितीही प्रयत्न केलात तरी तुमची आयडेंटीटी तुम्ही लपवु शकत नाही. दोन तीन गोष्टी एकाच फोन नंबर ला जोडल्या असतील तर त्या व्यक्तीचे खरे नाव शोधायला काही सेकंद पुरेशी.

बरं तुम्ही खरं नाव आणि खरी माहिती ठेवली असली तरी जेव्हा व्हॉट्सअ‍ॅपची माहिती (तुम्ही कोणाशी कितीवेळ चॅट करता, तुम्ही कोणाला कितीवेळा कॉल करता, तुमचे कॉन्टॅक्ट्स, ग्रुप मधील मेसेजेस एन्क्रिप्टेड नसतात त्यामुळे त्या द्वारे मिळालेली माहिती, तुमचे आर्थिक व्यवहार जर व्हॉट्सअ‍ॅप पे वापरत असाल तर, बिझनेसेसची माहिती जर बिझनेस व्हॉट्सअ‍ॅप वापरत असाल तर) जर फेसबुकला मिळाली तर फेसबुकला जॅकपॉटच लागेल. तुमच्या माहितीचा तुमच्याच विरुद्ध वापर होऊ शकतो. विविध प्रकारे आणि विविध गोष्टींची एकाच व्यक्तीची माहिती जेव्हा एकाच ठिकाणी मिळते तेव्हा टेक्स्ट प्रोसेसींग वापरुन संगणकाला मशीन लर्निंगच्या माध्यमातून खूप काही शिकता येते.

हातात असलेल्या माहितीचा कसाही आणि कुठेही वापर केला जाऊ शकतो. (अगदी देशांचे पॉलीटीक्स मॅनेज करण्यापासून ....केंब्रिज अ‍ॅनालॅटीका आठवलं का?, ते तुमची माहिती आंतर्राष्ट्रीय एजन्सीज पर्यंत पोहोचवणे काहीही घडू शकते. एकदा एखादी गोष्ट वापरण्याची आपल्याला सवय झाली की आपण त्यात विशेषत: व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप्स मधे अगदी छान छान आयडीयाज पासून ते बरेच काही चर्चा करतो. आत्ता व्हॉट्सअ‍ॅप आपल्या पर्सनल चॅट्सचं एन्क्रिप्शन काढत नाहीये पण आत्ता जसं डेटा शेअर करण्यासाठी परवानगी देण्यास सगळ्यांना भाग पाडलं जातंय तसं काहीसं भविष्यात केलं जाणार नाही याची काहीही खात्री देता येत नाही. त्यामुळे वेळीच सावध होणं गरजेचं आहे.

एन्ड टू एन्ड एन्क्रिप्शन आणि ओपन सोर्स या दोन संकल्पना अतिशय महत्वाच्या आहेत. एन्ड टू एन्ड एन्क्रिप्शन म्हणजे एखादा मेसेज आपण कुणाला पाठवला तर तो जेव्हा त्या अ‍ॅप्लीकेशनच्या मधुन जातो तेव्हा त्याचं रुपांतर ० आणि १ यांच्या अतिशय रॅन्डमली तयार केलेल्या कोड मधे कन्व्हर्जन होते जे डिकोड करणं खूप अवघड असतं. मग तो कोडेड मेसेज त्या अ‍ॅपच्या सर्व्हर्वर टेंपररीली सेव्ह केला जातो. एकदा का तो मेसेज दुसर्या एन्डला डिलीव्हर झाला की तो डिलीव्हर होतानाच डिक्रीप्ट होतो आणि ज्याला मेसेज पाठवला आहे त्याला तो दिसतो. काही काळ हे त्या लोकल सर्व्हरवर सेव्ह करतात पण नंतर डिलीट करुन टाकतात जर तुम्ही बॅक अपची परवानगी दिली असेल तर मात्र ते डिलीट करत नाहीत. फक्त ते एन्क्रिप्टेड फॉर्म मधेच रहातं.

*ओपन सोर्सचा अर्थ सगळाच डेटा ओपन असून तो कुणालाही शेअर होतो असा नाहीये.* जेव्हा संगणक प्रणाली चालू झाल्या त्यावेळी प्रत्येक प्रोग्रॅम, सॉफ्टवेअर हे प्रोप्रायटरी असायचं. म्हणजेच कुणाच्या ना कुणाच्या तरी मालकीचं असायचं. पण याला अनेक जण वैतागले कारण त्याच त्याच गोष्टींसाठी वेगवेगळे लोक आपापले प्रोग्रॅम्स लिहीत होते. त्यामुळे सगळीकडे एकप्रकारचे स्टॅग्नेशन आलेले होते. यातूनच ८० च्या दशकाच्या शेवटी ओपन सोर्स चळवळ उभी राहीली. यामधे लोक आपण लिहीलेले सॉफ्टवेअर प्रोग्रॅम्स ओपन सोर्स मधे ठेवायचे. याचा अर्थ असा की तो प्रोग्रॅम कुणीही वापरु शकतो आणि त्यावर मॉडीफीकेशन करुन ते देखील ओपन सोर्स मधे टाकू शकतो. यात देखील आता बरेच प्रोटोकॉल्स आलेले आहेत. सगळं इथे सांगणं शक्य नाही. पण जेव्हा ओपन सोर्स आहे असं म्हणतात तेव्हा ते सॉफ्टवेअर सगळ्यांसाठी खुलं असतं. पण ते सॉफ्टवेअर वापरुन जे अ‍ॅप्लीकेशन तयार केलं जातं त्याच्या टर्म्स कशा ठरवल्या आहेत त्याप्रमाणे त्यातील डेटा वापरला जातो.

उदाहरणार्थ: अ‍ॅन्ड्रॉईड सॉफ्टवेअर हे ओपन सोर्स आहे. पण ते ज्या मोबाईल कंपनीमधे वापरलं जातं त्या कंपनीकडे त्या मोबाईलच्या वापरकर्त्याचा डेटा जातो. अ‍ॅपल ही कंपनी अशी आहे की ती आपलंच सॉफ्टवेअर आपल्याच हार्डवेअर मधे वापरते. सगळं एकत्र विकते. ग्राहक पैसे मोजताना त्यासगळ्याचे पैसे मोजतो. विंडोज हे मायक्रोसॉफ्टने तयार केलेले पेड सॉफ्टवेअर आहे. त्याचा वापर करण्यासाठी ग्राहकांना पैसे मोजावेच लागतात. पण एखादं अ‍ॅप्लीकेशन जर ओपन सोर्स सॉफ्टवेअर वापरुन एखादी कम्युनीटी हॅन्डल करत असेल म्हणजे आधीच टर्म्स मधे ठरलेलं असेल की या अ‍ॅप्लीकेशनचा डेटा कुणा बरोबरही शेअर केला जाणार नाही किंवा कुणालाही विकला जाणार नाही. तर तो डेटा सिक्युअर असतो.

सिग्नल हे अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅपच्याच फाउंडर मेंबरने तयार केले आहे. फेसबुकने व्हॉट्सअ‍ॅप विकत घेतल्यावर वर्षभरातच त्याचे आणि झुक्याचे वाद झाले आणि तो बाहेर पडला. त्याने हे ओपन सोर्स सिग्नल आणले आहे. की जे एन्ड टू एन्ड एन्क्रिप्टेड आहे. म्हणजे सिग्नलचे नुसते पर्सनल मेसेजेसच नाहीत तर ग्रुप चॅट्स आणि बॅक अप्स देखील एन्क्रिप्टेड असतात. त्यामुळे जर ती माहिती त्या अ‍ॅप कडुन कुठेच वाचली जात नाहीये तर ती शेअर करण्याचा प्रश्नच येत नाही. सिग्नलमधे अजुनही ब्रॉडकास्ट लिस्ट किंवा स्टेटस वगैरे आलेलं नाहीये. व्हॉट्सअ‍ॅप मधील अनेक फीचर्स नाहीयेत. पण सिक्युअर मेसेजींग साठी सिग्नल उत्तम आहे. सिग्नल्स हे इन्स्टंट मेसेजींग अ‍ॅप अगदी व्हॉट्सअ‍ॅप सारखंच आहे आणि ओपन सोर्स आहे......त्यांनी आधीच जाहीर केलेलं आहे की आम्ही कोणताही डेटा स्टोअर करत नाही आणि कुणालाही आम्ही डेटा विकत नाही.

टेलीग्राम मधे बॅक अप एन्क्रिप्टेड नाहीये बाकी पर्सनल चॅट्स एन्क्रिप्टेड आहेत. बाकीच्या बर्याचशा फीचर्स व्हॉट्सअ‍ॅप सारख्याच आहेत. ते आपला काही बेसीक डेटा अ‍ॅक्सेस करत असले तरी कुणालाही शेअर करत नाहीयेत किंवा विकत नाहीयेत. हा प्लस पॉईंट आहे. यात थोडं फेसबुक सारख्या सोशल नेटवर्कींगसाईटचे फीचर्स आहेत. म्हणजे पब्लीक ग्रुप्स, पब्लीक प्रोफाईल्स असतात की ज्या तुम्ही फॉलो करु शकता.

व्हॉट्सअ‍ॅपने हे पाऊल ई-कॉमर्समधे एन्ट्री या दृष्टिने उचललं आहे. पण सगळेच व्हॉट्सॅप युजर्स व्हॉट्सॅप पे किंवा बिझनेस व्हॉट्सअ‍ॅप वापरत नाहीत. मग व्हॉट्सअ‍ॅप त्यांच्या प्रायव्हसीवर गदा का आणतंय? यामुळेच व्हॉट्सअ‍ॅप डिलीट करणंच सोयीचं आहे आणि आपल्या मित्रमंडळींसकट टेलीग्राम किंवा सिग्नलवर किंवा दोनही वर शिफ्ट होणं शहाणपणाचं आहे. नंतर कोणतं जास्त सोयीचं आहे हे ठरवता येईल. यात नमस्ते भारत सारखं अ‍ॅप देखील आहे पण ते सगळा डेटा गुगल ला देतंय. उपयोग काय? त्यामुळे केवळ स्वदेशी म्हणून तिथे जाण्यात अर्थ नाही. खरं तर आपल्या देशात इतके सॉफ्टवेअर इंजिनीअरींगमधले किडे करणारे लोक असताना सिग्नलचा सोर्स कोड वापरुन आपल्या भारतीयांसाठी एखादं अ‍ॅप बनवायला काय हरकत आहे जे सिग्नल सारखंच काम करेल? या अ‍ॅप्सच्या वापरकर्यांमधे भारतीयांची संख्या सर्वाधिक आहे. त्यामुळे एकतर आपली इतकी ताकद दाखवली पाहिजे की व्हॉट्सॅप-फेसबुक सारख्या जायंट्स ना आपलं म्हणणं मान्य करावंच लागेल......नाहीतर आपण आपलं काही तयार करावं.

सध्या सर्वत्र डेटा शेअरींग काही नविन नाही, आपण ते फुकट वापरतोय तर त्यांचा हक्क आहे आणि आपल्याच चांगल्यासाठी वापरणार आहेत किंवा व्हॉट्सअ‍ॅपने ते अनिवार्य केलेलं नाही अशा प्रकारच्या पोस्ट्स फिरत आहेत. यातील बरीच आर्ग्युमेंट्स फोल आहेत. व्हॉट्सअ‍ॅपचा तो कंपल्सरी अ‍ॅक्सेप्ट करावयास लावणारा मेसेज अजुनही येतोच आहे. त्यामुळे अशा मेसेजेसना फसु नका. सरळ व्हॉट्सअ‍ॅपवरुन सिग्नल किंवा टेलीग्रामवर शिफ्ट व्हा. मी तरी तेच करणार आहे. इतर बिझनेस टायकुन्स देखील त्यांच्या ट्विट्स मधुन हेच सांगत आहेत.

*डॉ.अपर्णा लळिंगकर*

डेटा सिक्युरिटी आणि सोशल नेटवर्कींग मधील मानसिक द्वंद्व - भाग २
----------------------------------------
व्हॉट्सअ‍ॅपने अचानकपणे त्यांच्या नविन प्रायव्हसी पॉलीसीचा बॉंबगोळा टाकल्याने बराच गदारोळ उठला. अनेकांनी चुकीची माहिती व अर्धवट माहिती शेअर केली आणि त्यामुळे जे आधीपासून गोंधळलेलेच होते त्यांच्या गोंधळात भरच टाकली गेली. वास्तविक पाहता आपण जेव्हा एखादी गोष्ट वापरावयास सुरुवात करतो तेव्हा हळूहळू का होईना पण त्याविषयीची योग्य माहिती घेणं अत्यंत गरजेचं असतं नाहीतर आज जशी अनेकांची परिस्थिती झाली आहे ते होत असतं.

एकूणच हे सगळं वाचत असताना आणि लोकांच्या प्रश्नांची उत्तरे शोधत असताना स्मार्टफोनच्या बाबतीत काही गोष्टी लक्षात आल्या आहेत. ज्या सगळ्यांनी समजुन घेणे गरजेचे आहे म्हणून लिहीत आहे. मुळात स्मार्ट फोन फारशी माहिती करून न घेता वापरला तर लोकं स्मार्ट ऐवजी बुद्धु बनतात. म्हणजे डिव्हाईस आणि अ‍ॅप्स स्मार्ट बनत जातात व ते वापरुन लोक बुद्धु बनुन आपला डेटा (सर्व प्रकारचा) शेअर करत राहतात. मग म्हणून स्मार्टफोन वापरायचाच नाही का? तर त्याचं उत्तर स्मार्टफोन वापरा फक्त स्मार्टली वापरा. म्हणजे काय ते पुढे दिलेलं आहे.

SMART चा एक लॉंगफॉर्म Self - Monitoring, Analysis, And Reporting Technology असा आहे. मग हे सेल्फ मॉनीटरींग हे ते वापरत असलेल्या व्यक्तीचा डेटा गोळा करुन मग त्या डेटाचे अ‍ॅनालीसीस करुन व रिपोर्टींग करुन केले जाते. त्यामुळे कोणत्याही स्मार्टफोन मधे आपण जेव्हा ते डिव्हाईस वापरत असतो तेव्हा काही डेटा हा ते अ‍ॅप वापरण्यासाठी अनिवार्य असतो म्हणून त्याची परवानगी घेऊन तो डेटा वापरला जातो. उदाहरणार्थ: जर आपण ओला चे अ‍ॅप्लीकेशन वापरत असू तर त्याला आपलं लोकेशन शेअर करणे अत्यावश्यक आहे.

तसंच व्हॉट्सअ‍ॅप किंवा सिग्नल वापरायचं असेल तर आपले कॉन्टॅक्ट्स शेअर करणे क्रमप्राप्त आहे. त्याचप्रमाणे जर तुम्ही कॅमेरा, मिडीया, मायक्रोफोन आणि स्टोअरेज याच्या अ‍ॅक्सेसची परवानगी दिली तरच तुम्ही या इन्स्टंट मेसेजींग अ‍ॅप्सचा उपयोग फोटो/व्हिडीओ काढून पाठवणे, इतरांनी पाठवलेले सेव्ह करणे आणि इतरांनी पाठवलेले इतरांना पुढे पाठवणे या गोष्टी करु शकतात. पण त्यासाठी फोनचा अ‍ॅक्सेस, लोकेशनचा अ‍ॅक्सेस, एसएमएस चा अ‍ॅक्सेस देण्याची गरज नसते. त्यामुळे गरज नसलेल्या परवानग्या देऊ नयेत. यागोष्टी आपण कोणतेही अ‍ॅप नक्की कशासाठी डाऊनलोड करुन घेत आहोत याचा विचार करुन ठरवावे.

तुमचा फोन जेव्हा कोणत्याही मार्गाने (वाय-फाय, ब्रॉडबॅंड किंवा डेटा पॅक) इंटरनेटला जोडला की सगळे अ‍ॅप्स सर्व्हिस प्रोव्हाईडरच्या माध्यमातून आपलं लोकेशन अ‍ॅक्सेस करतातच ......ते कितीही नाही म्हणत असले तरी. पण त्यांना ते शेअर करण्याचा अधिकार नाहीये. पण तरी ते बेकायदेशीरपणे एकमेकांत हे शेअर करत असतात. मग तसं होत असेल तर व्हॉट्सअ‍ॅप त्यासाठी आत्ताच ८ फेब्रुवारीच्या आत परवानगी का मगतंय? त्याला कारण आहे. आत्तापर्यंत युजर्सच्या डेटा प्रोटेक्शन संदर्भात भारतात कडक कायदे नव्हते. त्यामुळे हे लोक बेकायदेशीरपणे डेटा शेअर करुन प्रायव्हसीचं उल्लंघन करत असले तरी त्यांना शिक्षेसाठी भारतीय कायद्यात तरतूद नव्हती. येत्या संसदीय अधिवेशनात भारतातील युजर्सचा डेटा प्रोटेक्ट करण्या संदर्भात युरोपीयन युनियन सारखा कडक कायदा पास केला जाणार आहे. ते साधारणपणे ८ फेब्रुवारी नंतरच होणार आहे.

म्हणून व्हॉट्सअ‍ॅप आणि फेसबुक या कायद्याच्या तडाख्यातून स्वत:ची कातडी वाचविण्यासाठी आम्ही युजर्सची परवानगी घेतली आहे असे भासविण्यासाठी आपल्याला त्यांची नविन प्रायव्हसी पॉलीसी स्विकारण्यास भाग पाडत आहेत.अधिकाधिक युजर्सना ह्या तांत्रिक गोष्टी माहिती नसतात त्यामुळे आणि अर्धवट माहिती पसरविणारे आपल्याकडे कमी नाहीत त्यांच्यामुळे नाहीतरी काय आपला डेटा घेतला जातोच आहे तर आता पॉलीसी स्विकारली तर काय फरक पडतो? असे चुकीचे समज करुन घेतात. तुम्ही पॉलीसी स्विकारली तर तुमचा डेटा फक्त तुम्हाला पर्सनलाईज्ड जाहिराती दाखविण्यासाठी वापरला जातो असे नाही तर इतरही अनेक गोष्टींसाठी वापरला जातो. खाली काही उदाहरणे देत आहे:

उदा १) जेव्हा तुमचा लॉग डेटा (तुम्ही कुणाशी कितीवेळ आणि कधी चॅटींग केलंत, तुम्ही कुणाला कधी आणि किती वेळा कॉल केलत, किती वेळ त्या व्यक्तीशी बोललात), तुमचं लोकेशन हे व्हॉट्सअ‍ॅपकडुन फेसबुक कडे जाईल त्यावेळी फेसबुककडे तुमचं फेसबुकमधे अकाउंट असेल तर तिथून मिळालेली माहिती असणार जसे तुम्ही कोणती पेजेस लाईक केलीत, तुम्ही कोणत्या राजकीय विचार धारेशी निगडीत आहात, तुम्ही कोणत्या धर्माला फेव्हर करता इ. याचबरोबर फेसबुक्ची टेक्स्ट प्रोसेसींग आणि मशीन लर्निंग अल्गॉरिदम्स आता तुम्ही तुमच्या पोस्ट मधे काय लिहीत आहात हे देखील वाचून (संगणक प्रोग्रॅमच्या सहाय्याने) त्यातील आक्षेपार्ह की-वर्ड्स, किंवा कोणी रिपोर्ट केलेले शब्द अथवा पोस्ट्स हे सगळं प्रोसेस करतं.

त्याचबरोबर जर तुमचं इन्स्टाग्राम मधे अकाउंट असेल तर तिथली माहिती देखील शेअर होतेच. म्हणजे फेसबुककडे आता तुमच्या विषयी केवढी माहिती गोळा झालेली आहे याची कल्पना तुम्हाला आलेली असेलच. मशीन लर्निग अल्गॉरिदम्स वापरुन याचा विविध हेतू साध्य करण्यासाठी वापर केला जाऊ शकतो. केंब्रिज अ‍ॅनालाटीकाला फेसबुकने भारतीय वापरकर्त्यांचा डेटा विकलेला होता. केंब्रिज अ‍ॅनालाटीकाला भारतातील एका राजकीय पक्षाने लोकसभा निवडणुकीच्या काळात समाजमाध्यमांचा वापर करुन समाजमन त्यांना हवं त्याप्रमाणे वळविण्यासाठी पैसे दिलेले होते. यातूनच मग फेक कंटेंट तयार करुन ते त्या त्या प्रकारची विचारधारा असलेल्या, कुंपणावर असलेल्या अशा सर्वांना दाखवुन समाजमनाचे मॅन्युप्युलेशन केले होते.

२) नुकतीच एप्रिल २०२० मधे टिक टॉकने असंच काही केलेलं होतं. ज्यावेळी तबलिगी जमातीच्या अधिवेशनाला आलेले काही परदेशी नागरिक मार्च एन्डला अधिवेशन संपल्यावर परत न जाता देशात इतरत्र विखुरले आणि त्यातील बर्याच जणांना कोविडची लागण झालेली असल्याचे स्पष्ट झाल्यावर देशभरात याविषयी नाराजी पसरली होती. कारण तोपर्यंत आपल्याकडे कोविडचं प्रमाण कमी होतं. याच भावनांचा गैरफायदा टिक टॉकने घेऊन बरेच व्हिडीओज काही लाख युनिक युजर्समधे शेअर केले. त्या व्हिडीओज मधे जाळीची टोपी घातलेले मुसलमान तरुण कोरोना वगैरे सगळं खोटं आहे, हे देखील सीएए आणि एनआरसी सारखंच सरकारने तयार केलेलं आहे अशा आशयाची गाणी गात तोंडावरील मास्क काढून फेकून देऊन एकमेकांच्या गळ्यात गळे घालताना दाखवलेले होते. जेव्हा या व्हिडीओजची फॉरेन्सीक तपासणी केली गेली तेव्हा असे लक्षात आले की हे व्हिडीओज पाकीस्तानात तयार केलेले होते आणि त्याचे हिंदी डब करुन ते एका प्रोफेशनल सॉफ्टवेअर एडीटरने एडीट करुन व्हिडीओला हिंदी भाषेत्तील गीत किंवा आवाज जोडलेला होता. याचा परिणाम आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. भारतातील अनेक मुसलमान बांधव मिसगाईड होऊन मास्क वापरत नव्हते, बाजारपेठांमधे प्रचंड गर्दी करत होते........सोशल डिस्टन्सींग पाळत नव्हते.

३) नुकत्याच अमेरिकेत ज्या घडामोडी झाल्या त्यातील काहींचा सोशल मिडीयाशी संबंध आहे. यात मी ट्रंप समर्थक बरोबर की चूक यासाठी हे उदाहरण देत नाहीये. गैरसमज नको. ट्रंप हरले आणि म्हणून त्यांनी त्यांच्या ट्विटर आणि फेसबुक वरुन देखील ही इलेक्शन्स चोरलेली गेली आहेत आणि पुन्हा निवडणुका घेतल्या जाव्यात असं म्हंटलं होतं. त्यासाठी त्यांचे समर्थक अमेरिकेच्या संसद भवनात घुसले आणि मोडतोड करण्यास सुरुवात केली. पण त्यानंतर ट्रम्प यांनी त्विटरवरुन लोकांना शांतता राखण्याचं आवाहन केलं. पण ट्विटर, फेसवुकची अकाउंट्स अचानक डिलीट केली गेली हे कारण देऊन की त्यांनी देशात दंगली घडवल्या. त्याचबरोबर अमेरिकेत ट्विटर सारखं दिसणारं पार्लर हे अजुन एक सोशल मिडीया अ‍ॅप आहे की जे ट्रंप समर्थकांत प्रसिद्ध होतं. अ‍ॅपल आणि गुगल प्ले स्टोअर मधून हे अ‍ॅप अचानक डिलीट केलं गेलं आणि पार्लरची वेबसाईट जी अ‍ॅमेझॉन होस्ट करत होतं ती वेबसाईट देखील डीलीट केली गेली.

अमेरिकेतील निवडणुकांचा इतिहास पाहिलात तर ज्या ज्या वेळी कोणी रिपब्लिकन उमेद्वार निवडुन आला आहे त्या त्या वेळी अमेरिकेत दंगे झालेले आहेत. पण लिबरल्सच्या मते त्या चळवळी होत्या. अगदी २०१६ मधे देखील ट्रंप सत्तेत आल्यावर डेमोक्रॅट पक्षाच्या समर्थकांनी त्या विरोधात दंगे केलेले होते. जॉर्ज बुश सत्तेत आले होते तेव्हा देखील असेच दंगे झालेले होते. म्हणजे आपल्या मनासारखं झालं नाही तर दंगे करायचे ही मानसिकता अमेरिकन लोकांमधे आहेच. हे काही फक्त ट्रंप हरले म्हणून झालं असं नाहीये. पण सोशल मिडीया जायंट्स नी तातडीने ट्रंपची अकाउंट्स डिलीट केली आणि ट्रंप समर्थक सर्वाधिक ज्या ठिकाणी आहेत असे अ‍ॅपही डिलीट केले.

म्हणजे याला फ्रिडम ऑफ एक्सप्रेशनची हत्या असं म्हणता येऊ शकतं पण ते डेमोक्रॅट्स समर्थकांनी केलेलं सल्याने ते देशाच्या सुरक्षेच्या कारणासाठी केलेली कारवाई या सदरात मोडलं. आता पार्लरवर सर्वाधिक ट्रंप समर्थक आहेत हे कसं समजलं? तर त्या वापरकर्त्याच्या डेटा वरुन समजलं. जेव्हा २०१६ मधे हिलरी हरल्या होत्या आणि ट्रंप जिंकले होते तेव्हा त्यांना रशियाने जिंकून दिलं होतं असं डेमोक्रॅट्सचं म्हणणं होतं. तर आता बायडेन जिंकले तर त्यांना चीनने जिंकून दिलंय असं रिपब्लिकनांचं म्हणणं आहे. सत्य कधीच बाहेर येणार नाही. पण यातून आपल्याला एक धडा घेता ये ईल की हे सोशल मिडीया जायंट्स फक्त पैशाशी आपली लॉयल्टी दाखवत असतात. त्यासाठी ते फ्रिडम ऑफ एक्स्प्रेशन देखील अशा प्रकारे हिरावून घेऊ शकतात. आणि आपला डेटा देऊन आपणच त्यांना ही ताकद पुरवत आहोत.

सोशल मिडीयातील युजर डेटाचा वापर हा राजकीय सत्ता उलथवण्यासाठी देखील करुन घेतला जाऊ शकतो, दंगे भडकावण्यासाठी केला जाऊ शकतो. याचाच अर्थ आपला डेटा जेव्हा शेअर होतोय त्याच्या वापरावर कायद्याने निर्बंध नसतील तर आपला युजर डेटा हे या जायंट्स साठी सोन्याची खाण ठरु शकतं. मग हा डेटा देशद्रिह्यांना विकून त्याचा गैरवापर करुन देशाची कायदा व सुव्यवस्था धोक्यात आणली जाऊ शकते. डेटाचा वापर फक्त जाहिरातीं पर्यंत सिमीत नाहीये. गुगलला आपली सर्वाधिक माहिती असली तरी गुगल हे सोशल मिडीया जायंट नाहीये. त्यामुळे त्यांच्याजवळील डेटा ते फक्त जाहिरातींसाठीच वापरतात. पण सोशल मिडीयामधील डेटामुळे लोकांच्या भावना आणि मानसिकता यांचे मॅन्युप्युलेशन होऊ शकते.

व्हॉट्सअ‍ॅपने कितीही स्पष्टीकरणाची ठिगळं जोडून वापरकर्त्यांचा विश्वास संपादनाचा प्रयत्न केला तरी ते अर्ध सत्य सांगत आहेत हे देखील तितकेच खरे आहे. तुम्ही त्यांची नविन पॉलिसी नीट वाचा. आपले पर्सनल चॅट मेसेजेस हे एन्क्रिप्टेड असल्याने ते ते वाचणार नाहीतच पण डेटा लॉग, लोकेशन ही माहिती तर ते चोरत आहेतच आणि त्याचा गैरवापर कसा केला जाऊ शकतो याची उदाहरणे वर दिलेली आहेत. त्यामुळे ते आधीपासून चोरत आहेत तर आता त्यांना ते कायदेशीरपणे घेऊ द्या असे म्हणण्यात मूर्खपणा आहे.

आता सिग्नल मधे असं काही होण्याची शक्यताच नाहीये. त्याचं कारण असं की सिग्नल ही ना नफा ना तोटा या तत्वावर चालणारी ओपन सोर्स चळवळीच्या तत्वांवर तसेच देणग्यांवर चालते. तसेच सिग्नल हे अ‍ॅप अमेरिकन क्रिप्टोग्राफर ब्रायन अ‍ॅक्टन यांनी बनवलेलं आहे. ते एन्ड टू एन्ड एन्क्रिप्टेड असल्याने त्यांच्याकडे कोणताही डेटा सेव्ह होत नाही. टेंपररी सेव्ह केलेला डेटा हा एन्क्रिप्टेडच असतो. अगदी त्यांचे चॅट लॉग्ज, कॉल लॉग्ज हे देखील एन्क्रिप्टेड असतात. त्यामुळे ते कोणताही डेटा ते विकत नाहीत आणि भविष्यात विकण्याची शक्यता नाही.

फक्त तुम्ही सिग्नल अ‍ॅप डाऊनलोड करुन घेताना एक पथ्य पाळायचं. ते म्हणजे सिग्नल मधे अकाउंट उघडताना आपला मोबाईल नंबर आणि ओटीपी व्हेरीफीकेशनचे सोपस्कार झाले की ते तुम्हाला पिन जनरेशनचा ऑप्शन देतात. तेव्हा पिन जनरेट करायचा आणि मगच पुढे जायचं. तुम्ही पिन जनरेट न करताच पुढे गेलात तर तुम्ही मेसेज पाठवताना तुम्हाला एक नोटीफीकेशन येते की "सिग्नल अ‍ॅपला तुमच्या एसएमएसचा डिफॉल्ट ऑप्शन बनवा". असा मेसेज येण्यामागचं कारण असं की तुमच्या कडे पिन जनरेट केलेला नसल्याने तुमचा मेसेज एन्क्रिप्शनच्या लूप मधे शिरूच शकत नाही. आणि मग सिग्नल तुम्हला एसएमएसचा पर्याय देतं की जो नॉर्मल फोन मधुन देखील आपण करु शकतो.

हा जनरेटेड पिन तुमचा डेटा एन्क्रिपशन मधे महत्वाची भूमिका बजावतो. तसेच जर तुम्हाला एका डिव्हाईसवरुन दुसर्या डिव्हाईसवर सिग्नल टाकायचं असेल तेच अकाउंट ठेवून तर तुमची माहिती जशी च्या तशी ट्रान्सफर करण्यासाठी हा पिन उपयोगी पडतो. हा पिन जनरेट केल्यावर त्याच्या बरोबरच तुमची अजुन एन्क्रिप्टेड माहिती जोडून एक लॉंग टर्म की बनवली जाते जी लोकली तुमच्या डिव्हाईसवर साठवली जाते. जेव्हा तुम्ही सिग्नल वापरुन चॅट करता, कॉल करता किंवा काहीही शेअर करता .....ती माहिती या लॉंग टर्म की मार्फत एन्ड टू एन्ड एन्क्रिप्ट होते म्हणजेच ० आणि १ च्या रॅण्डमली जनरेट केलेल्या कोड मधे रुपांतरीत होते.

एका इस्रायली कंपनीने सिग्नलचा सर्व्हर हॅक केल्याचा दावा केलेला होता पण हा एन्क्रिप्टेड कोड इतका स्ट्रॉंग असतो की तो हॅक जरी झाला तरी डिकोड करणं प्रचंड अवघड असतं. तो फक्त तुम्ही ज्या व्यक्तीला मेसेज पाठवलाय त्या व्यक्तीच्या डिव्हाईसवर डिलीव्हर होताना डिक्रिप्ट होतो आनि त्याच्या मूळ स्वरुपात तुमच्या संपर्काला दिसतो. हेच ग्रुप चॅटच्या बाबतीतही आहे. त्यामुळेच सिग्नल हे अ‍ॅप वापरण्यास अतिशय सुरक्षित आहे. आता आपला वापर (आपल्या डेटा मार्फत) देशद्रोही शक्तींना करु देण्याची परवानगी द्यायची की सिग्नल सारखं अ‍ॅप वापरायचं हे आता आपणच ठरवा. सूज्ञास अधिक सांगणे न लगे.

*डॉ. अपर्णा लळिंगकर*

मुक्त विहारि's picture

15 Jan 2021 - 12:30 pm | मुक्त विहारि

माहिती बद्दल धन्यवाद

जसं एका व्यक्तिला मन असते तसेच संपुर्ण समाजाला असते त्याला "समाजमन" असे म्हणतात, समाजमन आणि त्याचा कल जाणुन घेउनच पुढारी लोक मते आपल्या पारड्यात पाडायला बघत असतात , पुर्वी समाजमन जाणुन घेण्यासाठी त्यांच्याशी संवाद साधणे त्यांचा फिडबेक घेणे व त्याची गोळाबेरीज लावणे एवढेच काय ते होते , मग ह्यातुन निवडणुका आणि प्रचारपत्र ठरायची , परंतु हे काम जितकी जास्त लोकसंख्या तितके कटकटीचे होते ,
हे काम आता सोशल मिडियाने खुप सोपे करुन ठेवले , लोक स्वताहुन आपले जनमत गोळा करुन देऊ लागले , त्याचे विश्लेशन करायचे ( उदा - राम मंदिराच्या फेवरमध्ये किती टक्के भारतिय आहेत हे फेबु आणि इन्स्टा वरुन सहज काढ्ता येइल , कसे काढणार , कोण कढणार , किती रुपयात काढणार सगळी चर्चा सगळीकडेच झाली आहे )),आणि निवडणुकीला उभे रहायचे , विषय संपला !! पन एढ्यावरही नाही भागले तर काय , समाजमन आपल्या बाजुने बनवायचे !! कसे ?? तर जाहिरातींचा भडीमार करुन !! हे एका गावापुरते मर्यादित नाही तर पुर्ण देशाला लागु पडते,
पण काय जर हेच विश्लेशन इतरांच्या विरोधात वापरले तर खुप काही विचित्र घडु शकते , यातुन मोठी जिवित आणी वित्त हाणी सुधा होऊ शकते
हिटलरने असेच समाजमनात बिंबवले होते कि ज्यु लोकना मारल्याने पाप लागत नाही , नाझीवाद , आणि नरसंहार घडुन आला ,

म्हनुन आपली वयक्तिक माहिती सोशिअल करणे वाटते तितके सोपे नाही , कोण जाने उद्या हिच माहिती असा नरसंहार करण्यासाठी वापरली गेली तर ...
https://www.misalpav.com/node/47722

उपयोजक's picture

16 Jan 2021 - 11:56 am | उपयोजक

अखेर WhatsApp ची माघार; तीव्र विरोधानंतर नवीन प्रायव्हसी पॉलिसी स्थगित.

सोशल मीडियावरील संवादाचे सर्वाधिक लोकप्रिय माध्यम असलेल्या WhatsApp ने अखेर माघार घेतली आहे. व्हॉट्सअ‍ॅप ने नवीन प्रायव्हसी पॉलिसी पुढील तीन महिन्यांसाठी लांबवणीवर टाकण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे व्हॉट्सअ‍ॅप युझर्सना दिलासा मिळाला आहे. आता, 8 फेब्रुवारीला कोणत्याही युझरचे अकाऊंट बंद होणार नाही. नवीन वर्षात व्हॉट्सअ‍ॅपने नवीन प्रायव्हसी पॉलिसी जाहीर करत जगभरातील कोट्यवधी युझर्सना धक्का दिला होता. यानुसार, नवीन पॉलिसी मान्य न केल्यास 8 फेब्रुवारी 2021 पासून व्हॉट्सअ‍ॅप अकाऊंट बंद होईल, असा इशारा देण्यात आला होता.

मात्र, यानंतर जगभरातील युझर्सनी या नवीन प्रायव्हसी पॉलिसीला जोरदार विरोध करण्यात आला. तसेच व्हॉट्सअ‍ॅपवर नाराजीही व्यक्त करण्यात आली. मात्र, चौफेर होणारी टीका आणि विरोधानंतर व्हॉट्सअ‍ॅपने आता एक पाऊल मागे घेत नवीन प्रायव्हसी पॉलिसी स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. फेसबुकची मालकी असलेल्या व्हॉट्सअ‍ॅपने या निर्णयाची घोषणा करताना सांगितले की, नवीन प्रायव्हसी पॉलिसी मान्य करण्यासाठी दिलेली मुदत मागे घेण्यात येत आहे. 8 फेब्रुवारी 2021 रोजी कोणत्याही युझरचे अकाऊंट बंद किंवा डिलीट करण्यात येणार नाही. व्हॉट्सअ‍ॅप गोपनियता आणि सुरक्षेवर कशापद्धतीने काम करते, याविषयी स्पष्टता आणणार आहोत. चुकीची माहिती आणि पसरलेले गैरसमज दूर करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.

15 मे 2021 रोजी व्यावसायिक पर्याय उपलब्ध करण्यापूर्वी नवीन प्राइव्हसी पॉलिसीबद्दल जाणून घेण्यासाठी हळूहळू युझर्सपर्यंत पोहोचणार आहोत, असे व्हॉट्सअ‍ॅपने स्पष्ट केले आहे. व्हॉट्सअ‍ॅपवरील डेटा पूर्वीपासूनच फेसबुकसोबत शेअर केला जात होता. परंतु, व्हॉट्सअ‍ॅपवरील जवळपास सर्वच माहिती फेसबुक आणि इंस्टाग्रामसोबत शेअर केली जाण्याच्या संभ्रमामुळे युझर्समध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. त्यामुळे सिग्नल आणि टेलिग्रामसारख्या स्पर्धकांकडे अनेक युझर्स वळले. याचा मोठा फटका व्हॉट्सअ‍ॅपला बसला. या पार्श्वभूमीवर अखेरीस व्हॉट्सअ‍ॅपने नवीन प्रायव्हसी पॉलिसी लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, नवीन प्रायव्हसी पॉलिसीबाबत काही दिवसांपूर्वी व्हॉट्सअ‍ॅपकडून विस्तृत स्पष्टीकरण देण्यात आले होते. व्हॉट्सअ‍ॅपद्वारे मित्रांसह कुटुंबाशी होत असलेले चॅटिंग पूर्णपणे सुरक्षित आहे. तुमच्या गोपनीयतेला कोणताही धोका नाही. नवीन प्रायव्हसी पॉलिसी ही बिझनेस अकाऊंट समोर ठेवून तयार करण्यात आली आहे. WhatsApp कोणत्याही युझर्सचे मेसेजेस पाहू शकत नाही किंवा केलेल्या कॉल्समधील संभाषण ऐकू शकत नाही. एवढेच नाही, तर शेअर केलेले लोकेशनही पाहू शकत नाही. फेसबुकही नाही, असेही व्हॉट्सअ‍ॅपने यापूर्वी स्पष्ट केले होते.

चौथा कोनाडा's picture

20 Jan 2021 - 5:49 pm | चौथा कोनाडा

या संबधी आणखी एक वृत्त. याचा नक्की काय फायदा होईल सांगता येत नाही.
ग्राहक आणि सेवादाता व्हाट्सऍप मधील कमर्शियल व्यवहार असेल तर केंद्र सरकार कितपत विरोध करू शकेल हाच प्रश्न आहे.

व्हाट्सऍपचे गोपनीय धोरणातील बदल केंद्र सरकारला अमान्य

खबो जाप's picture

3 Mar 2021 - 7:58 am | खबो जाप

https://casparwre.de/blog/stop-using-google-analytics/

The way Google turns data into gold ingots is as follows:

Step 1: Google collects as much data about you as it can.
Step 2: Google uses this data to get to know you very very well: what you like, what you don’t like, whether you are pregnant, whether you are gay, where your friends live, where you spend your time, what you purchase online.
Step 3: Google uses its extensive knowledge of you to show you advertising that fits you like a tailor-made suit.
Step 4: Lots of gold ingots.
It’s called surveillance capitalism and it’s certainly not about giving you a great user experience, it’s about making money.

कायप्पा चेपु वगैरे न वापरणार्‍याची सुद्धा या कचाट्यातून सुटका नाही. तुमच्याजवळ मोबाईल असणे सुद्धा पुरेसे आहे. परवाच माझी सून ऑफिसात असताना इतर दोन बायका काही वस्तूंच्या खरेदीबद्दल बोलत होत्या. सुनेच्या मोबाईलच्या मायक्रोफोनने त्या संभाषणाचा वेध घेतला आणि तिच्या मोबाईल वर लगेच अमेझॉन - युट्यूबवर त्या वस्तूंच्या जाहिराती दाखल झाल्या. बच के कहां जाओगे ?

मोबाईचे दोन्ही कॅमेरे तर सतत हेरगिरी करत असतातच. कोणत्या प्रकारचे फोटो विडियो वगैरे बघताना (मजकूर वाचताना सुद्धा असेल कदाचित) तुमच्या बुब्बुळांची हालचाल आकुंचन प्रसरण वगैरे कसे होते त्यावरून तुमची आवड-निवड टिपली जात असते. या प्रकारचे काम हीच माझ्या एका नातेवाईकाची नोकरी आहे.

फक्त फोनसाठी एक वेगळा साधा फोन जवळ ठेऊन स्मार्ट फोन बंद करून ठेवणे आणि दिवसातून फक्त एकदोनदा उघडून बघणे असे केले जाऊ शकते.