हा शब्द बोलीभाषेतुन आला काय

शकु गोवेकर's picture
शकु गोवेकर in काथ्याकूट
20 Oct 2020 - 12:10 am
गाभा: 

सध्या या चर्चेला वाट फुटली आहे का हे माहीत नाही पण घटस्फोट हा शब्द आपल्या भाषेत कसा आला असावा
जर शंभर वर्षांपूर्वीची पुस्तके कदाचित वाचनात अली तरीसुद्धा घटस्फोटाची माहिती दिसत नाही
दिग्गज लेखकांच्या लेखनात बहुतेक याला काडीमोड असे नाव असावे
समाजशाश्त्री लोकांनी मुद्दामहून हा टाळला तर नसेल
पूर्वी न्याय दालनात याला काय म्हणाले असतील घटस्फोट का इतर दुसरा शब्द --
आपणास काय वाटते आणि इतिहास काय सांगतो
हा सामान्य विषय म्हणून पाहावे वैयत्तिक काहीही नाही

प्रतिक्रिया

सामान्यनागरिक's picture

20 Oct 2020 - 12:27 pm | सामान्यनागरिक

कायद्याच्या भाषेत याला विवाह-विच्छेद म्हणत असावेत.

नित्यानंद मिश्र ह्यांच्या मते घटस्फोट किंवा कुठलाही तत्सम शब्द संस्कृत शास्त्रांत नाही. कौटिलीय अर्थशास्त्रांत "मोक्ष" असा शब्द वापरला जातो तो सुद्धा असुरी विवाहा साठी. त्याशिवाय महिलेला सोडले तर तिला परित्यक्ता म्हटले जाते.

घटस्फोट हा शब्द कोंकणीत बुडकुलो-फार म्हणून भाषांतरीत केला जातो. कन्नड भाषेंत सोडचित्तीं म्हटले जाते तर गुजरातीत सुद्दा काडी मोड प्रकारचा शब्द आहे. घटस्फोट हा कुणाच्या तरी सुपीक डोक्यांतून आलेला शब्द आहे असे वाटते. स्फोट हा शब्द बोली भाषेंतील असावा असे वाटत नाही तर संस्कृत प्रचुर वाटतो. स्फोट शब्द पाणिनी ह्यांच्या अष्टअध्यायांत आहे आणि भृताहारी ह्यांनी त्यावर मोठे भाष्य लिहिले होते. शब्द ऐकून मनांत ज्या भावना प्रकट/निर्माण होतात त्याला स्फोट असे म्हणतात. मराठींत स्फोट ह्याचा अर्थ ब्लास्ट असा होतो हा त्या संस्कृत शब्दाशीच संबंधीत असावा असे वाटते.

घटस्फोट हा शब्द इतर संदर्भांत धर्मसिंधू मध्ये आहे. कधी कधी जिवंत व्यक्ती चा सुद्धा अंत्यसंस्कार केला जाऊ शकतो (म्हणजे प्रतीकात्मक पद्धतीने खरोखरच्या चितेवर चढवून नव्हे) आणि ह्यांत एक घट घेऊन तो फोडण्याचा विधी आहे. काही तरी मोठ्या पापाचे प्रायश्चित म्हणून हे कार्य केले जाते.

माझे पैसे "घटस्फोट" हा शब्द कुणी तरी एका व्यक्तीने लग्नाच्या संदर्भांत सर्वप्रथम लिहून प्रसिद्ध केला आहे ह्यावर आहेत !

काडीमोड हा शब्द १००% आदिवासी बोली भाषांतून मराठीत आला आहे.

चौथा कोनाडा's picture

20 Oct 2020 - 1:24 pm | चौथा कोनाडा

रोचक चर्चा.
वाचत आहे.

मला वाटते गुजरातीत "छूटा छेडा" असा शब्द आहे.

प्रचेतस's picture

20 Oct 2020 - 1:36 pm | प्रचेतस

मोल्सवर्थ शब्दकोशात घटस्फोटाचा अर्थ पुढीलप्रमाणे दिला आहे.

घटस्फोट ghaṭasphōṭa m (S Breaking a pitcher.) The ceremony of ejecting irreversibly a person from caste: also of concluding an offender to be dead and disposing of him accordingly.

शिवाय लग्नाच्या वेळी मंगल कलश (घट) आणला जातो, त्याद्वारेच पाणीग्रहण होते. काडीमोड झाला म्हणजे तो कलश फुटला असाही अर्थ ह्या शब्दामागे असावा.

चौथा कोनाडा's picture

22 Oct 2020 - 5:59 pm | चौथा कोनाडा

शिवाय लग्नाच्या वेळी मंगल कलश (घट) आणला जातो, त्याद्वारेच पाणीग्रहण होते. काडीमोड झाला म्हणजे तो कलश फुटला असाही अर्थ ह्या शब्दामागे असावा.

नविन माहिती समजली !

चौथा कोनाडा's picture

22 Oct 2020 - 5:59 pm | चौथा कोनाडा

शिवाय लग्नाच्या वेळी मंगल कलश (घट) आणला जातो, त्याद्वारेच पाणीग्रहण होते. काडीमोड झाला म्हणजे तो कलश फुटला असाही अर्थ ह्या शब्दामागे असावा.

नविन माहिती समजली !

धर्मराजमुटके's picture

20 Oct 2020 - 2:47 pm | धर्मराजमुटके

काडीमोड हा शब्द सध्याच्या काळात सर्वस्वी चुकीचा वाटतो. पुर्वी काडी मोडावी इतक्या सहजतेने विवाह संबंध विच्छेद करणे सोपे असावे. आता ते कदाचित लोखंडाइतके कठीण असावे म्हणून कोणी तो शब्द वापरत नसावेत असा एक अंदाज.

Gk's picture

20 Oct 2020 - 3:36 pm | Gk

आता सळी वाकवा असा शब्दप्रयोग वापरला पाहिजे

अंतयेष्टीमध्ये घटस्फोट म्हणून एक विधी असतो, त्यामध्ये पाण्याने भरलेला घडा खांद्यावर घेऊन 3 प्रदक्षिणा घालून तो घट जमिनीवर टाकून फोडला जातो.
अर्थ - तुझा माझा संबंध आता संपला, तू आता तुझ्या मार्गाने पुढे जा, मागच्या लोकांमध्ये अडकू नको असा काहीतरी आहे

या शब्दाचा संदर्भ तिथेच जातो.

सोत्रि's picture

23 Oct 2020 - 4:34 am | सोत्रि

हे लॅाजिकल वाटते आहे!

- (घटस्फोट शब्दाच्या उगमाबद्दल उत्सुक असणारा) सोकाजी

शकु गोवेकर's picture

21 Oct 2020 - 12:17 am | शकु गोवेकर

पूर्वी पुरुषप्रधान विचारांमुळे न्यायालयात महिलाना बरोबर माप मिळाले नसेल
समजा अमॅझॉनचे मालकांनी काडीमोड दिला तर कोट्यवधी ची भरपाई द्यावी लागेल
पण त्यांच्या जागी एक बाई मालकीण आहे नवरा कमवीत नाही
तर नवरोबाला पोटगी दिली जाईल का -
भारतामध्ये हे होईल किंवा झाले आहे का --

> तर नवरोबाला पोटगी दिली जाईल का -

अमेरिकेत हो !

भारतांत ठाऊक नाही.