फोटोयुक्त लेखनाची नवी रेसिपी

टर्मीनेटर's picture
टर्मीनेटर in तंत्रजगत
1 Oct 2020 - 11:01 pm

.field-items img {border: 1px solid #669999;}

नमस्कार मिपाकरांनो,

मिपावर लेखनात फोटो समाविष्ट कसा करावा? हा प्रश्न वारंवार विचारला जातो. वास्तविक ह्या विषयावर खाली दिलेले दोन उपयुक्त धागे मिपावर उपलब्ध आहेत.

मिपावर चित्रे टाकण्याची कृती - डॉ. सुहास म्हात्रे
गूगल ड्राइव'वरचे फोटो, ओडिओ, विडिओ वेबसाईटवर देणे - कंजूस

परंतु तरीही काही कारणांमुळे जसे की गुगल नियमितपणे आपली वेब आणि मोबाईल apps अपडेट करत असल्याने लेखनात फोटो समाविष्ट करण्यात अनेक मिपाकरांना अडचण येते. ती अडचण दूर करण्यासाठी स्क्रीनशॉट्स सहित, शक्य तेवढ्या सोप्या भाषेत एक ट्युटोरीयलवजा लेख लिहिण्याचा प्रयत्न करतोय.

ह्या लेखात आपण गुगल फोटोज आणि फेसबुक वरून फोटो समाविष्ट कसा करावा ह्याची माहिती घेऊ. अर्थात विशिष्ठ विषयावरील लेखात द्यायचे फोटो, स्क्रीनशॉट्स, आकृत्या इत्यादी कोणी फेसबुकवर पोस्ट करत नसल्याने त्यासाठी शक्यतो गुगल फोटोजचा पर्याय वापरावा आणि प्रवास (पर्यटनस्थळे), उत्सव, समारंभ, स्वनिर्मित कलाकृतींचे फोटो जे सहसा फेसबुकवर पोस्ट केले जातात ते तेथून समाविष्ट करणे उत्तम.

गुगल फोटोज वरून फोटो समाविष्ट कसा करावा:

१) सर्वप्रथम आपल्या डेस्कटॉप, लॅपटॉप, टॅब्लेट किंवा मोबाईलच्या ब्राउझर मधे https://photos.google.com ही साईट उघडून तिथे लॉगीन करावे. ह्या लिंक वर क्लिक केले तरी चालेल ती नवीन टॅब मधे उघडेल.

[ टॅब्लेट किंवा मोबाईल मधील आणि आपल्या डेस्कटॉप, लॅपटॉप वरील (install केलेले असल्यास ) गुगलचे Photos हे App उघडू नका, त्यात फोटोची डायरेक्ट लिंक मिळवण्याची सुविधा आता उपलब्ध नाही. ]

२) आता टॉप बार वरील उजवीकडे दिसणाऱ्या upload button वर क्लिक करून जे फोटो लेखात द्यायचे असतील ते अपलोड करा. (ते आधीच अपलोड केलेले असतील तर पुन्हा करायची आवश्यकता नाही.)

३) डेस्कटॉप, लॅपटॉप, टॅब्लेटच्या डाव्या बाजूला असलेल्या साईड बार मधून आणि फोन वापरत असाल तर टॉप बार वरील ☰ ह्या मेनू च्या चिन्हावर क्लिक करून यादीतील Albums हा पर्याय निवडा.

menu

४) डेस्कटॉप, लॅपटॉप, टॅब्लेटच्या स्क्रीन वर दिसणाऱ्या Create album वर क्लिक करा.

create album

आणि मोबाईल वर albums च्या शेजारच्या छोट्या चौकटीतील + चिन्हावर क्लिक करा.

upload button2

५) आता Add a title येथे नवीन अल्बम साठी हवे ते नाव लिहा. (इथे मी उदाहरणासाठी Tutorial असे नाव दिले आहे.)

title

त्यानंतर उजवीकडील वरच्या कोपऱ्यातील वर क्लिक केल्यावर Options सिलेक्ट करून Link sharing समोरील स्लायडर उजवीकडे सरकवून लिंक शेअरिंग ऑन करा, नंतर मध्ये दुसरी पॉपअप विंडो उघडेल ती बंद करा.

slider

असे केल्यावर खालीलप्रमाणे अल्बमच्या नावाखाली Shared असे लिहिलेले दिसेल, ते दिसणे अत्यंत महत्वाचे आहे अन्यथा लेखात फोटो दिसणार नाहीत.

shared

आता त्याच पानावर खाली दिसणाऱ्या + Select photos ह्या बटणावर क्लिक केल्यावर जे पान उघडेल त्यावरील सुरुवातीला आपण अपलोड केलेले फोटो किंवा आधीपासून तेथे असलेले फोटोज सिलेक्ट करा.

select photos

(फोटो सिलेक्ट करण्यासाठी थंबनेलच्या डाव्या कोपऱ्यात वरच्या बाजूला अस्पष्ट वर्तुळ दिसेल त्यावर क्लिक करा. थंबनेलचा आकार फोटोच्या आकारानुसार वेगवेगळा असू शकेल.)

selected

हवे असलेले फोटोज सिलेक्ट करून झाल्यावर वरती उजव्या कोपऱ्यातील Done ह्या बटणावर क्लिक करा.

६) तुमचा शेअर्ड अल्बम आता तयार झाला आहे, त्यातला लेखात समावेश करायचा असलेला फोटो त्याच्या थंबनेल वर क्लिक करून उघडा, आणि त्या पूर्ण पणे उघडलेल्या फोटोवर वर राईट क्लिक केल्यावर जे पर्याय दिसतील त्यातून Copy Image Location अथवा Copy image address हा पर्याय निवडला कि त्या फोटोचे Image URL क्लिपबोर्ड मधे कॉपी होईल. (वरील क्रिया करताना Copy Image हा पर्याय निवडू नये!)

७) आता हे कॉपी केलेले Image URL मिपावर लेखन करत असलेल्या टेक्स्ट एडिटरच्या वरच्या टूलबारच्या डाव्या कोपऱ्यातील Insert/edit image ह्या बटणावर क्लिक करून त्यातल्या Image URL समोर पेस्ट करा.
Width x Height येथे फोटोची लांबी आणि उंची नमूद करा. उदा. landscape फोटो साठी 600 X 450 आणि portrait साठी 450 X 600.
Alternative text येथे समजा काही तांत्रिक कारणाने फोटो लोड नाही होऊ शकला तर त्या ऐवजी दिसेल असा शब्द लिहा. उदा. झाडाचा फोटो असेल तर त्याठिकाणी झाड किंवा Tree असे लिहावे.

insert or edit image

एका पेक्षा जास्ती फोटो असतील तर हीच कृती परत परत करावी.

फेसबुक वरील फोटो समाविष्ट कसा करावा

मोबाईल,टॅब्लेट,डेस्कटॉप, लॅपटॉप साठीच्या Updated App मधे डायरेक्ट लिंक मिळवण्याची सुविधा नसल्याने,
डेस्कटॉप, लॅपटॉप, टॅब्लेट किंवा मोबाईलच्या ब्राउझर वर https://www.facebook.com ही साईट उघडून तिथे लॉगीन करावे.
(टॅब्लेट किंवा मोबाईलच्या ब्राउझर settings मधून Desktop site हा पर्याय निवडावा अन्यथा डायरेक्ट लिंक मिळू शकत नाही. )

फेसबुक वरील फोटो लेखात देताना आपल्या टाईमलाईन वरील किंवा albums मधील हव्या असलेल्या फोटोवर क्लिक करून तो उघडा, आणि त्या पूर्ण पणे उघडलेल्या फोटोवर वर राईट क्लिक केल्यावर जे पर्याय दिसतील त्यातून Copy Image Location अथवा Copy image address हा पर्याय निवडला कि त्या फोटोचे Image URL क्लिपबोर्ड मधे कॉपी होईल. (फेसबुक वरचे आपले फोटो समाविष्ट करताना त्यांना Public access दिलाय कि नाही त्याची खात्री करा, नसेल दिला तर सर्वप्रथम तो द्या अन्यथा फोटो लेखात दिसणार नाहीत.) त्यानंतर मिपावर तो लेखात देण्याची कृती वरील क्रमांक ७ प्रमाणेच आहे.

टीप: गुगल फोटोज वरून फोटो समाविष्ट करणे जास्ती फायदेशीर आहे कारण जवळपास सर्वच Intarnet Service Providers कडे ग्लोबल + गुगलची स्वतःची bandwidth असल्याने जास्त साईझचे फोटो असले तरी ते लवकर लोड होतात.

प्रतिक्रिया

कंजूस's picture

2 Oct 2020 - 7:37 am | कंजूस

अपडेटस महत्त्वाचे असतात.
साइट्सवाले सतत अपडेट करतात त्यामुळे आपल्यालाही शोधाशोध करावी लागते.

मी काही लेख लिहिले होते पूर्वी परंतू त्यातील माहिती आता जुनी झाली. नव्यानेच लेख अपेक्षित आहे.

काही वेळा मी फोटो लेखाच्या प्रतिसादात टाकून दिले आणि असं करून लेखात टाका असं लिहिलं तरी टाकत नाहीत. "माझ्या ब्लॉगवर जाऊन पाहा" हा आग्रह असतो. खरं म्हणजे ब्लॉगवरचे ( blogspot / WordPress ) फोटो लेखात आणणे फार सोप्प असतं कारण ते 'public domain' मध्येच असतात.

टर्मीनेटर's picture

5 Oct 2020 - 4:03 pm | टर्मीनेटर

अपडेटस महत्त्वाचे असतात.
साइट्सवाले सतत अपडेट करतात त्यामुळे आपल्यालाही शोधाशोध करावी लागते.

आणि

खरं म्हणजे ब्लॉगवरचे ( blogspot / WordPress ) फोटो लेखात आणणे फार सोप्प असतं कारण ते 'public domain' मध्येच असतात.

सहमत.

सुमो's picture

3 Oct 2020 - 4:19 am | सुमो

वरील शेअर्ड टू पब्लिक फोटोंच्या लिंक्स काही काळानंतर बदलतात.आणि फोटो दिसेनासे होतात.

त्यामुळे फेसबुकचा वापर इथे फोटो देण्यासाठी करु नये.

प्रचेतस's picture

3 Oct 2020 - 9:14 am | प्रचेतस

अतिशय उपयुक्त माहिती.
धन्यवाद या धाग्याबद्द्ल.

कुमार१'s picture

3 Oct 2020 - 9:23 am | कुमार१

अतिशय उपयुक्त माहिती.
आता शिकेन.

तपशीलवार व स्क्रीनशॉटस् सहित माहिती.
👌
👍

सुमो's picture

3 Oct 2020 - 6:49 pm | सुमो

लिंक थोड्या वेगळ्या पद्धतीने घेतली आहे. इथे टाकून बघतोय. काही दिवसांनी कळेल पर्मनंट लिंक आहे की टेंपररी 🤔

भजी

चौथा कोनाडा's picture

3 Oct 2020 - 9:19 pm | चौथा कोनाडा

नय दिसतय हा भजी फोटो !
लिंक टेम्पररी झाली सुद्धा !
😉

कंजूस's picture

3 Oct 2020 - 11:19 pm | कंजूस

गरमच खायची असतात.

चौथा कोनाडा's picture

5 Oct 2020 - 12:22 pm | चौथा कोनाडा

तुमी आधीच संपवलेली दिसतायत !
😋

सुमो's picture

4 Oct 2020 - 5:07 am | सुमो

भजी

भजी तो बनती है !

चौथा कोनाडा's picture

5 Oct 2020 - 11:58 am | चौथा कोनाडा

व्वा, गरमागरम भजी ! सुमो, आता तुमच्या कडुण भजीपार्टी मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्याप्रयोग

आधीचा प्रयोग नक्की काय केला होता हे समजले नाही !

टर्मीनेटर's picture

5 Oct 2020 - 4:20 pm | टर्मीनेटर

भज्यांचा फोटो आवडला! आधी ज्या पद्धतीनी तुम्ही लिंक मिळवली होती तो फोटो मात्र दिसत नाहीये.

वरील शेअर्ड टू पब्लिक फोटोंच्या लिंक्स काही काळानंतर बदलतात.आणि फोटो दिसेनासे होतात.
त्यामुळे फेसबुकचा वापर इथे फोटो देण्यासाठी करु नये.

हा अनुभव बहुतांश साईटवर येतो, त्याला गुगल फोटोज आणि फेसबुक देखील अपवाद नाहीत. परंतु फास्ट लोडिंग आणि साईट अपडेट झाल्यानंतरही आपल्या खात्यात काही सेटिंग्ज मधे बदल करून ते पूर्ववत करता येणे अजूनपर्यंत तरी शक्य होत असल्याने हा पर्याय भरोश्याचा वाटतो. अनेक मोफत सेवा देणाऱ्या साईट्सनि फोटो शेअरिंग/Image hotlinking आता बंद केले आहे, भविष्यात आणखीनही काही बंद करतील. तोपर्यंत उपलब्ध आणि सोयीस्कर पर्यायांचा वापर करत राहणे तेवढे आपल्या हातात आहे 😀

कायप्पावर आलेला एखादा व्हिडीओ येथे शेअर करता येऊ शकतो का?

थेट करता येत असेल तर माहीत नाही. कंजूस यांच्या लेखात ड्राइव्ह व्हिडीओ कसा अपलोड करायचा ते दिले आहे.

शाम भागवत's picture

4 Oct 2020 - 12:19 pm | शाम भागवत

ड्राईव्हवर टाकून मग येईल. किंवा युट्युबला अपलोड करूनही करता येईल.
थेट करता येईल का? वगैरे बघत होतो.
किंवा कायप्पावर आलेला व्हिडिओ याअगोदर युट्युबवर आलेला आहे किंवा नाही , हे तपासायची युक्ति शोधत होतो.

सुमो's picture

4 Oct 2020 - 9:48 am | सुमो

कुमार१'s picture

4 Oct 2020 - 10:14 am | कुमार१

ok

शाम भागवत's picture

4 Oct 2020 - 12:15 pm | शाम भागवत

मला दिसत नाहीये.
🤔

कुमार१'s picture

5 Oct 2020 - 11:20 am | कुमार१

आधी दिसून नंतर गायब का होतो ?

टर्मीनेटर's picture

5 Oct 2020 - 4:35 pm | टर्मीनेटर

कुमार साहेब हा फोटो इथेच नाही तर तुम्ही त्यासाठी दिलेल्या

https://lh3.googleusercontent.com/pw/ACtC-3csqLpoMvKKodJNetawwz55A6Rt7ML...

ह्या लिंक वर सुद्धा दिसत नाहीये!

कुमार१'s picture

5 Oct 2020 - 4:47 pm | कुमार१

इथे चढवल्यावर मी तो माझ्या अल्बममधून उडवून टाकला.
म्हणून का ?

टर्मीनेटर's picture

5 Oct 2020 - 4:56 pm | टर्मीनेटर

हो, त्यामुळेच...😀

ही एक विडिओ फाइलच असते ती आपल्या स्टोरेजमध्ये येते. पण कोणाची आहे हे कळत नाही. ( Forwarded).
------------------
वरचे तीन्ही फोटो दिसत नाहीत.

कंजूस's picture

4 Oct 2020 - 2:08 pm | कंजूस

दोन्ही दिसत नाहीत. भजीचा दुसरा दिसतो.

या लेखासाठी धन्यवाद.

मिपाच्या एडीटरद्वारे किंवा एचटीएमएल कोडद्वारे चित्रे प्रकाशित करताना लांबी अथवा रुंदी यापैकी एकच द्यावे. चित्राच्या मूळ आकारमानातले रुंदी व लांबीचे गुणोत्तर आपोआप सांभाळले जाते. दोन्ही द्यायचे असल्यास मूळ आकारमानातले गुणोत्तर न बिघडवता द्यावे उदा. फोटो १०२४ x ७६८ असल्यास ६४० x ४८० अशा रुंदी व लांबीद्वारे ते बदलणार नाही. हे गुणोत्तर बिघडल्यास फोटो ओढल्यासारखा अथवा दाबल्यासारखा वाटू शकतो. माझ्या चला जुजबी एचटीएमएल शिकुया या धाग्यात यावर सोदाहरण माहिती मिळेल.

गुगल फोटोज सहजपणे उपलब्ध होणारा पर्याय असला तरी फोटोजचा दुवा खूपच लांब असतो. सहज पाहिले असता एका फोटोसाठी गुगल ७६३ अक्षरे लांब दुवा वापरत आहे. याऊलट त्याच फोटोसाठी फ्लिकर केवळ ६४ अक्षरे वापरत आहे. या कारणानेच गेल्या काही वर्षांपासून मी प्राधान्याने फ्लिकर वापरत आहे.

टर्मीनेटर's picture

5 Oct 2020 - 4:45 pm | टर्मीनेटर

@ श्रीरंग_जोशी

मिपाच्या एडीटरद्वारे किंवा एचटीएमएल कोडद्वारे चित्रे प्रकाशित करताना लांबी अथवा रुंदी यापैकी एकच द्यावे. चित्राच्या मूळ आकारमानातले रुंदी व लांबीचे गुणोत्तर आपोआप सांभाळले जाते.

सहमत आणि आभारी आहे.

चौथा कोनाडा's picture

5 Oct 2020 - 9:48 pm | चौथा कोनाडा

लांबी अथवा रुंदी यापैकी एकच द्यावे
या मुळे काम सोपे आणि वेगवान होते !
धन्यवाद !

टर्मीनेटर's picture

5 Oct 2020 - 4:31 pm | टर्मीनेटर

@ प्रचेतस, कुमार१, शाम भागवत
आपल्या प्रतिसादासाठी धन्यवाद 🙏

अमरेंद्र बाहुबली's picture

11 Oct 2020 - 2:12 am | अमरेंद्र बाहुबली

Face

अमरेंद्र बाहुबली's picture

11 Oct 2020 - 2:19 am | अमरेंद्र बाहुबली

HiFace

अमरेंद्र बाहुबली's picture

11 Oct 2020 - 3:07 am | अमरेंद्र बाहुबली

Face

अमरेंद्र बाहुबली's picture

11 Oct 2020 - 3:12 am | अमरेंद्र बाहुबली

Mask

सुमो's picture

12 Oct 2020 - 11:38 am | सुमो

चाचणी.

Insta

कंजूस's picture

12 Oct 2020 - 1:25 pm | कंजूस

Instagram free आहे का आणि स्टोरेज किती देतात?

सुमो's picture

13 Oct 2020 - 5:30 am | सुमो

म्हणजे फेसबुकच हो. फोटोंसाठीचं फेसबुक म्हणा हवं तर. फॉलो,लाईक आदि प्रकार तस्सेच आहेत. फोटोंसाठी स्टोरेज लिमिट नाहीये.

हा आणखी एक टाकून ठेवतो. फेसबुक प्रमाणे काही काळानंतर गायब होतो का ते बघायचं.

Pic credit: thefoodpunch instagram

Insta

चौथा कोनाडा's picture

17 Oct 2020 - 6:03 pm | चौथा कोनाडा

बाजीगर, फोटो दिसत नाहीय, "शेअर टू एव्हरीवन" करायचा राहिला की काय ?

Sanjay Uwach's picture

19 Oct 2020 - 2:03 pm | Sanjay Uwach

Kesher flower

Sanjay Uwach's picture

20 Oct 2020 - 7:56 am | Sanjay Uwach

nivdung

चौथा कोनाडा's picture

20 Oct 2020 - 9:04 am | चौथा कोनाडा

व्वा, फोटो टाकायला जमलं म्हणायचं !
सुरेख !
हार्दिक अभिनंदन !
येऊ द्या आणखी छान छान फोटो !

डॉक्टर साहेबांच्या पद्धतीने टाकले आहेत.

चौथा कोनाडा's picture

20 Oct 2020 - 9:59 am | चौथा कोनाडा

+१ छानच !

पण नंतर टाकलेले दिसत नाहीयत.
पोस्ट करण्यापुर्वी ट्रायल घ्यायची विसरू नका.

ट्रायल घेताना दिसतात पण ऑन केलं की गायब होतात . त्यासाठी एक फोटो नवीन अपलोड करून टाकला तो व्यवस्थित दिसतो आहे. (Nivduung)

Sanjay Uwach's picture

20 Oct 2020 - 9:20 am | Sanjay Uwach

nassem garden

Sanjay Uwach's picture

20 Oct 2020 - 9:52 am | Sanjay Uwach

sky

कंजूस's picture

5 Nov 2020 - 5:41 am | कंजूस

तुम्ही तुमच्या डिवाइसमधून ( तुमचंच जीमेल अकाउंट लॉगिन असताना) फोटो शेअरिंग मिपावर टेस्ट करता तेव्हा फोटो दिसतात. ते सर्वांनाच दिसतील असा समज होतो.

क्रोम ब्राउजर लॉगिनप्रमाणे फोटो दाखवतो. दुसऱ्या एखाद्या ब्राउजरात ती लिंक अड्रेसबारमध्ये टाकून फोटो येतो का पाहावे.