इजिप्त सोलोट्रीप: एक अविस्मरणीय अनुभव. भाग – १

टर्मीनेटर's picture
टर्मीनेटर in भटकंती
3 Jun 2018 - 11:48 am



शाळेत शिकत असताना इतिहास आणि भूगोलाच्या पुस्तकांतून अनेक देशांची ओळख झाली, परंतु ज्याला आवर्जून भेट द्यायचीच अशी ओढ माझ्या मनात निर्माण करणारा देश म्हणजे इजिप्त. हजारो वर्षांपूर्वी प्रगत असलेल्या संस्कृतीचे अवशेष, अकरा देशांमधून वहाणारी आणि आत्ता आत्ता पर्यंत जगातील सर्वात लांब म्हणून ओळखली जाणारी नाईल नदी, भूमध्य समुद्र (Mediterranean Sea), तांबडा समुद्र (Red Sea), ममी’ज, प्राचीन स्थापत्यशास्त्राचा उत्कृष्ठ नमुना आणि जागतिक आश्चर्य असलेले पिरामिड्स, भव्यदिव्य मंदिरे ह्या सर्व गोष्टी मला आकर्षित करत होत्या. शेवटी ह्या वर्षाच्या म्हणजेच २०१८ च्या फेब्रुवारी-मार्च महिन्यात माझे इजिप्त भेटीचे स्वप्न पूर्ण होणारा योग जुळून आला.

जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात आमच्या सौभाग्यवतींना एका कॉन्फरंस साठी दोन आठवडे ग्लासगोला जाण्याचे फर्मान त्यांच्या कार्यालयातून आले, त्यामुळे ह्या कालावधीत मी एकट्याने कुठे जायचं हा उद्भवलेला प्रश्न ईजिप्तला जायचं ह्या उत्तराने क्षणात निकालात निघाला, परंतु नियोजन आणि तयारी साठी जेमतेम ४०-४५ दिवसच हातात होते (त्यात २६ जानेवारी ते १ फेब्रुवारी पूर्वनियोजित केरळ दौरा होताच). आत्तापर्यंत मित्र मंडळी व कुटुंबीयांबरोबर देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय प्रवासाचा अनुभव होता परंतु एकट्याने परदेशी पर्यटनाला जाण्याची हि पहिलीच वेळ होती. पॅकेज टूरनी जाणे मला अजिबात आवडत नाही त्यामुळे तो विकल्प बाद होता. मग सुरुवात झाली इंटरनेटवर इजिप्त बद्दलची शक्यतेवढी माहिती गोळा करण्याला. हे संशोधन सुमारे १० ते १२ दिवस चालले. अनेक वेबसाईटस व ब्लॉग्स वाचून काढले, काही ब्लॉगर्सशी ईमेलवर संवाद साधला त्यांनी त्यांच्याकडची अधिकची माहिती देखील दिली, परंतु हि सगळी माहिती ३ ते ५ वर्षे जुनी होती. महत्वाची अद्ययावत माहिती कुठेच मिळाली नाही जसे कि अंतर्गत प्रवास उदा. रेल्वे, बस, टॅक्सी भाडे व त्यांचे वेळापत्रक तसेच विविध ठिकाणांचे प्रवेश शुल्क इत्यादी.

व्हिसा बद्दलची माहिती देखील अद्ययावत नव्हती आणि दुर्दैवाने इजिप्त सरकारची भारतीयांना व्हिसा विषयक मार्गदर्शन करणारी कोणतीही अधिकृत वेबसाईट उपलब्ध नाहीये. भारतात दोन ठिकाणी व्हिसा साठीचे अर्ज स्वीकारले जातात एक दिल्लीला त्यांच्या दूतावासात (Embassy of Egypt in Delhi) आणि दुसरे मलबार हिल मुंबईला त्यांच्या वाणिज्य दूतावासात (Consulate General of Egypt in Mumbai). गुगल वर त्यांचे फोन नंबर्स मिळवून मुंबईच्या दूतावासाशी संपर्क साधल्यावर त्यांनी आवश्यक कागदपत्रांविषयी माहिती दिली, अर्थात ती सुद्धा अपूर्ण होती हे तिथे अर्ज द्यायला गेल्यावर दुसऱ्या खेपेत समजले तसेच व्हिसा शुल्क हे देखील एकट्याने जाणाऱ्या व्यक्ती साठी अतिरिक्त लागते हे तिसऱ्या खेपेत समजले, पहिली खेप मुंबईतल्या ट्राफिक जाम मध्ये अडकल्याने आणि मलबार हिलला पोहोचे पर्यंत लागणाऱ्या असंख्य सिग्नल्स मुळे झालेल्या केवळ ४ मिनिटांच्या उशिरामुळे वाया गेली होती. अर्ज स्वीकारण्याची वेळ हि सकाळी ९ ते ११ आहे आणि बरोब्बर ११ वाजता त्यांच्या कार्यालयाचा दरवाजा बंद होतो.

टुरिस्ट व्हिसासाठी अर्ज करताना जाण्या येण्याचे विमानाचे तिकीट आणि संपूर्ण वास्तव्य कालावधीच्या हॉटेल बुकिंग कन्फर्मेशनच्या प्रती अर्जासोबत जोडाव्या लागतात म्हणून मग ते काम प्राधान्याने करायचे ठरवले.

कैरो (Cairo), अलेक्झांड्रिया (Alexandria), अस्वान (Aswan), अबू सिंबल (Abu Simbel), लुक्सोर (Luxor) आणि हुरघाडा (Hurghada) हि माझ्यासाठी मस्ट व्हिजिट डेस्टीनेशन्स होती, त्या अनुषंगाने २५ फेब्रुवारी ते १२ मार्च असा १५ रात्री (जाता येतानाच्या विमान प्रवासातल्या दोन रात्री मिळून १५+२=१७ रात्री) आणि १६ दिवसांचा खाली दिल्याप्रमाणे इजिप्त सफरीचा कार्यक्रम कागदावर तयार झाला.

  • २४ फेब्रुवारीला रात्री मुंबईहून कैरोला प्रस्थान (Egypt Air)
  • ३ रात्री कैरो. (२५,२६,२७ फेब्रुवारी)
  • ५ रात्री अस्वान. (२८ फेब्रुवारी, १,२,३,४ मार्च)
  • ४ रात्री लुक्सोर. (५,६,७.८ मार्च)
  • २ रात्री हुरघाडा (९,१० मार्च)
  • १ रात्र कैरो. (११ मार्च)
  • १२ मार्चला संध्याकाळी कैरो - मुंबई परतीचा प्रवास (Egypt Air)
  • १३ मार्चला पहाटे स्वगृही आगमन.

नकाशा

मग makemytrip, yatra, hostelworld, airbnb, tripadvisor व goibibo अशा विविध वेबसाईटवर जाऊन हॉटेल्स चे रीव्ह्युज वाचून आणि टेरिफ कम्पेअर करून शेवटी goibibo वरून विमानाची तिकिटे आणि हॉटेल्स बुक केली, ह्या सगळ्यात ६ फेब्रुवारी ते १३ फेब्रुवारी असे ८ दिवस खर्ची पडले.

१४ फेब्रुवारीला सगळी आवश्यक कागदपत्रे घेऊन मुंबईचे वाणिज्य दूतावास गाठले जे वर म्हणाल्या प्रमाणे बरोब्बर ११ वाजता बंद झाले होते, पहिली खेप वाया गेली होती. परत दुसऱ्या दिवशी गेलो तर तिथल्या अधिकाऱ्याने आणखीन एका कागदपत्राची कमतरता असल्याचे सांगितले, त्याची पूर्तता ११ वाजण्याच्या आत होणे अशक्य होते म्हणून मग परत १६ फेब्रुवारीला परिपूर्ण फाईल घेऊन गेलो, ती तपासल्यावर एकदाचे त्याचे समाधान झाले व त्याने कागदपत्रे व शुल्क स्वीकारून २१ फेब्रुवारीला दुपारी ३ वाजता व्हिसा घ्यायला येण्यास सांगितले. २४ फेब्रुवारीला रात्रीची फ्लाईट होती आणि जेमतेम साडेतीन दिवस आधी व्हिसा मिळणार होता त्यामुळे मनात थोडी धाकधूक घेऊनच ठरलेल्या वेळी पुन्हा तिथे पोचलो आणि आधीच्या खेपांमध्ये भेटलेल्या मुंब्रा, भिवंडी किंवा भेंडीबाजारात दिसणाऱ्या टीपीकल मुसलमानी पेहारावातल्या त्या दाढीवाल्या अधिकाऱ्याच्या जागी एक सुंदर ईजिप्शियन तरुणी आणि तिच्या शेजारी बसलेला गोरापान निळ्या डोळ्यांचा सुटा-बुटातला अधिकारी पाहून सुखद धक्काच बसला, अक्षरशः दोन मिनिटांत समोर ठेवलेल्या पासपोर्टस च्या चळतीतून माझा व्हिसा stamped केलेला पासपोर्ट काढून तिने मला दिला व दोघांनी हसतमुखाने माझ्या प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या आणि मी त्यांचे आभार मानून एका वेगळ्याच आनंदात तिथून बाहेर पडलो.

आता खऱ्या अर्थाने तयारीला लागायचं होतं आणि हातात दिवस होते तीन. ह्या तीन दिवसात जुजबी खरेदी, मनी एक्स्चेंज आणि पॅकींग अशी महत्वाची कामे होती. ह्यापैकी मनी एक्स्चेंज प्राधान्यक्रमात अग्रभागी होते. ईजिप्तचे चलन हे EGP म्हणजे ईजिप्शियन पाउंड आहे आणि एका पाउंडची अधिकृत किंमत तीन रुपये ऐशी पैसे आहे, परंतु एक्स्चेंज करताना तो जवळपास पाच रुपयांना पडतो. आधी केलेल्या संशोधनातून एक उपयुक्त माहिती मिळाली होती कि इजिप्तला जाताना ईजिप्शियन पाउंडस अगदी जरुरी पुरतेच घेऊन जावे जसे कि एअरपोर्ट ते हॉटेलपर्यंतचे टॅक्सी भाडे व अगदी थोडेसे जवळ असावेत म्हणून व बाकी करन्सी अमेरिकन डॉलर्स मध्ये न्यावी. ह्याची तीन कारणे आहेत, एक म्हणजे न्यायला सोपे. १०० डॉलर्सच्या केवळ १६ नोटांमध्ये तुम्ही एक लाख रुपयांहून अधिक रक्कम नेऊ शकता. दुसरे कारण म्हणजे इजिप्तमध्ये अनेक ठिकाणी अमेरिकन डॉलर्स सर्रास स्वीकारले जातात. आणि तिसरे महत्वाचे कारण असे कि मनी एक्स्चेंज मध्ये रुपयाच्या तुलनेत अत्यल्प कमिशन लागते. हि माहिती प्रमाण मानून पहिल्या दिवशी मी केवळ ५०० इजिप्शियन पाउंडस आणि बाकीची रक्कम अमेरिकन डॉलर्स मध्ये रुपांतरीत करून घेतली (जी अर्थातच फायदेशीरही ठरली). दुसऱ्या दिवशी आवश्यक ती खरेदी उरकून घेतली आणि तिसऱ्या दिवशी म्हणजे २४ फेब्रुवारीला दुपारपर्यंत सामानाची बांधाबांध झाली. त्याच रात्री निघायचं होतं, फ्लाईट मध्यरात्री २:५० ची होती पण मेट्रो च्या कामामुळे रोजच होणारा ट्राफिक जाम आणि सिक्युरिटी चेक, इमिग्रेशनला लागणारा वेळ हिशोबात घेऊन अगदी एअर्लाइन च्या सुचनेप्रमाणे चार तास आधी नाही तरी निदान तीन साडेतीन तास आधी पोहोचणे आवश्यक होते म्हणून दहा वाजता एअरपोर्टच्या दिशेने प्रयाण केले. अपेक्षेप्रमाणे रात्री ११:३० ला छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचलो. सगळे सोपस्कार पार पाडेपर्यंत दीड वाजला. बोर्डिंग साठी अजून अर्धा पाउण तास बाकी होता म्हणून थोडावेळ ड्युटी फ्री मध्ये टाईमपास करून मग बोर्डिंग गेट जवळ ते उघडण्याची प्रतीक्षा करत बसलो. सुमारे २:१५ वाजता गेट उघडले, विमानात प्रवेश करून आपल्या आसनावर स्थानपन्न झालो आणि निर्धारित वेळेपेक्षा २० मिनिटे उशिरा विमानाने मुंबईहून कैरोच्या दिशेने उड्डाण केले.


क्रमश:


संजय भावे
(उर्फ ‘टर्मीनेटर’)

पुढील भाग: इजिप्त सोलोट्रीप: एक अविस्मरणीय अनुभव. भाग – २

प्रतिक्रिया

भारी, इजिप्तचे प्रचंड आकर्षण आहे.
पुढचे भाग भराभर आणि तपशीलवार येऊ द्यात.

टर्मीनेटर's picture

3 Jun 2018 - 2:26 pm | टर्मीनेटर

जरूर...

पद्मावति's picture

3 Jun 2018 - 1:26 pm | पद्मावति

वाह...माझी ड्रीम ट्रिप करताय. मस्तच. पु.भा.प्र .

टर्मीनेटर's picture

3 Jun 2018 - 2:27 pm | टर्मीनेटर

धन्यवाद पद्मावातिजी.

डॉ सुहास म्हात्रे's picture

3 Jun 2018 - 1:42 pm | डॉ सुहास म्हात्रे

अरे वा ! मस्तं ! इजिप्तसफरीचा अनुभव ! तयारी तर जोरात केली आहे. भरपूर फोटोंसह प्रवासवर्णन टाका. मजा येइल पहायला-वाचायला.

तुम्हाला द्यायचा प्रतिसाद चुकून खाली पोस्ट झालाय डॉक्टर ...

टर्मीनेटर's picture

3 Jun 2018 - 2:28 pm | टर्मीनेटर

धन्यवाद डॉक्टर. पुढील भागांमध्ये कमी-अधिक प्रमाणात फोटो टाकतो.

तुषार काळभोर's picture

3 Jun 2018 - 2:33 pm | तुषार काळभोर

मिपावर बहुतेक अजून कोणी ईजिप्त प्रवासविषयी कोणी लिहिलं नसावं.
भरपूर फोटोंसाहित पुढील भाग टाका.

टर्मीनेटर's picture

3 Jun 2018 - 3:31 pm | टर्मीनेटर

नक्की पैलवानजी...

मनिमौ's picture

3 Jun 2018 - 2:46 pm | मनिमौ

लौकर येऊ द्या. तसेच शक्य असेल तर हाॅटेल ची नावे, तिथे आलेला अनुभव, आसपास च्या रेस्टॉरंट ची नावे यांचाही ऊल्लेख येऊ द्या. फोटो नाही टाकले तर लेख फाउल धरण्यात येईल.

टर्मीनेटर's picture

3 Jun 2018 - 3:33 pm | टर्मीनेटर

येस मनिमौ...

दुर्गविहारी's picture

3 Jun 2018 - 3:09 pm | दुर्गविहारी

उत्तम सुरवात. ईजिप्त विषयी प्रचंड आकर्षण आहे. तुमच्या धाग्यांची ईथून पुढे वाट बघावी लागेल.
एक सुचना व्हिसा काढण्यासाठी जी कागदपत्रे आवश्यक आहेत, त्यांची यादी देता येते का पहा. ईजिप्त मधील हॉटेल्सची नावे, संपर्क क्रमांक, पत्ते देता येतील तर नंतर जाणाऱ्यां
ना त्याचा उपयोग होतो.
पु.भा. प्र.

टर्मीनेटर's picture

3 Jun 2018 - 3:37 pm | टर्मीनेटर

चांगली सूचना दुर्गविहारीजी, त्या त्या भागाच्या शेवटी किंवा सगळ्यात शेवटच्या भागात हि माहिती देतो.

यशोधरा's picture

3 Jun 2018 - 4:08 pm | यशोधरा

फटाफट पुढील भाग, फोटो असे सगळे बैजवार येऊदे.
सगळ्या फिरणाऱ्या मिपाकरांचा भयानक हेवा वाटायला लागलाय...
फिरायला काय जातात, ट्रेकिंग काय करतात..

टर्मीनेटर's picture

3 Jun 2018 - 5:02 pm | टर्मीनेटर

लवकरच पुढील भाग टाकतो...

एस's picture

4 Jun 2018 - 12:20 am | एस

फिरायला काय जातात, ट्रेकिंग काय करतात..

बघा ना! काही काही लोक फिरायला काय जातात, ट्रेकिंग काय करतात..!

टर्मीनेटर's picture

4 Jun 2018 - 9:43 am | टर्मीनेटर

:-)

श्वेता२४'s picture

3 Jun 2018 - 4:22 pm | श्वेता२४

प्रवासाला निघण्याआधी काय काय सोपस्कार पार पाडले तेही लिहिल ते बरं केलंत कुणालाही पूर्वतयारीसाठी हि माहिती उपयोगी पडेल पुभाप्र

टर्मीनेटर's picture

3 Jun 2018 - 5:02 pm | टर्मीनेटर

धन्यवाद...

टवाळ कार्टा's picture

3 Jun 2018 - 4:29 pm | टवाळ कार्टा

सुरक्षेततेची काही चिंता करावी लागली का?

टर्मीनेटर's picture

3 Jun 2018 - 5:07 pm | टर्मीनेटर

अजिबात नाही, अनेक बाबतीत ईजिप्त आणि भारतात साम्ये आढळली. भारतात जसे काश्मीर दहशत वादामुळे होरपळतय तसाच प्रकार तिथे फक्त सिनाई प्रांतामध्ये आहे.

कंजूस's picture

3 Jun 2018 - 6:06 pm | कंजूस

बकेट लिस्टित आहे.
युट्युबवरचे सर्व विडिओ पाहून घेतलेत. विशेषत: हिस्ट्रीचानेलचे. डिस्कवरी चा वॉकिंग द नाईल ( जुना आहे एपिसोड ) पाहिला. माहिती पत्रकं नकाशे आहेतच फक्त याच लेखाची वाट पाहात होतो.
कारागिरांचं गावही खूप ऐतिहासिक खजिना आहे ( होता) त्या सर्व वस्तूंचे संग्रहालय मात्र तिथे नाही, युरोपात आहे कारण शोध करणाऱ्यांंना मिळालेल्या वस्त् नेता येत होत्या. तुतनखामेनच्या कबरीचा शोध लागल्यावर निघालेला न्यान जिओचा अंकही नातेवाईकाकडे पाहिला आहे.
सोन्याचे दागिन्यांतले वैशिष्ट्य म्हणजे तसे करता येत नाही अजुनही. उदा मुकुटावर चिकटवलेला सोन्याचाच रवा.

आता हे तुम्ही प्रत्यक्ष बघितले तर आनंदच आहे. काय चित्र कला आहे! शमशाद नावाच्या एक अफगाण चानेलवर इजिप्शन मालिका लावायचे .काय मस्त होती.

टर्मीनेटर's picture

3 Jun 2018 - 6:31 pm | टर्मीनेटर

खरं आहे कंजूसजी, बराच अनमोल ठेवा लुटला तरी गेला किंवा परदेशी शोधकर्त्यांनी स्वदेशी नेला आहे, तरी पण ईजिप्शियन अँटीक्विटी म्युझीयम मध्ये असलेले सोन्याचे दागिने, मुखवटे बनवणाऱ्या कारागिरांची कलाकारी बघून आश्चर्यचकित व्हायची पाळी येते.

एस's picture

4 Jun 2018 - 12:20 am | एस

वाचतोय. पुभाप्र.

टर्मीनेटर's picture

4 Jun 2018 - 9:45 am | टर्मीनेटर

धन्यवाद .

निशाचर's picture

4 Jun 2018 - 4:54 am | निशाचर

अरे वा! छान सुरुवात.

टर्मीनेटर's picture

4 Jun 2018 - 9:45 am | टर्मीनेटर

धन्यवाद .

अनिंद्य's picture

4 Jun 2018 - 11:12 am | अनिंद्य

शानदार सुरुवात !

इजिप्तमध्ये पंधरवड्याची सहल म्हणजे चंगळ आहे :-) तुम्ही भेट देण्याच्या ठिकाणांची निवडही फार छान केली आहे. पुढील सचित्र भागांची प्रतीक्षा आहे.

स्वगत :- बऱ्याच वर्षांपासून मनात एक सोलो ट्रिप आखत आहे - कैरो, रोम आणि इस्तंबुल आणि परत त्याच क्रमाने तोच प्रदेश. कधी जमेल देवा ?

टर्मीनेटर's picture

4 Jun 2018 - 12:34 pm | टर्मीनेटर

धन्यवाद अनिन्द्यजी. आणि तुमच्या कैरो, रोम आणि इस्तंबुल सोलो ट्रिप साठी खूप खूप शुभेच्छा...

मीअपर्णा's picture

22 May 2020 - 6:13 pm | मीअपर्णा

ही सिरीज मी आधी ओझरती वाचली होती.
आता पुन्हा निवांतपणे वाचेन.
मुलांमुळे काही इजिप्शियन परिचीत झालेत. कधी जायचा योग आला तर थोडी त्यांची आणि इकडच्या माहितीची खूप मदत होईल. धन्यवाद :)

टर्मीनेटर's picture

2 Jul 2020 - 12:41 pm | टर्मीनेटर

@ मीअपर्णा
प्रतिसादासाठी आभार आणि तुमच्या प्रतिसादाला खूप उशिरा उत्तर देत असल्याबद्दल क्षमस्व!

नयना माबदी's picture

18 Sep 2020 - 1:04 pm | नयना माबदी

खुप मस्त. माझी आवडती ट्रीप.

टर्मीनेटर's picture

29 Sep 2020 - 2:22 pm | टर्मीनेटर

@ नयना माबदी
प्रतिसादासाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏

मध्यंतरी ह्या मालिकेतील भागांमधले फोटो दिसत नसल्याचे वाचकांनी निदर्शनास आणून दिले होते. गुगल फोटोज अपडेट झाल्याने तसे झाले होते, परंतु आता आवश्यक त्या सुधारणा केल्यावर सर्व भागांमधले फोटो पुन्हा दिसू लागले आहेत.
धन्यवाद 🙏