श्रीगणेश लेखमाला २०२० - समारोप

साहित्य संपादक's picture
साहित्य संपादक in लेखमाला
2 Sep 2020 - 8:29 am

नमस्कार,

मागील दहा दिवस सुरू असलेला गणेशोत्सव अन मिपाच्या श्रीगणेश लेखमालेचा शब्दोत्सव यांचा आज समारोप होतोय. मिसळपावची स्थापना श्रीगणेश चतुर्थीची. मिपाचा यंदा चौदावा वर्धापनदिन. गणेशोत्सवानिमित्त आयोजित केल्या जाणाऱ्या मिपा श्रीगणेश लेखमालेचे हे नववे वर्ष.

यंदा 'आठवणी - स्मृती' या विषयावर लेखमाला घेण्याचे जाहीर केले आणि मिपाकर नॉस्टॅल्जिक झाले. हा विषय किती जिव्हाळ्याचा आहे, हे आवाहनाला मिळालेल्या प्रतिसादावरून दिसून आले. वाचकांनाही हा विषय व लेखमाला आवडल्याचे त्यांच्या प्रतिसादावरून दिसून आले.

या लेखमालेच्या निमित्ताने मिपाकरांनी किती वेगवेगळ्या आठवणींचा धांडोळा घेतला! सत्तर-ऐंशीच्या दशकातील चॉकलेट स्पर्धेपासून ते डोंगर-किल्ले फिरल्याच्या आठवणी.. आंघोळीच्या साबणापासून ते माळव्याच्या चित्रांपर्यंत स्मृती.. काही साध्यासुध्या आठवणी ते काही आठवणींच्या आठवणी.. चित्रपटांच्या आठवणी अन मनावर ओरखडा उमटवणाऱ्या आठवणी.. आपल्या स्मृती अन आठवणी शेअर करून मिपाकरांनी ही लेखमाला समृद्ध केली. मिपावरच्या लोकप्रिय लेखाची आठवण अन त्याची ध्वनिमुद्रित साठवण हा नावीन्यपूर्ण प्रयोगही मिपाकरांना आवडला आणि त्यांनी उचलून धरला.

आवर्जून उल्लेख करायचा आहे, तो या लेखमालेच्या निमित्ताने मिपा परिवारात सामील झालेल्या नवीन सदस्यांचा. या लेखमालेच्या निमित्ताने आपल्याला काही नवीन सदस्य मिळाले. त्यांच्या लेखांनाही भरभरून प्रतिसाद देऊन मिपाकरांनी त्यांचा उत्साह वाढवला. अनुराधा काळे (वय ७९) यांनी त्यांच्या बालपणीच्या स्मृती आपल्यापर्यंत पोहोचवल्या. त्यांचा मिपावरील लेखनाचा हा पहिलाच प्रयत्न. लेख प्रकाशित झाल्यावर त्यांना आणि त्यांच्या बहिणीला (वय ८१) झालेला आनंद त्यांनी प्रत्यक्ष फोन करून कळवला. तो आम्ही इथे शब्दांत व्यक्त करू शकत नाही.

अशा अनेक स्मृती या श्रीगणेश लेखमालेने आपल्याला दिल्या. मिपाचं साहित्यिक भांडार आणखीनच समृद्ध झालं. यासाठी सर्व मिपाकरांच्या वतीने स्मृती-लेखकांना मनःपूर्वक धन्यवाद. लेखकांचा उत्साह वाढवणारे प्रतिसाद देणाऱ्या मिपाकरांचेदेखील आभार. तुमचा लोभ असाच असू द्यावा.

धन्यवाद!
||गणपती बाप्पा मोरया||

ताजा कलम : मिपाचा दिवाळी अंक येतोय. लवकरच आवाहनाचा धागा प्रकाशित करतोय.

श्रीगणेश लेखमाला २०२०

प्रतिक्रिया

कुमार१'s picture

2 Sep 2020 - 10:29 am | कुमार१

उत्तम उपक्रम होता.
हार्दिक अभिनंदन !

अनिंद्य's picture

2 Sep 2020 - 11:49 am | अनिंद्य

उत्तम उपक्रमाबद्दल संपादक-संचालक मंडळाचे अनेक आभार, माझा लेख स्वीकारल्याबद्दल अधिकचे _/\_

एका थीमच्या विषयात मिपाकरांनी लिहिलेल्या लेखांमधले वैविध्य बघून आश्चर्यचकित झालो.

खूप छान.

चौकटराजा's picture

2 Sep 2020 - 12:39 pm | चौकटराजा

मिपाचा दिवाळी अंक येतोय. लवकरच आवाहनाचा धागा प्रकाशित करतोय. करोना च्या आक्रमणाने जग काही प्रमाणात नक्कीच बदलणार आहे जरी लस आली तरी. तसेच गेल्या अनेक वर्षात अनेक क्षेत्रात बदल झालेत. नोकरी, पर्यावरण , मानवी सम्बन्ध, राजकीय मान्डणी यात . यासाठी लेख ,काव्य, व्यंगचित्रे यासाठी " बद्ल" हा विषय सुचवावासा वाटतो.

शा वि कु's picture

2 Sep 2020 - 4:01 pm | शा वि कु

भारी कल्पना आहे!

विनिता००२'s picture

2 Sep 2020 - 12:47 pm | विनिता००२

छान झाला ह्या वर्षीचा गणेशोत्सव! लेख खूपच छान होते.
चित्रगुप्त ह्यांची माळव्यातली चित्रे खूप आवडली. लेख अजून नीट वाचायचा आहे, पण नोंदवते.

संपादक मंडळाचे आणि सर्व मिपाकरांचा ही मी आभारी आहे.

खरे तर कविता, शतशब्द कथा आणि गणेशमाला लेखासाठी मी पहिल्यांदाच माझा सहभाग नोंदवला आणि मला आनंद वाटला..

12 वर्षे झाली सदस्य असण्याला.. पण दिवाळी असु वा कुठलीही लेखमाला मला काहीच देता आले नव्हते. अपवाद पैसा ताईच्या बोलण्याने 2015/2016 का कधी कविता देणार होतो पण राहिली द्यायची..

तरीही, सर्व वाचकांनी जे प्रोत्साहन दिले ते अभूतपूर्व होते..
आणि आताचे गणेश लेखमालेचे लेख तर खुपच भारी होते.
मग ते गावाकडच्या आठवणी असुद्या... शाळेतल्या असुद्या.. चित्रांच्या असुद्या.. चॉकलेट्स च्या गोड आठवणी असुद्या किंवा साबणाच्या अंघोळीच्या असुद्या.. किंवा अश्या कितीही.. खुप समरसून जायला झाले...

MipaPremiYogesh's picture

2 Sep 2020 - 3:41 pm | MipaPremiYogesh

खूप धन्यवाद ह्या उपक्रमाबद्दल. खूप सुंदर आणि वैविध्यपूर्ण लेख वाचायला मिळाले. आणि मला पण ह्यात सहभागी होता आले ह्या बद्दल आभार.

गणेश लेखमाला आयोजित करण्यातील सातत्य खरोखरच वाखाणण्याजोगे आहे. उत्तमोत्तम लेखांची मेजवानी दरवर्षी न चुकता दिल्याबद्द्ल लेखमालेतील लेखक, अविरत कष्ट करणारे साहित्य संपादक, मिपाचे चालक, मालक, वाचक ह्यांचे मंडळ मनापासून आभारी आहे.

खुप सुंदर उपक्रम 'होता'..होतापण नाही म्हणाव वाटत.. मस्त मस्त.

चौकटराजा's picture

2 Sep 2020 - 6:10 pm | चौकटराजा

मी या मालेत लेख देउ शकलो नाही कारण माझा पीसी महिनाभर बिघडलेलाच होता. विषय माहीत नव्हता. पण माझ्ह्या आठवणीतील पुणे असा एक लेख लिहायचा इच्चार आहे !

तुषार काळभोर's picture

3 Sep 2020 - 7:07 am | तुषार काळभोर

..

ज्ञानोबाचे पैजार's picture

3 Sep 2020 - 9:13 am | ज्ञानोबाचे पैजार

संपूर्ण लेखमाला आवडली, या करता ज्या ज्या दृष्य अदृष्य हातांनी अपार मेहनत घेतली होती त्या सर्वांचे अभिनंदन.

या मालिकेच्या यशाने आता दिवाळी अंकाकडून अपेक्षा वाढल्या आहेत.

पैजारबुवा,

कंजूस's picture

3 Sep 2020 - 9:14 am | कंजूस

छान झाली मालिका.

खुप मस्त झाली श्री गणेश लेखमाला.
हि लेखमाला यशस्वी होण्यात आधीच्या लिहित्या मिपाकरांच्या बरोबरीने नवीन लेखक/लेखिकांचे योगदानही मोठे आहे.
वर पैलवान ह्यांनी म्हंटल्या प्रमाणे "आठवणीत राहील अशी हि लेखमाला" आम्हा वाचकांसाठी सादर करणारे सर्व लेखक/लेखिका आणि पडद्या मागे कष्ट घेतलेल्या टीम मिपाचे शतशः आभार!

सस्नेह's picture

3 Sep 2020 - 10:24 pm | सस्नेह

छान झाली लेखमाला..
आणि उत्तम थीम.

सुमो's picture

4 Sep 2020 - 5:11 am | सुमो

छान झाली लेखमाला.

लेखकमंडळी आणिउपक्रम यशस्वी करण्यासाठी झटलेल्या सर्वांचे अभिनंदन.

चौथा कोनाडा's picture

12 Sep 2020 - 5:21 pm | चौथा कोनाडा

या सुंदर उपक्रमाबद्दल मिपा मालक, संचालक, संपादक मंडळ, साहित्य संपादक आणि सर्व कार्यकर्त्यांचे खुप आभार !
या निमित्ताने आठवणींचा सुंदर खजिना वाचायला मिळाला !
मलाही कथा-वाचनाची संधी दिलीत त्याबद्दल धन्यवाद !
या वेगळ्या प्रयोगाला वाचक/श्रोत्यांनी उत्तम प्रतिसाद देउन हुरुप वाढविला, खुप छान वाटले !

धन्यवाद मिपा !

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

12 Sep 2020 - 6:04 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

एकापेक्षा एक आठवणी. उत्तम उपक्रम. सर्वांचं कौतुक आहे. मालिका यशस्वी केल्याबद्दल सर्वांचं अभिनंदन.

-दिलीप बिरुटे