सुमारे १९८६ साली भारत सरकारने भारतीय भाषांसाठी संगणक कळफलक प्रमाणीत केला. त्याचे नाव इनस्क्रिप्ट. पुढे १९८८ आणि १९९२ साली त्यात सुधारणा केल्या. त्या काळी युनिकोड वगैरे नव्हते. पुढे युनिकोड आले त्यातही भारतीय भाषांसाठी सुधारणा झाल्या. परंतु तो पर्यंत भारतीय भाषांसाठी लिखाण करण्यासाठी अनेकांनी अनेक अप्रमाणित पद्धती विकसित केल्या होत्या जसे गमभन, बोलनागरी इत्यादी. अशीच आणखी एक सोय म्हणजे गुगल इनपुट टूल्स. AI आणि तत्सम तंत्रज्ञानाचा वापर करून विविध भाषांसाठी बनवलेली प्रणाली, जी अर्थातच प्रमाणित नाही
दुर्दैवाने आजही भारतीय भाषांमध्ये टंकणे कठीण पडते कारण प्रमाणीकरणाचा आणि त्याच्या प्रसाराचा अभाव. तसेच भारतात मिळणाऱ्या संगणकांचे कळफलक हे अमेरिकन असतात व भारतीय इनस्क्रिप्ट अक्षरे त्यावर नसल्याने प्रसारही होत नाही.
सुदैवाने युनिकोड मुळे जगातील सर्व भाषांना संगणकावर स्वतःची एक प्रमाणित लिखाण पद्धती तयार झाली आहे ,आज सगळ्या ऑपरेटिंग सिस्टिम्स युनिकोड सपोर्ट करतात तसेच त्या त्या भाषांमध्ये लिहिण्याची सोयही देतात. परंतु भारतीय भाषांमध्ये तरी हे लिहिणे अजून तितकेसे रुळले नाही.
आपल्याला मराठी वर्णमाला येत असेल तर हे टंकणे शिकणे फार सोपे आहे. रोज अर्धा तास या हिशेबाने ४-६ दिवसात बऱ्यापैकी जमू शकते. अर्थात टंकणे गुगल इनपुट टूल्स इतक्या वेगाने होत नाही परंतु या (गुगल इनपुट टूल्स) पद्धतीत काही स्पेसिफिक शब्द लिहिणे जरा कठीण जाते वेळी इनस्क्रिप्ट माहिती असणे फायद्याचे ठरते. रच्याकने गुगल इनपुट टूल्स पण इनस्क्रिप्ट ला सपोर्ट करते.
तर आज ह्या पद्धतीने काही कठीण शब्द कसे लिहायचे हे बघू. खरे तर मी माझ्या सोयीसाठी ह्या नोट्स तयार केल्या होत्या कारण मला ही माहिती कुठेच मिळाली नाही, खास करून मराठीतले विविध र चे प्रकार इत्यादी. इतरांनाही याचा फायदा होईल असे वाटल्याने इथे देत आहे. अजूनही कोणता शब्द तुम्हाला लिहिता येत नाही असे वाटत असेल तर प्रतिसादात विचारू शकता, मी उत्तर द्यायचा प्रयत्न करीन.
मराठी वर्णमाला
अ (D) आ (E) इ (F) ई (R) उ (G) ऊ (T) ए (S) ऐ (W)
ओ (A) औ (Q) अं (Dx) अः (D_) अॅ (D@) अॉ (|)
क (k) ख (K) ग (i) घ (I) ङ (U)
च (;) छ (:) ज (p) झ (P) ञ (})
ट (') ठ (") ड ([) ढ ({) ण (C)
त (l) थ (L) द (o) ध (O) न (v)
प (h) फ (H) ब (y) भ (Y) म (c)
य(/) र (j) ल (n) व (b) श (M)
ष ( < ) स (m) ह (u) ळ (N) क्ष (Shift + 7) ज्ञ (Shift + 5)
त्र (Shift + 6) क्ष (Shift + 7) श्र (Shift + 8) ऋ (+)
् (d) ा (e) ि (f) ी (r) ु (g) ू (t) े (s) ै (w)
ो (a) ौ (q) ं (x अनुस्वार) ः (_) ॅ (@) ँ (X) ॉ (\) ृ (=) ॄ (Left Ctrl + shift + u + 0944)
(0950 is a unicode character for ॐ , you can replace 0950 with any other code to type other unicode characters. List of all Devnagari unicode characters https://unicode.org/charts/PDF/U0900.pdf)
ॐ (Left Ctrl + shift + u + 0950)
ऽ (Left Ctrl + shift + u + 093d)
₹ (Left Ctrl + shift + u + 20b9)
कीबोर्ड लेआऊट
इनस्क्रिप्ट देवनागरी कळफलक असा दिसतो. हा देवनागरी वर्णमालेप्रमाणे organise केला आहे.
काही कठीण शब्द कसे लिहिता येतील याची उदाहरणे
कृष्ण (k=
पर्वत (hjdbl)
वृत्त (b=ldl)
हऱ्या (uJd/e)
नाऱ्या (vJd/e)
झिंदाबाद (Pfxoeyeo)
ऑफीस (|Hrm)
अॅपल (D@hn)
अत्युकृष्ठ (Dld/gk=<d")
त्राही (Shift + 6eur)
त्र्यंब्यक (Shift + 6d/xyd/k)
प्रत्येक (hdjld/sk)
ऋषी (+
स्वताः (mdble_)
हृदयात (u=o/el)
महाराष्ट्र (cueje<d'dj)
राष्ट्रीय (je<d'djr/)
प्रश्न (hdjMdv)
बँक (yXk)
अँड्रॉईड (DX[dj\R[)
कॅमेरा (k@csje)
भक्ती (Ykdlr)
धक्का (Okdke)
लॅपटॉप (n@h'\h)
ज्ञानेश्वर (Shift + 5evsMdbj)
एक्स्ट्रॉ (Skdmd'dj\)
द्रौपदी (odjqhor)
ऱ्हस्व (Jdumdb)
काँप्युटर (keXhd/g'j)
माझं (cePx)
चम्पा (;cdhe)
ब्रम्ह (ydjcdu)
क्षणीक (Shift + 7Crk)
इंट्रेस्टींग (Fx'djsmd'rxi)
वाङमय (beUc/)
विठ्ठल (bf"d"n)
विठ्ठल (bf"d 'Left Ctrl + Shift + u + 200c' "n)
हूर्र्र् (utjd 'LeftCtrl + Shift + u + 200c' jd 'Left Ctrl + Shift + u + 200c' jd 'Left Ctrl + Shift + u + 200c') मुद्दाम हलन्त पाहिजे असेल तर ही पद्धत वापरु शकता
प्रतिक्रिया
25 Aug 2020 - 6:27 pm | शेर भाई
कोणे एक काळी “शिवाजी” किंवा “मंगला” Fonts जपून ठेवावे लागत. पण आता Google Input Tools ने आम्हाला खूप आळशी केल आहे. पूर्वी तुम्ही दिल्या प्रमाणे तक्ते समोर ठेवून टंकायला लागायचे आता मराठी उच्चाराप्रमाणे इंग्रजी कळा (Keys) दाबत गेलो कि झाल.
25 Aug 2020 - 6:53 pm | टीपीके
मी माझ्या संदर्भसाठी हे तयार केले होते, जर कोणाला शिकायची इच्छा असेल तर त्यानंही उपयोगी पडेल म्हणून इथे डकवले. गुगल इनपुट टूल्स हे फक्त ब्राउझर मध्ये वपरता येते पण या पद्धतीने संगणकावर कोणत्याही प्रोग्रॅम मधे टंकता येते त्यामुळे याची माहीती असणे उपयोगी आहे.
कळफलक भारतीय भाषांमध्ये उपलब्ध झाला तर तुम्हाला असा तक्ता घेऊन बसायची गरज नाही. सध्या इंग्रजी कळफलक वापरात असल्याने तुम्हाला गुगल इनपुट टूल्स सोपे वाटते.
५० लाख लोकसंख्या असणाऱ्या नॉर्वे , डेन्मार्क इत्यादी देशांमध्ये त्यांच्या भाषेचे कळफलक, शुद्धलेखन सहाय्यक, व्याकरण सहाय्यक मिळतात पण ११ कोटी लोकसंख्येच्या महाराष्ट्रात साधा मराठी कळफलक मिळत नाही आणि त्याबद्दल आपल्याला काहीच वैषम्य नाही हिच आपली शोकांतिका
25 Aug 2020 - 8:39 pm | शेर भाई
|गुगल इनपुट टूल्स हे फक्त ब्राउझर मध्ये वपरता येते पण या पद्धतीने संगणकावर कोणत्याही प्रोग्रॅम मधे टंकता येते त्यामुळे याची माहीती असणे उपयोगी आहे.
गुगल इनपुट टूल्स हे फक्त ब्राउझर मध्येच वापरता येते अस नाही, तुम्ही जर गुगल इनपुट टूल्स संगणकाला शिकवलं (install केल) कि संगणकावर कोणत्याही प्रोग्रॅम मधे टंकता येते. याशिवाय जर अति-तलम कार्यालय वर्ष-भर (Microsoft Office 365) किंवा अति-तलम कार्यालय २०१९ (Microsoft Office 2019) वापरणार असाल तर मराठीचा भाषा पुडा (Language Pack) सुद्धा उपलब्ध आहे.
25 Aug 2020 - 9:10 pm | शाम भागवत
अति-तलम कार्यालय वर्ष-भर = Microsoft Office 365
अति-तलम कार्यालय २०१९ =Microsoft Office 2019
भाषा पुडा= Language Pack
हे आवडलं.
30 Sep 2020 - 8:44 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अति-तलम कार्यालय वर्षभर, हे मराठीकरण गंडले आहे, असे वाटते. ऑफीस मधून अॅप्लिकेशनचा बोध होतो. ऑफीस वापरतो का असे म्हटले की ऑफीसच्या काही अप्लीकेशन्सचा बोध होतो. कार्यालय वापर असे म्हणता येणार नाही. बाकी प्रयत्न स्तुत्य आहे.
-दिलीप बिरुटे
29 Aug 2020 - 7:43 pm | Nitin Palkar
छान! शेर भाई!!
_/\_
25 Aug 2020 - 8:46 pm | शेर भाई
|महाराष्ट्रात साधा मराठी कळफलक मिळत नाही आणि त्याबद्दल आपल्याला काहीच वैषम्य नाही हिच आपली शोकांतिका
महाराष्ट्रात साधा मराठी कळफलक मिळत नाही आणि त्याबद्दल वैषम्य वाटून घेण्यापेक्षा, कोणत्याही कळफलकाला आपण मराठी टंकायला तयार करू शकतो याचा अभिमान बाळगायला काय हरकत आहे.
25 Aug 2020 - 11:39 pm | टीपीके
हे आवडले :)
पण आपण सुचवलेले फक्त workarounds जुगाड आहेत. माझा मुख्य मुद्दा हा प्रमाणीकरण हा आहे. अर्थात तुमच्या मतांचाही आदर आहेच.
आवड आपली आपली :-)
26 Aug 2020 - 12:29 am | शेर भाई
हातात Mixer असताना पाटा वरवंटा घेऊन वाटत का बसावे. आपल्याला गरमागरम भजीसोबत खमंग चटणी मिळाली बस्स.
आणि हो, इथे Mixer म्हणजे in thing आणि पाटा वरवंटा outdated अस अजिबात नाही.
30 Aug 2020 - 1:07 pm | चौथा कोनाडा
महाराष्ट्रात साधा मराठी कळफलक मिळत नाही आणि त्याबद्दल आपल्याला काहीच वैषम्य नाही हिच आपली शोकांतिका
महाराष्ट्रात साधा मराठी कळफलक मिळत नाही आणि त्याबद्दल वैषम्य वाटून घेण्यापेक्षा, कोणत्याही कळफलकाला आपण मराठी टंकायला तयार करू शकतो याचा अभिमान बाळगायला काय हरकत आहे.
आपण परभाषेतले ९०% शब्द घेऊन तयार झालेल्या धेडगुजरी भाषेला मराठी म्हणुन मिरवतो याचा अभिमान बाळगायला काय हरकत आहे !
26 Aug 2020 - 12:11 pm | चौथा कोनाडा
टू इन वन कळफलक हवा !
नेहमीचा क्वेर्टी (QWERTY) आणि बटन दाबला की इन्स्क्रिप्ट ! असा एकातदोन कळफलक बाहेरून ही जोडता यायला हवा.
( दोन्ही विकसित करावा लागेल, पण भारतीय पातळीवर विकसित करुन प्रसार केल्यास नक्की फायदा होईल )
26 Aug 2020 - 10:08 pm | टीपीके
तुम्ही जे मागताय तेच इनस्क्रिप्ट आहे. विंडोज कि आणि स्पेस बार दाबला कि भाषा बदलते. पाहिजे तेव्हा इंग्रजी, पाहिजे तेव्हा मराठी. तुमच्याकडे पर्मनंट मार्कर पेन असेल तर वरील प्रमाणे तुम्हीच तुमच्या कीबोर्ड वर लिहा आणि OS वर इनस्क्रिप्ट सेटिंग करा, झाला तुमचा पूर्ण सेटअप तयार. खरे तर असे कीबोर्ड सहज मिळायला पाहिजे पण नाही मिळत, TVS कंपनीचा १च कीबोर्ड आहे असा
हा बघा
27 Aug 2020 - 5:46 pm | चौथा कोनाडा
धन्यवाद, टीपीकेजी !
पर्मनंट मार्कर पेनने कळफलकाच्या कळांवर मराठी अक्षरखुणा करायचं (आत्ता तरी) रानटी वाटतेय. प्रयोग करून बघावा लागेल.
TVS कंपनीचा कीबोर्ड एकदम बेष्ट पर्याय आहे सध्याच्याला !
27 Aug 2020 - 6:29 pm | शाम भागवत
ISM SOFT बरोबर पूर्वी कळफळ्यावर चिकटवायला स्टिकर्सच मिळायची. तेवढी सोय झाली तरी पूरेसे असावे.
28 Aug 2020 - 5:25 pm | चौथा कोनाडा
हा ही उत्तम पर्याय सुचविलात !
धन्यवाद, शाम भागवत़जी.
29 Aug 2020 - 11:48 am | टीपीके
हो, हा पर्याय ही उत्त्तम आहे. अशी स्टिकर्स मिळतात का? मी कधी बघितली आणि शोधली नाही. कुणाला माहिती असेल तर सांगा, I am also interested
29 Aug 2020 - 1:06 pm | चौथा कोनाडा
इथं थॉडीफार माहिती आहे, कळफलक ले-ऑऊटची खात्री करुन घ्यावी लागेल.
https://www.amazon.in/Keyboard-Stickers-Lettering-Transparent-Background...
https://www.flipkart.com/prodot-kb-297rs-usb-hindi-devanagri-standard-ke...
https://www.amazon.com/Hindi-Keyboard-Stickers-Overlays-Characters/dp/B0...
29 Aug 2020 - 1:35 pm | टीपीके
पहिले उत्पादन छान वाटतेय पण फारच महाग. त्यात 2-3 नवीन कीबोर्ड येतील
दुसरे मस्त , फक्त 500-600 मधे
तिसरे भयंकर महाग, त्या मुळे कटाप
पाहिल्याचा फायदा म्हणजे कोणत्याही existing कीबोर्ड वर वापरता येईल. वेगळा कीबोर्ड न्यायाची गरज नाही. पण किंमत खूप जास्त. पण असतील आणखी कंपन्या ज्यांचे असे प्रॉडक्ट असेल जे स्वस्त असेल
29 Aug 2020 - 10:40 pm | शाम भागवत
मी १९९५ ला घेतलेल्या ISM SOFT बरोबर स्टिकर्स आली होती. स्टिकर्सची क्वालिटी चांगली होती. काही वर्षांनी तो कीबोर्डच मोडला. तोपर्यंत कीबोर्ड पाठ झाला होता. त्यामुळे नेहमीचा कीबोर्ड आता चालतो. आजही इन्स्क्रिप्टच वापरतो.
एचसीएलने बायलिंगल कीबोर्ड बनवले होते. रिझर्व्ह बँक व नाबार्डमधे पाहिलेले आठवतंय.
30 Aug 2020 - 1:10 pm | चौथा कोनाडा
व्वा, कौतुकास्पद ! चांगली स्टिकर्सची मिळुन वरीच वर्षे वापरता आली हे ही विशेषच !
26 Aug 2020 - 12:51 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आता गुगल इनपूटवरच आपली भिस्त आहे, बाकी ते इन्स्क्रीप्ट झेपत नाही. लेखनाबद्दल आभार.
-दिलीप बिरुटे
28 Aug 2020 - 11:51 am | तुषार काळभोर
+१
25 Aug 2020 - 6:54 pm | टर्मीनेटर
छान माहितीपुर्ण लेख!
अर्थात “ काही कठीण शब्द लिहिण्याची पद्धतही कठीणच वाटली “ :-)
धन्यवाद आणी पुढील लेखनासाठी शुभेच्छा!
25 Aug 2020 - 7:06 pm | टीपीके
इंग्रजी कळफलकावर नक्कीच कठीण वाटते, पण देवनागरी कळफलकावर समोर अक्षरं असतील तर नाही वाटणार :)
25 Aug 2020 - 7:05 pm | शाम भागवत
येथे पण बरीच चर्चा झालेली आहे. <\a>
25 Aug 2020 - 7:19 pm | टीपीके
हे नव्हते बघितले. चांगली चर्चा.
अर्थात हा लेख मी कोणी इनस्क्रिप्ट कळफलक वापरच म्हणून लिहिला नसून, वापरायची इच्छा झाली तर संदर्भ म्हणून लिहिला आहे
25 Aug 2020 - 7:41 pm | कंजूस
कळफलकामागची कळ समजली.
25 Aug 2020 - 8:57 pm | नि३सोलपुरकर
अति-तलम कार्यालय वर्ष-भर आणी अति-तलम कार्यालय २०१९
शेर भाई _/\_
25 Aug 2020 - 10:39 pm | सतिश गावडे
Microsoft Office 365 आणि Microsoft Office 2019 ही विशेषनामे असून विशेषनामांचं भाषांतर करत नाहीत. :)
25 Aug 2020 - 10:59 pm | शाम भागवत
एकदम मान्य.
टोपण नाव समजूया.
;)
25 Aug 2020 - 11:58 pm | शेर भाई
|Microsoft Office 365 आणि Microsoft Office 2019 ही विशेषनामे असून विशेषनामांचं भाषांतर करत नाहीत. :)
आजकाल साध्या मराठी संवादात आपण आपल्याच नकळतपणे बऱ्याचदा इंग्रजी शब्द घुसडून बोलत असतो. मागे एका मित्रासोबत कुठेही कधीही भेटल्यावर पूर्ण वेळ मराठीतच बोलायचे अशी पैज लावली होती, हा त्याचाच दुष्परिणाम आहे. त्यावेळी मराठी संवादात व्याकरणाचे भान देखील ठेवायला हवे हा मुद्दा आमच्याकडून सुटला होता.
सतीशG तुमचे आभार.
26 Aug 2020 - 1:56 am | डाम्बिस बोका
Microsoft SwiftKey Keyboard हा कीबोर्ड मी फोन वर वापरतो
26 Aug 2020 - 9:07 am | सुमो
लेख.
इन्स्क्रिप्ट कधी वापरलं नाही.
26 Aug 2020 - 9:31 am | महासंग्राम
हल्ली क्रोम ब्राऊझरवर गुगल इनपुट टूल ऑनलाईन वापरतांना बराच त्रास होतो, शब्द टाईप केल्यावर जवळपास ३-४ सेकंद थांबावं लागतं. यासाठी काही उपाय आहेत का ?
26 Aug 2020 - 3:19 pm | संजय क्षीरसागर
मोबाईलसाठी गुगल हँडरायटींग अॅप आहे. त्यात मराठी फाँन्ट डाऊनलोड करा.
पेननं वहीवर लिहिल्यासारखं, बोटानं स्क्रीनवर लिहिता येतं.
पीसीवर लिहायला बराह पॅडसारखी मजा अजून कशातही आली नाही. विचारा बरहुकूम शब्द उमटतात. बराह सध्या (बहुतेक) पेड आहे. पूर्वीपासून वापरत असल्यानं माझ्याकडे फ्री वर्शन आहे.
26 Aug 2020 - 3:28 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
येस्स....! बरहाची तुलनाच नै होऊ शकत कोणाची. मी तर कधी कधी मिपावर टायपासाठीही त्याचा उपयोग करतो.
मला बरहाची तर इतकी सवय झाली की, बरहाने अगोदर शब्द उमटतात आणि नंतर मेंदू म्हणतो, भाऊ हे नव्हतं रे टायपाचं. :)
सेम हियर, व्हर्जन एक आणि व्हर्जन आठ, हे दोन्ही माझ्याकडे आहे.
-दिलीप बिरुटे
(बरहाकर)
26 Aug 2020 - 3:35 pm | संजय क्षीरसागर
गुगल हँडरायटींग ट्राय करा. लैच भारी !
त्यात मराठी आणि इंग्रजी दोन्ही पर्याय आहेत.
मला प्रोफेशनल कामासाठी प्रचंड इंग्रजी टाईप करायला लागतं ते पण मोबाईलवर फारच सुखाचं झालं आहे.
26 Aug 2020 - 6:13 pm | चौथा कोनाडा
बराह भारीच आहे,
वापरलेय, वापरतोय. फ्री व्हर्शन !
पण माझा आजकाल गुगल मराठी इनपुटचा वापर वाढलाय.
26 Aug 2020 - 6:44 pm | सतिश गावडे
बरहा खरंच भारी आहे.
माझ्याकडे बरहाचे सुपर युजर व्हर्शन आहे. हे व्हर्शन स्टार्टपमध्ये टाकून ठेवायचे. पिसी किंवा लॅपटॉप चालू झाला की बरहा चालू होते. आणि त्यावर अक्षरे आपोआप (मी कळफलकाला हातही न लावता) उमटू लागतात. मग हे बरहामध्ये उमटलेलं डोळ्यांमार्फत माझ्या मेंदूपर्यंत पोहचते. आणि त्यानंतर मेंदूला कळते की त्याला काय विचार करायचा आहे टंकण्यासाठी. पण बरहामध्ये ते टंकन आधीच झालेले असते. अपूर्व आहे हे.
28 Aug 2020 - 11:39 am | प्रकाश घाटपांडे
माझ्याकडे बराह चे पेड वर्जन आहे. पण तरीही फेबुवर च्या / मायबोली च्या टेक्स्ट बॉक्स मधे थेट लिहिता येत नाही. अक्षरांची गर्दी होते भलतच गार्बेज येत. मग नोट पॅड मधून लिहावे लागते
27 Aug 2020 - 6:39 pm | मराठी_माणूस
ह्या निमित्ताने CDAC च्या GIST कार्ड ची आठवण आली.
31 Aug 2020 - 7:15 am | निनाद
कळफलकावर लावायला स्टिकर्स उपलब्ध आहेत.
हे महाग आहेत.
The DataCal Marathi language keyboard labels are a high-quality, durable and economical solution to creating a Marathi bilingual keyboard.
https://www.dsi-keyboards.com/shop/accessories/language-labels/m-o-langu...
पण यापेक्षा स्वस्त नक्कीच मिळू शकतील.
31 Aug 2020 - 11:07 am | टीपीके
हे छान आहे. पण तुम्ही म्हणता तसे जरा महाग आहेत. वरती शाम म्हणतात तसे भारतात कुठे मिळतात बघितले पाहिजे
31 Aug 2020 - 9:29 am | शशिकांत ओक
मोबाईल फोन वर भारतीय भाषा आणि इंग्रजी हे नुसत्या स्पेस बारला पुढेमागे सरकवून भाषा बदलून लिहायची सोय असलेले अॅप आहे. शिवाय तुम्ही पुढचा शब्द काय लिहिणार आहात तो समोर येतो. मात्र हा की बोर्ड पीसीवर मिळत नाही.
I'm using SwiftKey, the keyboard that learns from you. Get it for Android at https://swiftkey.com
31 Aug 2020 - 11:14 am | टीपीके
माझा मुख्य मुद्दा standardization बद्दल आहे. इंग्रजी बद्दल असे करावे लागते का? लॅपटॉप असो, फोन असो, किंवा आणखी कोणतेही मशीन असो.
असो, हा लेख मी संदर्भासाठी लिहिला होता. विषय वेगळीकडे गेला :)
जी लोकं इनस्क्रिप्ट वापरतात त्यांच्या मते यात काही माहिती वाढवावी का? इतरांनी हे वापरले आहे का? काही शंका आहेत का?
31 Aug 2020 - 6:02 pm | चौथा कोनाडा
एकंदरीत इथल्या कुणीच इनस्क्रिप्ट वापरलेलं दिसत नाहीय.
माझ्या सारखे फोनेटिकला सरावलेले इनस्क्रिप्ट वापरयला कचरतात, म्हणुनच आपण म्हणता तसे कळफलक इनस्क्रिप्ट अक्षरे नसल्यामुळे !
आपण मेहनत घेऊन कठीण शब्द कसे लिहायचे हे लिहिल्यामुळे आमच्या सारख्यांची खुप सोय होणार आहे,
जेव्हा केव्हा इनस्क्रिप्ट वापरू तेव्हा इथे पटकिनि सन्दर्भ घेता येईल !
वापरा नंतरच अडचणि येतील, शंका येतील तेव्हा आपण असालच मदतीला !
हा माहितीपुर्ण धागा काढल्याबद्दल धन्यवाद टीपीके !
1 Sep 2020 - 4:42 pm | टीपीके
धन्यवाद :)
कधीतरी एकदा वापरून बघा. आठवड्यातून अर्धा एक तास दिलात तरी खूप सराव होतो. लेआऊट देवनागरी मुळाक्षरे असतात तसाच आहे, शेवटच्या एक दोन ओळी सोडल्या तर.
जसे मराठी शब्द तयार होतात अगदी तसेच टाईप करायचे.
वर निनाद म्हणाले तसे स्टिकर्स मिळाले पाहिजेत म्हणजे आणखीन सोपे होईल.
कोणाच्या ओळखीत असे स्टिकर्स बनवणारे आहेत का?
30 Sep 2020 - 8:39 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
जालीय आयुष्यात इनस्क्रिप्ट शब्द खूप वेळा ऐकला, टंकायला कसे असेल असेही विचार येऊन गेला. पण थेट काही जमले नाही. काही तरी कठीण असेल असेच वाटत राहीलेले आहे, त्यामुळे इनस्क्रिप्ट वापरलेले नाही.
-दिलीप बिरुटे
31 Aug 2020 - 8:40 pm | बोका
हा माहितीपुर्ण धागा काढल्याबद्दल धन्यवाद टीपीके !
पण नवीन पिढी भारतीय लिपीत लिहिण्यास अनुत्सुक आहे.
सगळे रोमन लिपीत मराठी, हिन्दि, वगैरे लिहितात.
काही वर्षांनी, मलाय भाषेसारखी , मराठी रोमन लिपीत लिहिली जाणार नाही अशी आशा करतो.
1 Sep 2020 - 4:43 pm | टीपीके
:(