सर्व मिपाकरांना विनंती, वारंवार सूचना देऊनही 'चालू घडामोडी' आणि इतरही काही धाग्यांत व्यक्तिगत पातळीवर केली जाणारी टीका दिसून येते. पक्षांचे प्रमुख, पक्ष यांच्यावर केल्या जाणा-या टिकाही संयमित असाव्यात अशी अपेक्षा आहे, नव्या कायद्यांमुळे संकेतस्थळावरील सर्वांचा वावर कायद्यातील नियमाबरोबर, सार्वजनिक संस्थळावरील सभ्यतेचे किमान निकष पाळणारा असावे असे मिपा व्यवस्थापनाचे मत आहे, यापुढे असे आढळून येत राहिल्यास कोणतेही स्पष्टीकरण न देता असे प्रतिसाद, धागे सरसकट अप्रकाशित केल्या जातील किंवा खाते निष्कासित करण्यासारखी कठोर कारवाई केली जाईल याची सर्वांनी नोंद घ्यावी व सहकार्य करावे.

- मिपा व्यवस्थापन


Food - Kitchen Affairs - १. चहा

Primary tabs

गणेशा's picture
गणेशा in पाककृती
21 Aug 2020 - 7:14 pm

किचन मध्ये पुन्हा थोडासा शिरकाव करण्याचा प्रयत्न आता करावा म्हणतो आहे. कधीकाळी रुम वरती थोडाफार स्वयपाक केल्याचा अनुभव होता.. पण त्या नंतर कित्येक वर्ष मात्र किचन मध्ये काहीच केले नाही..
बेसिक गरज : किचन हे स्वच्छ असावे .., फोटो देताना पण किमान निदान स्वच्छता दिसलीच पाहिजे.

(अवांतर
- नाहीतर मध्ये फेसबुकवरती, केतकी चितळे ने साबण कमी वापरुन त्याचा परिपुर्ण वापर कसा केला पाहिजे हे सांगायला बाथरुम मधला साबन कापण्याचा विडीओ दिला, आणि तिचे अतिशय घाणेरडे बाथरुम बघुनच किळस आली. कसे कळत नाही बरे लोकांना.
असे निदान पाककृती विभागात झाले नाही पाहिजे, किचन छानच हवे.
पाककला च काय कुठलीही कला ही स्वच्छतेच्या ठिकाणी जास्त उठुन दिसते असे माझे मत..
)

सुरुवात करताना जरा चांगला किंवा वेगळा पदार्थ घेवून सुरुवात करावी असे जरी वाटत असले तरी चहा प्रथम घेण्याचे कारण आहे.
एक तर चहाची रेसेपी मी कुठे ही कोणी लिहिलेली किंवा सांगितलेली पाहिलेली नाही.
आणि बर्याचदा चहा पिताना, असला का यांनी /हिने चहा बनवला आहे असे वाटत राहते.
बर एकाच माणसाने रोज सारख्याच चवीचा चहा तरी करावा ना, पण नाही, आज काय गोड, उद्या सपक, नंतर काय तर चहापत्तीच नीट उकळलेली नाही.
असो.

आता चहा पण प्रत्येकाला वेगवेगळा आवडतो, काहींना काळा चहा आवडतो, काहींना मसाला चहा आवडतो, काहींना अद्रक वाला तर काहींना विलायची चहा.
काहींना दुध आणि चहा पावडर नंतर कपात मिक्स केलेला चहा आवडतो.
मला मात्र नेहमी प्लेन चहा आवडतो.. प्लेन आणि कडक, कधीतरी गवतीचहा ची पाणे टाकतो त्यात मी. पण जास्त आवडतो तो प्लेन असलेला चहा..

माझे म्हणणे असेच आहे, कुठली ही गोष्ट ही त्याच्या बेसिक गुणधर्मावर आवडली पाहिजे, त्यात कसल्या ही गोष्टी अ‍ॅड करुन त्या प्रमाणे चव आणली तर बेसिक गोष्ट कुठे तरी हरवल्या सारखी वाटते. अगदी वडापाव जरी खायचा म्हंटला तरी त्याची चटणी बाजुला घेवून तीला तोंडी लावुन खाण्यात मज्जा असते, ती चटणीच पावाला अखंड लावून तीची चव म्हणजे वडापाव ची चव भारी असे का म्हणायचे ? अगदी पुण्यातला गार्डन वडापाव त्यामुळेच मला आवडत नाही, चटणीचीच सारी चव.. अरे वडापावला स्वताची चव असतेच असते.
चहाचे पण तसेच आहे..

तर चला आता जास्त पान्हाळ न लावता चहा कडे वळु या.

साहित्य आणि कृती (2 कप चहासाठी) :

१. मल चहा आणि दुध मिक्स करुन नंतर त्यात चहा पावडर टाकणार्‍यांचा खुप राग येतो..

तर आधी १ १/२ कप पाणी गॅस वर ठेवावे.
1
असे झोपेतुन उठुन आल्यासारखे, तुमच्या घरात लुडबुड करायला कोणी असेल तर त्याला लुडबुड करुन द्यावी.
१ १/२ कप पाणी.

२.आणि गॅस चालु करुन, पाणी थोडे उकळायला लागले की त्यात चहा पावडर टाकावी.. मला कडक चहा आवडतो म्हणुन रेड लेबल चहा मला जास्त आवडतो.

जर तुम्ही टीव्ही किंवा इतर काही बघता बघता चहा करत असाल तर साखर पण लगेच टाकली तरी जास्त काही फरक पडत नाही.. नाही तर थोड्या वेळाने साखर टाकावी. आणि चहा उकळुन द्यावा.

प्रमाण : ( चमच्याचे माप वेगवेगळे असेल तर एक दोनदा चहा करुन हे प्रमाण आपल्या आवडी नुसार बदलावे)
चहा पावडर - ३ छोटे चमचे.
साखर - ३ मोठे चमचे.
2
चहापावडर टाकताना

3
साखर टाकताना

३. चहा चांगला ५ मिनिटे उकळुन द्यावा, अतिशय सुंदर चहाचा सुवास यायला लागल्यावर त्यात १ कप उकळलेले दुध टाकावे.
काही लोक गार दुध चहात टाकतात, त्याने चहा आणखिन जास्त वेळ उकळवुन द्यावा लागतो, आणि त्यामुळे तो काळा किंवा कडवट ही बनु शकतो. म्हणुन दुध बाजुला उकळुन घेवुन मग चहात टाकावे.
चहा हा घट्ट , दाट असला पाहिजे, त्या साठी म्हशीचे दुध वापरावे. गाईच्या दुधाचा चहा निट लागत नाही.
त्यात ही सकाळी चहा करत असाल तर कालचे शिळे फ्रीज मध्ये ठेवलेले दुध पुन्हा एकदा उकळवून ते चहात मध्ये टाकल्यास चहा खुपच भारी लागतो.

४. आता चहा पुन्हा ३-४ मिनिटे हळु गॅस वर ठेवुन द्यायचा, घाई घाई करुन मोठा गॅस वर लगेच उकळी आणुन द्यायची नाही,आपल्याला काय २ मिनिटात चहा केला असले कुठलेही पारोतोषिक जिंकायचे नसते किंवा कुठे जाहिरात ही करायची नसते. त्यामुळे हळु गॅस वर ३-५ मिनिटे चहा उकळुन द्यायचा, आता चहाला सुंदर लालसर रंग आलेला असतो, काळासर चहा लोक का करत असतील हे मला कळत नाही. जर काळाच चहा करायचा असल्यास बीन दुधाचा चहा करावा.

५. आता चहा कपात घ्यावा. त्याला लालसर कलर आलेला हवा.. आणी तो चहा दाट आणि सोबत कडक ही हवा. काही लोकांना दाट चहा करताना तो कडक होत नाही, आणि कडक चहा म्हंटले की त्याला जास्त उकळल्याने, तो एकतर मुळ चवी पेक्षा जळका आणि काळा होतो,

4
चहा..घट्ट आणि लालसर आणि कडक पण.

कधीतरी दुध पिणार्‍या माऊ ला पप्पांनी केलेला चहा प्यायचा असेल तर थोडासा पिऊ द्यावा.. तेथे नियम लावु नये.
6

प्रतिक्रिया

Gk's picture

21 Aug 2020 - 7:35 pm | Gk

छान

बर एकाच माणसाने रोज सारख्याच चवीचा चहा तरी करावा ना, पण नाही, आज काय गोड, उद्या सपक, नंतर काय तर चहापत्तीच नीट उकळलेली नाही.
असो.
बरोबर हे असच घडतं.. आम्ही व्यक्तीच्या आवडीनुसार चहा बनवतो.कोणी शुगरवाले,कोणाला कडक, इत्यादी इत्यादी..

पहिल्यापासून शेवटपर्यंत छान लिहिलंय ,पण फोटो नाही दिसले.

पहिल्या वाक्याचा अर्थ आहे, कि एकाच माणसाला रोज सारखाच चहा बनवून द्यावा ना, पण काय माहित, तसे का होत नाही..

मी चहा बनवला तर त्याची चव बदलत नाही..

कंजूस's picture

21 Aug 2020 - 8:24 pm | कंजूस

छानच.
चहा मला फार लागतो आणि तेवढ्या वेळा पितोही करून. पण करून ठेवलेला नाही चालत. रेल्वे प्रवासात मात्र हल्ली पीत नाही कारण दहापैकी नऊ वेळा 'प्रवासातले गरम पाणी' असते. कॉफी घेतो.
-------
पुढच्या भागाची वाट पाहतो.

गणेशा's picture

21 Aug 2020 - 8:27 pm | गणेशा

चहा मला पण खुप आवडतो,
आणि ज्यांना चहा ची सवय असते त्यांना बनवून ठेवलेला चहा आवडत नाही..

तुषार काळभोर's picture

23 Aug 2020 - 12:19 pm | तुषार काळभोर

मलापण नाही आवडत. त्यापेक्षा पिला नाही तरी चालते.

तुषार काळभोर's picture

23 Aug 2020 - 12:37 pm | तुषार काळभोर

हा दैवयोग आहे!!

चहा लांब राहिला, सगळीकडे गॅसचा नॉब बंद केलेला दिसतोय!

आमच्या घरात वर्षानुवर्षे एकाच चवीचा चहा होतो. आधी आई, मग वहिनी, मागची सात वर्षे बायको बनवते. एकच चव. कधीकधी चेंज म्हणून addition होते. कधी विलायची, कधी आलं, कधी दुधाचा. क्वचित कधीतरी गवतीचहा. पण बेसिक चव एकच आहे. पावडर पण एकच आहे. महाराष्ट्र नंबर एक फॅमिली मिक्स्चर पावडर. संपल्यावर पुण्यात जाऊन आणेपर्यंत मग दुकानातून टाटा किंवा सोसायटी आणली जाते. ते पण चांगले असतील, पण सवयीमुळे ते पांचट वाटतात.
पद्धत almost तुम्ही लिहिल्याप्रमाणे.
दूध योग्य प्रमाणात पाहिजे. कमी दुधाने अती कडक होतो, कडू लागतो, जास्त दुधाने चहाचा आत्मा हरवून तो अतृप्त होतो ;)

बऱ्याच नातेवाईकांकडे (हवेली, पुरंदर) गायीच्या दुधाचा चहा असतो. मला तोपण नाही आवडत. पांचट वाटतो.

ऑफिसमध्ये सीसीडी ची व्हेंडींग मशीन आहे. मी त्यात दोन साखरेच्या पुड्या (प्रत्येकी पाच ग्रॅम, एक चहाचा चमचा), दोन टी बॅग, पाऊण कप पाणी, चमचाभर दूध टाकतो. दोंनतीन मिनटे बॅगा न हलवता मुरून देतो. मग एक दोन वेळा बॅगा वरखाली करून टाकून देतो. काडी ने साखर हलवतो. आणि झकास बनलेला चहा पितो. आधी तीनचार कप व्हायचे, आता जर उशिरा थांबलो तरच चार वाजता घेतो.

बाहेर काही ठिकाणी आवर्जून चहा घेतो. म्हणजे तिथे गेलोय म्हणून घेतो.
तिलक
महानाज (बन मस्का सोबत - कम्पल्सरी)
अशोक
आळंदी फाट्यावर सोमेश्वर (त्यात क्रिमरोल बुडवून)

गणेशा च्या लेखात फोटो दिसत नाहीत हा दैवयोग आहे!!

हे खरंय. एकही फोटू दिसला नाही भौ!
लेखन मात्र छान आणि खुसखुशीत! :-)

तुषार काळभोर's picture

23 Aug 2020 - 1:51 pm | तुषार काळभोर

गॅसचा नॉब चालू झाला!
चहा दिसायला लागला!!

फोटो दिसत नाहीयेत . येथे खाली पुन्हा द्या फोटो.

यातील फोटो, सायकल किंवा ट्रेक च्या धाग्यांसारखे त्या ठिकाणांचे किंवा निसर्गसौंदर्य असलेले नाहीत, त्यामुळे फोटो दिसत नसले तरी जास्त काही पुन्हा फोटो देण्याचा प्रयत्न केला नाही.. पण आता पाहायचेच असल्यावर देतो.
येथे संपादन करता येत नसल्याने फोटो याच रिप्लाय मध्ये देतो सोबत लिंक पण देतो, म्हणजे फोटो दिसले नाहीत तरी लिंक वर दिसतील.

----
फोटो 1. तर आधी १ १/२ कप पाणी गॅस वर ठेवावे.
1

लिंक - https://photos.app.goo.gl/RgP6bHSbSCqtd8w58

फोटो 2.चहापावडर टाकताना - 3 छोटे चमचे.
2

लिंक - https://photos.app.goo.gl/fyYtNSWTsjCbUapr5

फोटो 3.साखर टाकताना -3 मोठे चमचे.
3

लिंक -https://photos.app.goo.gl/UX1ZQ3q1Gkj9oKcm6

फोटो 4.चहा..घट्ट आणि लालसर आणि कडक पण.
4

लिंक - https://photos.app.goo.gl/BC6jkCtPtTrecGqF6

फोटो 5. दुध पिणारी माऊ ..
5

लिंक -
https://photos.app.goo.gl/sp5JqFs4xCC9e6xF8

आताशिक फ़ोटो दिसले हुस्श ;) पण आमहला दूध पिणारी माऊ जास्त आवडली आहै :)

राघव's picture

23 Aug 2020 - 2:50 pm | राघव

आत्ता दिसले फोटो..!
माऊ गोड आहे.. काय नाव रे? :-)

बादवे, दीड कप पाणी + दूध.. एवढ्या मुद्दलात 3 मोठे चमचे साखर म्हणजे जऽऽरा जास्त नाही काय?? ;-) ह. घे.

मला पण हे कळलं नाही.:)
दीड कप पाणी + दूध.. एवढ्या मुद्दलात 3 मोठे चमचे साखर म्हणजे जऽऽरा जास्त नाही काय?? ;-) ह. घे.

Bhakti's picture

23 Aug 2020 - 3:38 pm | Bhakti

दिसला बाई चहा!! :)
मस्त मदत केली माऊने..छानच

शा वि कु's picture

23 Aug 2020 - 3:59 pm | शा वि कु

मला पण मापं पाठ आहेत, पण कधीही मापाने केला जात नाही. कायम चहा वेगवेगळ्या चवीचा होतो. चालायचंच. चहा करताना "सरप्राईज मी" असा भाव ठेऊन करतो. :))
हल्ली बिन साखरेचा चहा असतो, त्यामुळे तर अक्षरशः काहीही कशातही मिसळून कसेही उकळले तरी चव थोड्याफार फरकाने तशीच होते.त्यात आलं किंवा मसाला घातला की छानच होतो.
आणि बिनसाखरेचा असल्यामुळे कितीहीवेळा पिला तरी काही प्रॉब्लेम नाही अशी स्वतःची (गैर?)समजूत घालून 4-5 वेळा तरी चहा होतोच.

तुमचे चहापुराण आणि तुम्हाला चहा करण्यात मदत करणारी पिल्लू दोन्ही फारच छान !

सिरुसेरि's picture

24 Aug 2020 - 8:24 pm | सिरुसेरि

वा . छान लेख आणी फोटो . बाकी , गॅसच्या जवळ मोबाईलने फोटो काढताना काळजी घ्या .

वामन देशमुख's picture

24 Aug 2020 - 10:46 pm | वामन देशमुख

मी चहा-कॉफीच्या थेंबालाही स्पर्श करत नाही पण तुमची अनवट रेसिपी आणि सादरीकरण आवडले.

अर्थात माझ्या अर्ध्या-बरीला मी अनेकदा चहा करून देतो आणि तिलाही आवडतो.
(आवडतो म्हणजे मी आवडतो, की मी चहा केलेला आवडतो की मी केलेला चहा आवडतो हा भाग अलहिदा!)

तुमच्या माऊला माझ्याकडून आणि माझ्या अर्ध्या-बरीकडून एक कप गोड-गोड चहा!

चौकस२१२'s picture

25 Aug 2020 - 6:19 am | चौकस२१२

१. मल चहा आणि दुध मिक्स करुन नंतर त्यात चहा पावडर टाकणार्‍यांचा खुप राग येतो..
हा हा , पटतंय
चहात अजून एक
-त्यात नुसत्या आल्यापेक्षा आलेपाक ( थोडा खवा असलेला ) घालायचा
- किंवा वरून थोडे क्रीम घालायचे
- चहामध्ये पाश्चिमात्य पद्धतीने पिण्यात पण मजा असते... पाणी ८५ अंश लाच तापवावे ,,,१०० अंश नाही आधी चहात पाणी , मग ते ठेवणे आणि मग कोमट दूध घालणे ...

मला पण जायफळ घातलेली/ वेलची कॉफी आवडते पण ती मूळ देशी कॉफी / चिकोरी पासून बनवली तर,, ISNTAT कॉफी पासून बनवली तर नाही,, आपली तर मग सटकते ..

सर्वांचे प्रतिसाद पाहून अतिशय छान वाटले..
चहा ला काही कोणी प्रतिसाद द्यायचा नाही.. किंवा हे का लिहिले जरा चांगला पदार्थ लिहायचा असे रिप्लाय येतील असे वाटले होते..

तुमच्या सर्वांच्या प्रतिसादामुळे पाककले साठी आवर्जुन वेळ काढावा असे वाटत आहे..

नक्कीच जमतील त्या छोट्या छोट्या गोष्टी करून देत राहिल.
लगेच पुन्हा अवघड नको, ते इतर सुगरण मंडळी देतील..

जाता जाता..

पाककृती विभाग मला आवडला होता तो निवेदिता ताई, जागु ताई(? मासे बनवायच्या त्या याच ना ) गणपा, कच्ची कैरी आणि आमची ऑल टाइम फेव्हरेट पियुशा.
जूने आयडी आता इकडे नसतात..