चिन्यांचा उपद्व्याप भाग ३

माहितगार's picture
माहितगार in काथ्याकूट
1 Jul 2020 - 6:48 pm
गाभा: 

न्यूज १८ च्या संकेतस्थळावर Lt Gen Hooda यांचा, प्रत्येकाने आवर्जून वाचावा असा, एक नेमका आणि प्रत्येकालाच नेमक्या जबाबदारीचे नेमके भान देणारा लेख आला आहे.

कॉपीराईटमुळे संपूर्ण लेख देऊ शकत नाही तो न्यूज १८ च्या संस्थळावर जाऊन वाचणे अधिक उत्तम त्यांच्या मुख्य मुद्यांचा खाली गोषवारा.

१) Lt Gen Hooda (निवृत्त असावेत) म्हणतात की सार्वजनिक माहिती पेक्षा अधिकची माहिती त्यांच्याकडे नाही पण लदाख परिसर व Line of Actual Control (LAC) चे भारतीय लष्कराकडून होणारे व्यवस्थापन पद्धतीची त्यांना व्यवस्थीत कल्पना आहे.

२) ज्या काही क्षेत्रात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेबाबत भारत आणि चिनचे आपापले म्हणणे आहे त्यात Pangong Tso and Depsang या दोन जागांचा समावेश होतो . आत्ता पर्यंतची स्थिती आपापल्या म्हणण्यानुसार असलेल्या नियंत्रण रेषे पर्यंत दोन्हीही फौजांनी आपापली गस्त चालू ठेवावी पण कायमस्वरूपी प्रेझेन्स ठेवू नये. म्हणजे दोन्ही बाजूंचा क्लेम चालू राही.

३) Pangong Tso आणि Depsang, मध्ये जिथे गस्त करण्यासाठी चिनी आणि भारतीय सैन्य दोन्हींनाही परवानगी होती तिथे चिनने स्वतःच्या सैन्यतळाचा जम बसवून भारतीय सैन्याला गस्त घालण्यापासून रोखून ठेवले आहे. -म्हणजे चिनचे सैन्य गस्त घालून गेले असते आणि भारतीय सैन्यालाही त्यांची गस्त घालता आली असती तर समस्या नव्हती.

४) कायमस्वरूपी तळ दोन्ही सेनांनी करू नयेत असा ताळमेळ असताना तो चिनी सैन्याने मोडू नये अशी अपेक्षा आहे एखाद्या बाजूने मोडला तर चर्चेच्या नेमक्या पायर्‍या करारात आहेत आणि त्या पायर्‍यांमध्ये भारतीय सैन्याने सांगितल्या प्रमाणे त्यांची गस्त संपवून चिनी सैन्य मागे फिरलेले नाही उलट पक्षी सैन्य तळ अधिक मजबूत केला आहे. त्यामुळे चर्चेद्वारे चिनी सैन्याने मागे फिरावे म्हणून भारतीय बाजूकडून सांगून पाहिले जात आहे.

५) हुडांच्या म्हणण्यानुसार युद्धाची भूमिका घेण्यापुर्वी चर्चेच्या संधी वापरून घेणे अधिक उचित पण आपल्या बाजूने होणारी चर्चा अधिक नि:संदिग्ध अशा स्वरूपाची असावयास हवी.

६) 'विवाद चालू असलेले सीमा क्षेत्र' आणि 'विवाद्य सीमा क्षेत्र' या दोन वाक्य प्रयोगात अल्पसा पण महत्वाचा फरक आहे. 'विवाद चालू असलेले सीमा क्षेत्र' ला 'विवाद्य सीमा क्षेत्र' म्हटले की मानसिक दृष्ट्या दुसर्‍याची बाजू तुम्ही आधीच स्विकारून दुसर्‍या बाजूस अधिकची संधी देता तर हुडांच्या म्हणण्यानुसार भारतीय सीमेच्या बाबत भारतीय सैन्याच्या अधिकार विषयक तडजोड करण्याचे भारतीयांना कसलेही कारण नाही. ज्या भूभागावर भारत अधिकार सांगतो त्यास 'विवाद्य सीमा क्षेत्र' ‘disputed area’ and ‘grey zone’ हे शब्द प्रयोग भारतीयांनी टाळले पाहीजे.

७) सध्या 'विवाद चालू असलेल्या सीमा क्षेत्रात' समस्या असली तरीही भारतीय सैन्य संपूर्ण नियंत्रणातील भूमीवरील कब्जा गामावत चालले आहे अशी दिशाभूल होते आहे ती दिशाभूल बरोबर नाही, सरकारे कोणतीही असोत डोळ्यात तेल घालून संपूर्ण नियंत्रणातील कोणताही भूभाग भारतीय सुरक्षा दलांनी अद्याप गमावलेला नाही. तसा अभास निर्माण करणे भारतीय सुरक्षा दलांच्या आता पर्यंतच्या योगदानास कमी लेखणारे ठरते. त्यामुळे भारतीयांचे मनोबल खच्ची करण्याची शत्रुस हकनाक संधी मिळते अशी संधी देणे सर्वांनीच टाळले पाहिजे.

८) आंतरराष्ट्रीय राजकारणात क्षमता व इच्छाशक्ती आणि त्या तुम्ही नि:सदिंग्धपणे कसा जाणवून देता हे महत्वाचे असते.

In international politics, deterring an adversary depends a lot on how we convey our intentions. Thomas C. Schelling writes in his classic work Arms and Influence, “It is a tradition in military planning to attend to an enemy’s capabilities, not his intentions. Bur deterrence is about intentions - not just estimating enemy intentions but influencing them. The hardest part is communicating our own intentions.”

९) नियंत्रण रेषेच्या बाबत आतापर्यंत आखून दिलेल्या परंपरा आणि करारांचे उल्लंघन चिनी सैन्याकडून होते आहे. त्यांनी मागे फिरावयास हवे आहे. आणि तसे मागे न फिरण्याची किंमत मोठी असू शकते त्यासाठी आवश्यक्ष क्षमता आणि इच्छाशक्ती भारताकडे आहे याची सुसप्ष्ट शब्दात कल्पना चिनींना नि:संदिग्धपणे सर्व स्तरावरून करून द्यावयास हवी.

१०) चिनी सैन्याने मागे फिरून आधीची स्थिती बहाल केली जाईल यासाठी भारताने ठाम असावे, चिनींच्या नव्या उपद्व्यापांचे गांभीर्य कमी न लेखता डिटरन्स आणि कंपेलन्स या दोन्ही मार्गांचा अवलंब करावा. दोन्ही गोष्टींचा अवलंब तुम्ही किती करता यावरून तुमचा शत्रु तुम्हाला जोखत असतो.

११) काही वेळा शत्रुपक्षाला संबंधांवर गंभीर परिणाम होतो आणि त्याची किंमत मोठी आहे हे कृतीतून दाखवून देणे खासकरून तुमचा शत्रु तुमच्या पेक्षा बलाढ्य असल्यास महत्वाचे असते त्या दृष्टीने कृती आणि संवादात नि:संदिग्धता हवी.

१२) शत्रु डोक्यावर बसलेला असतानाची वेळ सर्व राजकीय इच्छाशक्तीच्या एकोप्याची असते की ज्यामुळे शत्रु राष्ट्रास सुस्पष्ट संदेश जाऊ शकेल, हि वेळ राजकीय उखाळ्या पाखाळ्यांची अथवा टिव्हीपुरती चर्चा मर्यादीत ठेवण्याची नव्हे.

* हुडांच्या लेखाचा दुवा पुन्हा एकदा

* अनुषंगिका व्यतरीक्त अवांतरे आणि शुद्धलेखन चर्चा टाळण्यासाठी आणि चर्चा सहभागासाठी अनेक आभार.

प्रतिक्रिया

शाम भागवत's picture

1 Jul 2020 - 8:42 pm | शाम भागवत

नियंत्रण रेषेच्या बाबत आतापर्यंत आखून दिलेल्या परंपरा आणि करारांचे उल्लंघन चिनी सैन्याकडून होते आहे.

चीनने पायंडा मोडलाय.
सहमत.

मदनबाण's picture

3 Jul 2020 - 10:55 am | मदनबाण

P1
“ There will be no withdrawal without written orders and these orders shall never be issued.”
: - Field Marshal Sam Manekshaw as Core Commander in 1962.

चीन आणि इतर :-

Russia's Vladivostok celebration irks Chinese diplomat, says 'in the past it was our Haishenwai'
Russia accuses scientist of treason for passing secrets to China: lawyer
Myanmar accuses China of arming terror groups, seeks international help to suppress them

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Akele Akele Kahan Ja Rahe Ho... :- An Evening In Paris

कानडाऊ योगेशु's picture

3 Jul 2020 - 12:00 pm | कानडाऊ योगेशु

माझा मॅनेजर ऑस्ट्रेलियात शिफ्ट झालाय.रोज सकाळी मीटींग असते. त्याने सांगितले कि ऑस्ट्रेलियन वृत्तपत्रातील वृत्ते पूर्णपणे चीनच्या बाजुची आहेत. म्हणजे भारताने आगळीक केली व चीनने योग्य प्रत्युत्तर दिले अश्या प्रकारची. कुणी परदेशस्थ मिपाकर ह्यावर अधिक प्रकाश टाकु शकेल.

अभ्या..'s picture

3 Jul 2020 - 12:10 pm | अभ्या..

माहितगार साह्याबाना चीनशी चर्चा करणेसाठी भारतातर्फे पाठवले पाहिजे.
जिनपिंग काका बीजिंग सुध्दा आपल्याला देऊन मंगोलियात राहायला जातील.
;)

शाम भागवत's picture

3 Jul 2020 - 12:46 pm | शाम भागवत

किती ते चिडवायचं?
:)))

निसटत्या बाजू आणि उत्तरदायित्वास नकार !

कंडोम फाटून पोरगा झाल्यावर या बाबी उपयोगी असतील

धोकादाय़क क्षेत्रात "मुसंडी" मारणार्‍यांनी ध्यानात ठेवाव्यात

मदनबाण's picture

3 Jul 2020 - 11:09 pm | मदनबाण

P1

बर्नॉल चा खप आता नक्कीच वाढणार असं दिसतय !

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Akele Akele Kahan Ja Rahe Ho... :- An Evening In Paris

वामन देशमुख's picture

4 Jul 2020 - 5:10 pm | वामन देशमुख

आता चीनने रशियासोबतदेखील जमीन जिहाद उकरून काढला आहे!

आंतरजालावरील माहितीनुसार व्लादिवोस्तोक हे प्रशांत महासागरातील चीन, उत्तर कोरिया आणि रशियाच्या सीमांजवळील बेटावरचे एक शहर आहे. दुसऱ्या महायुद्धात रशिया-जर्मनीत इथे तुंबळ लढाई झाली होती. रशियाच्या नौदलाचा इथे एक मोठा तळ आहे.

मला सापडलेली बातमी

गूगल नकाशात व्लादिवोस्तोक Vladivostok

वामन देशमुख's picture

6 Jul 2020 - 2:16 pm | वामन देशमुख

चीनने आता भारत, रशिया, नेपाळ... पाठोपाठ भूतानबरोबरही जमीन जिहाद सुरु केला आहे.

संबंधित बातमी

काही महिन्यांपूर्वीची बातमी

मला एक प्रश्न पडलाय, - शक्यतो कुठल्याही देशाने, एकावेळी इतर एकाच देशाशी शत्रुत्व / युद्ध/ लढाई करावी असं कॉमन सेन्स सांगतो. मग चीन एकाच वेळी इतक्या देशांशी वाद का उकरून काढत असावा?

ज्योत विझण्यापूर्वीची फडफड म्हणावी का?

सकतेंग वन्यजीव अभयारण्य गूगल नकाशात -

शाम भागवत's picture

6 Jul 2020 - 3:18 pm | शाम भागवत

मला एक शंका वारंवार येतीय.
जिनपिंग हे एक सत्ताकेंद्र आहे. कम्युनिस्ट पार्टी हे दुसरं सत्ता केंद्र असून सैन्याच्या निष्ठा पार्टीशी असतात.
कम्युनिस्ट पार्टी सैन्याच्या हालचाली मार्फत जिनपिंगना शह देण्याची चाल खेळत असेल का?

जिनपिंगच्या काळात काही मिलियन लोकांना तुरूंगात टाकले आहे अशी एक बातमी मध्यंतरी वाचली होती तेव्हांपासून ही शंका यायला लागली आहे.
जिनपिंगच्या आत्तापर्यंतची संपूर्ण कारकीर्द पाहाता, आत्ताची वेळ जिनपिंगना सर्वात अडचणीची असण्याची शक्यता आहे. अंतर्गत तसेच बहिर्गत शत्रू नेहमीच अशा संधीची वाट पहात असतात.

मला एक प्रश्न पडलाय, - शक्यतो कुठल्याही देशाने, एकावेळी इतर एकाच देशाशी शत्रुत्व / युद्ध/ लढाई करावी असं कॉमन सेन्स सांगतो. मग चीन एकाच वेळी इतक्या देशांशी वाद का उकरून काढत असावा?

- चीनलगत सगळ्या देशांची सध्याची आर्थिक स्थिती बघता, एक महिना जरी युद्धसदृश होस्टाईल वातावरण त्या देशांवर लादलं गेलं तर आर्थिक कंबरडं पूर्णपणे मोडेल.
- त्यांना मदत करण्यासाठी जे जे देश पैसा ओततील त्यांची स्वतःची स्थितीदेखील, युद्धपरिस्थिती जास्त काळ चालू देणार नाही.
- अशा परिस्थितीत काही आर्थिक सामंजस्य करार करून या देशांना आपल्या पंखाखाली आणायची योजना देखील असू शकते.
- किंवा युद्धखोरगिरी करून आणखी जमीन बळकवायची संधी असू शकते.

राघव's picture

7 Jul 2020 - 2:15 pm | राघव

म्हणजे, हे सगळं दबावतंत्र आहे असं म्हणण्यास वाव आहे. एकाचवेळी अनेक आघाड्यांवर खेळणं हे युद्धनीतीत डिकॉय म्हणूनच वापरलं जाणारं तंत्र आहे.

अर्थात् ही सगळी भाकीतं. चीन अजून किती ठिकाणी आणि काय काय उपद्व्याप करतोय ती माहिती काढली पाहिजे. विशेषतः मागच्या वर्ष-दीड वर्षातील. त्यातून साधारण त्याच्या खेळीचा अंदाज घ्यायला मदत होईल.

आत्ताही, जोवर डोवाल-वँग चर्चा झाल्याची बातमी आली नाही, तोवर डोवाल काय करताहेत/कुठे आहेत याचा काहीही पत्ता लागत नव्हता.

पाकनं २०,००० सैन्य पीओके मधे तैनात केल्याच्या बातम्या होत्या.
भारतानं अजूनही आपला सैन्याचा आघाडीवरचा बिल्ट-अप काढण्यास सुरुवात केलेली नाही.
चीन सैन्य सुद्धा १-२ किमीहून जास्त मागे गेलेलं अजून समजलेलं नाही.

येत्या २-३ महिन्यात कुणी [चीन/पाकीस्तान] कागाळी केली तर भारत सरळ पीओके घेण्याची चाल करेल काय? सद्यस्थितीत, भारताच्या बाजूनं शक्तीशाली देश असतांना आणि पाकिस्तान इतका कमजोर असतांना, एवढी चांगली वेळ परत कधी येईल सांगता येत नाही! :-)

शाम भागवत's picture

7 Jul 2020 - 2:55 pm | शाम भागवत

अहो, घटना घडतच असतात. आपण आपला स्वार्थ साधायचा असतो. ह्यालाच आंतरराष्टीय राजकारण म्हणतात. सगळं ठीकठाक होईल. १.पण कोण कोणाच्या बाजूस आहे हे तर कळलं.
२. ५९ ॲप बॅन झाले. कदाचित भारतियांना संधी मिळू शकेल.
३. रस्त्यांच्या कामातून हटवल. नक्कीच भारतीय कंपन्यांचा फायदा होईल.
४. सुरक्षितता या मुद्यावर ५जी मधून चीनला भारतातून बाजूला करता येईल.
५. खेळणी व छोट्या इलेक्ट्राॅनिक वस्तूंची खूप मोठा ग्राहकवर्ग म्हणजे बाजारपेठ चीनने भारतात निर्माण करून दिली आहे. या वस्तूंवर बंदी आणून भारतीय उद्योग त्यात शिरकाव करू शकतील. माल खपवण्यासाठी एक पैशाची सुध्दा जाहिरात करायची जरूरी नाहीये.
असो.
इथेच थांबतो. कारण अर्धा पेला भरलेला आहे का अर्धा रिकामा आहे यावर नेहमीच वाद होत असतात. :)

मदनबाण's picture

6 Jul 2020 - 1:49 pm | मदनबाण

P1
चायनीज हॅलिकॉप्टर सपोर्ट बेस [ संदर्भ :- China buying time with border talks, satellite images show PLA helicopter support base near stand-off areas ]
बॉर्डर वरुन जरी काही अंतराची माघार घेण्यास चीन ने सुरवात केली असेल तरी हुरळुन जायची गरज नाही, चीनने केलेली आणि चालवलेली तयारी काही वेगळा संदेश देते का ?

बादवे :- अतिरेक्यांच्या जनाज्याला गर्दी करुन गळे काढणार्‍या देशद्रोही काश्मिरी लोकांनी आपल्या २० वीरगतीस प्राप्त झालेल्या जवानांच्या बद्धल एक शब्दही काढलेला नाही हे अनेकांच्या लक्षात आलेच असेल.

जाता जाता :- चीनकडे आपल्या पेक्षा कैक पटीने जास्त सॅटेलाईट्स आहेत, शस्त्रास्त्र खरेदी बरोबरच आपण यात मागे राहणार नाही याची काळजी घेण्यात येइल असे आता वाटते.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Chale The Saath Milke... :- Hasina maan jayegi

वामन देशमुख's picture

6 Jul 2020 - 2:18 pm | वामन देशमुख

चीनने केलेली आणि चालवलेली तयारी काही वेगळा संदेश देते का ?

कुडन्ट अ‍ॅग्री मोअर... !

दीपक व्होरांचा एक विडिओ आहे, ज्यात त्यांनी काही अंदाज वर्तवले आहेत. अर्थात् हे सगळे मोघम अंदाजच आहेत, पण इंटरेस्टिंग आहेत.

मदनबाण's picture

6 Jul 2020 - 5:02 pm | मदनबाण

@ राघव, दिलेला व्हिडियो पाहिला आणि फार आवडला देखील. दिलेला व्हिडियो पाहिला गेल्यामुळे 100+ Chinese Killed in Galwan’ | PLA Veteran’s Big Expose | NewsX हा व्हिडियो देखील पाहण्यात आला ! परंतु ही बातमी कितपत सत्य आहे हे ठावूक नाही. [ इन्फो वॉर / सायकोलॉजिकल वॉरअसेल तर उत्तमच ! ]

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Chale The Saath Milke... :- Hasina maan jayegi

धन्यवाद बाणा. होय हा विडीओ तेवढा ऑथेंटीक वाटत नाही. पण ह्यात सुद्धा सीसीपी बद्दल जे भाकीत केलेलं दिसतं ते व्होरांच्या मताशी जुळणारं आहे. :-)

वामन देशमुख's picture

6 Jul 2020 - 9:45 pm | वामन देशमुख

व्हिडिओ आवडला, बरीचशी मतं पटली.

वामन देशमुख's picture

7 Jul 2020 - 7:16 pm | वामन देशमुख

Why China’s New Claim to Bhutan’s Territory Bordering Arunachal is Making Delhi Uneasy

कदाचित, भारतावर भूतानच्या संरक्षणाची जबाबदारी आहे, म्हणून.

शाम भागवत's picture

7 Jul 2020 - 8:35 pm | शाम भागवत

१९६२ च्या युद्धात भारतीय सैन्य पळत सुटले. चीनी सैनीक पाठलाग करत मागे लागले. असे करत ते आसाम मधे म्हणजे आत्ताचा (अरूणाचल प्रदेश ) घुसले. याच मार्गाने आपण तिबेटशी संबंध ठेवत आलो होतो. दलाई लामाही याच मार्गाने पळून भारतात आश्रयासाठी आले होते.

मात्र त्यानंतर चिनी सैनिक माघारी परत गेले. त्यांना बहुधा हा सगळा थोरातांचा सापळा वाटत होता. प्रतापगडाखाली जसा अफजुलखान स्वखुशीने चालत आला होता, तसंच चीन अरूणाचल प्रदेशात चालून आला होता. त्याचे रसदीचे सर्व माग ताणले गेले होते. आजूबाजूच्या डोंगरात भारतीय सैन्य तोफेच्या बाराच्या इशाऱ्याची वाट बघतंय अशी कदाचित चीनी सैन्याला भिती वाटली असेल. हे सर्व आजूबाजूचे भाग भारतीयांना परिचित व चिनी सैन्याला अगम्य होते. थोरातांनी हेच सांगितले होते की, अशा स्थितीत आपण प्रत्येक चीनी सैनीक कापून काढू शकू. पराजयाच रूपांतर विजयात करू शकू.

प्रतापगडाच्या लढाईचा थोरातसाहेबांनी अभ्यास केला नसेल हे कसे शक्य आहे? पण थोरातांना सगळं युध्द संपल्यावर, आता काहीही करता येणार नाही अशी परिस्थिती आल्यावर दिल्लीवरून बोलावणं आलं. नेहरू, कृष्णमेनन व कौल यांना शिवाजी महाराज, त्यांचा गनिमी कावा, डोंगर दऱ्यांचा उपयोग करून करायचं त्यांच युध्दतंत्र वगैरे कळणं शक्य नव्हते. त्यामुळे त्यांना थोरातही कळले नाहीत.

पण चिन्यांना मात्र या सगळ्यातला धोका कळला होता. ते ताबडतोब तिथून मागे फिरले. पण ते जिथून मागे फिरले तिथपर्यंतचा भाग आपण जिंकलेला असून तो भाग आपला आहे अशी गैरसमजूत त्यांनी करून घेतली आहे. हेच गलवान खोऱ्याबाबतही झाले आहे. आपण मात्र आपला जिथपर्यंत ताबा आहे, तो आपला भाग म्हणत आहोत.

सर्व जगावर राज्य करणाऱ्या ब्रिटिशांनी तिबेट मुद्दामहून बफर स्टेट म्हणून ठेवला होता, त्यामागे त्यांचा नक्कीच काहीतरी हेतू होता, तेच धोरण पुढे चालू ठेवले असते तरी पुष्कळ झाले असते. पण आपण तसेतर केले नाहीच, उलट आपली तिबेटमधली आपली सैन्याची तुकडी परत बोलावली.

भाग २ वर दिलेली प्रतिक्रिया इथेपन चिकटवतोय. हेच थोडसं भूतानच्या बाबतीत झालं होतं.

स्ट्रॅटेजिक अ‍ॅडव्हांटेज - दौलतबेग ओल्डी एअरस्ट्रीप

https://economictimes.indiatimes.com/news/defence/i-decided-to-reactivat...

https://www.youtube.com/watch?v=5kDt1zQx__0

मदनबाण's picture

7 Jul 2020 - 11:16 pm | मदनबाण

@ राघव आजच पूर्व एयर चीफ मार्शल प्रणब कुमार बारबोरा यांचा वरील व्हिडियो पाहिला होता, खरंतर काही काळा पूर्वी त्यांनी दिलेली मुलाखत वाचनात आली होती पण वाचनात घाई केल्याने त्यांचे नाव मात्र नजरेतुन सुटले होते [ जी दौलत बेग ओल्डी संबंधीची त्यांनी केलेल्या खुलाश्या बद्धल होती. ] मग मला वाटतं हल्लीच एका डिबेटच्या मध्ये त्यांना प्रथम पाहिले आणि ऐकले, पण तरीही याही वेळेस माझे लक्ष त्यांच्या नावाकडे गेले नाही ! मुलाखत पाहतांना त्या व्हिडियोतील त्यांची बोलण्याची शैली / लकब मला प्रचंड आवडली [ हा व्हिडियो मला आज बराच शोध घेउन देखील मिळाला नाही. :( ] हवा असलेला व्हिडियो मिळाला नसला तरी त्यांचाच दुसरा महत्वपूर्ण व्हिडियो मिळाला आणि पाहिला तो सुद्धा खाली देत आहे.
मग त्यांच्या बद्धल अधिक माहिती मला खालील व्हिडियोतुन मिळाली आणि तो व्हिडियो पाहुन झाल्यावर मी वरती दिलेला व्हिडियो पाहिला.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Yeh Wadiyan Yeh Fizaayein... :- Aaj Aur Kal

शाम भागवत's picture

11 Jul 2020 - 11:19 am | शाम भागवत

वुहान परत एकदा गाजायला लागेल असं दिसतंय.

सीपीईसीमुळे वाढणाऱ्या मागणीमुळे प्रचंड उत्पादन करायला लागणार आहे असे वाटल्याने अनेक शहरे निर्माण केली गेली. त्यात प्रचंड गुंतवणूक झालीय. बांधकाम तर झाली आहेत. पण उद्योगांची वाढ राहोच, मागणीअभावी उद्योगक्षेत्रच आक्रसत चाललंय. त्यामुळे या शहरात माणसे राहावयास कधी आलीच नाहीत. तिथे भुते राहातात असं म्हटलं जायचं. आतातर तिथे भुते सुध्दा राहणार नाहीत अशी परिस्थिती येतीय की काय असं वाटायला लागलंय.

वुहानमधली सोन्याच्या व्यवसायातील सर्वात मोठी कंपनी असलेल्या, किंग्ज गोल्ड ज्युवेलरी नावाच्या कंपनीने ८३ टन सोने तारण ठेऊन २.८ डाॅलरच कर्ज उचललं. ह्या कंपनीचं या भुतांच्या शहरातील व्यवहारात काही अब्ज डाॅलर्सच नुकसान झाल्याने त्यांना हे कर्ज फेडता आलं नाही. तेव्हा त्यांनी तारण म्हणून ठेवलेल्या सोन्याची तपासणी केली तर सोन्याच्या ऐवजी सोन्याचा मुलामा दिलेले पितळी बार सापडले.

ही २२ मेफेब्रुवारी २०२० मधली गोष्ट आहे. असं म्हटलं जातंय की, हाच प्रकार अनेक कंपन्यांनी केलाय व हळू हळू सगळेच देणीदार पैशासाठी तगादे लावायला गर्दी करायला लागले आहेत. अनेक अब्ज डाॅलर्सच्या पितळी सोन्याचे हे व्यवहार आहेत. यात विमा कंपन्यांनी हमी घेतलेली असल्याने त्याही झोपणार आहेत.

अर्थव्यवस्थेवर ताण आलेला असतानाच नेमके हे सगळे उघडकीस येतंय.<\a>

सतिश गावडे's picture

11 Jul 2020 - 11:37 am | सतिश गावडे

किंग्ज गोल्ड ज्युवेलरी नावाच्या कंपनीने ८३ टन सोने तारण ठेऊन २.८ डाॅलरच कर्ज उचललं.

इथे हजार/लाख/कोटी/ अब्ज वगैरे टंकायचं राहून गेलंय का?

शाम भागवत's picture

11 Jul 2020 - 12:31 pm | शाम भागवत

:)

८३ टन सोन्याचा मुलामा दिलेल्या पितळी बारच्या तारणावर २.८ अब्ज अमेरिकन डाॅलरच कर्ज उचलले.

फेब्रुवारी मधे हप्ता चुकला म्हणून तारण ठेवलेले सोन्याच्या संदर्भात कोर्ट ॲार्डर २२ मेला मिळाली.

शाम भागवत's picture

11 Jul 2020 - 3:03 pm | शाम भागवत

चीनच्या एकूण सोन्याच्या साठ्याचा ४.२% = ८३ टन सोने

मदनबाण's picture

12 Jul 2020 - 12:25 am | मदनबाण

जालावर रडार आणि अँटी रडार मिसाइल्स ची माहिती काही काळा पासुन येत आहे, विशेषतः चीन ने लडाख बॉर्डर जवळ त्यांची एस-४०० सिस्टिम डिप्लॉय केल्या नंतर.
माझ्या माहिती नुसार चीन ने ही सिस्टिम अक्साई चीन मधील TSO Tang Lake जवळ उभी केलेली आहे !
या एस-४०० सिस्टिमला आपले ब्राह्मोस सुपरसॉनिक क्रूज मिसाइल न्यूट्रिलाइझ करु शकते असे म्हंटले जात आहे. [ ब्राम्होस ची सीइपी १ मिटर आहे. सीइपी :- Circular Error Probability ] हे मिसाइल रडार मधुन निघणार्‍या लहरी पकडु शकते की नाही ते ठावूक नाही, पण सॅटॅलाइट ने किंवा इतर पद्धतीने एस-४०० चे लोकेशन कोऑर्डिनेट्स मिळाले तर ती सिस्टिम हिट करता येइल, अर्थात एस-४०० ही इझी मुव्ह सिस्टिम असल्याने कमी वेळेत या सिस्टिम चे अचूक लोकेशन मिळवणे हे महत्वाचे ठरावे.

आपल्याकडुन देखील एस-४०० सिस्टिमी खरेदी विषयी घाई करण्याच्या बातम्या आणि त्या सिस्टिमला विरोध करणार्‍या बातम्या येत आहेत.
आपल्या लष्कराने मागच्या वर्षी ChangThang Prahar या कोडनेम ने मोठ्या स्केल चे वॉर ड्रिल पूर्व लडाख मधील चीनला लागुन असलेल्या सीमा भागात केले होते.
आपल्या बाजुने Barak-8 एअर डिफेन्स सिस्टिम डिप्लॉय केली आहे अश्या बातम्या सध्या जालावर दिसत आहेत, तसेच अमेरिकेकडुन NASAMS II मिसाइल शिल्ड विकत घेण्या विषयी देखील चर्चा चालु असल्याचे समजते आणि याच बरोबर रशियाकडुन ३० Tula ZRPK “Shell-S” विकत घेण्याचा विचार असल्याचे समजते आहे.

संदर्भ :-
Indian army conducts massive exercise near China border in Eastern Ladakh [ २०१९ ची बातमी ]
Indian Army Conducts Massive Exercise ‘Chang Thang in Eastern Ladakh [ २०१९ ची बातमी ]
China ‘deploys’ S-400s, IAF has war gamed the scenario multiple times for air ops
New Delhi to get Washington-type missile shield NASAMS II
Why Subramanian Swamy doesn’t want India to use S-400 missiles against China
'After Banning Chinese Apps, Check Chinese Software In Russian S-400': Subramanian Swamy
India wants to rush delivery of S-400 anti-missile system — here’s why it doesn’t want any delays
India to deploy Barak-8 Air Defence System in Ladakh against China
India intend to buy more than 30 Tula ZRPK “Shell-S” from Russia

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Chand Si Mehbooba... :- Himalay Ki God Mein

माझ्या माहिती नुसार चीन ने ही सिस्टिम अक्साई चीन मधील TSO Tang Lake जवळ उभी केलेली आहे !
या बातमी बद्धल जालावर अधिक गहन शोध घेतल्यावर मिळालेली माहिती खालील दोन इमेजेस मधुन समजु शकते, तसेच एस ४०० च्या जागी एस ३०० असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
https://pbs.twimg.com/media/EcVU9jJWsAEVet0?format=jpg&name=medium
उजवीकडे एस ३०० चे लोकेशन पिवळ्या रंगाच्या पीन ने दर्शवले आहे.

https://pbs.twimg.com/media/EcJ899UUcAENoe-?format=jpg&name=4096x4096
रडार मधुन बाहेर पडणार्‍या लहरी त्याचे उगम स्थान म्हणजे रडार चे स्थान दर्शवतात.

तसेच Rutog County, Ngari Prefecture, Tibet, China [ Latitude :- 33.381 / Longitude :- 79.730 ] मध्ये देखील चीन ने अँन्टी एअर क्राफ्ट रडार बसवले असल्याचे म्हंटले जात आहे.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Chand Si Mehbooba... :- Himalay Ki God Mein

इस्लामी राष्ट्र म्हणुन ज्याची निर्मीती हिंदुंच्या विरोधात झाली त्यांची त्यांच्याच देशात नमाज पठण करण्याचे वांदे झाले आहेत हे मागच्या धाग्यात सांगितले होते, पण आज चक्क वेगळी बातमी वाचली ती खाली देतो...
Watch: Pakistanis sing 'Vande Mataram' with Indians in London protest against China
गंमत पहा, ज्यांनी हिंदूंच्या कत्तली करुन त्यांच्या स्त्रियांची विटंबना केली तेच आता वंदे मातरम म्हणत आहेत आणि हिंदुस्थानात काही बोकड अजुनही वंदे मातरम म्हणणार नाहीत असे म्हणतात... त्यांनी आता तरी बोध घेण्यास हरकत नसावी !

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Aate Jate Khoobsurat Awara Sadko Pe... :- Anurodh

मदनबाण's picture

16 Jul 2020 - 1:04 pm | मदनबाण

चीनी उपद्व्याप...
China refuses to back off from Finger 4 area in Ladakh, India increases deployment of tanks near LAC
How a wrong analysis of satellite images swamped China's social media

चीनकडुन आर्टिलरीचा अभ्यास :-

आपली बाजु :-

अपाचे हॅलिकॉप्टर :-

टँक मुव्हमेंट :-

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Aaja Re Pardesi Main... :- Madhumati

आपल्या इस्रोचा स्पाय सॅटेलाइट [ प्रोजेक्ट कौटिल्य ]जो इलेक्ट्रॉनिक इंटलिजन्स गोळा करतो तो हल्लीच तिबेट वरुन गेल्याने चीन मध्ये खळबळ उडाल्याचे वृत्त आहे. हा सॅटेलाइट शत्रुपक्षाच्या प्रदेशातील रेडियो सिग्नल मॉनिटर करतो. असेच पाकिस्तानच्या जिन्हा नेव्हल बेस च्या बाबतीत देखील केले गेले आहे.
चीन ने तिबेट मधील त्यांचे एअर बेस / तसेच इतर ठिकाणच्या हालचाली वाढवल्याच्या बातम्या काही काळा पासुन येत आहेत.

गुगल अर्थ मधुन अश्या आणि इतर बेसचा मी शोध घेतला :-

होतान [ Hotan ] एअर बेस :- [ यात चीन ची फायटर जेट्स दृष्टीस पडतात. ]
https://earth.google.com/web/search/hotan+airbase/@37.03579634,79.87849616,1423.40305644a,771.35787717d,35y,0h,0t,0r/data=CigiJgokCeUl0t3ih0JAEbzmRpGrf0JAGaZvGmBt8FNAIZJ_3Q3O6VNA

होतान एअर बेस :- [ यात देखील चीन ची फायटर जेट्स दृष्टीस पडतात. ]
https://earth.google.com/web/search/hotan+airbase/@37.04102081,79.86165193,1414.27091479a,694.39276466d,35y,0h,0t,0r/data=CigiJgokCeUl0t3ih0JAEbzmRpGrf0JAGaZvGmBt8FNAIZJ_3Q3O6VNA

होतान :- [ बहुतेक चायनीज एचक्यू ९ बेस ]
https://earth.google.com/web/search/hotan+airbase/@36.99929174,79.92636379,1471.94695782a,680.15184499d,35y,0h,0t,0r/data=CigiJgokCeUl0t3ih0JAEbzmRpGrf0JAGaZvGmBt8FNAIZJ_3Q3O6VNA

नागरी गुनसा धाबपट्टी [ Ngari Gunsa ] :- ही तिबेट मधील धावपट्टी असुन पैंगोंग लेक पासुन फक्त २०० किलोमीटर अंतरावर हा बेस आहे.
https://earth.google.com/web/search/Ngari+Kunsha+Airport,+%e7%8b%ae%e6%b...@32.10024121,80.05772868,4267.59716819a,10569.9799052d,35y,0h,3.82180814t,0r/data=CigiJgokCW2_1stZhkBAEf_g7m5ODz5AGfUfeocyJlVAIZDaprm5XVNA

स्कार्दू एअरबेस [ Skardu ]:- [ पाकव्याप्त काश्मीर ] [ इथे पाकड्यांनी JF-17 फायटर जेट उतरवले असुन त्यांचा युद्ध सराव सुरु असल्याच्या बातम्या आहेत.]
https://earth.google.com/web/search/Skardu+/@35.33878529,75.54982189,2197.2641166a,6380.98297464d,35y,0h,0t,0r/data=CnEaRxJBCiQweDM4ZTQ2MzkyYmFjMTAyODM6MHhjMmY3YTc4NmY5ODMzZDcZvNaUGpCpQUAhchmS7kLjUkAqB1NrYXJkdSAYAiABIiYKJAkOc7_WrBJAQBGpdJID3QdAQBn_EWqs3AlUQCHf6Nr6hv1TQA

[सुचना :- सगळ्या लिंक संपूर्ण कॉपी पेस्ट करुनच ब्राउजर मध्ये उघडाव्यात. तसेच दिसणार्‍या इमेजेस लेटेस्ट नाहीत. ]

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Namo Namo... :- Kedarnath

*

...त्यांचा युद्ध सुरु असल्याच्या बातम्या आहेत....

'युद्ध सराव सुरू' म्हणावयाचे आहे का ? (मी आज दिवसभरात बातम्या बघीतल्या नाहीत)

'युद्ध सराव सुरू' म्हणावयाचे आहे का ?
हो, लिखाणात चूक झाली आहे. क्षमस्व. [ चूक लक्षात आणुन दिल्या बद्धल आभारी आहे. ]

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Namo Namo... :- Kedarnath

धनावडे's picture

28 Jul 2020 - 4:15 pm | धनावडे

काही दिवसापासून मराठी वृत्तपत्रांच्या वेबसाईट वर चिनी भाषेतील जाहिराती दिसतायत, हा हॅकिंग च काही प्रकार आहे का?

नेमक्या कोण कोणती वृत्तपत्रात तुम्हाला चिनी भाषी जाहीराती दिसतात ?

धनावडे's picture

28 Jul 2020 - 6:51 pm | धनावडे

लोकसत्ता आणि पुढारी

मदनबाण's picture

1 Sep 2020 - 8:50 pm | मदनबाण

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- New tensions on LAC shouldn’t escalate like Galwan. Raise diplomacy stakes to push China back

मदनबाण's picture

1 Sep 2020 - 8:54 pm | मदनबाण

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- New tensions on LAC shouldn’t escalate like Galwan. Raise diplomacy stakes to push China back

मदनबाण's picture

13 Sep 2020 - 9:31 pm | मदनबाण

आत्ताच माझ्या वाचनात पत्रकारीते मधील जवळपास ८० वर्ष जुने आणि उत्तम मॅगझीन असलेल्या न्यूजविक मधील एक लेख आला...
यातील मला महत्वाच्या वाटलेल्या काही ओळी खाली देत आहे.
China is thought to have suffered at least 43 deaths in the Galwan clash. Paskal says the number of Chinese killed could exceed 60. Indian troops fought back ferociously. Beijing won't admit the extent of the debacle.

Then, beginning late last month, for the first time in a half-century, India carried out an offensive against China, taking back high ground the Chinese recently grabbed. China's forces were surprised when Indian troops mounted their attempt to retake strategic high points. Stunned Chinese soldiers retreated.

China's subsequent efforts to counter the Indian moves proved ineffective. At least for the moment, India's troops, in the southernmost of the three areas of conflict, are in control of territory once in Chinese hands.

संदर्भ :- The Chinese Army Flops in India. What Will Xi Do Next? | Opinion

टिवटिव अपडेट :-
Images allegedly taken by #China's Gaofen-2 satellite begin circulating chinese social media, showing #India's new camps sitting above the #SpanggurGap & #China's camps below it the image reaffirms action by the #IndianArmy

Image two shows the line of sight India enjoys

संदर्भ :- d-atis

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Indian vs Chinese Air Force: Is the Indian Air Force superior to the Chinese PLAF?

कोहंसोहं१०'s picture

13 Sep 2020 - 11:03 pm | कोहंसोहं१०

https://www.aajtak.in/technology/mobile/story/redmi-9i-price-in-india-le...

https://www.aajtak.in/technology/mobile/story/oppo-f17-price-in-india-st...

देशात चिनी वस्तूवरील बॅन हा विषय एवढ्या दिवसांपासून सुरु असताना देशातील नंबर १ न्युज चॅनेल म्हणवून घेणारे चिनी कंपन्यांची जाहिरात करत आहेत.
एकीकडे मोठमोठ्या बातम्या द्यायच्या, चीनविरोधी सूर आळवायचा, चर्चा घडवून आणायच्या आणि दुसरीकडे न्युजच्या नावाखाली त्यांच्या कंपन्यांच्या प्रोडक्टस ची जाहिरात साईटवर करायची. हे बरोबर वाटते का?
असल्या न्युज बॅन करून चिन्यांच्या उपद्व्यापांना योग्य उत्तर देण्याची जबाबदारी यांची नाही का?

चीन बरोबर जे मतभेद आहेत ते चर्चे नीच सोडवले पाहिजेत.
हवं तर दुसऱ्या देशाची मदत घेवून चीन वर राज नैतिक दबाव आणावा.
युद्ध हा पर्याय भारताला खूप महाग पडेल.
चीन समोर भारतीय सेना टिकाव धरू शकणार नाही जेव्हा उघड युद्धाची घोषणा होईल.
नेहरू सारखी अवस्था मोदी ची होईल
तंत्र ज्ञान मध्ये चीन भारताच्या खूप पुढे आहे.
तुलना होवू शकत नाही

बरोबर.. परिस्थिती हाताबाहेर जाण्याआधी हे घडायला पाहिजे...वैर्याचा काळ.. धैर्याने घ्यावं लागेल..

प्रसाद_१९८२'s picture

14 Sep 2020 - 6:37 pm | प्रसाद_१९८२

चीन समोर भारतीय सेना टिकाव धरू शकणार नाही जेव्हा उघड युद्धाची घोषणा होईल.
--

या विधानाला काही आधार की असाच हवेत गोळीबार ?
मुळात चीनी सैन्याला युद्धाचा अनुभव शून्य आहे या उलट पाकिस्तानच्या कृपेने भारतीय जवान सतत एक्टिव असतात. या शिवाय सियाचीन सारख्या अतिऊंच भागांचा भारतीय सैन्याला सराव आहे याच्या उलट चीनी सैन्य समुद्र सपाटिच्या भागातून हिमालयात येते.

हिमालयातील लडाक भागात जर युद्ध पेटले तर भारतीय सैन्य चीन्यांना वरचढ ठरेल यात शंका नाही. याची छोटिसी झलक भारतीय सैन्याने, १९६२च्या युद्धात गमावलेले अनेक पॉईंट परत घेऊन दाखवून दिली आहे.

१. सर्वात महत्वाचे म्हणजे आपण थोरातांनी सांगितल्याप्रमाणे लढत आहोत. आपल्या सर्व हालचाली रस्ते तयार झाल्यावर रस्त्यांच्या सहाय्याने होताहेत. त्यामुळे रसदीवर ताण येण्याचे काहीच कारण नाहीये.

२. १९६२ च्या युध्दानंतर उंच भागातील विरळ हवेत कार्यरत राहणारी सेना आपण उभारली व तिची व्याप्ती आपण वाढवत राहीलो आहोत. आजमितीला ही संख्या दोन लाखांपर्यंत गेली आहे. हे सैन्य जगांत अत्युकृष्ट मानलं जातंय. याबाबतीत रशिया, अमेरिका, फान्स वगैरे देशही आपल्याशी बरोबरी करू शकत नाहीत.

३. याच कारणामुळे आपले सैनिक जून महिन्यातील हातघाईच्या लढाईत वरचढ ठरले. “चिनी सैनिकांच्या मागे लागणे व त्यानंतर त्यांच्यावर हल्ला करणे” यातून हे दिसून आले. अशा हवेत दमसास टिकवून जोरात पळून जाणे सुध्दा चिनी सैनिकांना जमू शकलेले नाही असे दिसतेय. याउलट दम लागल्यामुळे हतबल झालेल्या चिनी सैनिकांना आपले सैनिक फारच वरचढ ठरलेले दिसताहेत. यानंतर कराटेचे प्रशिक्षण घेतलेले सैनिक चीनने तैनात केल्याची बातमी आली होती. पण ते सैनिक विरळ हवेत कितीवेळ हालचाली करू शकतात याला महत्व आहे. त्यांच्या कराटेच्या ज्ञानाचा तरच उपयोग आहे.

४. सियाचीन तसेच उंचावरील आपल्या ठाण्यांची संख्या अंदाजे २०० असून तिथे आपल्या सैनिकांची सतत ये जा चालू असते. रसद पुरवढ्याची कामे चालू असतात. त्यामुळे आपले सैनिक सतत तिथल्या हवेशी जमवून घेतलेले असे असतात. हे अनेक वर्षे चालू आहे. डोंगराळ प्रदेशातील आपले हे जगातील उत्कृष्ट सैन्य असून पाकिस्तानमुळे ते नेहमी सरावात असते.

५. १९६२ च्या युध्दात, युध्द सुरू झाल्यावर आपण गरम कपडे व हत्यारे परदेशातून आयात करायला सुरवात केली. जेव्हा ही युध्दसामुग्री आपल्याला मिळाली, तेव्हा चीनने एकतर्फी युध्दबंदीची घोषणा केल्याने आपण त्या युध्दसामुग्रीचा उपयोगही करू शकलो नव्हतो. यावेळी आपण ही तयारी अगोदर करतोय व नंतर चीनने दिलेले आव्हान स्विकारतोय. आपण उगीचच हातात तलवार आलीय म्हणून कोणावर धावून जात नाही आहोत. तर मिळालेले आव्हान परतावून लावतोय. सैन्याच्या ताकदीवर जैसे थे परिस्थिती आणायला चीनला भाग पाडतोय.

६. १९६२ ला चीन आपल्यावर हल्ला करणार नाही या समजूतीतच आपण होतो. आत्ताची सेना व सरकार सावध आहे असं वाटतंय. चीन आपला मुख्य शत्रू आहे, पाकीस्तान नव्हे हे वाक्य पर्रिकरांनी काही वर्षापूर्वी उच्चारले होते, त्यामुळे मला असं वाटतंय.

७. अमेरिका, जपान, फान्स व अमेरिका यांना त्यांच्या लष्करी उपग्रहावरून मिळणरी माहिती आता भारताला प्रत्यक्ष युध्दक्षेत्रावर मिळायला लागलीय की काय अशी शंका यायला लागलीय. त्यासाठीचे समन्वय संयुक्त युध्दसरावात करून घेतले असणे शक्य आहे. त्यासाठी अमेरिकेने नाटो राष्टांसारखा दर्जा भारताला दिला की काय असं वाटतंय. आजपर्यंत चीन गुपचूप हालचाली करून भारताला चकीत करायचा. आता बरोबर उलटं होतंय. चीनच्या हालचाली भारताला कळताहेत. त्याप्रमाणे भारत योजना आखतोय. तर भारताच्या हालचाली चीनला कळत नाहीयेत. भारताची खेळी झाल्यावर तो चकीत होतोय. त्याला बावचळायला होतंय. बंदूकांच्या फैरी हवेत झाडायला लागलाय.

८. यामुळे भारत तंत्रज्ञानाच्या बाबतीतही पुढावा मिळवायला लागलाय अशी माझी समजूत व्हायला लागलीय. तसं असेल तर मिझाईल, ड्रोन, तोफा यांचा पहिला मारा झाल्यावर त्याचा फिडबॅक तातडीने मिळून भारताचा मारा अधिक अचूक व भेदक होऊ शकतो. असे झाले तर चीन कितीही ताकदवान असला तरी आपण त्याचेवर हवाई प्रभूत्व मिळवू शकतो.

८. भारताच्या बदलेलेल्या या स्थितीचे परिणामही दिसताहेत. नेपाळचा भारत विरोध बदलतोय. श्रीलंकेचे नवीन सरकार चीन धार्जीणी भूमिका घेत नाहीये. उलट हबनटोटच्या बाबतीत आमची चूक झाली असं वक्तव्य करतोय. रशिया हळूहळू भारताची बाजू घ्यायला लागलाय. जर्मनीने तर उघड उघड चीनधार्जीणी भूमिका घेतली होती. पण तोही फेरविचार करायला लागलाय. अग्नेय आशियातले छोटे देशही चीन विरूध्द बोलायला लागले आहेत. इराणनेही चाबहार बंदराबदल भूमिका बदलायचे ठरवतोय.

९. जर असं असेल, तर पाकिस्तानवर आपण नक्कीच हवाई प्रभूत्व मिळवू शकू असं भारतीय सैन्याला वाटणे साहजिकच आहे. बांगलादेशच्या युध्दात हवाई प्रभूत्व मिळल्यावर आपल्या विमानदळाचा आपल्याला खूपच फायदा झाला होता. तसंच यावेळीही होऊ शकतो. तसं झालं तर दोन आघाड्यांवर लढणे सोपे होऊन जाते.

राफेल सारखी विमाने चीनच्या सरहद्दीवर ठेवणे व तेजस पाकिस्तानच्या बाजूला ठेवणे. तसेच १९७१ च्या युध्दात गाजलेली मिराज नव्याने घेणे व ते पाकिस्तानच्या सिमेवर तैनात करणे, यासर्व गोष्टी आपण हवाई युध्दात वर्चस्व मिळवणारच याबाबतची आपली सैन्याची खात्री दर्शवते. अर्थात वर उल्लेख केलेल्या चार प्रबळ देशांचे तंत्रज्ञान आपल्यामागे उभे राहिल्याने हे शक्य झाले असावे. यात अजून इस्त्रायलची मदत विचारात घेतलेली नाही. काही करून पाकिस्तानी अणुबाँवर ताबा मिळवायला तो देश अगदी टपून बसलेला असणार.

१०. हवाई प्रभूत्व मिळवलं तरी शेवटची लढाई सैन्यालाच करायला लागते. त्याबाबतीत भारतीय सैन्याने आपले श्रेष्ठत्व सिध्द केलच आहे. अस असेल तर भारताच्या बाजूने जास्तीत जास्त देश गोळा होणे यात आश्चर्य वाटण्यासारखे काहीच नाही. तरीही रस्त्याची कामे पूर्ण होईपर्यंत म्हणजे २०२२ पर्यंत लढाई टाळण्याचाच कल असण्याची शक्यता मला वाटते. तोपर्यंत आपली अर्थव्यवस्था सावरायलाही वेळ मिळू शकतो.

पण तोपर्यंत चीनला जैसे थे स्थिती ठेवायला भाग पाडायचे, वर्चस्व मिळवू द्यायचे नाही, तसेच आमच्यावर युध्द लादल्यास त्याची जबरदस्त किंमत चीनला मोजायला लागेल अशी जाणीव चीनला करून द्यायची इतपत भारताची सध्याची भूमिका असावी असं मला वाटते.

Rajesh188's picture

14 Sep 2020 - 10:58 pm | Rajesh188

पण आता पारंपरिक आणि सीमित क्षेत्रात च युद्ध होईल असे नाही.
चीन पाकिस्तान च्या भू भागावरून उत्तरेच्या सीमेवरून सुद्धा हल्ला करेल.
किंवा पाणबुडी चा वापर करून देशाच्या दक्षिण आणि पश्चिम सीमेवरून हल्ला करणे जास्त अवघड नसेल एवढे तंत्र ज्ञान पुढे गेले आहे.
चीन काही ही करेल नित्तीमत्ता त्याच्या जवळ नाही .
त्या मुळे सरासरी युद्ध टाळणे आणि शक्य होईल तेवढे जागतिक दडपण चीन वर ठेवणे हे शहान पणाचे असेल.
बाकी युद्ध झालेच तर सर्व बाबतीत तयारीत असणे कधी ही चांगलेच.
आता फक्त सैन्य च लढत नाही .
सायबर हल्ले,आणि अशा प्रकारचे अनेक हल्ले केले जातात..
इस्त्रायल चे उदाहरण घ्या सरळ सरळ पॅलेस्टाईन च्या मध्य भगी जावून नागरी वस्ती वर हल्ला करायला तो मागे पुढे पाहत नाही.
सीमेवर सैनिकी ठिकाण वरच हल्ला करण्याचे दिवस गेले आता .
अमेरिकेने पण अफगाणिस्तान मध्ये ,पाकिस्तान मध्ये ladhen साठी कसे हल्ले केले होते.

हे मुद्दे वाचून चांगल वाटलं..जय हिंद!जय हिंद की सेना!!

सकाळ २८ ॲाक्टोबर २०२०
भारताची क्षेपणास्त्र मारक क्षमता भेदक करण्यासाठी उपयुक्त बेका ( बेसिक एक्सचेंज अँड कोऑपरेशन एग्रीमेंट ) करारावर शिक्कामोर्तब झाले. या करारानुसार भारताला क्षेपणास्त्र हल्ल्यासाठी लागणारे अचूक भौगोलिक तपशील अमेरिकेकडून मिळतील.

👆
हवाई प्रभूत्व मिळवण्यासाठी हे फार महत्वाचे वाटतंय.

माहितगार's picture

14 Sep 2020 - 10:55 pm | माहितगार

अगदी सद्दाम हुसेन प्रमाणे देशाला तोंडघशी पाडून लढण्याची गरज नसावी पण अती कठीण परिस्थितीत राणा प्रताप ते शिवाजी महाराजांच्या उपरांतही भारतीय सैनिक कडवी झूंज देत आला आहे. तंत्रज्ञान रशिया आणि आमेरीका दोघांकडेही होते आणि दोन्ही महासत्तांना अफगाणीस्तानातील वास्तव्य महागात पडले. अफगाणी अतीरेक्यांच्या धर्मांधते बद्दल प्रेम नाही पण 'महासत्ता अथवा शत्रूराष्ट्राच्या वैचारीक लाचारी विहिन निष्ठा' असेल तर तंत्रज्ञान दुय्यम भूमिका निभावते. त्यामुळे प्रश्न वैचारीक लाचारीने परकीयांचे लांगूलचालन करणार्‍यांचा आहे. आमच्यातले देशप्रेमी भारतीय परकीयांची तळी चाटणार्‍यांना गरजेपेक्षा अधिक जागा देतो की काय याचा देशप्रेमींनी विचार करण्याची गरज असावी. वसुधैव कुटूंबकम म्हणजे देशाचा अभिमान विकावयास काढणे नसावे, वैचारीक लाचारांना समज देऊन समजावून देण्याची गरज असावी किंवा कसे.

भारतातील 10 हजार लोकांवर चीन पाळत आहे
केवळ अतिमहत्त्वाच्या राजकीय नेत्यांवरच नव्हे, तर राजकीय संस्था आणि उद्योगांवरही चीननं पाळत ठेवलीय. भारतातील सर्व क्षेत्रातील गुन्हेगारांचा तपशीलही या कंपनीकडे आहे.

लष्कर प्रमुख बिपीन रावत यांच्यासह 15 माजी लष्करप्रमुख, नौदलप्रमुख आणि हवाईदल प्रमुख, सरन्यायाधीश शरद बोबडे न्या. ए. एम. खानविलकर, लोकपाल पी. सी. घोष, कॅग जी. सी. मुर्मू यांच्या हालचालींची नोंदही ही कंपनी ठेवत असल्याचं दि इंडियन एक्स्प्रेसनं वृत्त म्हटलंय.

https://www.loksatta.com/photos/picture-gallery-others/2275222/before-fo...

आपले जवान ज्या प्रकारे चीनला टक्कर देत आहेत त्यासाठी त्यांना कडक सलाम. हेच आपल्या देशाचे खरे आणि मजबुत चौकिदार(रक्षणकरते) आहेत.

चीन च्या सीमेवरील सैनिकांच्या हालचाली पण भारतीय अती हुशार मिडिया नी प्रसिद्ध केले .
कशा साठी प्रसिद्ध करायचे सैनिक ऑपरेशन चा पण राजकीय फायदा उचलायचा आहे का?
त्या साठी गुप्त माहीत उघड करायची पण ह्यांची तयारी आहे.
सीमित युद्ध च चीन बरोबर होईल हे गृहीत
धरणे चुकीचे आहे.
सीमित युद्ध ठराविक भागा पुरतेच मर्यादित असते जसे कारगिल युद्ध .
पण सीमित युद्ध झाले नाही तर देशातील कोणत्या ही भागावर,हल्ला केला जाईल मग तो नागरी भाग आहे की सैनिकी हे बघितले जात नाही.
देशाच्या कोणत्या ही सीमेवरून हल्ला केला जावू शकतो.
जसा मुंबई वर समुद्र मार्गे हल्ला झाला.(कसाब आणि कंपनीl
कोणाला म्हणजे कोणालाच सुगावा लागला नाही.
त्या अत्यंत सावध राहणे हाच उपाय असतो.

माहितगार's picture

14 Sep 2020 - 11:02 pm | माहितगार

सहमत आहे, तसे शत्रूराष्ट्रांचे सैन्याचे फॉर्मेशन्स आजकाल प्रत्येक देशाला सॅटेलाईटच्या माध्यमातून बघता येतात, पण तरीही भारतीय मिडीयाने शत्रूराष्ट्राच्या विश्लेषकांचे काम सोपे करण्याची भूमिका निभावू नये. संरक्षण आणि परराष्ट्र संबंधाबाबत गोपनीयता राखण्यासाठी माध्यमांसहीत सर्वांवर आवश्यक निर्बंध घालण्याचे अधिकार भारत सरकार कडे असतात त्याचा वापर भारत सरकारने करावा. शत्रू राष्ट्रांना उपयूक्त माहिती कुणीही उघड करत असेल तर भारतसरकारला अवगत करणे सयुक्तीक असावे.

शाम भागवत's picture

14 Sep 2020 - 11:26 pm | शाम भागवत

भारतीय माध्यमात जे काही येतंय त्यात नविन असं काहीही नाहीये. ते मूळात जालावर असलेल्या माहितीची कॉपी पेस्ट आहे. कोणतेही भारतीय माध्यम संशोधन करून वृत्तलेखन करत नाहीये.

त्यामुळे कसाबवरच्या कारवाईच्या छायाचित्रणाचा जसा पाकिस्तानला फायदा झाला, तस काही होण्याची शक्यता वाटत नाही.

मात्र चीनबद्दलचा बागुलबुवा निर्माण होणार नाही एवढी काळजी तरी घेतलीच पाहिजे. भारतात आपल्याबद्दल बागुलबुवा निर्माण करायचा प्रयत्नात चीन नेहमीच असतो. तर अणुबॉंबची धमकी देणे ही पाकिस्तानची खेळी असत आलीय. त्या प्रकाराला मिडियातून शह द्यायलाच लागेल.

सुबोध खरे's picture

15 Sep 2020 - 7:18 pm | सुबोध खरे

त्या साठी गुप्त माहीत उघड करायची पण ह्यांची तयारी आहे.

आपली माहिती/समज फारच बाळबोध आहे.

भारत काय करतो आहे या बद्दल चीनला वृत्तपत्रातून जर बातम्या कळू लागल्या तर आपले सैन्य आता पर्यंत बीजिंग आणि इस्लामाबाद पर्यंत पोचले असते.

मुंबई वर समुद्र मार्गे हल्ला झाला.(कसाब आणि कंपनीl

कोणाला म्हणजे कोणालाच सुगावा लागला नाही.

याला आपले सूर्याजी पिसाळ कारणीभूत आहेत. हिंदू दहशतवादाचा बागुलबुवा उभा करणार्यांनी इतक्या टोकाचा देशद्रोह केला हे खरं सुद्धा वाटत नाही.

https://www.dailyo.in/politics/lt-col-prasad-shrikant-purohit-bail-maleg...

हा दुवा पूर्णपणे वाचून घ्या

लष्करी गुप्तहेर खातं कसं काम करतं हे सामान्यांना माहिती नसतं

बाकी चालू द्या

गोंधळी's picture

15 Sep 2020 - 6:50 pm | गोंधळी

China illegally occupying 38,000 sq km in Ladakh: Rajnath Singh in Lok Sabha

https://www.moneycontrol.com/news/economy/policy/china-in-illegal-occupa...

खरच यार राजीनामा दिलाच पाहीजे यांनी. यार भक्त लोक क्रुपया करुन जागे व्हा.

रात्रीचे चांदणे's picture

15 Sep 2020 - 7:06 pm | रात्रीचे चांदणे

कोणी दिला पाहिजे राजींनामा? राजनाथ सिंह १९६३ बद्दल बोलत आहेत.

गोंधळी's picture

15 Sep 2020 - 7:28 pm | गोंधळी

मग आता नक्की घुसघोरी झाली आहे की नाही? कारण की पं.प्र. बोलतायत घुस्खोरी झालीच नाही.

नक्की खर काय आहे??

सुबोध खरे's picture

15 Sep 2020 - 7:26 pm | सुबोध खरे

@ गोंधळी

बातमी नीट न वाचताच आपला पूर्वग्रह दूषित प्रतिसाद दिला आहे.

अक्साई चीन हा भाग चीनने फार पूर्वीपासून आपला आहे म्हणून दावा केलेला आहे.

The Indians did not learn of the existence of the road until 1957, which was confirmed when the road was shown in Chinese maps published in 1958.[35]

Aksai Chin covers an area of about 37,244 square kilometres

https://en.wikipedia.org/wiki/Aksai_Chin

हे जरा वाचून घ्या

Rajesh188's picture

15 Sep 2020 - 8:05 pm | Rajesh188

थोडा थोडा करून आता पर्यंत 38000 वर्ग किलोमीटर वर चीन नी अवैध कब्जा केला असावा .
अक्साई चीन हा भाग भारत पाकिस्तान च्या आक्षेप मुळे मालकी हक्क कोणाचा असा चीन च दावा असावा.
तैवान चा भाग,अरुणाचल चा भाग असा सर्व मिळून 38000.

सुबोध खरे's picture

15 Sep 2020 - 8:15 pm | सुबोध खरे

तैवान चा भाग?
??

Rajesh188's picture

15 Sep 2020 - 9:30 pm | Rajesh188

Tavang चा काही भाग चीन chya ताब्यात असावा

ऋतुराज चित्रे's picture

15 Sep 2020 - 8:36 pm | ऋतुराज चित्रे

भारताचा हा भूभाग चीनने पूर्वीच बळकावला असेल तर संसद सदस्यांना त्याची माहीती असेलच. राजनाथसिंहांना आज ती माहीती संसदेत का द्यावीशी वाटली ?

योग्य वेळी योग्य नशेत जनतेला ठेवणाऱ्या पक्षाला च यशस्वी राजकीय पक्ष म्हणतात.
आता कुठे नशा उतरत होती नोकऱ्या गेल्या मुळे,
तोच शेतकरी 38000 ची गोळी देवून जनतेला परत नशेत ठेवले जाईल

सुबोध खरे's picture

15 Sep 2020 - 11:59 pm | सुबोध खरे

कारण तेथे चीनने अधिक भूमीवर दावा सांगून सैन्याची जमवाजमव केली आहे. भारताने 370 रद्द करून काश्मीरचा प्रश्न स्वतःपुरता संपवून टाकला आहे आता यानंतर पाकव्याप्त काश्मीर भारतात विलीन करून घेतील अशी भीती पाकिस्तान आणि चीनला वाटते आहे. चीनचा CPEC हा रस्ता पाकव्याप्त काश्मीर मधून जात आहे त्याला खोल नसेल या भीतीने चीनने नियंत्रण रेषेवर हालचाली सुरू केल्या आहेत आणि आपल्या भूभागावर आपला दावा सांगितला आहे. त्यांनी जर सैन्य भारतीय हद्दीत घुसवले तर आपल्याला युद्ध करावे लागेल

जर दोन्ही देशांशो युद्ध करायची पाळी आली तर संसदेला त्या भागाच्या इतिहासासकट सर्व माहिती दिली गेली आहे.

याकडे पण जर लोक आपल्या पूर्वग्रहदूषित नजरेने पाहणार असतील तर काय बोलायचे?

सुबोध खरे's picture

16 Sep 2020 - 12:00 am | सुबोध खरे

खीळ बसेल असे वाचावे

ऋतुराज चित्रे's picture

16 Sep 2020 - 12:22 am | ऋतुराज चित्रे

मी फक्त उद्देश विचारला , संसदेत माहीती बेजबाबदारपणे देणार नाही हयाची खात्री आहे .

Rajesh188's picture

15 Sep 2020 - 10:00 pm | Rajesh188

भारताचा अरुणाचल, आसाम किंवा मेघालय आणि बाकी राज्य असतील.
भारतीय मीडिया त्यांची कधी च दखल घेत नाही .
महिन्यातून काय 6 महिन्यातून 1 दा पण त्या राज्यांच्या प्रश्न विषयी भारतीय मीडिया वर चर्चा होत नाही.
फक्त भू भाग भारताच्या हद्दीत असून चालत नाही.
तसेच पाकिस्तान चे पण आहे गिलगिट,बलिस्तान,आणि बाकी लगतचा प्रदेश ह्या मध्ये राहणारी लोक bhale मुस्लिम असतील पण पठाणी पाकिस्तान ची संस्कृती ,विचार आणि ह्या भागातील लोकांचे विचार फरक आहे.
गिलगिट आणि आजू बाजूचा प्रदेश आणि पाकिस्तान ची मुळ भूमी ह्यांचे संबंध तुटलेले च आहेत.

Rajesh188's picture

19 Sep 2020 - 11:38 am | Rajesh188

अखंड भारत मध्ये आता असलेले तीन देश भारत,बांगलादेश ,पाकिस्तान.
ह्या देशांचा इतिहास बघितला तर अत्यंत द्वेषाचा आहे.
देशाच्या फाळणी मध्ये 1.5 करोड लोक मारले gele.
बांगलादेश देश फाळणी मध्ये लाखो लोक मारले gele.
आणि ह्या आकड्या मधील खूप मोठा मृतांचा आकडा हा जनतेनी केलेल्या हिंसाचार मध्ये मारले gelelya लोकांचा आहे.
हे तिन्ही देश एकमेकांचे शत्रू आहेत.
जगात अनेक देश आहेत त्यांच्या मध्ये पण सीमेवरून वाद आहेत पण जनते मध्ये एवढं द्वेष कोणत्याच देशात नसावा.
पाकिस्तानी भारताचा तीव्र द्वेष करतात,भारतीय पाकिस्तानचा तीव्र द्वेष करतात.
पाकिस्तानी ,बांगलादेशी लोकांचा द्वेष करतात
आता भारतीय जनता चीन च्या लोकांचा द्वेष करत आहे.
पण चिनी नागरिक तसा द्वेष करत नाहीत त्यांचे सैन्य लढत आहे.
ही अशी विचित्र अवस्था जगात फक्त इथेच का निर्माण झाली असावी.

शाम भागवत's picture

19 Sep 2020 - 11:56 am | शाम भागवत

पण चिनी नागरिक तसा द्वेष करत नाहीत त्यांचे सैन्य लढत आहे.

या एका वाक्यासाठी बाकी सगळं लिहलंय काय? अशी शंका आली.
तुमचं चीनबद्दलच प्रेम जरा वाढतच चाललंय असंही एकदा मनांत आलं.
🤔

शाम भागवत's picture

19 Sep 2020 - 11:58 am | शाम भागवत

129300 हा इमोजीचा नंबर आहे. ह्याचाही वापर बऱ्याच वेळेस करायला लागतो.

सुबोध खरे's picture

19 Sep 2020 - 12:29 pm | सुबोध खरे

आता भारतीय जनता चीन च्या लोकांचा द्वेष करत आहे.

पण चिनी नागरिक तसा द्वेष करत नाहीत त्यांचे सैन्य लढत आहे.

मुळात चिनी नागरिकांना स्वतंत्रपणे विचार करण्याची सवयच लावलेली नाही.

सरकार जे सांगेल तेच सत्य हे स्वीकारणायची सवय जन्मापासून आहे.

आणि मताधिकार असण्यापेक्षा भरलेले पोट जास्त महत्त्वाचे असेच त्यांना शिकवले गेले आहे.

१९६२ चे युद्ध इ गोष्टी त्यांना शिकवलेल्याच नाहीत आणि सरकार सांगेल तीच सीमारेषा बरोबर असेच त्यानि मान्य केलेले आहे.

या उलट जपान आणि कोरिया( आता दक्षिण कोरिया) यांच्या बरोबरच्या युद्धात झालेली हार आणि त्यांनी चिनी जनतेवर केलेले अत्याचार यामुळे चिनी माणूस जपान आणि कोरियाचा द्वेष करतो परंतु त्यांना भारताबद्दल फारसे काही वाटत नाही. बुद्धाची जन्मभूमी आणि आशियातील एक देश म्हणून थोडी फार आत्मीयता वाटते एवढंच.

या उलट चीनने भारताशी युद्ध केले आणि गेली कित्येक वर्षे भारतीय सीमेवर सतत कुरबुरी करत असल्यामुळे भारतीय माणसाला चीन बद्दल एक तर्हेची अढी होती.त्यातून सदा सर्वदा आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानची तळी उचलत असल्यामुळे भारतीय जनतेला चीन बद्दल संताप आहे.

आणि आता कोव्हीड चीन मधून जगभर पसरल्या मुळे( कि पसरवल्यामुळे) भारतीय जनतेला जो मोठा त्रास सहन करायला लागतो आहे त्यामुळे तर भारतीय माणूस चीनचा द्वेषच करतो आहे.

हिंदूस्थानाच्या सैन्यदलाने ५०,००० चायना बॉर्डरवर मूव्ह केले आहे. आता या भागात एकुण 200,000 जवान तैनात आहेत.
India shifts 50,000 troops to China border in historic move

हल्लीच झालेली अग्नीची चाचणी :-

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : - हतो वा प्राप्स्यसि स्वर्गं जित्वा वा भोक्ष्यसे महीम्। तस्मादुत्तिष्ठ कौन्तेय युद्धाय कृतनिश्चयः।।2.37।।

गॉडजिला's picture

29 Jun 2021 - 5:01 pm | गॉडजिला

भारतीय नेत्रुत्व ज्या ज्या आघाडीवर काही चांगले काम करत आहे त्यामधे ही एक महत्वाची बाब आहे.