चिन्यांचा उपद्व्याप (भाग दोन)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे in काथ्याकूट
20 Jun 2020 - 5:36 pm
गाभा: 

राम राम मंडळी. चिन्यांच्या उपद्याप या विषयावर मिपावर दोन हजार तेराला चर्चा सुरु होती. आताही तोच प्रश्न नव्याने समोर आला आहे. आपण अगोदरच कोरोनाने परेशान आहोत. रुग्ण वाढत आहेत बरे होत आहेत. आपण आपल्या जींदगीशी व्यक्तीगत पातळीवर समझोता करुन जरा हळुहळु आपलं मार्गक्रमण सुरु करत होतो की चिन्यांनी सीमेवर कुरापती सुरु केल्या. एलएसीवर चीनने जे कृत्य केलं त्यामुळे देशभर संताप उमटला आहे. अशा परिस्थितीत काल पंतप्रधानांची काल जी सर्वपक्षीय बैठक झाली त्यात चिन्यांनी घुसखोरी केलीच नाही अशी सर्वांना माहिती दिली आहे. (बातमी मटा) परंतु भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यात दोन्ही देशांतील सैनिकांमध्ये संघर्ष झाला होता यात भारताचे २० जवान शहीद झाले त्याच वेळी चिन्यांचेही ४३ पेक्षा अधिक सैन्य ठार झाल्याचे म्हटल्या जाते. खिळे असलेले दंडु़क्यांचे चित्र माध्यमात फिरत आहेत. अतिशय संताप यावा असे हे चिन्यांचे कृत्य आहे. मात्र ग्लोबल टाइम्समधे किंवा चिन्यांकडून अशी काही बातमी येत नाही, असे झाले असेल तर चीन्यांना धडा शिकवणे गरजेचेच आहे. चिन्यांना धडा शिकवलाच पाहिजे. काल सर्वपक्षीय बैठकीत अनेकांनी अनेक प्रश्न विचारले आणि मा. पंतप्रधानांनी ”भारताला मैत्री आणि शांतता हवी आहे. पण देशाच्या सार्वभौमत्वाला आणि अखंडतेला ठेच पोहोचू देणार नाही. कुठल्याही परकीय दबावापुढे भारत झुकणार नाही. देशाच्या सुरक्षेसाठी जे काही आवश्यक असेल त्यासाठी वेगाने पावलं उचलली जातील”’ असे म्हटले आहे. देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने किंवा आणि अन्य काही कारणांमुळे असेल सर्वच गोष्टी जाहीर सांगता येत नसतील तरीही चिन्यांचा हा किडा ठेचला पाहिजे ही भारतीयांच्या मनातली इच्छा आहे, असे करतांना अनेक गोष्टी असतील येत्या काळात आपण कदाचित काही कार्यवाही करणारही असू पण चिन्यांचं आता पुरे झालं.

मंडळी, चिन्यांच्या एकूणच कोणत्याही गोष्टींवर आपण विश्वास ठेवणार नाही. चिन्यांच्या कुरापतीला वेगवेगळे कंगोरे असतील. गलवान क्षेत्रातील पुलाच्या कामामुळे चीनी भडकले असतील. गलवान खो-यातील काही वादग्रस्त क्षेत्र असेल ते आपल्या परत मिळालेच पाहिजेत असे एक भारतीय म्हणून वाटते. जगाचं लक्ष कोरोनावरुन हटवून अन्यत्र वळवणे असेल किंवा जे काही असेल त्या विषयांची चर्चा धाग्यात अपेक्षित आहेत. उत्तम संदर्भ, लिंका आणि व्हीडीयो टाळत असलेल्या व्हीडीयो-बातम्यांचा मजकूर टंकून एकूण्च चर्चा अपेक्षित आहे. देशातून चिन्यांचे विविध कामांचे कंत्राट, वस्तूंच्या ऑर्डर्स रद्द होत आहेत एका दृष्टीने आता चिन्यांची कोंडी करण्याचा थोडाफार प्रयत्नही होतांना दिसत आहे.

आत्ताच एक जूनला ग्लोबल टाइम्समधे चीनच्या वतीने म्हटलं गेलं होतं की अमेरिका आणि आमच्या वादापासून भारताने दूर राहावे. चीन अमेरिकावादात भारताने फायदा उठवू नये. आणि दोन राष्ट्राच्या (चीन-अमेरिका) वादात भारत पडल्यास भारताला मोठी किंमत मोजावी लागेल असे म्हटले होते त्याच बरोबर भारतात सध्या चीन विरोधात आवाज उठविण्यात येत आहे, मोदी सरकारने देशात चीन विरोधात उठवला जाणारा आवाज कमी करण्याकडे लक्ष द्यायला हवे असे चीनने म्हटले होते. (बातमी- ग्लोबल टाइम्स आणि सकाळ )आणि म्हणून त्यांनी कालचं कृत्य केलं असावं का ?

''भारताला शांतता हवी आहे. पण याचा अर्थ भारत दुबळा आहे असा होत नाही. चीनचा मूळ स्वभाव हा विश्वासघातचा आहे. भारत बलवान आहे आणि दुबळा नाही. शत्रूचे डोळे काढून हातात देण्याची सरकारमध्ये क्षमता आहे'' असे जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले त्यात चुकीचं काही नाही. चिन्यांच्या या कृत्याला आता आपण देश एकत्र होऊन चिन्यांंचा योग्य बंदोबस्त झालाच पाहिजे या मतावर येऊन ठेपलो आहोत.

मंडळी, कोमल यांच्या पहिल्या धाग्यातील प्रतिसाद लांबत गेले, दुसर्‍या पानावार जातांना प्रतिसाद लिहितांना अडचणी येत होत होत्या, सर्वाअर्थाने चीन्यांच्या कुरापती, आपले सीमा प्रश्न आणि त्यांच्या बंदोबस्तावर चर्चा व्हावी यासाठी हा धाग्याचा प्रपंच. आपण योग्य अशी माहितीची देवान-घेवाण व्यक्तीगत पातळीवर न जाता तटस्थपणे चर्चा कराल अशी अपेक्षा.

प्रतिक्रिया

शाम भागवत's picture

20 Jun 2020 - 8:27 pm | शाम भागवत

कायप्पावरचं एका तज्ञांच म्हणणं.

ताबारेषेच्या दोन्ही बाजूला नो मॅन्स लँड असते. चिनच्या बाजूच्या नो मॅन्स लँडमधे चीनचे सैनिक आले होते. म्हणून आपणही आपल्या बाजूच्या नो मॅन्स लँड मधे आलो होतो. 

चिन्यांचे म्हणणे होते की, आमच्या बाजूची नो मॅन्स लँड आम्ही आत्ता जिथे आहोत त्याच्यापुढे आहे असे आम्ही मानतो. त्यामुळे तुम्हीच घुसखोरी केली आहे. 
भारत म्हणतोय नाही. आम्ही घुसखोरी केलेली नाहीये. तुम्ही तुमच्या हद्दीत सिमारेषेवर आलात म्हणून आम्हीपण आमच्या हद्दीत सिमारेषेपर्यंत आलेलो आहोत.

अमेरिकन वार्तांकनानुसार,
६ जूनला बैठक झाली. दोघांनी सैन्य मागे घ्यायचे ठरले. त्याप्रमाणे चिनी सैन्य मागे गेले का हे पाहायला भारतीय सैन्याची तुकडी गेली. तिथे चिनी सैनिक नव्हते पण त्यांचा रिकामा तंबू होता. भारतीय तुकडीने तो तंबू पाडून टाकला. त्याचा राग चिनी सैन्याला आला व त्यांनी त्या तुकडीवर काठ्या खिळ्यांनी हल्ला चढवला. भारतीय सैन्याची तुकडी छोटी असल्याने ती तुकडी गारद झाली. पण हे कळताच आपले सैनीक तेथे धावत गेले व त्यांनी हल्ला चढवला. तो जोरदार हल्ला चिन्यांना झेपला नाही. त्यांचीही हानी झाली. 

एवढ्या तंबूच्या क्षुल्लक कारणावरून ही मारामारी व्हायला नको होती. असंही पुढे त्या वार्तांकनांत म्हटले आहे.

परंतू भारताचे म्हणणे आहे की, रिकामे तंबू ठोकायचे व कालांतराने तेच तंबू पुरावा म्हणून पुढे करून सिमारेषा पुढे ढकलायचा प्रयत्न करायचा ही चीनची आवडती पध्दत आहे. याच पद्धतीने २०१३ साली माघार घेत असल्याचे दाखवून, २४ चौ. किमी ठापलेलेही आहेत.

पण आत्ताचे सरकार सिमेवरील सैन्याला डावपेचांमध्ये जास्त महत्व देते. त्यांना थोडे अधिकारही दिले जाताहेत. कशामुळे ते नक्की सांगता येत नाही, पण एवढे मात्र नक्की की, नो मॅन्स लँड मधे रिकामे तंबूसुध्दा ठेऊ द्यायचे नाहीत ही सैन्याची सूचना मान्य करण्यात आली व सैन्याने त्याप्रमाणे कारवाई केली. १९६२ पासून आत्तापर्यंत यशस्वी होत आलेली ही तंबू पघ्दत कायमची मोडीत निघतेय म्हटल्यावर, चिन्यांचा रागाने तिळपापड झाला असल्यास नवल नाही.

रिकाम्या तंबूची ही पध्दत वरून किती निरूपद्रवी वाटते पण ती किती उपयुक्त आहे हे ज्याला माहीत नाही तो भारताला बोल लावणारच. वर ठळक केलेले अमेरिकन वार्ताहराची कॉमेंट त्याचीच तर साक्ष आहे. मुख्य म्हणजे भारतातले बहुसंख्य विरोधक हे देशप्रेमी असूनही, त्यांना अर्धवट माहिती देऊन वापरले जातंय याचे वाईट वाटते. त्यामुळे एका अमेरिकन वार्ताहराची दिशाभूल झालेली असल्यास, त्यात नवल वाटण्यासारखे काहीही नाही.

आणखी एक कायप्पा संदेशानुसार,
कॉंग्रेस पार्टी व चीनची कम्युनीस्ट पार्टी यांच्यात नेहमीच माहितीची देवाण घेवाण चालत असते. दोन्ही सरकारांचा त्यात संबंध नसतो. तसा त्यांच्यात करारच आहे म्हणे.
वरील माहीती मला नविन आहे. त्याबाबत इथल्या तज्ञांच्या मत प्रदर्शनाची वाट बघतोय. मी अजून कोणतेच मत बनवलेले नाही. चिनी लोक डॅंबीस आहेत हे मात्र मी मानतो.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

20 Jun 2020 - 8:37 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रतिसाद माहितीपूर्ण आवडला. (शेवटच्या चार-पाच ओळींंबद्ल माहिती नाही) भारतीय कम्युनिष्ट पार्टी कोणत्या तरी गटाने ६२ च्या युद्धात चीनचे समर्थन करीत होते की असे काही तरी माहिती वाचावी लागेल. (चुभूदेघे) ते अवांतर वाढत जाईल.

आज आणखी एक बातमी दिसते की गलवान नदीवरील पुल ज्याचं काम चिन्यांनी थांबवलं होतं म्हणे ते पूर्ण झालं. (बातमी)

-दिलीप बिरुटे

शाम भागवत's picture

20 Jun 2020 - 8:50 pm | शाम भागवत

चिन्यांचं हेच म्हणणं होत की, तो पूल नो मॅन्स लँडमधे येतो. म्हणून भारत तिथे पूल बांधू शकत नाही. त्यासाठीच खेळलेली खेळी होती ती. जर जमून गेली तर फायदा होऊन जातो.
पण नाही जमलं तर माघार घ्यायची. त्यात नुकसान नसतंच. फक्त चाचपणी होते. कुस्तीतल्या सुरवातीच्या खडाखडीसारखी.

चौथा कोनाडा's picture

21 Jun 2020 - 1:17 pm | चौथा कोनाडा

आंजावर जुजबी शोध घेतला असता ही घटना "नो मॅन्स लॅण्ड" मध्ये घडली असा उल्लेख बातम्यांमध्ये आढळला नाही !
सगळीकडे एलएसी (लाईन ऑफ अ‍ॅक्च्युअल कंट्रोल) चा उल्लेख आढळला.
___________________________________________________________________________________

भारत-चीन एलएसी (लाईन ऑफ अ‍ॅक्च्युअल कंट्रोल)
भारत आणि चीनमध्ये 4,48888 कि.मी. सीमा आहे. ही सीमा जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेशातून जाते.

हे पश्चिम क्षेत्र म्हणजेच जम्मू-काश्मीर, मध्यम क्षेत्र म्हणजे हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड आणि पूर्व क्षेत्र म्हणजेच सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेश अशा तीन क्षेत्रांमध्ये विभागले गेले आहे.

तथापि, अद्याप दोन्ही देशांचे पूर्णपणे सीमांकन झाले नाही. कारण बर्‍याच भागात अनेकांमध्ये सीमा विवाद आहे. पश्चिमेकडील क्षेत्रात अक्साई चीनचा दावा सध्या चीनच्या अखत्यारीत आहे. १९६२ च्या भारताशी युद्धाच्या वेळी चीनने हा संपूर्ण परिसर ताब्यात घेतला.

त्याचवेळी चीन पूर्व क्षेत्रात अरुणाचल प्रदेशवर दावा केला.
हा दक्षिण तिबेटचा एक भाग असल्याचे चीनचे म्हणणे आहे.
तिबेट आणि अरुणाचल प्रदेश यांच्यातील मॅकमोहन लाइनही चीन स्वीकारत नाही, अक्साई चीन भारताचा हक्क नाकारतो.

या वादामुळे दोन्ही देशांमध्ये कधीच सीमेबाबत एकमत होऊ शकले नाही. तथापि, यथास्थिती राखण्यासाठी अ‍ॅच्युरियल कंट्रोलची ओळ म्हणजे एलएसी टर्म वापरली गेली. तथापि, अद्याप हे स्पष्ट झाले नाही. दोन्ही देश त्यांच्या नियंत्रणाच्या वेगवेगळ्या सीमारेषा सांगून दावा करतात.

अनेक हिमनद्या, बर्फाचे वाळवंट, पर्वत आणि नद्या या वास्तविक सीमारेषेवर (एलएसी) आहेत.
एलएसीसह असे बरेच भाग आहेत जिथे भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये अनेकदा तणाव असतो.
त्यामुळेच बर्‍याच वेळा चकमकी होतात आणि आपल्या पर्यंत बातम्या येत राहतात.

(संदर्भः https :// www. bbc. com/hindi/india-53096593)

शाम भागवत's picture

21 Jun 2020 - 2:43 pm | शाम भागवत

नो मॅन्स लँड फक्त आंतरराष्ट्रीय सीमेबाबातच असते. त्यामुळे वाद असलेल्या सीमेबाबतच्या वार्तांकनात हे शब्द कधीच वापरले जाणार नाहीत. सीमेवरची परिस्थिती नीट डोळ्यासमोर यावी यासाठी ते शब्द मी वापरले आहेत.
त्रासाबद्दल क्षमस्व.

प्रत्यक्ष ताबारेषेवर दोन्ही देशांचे सैनीक कधीच उभे नसतात. त्या रेषेपासून थोडेसे आत सोयीच्या जागी पोस्ट उभारलेल्या असतात. त्यामुळे एक अघोषीत अशी मोकळी जागा दोन्ही सैन्यामधे असते. रोज रोज भांडणे न होण्याच्या दृष्टीनेही ते चांगलेच असते. त्यातूनच एक नो मॅन्स लँड परिस्थिती जिला दोन्ही बाजू महत्व देत आहेत असा पायंडा पडत असतो. हाच पायंडा कोणितरी मोडतो व मग कुरबूरी सुरू होतात.

कारगीलमध्ये हाच प्रकार झाला होता. “अनेक वर्षे बिनतक्रार पाळल्या गेलेल्या कोणत्यातरी पायंड्याचे उल्लंघन” हेच कारण असते कुरबुरी सुरू होण्याचे. कारगील सारखा प्रकार सियाचीनमधे होऊ नये म्हणून आपण आता तिथे ३६५ दिवस सैन्य पहारा ठेवत असतो.
असो.

चौथा कोनाडा's picture

22 Jun 2020 - 1:11 pm | चौथा कोनाडा

..... त्यातूनच एक नो मॅन्स लँड परिस्थिती जिला दोन्ही बाजू महत्व देत आहेत असा पायंडा पडत असतो ...

अगदीच उद्बोधक ! नो मॅन्स लॅण्ड बद्दलची कल्पना आणखी स्पष्ट झाली !

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

21 Jun 2020 - 2:44 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

galwan pointआपल्यासारखाच जरा युट्यूबवर शोधाशोधा केल्यावर लक्षात येते की आपला सीमेचा प्रदेश अरुणाचल प्रदेशापासून ते दौलत बेग ओल्डी जो विमानतळाचा बेस आहे, पुढे अक्साईन चीनचा प्रदेश सुरु होतो त्यावरही आपण हक्क सांगतो पण आता तो मिळविणे म्हणजे युद्धच करावे लागेल असे दिसते. सर्व वादग्रस्तच राहीलेले आहे. पहिल्या छायाचित्रात 'पॅगॉग त्सोवर' आपला हक्क आपण फिंगर ८ पर्यंत सांगतो. पण चिन्यांनी आपल्या पाच पर्यंत घुसखोरी केली आहे आणि तिथेच सध्या वाद सुरु आहे. कोणी कितीही नाही म्हटलं तरी चिन्यांची घुसखोरी केलीच आहे. आपल्याला आपण पॉइंटपर्यंत आपला हक्क सांगितलाच पाहिजे आणि चिन्यांना मागे रेटलेच पाहिजे. चिन्यांचे तंबू म्हणा पेट्रोलिंग म्हणा सध्या ते आपल्या हद्दीत येऊन केली आहे. आणि आपल्याला मागे जावे लागते किंवा दुर्लक्ष होते. चिन्यांच इतिहास असाच आहे की जेव्हा जेव्हा आपण आपल्या भूभागावर दुर्लक्ष केले तिथे तिथे त्यांनी तो भाग आपला म्हणून घ्यायला सुरुवात केलेली दिसते.

o

सिमारेषा निश्चित नसल्यामुळे दौलतबेग ओल्डी जे आपल्या सुरक्षेच्या दृष्टीने मजबूत ठिकाण आहे, तिथून पाकड्यांवर आणि चिन्यांवर लक्ष ठेवता येते. म्हणून सध्या ओल्डीबेग पासून ते दरबगपर्यंत भारताने रस्त्याचे काम सुरु केले त्यात चिन्यांनी खोडा घालायचे काम केलेले दिसते कारण आपल्या जसजशा सीमा मजबूत होत तसतसे सीमारेषा स्पष्ट होत जातील. माहिती नाही केव्हा होईल ते पण अक्साई चीनवर आपलं नियंत्रण यावे असे मनापासून वाटते. आपण म्हणता तसे सीमेवर सतत अशीच वादग्रस्त ठिकाणे असल्यामुळे नेहमी वाद होतांना दिसतात. एकमेकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने दोन्हीही देश आपला सीमा प्रदेश मजबूत करतांना दिसत आहेत. आपला इतिहास सर्व असा मोकळाढोकळा असल्यामुळे नव्या काळात आता अधिक मजबुत व्हावेच लागणार आहे.

-दिलीप बिरुटे

शाम भागवत's picture

21 Jun 2020 - 2:58 pm | शाम भागवत

धन्यवाद सर.
_/\_

> पहिल्या छायाचित्रात गलवान खो-यात आपला हक्क आपण फिंगर ८ पर्यंत सांगतो.

सर, एक दुरुस्ती करायला हवी. हा नकाशा पॅगॉग त्सो इथला आहे. जिथे ही चकमक झाली त्या गलवान नदी खोऱ्याचा नव्हे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

22 Jun 2020 - 8:43 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

दुरुस्ती केली. लिहितांनाची चूक लक्षात आणून दिल्याबद्ल धन्स.

सध्या विरोधी पक्षाकडून सरकारवर जी टीका केली जात आहे ती याच पॉइंटवरची आहे. सरकार म्हणते की घुसखोरी झालीच नाही. आज दोन व्हीडीयो पाहिले त्यात आपले सैनिक बोटीमार्गे फिंगर पॉइंट ८ पर्यन्त पेट्रोलिंग करत असतात आणि जमीनीवर चालत जाऊन पॉइंट ८ वर जातात पण पॉइंट पाचपासून ते ८ पर्यन्त चिन्यांनी तंबू टाकले आहेत वा त्यांचे सैन्य तिथे आहे. सैन्यस्तरावरुनचर्चेत चिन्यांनी परत जावे म्हणून चर्चा होणार आहेत असे बातम्यांवरुन दिसते.

-दिलीप बिरुटे

चौथा कोनाडा's picture

22 Jun 2020 - 1:10 pm | चौथा कोनाडा

धन्यवाद, डॉ. साहेब !
तुम्ही जोडलेल्या आकृत्यांनी सीमेबाबत चित्र अधिक स्पष्ट झाले !

मराठी_माणूस's picture

21 Jun 2020 - 7:26 pm | मराठी_माणूस

वर ठळक केलेले अमेरिकन वार्ताहराची कॉमेंट त्याचीच तर साक्ष आहे.

अमेरिका आणि चीन ह्यांचे पण सध्या फारसे सख्य नसताना , तो अमेरिकन पत्रकार चीनला का झुकते माप देत असावा ?

हा प्रश्न तुम्हाला नसुन , फक्त मनात आला तो व्यक्त केला आहे.

शाम भागवत's picture

21 Jun 2020 - 7:34 pm | शाम भागवत

रिकाम्या तंबूला काय एवढं महत्व द्यायचं? हा अगदी सहज मनात येणारा विचार असावा असं वाटतं. कोणाची बाजू वगैरे घ्यायचा त्याचा विचार असावा असे काही वाटत नाही.

शेवटी हाही माझा तर्कच आहे म्हणा. :)
खरे काय ते अजून २-३ वर्षांनी कळेल. :)

पण तोपर्यंत तरी रस्ता पूर्ण होऊ दे, एवढीच इच्छा आहे.
_/\_

चिनी वस्तूंवर बहिष्कार घातला पाहिजे यांच्याशी सहमत पण मुख्य म्हणजे भारतात ज्या मोठ्या उद्योगधंद्यामध्ये चिनी गुंतवणूक आहे त्यावर काय तोडगा काढणार?
उदाहरणार्थ : पेटीएम, बिग बास्केट, फिल्पकार्ट (आणि अजून कितीतरी) यातून चायनीज कंपन्यांना भरमसाठ नफा होतो मात्र या कंपन्यांमूळे हजारो भारतीय लोकांना नोकऱ्या मिळाल्या आहेत.
आता तीन चार दिवसांपूर्वी महाराष्ट्रात चीनची 'ग्रेट वॉल मोटर्स' कंपनी मोठी गुंतवणूक करणार आहे अशी बातमी होती. यातून तीन हजार प्रत्यक्ष रोजगार अपेक्षित आहेत. याचे काय करायचे?
हा विषय अवघड आहे पण कुठूनतरी सुरुवात झालीच पाहिजे. यावर अधिक प्रतिक्रिया वाचण्यास उत्सुक आहे.

mrcoolguynice's picture

20 Jun 2020 - 11:08 pm | mrcoolguynice

झ

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

21 Jun 2020 - 10:40 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

भारतात चिन्यांची गुंतवणूक अनेक क्षेत्रात मोठी आहे. धाग्यातल्या लिंकमधे उल्लेख आहे तसा ”2019 च्या अखेरीस अंदाजे 1,000 चिनी कंपन्यांनी भारतात गुंतवणूक केली आहे किंवा देशात विविध कंपन्यांशी जुगाड जमवून ते सहभागी आहेत, जवळ जवळ 8 अब्ज डॉलर्सहून अधिक गुंतवणूक आणि स्थानिक बाजारात 200,000 रोजगार निर्मितीचा समावेश आहे. आणि चिनी कंपन्यांची भारतात गुंतवणूक आतापर्यंत 10 अब्ज डॉलर्सच्या जवळ जवळ गेली आहे. हे सर्व भारतातून खरडून काढायचं म्हणजे महा कठीण काम आहे.

मिपावरच कोणी तरी प्रतिसादात म्हटलं होतं की चीन्यांच्या उत्पादन हे अतिशय कमी भावात मागणे आणि न घेणे त्याचबरोबर भारतीय उत्पादने तितकीच स्वस्त करणे आणि त्याला उत्तम पर्याय देणे आता अशा गोष्टीमुळे किती फ़रक पडेल ते माहिती नाही. बांधकाम, तंत्रज्ञान, इलेक्ट्रीकल्स, आणि इतर अनेक गोष्टीत चिन्यांनी इतके खोल पाय रुतले आहेत की ते उपसून काढणे महाकठीण काम वाटतं. पण अशक्यही काहीच नसते.

एक साधं उदाहरण बघा काही दिवसापूर्वी प्लेष्टोअरवर आपल्या मोबाईलमधे चिन्यांचे कोणते अ‍ॅप्लीकेशन आहे हे ओळखण्याचे अ‍ॅप होते त्यातून ते अ‍ॅप्लीकेशन आपल्याला आपल्या मोबाईलमधे कोणते चीनी अ‍ॅप्लीकेशन आहे हे ओळखून ते रिमोव्ह करायचा पर्याय होता पण चिन्यांच्या तक्रारीनंतर ते अ‍ॅपच प्लेष्टोअरवरुन हटविण्यात आले. चीनी म्हणतात आम्च्या वस्तू भारतीयांच्या आयुष्यातील महत्वाचा भाग बनलेला आहे. ''लॉकडाऊनमुळे दोन्ही देशांच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम झालाय. त्यात चीनी वस्तूंवर बहिष्कार टाकून मध्यमवर्गीयांवर अधिक आर्थिक बोजा पडणार असल्याचे चीनचे म्हणणे आहे. भारतीयांकडील अधिक स्वस्त सामान हे चीनकडून येते. त्यामुळे बहिष्कार करण भारताला शक्य नसल्याचे चीनचं म्हणनं आहे.

चीनी ज्या अर्थी सध्या आपल्या उत्पादनासंदर्भात इतका हवालदील झाल्याचे एक कारण कोरोनाही आहे. आपण भारतीयांनी रिस्क नको म्हणून चीनी वस्तू खरेदी करणे कमी केल्याचे दिसते, आणि त्याचा परिणाम चीन्यांच्या उत्पादनावर नक्की होणार आहे. बघा आपल्या सर्वांना किती जमते ते...!

'कौन कहता है कि आकाश में सुराख नहीं हो सकता। एक पत्थर तो तबीयत से उछालो यारो!

-दिलीप बिरुटे

श्रीगणेशा's picture

20 Jun 2020 - 11:10 pm | श्रीगणेशा

मिसळपाववर अजूनही ही चर्चा का सुरू झाली नाही याचं आश्चर्य वाटलं. असो.
१५ जूनला नेमकं काय घडलं याची थोडक्यात पण तार्किक दृष्ट्या सुसंगत माहिती इथे वाचनात आली:

https://threadreaderapp.com/thread/1273826233881554944.html

चीन्यांनी चर्चेसाठी आलेल्या आपल्या (भारताच्या) छोट्या तुकडीला फसवून ठार केलं त्यात तुकडी प्रमुख (कमांडिंग ऑफिसर) चा समावेश होता.

चिडलेल्या ५० ते ६० सैनिकांनी, जे पोस्ट वर वाट पाहत होते, प्रतिहल्ला चढवून कित्येक चीन्यांना कापून काढले. मागून चिन्यांना कुमक मिळाली अन आपले २० सैनिक धारातीर्थी पडले. १० पकडले गेले. आपल्या तुकडीच्या प्रमुखाला नाहक फसवून ठार केल्याचा बदला आपल्या सैनिकांनी शत्रूचे ४० ते ५० सैनिक मारून घेतला.

चीन्यांचा तिळपापड झाला आणि त्यांनी आपल्या (भारतीय) सैनिकांच्या बेशिस्तीवर (त्यांच्या दृष्टीने बेशिस्त) बोट ठेवले:
https://www.google.com/amp/s/www.indiatoday.in/amp/india/story/first-hig...

पण स्वतः च्या (चीनच्या) सैन्याची आगळीक (चर्चेसाठी आलेल्या भारतीय तुकडीला फसवून ठार केलं गेलं) मात्र त्यांनी सोयीस्करपणे नजरेआड केली.

याही मागे गेलं तर चीनला खरी भीती आहे ती गलवान खोऱ्यात दळणवळणाच्या सुविधा तयार करून, भारत भविष्यात सैनिकी कारवाई करून अगदी सहजपणे अक्साई चीन भूभाग कधीही ताब्यात घेवू शकतो. कारण भारताने (सरकार कोणाचेही असो) नेहमीच आपली भूमिका कणखरपणे मांडली आहे -- पाकव्याप्त काश्मीर आणि अक्साई चीन हा भारताचा अविभाज्य भाग आहे आणि एक ना एक दिवस आपण तो मिळवणारच.

कोरोनामुळे जगभर डागाळलेली प्रतिमा आणि त्यामुळे होणारा आर्थिक परिणाम यातून जगाचं आणि महत्वाचं म्हणजे चिनी जनतेचं लक्ष इतरत्र वळवून आपली खुर्ची शाबूत आणि मजबूत ठेवण्यासाठी झी जिनपिंग नी आता युद्धाची तयारी सुरू केली आहे. सर्व जग कोरोनाशी आणि आर्थिक संकटाशी दोन हात करण्यात गुंतलेलं असताना हीच ती वेळ दुसऱ्याची जमीन गिळंकृत करून दक्षिण आशियात भारतावर मानसिक वर्चस्व निर्माण करण्याची, असे मनसुबे आखले जात आहेत.

भारताला चीनची दादागिरी कसेही करून झुगारून देण्याशिवाय आता पर्याय नाही. सीमेवर युद्ध कदाचित होणार नाही पण भारत चीन शीत युद्धाला मात्र सुरुवात झाली आहे.

पंतप्रधानांनी सर्वपक्षीय सभेतल्या भाषणात "ऐतिहासिक क्षण" हा उल्लेख करून आजवरची मुत्सद्देगिरीची दिशा पूर्ण बदलण्याचे संकेत दिले आहेत.

पहिल्या लिंक बद्दल धन्यवाद.

चीनच्या कुरापती भारताला नवीन नाहीत. आपल्याला केवळ ६२ चे युद्ध माहिती असते. त्यानंतरचे चीनचे २ युद्ध प्रयत्न हाणून पाडत भारताने मिळवलेले विजय आपल्या लक्षात राहत नाहीत.

किती मोठ्या प्रमाणात कोणती कारवाई होईल त्याचा अंदाज येणं कठीण आहे. पण जर चीननं युद्ध केलं तर ते आपणच जिंकू हे मात्र निर्विवाद.

भारत-चीन युद्ध सुरू झाले तर रशिया तटस्थ असेल की भारताबरोबर?

Quora varil comment
लहानशी लुटुपुटुची मारामारी असेल तोवर कुणीच मध्ये पडणार नाही. थोडेसेही मोठे हल्ले झाले तर ३रे महायुद्ध होईल आणि आजवर महायुद्धात मूळ हल्लेखोर देश नुकसानीत गेले, तबाह झाले. चीनला तशी संपण्याची इच्छा नसावी. आजही जपान सार्वभौम देश नाही. जर्मनी एकाच जातीपंथातला (युरोपियन), काहीसे रक्तगुण समान असलेला देश असल्याने पुन्हा मिसळून गेला. पण चीन तसा नाही. तिसऱ्या महायुद्धात चीनला संपल्याशिवाय गत्यंतर नाही हे त्यांना ठाऊक आहे. चीनने थोडाही भारतावर मोठा हल्ला केला तर सर्वप्रथम भारताने तिबेट ताब्यात घेऊन स्वतंत्र करणे जास्त शहाणपणाचे व उपयोगी ठरेल. तो भाग चीनने जबरीने काबीज केलेला असल्याने आणि चीनच्या प्रस्तावित OBOR आपोआप अडथळा निर्माण होईल आणि म्हणून भारतावर आंतरराष्ट्रीय दबाव कमी राहील. आणि चीनने जास्तच युद्ध वाढवले तर चीनची पूर्ण पूर्व किनारपट्टी फक्त जी औद्योगिक दृष्टीने पुढारलेली आहे, ती संपविण्यात येईल ज्यात जपान, तैवान, इंडोनेशिया, मंगोलिया, विएतनाम, भारत, दक्षिण कोरिया, हे मुख्य साऊथ चीन समुद्र भागातील देश युद्धात चीनविरुद्ध भाग घेतील आणि कोरोनाबाधित इटली, जर्मनी, फ्रांस, इंग्लंड आणि रशिया व अमेरिका चीनला घेरून तयार राहतील जेणेकरून युद्ध आण्विक बाजूला कळणार नाही. चीन अजूनही वैद्यकीय खास करून औषधी क्षेत्रात मागेच आहे जरी त्यांनी विषाणू Virus संबंधी प्रयोग केले ज्यात चीनसुद्धा हरला आणि त्यांचे अनेक लोक मारले गेले जे त्यांनी जरी जगापासून लपविले तरीही जगाला माहीत आहे. आणि

निव्वळ आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, UNच्या इतर आंतरराष्ट्रीय संस्थांवर तसेच डॉलर ऐवजी चिनी युऑन Yuon चा कब्जा करण्यासाठी चीन ३रे महायुद्ध करणार नाही इतकेच नाही तर चीन स्वत:हुन ते टाळेल कारण त्याची खूप मोठी शिक्षा चीनलाच भोगावी लागेल. आज अमेरिका चीनच्या सर्वात जास्त कर्जाखाली असला तरीही. (अमेरिकेचे एकूण कर्जापैकी साधारण १७% कर्ज चीनकडून घेतलेले आहे आणि त्याच्या खालोखाल साधारण १५.५% जपानकडून). जपानचे सैन्य अमेरिकेच्या आधिपत्याखाली असल्याने जपान आणि चीन एकत्र होऊ शकणार नाही जरी ते एकवर्णीय (Race) आहेत (तरी ते शेकडो वर्षांपासून एकमेकांचे शत्रूच आहेत) आणि चीन दुसऱ्या महायुद्धात जपानने केलेली वाईट हालत विसरूच शकणार नाही. आणि म्हणूनच ३रे महायुद्ध खरं तर होणार नाही. मोठ्यात मोठे म्हणजे दक्षिण चीन देशांपर्यंत ते सीमित राहील.

इतके मात्र नक्की कि चीनने मोठी लढाई लढण्याची तयारी म्हणून युद्ध झाल्यास जरुरी इतका मोठ्ठा तेल Oil साठा अगोदरच करून ठेवला आहे. आणि चीनने युद्धात तेलमार्गावर असलेले त्यांचे तळ वापरण्याचा प्रयत्न जरी केला तर मध्यपूर्वेतील देश आणि भारत-रशिया-अमेरिकेचे तळ त्यांना नाकाम करू शकतील. तशी युद्धाची परिस्थिती चीन येऊच देणार नाही. आणि याचे सर्वात मोठे कारण म्हणजे चीनला युद्धाचा सराव मुळीच नाही. चीनच्या सैनिकांपेक्षा पाकिस्तान, अफगाणिस्तान, इराण, व्हिएतनाम, दक्षिण कोरिया सारख्या लहान देशांनाही लढाईचा जास्त सराव आहे.

पाकिस्तानची भारतावर ही कृपाच आहे की तो भारतीय सैन्याला कायम तयारीत राहणे भाग पाडतो आणि भारतीय सैन्य आंतरराष्ट्रीय सैन्यात भाग घेत असते (त्यात पाकिस्तानही मागे नाही). फक्त पाकिस्तानला युद्ध करणे परवडणारे नाही. चीन त्यांना युद्धात खेचू शकणार नाही कारण तसे झाले तर सर्वप्रथम CPEC चे सर्वात जास्त नुकसान होईल. जरी CPEC रस्त्याची कामे बॉम्ब मिसाईल हल्ल्यापासून सुरक्षित राहण्यासाठी योजलेली Design केलेली आहेत. एकदा का भारताने POK, आणि पाकने चीनला दिलेला POKचा भाग कापला, जे शक्य आहे कारण मुख्य चीन आणि POK यात तिबेट हा राहण्यास तसेच खडे सैन्य ठेवण्यास खूप कठीण असलेला भाग आहे ज्यामुळे तेथील वातावरणात चिनी भूदल सैन्य टिकणार नाही. पूर्ण जगात त्या कठीण प्रदेशात युद्ध करू शकणाऱ्या सैन्याच्या ३-३।। पलटणी फक्त भारताकडे आहेत, त्या म्हणजे डोग्रा आणि गोरखा पलटणी. आणि यासाठीच चीन नेपाळला फूस लावत असतो की चीनविरुद्ध भारत गोरखा सैन्य वापरू शकणार नाही. आणि म्हणूनच चीनशी युद्ध वाढते दिसताच भारताने ताबडतोब नेपाळचा बंदोबस्त करणे जरुरी आहे. आणि यासाठीच भारत कधीही नेपाळला मदत बंद करीत नाही. सद्य नेपाळ सरकार पाडणे भारताला काहीच कठीण नाही (जशी राजस्थान, पंजाब, महाराष्ट्र, झारखंड सरकार निव्वळ भाजपप्रणित केंद्रीय NDA सरकारच्या मुद्दाम केलेल्या दुर्लक्षामुळे टिकून आहेत).

एकूण परिस्थिती पूर्ण असीमित युद्धाची नसून सीमित युद्धाचीच दिसते आहे आणि तिथपर्यंतच चीन मजल मारू शकेल अन्यथा चीनचे खूप नुकसान होईल हे चीनला कळून चुकलेले आहे. आणि यासाठीच चीन पाकिस्तान-भारत युद्ध पेटवू पाहाय आहे, ज्यापासून पाकिस्तान दूर पळते आहे (जरी पाकिस्तानने मिलिटरी खर्चासाठी या वर्षी बजेटमध्ये जास्त तरतूद केल्याचे समजते). कारण चीनला भारताकडून फटका म्हणजे पाकिस्तानचा सुंठीवाचून खोकला जाणे आहे. CPEC जितका लांबेल तितकेच दिवस पाकिस्तान सार्वभौम (स्वतंत्र) आहे हे पाकिस्तानला कळून चुकले आहे. आणि त्यामुळेच पाकिस्तानकडून आतंकवादी कुरबुरी सध्या कमी आहेत. भारताने POK, गिलगिट-बाल्टिस्तान ताब्यात घ्यावा हीच पाकिस्तानची मनोमनी ईच्छा असणार आणि आहे हे दिसून येत आहे. POK, गिलगिट-बाल्टिस्तान भारताने ताब्यात घेतला की CPEC हवेत विरेल. तसे कबायली टोळीवाल्यांमुळे POK हा भाग कुणाच्याही ताब्यात राहू शकत नाही, जसे अफगाणिस्तानमधून अगोदर रशियाने पाय काढून घेतला आणि आता अमेरिकाही तिथून पळ काढू इच्छित आहे. POK भागात अनेक अफगाणी टोळीवाले अमेरिकेच्या गुपचूप पाकिस्तानने फुलविले, फळविले आणि इतके वर्ष अफगाणिस्तानमधील टोळीयुद्धात मदत करून खूप वर्षे अमेरिकेकडून पैसा लाटला. या भागात प्रथम रशिया हरला, नंतर अमेरिका पळ काढण्याच्या मार्गावर आहे आणि म्हणून अमेरिका पाकिस्तानला अधूनमधून मदत करीत राहते जोपर्यंत अमेरिकी सैनिक अफगाणिस्तानमधून सुखरूप निघत नाहीत. आणि आता चीन CPECद्वारे त्यात फसतोय. भारतालाही POK मध्ये स्वारस्य असण्याचे कारण नाही. ज्या लोकांच्या जगण्याशिवाय इतर जरुरीच्या काहीच इच्छाच नाहीत, त्यांच्यावर कधीच राज्य करता येत नसते. ते फक्त एकमेकांच्या टोळ्यांवर हल्ले करीत राहणार, एकमेकांची बायकामुली पळवित राहणार. धान्य इत्यादी न पिकविता फक्त लुटालूट करून अन्न मिळविणाऱ्याना बंदुकी आणि दारुगोळा सोडून इतर कशाचीही अद्ययावत गोष्टींची इच्छा नसते आणि म्हणून जरुरीच नसते. कां नाही? गेल्या २००० वर्षांचा इतिहास बघा अगदी चंगेजखान, उझबेक, मुघल, शक, हुण इत्यादी कुणीही असो, येथील लोक फक्त लुटले जात राहिले आणि लुटत राहिले, पैसे कमविण्यासाठी हिंदुस्थानातील आक्रमणात अल्पकाळ सैन्यात भरती होत राहिले, एकदुसऱ्यांना मारून व मरुन जगत राहिले. हा भाग फक्त काश्मीरच्या शीख राज्याखालीच काहीसा शांत होता. हा भाग कधी माणसाळणार नाही, तेथे चीननेही CPEC प्रोजेक्ट बांधून मूर्खपणाच केलाय. त्या रस्त्यावर येणारे ट्रक इत्यादी कायम लुटले जाणार, जाळले जाणार. इतिहास साक्षी आहे मुस्लिम कबायली टोळीवाले असोत वा राजे त्यांचा प्रतिकार फक्त हिंदुस्थानीच करू शकले आणि म्हणूनच आज भारतात ८२% हिंदू टिकून आहेत.

तिबेट स्वतंत्र करून दलाई लामाला तेथे प्रस्थापित करणे भारताला अशक्य नव्हते, फक्त त्यावेळी असलेल्या नाकर्त्या आणि फक्त चीनला पोकळ धमक्या देणाऱ्या पंतप्रधानामुळे ते झाले नाही (दोन वेळा लिखित धमक्या दिल्या आणो तिसरीअगोदर चीननेच हल्ला केला). १९६२ मध्ये चीनला ठोकणे मुळीच अशक्य नव्हते, चीनची जिंकण्याची स्थिती नव्हतीच. पण भारतीय सैन्याला अखेरपर्यंत हल्ल्याच्याच काय प्रतिकार करण्याच्यासुद्धा आज्ञाच मिळाल्या नाहीत, कारण आपला संरक्षणमंत्री नेहरूंचा मित्र पक्के कम्युनिस्ट होते (ज्याला नंतर काढले गेले). दोघांनी मिळून भारताला आता शास्त्रांची काय जरुरी आहे आणि भारतातील १५ पैकी १२ Ordinance फॅक्टरी बंद केल्या. अन्यथा तेथून ब्रिटिश सरकार पूर्ण जगाला रायफली आणि गोळ्या पुरवीत इतकी त्यांची क्षमता होती. आज त्याच साध्या रायफली आणि गोळ्या आपल्याला सध्या हत्यारबंद पोलिसांसाठी आयात कराव्या लागत आहेत.

नेहरू आणि त्यानंतरचे नेहरू/गांधी घराणेही नेहमीच वामपंथी धोरणाचेच होते आणि अजूनही आहेत, फक्त ते निव्वळ सत्तेत राहिल्यामुळे त्यांचे वामपंथी गुण फ्रीजमध्ये बांधून ठेवले गेले, कारण सत्ता काबीज करण्याची जरुरीचं पडली नाही. ती आपोआप मोहनदास गांधींनी स्वत: त्यांच्या ताटात वाढली. जेव्हा स्वातंत्र्यानंतर २-३ महिन्यातच १९४७ सालीच मोहनदास गांधींना चूक जाणवली, तेव्हा नेहरूंना पंतप्रधानपद सोडा सांगितले पण नेहरूंनी सत्तालालसेने मुद्दाम ते कानाआड केले गेले. तसेच १९४८ सालीच आता काँग्रेस निर्मितीचे कार्य संपले म्हणून आता काँग्रेस विलीन Dissolve करा असे सांगितले पण ते बोलूनही उपयोग झाला नाही, कारण त्यानंतर काही ४-५ दिवसातच मोहनदास गांधीजींचा खून झाला. नेहरूंच्या ऐवजी वल्लभभाई पटेलांसारखे कुणी असते तर त्यांच्याकडून चीनला तेव्हा १९६२ सालीच धडा शिकवला गेला असता.

आजही चीन भारताचे वा भारत चीनचे फारसे नुकसान करू शकत नाही कारण भारत-चीन सीमेवर चीन असो वा भारत दोघांची लोकसंख्या फारच कमी आहे आणि तेथेही कठीण हिमालय उभा आहे. लडाखला लागून असलेला भाग लडाखचाच चीनने काबीज केलेला Aksai Chin आणि त्यास लागून मूळ तिबेटचा भाग आहे जेथे युद्धात चिनी (मूळ लडाखी-तिबेटी) सैन्य मारले गेले तरी चीनला त्यात स्वारस्य नाही पण भारतीय लडाखी, Aksai Chin सुद्धा मूळ भारतीय त्यामुळे तेथे फक्त ढकला-ढकली होते. आता कधी गोळ्या चालविल्या जातच नाहीत, हीच परिस्थिती सिक्कीमजवळ. तेथे चिनी अधिकारीसह उरलेले मूळ तिबेटी समोर उभे केले जातात, ज्यांच्या जिवाची चीनला किंमत नाही तशी चीनी सरकारला त्यांची चिनी माणसे मारली गेल्याबद्दलही काही दु:ख वाटत नाही, हे वूहान विषाणू प्रकरणावरून दिसून आले ज्यात वूहानच्या करोना विषाणूने लाख तरी चिनी मेले ज्याचे पण आकडे जगापासून वाचण्यासाठी लपविले गेले.

चीन ३रे महायुद्ध करणे शक्य नाही. जास्तीत जास्त South Chin Sea इथपर्यंतच लढाई वाढू शकते ज्यास मिनी महायुद्ध म्हणता येईल. आणि चीनची तितकीसुद्धा हिम्मत होणार नाही. झाल्यास सर्वात मोठे नुकसान चीनचेच असेल. आंतरराष्ट्रीय बाजारात चीनची पत कोसळेल. चीनमधील उद्योग बाहेर जात आहेतच, पण चिनी मालाला खरेदी करणारे भारतीय गद्दारांशिवाय कुणी नसेल. चीनचा GDP कोसळेल. शक्यता आहे Security Council मधील सदस्यत्व चीन हिरावून घ्यायला सोपे कारण मिळेल, चीनचे UNOचे सदस्यत्व जरी गेले नाही तरीही UNO च्या सदस्यांची संख्या वाढविली जाईल आणि त्यात भारत, तैवान, दक्षिण कोरिया, इंडोनेशिया, जपान इत्यादीची वर्णी लागेल.

कुणास ठाऊक भारतीय २० सैनिक मारले गेल्याबद्दल हे काय झालं, ऐसा तो मैने नही कहा था म्हणत चिनी क्सि जिनपिंग रडत असेल, चीनचेही ५९ मेलेत, पण त्याची चिंता अर्थात क्सि जिनपिंगला नसणार. पण भारताचे मेले तर युद्ध जवळ येते, जे करण्याची त्याची इच्छा आहे कि नाही कुणास ठाऊक. की फक्त हूल द्यायला गेले आणि २० भारतीय मारून बसले. समजेलच लवकर. पण भारत-चीन युद्ध होण्यात अमेरिका आणि युरोपियन यांचा फायदाच आहे, शस्त्र त्यांचीच विकली जाणार आहेत. आणि यावेळी युद्ध त्यांच्या घरादारांत नाही, दूरच्या दुसऱ्यांच्या घरात आहे. त्यांना फक्त बसल्या जागी टाळ्या वाजवायच्या आहेत. मॉडीजी टुम लडो, हॅम टुम्हारे पीचे हाय

मिमांसा करण्याचा स्तुत्य प्रयत्न. बर्‍याच बाबींना छेडलंय. :-)

- अगोदरच्या महायुद्धांची कारणे बघीतली तर बुभुक्षीत महत्वाकांक्षा हे एक महत्त्वाचं कारण दिसून येतं. तसंच आर्थिक अराजक माजलं आणि ते फार लांबलं, तर त्याची परिणती युद्धात होऊ शकते. सद्य जागतिक परिस्थितीत या दोन्ही गोष्टी दिसून येतात.
- जर चीनकडून युद्ध झालं तर पाकिस्तानला त्यात उडी घेण्यास ते भाग पाडू शकतात. सध्याच्या परिस्थितीत पाक अर्थव्यवस्था जवळपास संपूर्णपणे चीनवर अवलंबून आहे. केवळ चीननं दिलेलं कर्ज माफ जरी केलं तरी पाकची परिस्थिती बर्‍यापैकी सुधारेल. युद्धपरिस्थितीत चीन तसं करू शकतो. अफगाण युद्धाच्या वेळेस अमेरिकेने अनेक देशांची कर्जे केवळ पाठिंब्यासाठी माफ केली होती. इथे तर प्रत्यक्ष सहभाग घ्यायला लावण्यासाठी चीन एवढे तर नक्कीच करू शकतो.
- चीनला सध्या मित्र असलेले दिसत नाहीत असं म्हणणं योग्य ठरेल. पाकिस्तान आणि उ. कोरीया एवढेच देश सध्या चीनसोबत असल्याचे चित्र दिसते. बाकीच्या अनेक लहान देशांना चीननं आर्थिकदृष्ट्या अंकित करून जरी घेतले तरी ते प्रत्यक्ष युद्धात किती मदत करतात ते बघणं औत्सुक्याचं ठरेल.
- सीमित युद्ध करणे चीनला अजिबातच परवडणारे नाही. कारणे दोन -
१. सध्या चीनच्या विरोधात असलेलं जगातील बहुतांश जनमत. ऑफिशियल स्टँण्ड घेण्यासाठी बहुतांश देशांना ते कोलीत मिळेल.
२. सीमित युद्धातून मिळणारा नगण्य फायदा. उलट सीमित युद्ध भारताच्या पथ्यावर पडणारं असेल.

युद्ध अटळ आहे असं चित्र सध्यातरी दिसत नाही. ते होऊ नये हेच सर्वात चांगलं. पण झालंच तर आहे त्या परिस्थितीत भारत त्यासाठी तयार असेल, असा एक भारतीय म्हणून मला विश्वास आहे.

भीमराव's picture

20 Jun 2020 - 11:58 pm | भीमराव

गावात एक म्हण आहे, वेळेला शेजारीच उपयोगाला पडतो, पण आमचे शेजारी एकास एक नग आहेत एक दहशतवादी पाठवतो, एक घुसखोरी करतो. नेपाळी सुद्धा आजकाल चीन च्या बुडाला चिकटलेले आहेत. बुंगलादेश वाले चितगाव देतायत, श्रीलंका हंबंनटोटा देऊन फसली आहे. पाकिस्तान न गुआदार उघडले आहे चीन साठी. असले शेजारी असण्यापेक्षा आम्ही एक बेट असतो तर बरं झालं असतं आष्ट्रोल्यासारखं.
आणि चायनीज सामान नाही वापरलं तर मरणार नाही कोणी. दहा वर्षापूर्वी कुठे होते स्मार्टफोन? कोण वापरत होता चिरकुट इलेक्ट्रॉनिक? कुणाकडे होते दहा जाकेट, पाच बुट, दहा गॉगल? मरत होती का लोकं? टिक टॉक नव्हतं म्हणून काय बिघडलं होतं आपलं? आपण जर हायफाय चोजं कमी केली आणि गरज आहे तेवढं च खरेदी केलं ना तर कशाला लागतं चायनीज? भारतीय वस्तू म्हणजे दणकट, वापरायला सुटसुटीत आणि तुलनेने स्वस्त परंतु टिकाऊ असतात. त्यांचा पर्यावरणाला फायदा नाही का? वापरा आणि फेका च उदात्तीकरण थांबलं तरच उपयोग आहे बघा.

mrcoolguynice's picture

21 Jun 2020 - 7:23 am | mrcoolguynice

मी काय म्हणतो....
नाही म्हटलं....
ते बाल्कनीत येऊन , टाळी, थाळी बडवून,
दिवे लावण्याचे, व त्यातून निर्माण होणाऱ्या, पवित्र ध्वनी प्रकाश लहरींनी, चिन्यांना आपल्या भूमीवरून हुसकावून लावण्याच्या,
जगतगुरुने सांगितलेल्या रामबाण इलाजाची, कायप्पा ढकलपत्रे, भक्त संप्रदायाकडून आली कशी नाहीत अजून....

रात्रीचे चांदणे's picture

21 Jun 2020 - 8:38 am | रात्रीचे चांदणे

ह्या परिस्थिती मध्ये सुद्धा काही लोकांना राजकारण कसे दिसते हे समजत नाही, हिथे थाळी वाजवून डॉक्टर्स विषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा मुद्दा आणायची काय गरज होती?
ज्या लोकांना bjp आवडत नाही त्यांनी नक्कीच बजप चा विरोध करावा पण हिथे bjp विरुद्ध चीन नसून भारत विरुध्द चीन आहे हे लक्षात ठेवावे.
उद्या समजा दुर्दैवाने चिनी सैनिक तुमच्या शहरात घुसले (अस होणार नाही) तर तुम्ही मानणार आहे का चिनी सैन्याला की मी bjp चा supporter नाही मला मारू नका, आणि ते ऐकणार आहे का तुमचं. एका शाहिद झालेल्या जवानांच्या वडिलांनी सुद्धा राजकारण करू नका म्हणून सल्ला दिलाय, त्यामुळे त्यांचा तरी मान ठेवा.
सरकार म्हणून bjp च काय चुकलं असेल तर चर्चा करण्यात काहीही हरकत नाही पण ओढुन ताणून कुठेही bjp ला आणण्यात काहीही गरज नाही.

मदनबाण's picture

21 Jun 2020 - 8:33 am | मदनबाण

@ अर्जुन
सुंदर विश्लेषण !
चीन मधील वाढती बेरोजगारी, वुहान मधील कोरोनाच्या प्रादुर्भावाने लाखो चीन नागरिक मेले आणि मरत आहेत त्यांचा सरकार विरोधात उफाळुन येणारा रोष, तसेच हाँगकाँग मधील आंदोलन यांच्यामुळे चायनीज वन पार्टी सिस्टीमला धोका निर्माण झाला आहे, हा धोका टाळण्याचा एकमेव मार्ग म्हणजे जनतेचे लक्ष दुसर्‍या विषयात गुंतवणे आणि त्यासाठी शत्रु निर्माण करुन कृत्रिम राष्ट्रवादाची निर्मीती करुन जनतेला तो विषय देणे ज्यामुळे सत्तेवर येणारे गंडांतर टाळता येते.
यामुळे चीन आपल्याशी मध्यम युद्ध करण्याची मानसिकता तयार करुन आणि त्याप्रमाणेच नियोजन करुन सीमेवर आला आहे असे सध्या तरी चित्र दिसत आहे.

हिंदुस्थानशी पंगा घेणे परवडणारे नाही, हे चीनचे थोबाड एकादा व्यवस्थित सुजवले की त्यांच्या कायम स्मरणात राहिल याची खबरदारी आपण घेतली पाहिजी आणि जागतिक पातळीवर चीनला जितके उघडे पाडता येइल आणि त्यांच्या विरोधात जितकी वातावरण निर्मीती करता येइल ती केली पाहिजे, अशी संधी आपल्याला देखील परत मिळणार नाही.

आपले २० जवान वीरगतीस प्राप्त जरी झाले असले, तरी त्यांनी त्या स्थितीत केलेला करुन दाखवलेला पराक्रम हा अतुलनिय आहे :-
P1

संदर्भ :- reddit

जाता जाता :-

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Poongathave | Nizhalgal | Ilaiyaraaja Live In Concert Singapore

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

21 Jun 2020 - 10:46 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मालक ते व्हीडियोच्या लिंका द्या. नाय तर पुन्हा धागा जड होऊन जाईल. :)

-दिलीप बिरुटे

mrcoolguynice's picture

21 Jun 2020 - 9:57 am | mrcoolguynice

मदनबाण जी,

आपल्या प्रतिसादातील खालील ओळी, खुपच अर्थपूर्ण आहे, आणि त्या अर्थाचा आपण सर्वच भारतीय नागरिकांनी, विचार/चिंतन करून, आपण आपली भारतीय लोकशाही विचारबैठक कशी मजबूत करता/ठेवता येईल, याचासुद्धा प्राधान्यक्रमात समावेश करावा अशी आशा...

सिस्टीमला धोका निर्माण झाला आहे, हा धोका टाळण्याचा एकमेव मार्ग म्हणजे जनतेचे लक्ष दुसर्‍या विषयात गुंतवणे आणि त्यासाठी शत्रु निर्माण करुन कृत्रिम राष्ट्रवादाची निर्मीती करुन जनतेला तो विषय देणे ज्यामुळे सत्तेवर येणारे गंडांतर टाळता येते.

आपल्या प्रतिसादातील खालील ओळी, खुपच अर्थपूर्ण आहे, आणि त्या अर्थाचा आपण सर्वच भारतीय नागरिकांनी, विचार/चिंतन करून, आपण आपली भारतीय लोकशाही विचारबैठक कशी मजबूत करता/ठेवता येईल, याचासुद्धा प्राधान्यक्रमात समावेश करावा अशी आशा...
हे मी चीनसाठी म्हंटले आहे, तिथे एकच पार्टी म्हणजे सीसीपी आहे, आपल्या इथे लोकशाही असुन राजकारणी पर्ट्यांची काहीच कमतरता नसुन जगातील सर्वात मोठी लोकशाही आहे. ही लोकशाही असल्यानेच मी मोंदींचा निषेध नोंदवु शकतो आणि मतप्रद्रशनाचे प्रचंड स्वातंत्र्य आपल्या मिळाले आहे आणि आहे. हेच चीन असता तर तिथे विरोध करणारा सरळ गायब होतो आणि इंटनेटवर देखील कोणतेच स्वात्यंत्र्य नाही.

बाकी भारतीय नागरिकांनी, विचार/चिंतन करायचे झाले तर... त्यांच्या मनात नसलेल्या राष्ट्रवादाची करावयास हवे, जे आपल्या सैनिकांचे रक्त चीन सांडत आहे हे पाहत असुन देखील देखील आधाश्या सारखे चीनी मोबाइल विकत घेण्याच्या स्पर्धेत धावण्यात धन्यता मानतात !
संदर्भ :-
OnePlus 8 Pro sold out within minutes of going on sale even as calls for boycotting Chinese items

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Poongathave | Nizhalgal | Ilaiyaraaja Live In Concert Singapore

आपल्या इथे लोकशाही असुन राजकारणी पर्ट्यांची काहीच कमतरता नसुन जगातील सर्वात मोठी लोकशाही आहे. ही लोकशाही असल्यानेच मी मोंदींचा निषेध नोंदवु शकतो आणि मतप्रद्रशनाचे प्रचंड स्वातंत्र्य आपल्या मिळाले आहे आणि आहे. हेच चीन असता तर तिथे विरोध करणारा सरळ गायब होतो आणि इंटनेटवर देखील कोणतेच स्वात्यंत्र्य नाही.

बाकी भारतीय नागरिकांनी, विचार/चिंतन करायचे झाले तर... त्यांच्या मनात नसलेल्या राष्ट्रवादाची करावयास हवे, जे आपल्या सैनिकांचे रक्त चीन सांडत आहे हे पाहत असुन देखील देखील आधाश्या सारखे चीनी मोबाइल विकत घेण्याच्या स्पर्धेत धावण्यात धन्यता मानतात !

आपल्या इथे १९४७ पासूनच अखंडित लोकशाही आहे, व
मतप्रद्रशनाचे प्रचंड स्वातंत्र्य १९४७ अबाधित आहे (काही दृश्य व अदृश्य आणीबाणी कालावधी सोडून).
आपल्या स्वतंत्र सैनिकांनी , ते पुढे राज्यकर्ते झाल्यावर देखील, दुसऱ्या मतांचा आदर करण्याची थोर परंपरा घालून दिली होती खरी.

केवळ हयात पंतप्रधान मोदीजी यांच्या हयातीतच झालेली टीका असो, किंवा स्वर्गीय पंतप्रधान नेहरू यांच्यावर मरोणोत्तर अनेक दशके चाललेली खालच्या दर्जाची टीका असो, किंवा नंतरच्या पंप्रधानवरील मतप्रदर्शन असो, मतप्रद्रशनाचे हे प्रचंड स्वातंत्र्य भारताच्या जन्माच्या पहिल्या दिवसापासूनच आपल्याला मिळाले आहे , त्याचा यथेच्छ उपयोग काही भारतीय पिढ्यानपिढ्या करतही आहेत, व मतप्रद्रशनाचे हे प्रचंड स्वातंत्र्य, नोटबंदी सारखी गेल्या काही कालावधीतील नवलाई नाही, याची जाण, सुजाण नागरिकांना असेलच, असा माझा आशावाद आहे.

केवळ फोन खरेदीवरून , कोणत्याही भारतीयाच्या, मनात असलेला/ नसलेल्या राष्ट्रवादाविषयी अनुमान बांधणे हे वैचारिक संयमाचे शीघ्रपतन होईल.
मोदीजी स्वतः चिनी मालकी असलेल्या पे टी एम चा
पुरस्कार करतात, म्हणून त्याचा राष्ट्रनिष्ठेविषयी आपण शंका घेऊ शकत नाही.
फोन बरोबरच इतर असंख्य पैलू ध्यानात घेऊनच अनुमान बांधणे इष्ट होईल.

असो, केवळ एक पक्षीय चीनमधील राजकीय यंत्रणा,
व एक सुप्रीम लीडर च्या कुठल्याही निर्णयाचे अंध समर्थन करणारे मंत्री/सचिव/भक्त, याविषयी आपले निरीक्षण व अदृश्य तिटकारा प्रतिक्रियेतून जाणवल्याने,
मला आशा आहे की असे सुप्रीम-लीडर संस्कृती विषयी,
माझ्यासारख्या भारतीयांसारखी विचार बैठक, आपली असावी, असा कयास बांधायला वाव आहे.

केवळ हयात पंतप्रधान मोदीजी यांच्या हयातीतच झालेली टीका असो, किंवा स्वर्गीय पंतप्रधान नेहरू यांच्यावर मरोणोत्तर अनेक दशके चाललेली खालच्या दर्जाची टीका असो, किंवा नंतरच्या पंप्रधानवरील मतप्रदर्शन असो, मतप्रद्रशनाचे हे प्रचंड स्वातंत्र्य भारताच्या जन्माच्या पहिल्या दिवसापासूनच आपल्याला मिळाले आहे , त्याचा यथेच्छ उपयोग काही भारतीय पिढ्यानपिढ्या करतही आहेत, व मतप्रद्रशनाचे हे प्रचंड स्वातंत्र्य, नोटबंदी सारखी गेल्या काही कालावधीतील नवलाई नाही, याची जाण, सुजाण नागरिकांना असेलच, असा माझा आशावाद आहे.
वरील २ नावात तुम्ही अजुन २ नावे घेतली नाहीत, ती म्हणजे तथाकथित देश की बहु उर्फ राजमाता आणि त्यांचे चिरंजीव बिनडोक गांधी ! या माता पुत्रांचे कारनामे आपणास ठावूक नाही की ठावुक असुन त्यावर आपणास सोयिस्कर मौन पाळायचे आहे ? चीनच्या सत्तेशी कॉग्रेस पक्षाचा MoU [ memorandum of understanding ] कसा असु शकतो ? त्यावर आपले मत काय ?
संदर्भ :- Rahul Gandhi make the Congress-China MoU public
There is a secret shady pact between CCP and Congress party that makes India’s position very weak

केवळ फोन खरेदीवरून , कोणत्याही भारतीयाच्या, मनात असलेला/ नसलेल्या राष्ट्रवादाविषयी अनुमान बांधणे हे वैचारिक संयमाचे शीघ्रपतन होईल.
मोदीजी स्वतः चिनी मालकी असलेल्या पे टी एम चा पुरस्कार करतात, म्हणून त्याचा राष्ट्रनिष्ठेविषयी आपण शंका घेऊ शकत नाही.
फोन बरोबरच इतर असंख्य पैलू ध्यानात घेऊनच अनुमान बांधणे इष्ट होईल.

मी राष्ट्रनिष्ठा नाही तर राष्ट्रभावने बद्धल बोललो आहे याची नोंद घ्यावी. जिथे नागरिक चीनी वस्तुंचा बहिष्कार करतात तिथेच काही त्या जवळ देखील करतात, तेव्हा जे त्या जवळ करतात त्याच नागरिकां बद्धल माझे वक्तव्य आहे. मोदी सरकारने अनेक चीनी कंपन्यांची कंत्राटे रद्द करत आहेत हे पेटीएमचे उदा. देताना विसरलात की विचारांचे शिघ्रपतन रोखता आले नाही ?

मला आशा आहे की असे सुप्रीम-लीडर संस्कृती विषयी,
माझ्यासारख्या भारतीयांसारखी विचार बैठक, आपली असावी, असा कयास बांधायला वाव आहे.

मनमोहन असो वा मोदी, योग्य कृती बद्धल कौतुक आणि अयोग्य गोष्टींबदल निषेध नोंदवायला मी दुजाभाव करत नाही. आपले कॉग्रेस पक्षाने साइन केलेल्या MoU बद्धल काय मत आहे ते इथेच कळल्यास आपल्या विचारांच्या बैठकी बद्धल मलाही अंदाज येइल.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Poongathave | Nizhalgal | Ilaiyaraaja Live In Concert Singapore

वरील २ नावात तुम्ही अजुन २ नावे घेतली नाहीत,

कारण विषय भारतीय पंतप्रधान यांच्यावरील टीकेचा होता.

MoU बद्धल काय मत आहे

आपण दिलेला दुवा, व त्याचे लेखक, त्यातला मजकुराची सतत्या याबद्दलची विश्वासार्हता निदर्शक कोणतीही माहिती, दुर्दैवाने माझ्याकडे नसल्याने माझा पास.

मोदी सरकारने अनेक चीनी कंपन्यांची कंत्राटे रद्द करत आहेत हे पेटीएमचे उदा. देताना विसरलात की विचारांचे शिघ्रपतन रोखता आले नाही ?

माझा प्रतिसाद एखाद्याने खुल्या मनाने वाचता,
पेटीएमचे उदा. असूनही माझी मोदींच्या राष्ट्रभवानेविषयी शंका नाही, असेच प्रतीत होईल, अशी माझी आशा होती.

जिथे नागरिक चीनी वस्तुंचा बहिष्कार करतात तिथेच काही त्या जवळ देखील करतात, तेव्हा जे त्या जवळ करतात त्याच नागरिकां बद्धल माझे वक्तव्य आहे.

त्याला विरोध न करता, उलट मी हे निदर्शनाला आणू उत्सुक होतो, की केवळ फक्त फोन पुरते मर्यादित दृष्टिकोन न ठेवता, अधिक व्यापक दृष्टिक्षेप आपण टाकला पाहिजे आहे.

नाहीतर काये की एखादा उत्साही राष्ट्रप्रेमी, आपला जुना चायनीज फोन, ओळखीत कोणाला वापरायला देऊन,
सो कॉल्ड नॉन चायनीज फोन घेऊन, राष्ट्रप्रेमाच्या दिवा स्वप्नात रंगून जाण्याचा धोका संभवतो. विचारांच्या याच प्रकारच्या शीघ्रपतना विषयी इशारा देण्याचा माझा हेतू स्पष्ट होतो.

सध्याच्या चायनीज कंपनीच्या रद्द केलेल्या निविदा, जर केवळ वरकरणी मेड इन इंडिया लेबल लावलेल्या, परंतु चिनी भागभांडवलावर उभ्या राहिलेल्या कंपन्यांच्या वाट्याला न गेल्या, तरच रद्द करण्याची कृती पूर्णार्थ प्राप्त करेल.

मदनबाण's picture

22 Jun 2020 - 12:04 am | मदनबाण

आपण दिलेला दुवा, व त्याचे लेखक, त्यातला मजकुराची सतत्या याबद्दलची विश्वासार्हता निदर्शक कोणतीही माहिती, दुर्दैवाने माझ्याकडे नसल्याने माझा पास.

२००८ मधली बातमी :- Congress, Chinese Communist Party sign MoU

टिवटिव दुवा :- https://twitter.com/JethmalaniM/status/1274682842404929538

अवांतर :- चायनीज अँबेसीच्या पोर्टलवर २० एप्रिल २०१७ साली चायनीज फुड फेस्टिवल [ Chinese Diaoyutai Food Festival ] चे फोटो माझ्या पाहण्यात आले आहेत त्याचा दुवा वाचकांसाठी खाली देउन ठेवतो.
http://in.china-embassy.org/chn/sgxw/t1455276.htm

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- En Jodi Manja Kuruvi | Vikram | Ilaiyaraaja Live In Concert Singapore

बेकायदेशीर असेल तर पोलिसात जावा ,इथे आभाळ हेपलून काय उपयोग?

आपण दिलेल्या नवीन दुव्याबद्दल धन्यवाद !

परंतु दुव्यातील B & D ( आणि ) छापाच्या या तथाकथित पत्रकारीते विषयी, भाष्य करायला माझा नकार नोंदवतो.

मदनबाण's picture

26 Jun 2020 - 9:49 pm | मदनबाण

परंतु दुव्यातील B & D ( भ आणि द ) छापाच्या या तथाकथित पत्रकारीते विषयी, भाष्य करायला माझा नकार नोंदवतो.
या विषयावर अनेक वृत्तवाहिन्या आणि वर्तमानपत्र यांनी आपल्या सारखेच भाष्य करायचे टाळले असुन राहुल गांधी, प्रियांका गांधी आणि सोनिया गांधी सरकारवर सातत्याने टिका करतानच्या बातम्या मात्र पहिल्या पानावर देत आहेत. महाराष्ट्रातील [ पुरोगामी ? ] एकाही वर्तमानपत्रात [ तैमूर ने शी केली तरी त्याची मनोरंजनात्मक बातमी छापणारे ] या बद्धल वाच्यता केलेली निदान अजुन तरी माझ्या पाहण्यात नाही !

वरती मी म्हंटल आहे :- ती म्हणजे तथाकथित देश की बहु उर्फ राजमाता आणि त्यांचे चिरंजीव बिनडोक गांधी ! या माता पुत्रांचे कारनामे आपणास ठावूक नाही की ठावुक असुन त्यावर आपणास सोयिस्कर मौन पाळायचे आहे ?
यावर अधिक खाली :-

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- LYRICAL: Ghamand Kar | Tanhaji The Unsung Warrior

mrcoolguynice's picture

27 Jun 2020 - 6:49 am | mrcoolguynice

"B &D" journalism, my friend,
B &D.

mrcoolguynice's picture

27 Jun 2020 - 7:02 am | mrcoolguynice

What is B & D media ?
Analysis on The Deshbhakt.

B &D

B

गोंधळी's picture

27 Jun 2020 - 10:41 am | गोंधळी

इलेक्टोरल बॉन्ड ने काळा पैसा कसा नश्ट होणार आहे ते या दुव्यात योग्यरीत्या सांगीतले आहे.

गोदी मिडियात या बद्द्ल अवाक्षर नाही.

https://www.youtube.com/watch?v=m5s2GP9i1Bo

मदनबाण's picture

29 Jun 2020 - 12:34 pm | मदनबाण

ओक्के, लिंक बद्धल धन्यवाद.

B & D किंवा गोदी मिडिया काही नाही दाखवले जात ते वरच्या दुव्यातुन समजले, तसेच जर गांधी परिवारा विषयी B & D / गोदी मिडियात दाखवले जात असेल तर ते असत्य असते का ? त्या बद्धल देखील वाच्च्यता व्हायलाच हवी, नाही का ? दोष देउन सत्य नजरे आड करणे हे दोन्ही बाबतीत चूक ठरते.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- In 2020, can India pretend to be weaker than it was in 1967, despite building a nuclear arsenal and despite its longstanding status as one of the world’s largest importers of weapons?

गोंधळी's picture

21 Jun 2020 - 10:39 am | गोंधळी

Prime Minister Narendra Modi’s remarks Friday that neither has anyone intruded into Indian territory nor has anyone captured any military post एथेच हा विषय संपला.

https://www.youtube.com/watch?v=rLRTz4hSDU4

बाकी त्या जवानांना श्रध्दांजली.

भारताने काय काय केले पाहिजे?
१. तैवानला स्वतंत्र देश म्हणून मान्यता देणे व तेथे आपला राजदूत ठेवणे.
२. तिबेटच्या परागंदा सरकारला (Government in Exile) ला मान्यता देणे.
३. दक्षिण चिनी समुद्राला पूर्व समुद्र (East Sea) म्हणायला सुरुवात करणे. त्यातून व्हिएतनामच्या दाव्याला पुष्टी देणे.
४. मलाक्काच्या सामुद्रधुनीतील भारतीय नौदलाची गस्त वाढवणे.
५. चीनच्या सीमा भारताशी ऐतिहासिकदृष्ट्या कधीही जुळलेल्या नव्हत्या असे ठासून सांगत तिबेट, सिकियांग, आंतर मंगोलिया, हाँगकाँग इत्यादी प्रदेशांना स्वतंत्र दाखवत चीनचा नवा नकाशा प्रसिद्ध करणे.
६. गंगटोक ते ल्हासा, लेह ते यारकंद मार्गे काराकोरम खिंड अशा रस्त्यांची घोषणा करणे व मुद्दा क्र. ५ नुसार या रस्त्यांचे करार त्या-त्या स्वतंत्र सरकारशी करण्याचे घोषित करणे.
७. तैवानशी नौदलाचा संयुक्त सराव आयोजित करणे.
८. हाँगकाँगच्या लोकशाहीवादी आंदोलनाला उघड पाठींबा देणे.
९. तियानमेन चौकातल्या दडपलेल्या आंदोलनाला उजाळा देत राहणे. चीनमधील मानवाधिकार व लोकशाहीवादी कार्यकर्त्यांचा जाहीर गौरव करणे.

ही केवळ सैन्यसामर्थ्याची खडाखडी नसून अनेक पातळ्यांवर अनेक वर्षे खेळावे लागेल असे हे छुपे युद्ध आहे हे ध्यानात ठेवावे.

गलवान खोऱ्यातील आपल्या सैनिकांच्या अतुलनीय शौर्याला कडक सलाम!

शाम भागवत's picture

21 Jun 2020 - 11:30 am | शाम भागवत

मला वाटते हे सर्व करावे, पण ते २०२२ नंतर. रस्ते पूर्ण झाल्यावर आपला दबाब चीन व पाकिस्तानवर खऱ्या अर्थाने पडायला सुरवात होईल. तोपर्यंत तरी सरकारी पातळीवर खडाखडीचे प्रकारात सैन्याला मोकळीक देणे व चिन्यांना कुरघोडी करू न देणे, रस्त्यांच्या कामात अडथळे आणण्याचे चीनचे प्रयत्न हाणून पाडणे हेच उपाय अवलंबावेत. तसेच या सगळ्याचे रूपांतर युध्दात होणार नाही यासाठी राजकीय खेळ्या करत राहणेच योग्य होईल.

२०२२ नंतर मात्र युध्द झाले तरी हरकत नाही, इतक्या थराला जाऊन, आक्रमकता दाखवायला हरकत नाही. मात्र तोपर्यंत, आम्ही चिन्यांना घाबरत नाही हा संदेश कणखरपणे सर्व जगांत पोहोचायला हवा. ऐनवेळी भारताने कच खाल्ली तर काय करायचे? अशी पुसटशी सुध्दा शंका, भारतीय मित्रांच्या मनात येता कामा नये.

शाम भागवत's picture

21 Jun 2020 - 12:27 pm | शाम भागवत

अहो, मी वेगळे काहीही सुचवत नाहीये. जनरल थोरातांनी मांडलेली व राबवलेली व्यूहरचनेच्या आधारे सगळं बोलतोय. पण आपण ती व्यूहरचना मोडली व १९६२ साली हरलो. आता परत तीच चूक का करायची? चिनने मात्र रसद पुरवढ्यावर ताण येणार नाही याची काळजी घेत (म्हणजे रस्ते बांधत) नेहमी हालचाली केल्या आहेत. थोरातांचे बोलणे चीननेच जास्त मनावर घेतलेले दिसून येते. आवश्यक तेवढा भूभाग ताब्यात आल्यावर त्यांनी आसामात उतरलेले सैन्यही ताबडतोब माघारी घेतले व एकतर्फी युध्दबंदी जाहीर केली. अन्यथा रसदीवर ताण येणार हे त्यांना माहीत होते. तसेच त्यानंतर त्यांनी मिळवलेल्या प्रदेशात लागलीच रस्ते बांधले.

रसदीवर येणाऱ्या ताणामुळे आसामात घुसखोरी चीन करूच शकणार नाही. जर केली तर, भारताच्या या सापळ्याच चीन अडकेल व त्याचे कंबरडे मोडता येईल हेच तर थोरात सांगत होते. चिनच्या आसाममधील वेगवान माघारीमुळे थोरातजी बरोबरच बोलत होते हेही सिध्द झालंय. जाऊ दे. जे झाले ते झाले. पण चीनशी लढताना ती चूक पुन्हा करायची नाही ही खूणगाठ बांधली तरी पुरेसे आहे.

जर युध्द झाले तर त्याचा फायदा आपल्याला उठवता यायला पाहिजे. त्यासाठी पाकने चिनला दिलेला काश्मीरचा भाग व त्यालगतचा अक्साई चीनचा काही भाग येथे वेगाने सैन्य पोहोचवता येईल, यास्थितीत पोहोचेपर्यंत, युध्दाचा आपल्याला काय उपयोग आहे?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

21 Jun 2020 - 11:56 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रतिसाद आवडला. आता पुढे काय केले पाहिजे, आता भारताची काय भूमिका राहिली पाहिजे, हे सुचवणारा प्रतिसाद आवडला. भारत आता यापुढे काय पावले उचलेल ते पाहणे रोचक ठरेल.

आपले प्रतिसाद नेहमीच नवे, वेगळे आणि माहितीपूर्ण असतात. लिहिते राहा सेठ.

-दिलीप बिरुटे

शाम भागवत's picture

21 Jun 2020 - 12:28 pm | शाम भागवत

अहो, मी वेगळे काहीही सुचवत नाहीये. जनरल थोरातांनी मांडलेली व राबवलेली व्यूहरचनेच्या आधारे सगळं बोलतोय. पण आपण ती व्यूहरचना मोडली व १९६२ साली हरलो. आता परत तीच चूक का करायची? चिनने मात्र रसद पुरवढ्यावर ताण येणार नाही याची काळजी घेत (म्हणजे रस्ते बांधत) नेहमी हालचाली केल्या आहेत. थोरातांचे बोलणे चीननेच जास्त मनावर घेतलेले दिसून येते. आवश्यक तेवढा भूभाग ताब्यात आल्यावर त्यांनी आसामात उतरलेले सैन्यही ताबडतोब माघारी घेतले व एकतर्फी युध्दबंदी जाहीर केली. अन्यथा रसदीवर ताण येणार हे त्यांना माहीत होते. तसेच त्यानंतर त्यांनी मिळवलेल्या प्रदेशात लागलीच रस्ते बांधले.

रसदीवर येणाऱ्या ताणामुळे आसामात घुसखोरी चीन करूच शकणार नाही. जर केली तर, भारताच्या या सापळ्याच चीन अडकेल व त्याचे कंबरडे मोडता येईल हेच तर थोरात सांगत होते. चिनच्या आसाममधील वेगवान माघारीमुळे थोरातजी बरोबरच बोलत होते हेही सिध्द झालंय. जाऊ दे. जे झाले ते झाले. पण चीनशी लढताना ती चूक पुन्हा करायची नाही ही खूणगाठ बांधली तरी पुरेसे आहे.

जर युध्द झाले तर त्याचा फायदा आपल्याला उठवता यायला पाहिजे. त्यासाठी पाकने चिनला दिलेला काश्मीरचा भाग व त्यालगतचा अक्साई चीनचा काही भाग येथे वेगाने सैन्य पोहोचवता येईल, यास्थितीत पोहोचेपर्यंत, युध्दाचा आपल्याला काय उपयोग आहे?

खरंय. प्रतिसाद पटला. चीनने त्याच्या ताब्यातल्या भूभागावर रस्ते लगेच बांधून घेतलेत. काही तर actual line of control च्या इतक्या जवळ आहेत की त्यातून पुढे भारताला चांगलाच धोका निर्माण होऊ शकतो. भारतानं मात्र जरा काही बांधकाम हाती घेतलं की चीन बोंब उठवतो, दबावतंत्र खेळतो. नेहमीचे फेसऑफ्स त्याच दबावतंत्राचा भाग आहेत. त्यामुळेच एवढी वर्षं तिथं फार बांधकाम झालेलं नव्हतं. आत्ता आत्ता भारतमाला प्रकल्पांतर्गत सीमेलगत बरीचशी कामं झालीयेत/चालू आहेत.
पण बांधकामाचंही जाऊ देत.. मंत्रीमंडळातील नेते, लष्करी अधिकारी यांनी अरुणाचल प्रदेश/लद्दाख मधे साधी भेट जरी दिली तरी चीन समज देण्याची वगैरे भाषा बोलतो.

चीननं स्वतःचा खूप बागुलबुवा करून ठेवलाय. युद्धतंत्राचा तो प्रभावी भाग आहे. समोरच्याचं मानसिक खच्चीकरण केलं की अर्धी लढाई जिंकलेली असते. पण भारतीय लष्कराच्या ६२च्या युद्धातल्या पराजयातील पराक्रमाचीही त्यांना तितकीच जाणीव आहे. ते शौर्य वादातीत आहे. आजपर्यंतच्या युद्धखोरीच्या प्रकारात आणि फेसऑफ्स मधे त्याचं प्रतिबिंब उमटतं. आपणच जर घरबसल्या इतके संतापतो, तर आपलं सैन्य किती भडकलेलं असेल याची कल्पनाच केलेली बरी. चीन सैन्याचं मनोबल आत्ता कसं असेल हे जाणणं औत्सुक्याचं ठरेल!

आता तर Rules of Engagement [ROE] मधे सुद्धा बदल केल्याची बातमी आहे. ज्यांना जो संदेश हवा तो उघड आणि स्पष्ट आहे.

सौंदाळा's picture

21 Jun 2020 - 12:38 pm | सौंदाळा

एस,
प्रतिसाद एक नंबर.
चीन उघडपणे पाकड्याना पाठींबा देतो, आपला झेंडा मुद्दाम उलटा लावतो. याच भाषेत यांना उत्तर दिलं पाहिजे.

mrcoolguynice's picture

21 Jun 2020 - 12:02 pm | mrcoolguynice

चीन लडाखमध्ये भारतीय सैनिकांचे हत्याकांड करत असताना... परिस्थिती वर भाष्य करून , भारतीय जनतेला खरी माहिती देणे तर सोडाच, पण भिन्न मतप्रवाहतील घटकांवर, "या परिस्थितीत राजकारण आणू नका" म्हणून भक्तवृंदा कडून एकप्रकारे सात्विक संताप व त्राग्याचे प्रदर्शन करणार्यांनी,
डोळ्यावर ओढलेले कातडे बाजूला सारावी...
चिनी घुसखोरी इतकाच महत्वाचा, नव्हे त्याच्या कैकपटीने अधिक भरतीयांच्याशी संबंधित कोरोना महासाथी दरम्यान , चाललेले राजकारण पाहावे...
जस की दुसऱ्या पक्षांची राज्यसरकारे अनैतिक मार्गाने पडण्याचे प्रयत्न करणे, तेथील रेल्वे सारख्या केंद्रीय साधनांचा वापर करून ठराविक राज्यातील श्रमिक वाहतुकीची वाट लावून त्याचे खापर तेथील राज्यांवर टाकणे, तिथल्या आपल्या पक्षातील पण विरोधी बाकांवर बसलेल्या चमचा पित्त्यांच्या मदतीने, धादांत सणसणीखेज आरोपाचा धुरळा लावणे,
अफवेतून मॉब लिंच झालेल्या धार्मिक व्यक्तीच्या, विरुद्ध धर्मियांना टार्गेट करण्याचा दृष्टिकोनातून उन्मादी भडकावू अफवा पसरवून , आधीच अतिश्रमात असलेल्या पोलीस यंत्रणेवर जास्तीचा ताणाचा बोजा टाकणे...

हे असे धंदे आधी बंद करण्याचा आग्रह भक्तांनी आपल्या मानस पित्या कडे धरावा.

विनोद१८'s picture

22 Jun 2020 - 12:05 am | विनोद१८

......ह्या प्रतिसादाचा मुळ धाग्याशी सम्बध काय.

mrcoolguynice's picture

22 Jun 2020 - 6:40 am | mrcoolguynice

चीन लडाखमध्ये भारतीय सैनिकांचे हत्याकांड करत असताना... परिस्थिती वर भाष्य करून , भारतीय जनतेला खरी माहिती देणे तर सोडाच, पण भिन्न मतप्रवाहतील घटकांवर, "या परिस्थितीत राजकारण आणू नका" म्हणून भक्तवृंदा कडून एकप्रकारे सात्विक संताप व त्राग्याचे प्रदर्शन

या धाग्यावर, काही जणांकडून हे चालू आहे.

अनिरुद्ध.वैद्य's picture

22 Jun 2020 - 8:01 am | अनिरुद्ध.वैद्य

का देत नाहीये!

का सरकारने दिलेल्या महितीबाबत खर नाहीच आहे असा ग्रह आहे?

भारतीय हद्दीत कोणीही घुसखोरी केलेली नाही वा लष्करी तळही ताब्यात घेतलेले नाहीत असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वपक्षीय बैठकीत सांगितलं.

“अशा प्रकारची वक्तव्यं करुन लोकांच्या भावनांशी खेळलं जात आहे. माझी नरेंद्र मोदी आणि त्यांच्या समर्थकांना असं करणं बंद करा अशी विनंती करायची आहे,” असं कमल हासन यांनी म्हटलं आहे. “प्रश्न विचारणं देशविरोधी होत नाही. आपल्या घटनेने प्रश्न विचारण्याचा हक्क दिला आहे आणि जोपर्यंत सत्य ऐकायला मिळत नाही आम्ही प्रश्न विचारत राहणार,” असं कमल हासन यांनी सांगितलं आहे.

शुक्रवारी सर्वपक्षीय बैठक पार पडल्यानंतर विरोधकांनी केंद्र सरकारवर टीका करताना नियंत्रण रेषेवर नेमकं काय झालं याबद्दल योग्य माहिती दिली नसल्याची टीका केली होती. “संपूर्ण माहिती देऊ शकत नाही हे समजू शकतो, पण विरोधकांना आणि देशवासियांना अशा संवेदनशील घटनांची योग्य माहिती दिली पाहिजे,” असं मत कमल हासन यांनी व्यक्त केलं आहे.

लोकसत्ता ऑनलाइन | June 21, 2020 06:06 pm

अनिरुद्ध.वैद्य's picture

22 Jun 2020 - 7:09 pm | अनिरुद्ध.वैद्य

आलय. उगा ह्सन काका काय म्हणताय आम्हाला काय ऐकवता?

प्रचेतस's picture

21 Jun 2020 - 5:33 pm | प्रचेतस

रोचक चर्चा

हा आदरणीय पंतप्रधान यांचा दावा आणि वाचाळ माहिती आणि प्रसारण मंत्री यांच्याकडून झालेला खुलासा माझ्यासाठी असा आहे:

एकूण चिनी सैन्याची मुसंडी २६ चौरस किमी इतकी. नंतर २.५ किमी माघार. उरलेल्या प्रदेशाचे आक्रमित क्षेत्र चीनने आतापर्यंत बळकावलेल्या तुलनेत नगण्य. म्हणून चीनने भारतीय भूमीवर आक्रमण केले नाही.

जाता जाता: तेव्हडं चीनने काँग्रेसच्या चीन धार्जिणी कारकिर्दीत लाटलेल्या प्रदेशाचे क्षेत्रफळ भारताच्या एकूण क्षेत्रफळापेक्षा कमी राहील एव्हडं बघा.

भारत आणि चीन दरम्यान पारंपरिक युद्धाची शक्यता सध्या तरी नाही. पण गलवान व्हॅली सारख्या छोट्या चकमकी सुरू राहतील, ज्यात बंदुकीची गोळी किंवा तोफेचा गोळा पण न सुटता दोन्ही बाजूने सैन्याचे बळी जातील.

पण सध्या तरी भारत आणि चीन गोळी चालवून युद्धाला सुरवात करणार नाही. याचे सगळ्यात महत्वाचे कारण म्हणजे, एकदा गोळी चालवून युद्धाचा भडका उडाला तर या युद्धाला लवकरच जागतिक स्वरूप प्राप्त होईल आणि ते भयानक असेल. जगातील कोणत्याही मोठ्या देशाला आपल्यामुळे युद्ध सुरू झाल्याचा ठपका आपल्यावर येऊ द्यायचा नाही. या परिस्थितीत अजून एक होऊ शकते की चीन स्वतः काही न करता सध्या आपल्या कडेवर घेतलेल्या नेपाळ कडून भारताची आगळीक काढू शकतो, किंवा चीन मागे आहे या भरवशावर नेपाळ पण काही वेडेपणा करू शकतो. याची छोटी झलक नेपाळने बिहारला लागून असलेल्या सीमेवर सितामढी येथे दाखवली होती. मात्र नेपाळने आपल्या सुरक्षा जवानांवर हल्ला केला किंवा चिथावणी दिली तर भारत सरकार समोर गंभीर संकट तयार होईल. लक्षात घ्या भारताने या वर कारवाई करायची नाही असे ठरवले तर विरोधी पक्ष आणि भारतीय जनता पण सरकारला सुखाने बसू देणार नाही आणि केली तर चीन या संघर्षात नेपाळची बाजू उचलण्याच्या बहाण्याने उडी मारेल आणि त्याला व्यापक युद्धाचे स्वरूप देईल. पुन्हा युद्धखोर म्हणून भारताचे नाव समोर करेल, या बाबतीत आपल्याच देशातील डावे पत्रकार पण चिनचीच भाषा बोलतील.
तसेच हीमालयातील लढाईसाठी भारताला गूरखा रेजिंमेन्ट अत्यंत महत्वाची आहे. कारण त्या वातावरणात ते सहज व दीर्घकाळ टिकाव धरु शकतात. त्यामूळे भारताला संयम बाळगणे व नेपाळशी संबंध सूधारणे किंवा टिकवणे आवश्यक आहे. जरी चूकीचे वाटत असले तरी नेपाळला सध्या व्यापारात काही सवलती, आर्थिक मदत देऊन तो कूरापती काढणार नाही, याची काळजी घ्यावी लागेल. तसेही ओली जास्त दिवस सत्तेत राहतील असे वाटत नाही. त्यांचा आरोग्याचा आधीच तक्रारी आहेत. देशात विरोध वाढत चालला आहे. आपण निदान नेपाळचे लोकमत भारताच्या बाजूने राहील याकडे लक्ष द्यावे.
त्या प्र माणे अ मे रिका, सौदी अरेबियाशी अ स लेले आप ले चां ग ले संबंध वाप रुन पा कि स्तान व र द बाव आ णावा, जो प र्यत आप ले र स्ते सी मा भागात बां धून त या र होत ना ही तो प र्य त यू द्ध टा ळावेच लागेल. हिवाळात चीनही यूध्दास तयार होणार नाही. त्यामूळे सध्या आपल्या संयमाची परीक्षा आहे.

शाम भागवत's picture

21 Jun 2020 - 8:15 pm | शाम भागवत

खरंय.
संयम फारच महत्वाचा.
मग ते क्षेत्र कोणतेही असो.

Rajesh188's picture

22 Jun 2020 - 12:22 am | Rajesh188

चीन हा साम्राज्यवादी देश आहे.त्याचा इतिहास च तसा आहे.
मला वाटतं तिबेट हा स्वतंत्र देश निर्माण झाला असता तर चीन ची सीमा भारताला मिळालीच नसती.
चीन ला शह द्यायचा असेल तर तिबेट हा स्वतंत्र देश निर्माण करण्यासाठी जोरदार मोहीम भारताने आखावी.
त्या साठी शस्त्र,प्रशिक्षण देण्याची तयारी पण ठेवावी.
तिबेटी तरुणांना पैसे, शस्त्र पुरुवून अतिर्की कारवाया करण्यास प्रोत्साहन देण्याची गरज आहे.
चीन भारताशी युद्ध करणार नाही कारण चीन
ची गुर्मी उतरवण्याची जगातील खूप राष्ट्र ची इच्छा आहे .
युद्ध झाले तर अनेक देश भारताच्या बाजू नी उभे राहतील .
भारताच्या अरुणाचल वर त्याचा डोळा आहे.

कपिलमुनी's picture

22 Jun 2020 - 12:52 am | कपिलमुनी

१९६२ नंतर चे सर्वात कमि % डिफेन्स बजेट असतना आपले सैन्य कसे लढणार ? ते अत्यंत शूर वीर आहेत पण त्यांना पुरेसे बजेट द्यायला हवे , युद्ध सुरु झल्यावर ५०० कोटि जाहीर केले आहेत , हे आग लागल्यावर विहिर खणण्यासारखे आहे

कपिलमुनी's picture

22 Jun 2020 - 12:57 am | कपिलमुनी

भारतचा स्वातंत्र्यानंतरचा तिबेट सहीत नकाशा कोणा़कडे उपलब्ध आहे का ? जालीय दुवा असेल तर इथे डकवावा

तुषार काळभोर's picture

27 Jun 2020 - 8:47 am | तुषार काळभोर

3

शेजारी शेजारी जमीन असेल तर काही नालायक शेजारी आपल्या शेत जमिनीत आक्रमण करतात .त्यांना प्रेमाने समजावून काही फरक पडत नाही तुम्ही संयम ठेवला तर ते अजुन तुम्हाला त्रास देतात अडवणूक करतात ह्याचा अनुभव नेहमी आपल्याला येतो.
जेव्हा भर चोकात त्याला फोडून काढत नाही तो पर्यंत तो त्रास देतच राहतो.
तसेच देशांचे आहे जो पर्यंत तुम्ही आक्रमक भूमिका घेत नाही तो पर्यंत बाजूचा देश त्रास देतच राहणार.
नेपाल सारख्या किरकोळ देश पण आपल्या विरोधी जातो ह्या आपले शांती प्रिय धोरण कारणीभूत आहे.

शाम भागवत's picture

22 Jun 2020 - 1:46 am | शाम भागवत

चीनच्या बाॅर्डरवरील रस्त्यांबद्दल उल्लेख आलेला आहे म्हणून
बाॅर्डर रोड सारखेच बाॅर्डर रेल्वे बद्दलही इथेच लिहीतो.

यांत जम्मु व काश्मीर,लडाख,पंजाब,हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, राजस्थान, अरूणाचल व आसामचा समावेश
१. श्रीनगर - कारगील - लेह ४३० किमी, २०२६ ला पूर्ण करणार.
२. जम्मू - पूँच्छ २३४ किमी. २०२५ ला पूर्ण करणार.
३. पठाणकोट - लेह ७२८ किमी २०२३ ला पूर्ण करणार.
४.पट्टी - फिरोजपूर २५ किमी २०२२ ला पूर्ण करणार. डबललाईन (पाकिस्तानी बाॅर्डरला खेटून) मुंबई -जम्मू अंतर २६७ किमीने व मुंबई - अमृतसर अंतर २४० किमीने कमी होणार. फिरोजपुर - अमृतसर अंतर ३२ किमी कमी होणार. भारत पाकिस्तान युध्दातली ही सगळी नेहमीची युध्दभूमी आहे.
५. डेहराडून - उत्तरकाशी ९० किमी २०२६ ला पूर्ण करणार
६. उत्तरकाशी - यमुनोत्री
७. उत्तरकाशी - गंगोत्री
८. ऋषीकेश चामोली १६० किमी २०२६ ला पूर्ण करणार
९. जोशीमठ, बद्रीनाथ
१०. सोनप्रयाग - केदारनाथ
११. तनकपूर - बागेश्वर १५५ किमी. २०२६ ला पूर्ण करणार ( नेपाळ व चीन सरहद्द)
१२. तनकपूर - जौलिजबी १०७ किमी २०२७ ला पूर्ण करणार (नेपाळ व चीन सरहद्द)
१३. जोधपूर - जैसलमेर २९२ किमी २०२३ ला पूर्ण करणार (पाकीस्तान सरहद्द)
१४. जोधपूर फलसुद ११६ किमी २०२३ ला पूर्ण करणार (पाकीस्तान सरहद्द)
१५. अनुपगढ - बिकानेर १५५ किमी २०२३ ला पूर्ण करणार (पाकिस्तान सीमा)
१६. मिसामरी - तवांग ३७८ किमी २०२६ ला पूर्ण करणार
१७. मुरकोगसेलाक - रूपाई २५६ किमी २०२६ ला पूर्ण करणार
१८. उत्तर लखीमपूर - सिलापथर २४७ किमी २०२६ ला पूर्ण करणार

काही गावांच्या नावांचा उच्चार चुकीचा केला गेला असणे शक्य आहे.

कृपया सोशल मिडीया वर भारताचे संरषण धोरणावर चचाॆ करू नका.

आता हा प्रतिसाद नक्की कोणत्या माहितीबद्दल आहे ते कळेना. त्या माहितीच्या खालीच प्रतिसाद चिकटवला असता तर बरे झाले असते.
पण हा प्रतिसाद जर बाॅर्डर रेल्वे बद्दल असेल, तर त्यात गोपनीय काहीही नाही.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

22 Jun 2020 - 1:49 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

नेपाळी पण सध्या लैच ट्याव ट्याव करू लागलय. चीन-नेपाळ संबंध पाहताआणि सध्या नेपाळ सरकारचं चीन प्रेम, त्यांचा नवा नकाशा हे सर्व पाहता यांनाही खुमखुमी येतेय.

च्यायला, रात्री गल्लीत ड्यूटीला येणारे गुरखे, कपड़े विकायला येणारे नेपाळी यांना आवरावे लागते.

आम्हाला उगा तान देऊ नका. आमचं डोकं सध्या खराब आहे. शिस्तीत राहा म्हणा.

-दिलीप बिरुटे

केदार-मिसळपाव's picture

22 Jun 2020 - 5:20 pm | केदार-मिसळपाव

ते आपले बंधू आहेत. राज्यकर्ते आणी नागरीक , आपण गफलत करता कामा नये.

अनिरुद्ध.वैद्य's picture

22 Jun 2020 - 7:12 pm | अनिरुद्ध.वैद्य

कि विचारायच, की बाबारे, चीन नं तर तुमचेही ४ ५ गावं घशात घातले, म्हाइताय का ;)

तैवानच्या हद्दीत विमाने घुसवून:
"...Normalized sorties will let the Taiwan secessionists understand the power gap between the Chinese mainland and the island, as they will find themselves struggling to deal with frequent PLA operations, and the US cannot come to their rescue, the expert said....." ग्लोबल टाईम्स

* ...Normalized sorties...

* ...they will find themselves struggling to deal with frequent PLA operations

* and the US cannot come to their rescue,

भारतीय हद्दीत पुढे सरकण्याचे प्रयत्न करुन

* '...India knows ‘it can’t have a war with China’..'
*'"It is normal to see heated nationalism in India, but we don't need to worry whether nationalism will hijack the policymaking of India to further provoke China. When India is in conflict with Pakistan or other neighbors, nationalism might drive New Delhi to take actual operations, but when it comes to China, it is a different story,"...So they might say some harsh words, but they dare not take the first shot against us." - ग्लोबल टाईम्स

आता चिनी भाषेतला फरक बघा

According to the report, the US has 375,000 enlisted members of its Indo-Pacific Command, including 60 percent of its Navy ships, 55 percent of its Army and two-thirds of its Marine Corps. In addition, with 85,000 forward-deployed soldiers and a large amount of high-tech and new weaponry, the US military has maintained its absolute supremacy in the Asia-Pacific over the years, while also keeping to seek new deployments, budgets and resources using China's and Russia's military development as excuses.

In 2020, the US took a series of measures to contain China, on topics including COVID-19, Hong Kong, Taiwan, high-tech and the military. Recently, US warships have repeatedly trespassed into Chinese territorial waters around the Xisha and Nansha islands, conducted operations in the South China Sea and crossed the Taiwan Straits. In a rare move, it has deployed three aircraft carriers to the region.

Chinese military experts told the Global Times that China has expelled the trespassing US warships and conducted exercises to boost its combat capability, showing its will and capability to safeguard its sovereignty and territorial integrity.

"...Both countries (चीन व युएसए) should keep communication channels open, implement the military confidence building and crisis prevention agreements and create conditions for communication and dialogues on nuclear security, cyberspace, outer space and artificial intelligence to manage their differences and prevent conflicts, the report suggests...." ग्लोबल टाईम्स

तेच भारताबाबतचा बढाईखोरपणा

"....Indian forces use weapons bought from different countries which many not coordinate with each other well, not to mention their undisciplined troops who can blow up their own submarine in a dockyard and shoot down a friendly helicopter, observers noted...."
"...Indian economist Swaminathan Aiyar said in a Saturday report by Indian media outlet the Economic Times that the gap between China and India militarily and economically is five times bigger than it was in 1962. Attempting military adventures in that area is asking to be thrashed again and humiliated on a scale five times bigger than in 1962.

In a potential self-defense counterattack, China will secure its own territory and not likely claim Indian territory after emerging victorious, but the battle will deeply hurt India so much that global position and economy would go backwards to decades ago, Chinese analysts said...." -ग्लोबल टाईम्स

बेसिकली आमेरीका इंडोपॅसिफीक मध्ये दबाव कायम ठेवेल पण आमेरीकन जनमत कोणतेही युद्ध अंगावर घेण्याच्या मनस्थितीत नाही याची कल्पना, स्वतःची सुधारलेली आर्थीक व सामरीक स्थिती त्याच वेळी भारतासहीत इतरदेशांच्या अर्थव्यवस्था करोनाने हवालदिल झालेल्या असताना पुर्ण युद्ध अंगावर घ्यायचे नाही पण युद्ध न करता पुशकरुन जेवढे पदरात पाडून घेता येईल तेवढे पदरात पाडून घेणे असा सर्वसाधारण पवित्रा असावा.

अर्थात चिनला भाषा कोणती समजते ती आमेरीकेसारख्या बलाढ्य देशाच्या बलाढ्य आरमाराची

केदार-मिसळपाव's picture

22 Jun 2020 - 4:42 pm | केदार-मिसळपाव

map

शाम भागवत's picture

22 Jun 2020 - 9:24 pm | शाम भागवत

१६ जून २०२० पासून चीनवर एक मोठीच आफत ओढवलेली आहे.

२०१६ साली युरोपिय संघाने चीनविरूध्द दावा दाखल केला होता. संघाचे असे म्हणणे होते की, चीन त्यांच्या उत्पादकांना खूप मोठ्या प्रमाणात अनुदान देतो. त्यामुळे युरोपियन संघामधे किंमत पाडून माल विकणे चीनला जमते. त्यामुळे इथले उद्योग बंद पडत आहेत. बेरोजगारी वाढतीय. उद्योग बंद पडल्यावर चिन किंमती वाढवायला सुरवात करतो हेही तोपर्यंत लक्षात आलेले होते. खरेतर हे आरोप चीनवर गेली दोन दशके होत आहेत. पण योग्य व अधिकृत उपाय सापडत नव्हता.

अमेरिकापण याच मुद्यावर भर देत होती. पण ट्रंप यांनी हाच मुद्दा यावेळेस जास्त लावून धरला. पण अमेरिकेची गोष्टच वेगळी आहे. ती जागतिक व्यापार संघटनेकडे दावे लावणे वगैरे करत बसली नाही. तिने थेट आयात कर लावायला सुरवात केली व जागतिक व्यापार संघटनेला दम भरला की, संघटनेने चीनवर योग्य कारवाई केली नाही तर अमेरिका जागतिक व्यापार संघटनेतून बाहेर पडेल!!!

अर्थात ट्रंपला आकस्त्राळे, स्वार्थी वगैरे विशेषणे देऊन चीन मात्र सर्व नैतीक बाबींचे पालन करणारा असं रंगवायला काहींनी कमी केले नाही. लोकांनाही त्यात चुकीचे वाटले नाही, की शंका आली नाही, कारण अमेरिकेचा इतिहास सगळ्यांनाच माहित्येय.

आता चीन सरकार अनुदान देते हे सिध्द करता येत नाही हाच खरा प्राॅब्लेम आहे. कारण चीनमध्ये जाऊन आपण माहिती गोळा करू शकत नाही. उलट चीनी लोक इतर देशात मुक्तपणे फिरून पुरावे गोळा करू शकतात. यावर उपाय म्हणून एक नवीनच शक्कल लढवली गेली. जो देश मुक्त व्यापाराचे नियम पाळतो, अशा कोणत्यातरी तिसऱ्याच देशातील उत्पादन खर्चाशी चिनच्या उत्पादन खर्चाची तुलना करायची व त्यानुसार चीन सरकार अनुदान देते आहे हे सिध्द करणे.

चीन युरोपिअन युनियनमधे अल्युमिनीयम व पोलाद इतक्या स्वस्तात विकत होते, की तिथले कारखाने बंद पडले. टाटांचा मोठा गाजावाजा झालेला, युरोपातील स्टील उद्योग विकत घेण्याचा प्रयत्नपण यामुळेच तोट्यात गेला होता.

भारताचीही हीच अडचण आहे. भारत आपल्या उत्पादकांना मदत देऊ शकत नाही. मदत दिली तर चीन ती आरामात सिध्द करू शकतो. पण हेच चिनने केले तर मात्र आपण ते सिध्द करूच शकत नाही. त्यांच्या देशात जाऊन आपण माहिती मिळवणे सोडाच, आपण कुठे जायचे, रहावयाचे, कोणाला भेटायचे हे सगळे चीनचे सरकारच जणू काही ठरवते. आपल्या मनानुसार कुठेही जाऊन कोणालाही भेटता येत नाही.

खरे तर अशा प्रकारच्या परिस्थितीत चीनला समान पातळीवर व्यवहार करणारा देश अशी मान्यता देणे हीच मोठी घोडचूक होती. पण चीनने आपली माणसे आंतराराष्ट्रीय संघटनांमधे पेरून ठेवली होती. त्यामुळे दाद मागणेही अवघड होऊन बसले होते.

TheBL ने तर जाहीर करून टाकले आहे की,
“अलीकडील संशोधनात असे दिसून आले आहे की सीसीपीने यूएन आणि जागतिक बँक, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि आंतर-अमेरिकन विकास बँक यासारख्या जगातील प्रमुख वित्तीय संस्थांसह अनेक आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये घुसखोरी केली आहे.”

तर सांगायचा मुद्दा असा की, चीन त्याच्या अनैतीक खेळींमुळे यशस्वी होत होता. चीनचे कौतूक भारतातलेपण करायला लागले होते. पण अनैतीक पध्दतीने चीन भारतीय बाजार ताब्यात घेत आहे, त्यामुळे भारतातील रोजंदारीवर परिणाम होत आहे वगैरेकडे कोणी भारतीय गांभिर्याने पहात नव्हता की बोलत नव्हता. कोणि बोलला तर त्याची टिंगल टवाळी होणार हे जणू काही ठरूनच गेले होते. भारत चीनला तोंड देऊच शकत नाही हा सिध्दांत पक्का करण्याचीच स्पर्धा चाललेली होती.

याबाबतीत आपले समर्थक भारतात तयार करणे, ह्या चिनच्या कार्याला दाद द्यायला हवी. अर्थात आंतरराष्ट्रीय समुदायात चीन घुसखोरी करत असेल तर भारतात आपले हस्तक तयार करणे चीनला खूपच सोपे गेले असेल. भारतात असे कितीतरी लोक आहेत की, जे देशभक्त असून, निव्वळ हस्तकांच्या अपप्रचाराला बळी पडून चीनची बाजू घेत असतात.

प्रत्यक्षात जर चीनला व्यापारात अनैतिक मार्ग अनुसरायला बंदी केली तर भारत चीनला आरामात टक्कर देऊ शकतो, ही वस्तूस्थिती आहे. ही भारताची क्षमता इतर देशही मान्य करताहेत. विश्वास टाकायला तयार होताहेत. भांडवल गुंतवायला तयार होताहेत. तंत्रज्ञान द्यायलाही तयार व्हायला लागलेत. चीनला भारत पर्याय होऊ शकतो हे मान्य केल्याचीच खरेतर ही लक्षणे आहेत. पण स्वत: भारतीयच भारताची खरी किंमत जोखू शकत नसतील तर काय उपयोग?

तर सांगायचा मुद्दा असा की, हे सगळे १६ जून २०२० ला संपलेले आहे.

२०१९ मधे जागतीक व्यापार संघटनेने अनुचीत प्रथांबद्दल चीनला जबाबदार धरलेले आहे. फक्त तो निर्णय अंतीम नव्हता तर अंतरिम होता. १५ जून २०२० पर्यंत त्यावर आपली बाजू मांडायची चीनला संधी होती. पण चीनने ती संधी घेतली नाही. त्यामुळे चीन सरकार उत्पादकांना अनुदान देते हा अंतरिम निर्णय आपोआप अंतीम झालेला आहे.

चीनची फार मोठी कोंडी झालेली आहे. चीनच्या मालावर अँन्टी डंपिंग ड्युटी लावायला आता जगभर सुरवात होऊ शकते. चीनच्या वस्तुंचा उत्पादन खर्च काढायची नवीन पध्दत मंजूर झाली आहे. भारतही आता हे शस्त्र वापरू शकतो. म्हणजे भारत वापरत होताच. पण आता त्यात जोर येऊ शकेल. चीनचा कांगाव्याकडे गांभिर्याने अथवा पक्षपाती पध्दतीने लक्ष देणे आता सोपे जाणार नाही.

भारतीय उत्पादकांच्या कच्च्या मालाच्या खरेदीच्या किमतीत, चीन भारतात तयार वस्तू कशा विकू शकतो याचे फारसे आश्चर्य भारतीयांना आता वाटणार नाही. त्यासाठी चीन म्हणजे कोणीतरी फारच भारी प्रकार आहे, किंवा त्यांचे बिझीनेस माॅडेल अफलातून आहे अशा प्रकारचे ढगात मारलेले बाण परिणामकारक होणार नाहीत.

भारतीयांची अशी समजूत करून देण्यात आलीय की, कोरोना प्रकरणामुळे चीनने जगाचा विश्वास गमावला. प्रत्यक्षात वस्तुस्थिती उलटी आहे. चीनवरचा अविश्वास गेले दोन दशके वाढतच आहे. २०१६ पासून तर तो खूपच वेगाने वाढलाय.

“कोरोना” ही उंटाच्या पाठीवर लादलेल्या सामानावरची शेवटची काडी आहे.

माहितगार's picture

22 Jun 2020 - 10:12 pm | माहितगार

....चीन त्यांच्या उत्पादकांना खूप मोठ्या प्रमाणात अनुदान देतो. त्यामुळे युरोपियन संघामधे किंमत पाडून माल विकणे चीनला जमते. त्यामुळे इथले उद्योग बंद पडत आहेत. बेरोजगारी वाढतीय. उद्योग बंद पडल्यावर चिन किंमती वाढवायला सुरवात करतो हेही तोपर्यंत लक्षात आलेले होते....

मी हे परदेशात असताना चिनी लोकांना मार्केट सर्वे करताना जवळून बघीतले. बाजारातील प्रत्येक उपलब्ध वस्तू, बाजारातील वस्तुंचे किरकोळ व्यापारी मुल्य ते व्यापार्‍यांना अपेक्षीत कमिशनचे दर यांचा अत्यंत पद्धतशीर अभ्यास करून त्यापेक्षा आकर्षक किमतीत चीन उत्पादन उपलब्ध करते. आपण म्हणता तसे स्थानिक उत्पादन बंद पडले की किमती वाढवणे शक्य होत असावे. पर्यावरण व कामगार कायदे विषयक अटी कमी ठेवल्यामुळे युरोमेरीकन गुंतवणूकदार कंपन्या खुश होत्या त्यांनी चीनमध्ये गुंतवणूक केल्यामुळे तेरीभी चुप मेरी भी चुप चालू असावे. व्याजाचे दर कमी ठेवणे हे बँक सरकारी असेल तर अश्यक्य नसते. युरोमेरीकन पैसावापरून त्यांनाच कर्जात टाकण्यात चीनला बर्‍यापैकी यश आले.

माहितगार's picture

22 Jun 2020 - 10:17 pm | माहितगार

The Great Game in the Buddhist Himalayas: India and China’s Quest for ...
By Phunchok Stobdan
तिबेटन आणि चिनी राजकारणावरच्या इतिहासाची एक बाजू दर्शवू इच्छित हे एक रोचक पुस्तक वाचनात आले, -अर्थात भारतीय अधिकृत भूमिका यातील सर्वच बाजूंचे समर्थन करेल असे नक्की सांगता येणार नाही पण जिज्ञासूंनी अवश्य वाचावे.

माहितगार's picture

22 Jun 2020 - 10:37 pm | माहितगार

गूगल बुक्सवर पूर्ण पुस्तक वाचता येईलच असे नाही, या वृत्तांकनात आढावा आला आहे. पुस्तक जरा चिनी अध्यक्षाची बाजूस मदत करणारे ठरु शकते हे, त्यामुळे सर्व मुद्यांशि सहमत होणे कठीण असावे, लक्षात घेऊनच वाचले पाहीजे.

वीणा३'s picture

22 Jun 2020 - 10:23 pm | वीणा३

चर्चा छान चाललीये. शेखर गुप्ता (यूट्यूब चॅनेल "The Print ") हे दररोज एक "cut the clutter " नावाचे एपिसोड करतात. ते राजकारण, करोना, अमेरिका, चीन बरोबर चाललेला वाद या सगळ्या बद्दल चांगली माहिती देतात, त्यांच्या कडचे रिपोर्टर्स सुद्धा वेग वेगळ्या विषयांवर अभ्यास करून माहिती देतात (असं वाटतं तरी).

शकु गोवेकर's picture

22 Jun 2020 - 11:58 pm | शकु गोवेकर

महाराष्ट्राचे आपले मुख्यमंत्री यांनी तळेगाव पुने जवळ ग्रेट वॉल मार्ट या चिनी कंपनीला १५००० कोटी रुपयांची गुंतवणूक परवानगी दिली आहे कारण एकच असावे आपला चीन भाऊ चांगला होवो व भारतात येवो
हि कालची बातमी

चौथा कोनाडा's picture

23 Jun 2020 - 10:14 pm | चौथा कोनाडा

गलवान खोऱ्यातील चकमकी नंतर चिनी कंपनी ग्रेट वॉल मोटर्स आणि इतर दोन कंपन्यांच्या गुंतवणुकीवर स्थागिती देण्यात आलेली आहे.
- उद्योगमंत्री सुभाष देसाई

https://timesofindia.indiatimes.com/city/mumbai/maha-freezes-3-chinese-p...

mrcoolguynice's picture

23 Jun 2020 - 10:06 am | mrcoolguynice

‘चीनच्या तुष्टीकरणाचे भारताचे धोरण विस्कळीत’ अशा शीर्षकाचा लेख ‘जपान टाइम्स’ने प्रसिद्ध केला आहे. त्यात नवी दिल्लीतील ‘सेंटर फॉर पॉलिसी रीसर्च’मधील प्रा. ब्रह्मा चेलानी यांनी, गलवानमधील चीनचे कथित ‘अनपेक्षित’ डावपेच हे अनपेक्षित नसावेत, असे निरीक्षण नोंदवले आहे. मोदींना चीनच्या आकस्मिक हल्ल्यांचा अनुभव नाही. चीनचे मन वळवून आपण पुन्हा द्विपक्षीय संबंध प्रस्थापित करू आणि त्याच्या पाकिस्तानशी असलेल्या संबंधात बाधा आणू, अशी त्यांची भाबडी समजूत असावी. परंतु सद्य:परिस्थितीबाबत त्यांनी स्वत:लाच दोष दिला पाहिजे. धोरणांचे अतिवैयक्तिकरण आणि रणनीतीतील हटवादी भाबडेपणा यामुळे राजनैतिकदृष्टय़ा कुशल-कणखर नेता म्हणून नव्हे, तर ब्रिटनचे माजी पंतप्रधान नेव्हिल चेंबरलेन यांचा ‘भारतीय अवतार’ म्हणून मोदींनी स्वत:ला सादर करण्याचा प्रयत्न केला आहे. ते त्यांच्या चुकांमधून शिकत नाहीत आणि चीनबाबतचे धोरण बदलत नाहीत तोपर्यंत भारतीय नागरिक आणि प्रादेशिक सार्वभौमत्वाला किंमत मोजावी लागेल, असा इशाराही प्रा. चेलानी यांनी दिला आहे.

आनन्दा's picture

23 Jun 2020 - 10:15 am | आनन्दा

एकच नंबर..

कसला सॉल्लिड मारलाय!!

mrcoolguynice's picture

23 Jun 2020 - 11:10 am | mrcoolguynice

बरोबरे .. आता खरं ५६ इंच छातीच्या निधडेपणाची गरज आहे.

दरम्यान ...
पाकिस्तानी वृत्तपत्रे काय चुना लावतायेत पहा ...

पाकिस्तानातील ‘डॉन’ने भारत-चीन तणावाबद्दलच्या अग्रलेखातही काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला आहे. शेजाऱ्यांशी दादागिरी करून आपण या प्रदेशात सर्वश्रेष्ठ आहोत, असे दर्शवण्याचा भारताचा आजपर्यंतचा इतिहास आहे. पाकिस्तान सात दशकांपासून भारताची चिथावणी सहन करीत आहे. पाकिस्तानशी वैमनस्य वाढवून अन्य छोटय़ा देशांना दबावाखाली आणण्याचा भारताचा कदाचित प्रयत्न असेल. परंतु भारत-चीनमध्ये आर्थिक आणि लष्करीबाबतीत फारशी तुलना होऊ शकत नाही. म्हणून भारताने या आघाडीवर अतिसावधगिरीने पावले टाकावीत, असा अनाहूत सल्ला ‘डॉन’ने दिला आहे.

शाम भागवत's picture

23 Jun 2020 - 11:08 am | शाम भागवत


चीनचे मन वळवून आपण पुन्हा द्विपक्षीय संबंध प्रस्थापित करू आणि त्याच्या पाकिस्तानशी असलेल्या संबंधात बाधा आणू, अशी त्यांची (मोदींची) भाबडी समजूत असावी

.

देव करो, आणि २०२२ ला रस्ते पूर्ण होईपर्यंत, प्रा. ब्रह्मा चेलानी व चीन ह्याच गोड गैरसमजात राहो हीच इच्छा. मी फक्त सरकारच्या सीमेलगत रस्ते बांधणी शिथील होत नाहीये ना? इकडेत लक्ष पुरवणार.
:)

कपिलमुनी's picture

24 Jun 2020 - 12:46 pm | कपिलमुनी

तुम्ही तिथे लक्ष ठेवुन आहात म्हणून आम्ही पुण्यात शांत झोपू शक्तो . धन्यवाद

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

23 Jun 2020 - 11:18 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आज दैनिकं वाचून काढल्यावर निदर्शनास आले की, चीन सीमेवर तणाव असून भारताने लडाख पासून सीमेवर सैन्य तैनाती आणि लष्करी हालचाली वाढविल्या आहेत, चीननेही सीमेवर तसेच केले आहे. एकीकडे सीमेवर तणावर तर दुसरीकडे चर्चेच्या फेर्‍या सुरु आहेत. आणि ''भारतही चर्चेसाठी तयार असून चीनने घुसखोरी मागे घ्यावी ही भारताची अट आहे'' यातून चीनने घुसखोरी केली आहे हे नक्की आहे. अशावेळी पंतप्रधान चीनने घुसखोरी केली नाही असे का म्हणत आहेत माहिती नाही. असो. तो धाग्याचा विषय नाही. रशियाच्या मध्यस्थीतीमुळे व्हर्च्युअल कॉन्फरन्स होणार आहे, अशाही बातम्या आहेत.

दुसरी बातमी अशी की चीनने त्यांच्या एका कमांडरसह सोळा चीनी सैन्य मेले असल्याची कबूली दिली आहे. आपल्याकडे भारतात आपण जीतके चीनबद्दल सीमावादावर चर्चा करतो किंवा जितके पेटून उठतो तितकी चर्चा चीनमधे जाणीवपूर्वक केली जात नाही असे दिसते. राज्यकर्त्ये त्यांचं काम करतील नागरिकांनी त्यांचं काम करीत राहावे असे किंवा जाणीवपूर्वक चीन तेथील जनतेला अशा घडामोडींपासून दूर ठेवते. माध्यमांवरही बंदी आणून ते विषय दूर ठेवते.

आपली प्रसारमाध्यमे म्हणत आहेत की चीनला बाजारपेठेची भिती वाटत असल्यामुळे तो नमला आहे, यात मला काही तथ्य वाटत नाही. चीनची भारतात गुंतवणूक असली तरी जगभर चीन्यांच्या गुंतवणूकीचा सुळसुळाट झाला आहे, त्यामुळे तो नमला असे काही वाटत नाही. दुसरं असं की चीन सीमेवर जी काही शस्त्रसंबंदीचा करार होता त्यात आता सैनिकांना प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर गोळीबार करण्याचे अधिकार दिले आहेत आणि त्यामुळे दुसर्‍या बाजूने चीनही आता गोळीबाराला प्रत्युत्तरास तयार आहे असे म्हटले आहे. इतक्या दिवस पाकड्यांच्या बाजूने सतत विनाकारण गोळीबार चालू असतो तसे आता चीन्यांच्या बाजूनेही सुरु राहील असे वाटते.

काहीही घडामोडी होवोत, चिन्यांनी घुसखोरी केली असेल तर त्यांना परत फिरायला मजबूर केलं पाहिजे आणि आपण आपल्या भाग मिळविला पाहिजे तरच आपण आपला दबदबा निर्माण करु. नाही तर,अक्साइ चीनच्या वेळी तेव्हाच्या पंतप्रधानांनी काढलेल्या ” एक घास का तिनकाही नही उगता” अशा बेफ़िकीरीच्या या उद्गारावर मंत्रीमंडळातील महावीर त्यागी यांनी ”पंडित जी, आपके सिर पर भी बाल नहीं उगते, वह भी बंजर ही है, तो क्या उसे भी चीन को भेंट कर देंगे? काढलेले उद्गार सर्वांना माहिती आहे. इतिहासातल्या काही मोठ्या चुका आहेतच, पण आता वर्तमानात पुढे जाऊ.

बाकी, आता तशी परिस्थिती नाही. ”घुसखोरी झाली नाही” असे म्हणायचे आणि चीनी सैन्याने आपल्या काही भूभाग बळकून टाकावा, असे होऊ नये असे एक भारतीय म्हणून वाट्ते. आम्हाला आमच्या भूमीचा एक इंचही भाग गमवायचा नाही.

-दिलीप बिरुटे

अभ्या..'s picture

23 Jun 2020 - 11:28 am | अभ्या..

. ”घुसखोरी झाली नाही” असे म्हणायचे आणि चीनी सैन्याने आपल्या काही भूभाग बळकून टाकावा, असे होऊ नये असे एक भारतीय म्हणून वाट्ते. आम्हाला आमच्या भूमीचा एक इंचही भाग गमवायचा नाही.
नाही नाही, असे काही होणार नाही.
आपल्यातलेच काहीजण डोळ्यात तेल घालून लक्ष पुरवत आहेत. ;)

शाम भागवत's picture

23 Jun 2020 - 11:33 am | शाम भागवत

:)

चौथा कोनाडा's picture

23 Jun 2020 - 10:04 pm | चौथा कोनाडा

:-)))

रात्रीचे चांदणे's picture

23 Jun 2020 - 3:37 pm | रात्रीचे चांदणे

''भारतही चर्चेसाठी तयार असून चीनने घुसखोरी मागे घ्यावी ही भारताची अट आहे'' यातून चीनने घुसखोरी केली आहे हे नक्की आहे.<<<<<<<<<<<
शेखर गुप्तांच्या cut the cutter बघून मला मिळालेली माहिती अशी कि
१) फिंगर ४ च्या आपल्या कडील बाजू पर्यंत आपला ताबा आहे तर फिंगर ४ च्या चीन कडील बाजूला चीन चा ताबा आहे
२) आपला दावा आसा आहे कि फिंगर ८ पर्यंत चा प्रदेश हा भारतीय आहे तर चीन चा दावा फिंगर २पर्यंत आहे.
३) पण फिंगर ३ जवळ आपला एक लहानसा सैनिकी base आहे तर फिंगर ४ जवळ एक आणखीन एक निरीक्षण चौकी आहे .
मग आत्ता भारत आणि चीन मध्येवाद ह्या प्रदेशात का चालू झाला?
४) तर चीन ने फिंगर ४ कडील त्यांच्या कडील त्यांच्या बाजुला म्हणजेच P -१४ पॉईंट जवळ १-५ मे दरम्यान एक सैनिकी चौकी उभारली आहे ,
भारताची भूमिका अशी आहे कि चीन ने status quo बदलला आहे आणि त्यालाच भारताचा विरोध आहे, आणि ह्या चौकी जवळच १६ तारखेची चकमक झालेली आहे
५) म्हणजे आपला दावा जरी फिंगर ८ पर्यंत असला तरी आपला प्रत्यक्ष ताबा हा फिंगर ४पर्यंतच आहे तरी पण चीनने फिंगर ४जवळ चौकी उभारून
जैसे थे स्थिती मध्ये बदल केला आहे
६) आणखीन महत्वाची बाब म्हणजे चीनने उभारलेली चौकी हि आपल्या फिंगर ३ आणि ४च्या चौक्या पेक्षा उंचावर आहे म्हणजेच उद्या समजा चकमक झालीच तर चीन ला उंचीचा थोडा फायदाच होणार आहे
त्यामुळेच भारताची मागणी अशी आहे कि एप्रिल मध्ये जशी परिस्तिथी आहे तशीच ठेवा म्हणजेच फिंगर ४ च्या चीन च्या बाजू कडील सैनिकी चौकी ला आपला विरोध आहे पण जस वरती लिहिल्या प्रमाणे आपला प्रत्यक्ष ताबा हा फिंगर ४पर्यंतच आहे तर चीन चा ताबा हि फिंगर ४पर्यंतच आहे
म्हणूनच भारताची मागणी हि जैसे थे परिस्तिथी ठेवा अशी आहे आणि पंतप्रधानांनी भारताच्या भूमीवर आक्रमण झाले नाही आहे म्हटले असावे कारण ज्या भूमी वर प्रत्यक्ष ताबाच नाही तर घुसकोरी झाली असं म्हणण्यात काही अर्थ नाही.

शाम भागवत's picture

23 Jun 2020 - 4:11 pm | शाम भागवत

“वर्षांनुवर्षानुसार पडलेले पायंडे आणि त्याची कोणीतरी केलेले उल्लंघन” यापलिकडे काहीही नाही.
पण चीनला ती नवीन चौकी फायद्याची वाटत असणार. ती टिकवायची असेल, तर प्रथम अव्वाच्या सव्वा दावे करायचे. मग ते सोडून द्यायचे बतावणी करायची. मग त्याबदल्यात चौकी राहू दे म्हणायचे.

“बळी तो काळ पिळी” यापध्दतीने हे सगळे चाललंय. मला तर शेतावरचे बांध हळूच पुढे ठकलायची पध्दतच आठवतीय.
:)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

23 Jun 2020 - 4:42 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

चीनची घुसखोरी कुठे कुठे ? चीनने जवळ जवळ पाच ठिकाणी अशी एलएसीवर अशी घुसखोरी केली आहे, करत असतो. सध्या ज्यात प्रामुख्याने चर्चा आहे गलवान खोरे, पॅगॉग त्सोवर, वर एक प्रतिसादात उल्लेख केला आहे त्यात पॅगॉग त्सोवरनदीच्या काठावर आपला बेस कँप हा फिंगर चारवर आहे आणि चीनचा बेस कँप हा फिंगर आठच्या नंतर किंवा खाली आहे. आपण बोटीने फिंगर आठपर्यंत पेट्रोलिंग करतो तर चीन जमीनीमार्गे पाचच्या पुढे येऊन ठेपला आहे आणि इथेच वाद आहे. आपण म्हणता तसे ते आपल्या फिंगर पाच पर्यंत एलएसी मानत असतील तर ते आपल्या हद्दीत आलेच नाही, आणि त्यांची हद्द ही फिंगर पाचपर्यंत आहे असे म्हणायचे असेल तर मग मुद्देच संपले. (चित्र पाहा) फिंगर क्षेत्रातल्या पॉइंटवरच एकमत होत नसल्यामुळे अजूनही सहमती झाली नाही, केवळ माहितीस्तव.

-दिलीप बिरुटे

आंतरराष्ट्रीय मुद्द्यांच्या मांडणीत प्रत्येक शब्द जपून वापरावा लागतो, (ट्रंप प्रमाणे महासत्तेचे सत्ताधिश असाल तर जरासा वेळपाहुन कानाडोळा करणे छोट्या सत्तांना भाग पडते) भाजपाई (तसे एकुणच भारतीय) आंतरराष्ट्रीय मुद्द्यांच्या नेमक्या शब्द योजनात क्च्चे पडतात ह्या बद्दल मी एक मिपा लेखही लिहिला.

शत्रुपक्ष आपल्या सिमेत आलाच कसा मग तुम्ही कडक प्रत्त्युत्तर का नाही दिले यावरुन विरोधीपक्ष कोंडीत पकडतील त्या कोंडीतून सुटण्यासाठी मोदी बहुधा बोलून मोकळे झाले. एकदा राजा बोलला की मंत्रीगणाला सांभाळून घेण्या शिवाय भाग नसतो अशी भाजपाची गत झाली हे खरे आहे.

इतर देशियांशी कळणार असेल असे बोलणार असाल तर एस. जयशंकर यांच्या मुलाखती ऐकुन त्यांच्या वाक्य रचनांचा वापर करत बोलावे किंवा प्रराष्ट्र सचिवांना आधी बोलू द्यावे मग आपण बोलावे हे श्रेयस्कर असावे. खरे म्हणजे हे केवळ नेत्यांनीच नाही सर्वसामान्यांनीही केले पाहीजे समाज माध्यमांच्या काळात प्रत्येक व्यक्ती प्रचारतंत्राचा भाग आहे किंवा टार्गेट तरी आहे, दुसर्‍या देशातील व्यक्तींना प्रत्युत्तरे नेमकी काय द्यायची हे (स्थानिक पक्षीय राजकारणापलिकडे जाऊन) माहित हवे कारण उद्याचे नेते आपल्यातूनच पुढे जाणार असतात.

माहितगार's picture

23 Jun 2020 - 4:41 pm | माहितगार

शेतावरचे बांध संधीसाधूपणे पुढे ढकलणे + बळी तो कानपिळी + दुसर्‍याला त्रास देऊन स्वतःच आरडाओरडा करणे प्रसंगी दम भरणे

अगदी, चीनची निती अशीच आहे.

mrcoolguynice's picture

24 Jun 2020 - 10:48 am | mrcoolguynice

एक बातमी ...

गलवान व्हॅलीत झालेल्या संघर्षानंतर एबीपी-सी व्होटरनं एक सर्व्हे केला. ज्यात चीन सीमा व मोदी सरकारविषयी प्रश्न विचारण्यात आले. या सर्व्हेमध्ये मोदी सरकारनं चीनला चोख प्रत्युत्तर दिलं का या प्रश्नावर ६० टक्के लोकांनी नकार दर्शवला आहे.

.
त्यामुळे कदाचित, आता पुढच्या भारतीय लोकसभेच्या निवडणुका जवळ आल्या की , तर पाकिस्तानला ,
"चिन्यांचे तेल पाकिस्तानवर निघेल अशी भीती वाटेल".

शाम भागवत's picture

24 Jun 2020 - 3:15 pm | शाम भागवत

राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्यावर करण्यात आलेल्या सर्वेक्षणामधे ७०% अधिक नागरिकांनी देशाच्या सुरक्षेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास व्यक्त केला आहे. “आयएएनएस” व “सी-व्होटर“ याच्याकडून हे सर्वेक्षण करण्यात आले. “पंतप्रधान मोदी चीनसोबतची तणावाची स्थिती हाताळण्यास सक्षम आहेत“ असे मत नागरिकांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र टाईम्स २४ जून २०२०
:)

पेपरातल्या बातमी देत चर्चा करायचा मला खूप कंटाळा आहे. कारण त्यामधे मिडियावाले लोकांना खूप वापरून घेतात. काही अभ्यास करून मते मांडण्यांऐवजी आयते तयार मटेरिअलवर अवलंबून राहून चर्चा व्हायला लागते व तीच सवय लागते.
त्यामुळेच इथेच थांबणार आहे.

पण बातमीतला सोयीस्कर भाग तेवढा देऊन मेसेज टाकायला मात्र मी तुम्हाला प्रोत्साहनच देईन. :)

विनोद१८'s picture

25 Jun 2020 - 2:52 am | विनोद१८

...देताना तुम्हाला खुप काही आनंद झाला काय, प्रतिक्रिया आणि त्याखालची ओळ वाचुन तसेच वाटले.

मुळात विचारलेला प्रश्न चुकीचाच आहे 'मोदी सरकारने चीनला चोख उत्तर दिले का' असा बुद्धीभ्रम निर्माण करणारा न प्रश्न विचारता 'भारतीय सैन्याने चीनी सैन्याला चोख उत्तर दिले का' असा हवा होता ?? असा चुकिचा प्रश्न विचारुन त्याचे उत्तर प्रसिद्ध करुन भारतीय जनमानसाचे व भारतीय सैन्याचे मनोधैय प्रचंड उंचावले काय ?

ह्या बातमीत म्हटल्याप्रमाणे हा सर्व्हे कधी कुठे झाला, त्याचा Sample Size किती ? हा सर्व्हे घेणार्‍या "एबीपी-सी व्होटर"ची विश्वासार्हता काय ?? त्यानी ज्या ज्या लोकाना याबद्दल प्रश्न विचारले त्या त्या लोकाना तिकडची Ground Reality / खरी वस्तुस्थिती कितपत् माहित होती, ते ६० टक्के लोक नक्की कोण होते ?? 'मोदी सरकारनं चीनला चोख प्रत्युत्तर दिलं नाही' या त्यान्च्या आणि तुमच्या समजाला वस्तुनिस्ठ आधार काय ?? याचा अर्थ असा ध्वनित होतो की भारतिय सैन्य फक्त आणि फक्त मार खाऊन आणि २० जणांचे बलिदान देऊन परत आले.

त्यामुळे कदाचित, आता पुढच्या भारतीय लोकसभेच्या निवडणुका जवळ आल्या की , तर पाकिस्तानला ,
"चिन्यांचे तेल पाकिस्तानवर निघेल अशी भीती वाटेल"
.

असे लिहुन तुम्ही नक्की कोणता Message वाचकाना देत अहात ?? तुम्हाला काय म्हणायचे आहे ते स्पष्ट्पणे लिहा आडवळणाने नको.

त्यामुळे कदाचित, आता पुढच्या भारतीय लोकसभेच्या निवडणुका जवळ आल्या की , तर पाकिस्तानला ,
"चिन्यांचे तेल पाकिस्तानवर निघेल अशी भीती वाटेल".

असे लिहुन तुम्ही नक्की कोणता Message वाचकाना देत अहात ?? तुम्हाला काय म्हणायचे आहे ते स्पष्ट्पणे लिहा आडवळणाने नको.

ते तुम्ही सुरेंदर मोदींना विचारा.

एक म्हण : "वड्याचे तेल वांग्यावर काढणे"

वांगे सडके असेल तर वड्याचे तेल नक्कीच पडेल यात शंका नाहीच, मी विचारलेल्या प्रश्नांवर बोला. तुमचा अजेन्डा पुढे रेटु नका, हे मिसळपाव आहे मोदीविरोधकांचे व्यासपीठ किंवा चेपु नाही याचे भान असावे.

'भारतिय सैन्याने जवळ जवळ ३५ ते ४० चीनी लाल माकडे मारली ( याचेसुद्धा काहीना अतीव दुखः झाले असे एकुन दिसते ) हे सोयिस्करपणे विसरुन भारतीय सैन्य मार खाउन हात बांधुन परत माघारी आले' असा त्या सर्व्हेमध्ये विचारलेल्या प्रश्नाचा रोख आहे हे तर सरळ सरळ दिसते आहे. इतका अपमान अणि अविश्वास आपल्याच सैन्यावर अप्रत्यक्षपणे दाखविण्याचा प्रयत्न करणे आणि त्यांच्याबद्दल गैरसमज निर्माण होईल असा प्रयत्न करणे याला काय म्हणायचे ?? हे कधीच सहन केले जाणार नाही. यावर तुम्हाला काय म्हणायचे आहे ते लिहा अवांतर नको.

ते तुम्ही सुरेंदर मोदींना विचारा.
हे कोण सुरेंदर मोदी ?? सरळ सरळ नाव घ्यायला कशाला घाबरता, आपल्या घटनेने तसा अधिकारच दिला आहे ना तेव्हा बिन्धास्तपणे त्यांचे नाव घ्या. मला वैयक्तिक त्यांना काही विचारायचे नाही, मला तशी गरज नाही.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

24 Jun 2020 - 11:26 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

चीन नरमला, तणाव निवळला अशा बातम्यात तथ्य नाही. सरकार अगा जे घडलेच नाही म्हणते. असे असले तरी घुसलेले चीनी सैन्य या क्षणापर्यन्त परत फिरलेले नाही. एएलसीवर पलिकडून काही पॉइंटवर दोनहजार सैन्य येऊन आहे.

गलवानखो-यातील पेट्रोलिंग पॉइंट १४,१५, गोगराच्या पेट्रोलिंग पॉइंट १७ ए, हॉटस्र्पिंग फिंगर चार, पॅनगॉंग त्सो सरोवर वरील फिंगर ५ ते ८ या सर्व पॉइंटवरच्या घुसखोरी (संदर्भ-बातम्या) माघारी यावर अजुनही एकमत झालेलं नाही.

गलवान खो-यातून जो रस्ता पुढे ओल्डीतळावर जातो, त्या रस्त्याच्या उंच शिखरावर चीन्यांनी पेट्रोलिंग पॉइंट केला आहे, वरच्या बाजूने भारतीय हालचालींवर चिन्यांना मारा करायला अथवा लक्ष ठेवायला सोपे आहे म्हणून तेथून चिन्यांनी मागे सरकावे ही आपली मागणी आहे.

अधिक गोष्टी समजून घेण्यासाठी हा यूट्यूबवरचा व्हीडीयो बघावा.

-दिलीप बिरुटे

मराठी कथालेखक's picture

24 Jun 2020 - 4:59 pm | मराठी कथालेखक

पंतप्रधान म्हणतात घुसखोरीच झाली नाही. तर मग चकमक का व कशी झाली ? संरक्षण खात्याकडून काय अधिकृत माहिती दिली गेली आहे कुणी लिंक देवू शकेल का ?

जिथे चकमक झाली तिथे चीन ने रात्रीतून कॅम्पस उभे केलेत. बंकर्ससारखे पर्मनंट स्ट्रक्चर उभे केलेत. गलवान नदीचा प्रवाहच बदलला! रिंईफोर्स बरच झालंय.

भारतीय रणगाडे तिकडे लडाखमध्ये पोचलेत.

डीओबी, देसपांग आदी ठिकाणी सैन्याची जमवाजमव चीन करत आहे.

सोक्षमोक्ष लावावा लागणार अस वाटायला लागलाय. चर्चा व्यर्थ होत आहेत!!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

25 Jun 2020 - 11:58 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

चीनने चर्चेच्या नावाखाली ''गलवान खोरे'' आमचेच असून आमच्याच भूभागात भारतीय सैन्याने प्रवेश केल्याच्या बोंबा मारायला सुरुवात केली आहे. म्हणूनच माजी पंतप्रधान म्हणाले होते की विद्यमान पंतप्रधानांनी जवाबदारीने बोलायला हवे होते. ”आमच्याकडे घुसखोरी झालीच नाही” हाच आधार चीनने पकडला आहे. कोण बरोबर कोण चूक पुन्हा राजकीय आखाडा सुरु होईल तुर्तास तोही मुद्दा बाजूला ठेवू.

वादग्रस्त स्थानावरुन दोन्ही सैनिकांनी माघार घ्यावी यावर सहमती झाली असे दाखवूनही चीन्यांनी पक्कं बांधकाम गलवान खो-यात सुरु केल्याचे दिसते. भारताकडे युद्धनिती आणि संबंधित प्रश्न कसा हाताळावा याची ठरविणारी फौज असेलही पण आता चीन्यांना आक्रमक पद्धतीने बॅकफूटवर जावं लागेल अशी कृती सरकारकडून भारतीयांना अपेक्षित आहे. एकीकडे गलवान खो-यावर चर्चा करायची, आणि तिथे पक्के बांधकाम करायचे त्याचवेळी ओल्डीबग हे एअरबेस आहे त्या अक्साइनचीन सीमेवर चीन्यांनी आपलं सैन्य संख्या वाढवली आहे. भारताच्या परराष्ट्रखात्यातील पूर्व आशिया विभागाचे सहसचिव नवीन श्रीवास्तव व चीन्यांचे परराष्ट्र महासंचालक वू जियांघाव यांच्याबरोबरच्या चर्चेत तरी चीन्यांनी गलवान आमचंच आहे असे म्हटले आहे.

एकून परिस्थिती पाहता एवढ्यात परिस्थिती निवळणार नाही असे दिसते. चिन्यांना योग्य धडा देण्याची यापेक्षा दुसरी कोणती उत्तम वेळ असू शकत नाही असे वाटते.

-दिलीप बिरुटे

अभ्या..'s picture

25 Jun 2020 - 12:45 pm | अभ्या..

भारत रणांगणावर जिंकतो आणि टेबलावरची चर्चेत हरतो असे ऐकलेले ते खरे की काय असे वाटू लागले.

mrcoolguynice's picture

25 Jun 2020 - 12:22 pm | mrcoolguynice

NEW DELHI: As various government departments are preparing measures to reduce dependence on Chinese imports, eyes are now on the home ministry that is set to procure close to 50,000 bulletproof jackets — including some for the Indo Tibetan Border Force (ITBP) that is posted on the Line of Actual Control (LAC) and has been involved in a tussle that took place at Pangong Tso lake.

The defence ministry’s insistence on continuing with an order for 180,000 bulletproof jackets, even after it came to light that the vendor had switched the critical raw material supplier from western sources to Chinese companies last year, has led to a situation where other forces too could get similar products.

Read more at:
{{{https://economictimes.indiatimes.com/news/defence/will-bulletproof-jacke...}}}

मराठी_माणूस's picture

26 Jun 2020 - 9:20 am | मराठी_माणूस

https://www.loksatta.com/desh-videsh-news/indian-politicians-dont-even-k...

वरील बातमीत एका तज्ञांचे चीन संबंधातील मत मांडलेले आहे. त्यात एका ठीकाणे असे म्हट्ले आहे कि कारगील, पठाणकोट,मुंबई हल्ला या संबधी आधी माहीती मिळाली होती , तरीपण हे हल्ले झाले.

योगायोगाने एक पत्रही "इतिहासाची गरज नेमकी कशासाठी?" ह्या शिर्षकाखाली प्रसिध्द झाले आहे. त्यात नरहर कुरुंदकरांच्या एका लेखाचा संदर्भ आहे. ज्यात असे म्हटले आहे की, महंमद गझनी सोमनाथ फोडण्यासाठी ३०० मैल हिंदू राजवटीतून चालत आला तरीही प्रतिकार झाला नाही.

https://www.loksatta.com/lokmanas-news/loksatta-readers-response-email-l...

सतर्कता कमी पडतेय का ?

mrcoolguynice's picture

26 Jun 2020 - 9:59 am | mrcoolguynice

भारत-चीनमधील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर देशभरात चीनविरोधी जनभावना जोर धरत असून चिनी सामानांवर बहिष्काराची मागणी वाढत आहे. अशातच आता गुजरातमधील ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ हटवण्याची मागणी करण्यात आली आहे. गुजरातमधील भारतीय ट्रायबल पार्टीचे प्रमुख आणि आदिवासी नेता छोटू वसावा यांनी भाजपावर निशाणा साधत, ‘जर भाजपा चिनी सामानाचा खरंच विरोध करत असेल तर आधी मेड इन चायना असलेला स्टॅट्यू ऑफ युनिटी हटवायला पाहिजे’ असं म्हटलं आहे.

शा वि कु's picture

26 Jun 2020 - 10:00 am | शा वि कु
शा वि कु's picture

26 Jun 2020 - 10:02 am | शा वि कु
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

26 Jun 2020 - 12:16 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

दुवा गंडला असल्यामुळे काहीच दिसत नाही. नव्याने लिंक द्याल का प्लीज.

-दिलीप बिरुटे

शा वि कु's picture

26 Jun 2020 - 2:57 pm | शा वि कु
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

26 Jun 2020 - 7:21 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सरकारने देशविदेशात जाऊन आंतराराष्ट्रीय राजकारणात आपल्या बाजूने इतर देश राहावेत आदानप्रदान होत राहावेत यात आपला मुत्सद्दीपणाचा अभाव आहे असे म्हणायला वाव आहे. श्रीलंका,बांग्लादेश, नेपाळ हे लहान देश चिन्यांच्या बाजुने झालेत. चिन्यांनीही आता बाजार म्हणून या देशांकडे बघायला सुरुवात केलीच आहे. पाकडे त्यांच्या बाजूने आहेतच. आपण ट्रम्प तात्याच्या भरवशावर आहोत त्यांचा किती फायदा झाला ते भारतीय सरकारलाच माहिती.

उत्तम मतं, दुव्याबद्दल आभार.

-दिलीप बिरुटे

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

26 Jun 2020 - 12:07 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

clipboard39_202006446538
काल आणि आज सर्वच माध्यमांनी चिन्यांच्या घुसखोरीबद्दल बातमी दिली आहे. चिन्यांनी तंबू टाकून तळ ठोकला आहे. पूर्व लडाखसीमेवरील गलवान खोरे, हॉट्स्प्रींग, पेनगाँग त्सो सरोवरच्या तनावाबद्दल चर्चा सुरुच असतांना चीनच्या सैन्याने उत्तरेकडील डेपसांग पठाराव घुसखोरी केली आहे आहे, ज्या गलवान खोर्‍यात आपल्या जवानांना हौतात्म्य पत्करावे लागले तिथेच चिन्यांनी पक्के बांधकाम सुरु केले आहे असे म्हटले आहे. चित्र गलवान खोर्‍यातील असून नव्या बांधकामाची चित्रे अमेरिकेतील कंपनीने उपलब्ध करुन दिले आहे, त्याचा अर्थ नवी दोन बांधकामे चीनने केली असल्याचे म्हटले आहे.

आता जे काय असेल ते असेल त्याबाबत आपल्याकडून तरी त्याबाबात फारसे बोलले गेलेले नाही. मला वाटतं आपलं धोरण सध्या शांततेचे असावे आणि संधी मिळाली की त्यांना हुसकावून लावणयात येईल असे वाटते. भारतीय लष्कराकडून याबद्दल अधिकृत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. देखना है आगे आगे क्या होता है... !

संदर्भासाठी बातम्या लिंका : दै. सकाळ, economictimes

-दिलीप बिरुटे

चीनच्या बाजुने सात्यत्याने लष्करी सिद्धता वाढवली जात आहे, अश्या बातम्या आणि व्हिडियो काही काळा पासुन सतत समोर येत आहे.

चीनच्या बाजुने :-

आपल्या बाजुने :-
आपल्या बाजुने टी-९० भीष्म टँस्क आणि बहुतेक टी-७२ टँक बॉर्डरवर सिद्ध असल्याचे समजत आहे.

टी-९० भीष्म टँक बद्धल माहितीपट

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- LYRICAL: Ghamand Kar | Tanhaji The Unsung Warrior

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

26 Jun 2020 - 7:38 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

चिन्यांनी आपल्याला धडकी भरावी म्हणून युद्धाभ्यास केला असावा अशा बातम्या येत आहेत. चीनी सर्वपरीने नाटक करीत आहेत आणि त्याचवेळी इंच इंच नव्हे, तर मिटर मिटर, किलोमिटर आत सीमेत घुसत आहेत. एका नकाशावर आखलेली रेष प्रत्यक्षात जवळ जवळ चार किलोमिटरची सीमा बनली आणि आपल्या बाजूचं टोक तीथपर्यंत आपली ते सीमा समजतात. आणि असा हा मामला वर्षानुवर्ष धुसमसत राहणार असे वाटते.

-दिलीप बिरुटे

इन्दुसुता's picture

27 Jun 2020 - 10:17 pm | इन्दुसुता

या प्रतिसादाचा काही भाग धाग्याशी संबंधित नाही असे वाटण्याची शक्यता आहे.... अवांतर करण्याचा उद्देश नाही!

ही चर्चा वाचतेय आणि वाचत राहीन. चांगली चर्चा सुरु केल्याबद्दल बिरूटेसरांचे आभार!

चर्चा वाचत असताना आणि ९ जूनच्या " फाईट चायना विथ वॉलेट" धाग्यानंतर, मी काय करू शकेन याचा विचार केला आणि कमित कमी चिनी वस्तू वापरायचा निर्णय घेतला ( माझ्यापुरताच). आत्ता वापरत असलेल्या वस्तू वापरून संपवेन आणि नविन वस्तू घेताना चिनी घेणार नाही. हे मी पाकिस्तान बद्दल आधीच केले आहे. (मी तेथे उत्पादन झालेल्या वस्तू वापरत नाही, त्यांचे संगित/ सिरियल / सिनेमे बघत नाही). ते खूपच सोपे होते. चिनी मार्केट 'ऑल पर्व्हेझिव' असल्यामुळे कदाचित थोडे कठीण जाईलही, त्याची आता मानसिक तयारी आहे.

ह्या बाबतीत त्यांचे एन्क्रोचमेन्ट मला मान्य नाही ( जसे भूभागावर नाही तसेच अर्थकारणावरही नाही, म्हणूनच या धाग्यावर हा प्रतिसाद). एक सामान्य नागरिक म्हणून हे मी निश्चित करू शकते.

पण या धाग्यावर प्रतिसाद देण्यासाठी यायचे एक आणखी कारण आहे.
गेल्या आठवड्यात एक इन्फ्लेटेबल ग्लोबल अ‍ॅटलास घरी आणला. तो फुगवल्यावर मी जो भारताचा नकाशा बघितला तो नुसताच आश्चर्य चकीत करणारा नव्हता, त्याने मी हादरलेच!!
भारताची मानच कापून टाकलेली दर्शवली होती त्यात... संपूर्ण जम्मू काश्मिर हा "डिस्प्युटेड टेरिटरी" म्हणून दाखवला होता. भारतापेक्षा पूर्ण वेगळ्या रंगात.
हा अ‍ॅटलास व्हिएट्नाम मधून आला होता.
बराच विचार केला मी यावर.... नेहमीचा सोडून देणे हा पर्याय मंजूर नाही... मी काही केले किंवा केले नाही तरी फारसा फरक पडेल असे नाही याची पूर्ण जाणीव आहेच. तरीही, जो भाग आक्षेपार्ह दाखवला होता तो, आणि उत्पादक माहिती भोवती नोंद करून , तो अ‍ॅट्लास आणि एक पत्रं मी येथील भारतीय कॉन्सुलेटला पाठवले व त्या पत्राची एक प्रत पंतप्रधानांना पाठवली.

बिरुटेसरांनी नेपाळ बद्दल वर लिहिलेच आहे.... आता हे व्हिएट्नाम सारखे लहान देश देखिल ह्या भूभागावरील आपले sarvabhoumatva ( हे मराठीत काही केल्या लिहीता आले नाही) मान्य करत नाहीत किंवा त्याबद्दल संशयास्पद मिस् रेप्रेझेन्टेशन करतात हे मनाला फार त्रासदायक आहे....... आपण नागरिक दक्ष राहिलो नाही तर इतरांना भारत भूमी गिळंक्रुत ( हे व्यवस्थित लिहिता येत नाही हा क्रोमचा प्रॉब्लेम आहे का?) करायला वेळ लागणार नाही हे परत एकदा जाणवून गेले. मग आपल्याला (पाकिस्तान आणि चीन सोडून) इतर देशांचे उपद्व्याप, असे धागे काधावे लागतील अशी काळजीही वाटून गेली.
केवळ म्हणूनच हा प्रतिसाद!
आता या समस्येवर कायम स्वरूपी इलाज शोधणे तातडीचे झाले आहे. आपण ते करू शकू हा विश्वास आहे, तरीही आपल्या देशाची घरभेद्यांची महान परंपरा द्रुष्टिआड करून चालणार नाही.
येत्या काळात सक्षम आणि सतर्क राहण्याची आणि शत्रुला नामोहरम करण्याची भारतीय नागरिकांची सामुदायिक ईच्छा आणि उद्देश असावा असे वाटते.

शाम भागवत's picture

27 Jun 2020 - 10:25 pm | शाम भागवत

पटतंय

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

28 Jun 2020 - 9:02 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

इशान्य लडाखमधे आपण क्षेपणास्त्रे सीमेवर ठेवली असून चिन्यांचे संभाव्य हल्ले परतवण्यासाठी आपण तयारी केल्याचे बोलले जात आहे, असे असले तरी आपल्या ज्या काही मुद्यांचा प्रश्न आहे, ते मात्र सुटलेले नाही. सहा जूनच्या वेळेसची 'जैसे थे' परिस्थिती ठेवायला चीन तयार नाही. पेनगाँग सरोवरच्या फिंगर चारपर्यंत चीनने घुसखोरी करुन तिथे हेलीपॅडही उभारल्याच्या बातम्यांमधून दिसत आहे. दक्षीणबाजूला चिन्यांच्या हालचाली वाढल्या असून आपण पूर्वीपासून तिथे आहोत असे दाखवायला त्यांची नाटके सुरु आहेत. फींगर चारवर पाचशे मिटर अंतरावर भारत चीन सैन्य आमने-सामने आहेत. भडका इथेच उडण्याची शक्यता आहे.

दुर्दैवाने ज्या प्रश्नांसाठी हे सर्व सुरु झालं होतं तिथे त्या त्या स्थळांवर आपण तूर्तास बॅकफूटवर आहोत. आज गृहमंत्रीही योग्य वेळी चीन्यांना धडा शिकवू असे म्हणत आहेत. सध्या तरी आपल्याकडे सकारात्मक असे काही नाही.

-दिलीप बिरुटे

मदनबाण's picture

29 Jun 2020 - 12:35 pm | मदनबाण

Since Modi's June 19 infamous speech, PLA has encroached on two key Indian border areas:
1. The Depsang "bottleneck" (Y-junction), deep inside India and scene of a 3-week ingress in 2013.
2. The “triangle” near Galwan Valley's Patrol Point 14, scene of the June 15 fatal clashes.

टिवटिव दुवा :- Brahma Chellaney

Modi vowed the soldiers' deaths "will not be in vain." But today, the "triangle"—including the clashes' site—has come under PLA's control. Rather than giving the promised "free hand," India has asked its Army "not to escalate," thus allowing PLA to keep escalating its intrusions.

टिवटिव दुवा :- Brahma Chellaney

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- In 2020, can India pretend to be weaker than it was in 1967, despite building a nuclear arsenal and despite its longstanding status as one of the world’s largest importers of weapons?

मदनबाण's picture

29 Jun 2020 - 1:37 pm | मदनबाण

आपल्या बाजुने टी-९० भीष्म टँस्क आणि बहुतेक टी-७२ टँक बॉर्डरवर सिद्ध असल्याचे समजत आहे.
Amidst tensions with China, how C-17s are lifting the 46 tonne T-90 tanks

आपल्या आणि जपानच्या युद्ध नौकांचा एकत्रित युद्ध अभ्यास :-
LAC stand-off: India, Japan conduct naval exercise amid China row

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- In 2020, can India pretend to be weaker than it was in 1967, despite building a nuclear arsenal and despite its longstanding status as one of the world’s largest importers of weapons?

शाम भागवत's picture

29 Jun 2020 - 2:06 pm | शाम भागवत

अमेरिकेकडून क्षेपणास्त्रप्रणालीला तोंड देण्यासाठी अत्याधुनिक सामुग्री येतीय असं ऐकलं.

अभ्या..'s picture

29 Jun 2020 - 2:42 pm | अभ्या..

कौतुक वाटते ह्या न्युज चॅनेलांचे, त्यातल्या त्यात त्या न्युज नेशन आणि टीव्ही नाईन चे.
गेला महिनाभर किंबहुना जास्तच काळ चीन भारत युध्द चालूच आहे अशी चर्चा असते. काय एकेक रिपोर्ट काय एकेक भाष्ये अन खरोखर पोलीस टाईम्स च्या तोंडात मारतील अशा यमकी हेडलाईन्स. " ट्रम्प ने खाई है कसम, चीन होगा अब भस्म" अरे काय?
त्यात रक्षामंत्री रशियाला जाऊन डिमांड करायच्या आत रशिया आपल्याला एस ४०० अ‍ॅअर डिफेन्स प्रणाली देणार ह्याची चर्चा चालू. इतकेच नाहीतर ही प्रणाली सीमेवर तैनात झाल्यावर चीन कसा पाय लावून पळणार ह्याचे वर्णन. लगेच ही प्रणाली मंत्रीम्महोदय सोबत येताना विमानात घेऊन येणार असा आविर्भाव. त्या प्र्णालीचे गुणगान दोन दिवस गाऊन झाल्यावर ह्या वर्षात त्या मिलतील असे मंत्री आश्वासन घेऊन परतले आणि तीच एस ४०० सिस्टीम चीन ने सीमेवर उभी केली. लगेच चॅनेलांनी इस्रेली बराकचे गुणगान सुरु केले.
एकेक स्पेशल रिपोर्ट्स आणि ब्रेकिंग न्युज पाहता ह्या चॅनेलांना काय हवेय ते अद्याप कळले नाही.

शाम भागवत's picture

29 Jun 2020 - 3:05 pm | शाम भागवत

टी आर पी.

शाम भागवत's picture

28 Oct 2020 - 9:24 am | शाम भागवत

सकाळ २८ ॲाक्टोबर २०२०
भारताची क्षेपणास्त्र मारक क्षमता भेदक करण्यासाठी उपयुक्त बेका ( बेसिक एक्सचेंज अँड कोऑपरेशन एग्रीमेंट ) करारावर शिक्कामोर्तब झाले. या करारानुसार भारताला क्षेपणास्त्र हल्ल्यासाठी लागणारे अचूक भौगोलिक तपशील अमेरिकेकडून मिळतील.

👆
हवाई प्रभूत्व मिळवण्यासाठी हे फार महत्वाचे वाटतंय.

कपिलमुनी's picture

29 Jun 2020 - 6:49 pm | कपिलमुनी

मन कि बात मध्ये चायना चे नाव सुद्धा घेतले नाही. सीमा पार से ? येड्याचा बाजार आहे नुसता.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

29 Jun 2020 - 8:24 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

बोलले पण थेट नै. जसे, की ''वाकड्या नजरेने भारतीय भूमीकडे पाहणार्‍यांना कणखरपणे उत्तर दिले जाईल. भारतमातेच्या रक्षणाच्या ज्या दृढनिश्चयाने जवानांनी जे बलिदान तोच संकल्प भारतीयांनी त्यांच्या जीवनाचे ध्येय बनविले पाहिजे, हीच खरी जवानांना खरी श्रद्धांजली ठरेल'' मान्य. आता पुढील पाऊल ? लडाखमधे चिन्यांनी भारतीय सैन्याबरोबर यापुढे प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर मार्शल आर्टमधे पारंगत असलेल्या जवानांची भरती करुन ती बटालियन लडाख आणि सीमाप्रदेशावर चिन्यांची असणार आहे, ही त्यांची तयारी आहे प्रत्यक्ष सीमेवर.

आपण रशीयाकडून क्षेपणास्त्र विरोधी रडार घेतले. अमेरिकेकडून अमूक घेतले. जपानकडून अमुक-धमूक युद्ध सराव केला. हे सर्व अभिमान वाटावे असेच आहे, असे असले तरी आपलं मुळ जे दुखणं आहे त्यावर कार्यवाही अपेक्षित आहे, चिन्यांचे सैन्य लडाख आणि सीमेवर जे आत घुसले आहे, ते परत फिरले पाहिजेत, तरच या प्रकरणात भारतीय शिरजोर ठरले आणि आपण आपली भूमी परत मिळवली असे म्हणावे लागेल.

-दिलीप बिरुटे

रात्रीचे चांदणे's picture

29 Jun 2020 - 8:26 pm | रात्रीचे चांदणे

हे काय नळावर च भांडण आहे का की माझं नाव का घेतलं आणि नाही घेतलं म्हणायला

मदनबाण's picture

29 Jun 2020 - 8:44 pm | मदनबाण

प्रत्येक हिंदुस्थानी नागरिकाने वाचावे असे दोन लेख :-

‘Post Galwan battle, Chinese soldiers were in a state of panic’
PLA troops are an anxious group, recall Indian officers

बादवे जरासे अवांतर :- वरील एका प्रतिसादात आपण जपान बरोबर नौदलाचा एकत्रित युद्ध अभ्यास केला आहे त्याची बातमी आहे, जपान बरोबर आपले एक वेगळेच नातं देखील आहे जे टोकियो ट्रायल्स या नावाने प्रसिद्ध असुन देखील त्या बद्धल हिंदुस्थानी नागरिकांना तितकीशी माहिती नाही. या संपूर्ण घटनेवर वेब सिरिजी देखील असुन माझा अत्यंत प्रिय अभिनेता इरफान याने त्यात प्रमुख भुमिका केलेली आहे.

जालावर असलेली माहिती खाली डकवत असुन त्यात माझी कोणतीही भर नाही...
Remembered in Japan, forgotten in India……..

The day was 12 November, 1948. Tokyo Trials are going on in a huge garden house on the outskirts of Tokyo, the trial of fifty-five Japanese war criminals including Japan’s then Prime Minister Tojo, after losing WWII.
Of these, twenty-eight people have been identified as Class-A (crimes against peace) war criminals. If proved, the only punishment is the “death penalty”.

Eleven international judges from all over the world are announcing……”Guilty”…. “Guilty”…… “Guilty”……… Suddenly one thundered, “Not Guilty!”

A silence came down in the hallway. Who was this lone dissenter?

His name was Radha Binod Pal a Judge from India.

Born in 1886 in the Kumbh of East Bengal, his mother made a living by taking care of a household and their cow. For feeding the cow, Radha used to take the cow to the land near a local primary school.

When the teacher taught in school, Radha used to listen from outside. One day the school inspector came to visit the school from the city. He asked some questions of the students after entering the class. Everyone was silent. Radha said from outside the classroom window…. “I know the answer to all your questions.” And he answered all the questions one by one. Inspector said… “Wonderful!.. Which class do you read?”

The answer came, “… I do not read…I graze a cow.”

Everyone was shocked to hear that. Calling the head teacher, the school inspector instructed the boy to take admission in school as well as provide some stipend.

This is how education of Radha Binod Pal started. Then after passing the school final with the highest number in the district, he was admitted to Presidency College. After taking M Sc. from the University of Calcutta, he studied law again and got the Doctorate title. In the context of choosing the opposite of two things he once said, “law and mathematics are not so different after all.”

Coming back again to the International Court of Tokyo.

In his convincing argument to the rest of the jurists he signified that the Allies, (winners of WWII), also violated the principles of restraint and neutrality of international law. In addition to ignoring Japan’s surrender hints, they killed two hundred thousand innocent people using nuclear bombardment.

The judges were forced to drop many of the accused from Class-A to B, after seeing the logic written on twelve hundred thirty-two pages by Radha Binod Pal. These Class-B war criminals were saved by him from a sure death penalty. His verdict in the international court gave him and India a world-famous reputation.

Japan respects this great man. In 1966 Emperor Hirohito awarded him the highest civilian honor of the country, ‘Kokko Kunsao’. Two busy roads in Tokyo and Kyotto have been named after him. The law has been included in the syllabus of his sentence. In front of the Supreme Court of Tokyo, his statue has been placed. In 2007, Prime Minister Shinzo Abe expressed his desire to meet his family members in Delhi and met his son.

Dr. Radha Binod Pal (27 January 1886 – 10 January 1967) name is remembered in the history of Japan. In Tokyo, Japan, he has a museum and a statue in Yasukuni shrine.

Japan University has a research center in his name. Because of his judgment on Japanese war criminals, Chinese people hate him.

He is the author of many books related to law. In India, almost nobody knows him and perhaps not even his neighbors know him! A hindi movie was made on him, Tokyo Trials, starring Irfan Khan but that movie never made headlines.

…..one of the many underrated & unknown Indians.

We have been cheated by hiding the greatness of all our great nation and people as they were interested only in self and own Glory,

संदर्भ :- Tokyo Trials – Radha Binod Pal a Judge

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- In 2020, can India pretend to be weaker than it was in 1967, despite building a nuclear arsenal and despite its longstanding status as one of the world’s largest importers of weapons?

चौकस२१२'s picture

2 Jul 2020 - 3:05 pm | चौकस२१२

खूप लक्ष देऊन यातील न्यायाधीश पाल आणि स्वीडन चा न्यायाधीश यांचे म्हणणे ऐकावे लागते..
हा चित्रपट म्हणजे 'एक रुका हुवा फैसला ' चा जणू एका फार वरचं पातळीवरचे रूपांतर ( तसे एक रुका हुवा हा सुधाच १२ अँग्री मेन याचे रूपांतर होते म्हणा)
फक्त १२ सर्वसामान्य नागरिकांनऐवजी ७/८ न्यायाधीश ते सुद्धा प्रत्यक्ष देशाने खास निवडून पाठवलेले म्हणजे यातील वाद प्रतिवाद किती क्लिष्ट असतील याची कल्पना करा
मजा आली बघताना .. डोकं दुखलं पण मजा आली

शाम भागवत's picture

29 Jun 2020 - 10:39 pm | शाम भागवत

१. पाकव्याप्त काश्मिरमधील हाॅस्पिटलातील निम्म्या खाटा लष्करासाठी मोकळ्या ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत असं म्हटलं जातंय.
२. रशियातील विमानतळ भारतीय विमानांना केव्हाही वापरता येतील. त्यासाठी पूर्वपरवांगीची गरज नाही असं कळतंय.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

30 Jun 2020 - 9:13 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सरकारने मोबाईलमधील ५९ चीनी अ‍ॅपवर बंदी घातली यामुळे काय होणार हे मला तरी माहिती नाही. प्ले स्टोअरवर हे अ‍ॅप उपलब्ध नसतील परंतू प्ले स्टोअर टाईप विविध स्टोअरवर हे अ‍ॅप्लीकेशन मिळत असतातच. तिथे आणि तशा अनेक स्टोअरवर असे अनेक अ‍ॅप मिळत असतात, जाणकारांना माहिती आहेच. व्हीपीएन द्वारे असे अनेक अ‍ॅप वापरले जातात. असो, सरकारने काहीतरी पाऊल उचललं सरकारचं अभिनंदन. सरकारने हळुहळु अब्जावधी डॉलर्सची जी चीनी गुंतवणूक आहे तिला समूळ नष्ट करुन टाकावे, जे होईल ते होईल.

बाकी आज चार वाजता पंतप्रधान आपल्या भेटीला येत आहेत तेव्हा चीन संबंधात काही नवे असले तर धाग्यात येईनच आज चार बजे देखना न भूले.. मेरे प्यारे भाईयो और बहनो.

-दिलीप बिरुटे

चौथा कोनाडा's picture

30 Jun 2020 - 5:45 pm | चौथा कोनाडा

हे चिनी अ‍ॅप्स बंद करण्याची तांत्रिक प्रक्रिया काय असेल हे जाणण्यास उत्सुक.

जे लोक हे अ‍ॅप्स वापरत आहेत त्यांचे बंद पडणार का ?
बंद पडणार नसतील आणि ते वापरत राहतील त्यांना शिक्षा वै. करणार का ?
शिक्षा असेल तर काय प्रकारची असेल ?
सरकारने ज्या अ‍ॅप्स वर बंदी घातली त्याला अस्सल भारतीय पर्याय सरकार ऑफिशियली घोषित करणार का ?

तुषार काळभोर's picture

30 Jun 2020 - 6:46 pm | तुषार काळभोर

जे लोक हे अ‍ॅप्स वापरत आहेत त्यांचे बंद पडणार का ?
नाही

बंद पडणार नसतील आणि ते वापरत राहतील त्यांना शिक्षा वै. करणार का ?
नाही

शिक्षा असेल तर काय प्रकारची असेल ?
नाही

सरकारने ज्या अ‍ॅप्स वर बंदी घातली त्याला अस्सल भारतीय पर्याय सरकार ऑफिशियली घोषित करणार का ?
नाही

फक्त प्ले स्टोअर मधून काढलंय. कदाचित पुढे ISP आधीच install असलेल्या अॅप साठी इंटरनेट ब्लॉक करतील.

ताजा कलम :
टिक टॉक प्ले स्टोरवर सर्च केलं तर दिसत नाही. गुगल वर सर्च करुन प्ले स्टोअर च्या लिंक वर क्लिक केलं तर प्ले स्टोअर मध्ये tiktok वर जातो आणि इंस्टॉल करता येतं.

चौथा कोनाडा's picture

2 Jul 2020 - 5:59 pm | चौथा कोनाडा

+१
शेअरइट अ‍ॅपवर बंदी घातल्या नंतर दुसर्‍या दिवशी वापरण्यासाठी उघडलं तर भारत शासनाची सुचना आली ही "शेअरइट हे चिनी अ‍ॅप असल्यामुळे त्यावर बंदी घातलेली आहे, कृपया वापरू नका, लवकरच आम्ही या संबंधी योग्य त्या प्रक्रिया आणि कार्यवाही करत आहोत"

ही अ‍ॅपबंदी साठी टप्याटप्याने तांत्रिक कार्यवाही करण्याची सुरुवात केलीय असे बातम्यांमध्ये दाखवले जात आहे !

मराठी_माणूस's picture

3 Jul 2020 - 10:11 am | मराठी_माणूस

ते त्या अ‍ॅप साठी काही पर्यायी अ‍ॅप सुचवत आहेत का ?

मदनबाण's picture

30 Jun 2020 - 3:31 pm | मदनबाण

With Chinese troops on Indian territory in 7 places in Ladakh, the PLA is now stepping up activity on the Arunachal Pradesh border.
China has activated the Tawang, Walong and Asaphila borders -- which bore the brunt of Chinese attacks in 1962.

टिवटिव दुवा :- Ajai Shukla

आपल्या बाजुने एअर डिफेन्स सिटिम्स तैनात करण्यात आल्या असुन जमिनीवर M777 howitzers देखील तैनात करण्यात आलेल्या आहेत.
१] आकाश :- सरफेस टु एअर मिसाइल्स [ रेंज - ३० किमी ]
२] Israeli SpyDer
३] Pechora
४] OSA-AK
यातील काहींचे माहितीपर व्हिडियो :-

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Chinese troops now stepping up activity near Arunachal Pradesh

रात्रीचे चांदणे's picture

30 Jun 2020 - 10:49 pm | रात्रीचे चांदणे

The hindu मद्ये एका रिटायर्ड कर्नल ची वाचनीय मुलाखत छापून आली आहे. बऱ्याच बाबी त्यांनीं समजावून सांगितल्या आहेत. https://www.thehindu.com/news/national/the-pla-has-never-taken-such-a-bl...

mrcoolguynice's picture

1 Jul 2020 - 7:02 am | mrcoolguynice

भौइयो और बहनो...
त्यांनी आमचे २० जवान शहीद केलें...
बदल्यात आम्ही त्यांचे ५० अप्लिकेशन्स प्ले स्टोर वरून बॅन केले, जे पंडित नेहरूंना जमलं नाही..

mrcoolguynice's picture

1 Jul 2020 - 4:00 pm | mrcoolguynice

m

चीन ने पाकिस्तानवर जवळपास संपूर्ण नियंत्रण मिळवले आहे असे म्हंटल्यास ते वावगे ठरु नये !
आता चीनच्या इशार्‍यावर पाकड्यांनी २० हजार सैनिकांना गिलगिट बाल्टिस्तान मध्ये हलवले आहे.
.
..
...
बादवे...लाखो हिंदूंच्या कत्तली घडवुन आणि त्यांच्या स्त्रियांवर बलात्कार करुन इस्लामी राष्ट्राची हिंदुस्थान विरोधात निर्मीती झाली त्याच पाकिस्तानात आज साधा नमाज पढण्याचे वांदे झाले असुन यांचे चीनी आका यांची मुक्तपणे ठासत असुन यांच्या बायकांना देखील चीन मध्ये उचलुन नेत आहेत. [ हिंदूंनी चीनी लोकां कडुन काही तरी शिकावे का ? की इथे राहुन तिथे आत्मियता बाळगणार्‍यांनी बोध घ्यावा ? ]

टिवटिव दुवा १ :- Yes this is true...

टिवटिव दुवा २ :- Aukaat of Porkistanis after Chinese invaded Porkistan

टिवटिव दुवा ३ :- MASTER-SLAVE

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Pakistan Army Veteran calls Kashmiris Traitors for giving Terrorist locations to Indian Army

विनोद१८'s picture

2 Jul 2020 - 12:23 am | विनोद१८

.....पिवळे चिनी साहित्य मनसोक्त वाचुन देशाचा, देशाच्या पन्तप्रधानाचा व देशाच्या सैनिकान्चा मानभंग, तेजोभंग करणारी व पराकोटीचा द्वेश करणारी व सोयिस्कररित्या खरी माहिती दडवुन खोटी माहिती देणार्‍या व अर्बन नक्षल्यांसारखे आपला अजेन्डा पुढे रेटणार्‍या प्रतिक्रिया देणारी 'पिवळी पिशाच्चे' द्रुगोच्चर होऊ लागली आहेत असे दिसते.

आमच्या सैनिकांनी चीनचे ३५ ते ५० सैनिक मारले म्हणुन कदाचित 'दुख्खी आणि वैफल्यग्रस्त' होउन ती 'पिवळी पिशाच्चे' पिसाळली असतील का ??

वरच्या काही प्रतिक्रिया वाचुन तसे वाटले म्हणुन लिहिले.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

2 Jul 2020 - 8:30 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लडाखच्या सीमेवर भारतीय लष्कराच्या तीन डीव्हिजन तैनात करण्यात आल्या आहेत. रणगाड़े क्षेपणास्त्रे याच्या पूर्ण सज्जतेसह भारताच्या सैन्यदलात मोठ्या हालचाली दिसत आहेत, तिकडे चीननेही एकीकड़े चर्चा करीत असल्याचे दाखवून सीमेवर सैन्य उभे केले आहे.

भारत-चीन या दोन्ही देशांच्या कमांडरस्तरावरील चर्चेत भारताने शोक, दौलतबेग, ओल्डीरोड इथे गस्त घालू नये, ही चीनची मागणी भारताने धूड़कावून लावली आहे. चीनच्या दुस-याच्या हद्दीत घुसन्याचा मूर्खपणा वाढत आहे, तो भाग आमचाच आहे ही मुजोरी कमी झालेली नाही.

काल पंतप्रधान यांचं राष्ट्राला उद्देशून भाषणात चीनबद्दल एकही शब्द नव्हता, बोलायचं होतं चीनवर पण बोलले चन्यावर ही टीका होत असली तरी काही गोष्टी आणि सर्वच गोष्टी जाहीर सांगायच्या नसतात. मॅपची लढाई आहे, App ची नाही असे असले तरी चीन विरुद्ध आता सरकारने कंबर कसली आहे, एक भारतीय म्हणून चीनची खोड मोडली पाहिजे असे फार वाटत आहे.

-दिलीप बिरुटे

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

2 Jul 2020 - 11:37 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

भारत-चीन सीमारेषीय घटनांचा उत्तम मागोवा घेणारा लेख. वर, एका प्रतिसादात उल्लेख आला तो मुत्सद्दीपणाचा. आपण त्यातही बाजी मारणे गरजेचे आहे. युद्ध काही होणार नाही,भड़का कोणत्याही देशाला परवडणारा नाही. सध्या हे गुरगुरणे आहे. आपली आंतरराष्ट्रीय छबी मात्र यामुळे नक्की बनणार आहे, आपण बॅकफुटवर गेलो तर आपल्याबरोबर असलेले,येणारे देशही बॅकफुटवर जातील. सध्या तरी डोळ्याला डोळे भिडवून त्यांना परत फिरवायला मजबूर करणे हे जेव्हा होईल तेव्हा नव्या सरकारचा दबदबा निर्माण होईल,असे वाटते.

काल पंतप्रधान मोदी यांचं भाषण साधं होतं, लक्षणीय नव्हतं. अन्नपूर्ण योजनेला मुदतवाढ सांगायला ते टीव्हीवर आले असतील असे मला वाटत नाही, आपला फोकस देशातील प्रश्नावरच आहे असे भासवून चीनचं शेपुट छाटायचा आत विचार चालू असावा असे वाटते. सध्या संयम, शांतता, विचार आणि मग अटॅक् असाही प्लॅन असू शकतो.

देखेंगे आगे आगे होता है क्या...!

-दिलीप बिरुटे

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

3 Jul 2020 - 12:07 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

भारत-चीनमध्ये तणाव असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी लेहमध्ये दाखल. भारतीय सैनिकांचं मनोधैर्य वाढावे यासाठी व चीनसाठी एक सन्देश असल्याचे बोलले जात आहे.

काही उच्चस्तरीय बैठकही आहे असे म्हटल्या जाते.

--दिलीप बिरुटे

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

6 Jul 2020 - 11:42 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

चीनचे कॅम्प गलवान खो-यात दीड किमी परत जात आहेत अशी बातमी येत आहे, त्याचवेळी भारतीय सैन्यही असलेल्या स्थानावरुन मागे जायचं असेही म्हटल्या जाते.

गलवान खो-यातील नदीपात्रामुळे ते परत ज़ात आहेत असेही म्हटल्या जात आहे. विस्तारवादी शक्तींना रोखणे गरजेचे आहे, या लेहला टाकलेल्या घोषणेमुळे चीन घाबरला असे समजायचं कारण नाही.

बाकी दोन स्थळावरच्या स्थानावरुन चीन मागे गेला पाहिजे कोणत्याही अटीशिवाय.

-दिलीप बिरुटे

शाम भागवत's picture

6 Jul 2020 - 12:58 pm | शाम भागवत

तंबू वगैरे पण मागे राहायला नकोत.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

6 Jul 2020 - 4:06 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आपले भारतीय इतके भावनिक होतात की विचारु नका. काल पंतप्रधान लेहला गेल्यानंतर जसे तेथून आपण जिंकलो. राजकीय मुत्सद्दीपणाचीही धाग्यात चर्चा करतोय या धाग्यात. कालचा त्यांचा लेह प्रवास इव्हेंट अथवा नेहमीच्या धक्कातंत्राचा भाग होऊ नये तर त्याचे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दृष्ट्या दुरगामी परिणाम चांगले व्हावेत व्हावेत, एक भारतीय म्हणून वाटते.
तंबू आणि पेट्रोलोंगचे पॉइंट बदललेच पाहिजे.

ग्लोबल टाइम्समधे त्यांचं एक वाक्य आहे ''India knows ‘it can’t have a war with China’ ''New Delhi would be ‘more humiliated than 1962’ if it launches a new conflic (संदर्भ : ग्लोबल टाइम्सची बातमी)असे आपल्या देशाच्या मुखपत्रातून धमक्या देणारा चीन असा इतक्या सहजासहजी बॅकफूटवर जाणार नाही. कारण आंतरराष्ट्रीय दबदबा जो त्यांचा आघवपणा आहे, त्यावर परिणाम होईल म्हणून यात त्यांची नक्की चाल आहे. आम्ही परत जातो परंतु तुम्हीही परत जावे यात आपण जिंकलो असे काही नाही तर आपण नियमित जिथे पेट्रोलिंग करतो तिथे यायचं नाही असे चीनचे म्हणने आहे, याकडेही आपलं लक्ष असले पाहिजे.

भारत चीन बरोबर संघर्ष करु शकत नाही म्हणून भारत तणाव वाढू नये यासाठी प्रयत्न करतो असे त्यांचे म्हणने आहे, अर्थात यात आम्ही तुम्हाला घाबरत नाही वगैरे इतर काही डावपेच आहेच तो काही भाग नाही. चीनचं म्हणनं आहे की ''भारतीयांना खुश करण्यासाठी त्यांचे पंतप्रधान म्हणतात की सीमारेषेवर सैन्याला सर्व प्रकारचे निर्णय घ्यायला सूट दिली आहे''

ग्लोबल टाइम्सचा लेख काळजीपूर्वक वाचला तर चीन्यांचे अप्रत्यक्षपणे धमकावणे सुरु आहे. आपलंही आपल्याबाजूने सर्वतोपरी गुरगुरणे सुरुच आहे. चिन्यांवर किती परिणाम होतो हे काळच दाखवेल.

-दिलीप बिरुटे

शाम भागवत's picture

6 Jul 2020 - 4:24 pm | शाम भागवत

मला नाही वाटत आपण आपल्याला आत्तापर्यंत मिळणारी सुविधा घाबरून सोडून देऊ. चिनचे सैन्य व तळ मागे गेले की, आपला रस्ता व नदीवर बांधलेला पूल परत निर्धोक होईल. चीन्यांना त्यावर लक्ष ठेवता येईल असे काही मान्य करणे म्हणजे पूल बांधूनही नसल्यासारखाच की हो.

मला वाटते, चीन जेव्हा खूप अडचणीत आलेला आहे तेव्हांच नेमके हे पूल बांधण्याचे कृत्य करणे हा आपल्या सैन्याचा डावपेचाचा भाग असावा आणि राजकीय इच्छाशक्तिने सैन्याच्या म्हणण्याला मान तुकवली असावी. त्यावर प्रतिडाव टाकण्याचा चीनचा प्रयत्न असावा. माझ्यामागे किती देश आहेत हे सांगायचा चीन प्रयत्न करतोय. भारतही तेच करतोय. फरक एवढाच आहे की, भारतामागे उभे असलेले देश हे संपन्न व ताकदवान व स्वयंभू आहेत. तर चीनमागे उभे राहणारे चीनचे मिंधे आहेत.

नेपाळ हा एक मोठा प्रश्न होता. लेहमधे लढायला गुरखा रेजिमेंट ही सर्वोत्तम आहे. ती तर नेपाळविरूध्द वापरता येत नाही. पण तोही प्रश्न सुटायची शक्यता निर्माण झालीय.

अर्थात हे सगळे तर्क आहेत. म्युनसिपालटीत उंदीर मारणारे एवढच तर करू शकतात. :)

डोवाल-वँग चर्चेनंतर हे झालेले आहे असे समजते.
भारतीय सेनेचे बिल्ड-अप अजून तसेच आहे आणि ते चीनची माघार मॉनिटर करताहेत.
अजूनही पेचप्रसंग पूर्णपणे सुटला असं म्हणणं धाडसाचं ठरेल. कदाचित १-२ आठवड्यानंतर जरा अधिक कल्पना येईल.

भूतानची पण काही जमीन आमचीच म्हणून चीन आता बोंब मारतोय. रशियाबद्दलही गरळ ओकून झालीच आहे. हे सगळं दबावतंत्र आहे असं म्हणण्यास वाव आहे. एकाचवेळी अनेक आघाड्यांवर खेळणं हे युद्धनीतीत डिकॉय म्हणूनच वापरलं जाणारं तंत्र आहे.

चीनच्या वृत्तपत्रांनुसार भारतानंच चीनची आगळीक केलेली आहे, चीन निष्कारण यात ओढला जातोय आणि चीनच शांततेचे प्रयत्न करतोय असं चित्र आहे.
त्यामुळे त्यांच्या वृत्तपत्रांवर किती विश्वास ठेवायचा हा एक मोठाच प्रश्न आहे.

शाम भागवत's picture

7 Jul 2020 - 12:47 pm | शाम भागवत

१९६२ च्या युद्धात भारतीय सैन्य पळत सुटले. चीनी सैनीक पाठलाग करत मागे लागले. असे करत ते आसाम मधे म्हणजे आत्ताचा (अरूणाचल प्रदेश ) घुसले. याच मार्गाने आपण तिबेटशी संबंध ठेवत आलो होतो. दलाई लामाही याच मार्गाने पळून भारतात आश्रयासाठी आले होते.

मात्र त्यानंतर चिनी सैनिक माघारी परत गेले. त्यांना बहुधा हा सगळा थोरातांचा सापळा वाटत होता. प्रतापगडाखाली जसा अफजुलखान स्वखुशीने चालत आला होता, तसंच चीन अरूणाचल प्रदेशात चालून आला होता. त्याचे रसदीचे सर्व माग ताणले गेले होते. आजूबाजूच्या डोंगरात भारतीय सैन्य तोफेच्या बाराच्या इशाऱ्याची वाट बघतंय अशी कदाचित चीनी सैन्याला भिती वाटली असेल. हे सर्व आजूबाजूचे भाग भारतीयांना परिचित व चिनी सैन्याला अगम्य होते. थोरातांनी हेच सांगितले होते की, अशा स्थितीत आपण प्रत्येक चीनी सैनीक कापून काढू शकू. पराजयाच रूपांतर विजयात करू शकू.

प्रतापगडाच्या लढाईचा थोरातसाहेबांनी अभ्यास केला नसेल हे कसे शक्य आहे? पण थोरातांना सगळं युध्द संपल्यावर, आता काहीही करता येणार नाही अशी परिस्थिती आल्यावर दिल्लीवरून बोलावणं आलं. नेहरू, कृष्णमेनन व कौल यांना शिवाजी महाराज, त्यांचा गनिमी कावा, डोंगर दऱ्यांचा उपयोग करून करायचं त्यांच युध्दतंत्र वगैरे कळणं शक्य नव्हते. त्यामुळे त्यांना थोरातही कळले नाहीत.

पण चिन्यांना मात्र या सगळ्यातला धोका कळला होता. ते ताबडतोब तिथून मागे फिरले. पण ते जिथून मागे फिरले तिथपर्यंतचा भाग आपण जिंकलेला असून तो भाग आपला आहे अशी गैरसमजूत त्यांनी करून घेतली आहे. हेच गलवान खोऱ्याबाबतही झाले आहे. आपण मात्र आपला जिथपर्यंत ताबा आहे, तो आपला भाग म्हणत आहोत.

सर्व जगावर राज्य करणाऱ्या ब्रिटिशांनी तिबेट मुद्दामहून बफर स्टेट म्हणून ठेवला होता, त्यामागे त्यांचा नक्कीच काहीतरी हेतू होता, तेच धोरण पुढे चालू ठेवले असते तरी पुष्कळ झाले असते. पण आपण तसेतर केले नाहीच, उलट आपली तिबेटमधली आपली सैन्याची तुकडी परत बोलावली.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

31 Aug 2020 - 11:52 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Indo-China Dispute | भारत-चीन सैन्यामध्ये पुन्हा झटापट

https://marathi.abplive.com/news/india/india-china-border-conflict-chine...

-दिलीप बिरुटे