[कविता' २०२०] - करवली

साहित्य संपादक's picture
साहित्य संपादक in स्पर्धा
20 May 2020 - 7:32 pm

करवली

सहजंच फिरता फिरता आज पुन्हा तिथे आलो
आणि आठवली ती पहिलीच मंद झुळूक मोहरून टाकणारी
ते अवखळ चालणं
लटकेच हसणं
पापण्यांची उघडझाप
आणि लगबग पावले
त्यातली तारुण्याची नवाई

हसणारे ओठ
रुसणारे ओठ
आणि आत जाई-जुईच्या पाकळ्या
हसताना क्षणांत होतात मोकळ्या
पण पटकन लपतातही सगळ्या

नेसलेल्या साडीचा नवेपणा
डोळे कसले, शलाकाच त्या
आवाजाचे एक दोन शब्द
घर करून बसलेत कानभर

वाऱ्यावर झुलणारा भुरभूर कुन्तलभार
त्यातल्याच दोन तीन बटा चेहऱ्यावर रुळणार
आणि गालावरच्या खळीला स्पर्श त्या करणार

तो कर्दळीचा हात
त्यावर चंदनाची मेंदी
आणि वर पिवळं-धम्मक कंकण

इकडून तिकडे बागडणारी
करवली तू खरी
जिथे जाते तिथे
कारंज्यांच्या सरी

असतं एखादं पान असं
वाटतं पुन्हा पुन्हा उघडावं
बकुळीचं फुल जसं
सुगंध देत रहावं
आणि त्याचा सुगंध घेऊन
पुन्हा मिटून ठेवावं

body {
background: url(https://i.postimg.cc/3JFS7g8f/IMG-20200503-162101.jpg);

background-size: 4500px;
}

प्रतिक्रिया

कादंबरी...'s picture

21 May 2020 - 12:20 am | कादंबरी...

छान. रचना अजुन चांगली करता आली असती.
+१

गणेशा's picture

21 May 2020 - 6:47 am | गणेशा

अतिशय सुंदर.. वा किती छान वर्णन..

तो कर्दळीचा हात
त्यावर चंदनाची मेंदी
आणि वर पिवळं-धम्मक कंकण

हे तर अप्रतिम.. खुप आवडले..

चांदणे संदीप's picture

21 May 2020 - 7:23 am | चांदणे संदीप

पण, अजून उत्तम करता आली असती.

सं - दी - प

प्रियाभि..'s picture

21 May 2020 - 1:06 pm | प्रियाभि..

कल्पना चांगली वाटली. शुभेच्छा

जव्हेरगंज's picture

21 May 2020 - 9:22 pm | जव्हेरगंज

वा!
+१

कौस्तुभ भोसले's picture

22 May 2020 - 12:45 am | कौस्तुभ भोसले

मस्त

आगाऊ म्हादया......'s picture

23 May 2020 - 8:12 am | आगाऊ म्हादया......

+1

तुषार काळभोर's picture

23 May 2020 - 11:59 am | तुषार काळभोर

असतं एखादं पान असं
वाटतं पुन्हा पुन्हा उघडावं
बकुळीचं फुल जसं
सुगंध देत रहावं
आणि त्याचा सुगंध घेऊन
पुन्हा मिटून ठेवावं

रुपी's picture

23 May 2020 - 12:56 pm | रुपी

आहा! काय सुंदर!

पाषाणभेद's picture

24 May 2020 - 9:08 am | पाषाणभेद

इकडून तिकडे बागडणारी
करवली तू खरी
जिथे जाते तिथे
कारंज्यांच्या सरी

एका बापाच्या नजरेने वरील ओळी वाचल्या अन डोळे पाणावले.

श्रीगणेशा's picture

24 May 2020 - 8:54 pm | श्रीगणेशा

छान. शब्द सुरेख. रचना अजुन चांगली करता आली असती.

बिपीन सुरेश सांगळे's picture

25 May 2020 - 1:21 pm | बिपीन सुरेश सांगळे

शब्द अन कल्पना सुरेख
पण लेखन अजून सहज हवे होते