वाटा....
ठरलं अनंत वाटाच,अंती ध्येय,
कसली सिद्धता, कुठले प्रमेय?
दाही दिशांची यात्रा दरमजल,
नव्या वळणावर, नवी गजल,
कधी तुक्याची सोपी पायवाट,
कधी फंदींची धोपट,वहिवाट,
कधी करावी जरा वाकडी वाट,
होईल कुण्या गतजन्मीची भेट,
वाट जिथे संपवशील तू प्रारब्धा,
नवी वाट शोधेन मी आरब्धा,
पुन्हा मग अनंत वाटा अंती ध्येय,
कसली सिद्धता, कुठले प्रमेय?
body {
background: url(https://i.postimg.cc/3JFS7g8f/IMG-20200503-162101.jpg);
background-size: 2500px;
}
प्रतिक्रिया
4 May 2020 - 3:26 pm | प्रचेतस
+१
ही पण खास
4 May 2020 - 3:54 pm | जव्हेरगंज
वा! आवडली!!
+१
4 May 2020 - 4:15 pm | श्वेता२४
+१आवडली
4 May 2020 - 6:28 pm | प्रशांत
+१ आवडेश
5 May 2020 - 7:32 am | मन्या ऽ
आशादायी! आवडली!
+१
5 May 2020 - 7:59 am | तुषार काळभोर
सब माया है!
5 May 2020 - 10:15 am | किसन शिंदे
+१
5 May 2020 - 12:01 pm | पलाश
+१.
कधी तुक्याची सोपी पायवाट,
कधी फंदींची धोपट,वहिवाट,
हे फार मस्त आहे
आरब्ध शब्द आवडला.
5 May 2020 - 12:32 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
हेच आवडले.
-दिलीप बिरुटे
5 May 2020 - 9:16 pm | स्मिताके
+१ छान
8 May 2020 - 1:28 pm | कौस्तुभ भोसले
सुंदर
9 May 2020 - 8:34 am | चांदणे संदीप
वाटांवाटांची माहिती आणि महती सांगणारी कविता!
+१
एक प्रश्नः आरब्ध हा शब्द मराठी की हिंदी?
सं - दी - प
13 May 2020 - 11:01 am | पलाश
संस्कृृृत. https://spokensanskrit.org/index.php?tran_input=आरब्ध&direct=se&script=hk&link=yes&mode=3
12 May 2020 - 12:34 am | सौ मृदुला धनंजय...
+1
22 May 2020 - 9:44 pm | प्रसाद साळवी
वेव्ह फंक्शन ची आठवण झाली.... दाही दिशा एकदम आक्रमायला लागेलंच वेव्ह फंक्शन, छान प्रयत्न.
2 Jun 2020 - 5:12 pm | सत्यजित...
खरंय!
कसली सिद्धता,कुठले प्रमेय!
अनिश्चितता असतेच तरंगत कुठेतरी अधांतरी!