असंघटित कामगारक्षेत्र हा भारतातील खरा मागास वर्ग आहे . मी स्वतः अभियांत्रिकी आणि बांधकाम उद्योगात काम केलेले असल्याने स्वानुभवाने सांगू शकतो की खरोखर या लोकांना कोणीच वाली नाही . Contract Employment चे युग सुरू झाल्यापासून अक्षरश: कंत्राटदाराच्या मर्जीवर या लोकांचे जीवन अवलंबून असतें . कोणत्याही कंपनीत चतुर्थ आणि तृतीय श्रेणी कामगार वर्ग हा Backbone असतो . Welders, Electricians, Fitters, Technicians ,Helpers आणि अशी अनेक अन्य कामे करणारे हे लोक खऱ्या अर्थाने मशिन्स सुरू ठेवण्यासाठी अखंड कार्यरत असतात , पण त्याचवेळी हेच कर्मचारी सर्वाधिक दुर्लक्षित देखील असतात . कंपनी जर त्यांच्यासाठी 15000/- रुपये वेतन निश्चित करत असेल तर कंत्राटदार फक्त जेमतेम 8000/ ते 10000/- रुपये हातावर टेकवतात . त्यात राहणे खाणे याची व्यवस्था कामगारांनी स्वतः च करायची . मग मोठमोठ्या कंपन्यांच्या जवळ अगदी हलाखीच्या परिस्थितीत भाड्याने किंवा झोपड्या बांधून हे लोक राहतात . फॅमिली आणणे परवडत नाही मग ग्रुपने जेवण करून पोटाची खळगी भरत असतात ...
आज करोना मुळे स्थलांतर करणाऱ्या migrant workers मध्ये हे लोक बहुसंख्य असणार ... आधीच तुटपुंज्या उत्पन्नावर जगणारे आणि हातावर पोट असणारे हे लोक पुढे काय करणार हा गहन प्रश्न असणार आहे कारण गावाकडे कुटुंब देखील यांच्यावरच अवलंबून असणार ..गावाकडे असलीच तर थोडीफार शेती आणि जमीन यांच्या आधारे भविष्याची आस लावून हजारो किलोमीटर चालत जाण्यासाठी निघालेले हे लोक पाहून खूप वाईट वाटतंय ...
आपण एकविसाव्या शतकात वैज्ञानिक प्रगती आणि औद्योगिक प्रगती , प्रगत इकॉनॉमी च्या ज्या गप्पा मारत होतो त्या विरून गेल्यात ... उरले आहे भयाण वास्तव ... !!
''उत्तम चर्चा झाली आहे. चर्चेचा रोख पाहता आता धागा वाचनमात्र करणे आवश्यक . सर्व सदस्यांचे सहकार्याबद्दल मन:पूर्वक आभार''
संपादक मंडळ
प्रतिक्रिया
12 May 2020 - 2:59 pm | मराठी_माणूस
हे खरेच भयाण वास्तव आहे.
तुम्ही म्हणता तसे जर हे लोक
आणि तेही तुटपुंज्या पगारावर, तर आता हे काम कोण करणार हा प्रश्नच आहे.
12 May 2020 - 7:40 pm | शेखरमोघे
वास्तवाचे छान वर्णन.
अशा लोकान्च्या "कल्याणा"करता जरी अनेक सरकारी कायदेकानू बनवले गेले तरी शेवटी "कल्याण" दुसर्याच लोकान्चे होते. ज्या कंत्राटदाराच्या मर्जीवर या लोकांचे जीवन अवलंबून असतें, त्यान्चाही कोणीतरी "धनी" असतोच.
सरकारी कायदेकानू बनवले जात असताना militant trade unions चा प्रभाव कदाचित पुरेसा विचारात घेतला गेला नसावा. militant trade unions ला उत्तर म्हणून "आपले लोक" (की जे वाटाघाटीमध्ये भान्डून किन्वा इतर प्रकारे आपल्याकरता जास्त पैसे मिळवून घेतात आणि ज्याना काढून टाकणे या करता अनेक सव्यापसव्य करणे जरूर असते) कमित कमी ठेवून जमेल तेव्ह्ढी कामे कंत्राटदाराच्या हाती सोपवणे हा प्रकार सुरू झाला.
कदाचित अशा mass migration नन्तर कामाची नवीन पद्धत शोधावी लागेल. अशा परिस्थितीत AI/Robot अशा धर्तीवर कामे सुरू झाल्यास जी कामगारान्ची जरूर कमी होईल आणि/किन्वा required skill set जे बदलतील, त्यामुळे भविष्यकाळात "नोकरी" ची कल्पनाच बदलून जाईल.
पाश्चात्य देशात असे थोड्याबहुत प्रमाणात आहेच - जसे gig-economy म्हणजे "महिन्याला/वर्षाला ठरवलेला मेहनताना" या ऐवजी "अमुकतमुक करणे/करवून घेणे" हे तुमचे काम आणि त्या करता तुम्हाला एकूण येव्हढी रक्कम मिळेल (त्यातील काही रक्कम based on success असू शकेल).
12 May 2020 - 7:52 pm | मराठी कथालेखक
कोरोनाग्रस्तांपेक्षा लॉकडाउनग्रस्तांचे प्रश्न मोठे झाले आहेत / होणार आहेत
12 May 2020 - 7:53 pm | सुबोध खरे
१९९४ सालची कुणीतरी जगताप (किंवा दुसरे नाव असेल) विरुद्ध मुंबई महापालिका अशी एक केस आठवते आहे.
त्यात हा माणूस अत्यंत अकार्यक्षम आहे म्हणून त्याला कामावरन काढून टाकले होते. याविरुद्ध निकाल देताना मुंबई उच्च न्यायालयाने लिहिले होते कि सद्य कायद्याप्रमाणे एखादा माणूसअकार्यक्षम आहे म्हणून त्याला कामावरुन काढून टाकता येणार नाही तेंव्हा त्याच्यासंपूर्ण ५ वर्षाचा पगार देऊन त्याला नोकरी वर घेण्यात यावे.
टी सी एस च्या अहवालाप्रमाणे (१९९१) नौदलाच्या गोदीत ९ हजार कामगारांची गरज आहे. परंतु तेथे प्रत्यक्षात २० हजार कामगार होते. यानंतर नौदलाने तेथे भरती बंद केली होती. कारण एकही कामगाराला काढून टाकणे शक्य नव्हते.
अशा तर्हेच्या कामगार कायद्यामुळे खाजगी उद्योजक आपल्याकडे कामगार कायमचे ठेवून घ्यायला तयार नसतात.
कालच एका उद्योजकाशी बोलत असताना तो म्हणाला कि माझ्याकडे सध्या एकही ऑर्डर नाही गेल्या दोन महिन्यात काहीही काम झालेले नाही आणि महिना माझे वेतनावर ५ लाख रुपये जातात. दोन महिने मी कामगारांना घरी बसून पगार दिला आता मात्र मला एक दमडी देणें शक्य नाही. काय कायदेशीर कारवाई होईल ती होईल.
कारखान्यात वरती पावसाळ्याच्या अगोदर छप्पर टाकणे आवश्यक आहे अन्यथा सर्व यंत्रे गंजून जातील. लोकडाऊनच्या अगोदर मी छप्पर काढले आहे आणि आता यंत्रे उघड्यावर आहेत. सरकारचे काय जाते सर्व कामगारांना पगार द्या सांगायला. हि स्थिती तीन महिने राहिली तर मला कारखाना विकून घरी बसावे लागेल.
आपण औद्योगिक क्षेत्रात गेलात तर अशा अनेक करूण कहाण्या ऐकायला मिळतील
12 May 2020 - 7:54 pm | चौकटराजा
यासाठी मी मुक्त अर्थ्व्यवस्थेच्या विरूद्ध आहे. पण 90 टक्के जगाने ती मान्य केली आहे . आता माघार घेणार कशी? व 21 वे शतक बुद्धीचे आहे श्रमाचे नाही . ज्यावेळी " व्यवस्थापक" या प्राण्याविषयी मालक लोकांचे ज्ञान वास्तवाला धरून असेल त्यावेळी त्याना देखील 15000 वर काम करावे लागेल. आजतरी व्यावस्थापकामुळे आपला व्यवसाय वाढीस लागतो हा गैर समाज मालकांमध्ये आहे .
13 May 2020 - 12:43 pm | माझीही शॅम्पेन
गंभीर परिस्थिती , येणार काळ हा अतिशय कठीण असणार आहे
13 May 2020 - 12:49 pm | गामा पैलवान
करोना हे एक थोतांड आहे. टाळेबंदी हे त्याहून थोरलं थोतांड आहे. सोशल डिस्टन्सिंग हा रोगापेक्षा भयंकर उपाय आहे. समाजात न मिसळल्यामुळे लोकांना हर्ड इम्युनिटी प्राप्त होण्यात अडथळा येतो. कुठूनतरी फक्त लोकांना त्रास द्यायचा इतकीच योजना आहे. लोकांनी बसायचं बोंबलंत.
-गा.पै.
13 May 2020 - 3:35 pm | चौकस२१२
थोतांड?
इटली / इंग्लंड आणि अमेरिकेतील मृत्यू तुम्ही pahilele दिसत नाहीयेत
अमेरिका = ३०० मिलियन त्यात ८० हजार मृत्यू
त्याचं १० टक्के साधारण लोकसंख्या असेलल्या ऑस्ट्रलयात एकूण मृत्यू १०० चाय आसपास , वेळेवर टाळेबंदीकेली म्हणून नाहीतर मृत्यू ८ हजार च्या घरात असते !
अर्थात भारतशी तुलना कारेन चुकीचे होईल लोकसंख्येचाह इतकं दबाव असल्यामुळे भारतात कोणत्याही सरकारला काहीही केलं तरी हे आवरण अवघडच झालं असता
13 May 2020 - 7:34 pm | गामा पैलवान
चौकस२१२,
हे करोनामुळे झालेले मृत्यू नाहीत. हे करोनासोबत झालेले मृत्यू आहेत.
काळजी घ्यायला हवी, याविषयी दुमत नाही. पण टाळेबंदी हा उपाय नाही. विशेषत: धडधाकट माणसांना घरात डांबल्याने कसलाही फायदा नाही.
आ.न.,
-ग.पै.
14 May 2020 - 2:42 pm | कपिलमुनी
लॉकडाऊन हा एकमात्र उपाय- पंतप्रधान
आमचे प्रधान सेवक म्हणत आहेत, त्यामुळे ते योग्यच असणार
14 May 2020 - 2:51 pm | गामा पैलवान
टाळेबंदीच्या नावाखाली भयावडंबर ( = fear mongering ) माजवलं जातंय.
रोग्यांना अलग / विलग ठेवलं गेलं तर ते समजू शकतो. निरोगी व धडधाकट लोकांवर टाळेबंदीची सक्ती कशासाठी? कसला करोना व्हायरस? करोनाच्या अनेक जातीआहेत. या सगळ्या विषाणूंसाठी बेमुदत टाळेबंदी करायची का?
-गा.पै.
14 May 2020 - 4:03 pm | चौकस२१२
सगळे ८० हजार मृत्यू काय करोनासोबत झाले? काय वाट्टेल ते
14 May 2020 - 5:00 pm | गामा पैलवान
चौकस२१२,
अगदी बरोबर बोललात पहा. मीडिया काय वाट्टेल ते बरळतेय. मी त्यावर विश्वास ठेवू म्हणता? शक्य नाही.
आ.न.,
-गा.पै.
13 May 2020 - 1:04 pm | गामा पैलवान
रेल्वेमध्ये प्रवासासाठी आरोग्य सेतू अॅप बंधनकारक, आवाहनानंतर मध्यरात्री अचानक सक्ती :
https://marathi.abplive.com/news/india/aarogya-setu-app-is-mandatory-for...
याला मनमानी म्हणतात. हा नागरी स्वातंत्र्याचा संकोच आहे. यालाच घटनेतल्या मूलभूत हक्कांची पायमल्ली असंही म्हणतात.
मुकी बिचारी कुणीही हाका रे!
-गा.पै.
14 May 2020 - 4:08 pm | चौकस२१२
मूलभूत हक्कांची पायमल्ली !
हे फक्त रेल्वे प्रवाशांना च लागू केलाय सगळ्या जनतेला नाही
असेच अप ऑस्ट्रेलियन सरकारने चालू केलं अजिबात सक्ती नाही पण आजपर्यंत २७ मिलियन पैकी ६.५ मिलियन लोकांनी वापरयाला सुरवात केली आहे
आणि हो इथे जनता जागरूक आहे तरी सुद्धा चांगला प्रतिसाद सुरु झालाय
13 May 2020 - 2:26 pm | मदनबाण
सध्य काळातले सगळ्यात मोठे स्थलांतर आपल्या देशात होत असुन परिस्थिती दयनिय,चिंताजनक आणि भयावह देखील दिसत आहे.
याच स्थितीचा एक व्हिडियो देउन जातो...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Soniye... :- Aksar
15 May 2020 - 12:23 pm | विजुभाऊ
बिहारी मजूरांच्या परिस्थितीबद्दल वाईट वाटते पण एक प्रश्न विचारावासा वाटतो
हे सगळे मजूर बिहार आणि उत्तर प्रदेश मधलेच का आहेत हा .
इतकी वर्षे हा प्रश्न सर्वच राजकीय पक्षानी सोयीसाठी टाळला आहे.
एकटे राज ठाकरे या बद्दल बोलले होते.
बिहारी उत्तर प्रदेशी भय्याना इतक्या दूर कामासाठी जावे लागते याचे त्या प्रदेशातील पुढार्यांना काहीच देणेघेणे नाहिय्ये.
या कडे हिंदी न्यूज चॅनेल्स दुर्लक्ष्य करीत आहेत.
बिहारी लोकांना तिकडे काम मिळत नाही हा त्या मजूरांचा दोष नाही.
बिहारी नेत्याना उत्तर प्रदेशच्या नेत्याना याबद्दल त्या मजुरानी जाब विचारायला हवा. ते विचारणार नाहीत पण
देशाने त्या लबाड खादाड भ्रष्ट लोकांच्या लालची पणाची किम्मत किती दिवस मोजायची?
कृपाशंकर सिंग , लालु यादव , मुलायम , ममताबाई , मायावती , अखिलेश ,हे त्यांचे इतरवेळचे कैवारी हे कोणी या मजुरांची मदत करताना दिसत नाहियेत.
त्यांचे पक्षही जीव गेलेल्या पोपटासारखे झाले आहेत का?
17 May 2020 - 9:59 am | मदनबाण
विजुभाऊ माझ्याही मनात हाच प्रश्न आहे... उत्तर प्रदेशातुन तर देशाला ८ पंतप्रधान मिळाले आहेत तरी त्यांची प्रजा इतर राज्यात लोंढ्यांच्या स्वरुपात जात राहिली आहे !
जिथे रोजगाराची संधी उपलब्ध असणार तिथे लोक जाणारच ! महाराष्ट्रात मात्र हे प्रमाण फारच मोठे आहे. तुम्ही क्षणभर विचार करुन बघा कि याच प्रमाणात मराठी लोक पंजाब, दिल्ली किंवा बंगळरु मध्ये जाउन वसली असती तर !
उत्तर प्रदेश, बिहार इथे गुन्हेगारीचे प्रमाण प्रचंड आहे, त्यामुळे तिथली मोठी लोकसंख्या महाराष्ट्रात विस्थापीत झाल्याने महाराष्ट्रातील गुन्हेगारी देखील अर्थातच लक्षणीय प्रमाणात वाढली.
हे नेते मंडळी नक्की कधी आणि काय काम करतात त्याचे अवलोकन करण्याची व्यवस्थाच नाही,हीच स्थिती सरकारी कर्मचारी वर्गाची देखील आहे. मोदी सत्तेत आले तेव्हा कुठे हापिसात वेळेवर येणेचे सक्तीचे झाले कारण फिंगर प्रिंट सेंसर ने हजेरीची नोंद करणे आवश्यक केले गेले, म्हणजे इतके वर्ष बाबुलोक जेव्हा इच्छा होइल त्यावेळी हापिसात येत होते हे उघड आहे.
बरं अनेक राजकारणी, मंत्री संंत्री, आमदार खासदार नगरसेवक वगरै देशसेवा करण्यासाठी म्हणुन राजकारणात येतात, जनतेची सेवा करतात असे भासवले जाते ते मोठ्या प्रमाणात सत्य नाही,कारण यांच्या संपत्तीचे आकडे बघितले तर राजकारणासारखा दुसरा पैसे जमवण्याचा मार्ग आपल्या देशात दुसरा नाही हे लगेच कळुन येइल.
कोव्हीड- १९ व्हायरस ने आर्थिक संकट आले असताना सामान्य जनतेने मोठ्या प्रमाणात जसे शक्य असेल तसे दान केले, परंतु देशातील किती राजकारण्यांनी मदत म्हणुन पैसे दिले ?
आपला देश भ्रष्ट राजकारण्यांनी पोखरुन काढला असुन त्यांचे संपतीचे आकडे पाहता त्यांनी त्यांच्या पुढील २५ पिढ्यांना पुरुन उरेल इतका पैसा चरुन ठेवला आहे, आपला देश गरीब नाही तो राजकारण्यांनी गरीब करुन ठेवला आहे.
उत्तर प्रदेश आणि बिहार मध्ये विकास करण्याची इच्छा तिथल्या राजकारण्यांना झाली नाही त्याचा परिणाम देशातील इतर राज्यांना विशेषत: महाराष्ट्राला भोगावा लागलेला आहे.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Tu Hi Haqeeqat... :- Tum Mile
13 May 2020 - 3:33 pm | वामन देशमुख
एवढं ही निराश होऊ नका हो, साहेब. अशी संकटे जगात यापूर्वीही आलेली आहेत, आणि त्यातून आपण मार्ग काढला आहे.
13 May 2020 - 6:58 pm | चौकटराजा
यापूर्वीची खर्या अर्थाने साथ आली होती 1920 साली ! म्हंजे 100 वर्शापूर्वी. त्यावेळी मानवी जीवनात माणूस मरायचाच अशी समाजाची मानसिकता होती. कारण एकूणच मानवी प्रगती निदान वैद्यकात नगण्य होती. आता वैद्यकात टेस्ट ट्यूब बेबी, स्टेम सेल थेरपी, क्लोनिंग, डी एन ए ई चा शोध लागल्याने विषाणू मुळे होणारा नरसंहार मानवी मनाला बोचक ठरू लागला आहे. खरा धक्का तो आहे ! जेंव्हा वादळे ,भूकंप ,पूर अशी संकटे येतात त्यावेळी तीच एकाच वेळी जगावर कधीही कोसळत नाहीत , पण जैविक संकटाचा आवाका मोठा असतो.तुम्ही म्हणता ज्या संकटाना तोंड मानवी समाजाने दिले ती संकटे कधीही जागतिक नव्हती. एका देश दुसर्याला मदत करू शकत होता . आता तसे आहे काय ?
14 May 2020 - 4:17 pm | गणेशा
कपिलमुनी
तुमचे रिप्लाय पाहून मला आता वाटते आहे.
India deserves better चा हा नविन भाग मी लिहायला पाहिजे होता.
देशात सगळी फेकू गिरी चालू आहे, पण या संकट समयी नको हेवेदावे म्हणून गप्प बसलो..
पण टाळ्या, थाळ्या, दिवे, आत्मनिर्भर अर्र काय र गड्या..
तरी cosara news and test kit, त्याचे पॉलिटिक्स पोहचले नाही लोकांच्यात
14 May 2020 - 6:44 pm | गणेशा
कपिल मुनी यांच्या प्रतिसादा ला हा रिप्लाय होता.
असो.
शेवटचे एक वाक्य जाहीर बोलणे मला ही मान्य नव्हते, पण पूर्ण प्रतिसाद योग्यच होता, योग्य बोलले होते..
चालायचेच..
13 May 2020 - 5:19 pm | संन्यस्त खड्ग
बांधकाम क्षेत्रातील मजूर , मॅसन वगैरे लोक आणि अगदी रिलायन्स आणि तत्सम कंपन्यांच्या प्लांट मध्येही ही असली आधुनिक वेठबिगारी अगदी बेमालूम चालू असते ....
मला एक कळत नाही शेअर बाजारात अब्जावधी रुपयांचे कॅपिटल उभारणाऱ्या आणि हजारो करोड चा नफा कमावणाऱ्या कंपन्या ज्यांच्या जीवावर ह्या उलाढाली करतात त्यांना त्यांच्याच कंपनीत काम करणाऱ्या मजुरांची ही अवस्था दिसत नाही ?
उदाहरण द्यायचे तर रिलायन्स फाउंडेशन कडून अनेक सेवाभावी प्रोजेक्ट हाताळले जातात मग त्यांना त्यांच्या कामगारांची हलाखीची परिस्थिती दिसत नसेल काय ? की दिसूनही ही सगळी सामाजिक संस्थांची नाटकं CSR हडपण्यासाठीच असतात ¿
13 May 2020 - 5:23 pm | झपाटलेला फिलॉसॉफर
सल्लूभाई ची बीइंग ह्युमन वगैरे थोथांड अशीच आहेत . 100 रुपयाचा टी शर्ट 500 नी 1000 ला विकून तो पैसा जमवलेला पैसा नक्की जातो कुठं ? अशा आपत्ती काळात या संस्था कुठं दडून बसल्यात ? सल्लू स्वतः एक पैसा तरी देतो काय दान म्हणून ?
13 May 2020 - 6:44 pm | गणेशा
चर्चा वाचत आहे.
यावेळेस मुद्दाम करोना, lockdown, सरकारी यंत्रणा, आणि आरोग्य खाते या बद्दल लिहिले नाही..
कारण केंद्राच्या असंख्य गोष्टी आपल्याला पटल्या नाही. आणि ही वेळ नाही म्हणून नाही लिहिले.
पण येथील चर्चा वाचत आहे.. चांगला आहे धागा
14 May 2020 - 3:23 pm | जेडी
फक्त मजुरच नाहीत तर बरेच लोक ह्या lockdown ची शिकार होणार असे वाटते. माझ्या एका मित्राची बायको एका आघाडिच्या दैनिकात आहे. दरवर्षी कंत्राट रिन्यू व्हायचे ते यंदाहोणार नाही. त्याचा जॉब अगोदरच गेलाय. (ह्यात मात्र कंपनीकारणीभूत आहे.). अजूनपर्यंत बायकोच्या आधारावर चालू होते, आता काय? होम लोनचे पुढे काय? त्याला आता जॉबमिळणेअवघड आहेच. अजून एका दैनिकाने आपले कोल्हापूर युनिट बंद केल्याचे कळले. त्यातील स्टाफचे काय? बाकीच्यानी अर्धा पगार चालू केलाय. बऱ्याचशा आय टी कंपन्याही लोकांना घरी बसवू लागल्या आहेत. मुलांच्या अवाढव्य फियांचे काय? सर्वच अधांतरी होवून बसलय. कालच मला एअरटेल कढून मेसेज आलाय-"तुम्ही ज्या एअरटेल फ्रेंड शी बोलला..." , फ्रेंड काय? कर्मचारी का नाही. अचानकच कंपनीच्या मेसेंजर वर काहीजणांची एक्झीट दिसू लागलीय. सर्वच संभ्रमित करणारे आहे. मजूर निदान रस्त्यावर उतरून मिळेल ते खातात, तशी सवयही आहे पण ज्यांनी अशा कॉर्पोरेटमध्येच काम केलय त्यांचे काय? होम लोन चे काय? ज्यांची शेती आहेत ते थोडे बहुत तग धरतील पण बाकीच्यांचे काय? लोन कसे फेडणार? बँका बुडतील काय? आहे टी पुंजी ज्यांनी बँकेत ठेवलीय ती पण जाईल का? हजारो प्रश्न आहेत.
14 May 2020 - 4:37 pm | खिलजि
एक उदाहरण , लोकडाऊन सुरु झाल्यावर काही दिवस दुकाने बंद होती .. त्यापैकीच एक , रवी टेलरचे दुकान.. साधा टेलर , कुणाची पॅन्ट फाटली, चैन तुटली , उसवली कि दुरुस्त करून जेमतेम टिसचाळीस रुपये कमावणारा माणूस .. काय अवस्था झाली असेल त्याची कल्पनाही करवत नाही .. वीस दिवसांनी , मला इतर दुकाने सोडून फक्त तोच दुकान उघडून बसलेला दिसला .. मी कामावर निघायच्या आधी चहाचे घोट पीत , त्याला न्याहाळत बसायचो .. अर्धा दरवाजा उघडा आणि स्वारी आत मशीनवर बसून असायची . बघून बघून मीच एके दिवशी त्याच्याकडे उगाचच जुने कपडे दुरुस्त करायला दिले आणि चौकशीही केली .. त्याची अवस्था ऐकून वाईट वाटले आणि काही मदत हवी का तेही विचारले .. पण त्याने खरंच ती मदत नाकारली .. थोडे दिवस अजून गेले .. आणि अचानक त्याच्या दुकानावर लाईन दिसायला लागली . रवीशेट बाहेर लोकांना ओरडून लांब उभे राहा , गर्दी करू नका म्हणून मोठ्या उत्साहाने सांगत होते .. मला आश्चर्य वाटले .. मीही नक्की काय गडबड आहे ते बघायला गेलो . बघतो तर काय , छोट्या छोट्या पॅकेटमध्ये ( १/४ किलो ) हे साहेब डाळी कडधान्य विकतायत .. आता मला सांगा , हातपाय गाळून काय होणार आहे का ,, नाही ना .. मग जे होतंय ते बघायचं , कुणाला शक्य असेल तेवढं द्यायचं आणि हळूहळू पुढे सरकत राहायचं .. तो करोना जसा आला तास जाईलही पण आयुष्यभर असाच काहीतरी सकारात्मक बघून जगायचं ,, काय बोलता , बरोबर कि नाही ...
14 May 2020 - 5:26 pm | मोदक
काही मदत हवी का तेही विचारले ..
याबद्दल अभिनंदन. सध्या हाच उपाय आहे. आपण आपल्या मित्रांना / परिचितांना त्यांच्या परिस्थितीबद्दल विचारणे आणि या कठीण प्रसंगात त्यांच्यासोबत उभे राहणे अत्यंत आवश्यक आहे.
14 May 2020 - 6:02 pm | खिलजि
मला आवडते राव , हे असं काहीतरी करायला .. अगदी मनापासून आवडते .. बायकोला जाम राग येतो पण तिला माझे कौतुकही वाटते .. तसे तिने कित्येकदा बोलूनही दाखवले आहे .. आतापर्यंत किती दुबळे याचा हिशेब ठेवला नाही पण शक्यतो मदत १०००० च्यवर असेल तर बायकोला नक्की सांगतो आणि मगच करतो .. सबब , सध्या हाती फक्त एक फ्लॅट आहे आणि एक दुकान , पण स्वतःच्या हिमतीवर घेतलेले आणि दुसरे काही नाही .. आणि हो हे सर्व मी लोकांना मदत करत आणि रोजचा दानधर्म करत घेतलेले आहे ..
मोह आणि माया
दोन्ही नश्वर या जगी
सुखांची पेरणी करत जावी
दुःख तर आपसूक उगवलेलेच असते , गवतासारखे
त्यात फक्त पुण्याईची दुर्वा शोधावी
कधी कोण कसे आणि का देऊ ?
याचा लोभ नसावा
पशुपक्षी मित्र साधुसंत यांच्या भल्यातच देव मानावा
खिडकीशेजारी येतील मग राघुमैनाचिमण्या कावळे सारे
ऐकत राहा नाद तयांचे , मिळेल वैभव प्यारे
14 May 2020 - 4:45 pm | मोदक
अत्यंत असंवेदनशील होऊन अडचणीचा प्रश्न विचारू का..?
करोनामुळे पगार / नोकरीधंद्यावर परिणाम झाला म्हणून किती लोकं आत्महत्या करतील..?
नोकरदार- व्यावसायिक वर्गाला सरकार लगेच पॅकेज / मदत वगैरे जाहीर करेल..?
हे प्रश्न बर्याच जणांना आवडणार नाहीयेत याची कल्पना आहे तरीही भावभावना बाजूला ठेऊन याचा विचार करावा.
15 May 2020 - 2:22 pm | तुषार काळभोर
या प्रश्नाला सहमती!
14 May 2020 - 5:03 pm | गामा पैलवान
जेडी,
अगदी नेमका प्रश्न विचारलात पहा. म्हणून मी करोनास थोतांड मानतो व सोबतच्या टाळेबंदीस महाथोतांड.
आ.न.,
-गा.पै.
14 May 2020 - 5:50 pm | चौकटराजा
मी पी एम निधीत पैसा घालायचा नाही असे ठरवले कारण मी व्होट बॅन्क आधारित पॅकेज कल्चरच्या विरोधात आहे. ती ही कशी ? तर डी एस के ना तात्पुरते लोन मिळू द्यायचे नाही. एच ए ला मदत न करता तिला विकायचा घाट घालायचा. बी एस एन एल ला बुडवायचे,जेट एअर वेज ला खेळते भाडवल धंदा असतनाही द्यायचे नाही कारण त्यात व्होट बॅन्क नाही. लॉबी नाही . इथे अनेक उद्योगांची लॉबी 2024 मधे निवडनुकीसाठी काहीतरी देईल ना ?
सबब कितीही लॉकडाउन वाढला व आपल्याला भांडी घासायला लागली तरी मोलकरणीला दर महिन्यास निम्मा पगार द्यायचा .अधून मधून ज्या सुताराने आपले गेले वर्शी फर्निचरचे काम केले त्याला मदत करायची असा निर्णय मी घेतला आहे. स्वार्थी मदत ! आता न्हाव्याकडे गेल्यावर जरी त्याने पैसे वाढवले नसले तरी दुप्पट पैसे देणार. आपल्या परीने स्वार्थी सामाजिक कार्य !
14 May 2020 - 8:45 pm | मराठी कथालेखक
गामा पैलवान,
मी तुमच्या विचारांशी बहुतांशी सहमत आहे.
पण सोशल वा फिजिकल डिस्टन्सिंग पाळावे असे मात्र मला वाटते. कारण जर एक दीड मिटरचे अंतर ठेवून आणि मास्क लावून जर रोगापासून दूर राहता येणे शक्य असेल तर रहावे. आणि त्याकरिता फार काही खर्च वा मेहनतही नाही.
पण लॉकडाऊन हा अनाठायी आहे. आणि त्यातही तो ज्या पद्धतीने केला गेला/जातोय ते जास्तच संदर्भहीन ठरतो आहे.
लॉकडाऊनशी निगडीत प्रमुख मुद्दे जे माझ्यामते हुकलेले आहेत
१) फक्त चार तासांचा अवधी देवून लॉकडाउन करणे. कुणी कुठल्या दुसर्या शहरात काही कामा कर्रिता अगदी दोन-चार दिवसाकरिता गेलेला असेल तरी तो ही अडकला.
२) लॉकडाऊन का करतोय याचे उद्दिष्ट स्पष्ट नसणे - असे सांगितले की कोरोनाची साखळी तोडायची आहे. कोरोनाला हरवायचे आहे म्हणून लॉकडाउन केले जात आहे. पण ५५० वरुन ७८ हजारांवर केसेस मिळाल्यात मग साखळी तोडण्याचे उद्दिष्ट पुर्ण झाले का ? सामान्य जनतेच्या मनात सुरवातीला आशा निर्माण झाली की २१ दिवसाच्या लॉकडाऊनमुळे कोरोनाचे संकट टळेल वा अगदी थोडक्यात निभावेल. तसेही कोरोनाची लक्षणे दिसण्याकरिता जास्तीत जास्त १४ दिवस लागू शकतात असे सांगितलेले असल्याने २१ दिवसात सर्वच्या सर्व कोरोना रुग्ण नक्कीच सापडतील आणि त्यांना एकदा वेगळे केले आणि बरे केले की संकट टळले असे मानण्यास काहीच हरकत नव्हती. त्यामुळे अनेक सामान्य लोकांनी "स्टे होम, स्टे सेफ" चा नारा देत लॉकडाऊनला बर्यापैकी पाठिंबा दिला. पण त्यानंतरही रुग्ण मिळतच राहिले. पुन्हा लॉकडाउन २.० (हा .० का दिला जातो माहीत नाही.. एखाद्या सॉफ्टवेअरच्या मेजर/ मायनर वर्जन असतात म्हणून सॉफ्टवेअर रिलीज करताना २.० वा २.१ , २.२ ई दिले जाते. इथे काय संबंध ? उगाच नक्कल ? की लॉकडाउन ३.० मध्ये पुन्हा नवीन अध्यादेश , सुचना निघाली की - जे रोजच निघत राहते - ते लॉकडाऊन ३.१, ३.२ ई मानावे ? असो.)
तर नवीन रुग्ण मिळत राहिल्याने लॉकडाउन पुन्हा पुन्हा वाढवण्यात आले. आणि "तारीख पे तारीख" च्या खेळामुळे लोकांना अंतिमतः "लॉकडाऊन कधी संपणार" याबद्दल काहीच भरवसा उरला नाही. मग अफवांना उत येवू लागला. कुणी म्हणतोय जून पर्यंत चालेल, कुणी म्हणे जुलै वा ऑगस्ट.. शिवाय नवीन रुग्ण मिळण्याचे प्रमाण कमी होताना दिसत नव्हते. म्हणजे सरकारने आधी सांगितलेले उद्दिष्ट अजून साध्य झाले नव्हते किंबहूना आधीपेक्षा जास्तच कठीण झाले होते. म्हणजेच तार्किकदृष्ट्या उद्दिष्ट सफल होईपर्यंत लॉकडाउन सुरुच राहणार हाच अर्थ कुणीही घेणार ना ?त्यामुळे लोकांचा संयम सुटू लागला , लोक जमेल त्या पद्धतीने गावी निघालेत.
३) याउलट "कोरोनाची साखळी तोडणे वा कोरोनाला हरवणे" हा लॉकडाऊनचा उद्देश न न ठेवता, लॉकडाउनचा उद्देश कोरोनाला तोंड देण्याकरिता सज्ज होणे आणि अशी सज्जता येईपर्यंत फक्त संकटाला फार मोठे होण्यापासून लांबणीवर टाकणे इतकाच ठेवला असता आणि त्याची योग्य आकडेवारीनीशी माहिती दिली असती तर ते अधिक योग्य झाले असते.म्हणजे असे की
"कोरोनाचे संकट आले आहे आणि त्याकरिता वैद्यकीय सुविधा वाढवायच्या आहेत. जसे अमुक इतके हॉस्पिटल्स, अमुक इतक्या व्हेंटिलेटर सुविधा , टेस्टींगच्या अमुक इतक्या सुविधा / केंद्रे निर्माण करायचे आहेत, मास्कची मोठ्याप्रमाणात निर्मिती व वितरण करायचे आहे. तसेच कोरोनाला तोंड देण्यास योग्य असे बदल सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत, सरकारी व खासगी कार्यालयांत करायचे आहे आणि हे सर्व होईपर्यंत कोरोनाचे रुग्ण लाखांत असणे खूप धोकादायक होईल म्हणून जास्तीत जास्त अमूक इतके दिवसांचा लॉकडाउन घेतला जाईल." असे उद्दिष्ट ठेवून , तसेच ते अगदी स्पष्टपणे जनतेपर्यंत पोहोचवले असते, व वेळोवेळी ठरवलेल्या उद्दिष्टांची कितपत पुर्तता झाली याचे आकडे लोकांपर्यंत पोहोचवले असते तर लोकांचा धीर कायम राहिला असता.
४)चुकीच्या पद्धतीने अंमलबजावणी (यात राज्यांचा वा स्थानिक प्रशासनाचाही दोष असेल)- सुरुवातीस सांगण्यात आले की जीवनावश्यक वस्तूंची दुकाने नेहमीप्रमाणे चालू राहतील. आणि खरेच सुरुवातीचे अनेक दिवस किराणा मालची दुकाने नेहमीप्रमाणे चालू असायची. त्यामुळे जेव्हा पाहिजे तेव्हा सामान आणता यायचे. दुकानात गर्दी होत नसे. पण नंतर रेड झोन, कन्टेनमेंट झोन ई ई विभागणी करत दुकानांना वेळा ठरवून देण्यात आल्या. सकाळी १० ते दुपारी २ दुकान चालू. जणू १० ते २ वेळात कोरोना विषाणू झोपलेला असतो काय ?. मग लोक सकाळी १० वाजता दूध वा इतर सामान घेण्यास गर्दी करु लागलेत. संध्याकाळी चपाती ऐवजी ब्रेड खावासा वाटला तर त्याचे नियोजनही सकाळीच करायचे !! आणि म्हणे जीवनावश्यक वस्तूचा पुरवठा सुरळीत राहील.
तसेच व्हॉट्स अॅपवर अनेक आदेशांच्या पीडीएफ प्रति फिरु लागल्यात. केंद्र वा राज्य शासनाशिवाय, जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त, पोलिस आयुक्त इतकेच काय पोलीस स्टेशनच्या पी आय च्या सहीचेही आदेश फिरु लागलेत. कोणी आदेश काढावेत याचा काही धरबंदच उरला नाही.
५) जीवनावश्यक काय काय असू शकते याचेही भान सरकाराना उरले नाही. पाणी जीवनावश्यक आहे ना मग प्लंबिंगचे सामान मिळते ते हार्डवेअरचे दुकान बंद का ? आणि जीवनावश्यक सामान खरेदी करण्याकरिता वा वैद्यकीय कारणांकरिता खाली उतरावे लागते मग तरीही लिफ्ट दुरुस्ती करणार्या तंत्रज्ञांना पोलिसांनी परवानगी नाकारली. तसेच अनेक उत्पादन कंपन्या बंद असल्याने दुरुस्तीकरिता लागणार्या सुट्या भागांची पुरवठा साखळीही विस्कळीत झाली. जीवनावश्यक वस्तुंची वाहतुक वा वैद्यकीय कारणां करिता वाहने रस्त्यावर फिरत आहेत पण मग वाहने दुरुस्त करणारी व्यवसाये बंद ठेवून कसे चालेल ?
वर्क फ्रॉम होम चालू आहे पण इंटरनेटसाठी नवीन सिम, वा मोबाईल घ्यायची वा मोबाईल दुरुस्त करायची वा इतर काही आवश्यक वस्तू घ्यायची गरज पडली तर त्याची सोय नाही
६) सामान्य नागरिकांना विनाकारण त्रास देणे- पोलिस साधे मॉर्निंग वॉकला जाणार्या नागरिकांनाही त्रास देवू लागलेत. कुठे कुणाला उठाबशा काढायला लाव तर कधी त्यांच्या गळ्यात चित्रविचित्र पाट्या अडकवून त्यांचे फोटो /विडिओ प्रसिध्द केले गेले. पण एक दोघे जण , ते ही सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून , मास्क लावून पायी फिरत असतील तर त्याने काय बिघडणार होते ? स्वास्थ्य नीट राखण्याकरिता ते ही गरजेचे आहेच ना ? की लोकांनी मधुमेह, हृदयविकार जडवून घ्यावा ? सगळ्यांनाचा काही घरगुती व्यायाम वा योगासने येत नाहीत ना.
७) या कालावधीचा उपयोग करुन सर्व वाहतूक व्यवस्थामध्ये, वाहतुकीच्या साधनांत (बस , टॅक्सी, ट्रेन ई) वा कार्यालयांत कोरोनासोबत जगण्याकरिता काय आवश्यक बद्दल केले पाहिजेत याच्या सूचना प्रसिद्ध करुन ते बदल करवून घ्यायला हवे होते. पण याबाबत फारशा हालचाली झाल्याच नाहीत ,आता अगदी अलिकडे होवू लागल्यात बहूधा.
८) चार पाच दिवसापुर्वी केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी "कोरोनाच्या संकटासोबत जगण्याच्या कलेचा" उल्लेख केला.. हे खरे तर खूप आधी बोलायला हवे होते पण अगदी लॉकडाउन ३ पर्यंत सरकार "कोरोनाला हरवू, साखळी तोडू.. तुम्ही घरी बसा म्हणजे साखळी तुटलीच समजा" असे स्वप्न बघत होते आणि जनतेलाही दाखवत होते
आणखीही काही मुद्दे असू शकतील. मी मला सभोवतालि जे दिसलेत ते लिहलेत. ग्रामीण , निमशहरी भागातले, मुद्दे वेगळे असतील. अर्थिक मुद्दे, बेकारी , छोटे व्यावसायिक यांचे मुद्दे आणखी वेगळे. या सगळ्यांबद्दल एखादी लेखमाला होवू शकेल.
14 May 2020 - 9:48 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अतिशय मुद्देसुद आणि व्यवस्थित लिहिले आहे. मुळात अजिबात प्लॅनिंग न करता लादलेलं लॉकडाऊन बहुतेक पहिल्या धाग्यापासून आणि लॉकडाऊनपासून हेच सांगत आलोय. आता याही फसलेल्या लॉकडाऊनपासून मजुरांच्या स्थलातंर आणि त्यांच्या जीवघेण्या प्रवास आणि इतर मुद्यांपासून लक्ष विचलित करण्यासाठी पॅकेजचा फॉर्मूला आणला आहे, त्यातही काही नवीन नाही. आता काहीही सांगण्यासारखं आणि सरकारकडे सरकारचं म्हणून ऐकण्यासारखं राहीलेलं नाही हेच खरं आहे. आता लॉकडाऊन ४.०ची वाट पाहणे आहे. नव्या स्वरुपात. (कपाळ मोक्ष करुन घेणारी स्मायली)
-दिलीप बिरुटे
15 May 2020 - 12:59 pm | मराठी कथालेखक
अगदी मार्मिक.
सरकारकडे खर्या अर्थाने जमिनीवरील परिस्थिती समजून घेवून आणि सांख्यिकी, वैद्यकशास्त्र, समाजशास्त्र , अर्थशास्त्र, व्यवसाय ई विषयातील तज्ञ असून त्यांनी एकत्रितपणे काम करणे अपेक्षित आहे , पण अशा तज्ञांची टीम सरकारकडे आहे का किंवा असली तरी त्यांनी दिलेल्या सल्ल्यांची सरकाराकडे किंमत आहे की नाही याची शंका यावी अशी परिस्थिती आहे. IAS दर्जाचा अधिकारी (त्यातही मर्जीतला असलेला) म्हणजे सर्वज्ञ असा तर सरकारचा समज नाही ना ?
15 May 2020 - 1:27 am | गामा पैलवान
मराठी कथालेखक,
सोशल डिस्टन्सिंग वगळता तुमच्या प्रत्येक मुद्द्याशी सहमत आहे.
सुरक्षित अंतराची धडधाकट माणसाला जरुरी नाही. जे करोनाचे पीडित आहेत त्यांना विलग करून ठेवावं म्हणजे इतरांना सुरक्षित अंतर पाळायची गरज उरणार नाही.
आ.न.,
-गा.पै.
18 May 2020 - 10:05 am | सोन्या बागलाणकर
हीच तर मेख आहे कोरोनाची. तुम्हाला कसे कळणार कोण कोरोनाचे रुग्ण आहेत ते? asymptomatic रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणं नसूनही ते कोरोना पसरवू शकतात. याचाच अर्थ जोपर्यंत १००% लोकांची तपासणी होत नाही तोपर्यंत कोण रुग्ण आणि कोण नाही हे कळणे अशक्य आहे. आता भारतासारख्या देशात १००% चाचणी कितपत शक्य आहे?
बरं असं समजू कि सगळ्यांची चाचणी झाली आणि कळलं कि साधारण ९०,००० लोक कोरोनापीडित आहेत. या लोकांना कुठे वेगळं ठेवणार? का यांच्यासाठी निर्वासित लोकांसाठी असतात तश्या छावण्या उभारणार?
18 May 2020 - 5:10 pm | गामा पैलवान
सोन्या बागलाणकर,
करोनाचे रुग्ण म्हणजे नेमकं काय? करोना अंगात असणे, त्यामुळे बाधित असणे, त्याची सौम्य लक्षणं दिसणे, ती लक्षणं तीव्र बनणे आणि त्यांच्यापायी मृत्यू होणे या पाच स्वतंत्र बाबी आहेत. तर करोनाचा रुग्ण म्हणजे ज्याला करोनाचा त्रास होतो आहे अशी व्यक्ती. सरसकट सगळ्यांची चाचणी करायची नाहीये.
कारण की, जर सगळ्यांची चाचणी केली तर करोनासोबत त्याच जातीचे चरोना, फरोना, मरोना, गरोना, ढरोना, टरोना, हेही विषाणू सापडतील. मग प्रत्येक मनुष्यास इतरांपासनं विलग करून ठेवावं लागेल. तेही अमर्याद काळासाठी. कारण की हे विषाणू सतत माणसाच्या शरीरात वास करून राहणारे आहेत.
माझा आक्षेप केवळ सरसकट टाळेबंदीसच आहे. बाकी कशासही नाही. टाळेबंदी हे महाथोतांड तगवण्यासाठी करोना नावाची बेडकी प्रमाणाबाहेर फुगवण्यात येते आहे. तर ही फुगवलेली बेडकी हे थोतांड आहे. नैसर्गिक स्थितीतली बेडकी हे थोतांड नव्हे, ती सत्यांश आहे.
आ.न.,
-गा.पै.
15 May 2020 - 5:01 am | चौकस२१२
मराठी कथालेखक
आपण मांडलेले मुद्दे योग्य आहेत शंका नाही पण काही मुद्दे मात्र खटकले
-साधे मॉर्निंग वॉकला जाणार्या नागरिकांनाही त्रास देवू लागलेत"
अहो जर घरबंदी आहे तर असे बाहेर जाण्याचा प्रश येतो कुठे ?
-संध्याकाळी चपाती ऐवजी ब्रेड खावासा वाटला तर त्याचे नियोजनही सकाळीच करायचे !
नका खाऊ मग .. भागवा कि चपाती त , हा कसला हट्ट
-ठरवलेल्या उद्दिष्टांची कितपत पुर्तता झाली याचे आकडे लोकांपर्यंत पोहोचवले असते
यासाठी जनतेची पण मदत लागते ना.. डेटा गोळा कार्याला गेलं (रेल्वे ऍप) तर लगेच मानव अधिकार वाले बोंब मारणार )
-पण ५५० वरुन ७८ हजारांवर केसेस मिळाल्यात मग साखळी तोडण्याचे उद्दिष्ट पुर्ण झाले का ?
अहो एवढया मोठया देशात आणि इतरांत हि जर आलेख पाहिलात तर सुरवातीला अशीच वाढ होत होती // खाली फ्लॅटनिंग कर्व बद्दल चे वाचा. तुम्ही मधेच असा आलेख थांबवला तर चित्र वाईट दिसणारच
-जास्तीत जास्त १४ दिवस लागू शकतात असे सांगितलेले असल्याने २१ दिवसात सर्वच्या सर्व कोरोना रुग्ण नक्कीच सापडतील आणि त्यांना एकदा वेगळे केले आणि बरे केले की संकट टळले असे मानण्यास काहीच हरकत नव्हती
हि तुमची समजूत..जगातील इतर सरकार असे कोणीच म्हणते नव्हेत किंवा समजत नवहते .. येथेही सरकारने ४ आठवडे बंदी घोषित केली तेव्हा असे ना सरकार म्हणले कि ४ आठवड्यात हे संपणार आहे ना जनतेने तसे मानले.. " प्रयत्नांत पहिला भाग " असेच सगळे बघत आहेत
सरकार कडे काय जादूची कांडी आहे का? काय वाटेल त्या अपेक्षा आणि समजूत ठेव्याची आणि मग खडे फोडायचे
या जगभरच्या अतिशय अवघड परिस्थिती सध्या भारतात आणि अमेरिकेतील काही राज्यात या सर्व बांधांना जो सरसकट विरोध चालू दिसतोय त्यात हे सर्व टीकाकार फक्त प्रश्न उभे करीत आहेत उत्तरे त्यांचं कडेही नाहीत आणि काहीजण तर केवळ विरोधाला विरोध करीत आहेत , (जणू काही दुसऱ्या पक्षाचे सरकार असते तर सगळे २१ दिवसात आलबेल झाले असते )
काही मुद्दे पूर्ण विसरले जात आहेत
- अंतर ठेवून रोगाचा प्रादुर्भाव कमी करता येईल / पसरण्याचा वेग कमी करता येईल ( फ्लॅटनानिंग द कर्व)
- हे केल्याने आरोग्य व्यस्थेला एकदम ताण येणार नाही
- हे करीत असतं पूर्णतः व्यवस्थवार अघोरी परिणाम होणार हे सगळ्यानं माहित होते कोणाला माहित नवहते असे नाही
- यौद्धात जसा सेनापती रचना करतांना आपले कमीत क्कमी सैनिक आणि साधन मारले जातील असे नियोजन करण्याचा प्रयत्न करतो असेच आहे हा ( निर्दय वाटेल पण करणार काय?
- नियंत्रण करताना इंग्लड आणि अमेरिकेसारखी यंत्रणा पण कमी पडली तर भारतासारख्या अजस्त्र देशात ते किती अवघड आहे याचा विचार करा
सोशल डिस्टंसिन्ग वैगरे उपायांचा इतर देशात निश्चितच फायदा झाला आहे आणि ते करताना कधी चुका हि झाल्या आहेत , सगळेच जण शिकत आहेत
त्यामुळे या उद्या सगळ्यांनी साथ देऊन लढणे क्रमप्राप्त आहे , मिळाली संधी कि कर टीका हे उबग आणताय ..
पण असलं काही घडणार नाही असा दिसतंय .. याचा राजकारण , स्वार्थकारण चालणार
आता पुढील घोषणांची वाट पाहतोय..
- हि जमावबंदी / घरबंदी केलीच नसती तर काय फरक पडला नास्ता , यात सी आय ए / आय एम एफ चा हात असणार , विकसित देशांची आर्थिक व्यस्था दुबळी करणे हा हेतू वैगरे )
- बारामती जाणते राजे असते तर यांनी हे सगळं घडूच दिला नसते
- हा संघाचा डाव आहे ..(हाःहाःहा )
असो .. तर मी असे म्हणत नाही कि सरकारचे काहीच चुकले नाही .. नियोजन चुकले असणारच काही ठिकाणी ( जे तुम्ही काही मुद्यातून दाखवले आहेत )
यावरून अजून एक आठवले: इतिहासाची नोंद करण्याची इन्वेस्टिगेटिव्ह जर्नालिसम प्रथा ( म्हणजे गंभीर सनसनाटी नाही ) भारतात फारशी नसल्याने या काळात सरकारी/ विरोधी/ आणि शासकीय अधिकारी यांनी काय काय केले त्यावर काही माहितीपट यायची शक्यता दिसत नाही... इतर देशात असे माहितीपट बनवणे चालूही झाले/ जेणेकरून जनतेला काय घडले कसे घडले याचं दोन्ही बाजू दिसू शकतील..
15 May 2020 - 2:59 pm | मराठी कथालेखक
चौकसजी ,
धन्यवाद.
तुमच्या प्रतिसादातल्या सर्वात महत्वाच्या मुद्द्यावर मी आधी येतो.
बाकीच्यांचे माहित नाही पण माझी तरी अशी भूमिका नक्कीच नाही. आणि इथे मी चुकीच्या धोरण व निर्णयांचा विरोध करत आहे. सरकार कोणत्या प़़क्षाचे त्याला महत्व नाही. तसेही राज्यात व केंद्रात वेगवेगळे पक्ष आहेत पण माझा दोन्हींना समान विरोध आहे.
आता काही मुद्दे (सर्वच मुद्द्यांवर आता लिहिणं वेळेअभावी शक्य होणार नाही)
याबद्दल मी आधीच म्हंटलं आहे. पुन्हा तेच लिहितो. स्वास्थ्य नीट राखण्याकरिता ते ही गरजेचे आहेच ना ? की लोकांनी मधुमेह, हृदयविकार जडवून घ्यावा ? सगळ्यांनाचा काही घरगुती व्यायाम वा योगासने येत नाहीत ना.
कुणी काय खावे हे पण सरकारने ठरवावे का ? (चित्रपटगृह किंवा बगीचे चालू करा असा हट्ट कुणी करत नाहीये , पण अन्न ही प्राथमिक गरज आहे ना )बर ते पण एक दोन दिवस नाही. आमच्याकडे जवळपास महिनाभरापासून दुकानांना वेळ ठरवून दिली आहे. सध्या फक्त १० ते १२. मग या वेळेत जास्त गर्दी होते आणि सोशल डिस्टन्सींग धोक्यात येते त्याचे काय ?
हो ना. पण मग लॉकडाउनचे नेमके उद्दिष्ट काय होते ? तुमच्या मते काय होते ते तुम्ही सांगा मग पुढची चर्चा करता येईल.
लॉकडाऊन नकोच असे मी म्हणत नाही पण मग लॉकडाऊन "का (नेमके उद्दिष्ट), किती (किती दिवसांकरिता) व कसे (नेमक्या कोणत्या गोष्टींना परवानगी द्यायची व कोणत्या गोष्टींना नाही, आवश्यक गोष्टींकरिता पर्यायी वितरण व्यवस्था काय ? - "उगाच मिळेल ते खा" असा पवित्रा योग्य नाही) हे लॉकडाऊन चालू करण्यापुर्वीच स्पष्ट करायला हवे होते, त्यातही किती दिवस हा सर्वात कळीचा मुद्दा. आधी सांगितल्याप्रमाणे इथे "तारीख पे तारीख" चा खेळ नडला आणि अराजकसदृश परिस्थिती निर्माण झाली.
15 May 2020 - 5:04 pm | चौकस२१२
मराठी कथालेखक
सर्वप्रथम अगदी मुद्याला ला मुदा स्पष्ट मत मांडलेत त्यामुळे चांगले वाटले
१) इथे मी चुकीच्या धोरण व निर्णयांचा विरोध करत आहे..
भावना पोचल्या फक्त हा विरोध करितां काही जण ( कदाचित तुम्ही नसाल) एक नकारात्मक सूर लावतात त्या मुले जरा उद्वेगाने मी लिहिले
२) सगळ्यांनाचा काही घरगुती व्यायाम वा योगासने येत नाहीत ना.
हो पण घरातल्या घरात चालत येते .. निदान साधारण मध्यमवर्गीयाला तरी ,, अगदी छोट्या घरातील माणसांना त्रास आहे हे खार येआहे पण मग सगळ्यांनाच बाहेर पडायची परवानगी दिली तर एकतर अंतर पाळणार नाहीत किंवा पाळण्याची इच्छा असली तरी जग असेल का , आणि दुसरे कोणाला आणि कोणत्याकारणासाठी बाहेर परवानगी द्यायची हे हि एक कोडे म्हणजे एकूणच प्रशासनाची पंचाईत नाही का?
३)कुणी काय खावे हे पण सरकारने ठरवावे का ? अहो तसं कोण म्हणताय
मी जेव्हा म्हणले कि "भागवा कि चपाती त " या मागे हेतू हा होता कि अडचणीचं परिस्थिती जुळवून घ्या किदोन्ही वेळा लागली चपाती खायला तर काय बिघडल? .. त्यामुळे तुम्ही जे म्हणालात कि "संध्याकाळी चपाती ऐवजी ब्रेड खावासा वाटला तर त्याचे नियोजनही सकाळीच करायचे !" हे जरा समाजाचं लाडवलेलीपणाचे वाटले... मी उयेथील उदाहरण देतो... किरण मालाची दुकाने इथे बंद झाली नवहती आणि ताजा भाजी पाला मिळताच होता पण धोका कमी करण्यासाठी आम्ही थोडे दिवस ताज्याऐवजी फ्रोझन भाजी खायची ठरवली नाही मिळाली २० दिवस अगदी ताजी तर काय आकाश कोसळत नवहते ... हा साधं वसिहर
४)लॉकडाउनचे नेमके उद्दिष्ट काय होते "का (नेमके उद्दिष्ट),
सांगतो ( यात मी तद्न्य नाही पण या देशात ज्या सुसूत्रित पद्धतीने या प्रश्नाचा विचार . अभयास आणि टीका केली जात आहे आणि इतर देशातील बातमय सनसनाटी ना करीत त्याचे दाखले दिले जात आहेत त्या अनुभवावरून मांडतो)
रोगावर लस यायला आणि उपाय सापडायला वेळ लागणार हे कल्यामुळे प्रशासनाला दोन तीन गोष्टी कराव्या लागलाय
- प्रसार थांबवण्यासाठी बाहेरील देशातून येणाऱ्यांना थांबवणे ( येथे प्रथम चीन मग इराण, इटली आणि नंतर अमेरिका आणि मग सर्वच देशातून येणार्यांन्वर बंदी आणली )
- स्थानिक प्रसार कमी करणे कि जेणेकरून जो काही प्रसार होणार आहे तो हळू वेगाने तरी होईल ( आलेख सपाट करणे ) आणि त्यामुळे आहे त्या वैद्यकीय सेवांना ताण सहन करत येईल... हाच सर्वात मोठा मुद्दा आहे .
अर्थात याचे पूर्वनियोजन अनेक देशात हुकले अगदी इंग्लड आणि अमेरिकेत सुद्धा आणि भारतात पण.. अहो पण जरा विचार करा कि केवढा मोठा प्रश्न आहे .. लोक जेवहा भांडी का वाजवली असले फुकाचे वाद घालतात तेव्हा काय म्हणायचे? आज माझ्य देशात जगातील सर्वात उत्तम प्रकारे हे हाताळले जातंय , तिथे सुद्धा लोकांनी एका सकाळी दिवे लावले (अँझाक दिवस ) त्यावर लोंकानी असले फुकंचे वाद घातले नाहीत असो यावर बरीच चर्चा झाली आहे
किती (किती दिवसांकरिता)
हे ब्रह्मदेवाचं बापाला तरी जमले असत का हो? सांगायला
सर्वच टप्य्याटप्य्याने झाले आणि आता टप्याय टप्य्या ने परत सुरळीत पणा कसा आणायचा यांच्यात सर्व सरकारे कामात आहेत , घोळ झाले ना ..इथे सुद्धा काही हास्यास्पद निर्णय घेतले गेले आणि घोळ भारतासारखाय देशात तर ना झाले तर नवलच ..
त्यामुळे "किती" याला कोण उत्तर denar.
कसे (नेमक्या कोणत्या गोष्टींना परवानगी द्यायची व कोणत्या गोष्टींना नाही,
प्रथम स्वास्थ्य , आणि ते टिकवण्यासाठी सगळे आणि हळू हळू अर्थ व्यस्था हे समीकरण सगळे जण वापरायचा प्रयत्न करीत आहेत
"तारीख पे तारीख":
हे काय कोणी मुद्डमून केलाय का? आपण जगातील कोणत्याही राष्ट्राध्यक्षच्या जागी असतो तर काय केला असता याचाच पण टिक करण्याआधी विचार करावं मी तर विचार करण्याआधी एक दाभण आणि सुतळी घेऊन बसलो ..
असो चेष्टा सोडून देऊ
टीका आणि मूल्यमापन हे सर्वच करणार.. पण त्यात प्रत्येक प्रश्न कसा सहज सोडवता आलं असता असा विचार करू नये हीच विनंती
दुर्दैवाने जनता लागेचच त्याचे राजकारण करावयाचे मग तो भारतातील मोदी विरोध असो किंवा अमेरिकेतील ट्रम्प यांचा आंधळे पणा असो ( च्यामारी ह्या कारोंना ने मला ( म्हणजे ट्रम्पला ) ला समाजवादी बनवले कि काय? म्हणुत ट्रम्प तात्या डोकं धरून बसलेला दिसतोय अन मग काहीही बरळतोय..असो
काळजी घ्या ..
15 May 2020 - 6:11 pm | मराठी कथालेखक
लाडावलेपणा कसला ? अन्न ही प्राथमिक गरज आहे. आणि आम्ही आमच्या पैशांनीच विकत घेतोय काय सरकारला फुकट द्यायला नाही सांगत.
तुम्ही काय खायचे तो तुमचा प्रश्न आहे. आणि इतरांनी काय खावे हा त्यांचा प्रश्न आहे.
पण त्यामुळे अनिश्चितता वाढली, अनेक लोक (खासकरुन मजूर) मिळेल त्या प्रकारे प्रवासाला निघालेत.
जर हे उद्दिष्ट असेल तर ते अजून साध्य झालेलं नाहीच. उलट आणखी दूर गेलंय. आधी म्हणजे मार्चमध्ये रोज रुगण सापडण्याचे प्रमाण दोन वा तीन अंकी आकड्यात होते ते आता चार अंकी झाले. मग जर हे उद्दिष्ट साध्य होईपर्यंत लॉकडाऊन चालू ठेवायचे असेल तर कदाचित आणखी सहा महिनेही लॉकडाऊन ठेवावे लागेल. जमणार आहे का ते ?
म्हणजेच जे उद्दिष्ट ठरवले वा सांगितले गेले ते चुकीचे होते.
मी आधी सांगितल्याप्रमाणे वैद्यकीय सुविधा वाढवणे आणि कोरोनाच्या संकटास तोंड देण्याकरिता सज्ज होणे हे उद्दिष्ट असायला हवे होते.
आपण नेहमी अपयशी लोकांचेच दाखले द्यायला हवे असे नाही. द. कोरिया, तैवान यांकडेही बघता येईल. आता तुम्ही म्हणत असाल की ते देश लहान आहेत आणि भारत मोठा आहे तर त्या म्हणण्याला काही अर्थ नाही. देश मोठा असला तर त्याच्या यंत्राणाही त्याच प्रमाणात मोठ्या असणार ना.
16 May 2020 - 11:40 am | चौकस२१२
हे जरा समाजाचं लाडवलेलीपणाचे वाटले
लाडावलेपणा कसला ? अन्न ही प्राथमिक गरज आहे. आणि आम्ही आमच्या पैशांनीच विकत घेतोय काय सरकारला फुकट द्यायला नाही सांगत.
अहो तुम्हाला एक साधा मुद्दा कळत नाही का .. रोज ताजे नसेल मिळत किंवा एक वेळा पाव आणि एक वेळा चपाती नसेल जमत आणि आणीबाणी ची परिस्थिती असेल तर आहे त्यात सामावून घेणे हा साधा समाज नियम आहे त्यात सरकार काय सक्ती करताय..?
फोरझन भाजी चे उदाहरण णहणून दिले फक्त माहित आहे कि भारतात रोज ताजी भाजी खायची सवय आहे आणि ते चांगलेच आहे पण अश्या परिस्थिती जर नाही खाता आली तर काय एवढा आकाश कोसळला का?
18 May 2020 - 5:34 pm | मराठी कथालेखक
कसली आणीबाणी ? सरकार म्हणतंय म्हणून केवळ विश्वास ठेवायचा आणि म्हणायचं आणीबाणी ?
आणि कोरोनाचा धोका आणखी कित्येक महिने राहिल मग काय कित्येक महिने आणीबाणी आहे असं म्हणतच जगायचं ?
.
14 May 2020 - 9:23 pm | ऋतुराज चित्रे
अगदी मुद्देसूद लिहिले आहे . आता तुम्हाला एकच प्रश्न विचारला जाईल, सरकारला स्वप्न पडले होते का असे काही घडेल ह्याचे?
14 May 2020 - 10:21 pm | Prajakta२१
पण सोशल वा फिजिकल डिस्टन्सिंग पाळावे असे मात्र मला वाटते. कारण जर एक दीड मिटरचे अंतर ठेवून आणि मास्क लावून जर रोगापासून दूर राहता येणे शक्य असेल तर रहावे. आणि त्याकरिता फार काही खर्च वा मेहनतही नाही.>>>>>>>>>>>>>> कोणीच हे पळत नाहीये म्हणून lockdown
<<<<<<जीवनावश्यक काय काय असू शकते याचेही भान सरकाराना उरले नाही. पाणी जीवनावश्यक आहे ना मग प्लंबिंगचे सामान मिळते ते हार्डवेअरचे दुकान बंद का ? आणि जीवनावश्यक सामान खरेदी करण्याकरिता वा वैद्यकीय कारणांकरिता खाली उतरावे लागते मग तरीही लिफ्ट दुरुस्ती करणार्या तंत्रज्ञांना पोलिसांनी परवानगी नाकारली. तसेच अनेक उत्पादन कंपन्या बंद असल्याने दुरुस्तीकरिता लागणार्या सुट्या भागांची पुरवठा साखळीही विस्कळीत झाली. जीवनावश्यक वस्तुंची वाहतुक वा वैद्यकीय कारणां करिता वाहने रस्त्यावर फिरत आहेत पण मग वाहने दुरुस्त करणारी व्यवसाये बंद ठेवून कसे चालेल ?
वर्क फ्रॉम होम चालू आहे पण इंटरनेटसाठी नवीन सिम, वा मोबाईल घ्यायची वा मोबाईल दुरुस्त करायची वा इतर काही आवश्यक वस्तू घ्यायची गरज पडली तर त्याची सोय नाही>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>सहमत
आत्ता कशातच काही अर्थ वाटत नाहीये सरकारने ज्याला त्याला नशिबावर आणि रामभरोसे सोडून द्यावे सरळ
एवढे lockdown करून सुद्धा रुग्ण वाढत आहेत नियम न पाळणाऱ्या लोकांमुळे
त्याच्यापेक्षा Lockdown उठवून ज्याला त्याला त्याच्या नशिबावर सोडून द्यावे
15 May 2020 - 6:17 pm | मराठी कथालेखक
हे सगळ्यांसाठी पुर्णतः नवीन होतं. त्यामुळे काल सांगितलं आणि आज पाळलं जाईल असं नसतं. त्यातून त्यात सरकारी सूचनांत घोळ होता. मार्चच्या किमान २० तारखेपर्यंत तरी म्हणत होते की सगळ्यांनी मास्क लावणे गरजेचे नाही.
आणि कोणीच पाळत नाही असे नाही. पण लोकसंख्येच्या प्रमाणानुसार दहा हजार लोकसंख्या असलेल्या भागात (शहरी भागतला एक रस्ता ज्याच्या दुतर्फा काही १०-१२ मजली निवासी इमारती आहेत त्या भागाची लोकसंख्या सहज दहा हजार असू शकेल) जर २% लोकांनी नियम पाळला नाही तरी ते २०० लोक होतील.
15 May 2020 - 7:10 pm | सुबोध खरे
एवढे lockdown करून सुद्धा रुग्ण वाढत आहेत नियम न पाळणाऱ्या लोकांमुळे
त्याच्यापेक्षा Lockdown उठवून ज्याला त्याला त्याच्या नशिबावर सोडून द्यावे
लोकांच्या बेशिस्तपणा मुळे आपल्याला वैफल्य येते.
हा प्रतिसाद त्या वैफल्यातून आला आहे असेच मी समजतो आणि तो बरोबरही आहे.
यासाठी अध्यात्म फार महत्त्वाचे ठरते. "कर्मण्येवाधीकारस्ते मा फलेषु कदाचन "
असे लोक आजारी पडून वैद्यकीय सेवेसाठी आले तर वैद्यकीय सेवकांनी काय करायचं?
त्यांच्यावर उपचार करायचा कि रस्त्यावर मरायला सोडून द्यायचे?
उपचार करणार नाही हे म्हणणे शक्य नाही.
मग अशांच्या मुळे आरोग्य कर्मचारी आजारी पडले तर त्यांनी काय करायचं?
मी एक दिवस सोडला तर पूर्ण २ महिने माझा दवाखाना चालू ठेवला आहे. मी हा धोका पत्करायला तयार आहे.
पण माझे वृद्ध आई वडील (८४ आणि ७८ वय) त्यांना मधुमेह रक्तदाब आहे. वडिलांना फुफुसाचा आजार आहे आई कर्करोगातून बाहेर आली तरी अनेक तर्हेच्या जंतुसंसर्गातून अजून पूर्ण बाहेर आलेली नाही. तिला रोज इंजेक्शन द्यायला जावे लागते. त्यांना माझ्यामुळे हा रोग झाला तर?
तशीच स्थिती माझी स्वागत सहाय्यिका हिची आहे तिची आई पण ७५ वर्षाची आहे.
माझ्या धाडसाची किंमत तिने किंवा तिच्या कुटुंबाने मोजावी का?
माझ्याजवळ याचे उत्तर नाही.
माझ्याजवळ मला आयुष्याला पुरेल एवढा पैसा नक्की आहे
किंवा आजही वैद्यकीय व्यवसाय सोडून देउन मला वैद्यकीय प्रवेश परीक्षेच्या क्लास मध्ये शिकवणे सहज शक्य आहे जेथे रुग्णांशी संपर्क येणार नाही.
तेथे मला सहा आकडी पगार मिळेल. ( कारण माझ्याकडे सज्जड अशा संस्थेतील द्विपदवी आहे आणिहे काम मी अगोदर केलेलले आहे तेंव्हा मला चांगले शिकवता हि येते)
परंतु व्यवसाय सोडून ते करायचे ठरवले तरी मी आता या जागतिक साथीत पळून जाणार नाही एवढे नक्की.
शेवटी माणसाला वैफल्य येते. बेजबाबदार लोकांच्या बेशिस्तपणाची चीडहि येते
म्हणून आपले कर्म सोडून जाणे हे बरोबर नाही.
16 May 2020 - 1:15 pm | चौकस२१२
म्हणून आपले कर्म सोडून जाणे हे बरोबर नाही.
अगदी बरोबर बोललात डॉक्टर साहेब...आणि त्या कर्माचा एक भाग म्हणजे "फुकाची टीका ना करणे" जगात जे प्रश्न आहेत ते भारतात आहेत, काही जास्त काही कमी ..सगळ्यांनाच तोंड द्ययचंय
16 May 2020 - 8:38 pm | Prajakta२१
आपल्या मार्गदर्शनाबद्दल खूप धन्यवाद
खूप धन्यवाद आणि शुभेच्छा
16 May 2020 - 8:39 pm | Prajakta२१
आपल्या मार्गदर्शनाबद्दल खूप धन्यवाद
खूप धन्यवाद आणि शुभेच्छा
15 May 2020 - 2:37 am | नेत्रेश
> "सुरक्षित अंतराची धडधाकट माणसाला जरुरी नाही."
प्रॉब्लेम असा आहे की धडधाकट माणुस हा कॅरीयर असु शकतो, व तो हा विषाणु शेकडो माणसांपर्यंत पसरउ शकतो.
असा कॅरीयर सहजा सहजी ओळखु येत नसल्यामुळे सर्वांनीच सुरक्षित अंतर पाळण्याची गरज निर्माण झाली आहे.
अमेरीकेत सुरवातीपासुन सोशल डीस्टंसींग कंपल्सरी नसल्यामुळे आहे ८५ हजार लोक करोना होउन मेले आहेत. (यात ईतर कारणांमुळे मेलेल्या लोकांचा सामावेश नाही). अजुनही इकडे सोशल डीस्टंसींग न पाळणार्याला काही शिक्षा वगैरे नाही, त्या मुळे हा आकडा वाढतच जाणार.
सप्टेंबर पर्यंत ईकडे साधारण दीड ते दोन लाख लोक करोनाने मरायची शक्यता आहे. त्यामानाने भारतात बरीच चांगली परीस्थिती दीसते.
15 May 2020 - 5:07 pm | चौकस२१२
नेत्रेश.. सहम्त
15 May 2020 - 7:03 pm | यश राज
नेत्रेश सहमत ...
सो.डि महत्वाचे आहेच. आदयावत सुविधा आणि कमी लोकसंख्या असुनही इकडे ईंग्लंडात ज्या तर्हेने कोरोना फैलावलाय त्या द्रुष्टीने भारतात सरकारने खुप अगोदर काळजी घ्यायला सुरुवात केली. विचार करा जर भारताने लॉकडाऊन उशीरा जाहीर केला असता तर सध्या जी लोकं सरकारच्या नावाने आता ठणाठणा करत आहेत त्याच लोकांनी परत सरकारला उशीरा लॉकडाऊन जाहीर करण्याबद्द्ल शिव्या घालायला कमी जास्त केले नसते.
15 May 2020 - 5:39 pm | गामा पैलवान
नेत्रेश,
ते ८५००० करोनामुळे मेलेले आहेत हे कशावरून? ते करोना अंगात असतांना मेले आहेत. करोनामुळेच मेलेत हे कोणी ठरवलं? उगीच कोणीही मेला तर तो करोनामुळे असे छाप मारले गेले आहेत.
या मृत्यूंत करोनाचं योगदान नगण्य आहे.
आ.न.,
-गा.पै.
16 May 2020 - 7:12 am | नेत्रेश
ते मेलेले सर्वच्या सर्व करोना पॉझिटीव्ह होते.
मी काही डॉक्टर नाही, पण मला समजलेले ईथे मांडतो:
प्रत्येक माणुस वेगळा, त्याची प्रतिकारशक्ती वेगळी, शरीराची बाह्य गोष्टींना प्रतीकार करण्याची पद्धत वेगळी - त्यामुळे एखाद्याला काही गोष्टींची अॅलर्जी असते, काहींना नसते.
करोनाला प्रत्येकाचे शरीर थोडा वेगळा प्रतिसाद देते. साधारण ५०% लोकांना फारसा त्रास होत नाही, ४०% लोकांना जाणवण्या ईतपत त्रास होतो, पण १०% लोकांना टोकाचा त्रास होतो. त्यांचे शरीर खुप ऑव्हर रीआक्ट करते. आणी शरीराची प्रतिकारशक्तीच शरीरातील पेशींचा नाश करते. अशा प्रकारामुळे हॉस्पिटलमध्ये मेलेले लोक ओळखणे सहज शक्य आहे. आणी ते मृत्यु करोनामुळे झाले असे गणले जाते.
करोनामुळे मेलेल्या लोकांमध्ये बाकी काही त्रास नसलेल्या निरोगी व्यक्ती, बालके, आणी व्याधीग्रस्त असे सर्व लोक येतात. करोना होउन विशेष त्रास न होता बरे झालेल्या बालकांमध्ये नंतर दुसर्या प्रकारचे (आधी न आढळलेले) रोगही दीसु लागले आहेत. त्यांचे प्रमाण कमी आहे.
त्यामुळे सर्वांच्या सुरक्षेसाठी करोनाला दुर ठेवणे चांगले - अगदी आपले स्वतःचे शरीर करोनाला सहज हरऊ शकेल असा आत्मविश्वास असला तरीही!
टिपः अत्ताचा अमेरीकेतला करोनाने झालेल्या मृत्युचा आकडा 88,507 असुन जगभरात 3,08,610 लोक करोनाने मेले आहेत.
16 May 2020 - 9:42 am | चौकटराजा
पण १०% लोकांना टोकाचा त्रास होतो. त्यांचे शरीर खुप ऑव्हर रीआक्ट करते. आणी शरीराची प्रतिकारशक्तीच शरीरातील पेशींचा नाश करते. आटो इम्युनिटी व बाह्य लागण या दोन्ही गोष्टी माझ्या वाचनानुसार एकमेकाशी सम्बन्धित नाहीत. अक्वायर्ड व कॉन्स्टीटुशनल असे आघाताचे दोन प्रकार असतात असे मी वाचलेय .तुम्ही हे विधान कसे केले ? त्याचा एखादा सन्दर्भ दिला तर बरे होईल. एरवी मिपावर चे डॉ मन्डळी यावर अधिक प्रकाश टाकू शकतीलच !
16 May 2020 - 12:25 pm | नेत्रेश
https://www.bbc.com/news/health-51214864
थोडे स्क्रोल डाउन करा -
Severe disease
If the disease progresses it will be due to the immune system overreacting to the virus.
Those chemical signals to the rest of the body cause inflammation, but this needs to be delicately balanced. Too much inflammation can cause collateral damage throughout the body.
"The virus is triggering an imbalance in the immune response, there's too much inflammation, how it is doing this we don't know," said Dr Nathalie MacDermott, from King's College London.
16 May 2020 - 1:20 pm | नेत्रेश
आमचा डॉक्टर म्हणतो की तु लो रीस्क आहे, कदाचित करोना झाला तरी फार त्रास होणार नाही. पण तो पसरवण्याला नक्की हातभार लावशील. तेव्हा गप्प घरी बस.
16 May 2020 - 2:28 pm | चौकटराजा
धन्यवाद ! बघतो वाचून !
16 May 2020 - 11:32 am | चौकस२१२
ओहोहो ट्रम्प तात्या नंतर असले शोध लावणारे आपणच
16 May 2020 - 1:18 pm | चौकस२१२
माझे वरील विधान जी लोक "या मृत्यूंत करोनाचं योगदान नगण्य आहे"
अशी उचलली जीभ लावली टाळ्याला करीत आहेत त्यानं उद्देशून होते . नेत्रेश यांनी उद्देशून नाही ( खुलासा )
15 May 2020 - 6:17 pm | गामा पैलवान
लोकहो,
मोदींची बिल गेट्स सोबत चर्चा : https://www.loksatta.com/desh-videsh-news/pm-narendra-modi-video-confere...
चर्चा करायला बिल गेट्स काय थोर माणूस लागून गेलाय? हा फ्लंकी इसम आहे. पोलीयोच्या लशीकरणाच्या कार्यक्रमातनं अनुचित प्रभावाच्या शंकेपायी याच्या विश्वस्तनिधीस बाहेर काढलेलं ना मोदी सरकारने? मग आता नेमकी काय जादू झाली की मोदींना याच्याशी परत चर्चा करावीशी वाटते?
गेट्स फाऊंडेशनचे व्यवहार भ्रष्टाचाराने बरबटलेले आहेत.
हा करोनाचा भारतावर झालेला एक महाभयंकर साईड इफेक्ट आहे.
आ.न.,
-गा.पै.
15 May 2020 - 6:55 pm | सुबोध खरे
हि १५ एप्रिलची स्थिती होती.
https://www.thehindu.com/news/national/coronavirus-without-lockdown-india-would-have-seen-over-8-lakh-cases-by-april-15-says-health-ministry/article31319364.ece
Where India stands (१ मे)
India has a population of 1.3 billion and a death rate of about 7 per thousand per year, as of 2019. This means that each day, on average, about 26,000 people die in India. As of last week, roughly 60 people a day are believed to be dying of Covid-19. Unless this number is off by two orders of magnitude, the new virus has not yet significantly altered mortality in India. Indeed, during the lockdown, net mortality appears to have gone down due to the decline in accidents.
https://theprint.in/opinion/can-india-risk-a-controlled-epidemic-after-l...
retrospectively every one is wise and right
15 May 2020 - 9:01 pm | स्मिता.
संचारबंदी आणि टाळेबंदीमुळे अनेकांचे दैनंदिन व्यवहार, रोजगार बंद पडले आहेत. हातावर पोट असणार्यांना हालाखीचे दिवस आले आहेत. हे पाहून हळहळ वाटतेच. काही देशांत सरकारतर्फे मासिक पगाराच्या ८०% भत्ता मिळतोय तसं त्यांनाही मिळावं असं एक वाटतं पण लगेच जाणीव होते की सरकारने मदत दिली तरी आपल्याकडचे 'बाबू' लोकच त्यांच्या घशात घालतील. गरीब बिचारा भुकेलाच राहील.
हे सगळं खरं असलं तरी सुस्थितीतल्या मध्यमवर्गीय आणि घरून काम चालू असणार्या लोकांना घरात अडकून रहायला लागल्याने ते वैतागले आहेत. दर आठवड्याला कुटुंब/मित्रमैत्रिणींसोबत भेटणे, फिरणे बंद झाल्याने लोक उदास झाले आहेत. तसेच संचारबंदी कधी संपणार या बद्दलच्या अनिश्चिततेमुळे त्यांचे मन भरकटलेले आहे. शिवाय प्रसारमाध्यमांनी घातलेली करोनाची 'अतिरिक्त' भीती आहेच.
या सगळ्याचा परिणाम म्हणून लोकांना सगळंच थोतांड वाटायला लागलंय आणि हा त्रागा समजण्यासारखा आहे. थोडा जरी भारताबाहेरच्या आणि नेहमी म्हणावल्या जाणार्या 'विकसित' देशातल्या घडामोडींचा आढावा घेतला तरी लक्षात येईल की करोना आणि त्याच्या अनुशंगाने आलेल्या संचारबंदीने गांजलेला भारत हा एकमेव देश नाही. मार्चच्या सुरुवातीला अनेक देशांत पहिले 'हर्ड इम्युनिटी' वाढवून संचारबंदी टाळण्याचा प्रयत्न झाला पण ते फार काळ जमलं नाही. जे देश अर्थव्यवस्थेकरता संचारबंदी टाळत होते त्यांनी काही दिवसांत 'बेमुदत' संचारबंदी लागू केली. त्याने करोनाचा संपूर्ण नायनाट होणार नाही हे तर सगळ्यांनाच माहिती होतं, फक्त आलेख सपाट करणं हाच एक उद्देश होता. तसे केले नसते तर 'महामारी'सदृश्य परिस्थिती निर्माण झाली असती. शिंक/खोकल्यातून उडणार्या तुषारांतून पसरणारा आजार भारतासारख्या दाट लोकसंख्या असलेल्या देशात किती वेगात आणि किती प्रमाणात पसरला असता याची आपण कल्पना करू शकतो.
आपापल्या देशातल्या लोकांचे मनोबल कायम राखण्याचा आणि टप्प्या-टप्प्याने का होईना पण व्यवहार सुरळीत करण्याचा प्रयत्न प्रत्येक राष्ट्रप्रमुख करतोय. सगळ्यांना जनतेचा रोष सहन करावा लागतोय कारण नक्की काय करावं हे कोणालाच माहिती नाही. कमीतकमी जिवीतहानी होवू देवून व्यवहार सुरळीत करणे ही तारेवरची कसरत आहे, इकडे आड तर तिकडे विहीर आहे. अजूनपर्यंत तरी कोणत्याही देशाला यात मार्ग सापडल्याचं वाचलं/पाहिलं नाही.
एवढं सगळं लिहिण्याचं कारण एवढंच की भारतात आपण फार चुकीच्या निर्णयांचे बळी आहोत आणि बाहेरच्या जगात नंदनवन आहे असं अजिबात नाही. जे निर्णय जगभरात राबवले जात आहेत तेच भारतातही आहेत. सध्यातरी आशावादी राहून सरकारच्या सूचना पाळणे आणि आपापले कर्म करत राहणे हेच आपल्या हातात आहे.
15 May 2020 - 10:36 pm | धर्मराजमुटके
संयमित आणि सुंदर प्रतिसाद ! मनाला दिलासा देणारा प्रतिसाद.
15 May 2020 - 11:08 pm | मराठी कथालेखक
तुम्ही द. कोरिया आणि तैवानबद्दल वाचलं नाही असंच दिसतंय.
16 May 2020 - 7:17 am | नेत्रेश
भारतासारख्या खंडप्राय देशाची आणी बाकी लहान देशांची तुलना होउ शकत नाही.
तुलना कराचीच तर चीनशी करावी लागेल. त्यांनी तेथे जे उपाय केले, आणी ज्या प्रकारे राबवले, ते भारतात करता येणार आहेत का?
18 May 2020 - 5:56 pm | मराठी कथालेखक
देश लहान की मोठा त्याने काय फरक पडतो ?
तुलना होवू शकत नाहिच असं ठरवूनच ठेवलं तर मग काय बोलणार ?
आणि चीनशी तुलना करायला हरकत नाही. पण चीनने सगळं सत्य समोर आणलं आहे याची खात्री आहे का तुम्हाला ? चीनमध्ये फ्क्त वुहान प्रांतातच विषाणू जास्त पसरला, बाकी प्रातांत फारसा नाहिच , हे कसे ? लॉकडाऊनही बहुतांशी वुहानमध्येच झाले. उर्वरित देश विषाणू पासून आलिप्त कसा राहिला ? की कोणती एखादी लस होती जी देशाच्या इतर भागात दिली गेली.
दीड दोन महिन्यापुर्वी पुतिनने रशियात कसे कडकपणे लॉकडाऊन केले याच्या पोस्ट आणि पुतीनचे कौतुक व्हॉटस अॅपवर फिरत होते. इतके कडक लॉकडाऊन होते तरी तिथला कोरोना रुग्णांचा आकडा तीन लाखांच्या जवळ गेलाय.
इटलीने ९ हजार रुग्ण असताना लॉकडाऊन केले तरी तिथली रुग्णसंख्या आता सव्वा दोन लाखांवर पोहोचली आहे.
खुद्द भारतातही सहाशेच्या आत रुग्ण असताना लॉकडाऊन केले आणि तरीही आतापर्यंत एक लाखांवर रुग्णांची संख्या वाढली आहे. मग लॉकडाउनचे यश ते काय ?
न्यूझीलंड ,ऑस्ट्रेलिया वगळता कोणत्या देशाला (चीनबद्दल अनेक संभ्रम आहेत म्हणून त्याला गणत नाही)लॉकडाऊन करुन कोरोनाचा प्रसार आटोक्यात आणता आला ?
बाकी वाटल्यास हा लेख वाचू शकता. (अनेकांच्या नावडत्या) कुबेरांनी लिहला असला तरी त्यात स्वीडनचे वैद्यकतज्ज्ञ जोहान गिसेक यांनी ऑस्ट्रेलियाच्या स्काय न्यूजला दिलेली मुलाखतीत मांडलेली मते आहेत. (मूळ मुलाखत मी पाहिलेली नाही).
काही वाक्ये खाली देत आहे.
18 May 2020 - 6:41 pm | मोदक
टाळेबंदी यशस्वी करून दाखवली म्हणून नक्की कोण अभिमान बाळगत आहे..?
18 May 2020 - 6:59 pm | मोदक
देश लहान की मोठा त्याने काय फरक पडतो ?
मग एक सांगा.. सिंगापूरसारखी भारताची प्रगती का झाली नाही गेल्या ६० वर्षात..?
18 May 2020 - 7:02 pm | चौकस२१२
मराठी कथालेखक आपल्या माहिती साठी : जरी ऑस्ट्रेलिया मध्ये हे खूप चांगलंय प्रकारे आटोक्यात आणलं एअसले तरी येथे कोणी ना बढाया मारताय ना घरबंदी ला दोष देताय
टप्पय टप्पय ने चालू आहेत प्र्यत्न ..देशबंदी चा फायदा निशिचत झाला आहे
पण सरकारला आणि लोकांना हे हि माहित आहे कि आता बंधन शिथिल केल्यावर आणि त्यात थंडी सूर झाली आहे तेव्हा हे चित्र उलटू शकते, त्याची भीती आहेच
भारतात एकतर हि बंदी एकतर १००% चुकीची किंवा १०० % यौग्य अशी टोकाची भूमिका का घेतात लोक हेच समजत नाही ( निदान मिपावरील काही अगम्य प्रतीक्रिया वाचल्या तर तसे वाटते ) एकदम हिरो नाही तर झिरो का करता ?
कोणाला हे थोतांड वाटतं तर कोणाला यच्ययात फकिरी वृत्तीचा बेजवाबदार पणा दिसतो.. कोणाला सरकार पुरेसे समाजवादी का नाही याची पडलीय ..
16 May 2020 - 11:30 am | चौकस२१२
१००% अगदी योग्य शब्दात आपण मांडले आहेत .
जी लोक येथे "हे थोडात" आहे हे असे म्हणत आहेत त्यांनी जरूर वाचावे
16 May 2020 - 2:12 am | गामा पैलवान
स्मिता.,
लोकांना सगळंच थोतांड वाटायला लागलंय कारण हे थोतांडच आहे. आज कष्टकरी कामगार जात्यात आहे आणि आपण सुखवस्तू लोकं सुपात आहोत. तुमच्याकडे वर्षभर पुरेल इतका पैसा असला तरी नंतर काय, हा प्रश्न आहेच. हे थोतांड जर वेळच्या वेळीच निपटलं नाही तर उत्तरोत्तर हालत खराब होत जाणार ना?
शिवाय सरकारने संचारबंदी व टाळेबंदी घातल्या आहेत त्या नक्की कोणत्या तरतुदीखाली आहेत? यांना काही घटनात्मक आधार आहे का? इतर वेळेस सदैव घटनेच्या नावाने टाहो फोडणारे रामदास आठवले, जितेंद्र आव्हाड, प्रकाश आंबेडकर ऐन वेळेस तोंडं बंद करून का बरं बसले आहेत? कुठे गेले सगळे स्वयंघोषित घटनातत्ज्ञ? हा एक राजकीय घोटाळा वाटंत नाही का?
आ.न.,
-गा.पै.
16 May 2020 - 7:28 am | नेत्रेश
कुणाची तयारी असो वा नसो या व्हायरसवर व्हॅक्सिन तयारहोउन ते सर्व सामन्य लोकांपर्यंत पोहोचेपर्यंत परीस्थीती फारशी बदलणार नाही.
हा राजकीय घोटाळा असेल तर रामदास आठवले, जितेंद्र आव्हाड, प्रकाश आंबेडकर यांचा नक्की काय फायदा होत आहे?
आर्थिक फटका लहान थोर, कॉर्पोरेट, गव्हर्नमेंट, सर्वांनाच बसत आहे, केवळ भारतात नव्हे, तर जगभरात. सर्वचजण परत नॉर्मल लाईफ साठी अत्यंत अधीर आहेत. पण महामारीच्या भीतीने सर्वजण सोशल डीस्टंसिंग पाळुन सहकार्य करत आहेत. सरसकट निर्बंध उठवणे हा पर्याय नाही.
16 May 2020 - 4:30 pm | स्मिता.
जगभरातल्या सर्व (मित्र आणि शत्रू) राष्ट्रप्रमुखांनी ठरवून केलेला हा घोटाळा नक्कीच सगळ्यात मोठ्ठा राजकीय घोटाळा म्हणायला हवा.
16 May 2020 - 3:19 am | शकु गोवेकर
नोबेल पारितोषिक प्राप्त डॉक्टर बॅनर्जी यांनी सुचविल्याप्रमाणे भारतात गरीब कोण आहे याची व्याख्या काय हे कदाचित मंत्री मग तो प्रधान असो वा वित्त असो माहित नसावी कारण भारतात तसे पहिले तर ९६ टक्के जनता गरीब आहे व त्यांना प्रत्येकी सरसकट ५०० किंवा ५००० रुपये द्यावेत व लाल किंवा पिवळी शिधा पत्रिका याचा विचार करू नये
16 May 2020 - 3:14 pm | गामा पैलवान
चौकस२१२,
नगण्य योगदान हे माझं विधान आहे. या मृत्यूत करोनाचं योगदान नगण्य आहे याचा अर्थ इतर घटकांचं ( = वय + आरोग्य + सवयी) योगदान जास्त आहे.
अमेरिकेतले हे जे ८८०००+ लोकं मेलेत ते सगळे वयस्कर आहेत. त्यांच्या अंगात करोनाखेरीज इतर अनेक व्याधी होत्या. इथे इंग्लंडमध्येही साधारणत: तशीच परिस्थिती आहे. करोना अंगात असतांना मृत झालेले बरेचसे लोकं वृद्धाश्रमातले होते. इथे त्यावर ताजी (१५ मे रोजीची) माहिती आहे : https://www.bbc.co.uk/news/health-52284281
करोना अंगात असतांना मृत झालेल्यांपैकी २५% वृद्धाश्रमातले मृत आहेत. बाकीचे बाहेर मृत झालेले आहेत. करोना स्वत:हून ठार मारंत नाही. त्याच्यामुळे शरीराची अनावश्यक प्रतिक्रीया (अॅलर्जी) होते आणि तिला माणूस बळी पडतो.
माझा प्रश्न साधासोपा व सरळ आहे. जर हा वयस्करांचा आजार आहे तर धडधाकट लोकांवर टाळेबंदीची सक्ती का? असे किती धडधाकट लोकं मेलेत?
आ.न.,
-गा.पै.
16 May 2020 - 3:22 pm | मोदक
वयस्करपणाची तुमची नक्की व्याख्या काय आहे..?
५८ / ६० च्या पुढचे..?
17 May 2020 - 12:20 pm | गामा पैलवान
मोदक,
करोनाच्या संदर्भात वृद्ध कोण हे करोनामुळे गतप्राण झालेल्यांचं सरासरी ( = अॅव्हरेज) अथवा मध्यममान ( = मेडियन ) काढून ठरवता येईल. कोणत्या वयोगटाला किती धोका आहे ते आपसूक समजेल.
आ.न.,
-गा.पै.
16 May 2020 - 7:24 pm | सुबोध खरे
जर हा वयस्करांचा आजार आहे तर धडधाकट लोकांवर टाळेबंदीची सक्ती का?
भारतात आणि पाश्चात्य देशात खूप फरक आहे.
भारतात बहुसंख्य वृद्ध लोक हे आपल्या मुलांबरोबरच राहतात याशिवाय भारतात अफाट लोकसंख्येमुळे मर्यादित जागेत जास्त लोक गर्दी करून असतात.
आपल्याकडे मुलांची आपल्या आईवडिलांबद्दल भावनिक गुंतवणूक कितीतरी जास्त असल्यामुळे पाश्चात्य देशासारखे आईबाप वृद्धाश्रमातच मृत झाले हे फारच कमी आहे.
आपल्याकडे मुलगा महिनोन्महिने आई बापाशी बोलत नाही असे होतच नाही.
आजही रोजगार नाही खिशात पैसे नाहीत आणि गावी रोजगार मिळण्याची शक्यता शून्य टक्के असूनही स्थलांतरित मजूर आईबापाकडे गावाला मैलोगणती चालत का जात आहेत?
यामुळेच तरुण लोकांना बाहेर फिरण्यासाठी मुभा दिली असती तर त्यांच्या मुळे वृद्ध लोकांना मोठ्या प्रमाणावर आजार होऊन आपल्याकडे एकत्र इतकी मोठी रुग्ण संख्या झाली असती कि आपली फारशी चांगली नसलेली आरोग्य यंत्रणा मोडून पडली असती. यासाठीच हा लॉक डाऊन आवश्यक होता
17 May 2020 - 12:16 pm | गामा पैलवान
खरे डॉक्टर,
वाहक म्हणून छाप मारून कोणावरही टाळेबंदीची सक्ती करणं कितपत योग्य? वृद्ध लोकांना कसले ना कसले आजार होणारंच हे गृहीत असतं ना? उलट टाळेबंदीमुळे जे परिचयकाठीण्य उत्पन्न होतं ते न झाल्याने रोगापेक्ष उपचार भयंकर अशी अवस्था नाही होणार का?
एड्स झालेला माणूस साध्या सर्दीने मरायचा. मग सर्दीचे विषाणू फैलावणारे सगळे लोकं वाहक झाले ना? सर्दी तर कोणलाही होऊ शकते. करोना फ्लूसारखा आहे. सर्दीपेक्षा फारसा वेगळा नाही.
टाळेबंदी आणि अल्पसंपर्क ( मायनर एक्स्पोजर ) या दोन परस्परविरोधी उपाययोजना आहेत. त्यांच्यात समन्वय न साधता केवळ सरसकट टाळेबंदी हा एकांगी उपाय राबवला जातोय. हे कितपत उचित धरायचं? शासनाला करोना संपवण्यापेक्षा टाळेबंदी वाढवण्यामागे जास्त रस आहे.
आ.न.,
-गा.पै.
16 May 2020 - 11:45 pm | नेत्रेश
१. या आजारावे सर्व वयोगटातील व्यक्ती ICU मध्ये पोहोचतात. पण तरुण लोकं बरी होउन ५ ते १० दीवसांनी घरी परतण्याचे प्रमाण वृद्ध लोकांपेक्षा बरेच जास्त आहे. पण प्रचंड प्रमाणात तरुण लोक ICU मध्ये भरती झाले तर सर्वांना अॅडमिट करुन उपचार करणे शक्य होणार नाही. तेव्हा तरुणांनी आजारी न पडणे हा एकच उपाय आहे.
२. वृद्धाश्रमातले लोक बाहेर जात नाहीत, मग त्यांना करोना कसा झाला? तर काही लोकांचे तरुण नातेवाईक जे करोनाचे वाहक होते, ते भेटायला आले व करोना संक्रमीत करुन गेले. एकदा एकाला करोना झाल्यावर तो अत्यंत जलदगतीने सर्व वृद्ध लोकांमध्ये पसरला व दुर्दैवाने बरेच लोक मेले.
३. काही वृद्धाश्रमात बाहेरील व्हीजीटरना मनाई केली, तरीही तीथे सेवा देणार्या कर्मचार्यांकडुन करोना पसरला. करोना कॅरीयर ओळखणे खुप कठीण आहे. तो कॅरीयर आहे हे समजेपर्यंत त्याने बर्याचजणींपर्यंत करोना पोहोचवलेला असतो.
४, मरणार्या लोकांमध्ये तरुण घडधाकट लोकही आहेत. प्रमाण कमी आहे कारण त्यांना वैद्यकीय उपचार वेळेवर मिळत आहेत. पण रुग्णांचे प्रमाण अती वाढले तर वैद्यकीय व्यवस्था अपुरी पडुन तरुण लोकही जास्त प्रमाणात बळी पडतील.
तर"जर हा वयस्करांचा आजार आहे तर धडधाकट लोकांवर टाळेबंदीची सक्ती का? असे किती धडधाकट लोकं मेलेत?" याचे उत्तर असे आहे की
१. वैद्यकीय व्यवस्थेवर ताण येउन ती कोलमडु नये म्हणुन
२. तरुण धडधाकट लोकांकडुन तो बाकी म्हतर्या माणसांपर्यंत पसरु नये. आपल्या वृद्ध नातेवाईकांचे संरक्षण व्हावे म्हणुन.
"अमेरिकेतले हे जे ८८०००+ लोकं मेलेत ते सगळे वयस्कर आहेत. त्यांच्या अंगात करोनाखेरीज इतर अनेक व्याधी होत्या." ही चुकीची माहीती आहे. यात सर्व वयोगटातील व्यक्ती आहेत. आणी बर्याचजणांना फारशा गंभीर व्याधी नव्हत्या. जेव्हा आपल्या आजुबाजुचे / आपल्याला माहीती असलेले लोक मरु लागतात तेव्हा वास्तवाची दाहकता जाणवते. तोपर्यंत बराच उशीर झालेला असतो. न्युयॉर्क, लॉस एंजेलीस सारख्या शहरात रहाणार्या लोकांना विचारा.
थोडी अजुन माहीती - लॉस एंजेलीसमध्ये रस्त्यावर रहाणार्या १०,००० पेक्षा जास्त होमलेस लोकांना पालिकेने स्वतःच्या (लोकांच्या टॅक्सच्या) पैशांने गेल्या महीन्याभरापेक्षा जास्त दीवस चांगल्या हॉटेल्समध्ये ठेवले आहे. त्यांना रोज ३ वेळा जेवण, औषधे, मनोरंजन, ईत्यादी सर्व दीले आहे. कारण या लोकांना करोना होउन तो सर्वत्र पसरु नये म्हणुन. या साठी शेकडो खोल्या असतेली कीतीतरी हॉटेल्स भाड्याने घेतली आहेत.
17 May 2020 - 6:43 am | चौकटराजा
बर्याचजणांना फारशा गंभीर व्याधी नव्हत्या. जेव्हा आपल्या आजुबाजुचे / आपल्याला माहीती असलेले लोक मरु लागतात तेव्हा वास्तवाची दाहकता जाणवते हे विशेष करून मिपाकरांनी हे जाणून घेणे महत्वाचे आहे.फक्त पाककृती ,भटकंती,, कविता यांच्या धाग्यावर गर्दी नको ती अशा ज्ञानवर्धक धाग्यावर ही असावी. ही " कॅरियर " ची भानगड लोकांनी नीट समाजवुन घेणे गरजेचे आहे कारण जिथे जास्तीत जास्त टेस्ट करण्याची सोय नाही होणे शक्य नाही त्या भारतासारख्या देशात आपण " कॅरियर " देखील असू शकतो असे गृहित धरून घरीच थांबणे हे माझ्यासाठी तरी आता सक्तीचे व हिताचे झाले आहे. कारण मला धोका रोगी म्हणूनही आहे व माझी प्रतिकारशक्ती चांगली असेल तर " कॅरियर " म्हणूनही आहे !
17 May 2020 - 12:18 pm | गामा पैलवान
चौकटराजा,
हा प्रश्न विचारायची वेळ येऊ नये. पण प्रश्न विचारायला हरकत नाही. तुमच्या माहितीतला कोणी धडधाकट मनुष्य परलोकवासी झालाय का करोनामुळे प्रतिक्रिया येऊन?
आ.न.,
-गा.पै.
17 May 2020 - 6:33 pm | चौकटराजा
माझ्या नातेवईकात मित्रात कोणी नाही. त्याचे कारण बरेचसे सुखवस्तू आहेत. पैसे वाळगून आहेत निव्रुत्त आहेत. एक दोन बंकेत नोकरीस आहेत तरीही त्याना लागण वा मृत्यु नाही. सोसायटीत 50 दिवसानंतर ही केस नाही . कारण अर्थिक स्थिती चांगली असल्याने सर्व घरी थाम्बू शकतात. आता काहीचे हप्ते वगैरे कथा व्यथा असल्याने काही धोका पत्करून कामाला जाउ लागले आहेत. त्यात कोणाला लागण झाली तर सोशल डिस्टंसिंग हा भाग महत्वाचा म्हणून अधोरेखित होईल .आमच्या सोसाय्टीत एक पस्तीशीतील पी एस आय देखील आहे पण तो ही अजून ओके आहे.
अजूनही ही परिस्थीती असण्याचे कारण एक असेही असू शकते की माणसे दोन विभागात विभागली गेली आहेत. पुण्यात भवानी पेठ हा हॉटस्पॉट आहे कारण तिथे झोपडपट्टी आहे व लोकसंख्या दाट आहे. आम्ही जिथे रहातो तिथे लोकवस्तीच्या आयसोलेशन साठी आदर्श अरिया आहे. त्यामुळे दाट वस्ती अधिक मजबुरी अधिक अशिक्षित पणा याचे कोम्बिनेशन झाले की केसेस वाढत असाव्यात. एका अर्थाने पैशाचा हव्यास असलेल्यानी रोग भारतात आणला पण बळी ठरतोय तो ज्याकडे पैसा नाही.
17 May 2020 - 6:52 pm | मोदक
पैशाचा हव्यास असलेल्यानी रोग भारतात आणला पण बळी ठरतोय तो ज्याकडे पैसा नाही.
"पासपोर्ट विरूद्ध रेशन कार्ड" असे कांही..?
17 May 2020 - 12:33 pm | गामा पैलवान
नेत्रेश,
तुमचा इथला संदेश वाचला. माझी मतं मांडेन म्हणतो.
१.
करोनाचे रुग्ण आपोआप बरे होतात. रुग्णालयात केवळ श्वासोत्तेजक ( = व्हेन्टिलेटर) लावला जातो. तो सुद्धा श्वास घ्यायला अडथळा होऊ लागला तरंच लावला जातो. अशा रुग्णांचं प्रमाण माझ्या मते बरंच कमी आहे. इतकं कमी की सरसकट टाळेबंदीची गरज नाही.
२.
करोना हा विषाणू हवा, पाणी सर्वत्र असतो. तो अंगात सापडणं हे नैसर्गिक आहे. करोनाखेरीज इतर अनेक प्रकारचे विषाणू सर्वांच्या शरीरात सुखेनैव नांदत असतात. करोना काही एकमेव विषाणू नाही.
३.
करोना असाच सर्वत्र पोहोचायला हवा. जेणेकरून शरीराच्या संरक्षणप्रणालीस त्याची ओळख होऊन परिचयकाठीण्य उत्पन्न होईल. यालाच शरीराची प्रतिकारशक्ती वाढणे असंही म्हणतात. आपल्याला रोगाची लस टोचतात तेव्हा अशीच विषाणूची ओळख ( = इंट्रोडक्शन ) करवून दिली जाते.
४.
सरसकट टाळेबंदी लादण्याइतकं प्रमाण आजिबात नाही.
५.
mean, mode median विदा उपलब्ध आहे, त्याची माध्यमांनी कधी चर्चा केलीये का? नुसतं भयावडंबर माजवायचं. कळू द्या ना लोकांना करोनामुळे मृत झालेल्यांचं सरासरी आयुर्मान काय आहे ते. इथे करोना अंगात असतांना मृत झालेले नव्हे, तर करोनामुळे शरीराची अनावश्यक प्रतिक्रिया येऊन श्वास घुसमटून गतप्राण झालेले लोकंच अभिप्रेत आहेत. याव्यतिरिक्त झालेले इतर मृत्यू हे करोनामुळे झालेले मृत्यू नाहीत.
आ.न.,
-गा.पै.
17 May 2020 - 7:03 pm | मदनबाण
करोना हा विषाणू हवा, पाणी सर्वत्र असतो. तो अंगात सापडणं हे नैसर्गिक आहे. करोनाखेरीज इतर अनेक प्रकारचे विषाणू सर्वांच्या शरीरात सुखेनैव नांदत असतात. करोना काही एकमेव विषाणू नाही.
गापै, करोना विषाणूचे अनेक प्रकार आहेत, ज्यातील सध्याच्या विषाणूचे नामकरण कोव्हीड-१९ [ SARS-CoV-2 ]आहे. या विषाणूवर सर्वांनाच अधिक माहिती मिळावी म्हणुन २ व्हिडियो देउन ठेवतो.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Tu Hi Haqeeqat... :- Tum Mile
18 May 2020 - 2:38 am | नेत्रेश
गा.मा भाउ, तुम्ही म्हणता "करोना असाच सर्वत्र पोहोचायला हवा. जेणेकरून शरीराच्या संरक्षणप्रणालीस त्याची ओळख होऊन परिचयकाठीण्य उत्पन्न होईल. यालाच शरीराची प्रतिकारशक्ती वाढणे असंही म्हणतात. आपल्याला रोगाची लस टोचतात तेव्हा अशीच विषाणूची ओळख ( = इंट्रोडक्शन ) करवून दिली जाते."
HIV च्या विषाणुबाबत सुद्धा आपले हेच मत आहे का?
जो पर्यंत लस टोचत नाही तोपर्यंत आपले शरीर त्या विषाणुला प्रतिकार करण्यास तयार नसते. देवी, पोलिओ सारख्या विषाणुमुळे फैलावणार्या साथी लस सापडल्यावाच आटोक्यात आल्या. लस तयार नसताना, व या विषाणुबाधेवर कसे व काय उपचार करायचे हे नक्की माहीत नसताना त्याचा फैलाव करणे / करायला मदत करणे म्हणजे १०% लोकसंखेचा जीव धोक्यात घालण्यासारखे आहे. हे जगभरातल्या तज्ञ लोकांना समजले आहे, म्हणुनच बहुतेक सर्व देश सोशलडीस्टंसींग सारख्या उपायांनी करोनाचा फैलाव आटोक्यात ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत.
तुमची मते व पॅशन यांचा संपुर्ण आदर करुन सांगावेसे वाटते की वेळ असेल तर तुम्ही अजुन थोडा रीसर्च करा, केवळ बायास्ड, राजकीय अजेंडा असलेल्या मीडीयावर माहीतीसाठी अवलंबुन राहु नका. करोनावरचे रीसर्चपेपर्स व वेगवेळ्या युनिव्हरसीटीनी प्रकाशीत केलेले संशोधन व शास्त्रिय माहीती वाचा. केवळ आपल्या (कदाचित अपुर्ण) माहीतीवर अवलंबुन सरकार करत असलेल्या प्रयत्नांचा अनादर करु नका. बाकी आपली मर्जी.
बाकी अवांतर पण या संदर्भातले:
१. मी रहात असलेल्या शहरात (लॉस एंजेलीस काउंटी) मध्ये अमेरीकेतल्या पश्चिम भागात सर्वाधीक मृत्यु करोनाने झाले आहेत. करोनाने मरणार्या लोकांमध्ये आता डॉक्टर्स, नर्स, हॉस्पिटल कर्मचारी, पोलीस, फायर फायटर्स, अत्यावश्यक सेवा पुरवणारे, व ईतर फर्स्ट रीस्पाँडर्सही आहेत, जे बहुतेक तरुण, घडधाकट व मेडीकली फीट असतात. टीव्हीवर त्यांची संपुर्ण माहीती समजते. बहुतेकांवर सरकारी ईतमामात अंत्यसंस्कारही होतात. पण ईकडे मेडीकल कंडीशन ही कायद्याने गोपनीय असल्यामुळे दगावलेल्या लोकांना काही कंडीशन होती की नाही हे समजत नाही. दुर्दैवाने एका भारतीय कुटुंबातील कर्ता व्यक्ती आणी त्याचे वडील दोघेही करोनाने दगावलेले माहीती आहेत. त्या भारतीय व्यक्तीविषयी समजलेल्या माहीतीनुसार त्यांना काही मे़जर मेडीकल कंडीशन नव्हती.
२. करोनाबाधीत व्यक्तीच्या उपचारासाठी वापरलेली मेडीकल ईक्विपमेंटस लगेच दुसर्या रुग्णाच्या उपचारासाठी वापरता येत नाहीत. व्हेंटीलेटरसारखी ईक्विपमेंटस संपुर्ण निर्जंतुक करणे क्लीष्ट व वेळखाऊ काम आहे. त्यामुळॅ हॉस्पीटलसना जवळजवळ १० ते १०० पट जास्त मेडीकल ईक्विपमेंटसची गरज पडत आहे. (जीथे २० व्हेंटीलेटर्स होते अशी हॉस्पिटल्स आता २०० ते २००० व्हेंटीलेटर्स वापरत आहेत). म्हणुन सरकारी आदेशानुसार नासा व फोर्ड सारख्या कंपन्या मेडीकल ईक्विपमेंट डीझाईन व मॅन्युफॅक्चरींग करत आहेत. आणखीही बर्याच कंपन्या हे करत आहेत.
माझ्या टीमचा सहभाग असलेले नासाचे व्हेंटीलेटर डीझाईनः https://www.nasa.gov/press-release/nasa-developed-ventilator-authorized-...
फोर्ड तयार करत असलेले व्हेंटीलेटर्सः https://media.ford.com/content/fordmedia/fna/us/en/news/2020/03/30/ford-...
३. खरे खोटे माहीत नाही, पण परवा भारतातल्या नातेवाईकाने सांगीतले की भारतात काही धनवान व्यक्ती, विशेषतः दिल्लीकडे, व्हेंटीलेटर्स सारखी महागडी व आता दुर्मीळ होत जाणारी उपकरणे आपल्या कुटुंबाच्या वापरासाठी (वेळ पडली तर म्हणुन) विकत घेउन ठेवत आहेत. सर्वांना हे शक्य नाही, पण सोशल डीस्टंसीग पाळणे, आणी सोशल डीस्टंसीग मुळे हालाखीची वेळ आलेल्यां गोरगरीब लोकांना शक्य ती मदत कारणे एवढे आपण करु शकतो. अन्यथा या विषाणूचा अती फैलाव होउन लोक उपचारावीना मरु शकतात.
18 May 2020 - 5:10 pm | गामा पैलवान
नेत्रेश,
माझी मतं मांडतो.
१.
HIV च्या विषाणूची सर्दीच्या विषाणूसोबत तुलना होत नसते. करोना व सर्दीचा विषाणू हे सजातीय आहेत. हे दोघे मानवी शरीराबाहेर चारसहा तास 'जिवंत' असतात. उलट HIV मानवी शरीराबाहेर आल्यास दोनतीन मिनिटांत मरतो. तसंच HIV रक्तात पोहोचावा लागतो. एड्सच्या रोग्याशी हस्तांदोलन करून काहीही होत नसतं. याउलट सर्दी थेट संपर्क नसतांना नुसत्या हवेतनंही पसरते.
२.
सर्दीने जीव जातो का? तसा जात असेल तर त्यासाठी इतर घटक जबाबदार आहेत. सर्दी हा रोग नव्हे.
३.
करोनाची नेमकी आकडेवारी कोणी द्यायची? मी की मीडियाने?
आजपावेतो करोनामुळे जीव घुसमटून किती जण मेले आहेत? त्याप्रमाणे श्वासोत्तेजना लावावी लागलेल्यांची काही आकडेवारी मिळेल काय? ही आकडेवारी का उघड करण्यात येत नाहीये? सरसकट सगळ्यांना करोनाचे रुग्ण म्हणवून भयावडंबर कोण माजवतंय?
४.
करेक्ट. टाळेबंदी कधी उठवणार?
आणि जर सरकारला जर करोनावर आटोक्यात आणण्यापेक्षा टाळेबंदी वाढवण्यात रस असेल तर मी काय करावं?
५.
फाटलीये त्यांची. जे किरकोळ सुरक्षेसाठी आपलं स्वातंत्र्य गहाण ठेवायला तयार होतात त्यांच्या सुरक्षा व स्वातंत्र्य दोघांचीही वाट लागते.
६.
जरा शोधल्यावर सोकॅल नर्सिंग होमातले ११ पैकी ८ नर्स मरण पावल्याचं आढळून आलं. याला वैद्यकीय निष्काळजीपणा म्हणतात. जर हा वृद्धाश्रम धोकादायक वास्तू आहे तर योग्य काळजी का घेतली नाही? वृद्धाश्रमत साथीच्या रोगांच्या लागणीचं प्रमाण सर्वाधिक असतं, हे माहीत असूनही ?
याव्यतिरिक्त फार काही सापडलं नाही.
आ.न.,
-गा.पै.
17 May 2020 - 1:14 pm | गामा पैलवान
लोकहो,
जनतेचा संयम संपुष्टात येण्याची चिन्हे दिसंत आहेत. काल मुंबईत अँटॉप हिल परिसरात पोलिसांवर कोयत्याने वार केले गेले : https://lokmat.news18.com/mumbai/attack-with-sharp-object-on-police-at-m...
पुण्यात खबरदारीसाठी सशस्त्र दलास पाचारण : https://www.esakal.com/pune/coronavirus-crpf-battalion-deployed-pune-cit...
करोनाचं थोतांड व टाळेबंदीचं महाथोतांड सर्वसामान्य लोकांना छानपैकी कळू लागलंय. जनतेच्या संयमाची इतकी परीक्षा पाहू नये.
आ.न.,
-गा.पै.
17 May 2020 - 1:16 pm | चौकस२१२
-गा.पै.
चला मग दोन तीन गोष्टी सांगा ..होऊनच जाऊदे
1) आपण जे म्हणताय ते भारताबद्दल फक्त कि जगाबद्दल?
२) आपलं अनुभव कोणता आहे? इंग्लड मधील असावा असे दिसतंय लिखाणावरून
3) हा रोग पसरू नये म्हणून अति वयस्कर सोडले तर इतर कोणावर हि घरबंदी नको करायला असे तुमचे मत दिसत आहे .. तसे केले असते तर या रोगाचं जो प्रसार झालाय कि ज्याचे काही देशात प्रमाण भीतीदायक आहे ( कारण उपाय अजून नाही म्हणून) ते कसे थांबवता आले असते कि आपण म्हणताय ३०० मिलियन चाय अमेरिकेत ८५ मेल हे काही विशेष नाही?
४) याशिव्या काही इतर "कॉन्स्पिरसी थेअरी " तर आपल्या मनात नाही ना? असेल तर स्पष्ट मांडावी
५) येथे मान्यवर डॉक्टर लोक याला प्रतिसाद देत आहेत हे नुसतेच द्विपदवीधर डॉक्टर नाहीत तर या समूहावर एक संयमित चर्चच करणारे म्हणून त्यांना मन आहे आणि त्यांनी तो गन अनेक वेळा दाखवून दिला आहे
मग ते हि आपली विधाने प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष खोडून काढीत आहेत ते १००% चुकीचे का हो? या क्षेत्रात आपण त्यांच्यापेक्षा जास्त अनुभवी आहेत काय?
६) आपण म्हणता कि "करोना असाच सर्वत्र पोहोचायला हवा "कारण परिचयकाठीण्य उत्पन्न होईल आणि मग रोग पसरणार नाही..ह...म बर, समजा हा एक उपाय आहे असे धरून चालू ( यावर खरे तर वैद्य आणि संसर्गजन्य रोग तसाच सांगू शकतील )
परंतु ते "परिचयकाठीण्य " उत्पन्न होते पर्यंत किती लोक बळी पडतील? चालेले? सान्गा आपलं थ्रेशहोल्ड! .. ह...म.. जगातील इतक्या देशाचे वैद्यकीय अधिकारी , नेते अगदी मुर्ख आहेत का? कि ज्यांनी तो असा पसरू नये म्हणून धडपड चालवली आहे .. म्हणा ना स्पष्ट कि हो ते मूर्ख आहेत म्हणून
17 May 2020 - 6:25 pm | चौकस२१२
८५०००+ म्रुत्यु असे वाचावे
17 May 2020 - 4:56 pm | मराठी_माणूस
https://www.loksatta.com/mumbai-news/amitabh-gupta-who-handed-over-the-l...
"मानवतेच्या दृष्टिकोनातून" पत्र दिल्याचे म्हटले आहे.
17 May 2020 - 7:03 pm | गामा पैलवान
चौकस२१२,
माझी मतं सांगतो.
१.
प्रामुख्याने भारताबद्दल. करोनामुळे मोदी हा नेता मोडीत निघू नये म्हणून. माझा प्रमुख आक्षेप टाळेबंदी व तज्जन्य नागरीस्वातंत्र्यसंकोचास आहे.
२.
हो. पण भारतालाही लागू पडणारा आहे. शिवाय भारतीयांची प्रतिकारशक्ती जास्त असल्याने इंग्लंडइतकी भारताला टाळेबंदीची गरज नाही. मात्र प्रत्यक्षात इंग्लंडमध्ये टाळेबंदी सौम्य आहे, तर भारतात कडक.
३.
करोना हा सर्दीप्रमाणे एक विषाणू आहे. त्याचा प्रसार नैसर्गिकतीत्या होतोच. तो कोणीही थांबवू शकंत नाही. तो अंगात असला की रोगाची लागण होतेच असंही नाही.
करोना अंगात असणे, त्यामुळे बाधित असणे, त्याची सौम्य लक्षणं दिसणे, ती लक्षणं तीव्र बनणे आणि त्यांच्यापायी मृत्यू होणे या पाच स्वतंत्र बाबी आहेत. मृताच्या शरीरात करोना सापडणे म्हणजे करोनापायी मरणे नव्हे.
४.
अँथनी फौसी (की फॉसी) हा माणूस आपल्याला करोनावर लस सापडवून देणार आहे म्हणे. या माणसाने एड्सच्या लशीच्या नावाखाली गेली ३६ वर्षं अमेरिकेचा अमाप पैसा ओरबाडला आणि आता हा माणूस व्हाईट हाऊसला करोनाची अक्कल शिकवणार आहे.
बिल गेट्स या माणसाशी मोदी करोनाविषयी कसली चर्चा करतात? याच्या पोलियो न्यासाला भारतातनं हाकून लावलं होतं ना २०१७ साली?
साथीच्या रोगांना बळी पडलेल्यांसाठी कायदा अमेरिकी सभागृहांत सुमारे १ वर्षाआधी कार्यरत झाला आहोत : https://www.congress.gov/bill/116th-congress/house-bill/748/all-actions?...
उपरोक्त तथ्यांना "कॉन्स्पिरसी थेअरी" म्हणावं का ?
५.
मी डॉक्टरांच्या सल्ल्याला आजिबात गौण ठरवंत नाहीये. माझा आक्षेप सरसकट टाळेबंदीस आहे. तिचं समर्थन करण्यासाठी करोना हा गंभीर रोग म्हणून दाखण्यात येत आहे.
६.
०
७.
माहीत नाही. पण जनतेला मूर्ख बनवायचं कार्य जोरदारपणे चाललंय.
८.
ते मूर्ख असते तर किती बरं झालं असतं. ते मूर्ख आजिबात नाहीत. मूर्ख आपण जनता बनतो आहोत.
आ.न.,
-गा.पै.
18 May 2020 - 4:38 am | चौकस२१२
इंग्लंड मधील परिस्थिती आणि युरोप च्या जवळ आपण राहता ते बघून पण जर आपल्याला हे थोतांड आहे आणि जगभरचे नेते काही तरी स्वार्थसाठी जगाला मूर्ख बनवीत आहेत असे आपले ठाम मत दिसतंय... त्यामुळे यावर अजून चर्चा तुमच्याशी करण्यात काही अर्थ नाही
नेत्रेश आणि डॉक्टर खरे यांनी आपले बरेच मुद्दे खोदून काढले आहेत... मी अशी आशा करतो कि केवळ कोणत्यातरी पूर्वग्रहामुळे हे जे काय आपण मांडतंय त्व्यावर कोणाचा विश्वास बसू नये .
इति
19 May 2020 - 7:18 pm | आंबट चिंच
गा. मा. एक आवाहन आणि आव्हान…
तुम्ही जर इंग्लंड मध्ये असलात तर तिथेच अथवा भारतात असलात तर इकडे ते सुध्दा धारावी सारख्या भागात.
स्वतः हुन जसे विटेकर काकांनी आपल्या मुला विषयी लिहले आणि तो सेवा करायला गेला तसे कराल काय आणि ते सुध्दा मास्क न लावता.
ना रहेगा बास ना रहेगी बासुरी,
कशाला उगाच कळ्फलक बदडवायचा म्हणतो मी.
बरोबर?
आणि मग १४ दिवसांनी पुन्हा आपला अनुभव लिहायला या इकडे.
काय म्हणताय?
17 May 2020 - 7:49 pm | चौकटराजा
केदारनाथ यात्रेतील एक प्रसंग एका जीव वाचलेल्याने सांगितला ....
केदारनाथ होऊन परत येताना एका ठिकाणी पाणी वाढत होते. व रस्ता मधेच तुटलेला होता. बसमधील प्रवाशामध्ये दोन तट पडले .काही म्हणाले बसमध्येच थांबू काही म्हणाले नको धोका नको ,आपण टेकडी चढायला लागू . बसमध्ये बसू वाल्यांनी त्यांचे ऐकले नाही. ते बर्यापैकी वर गेले असावेत तो त्यांना बस उभी असलेला भराव बससकट पाण्यात पडल्याचे वरून दिसले .लोंढ्यात त्यांच्या देखत बस वाहून गेली .नंतर हेलिकॉप्टर ने त्यांना मानवी वस्तीत नेण्यात येऊन घरोघरी पोहोचते करण्यात आले.याउलट असेही झाले असते की ती माणसे एकटी पडली वाट चुकली असती व संपर्काचे अभावी मेली असती व बसवाल्याना घेऊन जाणारी दुसरी एक बस पलीकडून आली असती व एकेकाला त्या रेस्क्यू बसमधून मानवी वस्तीत आणण्यात आले असते .
वरील प्रकारची सिच्युएशन तुम्ही खास करून ऍडव्हेंचर वा डिझास्टर फिल्म मध्ये पाहिली असेल .काही वाचतात काही मरतात .कोणाचे जजमेंट कसे जिंकेल वा फोल होईल याला काही नियम नाही ! आलेल्या संकटाबद्दल जिथे मेडिकल प्रोफेशन मधील माणसे दिशाभूल करीत आहेत तिथे सामान्य माणसाचे काय ?
18 May 2020 - 4:47 am | चौकस२१२
"आलेल्या संकटाबद्दल जिथे मेडिकल प्रोफेशन मधील माणसे दिशाभूल करीत आहेत तिथे सामान्य माणसाचे काय ?
कोणत्या देशातील ?
निदान मिपावर जे डॉक्टर लिहितात ते तरी तसले काही करीत नाहीत उलट आपल्या परीने यौग्य माहितीच पसरवत आहेत ..इतर देशात हि , हि टीका होत नाहिये .. हा जरूर कि आरोयग्य अधिकाऱ्यांचे काही निर्णय चुकले त्यावर टीका होतीय पण ती अशी नाही कि "तुम्ही दिशाभूल केलीत" तर उलट तुम्ही वेळीच काही गोष्टींवर बंदी आणली नाही ? उदाहरणार्थ ऑस्ट्रेलीतील सिडनी य सर्वात मोठ्या शहरात रुबी प्रिन्सेस या क्रूझ शिप वरील प्रवाश्यांना शहरात लगेच का येऊ दिले?
म्हणजे एकूण समाजाचा विश्वास मेडिकल प्रोफेशन वर आहेच उलट त्यांचे कौतुकच चाललंय !
18 May 2020 - 9:40 am | चौकटराजा
भरपूर उदाहरणे आहेत. मिपावर असे डॉ लोक नाहीत याचे कारण मिपावर एक तळमळ वाले डॉ सोडले तर दुसरे लिहितच नाहीत. आयुवेदाने करोना बरा होतो पसून होमिओपाथी, हायड्रोक्विनाईन, अंटी वायरल मेदिसिन्स "विर" ने शेवट होणारी, गरम पाणी, काढे एक ना अनेक इथपासून डॉ विशवरूप रोयचौधरी सारखे लोक म्हणतात फन्ड साठी जागतिक आरोग्य सँघटनेचा कट . एवढेच नव्हे सर्वात मोठी दिशानूल की बरेच डॉ., हे ही सांगत आहेत की यात 60 च्या वरचे फारच प्रमाण आहे. खरे तर 60 च्या वरचे भटकणारे नाहीतच .60 च्या वरचा करोनाने आजारी पडून किडनी फेल्ने मेला तरी तो जर करोना वाला ठरत असेलही.
18 May 2020 - 12:34 am | संजय क्षीरसागर
त्याचं प्रथम कौतुक करतो ! सगळा देश लॉकडाऊन करण्यापेक्षा करोनाबाधितांना कसोशिनं शोधून क्वारंटाईन करणं केंव्हाही योग्य ठरलं असतं.
या सर्व कळकळीमागे तुमचा हेतू हा आहे > करोनामुळे मोदी हा नेता मोडीत निघू नये
मोदी फकिरीवृत्तीचे आहेत त्यांना अशा किरकोळ गोष्टींची फिकीर वाटेल हा समज योग्य नाही. एकदा निर्णय घेतला की ते स्वतः सुद्धा कधी त्यावर अवाक्षर काढत नाहीत. नोटाबंदीवर इतक्या चर्चा झडल्या, १००% चलन परत अर्थव्यवस्थेत आलं. ते स्वतः म्हणाले होते की ४.५० लाख कोटींच्या नोटा लोक गंगेत सोडतील. त्यांचे दिवंगत सहकारी श्रीयुत जेटली त्यांचा बचाव करायला म्हणाले की ४.५० लाख कोटी काय त्यापेक्षा किती तरी अधिक पैसा नष्ट झाला जो फेक करंसीच्या रुपात अर्थव्यवस्थेत सक्रीय होता. तरी मोदींनी त्यांना जरा सुद्धा करेक्ट करायचा प्रयत्न केला नाही. नोटाबंदी ही खर्या १४.५० लाख कोटीं पैकी ४.५० लाख कोटी बाद करण्यासाठीची योजना होती. तुम्ही अर्थमंत्री आहात का वनमंत्री ? असं काही सुद्धा मोदी म्हणाले नाहीत.
बुलेट ट्रेनसारखी १.१० लाख कोटींची योजना देशाला देण्यापूर्वी ते स्वतः म्हणाले होते की या बुलेट ट्रेनमधे कुणी बसणार नाही, पण आपल्याकडे बुलेट ट्रेन आहे हा दणका जगाला द्यायलाच हवा ! इतका थोर विचार देणारा नेता कर्जाची परतफेड कशी होईल, बुलेट ट्रेनचा उपयोग नक्की कुणाला, पर्यावरणाचं काय होईल इतक्या फालतू गोष्टींचा विचार कशाला करेल ? आता तुम्ही कधी मोदींना बुलेट ट्रेनबद्दल बोलतांना ऐकलंय का ? तो विषय संपला. फकिर कधी मागे वळून बघत नाही.
४ हजार कोटींचा सरदार पटेलांचा पुतळा उभा केला नसता तर देशाला स्टॅट्यू ऑफ लिबर्टीची उंची कळली असती का ?
जिएसटीमुळे देशात कमालीची स्वस्ताई होईल. तो स्वातंत्र्योत्तर भारतातला देशाच्या अर्थव्यवस्थेचा गेम चेंजर असेल. रात्री बारा वाजता पार्लमेंटच्या सेंट्रल हॉलमधे भूतो न भविष्यती असा अपूर्व सोहळा घडवून फुल स्वींगमधे जिएसटी आला. आज तीन वर्ष झाली, व्यावसायिकांनी एमारपीवर जिएसटी लावून, आधीच्या किंमतीत अंतर्भूत असलेला नफा काहीही न करता लाटला. परिणामी जनतेला जिएसटीचा भुर्दंड बसला तो त्यांनी आता आयुष्यभर भोगायचा. अजूनही जिएसटी रिटर्न्स सुरळीत होऊ शकली नाहीत. पण एकदा निर्णय घेतला की घेतला, पुन्हा त्याबद्दल अवाक्षर काढायचं नाही, याला म्हणतात आत्मविश्वास ! फकिराच्या लेखी पश्चात्ताप कधी ऐकलायं का ? ती सामान्यांची वृत्ती झाली.
आता तुम्हाला वाटेल की याचा लॉकडाऊनशी काय संबंध ? तर तुम्हाला या फकिरीवृतीच्या निर्णय कौशल्याची कल्पना यावी.
२१ तारखेला ट्रायल लॉकडाऊन का केला ? ते फक्त विरोधकांना दाखवून द्यायला केला की मी एक उडी मारायला सांगायचा अवकाश जनता शीर्षासन करुन उड्या मारायला तयार आहे. याला म्हणतात पॉवर ! त्या वेळी २४ तारखेला आपण संपूर्ण देश लॉकडाऊन करणार आहोत याची मोदींना कल्पना नव्हती असं तुम्हाला वाटतं का ? त्याच वेळी ३ दिवसांची मुदत देऊन सर्वांना सुखरुप घरी जायला सांगितलं असतं तर इतका मोठा अनर्थ टळला नसता का ? पण असे प्रष्न केवळ सामान्यांना पडतात.
मोदींसारखा विज्ञाननिष्ठ नेता कसा विचार करतो ? जेंव्हा बालाकोट एअर स्ट्राईकच्या वेळी तज्ञांनी सांगितलं की ढगाळ हवामानात टार्गेट दिसत नाहीत त्या वेळी मोदींनी काय सांगितलं ? जर आपल्या फायटर प्लेन्सनां त्यांची टार्गेट दिसत नसतील तर त्यांच्या रडारवर आपली प्लेन्स दिसणार नाहीत ! मी तारीख आणि वेळ ठरवली म्हणजे ठरवली. तुम्ही निघा ! खलास, आहे का काही त्यावर पुन्हा चर्चा ?
तद्वत, २१ तारखेला आपण जाहीर केलं की २४ तारखेला फुल लॉकडाऊन होणारे आणि ही बातमी करोना वायरसला समजली तर ? तेंव्हा आपण करोनावर गुप्तपणे अचानक स्ट्राईक करायचा ! आता देशहिताचा निर्णय घेतोयं म्हटल्यावर जनतेची फिकीर कशाला, ते कोणताही स्ट्राईक झेलतील.
अशा प्रकारे फकिराला कोणत्याही गोष्टीनी काहीही फरक पडत नाही. तो काहीही घेऊन आलेला नसतो, सगळी मालमत्ता देशाची असते आणि फकीर झाल्या गोष्टींचा कधीही विचार करत नाही.
18 May 2020 - 3:17 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
संक्षिसेठ, उत्तम प्रतिसाद.
-दिलीप बिरुटे
18 May 2020 - 9:02 pm | मराठी कथालेखक
छान लिहिलंय.
19 May 2020 - 8:20 pm | आयर्नमॅन
काळ वेळ अजिबात समजत नाही
18 May 2020 - 6:34 am | चौकस२१२
संक्षी
आपले "फकिरीवृतीच्या निर्णय कौशल्याची कल्पना आणि त्याचे अपरिणाम" हे लिखाण रोचक वाटले .. थोडक्यात आपले म्हणे असे आहे असे वाटते कि " मोदी हे फकीर वृत्तीचे असल्यामुळे इतरांचा फारसा विचार ना करिता त्यांनी kovida कारणास्तव देशभर बंदी आणणे यासारखे निर्णय घेतले "
आपल्या लिखाणावरचे हे माझे निरीक्षण जर बरोबर असेल तर मग तोच तर्क वापरला तर इतर देशातील राष्ट्राध्यक्षांनी कि जे विविध राजकीय विचारसरणी चे आहेत ते "फकीर नसताना" सुद्धा त्यांनी साधारण पाने "देशबंदीचे " निर्णय कसे घेतले
२-३ उदाहरणे देतो ( माफी मी परत मला माहिती असलेल्या देसहनबद्दल बोलतोय आणि या दशांची भारताशी तुलना होऊ शकत नाही पण येथे मुद्दा फक्त या "फकीर वृत्तीचा आहे )
१) नू झीलंड , स्त्री पंतप्रधान कौटिम्बक १ मूल, डावी ( दाव्यातील डावी ) विचारसरणी
२) ऑस्ट्रेलिया पुरुष पंतप्रधान,बायको + २ मुली उजव्या विचारसरणीचे ( आणि आपण धार्मिक आहोत हे उघडपणे सांगणारे "चर्च गोइंग ")
३) ऑस्ट्रेलाईतील व्हिक्टोरिया राज्याचे मुख्यमंत्री : पुरुष , बायको + ३ मुले डाव्या विचारसरणीचे आणि यांनी इतर राज्यांचं मानाने जास्त कडक बंदी आणली
मग हे सगळे फकीर नसताना कसे काय
18 May 2020 - 9:33 am | संजय क्षीरसागर
तिथे जनतेचा काय पाड ? त्यामुळे लॉकडाऊन केला म्हणजे केला ! त्यावर चर्चा होऊ शकत नाही, तो विषय संपला !
आपण फक्त फकीरीवृत्ती म्हणजे काय यावर बोलू शकतो.
२१ तारखेला ट्रायल लॉकडाऊन केल्यावर, लोकांना घरी जाण्यासाठी ३ दिवसांचा अवधी देऊन, २५ तारखेला देश लॉकडाऊन केला असता तर आज करोडो लोकांवर नाहक लादलेली दयनीय परिस्थिती, कोणताही सरकारी खर्च न होता टळली नसती का ? पण इतका फालतू आणि उघड विचार फक्त सामान्य माणूस करतो. फकीराची दूरदृष्टी आणि अंतर्ज्ञान याचा थांग सामान्यांना कसा लागणार ?
गटारीतल्या गॅसवर चहा करणारा माणूस हा फकीराचा प्रेरणा स्त्रोत असतो. त्यामुळे फकीराच्या आर्थिक डावपेचांचा कुणालाही थांगपत्ता लागणं मुश्कील. गेल्या ६ वर्षात इतक्या भयानक आर्थिक करामती झाल्या, कित्येक लाख कोटींच नुकसान झालं; पण त्या जनतेला ते दिसेल तर शप्पत ! याला म्हणतात फकीरी किमया.
फकीर हा नेहेमी अचानक अॅटॅक करतो, तो कुणाला सावध होण्याची संधीच देत नाही. २४ तारखेचा लॉकडाऊन नोटाबंदीच्या निर्णयापेक्षाही गुप्त ठेवणं आवश्यक होतं. कारण काय तर जनता कोणताही स्ट्राईक झेलायला तयार आहे; (त्यांना गेली ६ वर्ष आपण याचसाठी तयार केलंय), पण करोना वायरसला बितंबातमी लागता कामा नये.
तुम्हाला वाटेल फकीरी वृत्तीचा इतका गहन विचार कसा असू शकेल ? तर स्वतः मोदीजी भर शास्त्रज्ञांच्या काँन्फरान्समधे म्हणाले आहेत, भारतानं प्लास्टिक सर्जरी हजोरो वर्षांपूर्वीच शोधली होती आणि याचा पुरावा आहे आमचा गणपती. खलास ! काय बिशादे कुणाची पुढे बोलायची ?
18 May 2020 - 10:30 am | वामन देशमुख
ते भाषण ऐकायला मला खरंच आवडेल. इथे लिंक देता का प्लीज?
18 May 2020 - 10:41 am | गोंधळी
https://www.youtube.com/watch?v=NeIWu1NLuzE
तुम्हाला वाटेल फकीरी वृत्तीचा इतका गहन विचार कसा असू शकेल ? तर स्वतः मोदीजी भर शास्त्रज्ञांच्या काँन्फरान्समधे म्हणाले आहेत, भारतानं प्लास्टिक सर्जरी हजोरो वर्षांपूर्वीच शोधली होती आणि याचा पुरावा आहे आमचा गणपती. खलास ! काय बिशादे कुणाची पुढे बोलायची ?
18 May 2020 - 10:44 am | चौकस२१२
.माझा प्रश्न साधा होता फकिरी वृत्तीचे कारण आपण दिलेले रोचक वाटले होते म्हणून विचारायचा प्रयत्न केला आणि ते कारण जगातील इतर राष्ट्राध्यक्षांचं भूमिकेबरोअबर ताडून बघायचाच प्रयत्न केलं .. म्हणलं जर मोदी फेकीतर म्हणून लोकडोवन तर बाकीचे देश नेते पण फकिराच्या असेल पाहिजेत... पएकूण काय मोदी विरोध... हा अजेंडा दिसतोय.. जाऊ द्या .
18 May 2020 - 10:58 am | गोंधळी
देशाची चिंता वाटते. जनतेला मुर्ख बनवले जात आहे हे पाहुन त्रास होतो.
18 May 2020 - 3:05 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सहमत....!
-दिलीप बिरुटे
18 May 2020 - 11:23 am | संजय क्षीरसागर
२१ तारखेला ट्रायल लॉकडाऊन केल्यावर, लोकांना घरी जाण्यासाठी ३ दिवसांचा अवधी देऊन, २५ तारखेला देश लॉकडाऊन केला असता तर आज करोडो लोकांवर नाहक लादलेली दयनीय परिस्थिती, कोणताही सरकारी खर्च न होता टळली नसती का ?
18 May 2020 - 1:19 pm | चौकटराजा
त्यावेळी इतका प्रसार झालेला देखील नव्हता. पण सर्जिकल स्ट्राईक चे व्यसन लागलेल्या मोदीना ते मान्य कसे व्हावे ? आता त्यात वाईट असे होऊ शकले असते की आज देखील क्लस्टर्स ऑफ इन्फेक्शन ऐवजी कम्युनिटी इन्फेक्शन ही स्थिती देखील येऊ शकली असती. वर मी जे केदारनाथ चे उदाहरण दिले आहे ते त्या अर्थाने .दोन मतप्रवाह निर्माण होणे हे माणसातच घडते पण निसर्ग दोघांच्याही बाजूने कधीच दान टाकीत नाही. शेवटी ज्या मतप्रवाहाच्या पारड्यात निसर्गाचे दान पडते तो शहाणा बाकी मूर्ख . जीता वोही सिकंदर ! माझ्या मते टेस्ट टेस्ट अँन्ड टेस्ट हा एक मार्ग होता पण भारतीय संदर्भात १३० कोटी वगरे टेस्ट अशक्य ! त्यामुळे सामाजिक कायिक अंतर .पण इथे ४० कोटी लोक आज मिळवू आज खाऊ या पातळीला जगत आहेत तिथे सर्व फॉर्म्युले नापास ! आता एकच उरला आहे तुम्ही व तो देव दोघे काय ते बघून घ्या !
18 May 2020 - 1:40 pm | संजय क्षीरसागर
> आता एकच उरला आहे तुम्ही व तो देव दोघे काय ते बघून घ्या !
याचे मोदींनी नवे ब्रँडींग केले आहे "आत्मनिर्भरता अभियान " !
18 May 2020 - 1:44 pm | मोदक
खिक्.. :D
18 May 2020 - 2:23 pm | अभ्या..
राजेशाही मोजड्यांचा फोटो पाठवा काका. मान गये.
18 May 2020 - 3:23 pm | मामाजी
वामन देशमूख, चौकस २१२, आपल्या माहिती साठी ही लिंक पाठवत आहे.. हे संकलन गांधीवीदी विचारसरणीचे श्री धर्मपाल, यांनी, ब्रिटीशांनी १६५० ते १८५० च्या दरम्यान संपूर्ण भारतात केलेल्या अनेक चाचण्यांच्या /अहवालांच्या आधारावर केलेले आहे. लढाईत किंवा शिक्षेत कापले गेलेले नाक व कान प्लास्टिक सर्जरीने परत बसवण्याची विद्या भारताीयांना प्रचीन काळा पासुन अवगत आहे असे ब्रिटीशांनी नमूद कपून ठेवलेले आहे. मूळ वाक्यरचना .( This operation is not uncommon in India, and has been practiced from time immemorial.)
https://drive.google.com/open?id=1tN2xMm65nQj0Pn9K8ukwvSUvZVjqlK7t
18 May 2020 - 10:39 am | संजय क्षीरसागर
काही तज्ञांनी मार्क झुकेरबर्गला हे विडीओ काढण्याची विनंती केली होती. यावर मार्क म्हणाला अशा युगपुरुषाचे विडीओज काढणं अवमान होईल. एक वेळ मी स्वतःचा अकाऊंट यू ट्यूबवरुन काढेन पण ते विडीओज काढणार नाही, असं ऐकिवात आहे.
18 May 2020 - 10:45 am | संजय क्षीरसागर
Narendra Modi relates stem-cell and plastic surgery to our age old science
18 May 2020 - 3:08 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
=)) प्रतिसाद माहितीपूर्ण आहे.
-दिलीप बिरुटे
18 May 2020 - 4:02 pm | वामन देशमुख
सामान्य भारतीय जनतेला त्रास देऊन मोदींना नक्कीच आसुरी आनंद मिळत असावा, नाही का?
18 May 2020 - 5:05 pm | चौकस२१२
नक्कीच , नक्कीच मोदींना आसुरी आनंद मिळत असावा ( अक्यार्डिंग टू सम मिपाकर )
-एक तर ते फकीर आहेत
- दुसअरे असे कि त्यांना सर्जिकल स्ट्राईक चे व्यसन लागले आणि त्यांनी हे व्यसन इंग्लड , इटली, ऑस्ट्रेलिया आणि काही प्रमाणात ट्रम्प तात्या यांना लावले त्यामुळे हे सर्व खुले लोक आपल्याच जनतेला ठेचायला उत्सुक आहेत
- दुसरे असे कि हे सगळे थोतांड आहे !
- डॉक्टर लोकं सगळे महामूर्ख आहेत , ते लोकांची दिशाभूल करीत आहेत
- लवकरच मोदीनं मोडीत काढून तिथे बारामतीच्या राजाची नेमणूक करण्यात येणार आहे ( उदोहोजींची कशी काहीतरी करून संसदेत ढकलणूक केली गेली तशी )आणि ते नुसता एक पत्र लिहणार आणि कारोंना पळून जाणार .. नवीन गृहमंती खाते तब्लिघी जमाती पैकी कोणाकडे तरी दिले जाणार
मग सगले आलबेल...
चला घराबाहेर पडा राडा घालुयात कसलं काय कारोंना आणि कसला काय सगळं थोडांत ...
ताजी बातमी :
मला एक गुप्त बातमी लागली ती अशी कि भांडी थाळ्या बनवण्याच्य वयवसायाने मोदींना ना काही तरी गुपचूप मोठी स्पॉन्सरशिप दिली आणि त्यामुळे त्यांनी भांडी थाळ्या वाजवा असे फर्मान काढले .. लोकांनी लगेच केले, भांड्यांना आणि थाळ्यांना पोचे आले ..आणि लोकअन्चे नुकसान झाले .. आणि नवीन भांड्याचा खप वाढला... अर्थत काही शहाण्या लोंकांनी मोदींचे ना ऐकल्या मुळे त्यांच्या भांड्यांना काह्ही झाले नाही आणि त्यांचे पैसे वाचले.
याला "थाळी घोटाळा" असे नाव देण्यात येणार आहे आणि पी चंदम्बरम , मणिशंकर अय्यर , इत्यादींची एक चौअक्शी समिती नेमली जाणार आहे ( लल्लू आणि भुजबळ त्याला बहरून कन्सल्टिंग देणार)
18 May 2020 - 5:53 pm | संजय क्षीरसागर
२१ तारखेला ट्रायल लॉकडाऊन केल्यावर, लोकांना घरी जाण्यासाठी ३ दिवसांचा अवधी देऊन, २५ तारखेला देश लॉकडाऊन केला असता तर आज करोडो लोकांवर नाहक लादलेली दयनीय परिस्थिती, कोणताही सरकारी खर्च न होता टळली नसती का ?
19 May 2020 - 11:25 am | धनावडे
करोडो लोकांना 3 दिवसात एक जागेवरून दुसरीकडे हलवणे शक्य आहे? आणि त्यामुळे गावाकडे कोरोना पसरला असता त्याच काय?
19 May 2020 - 1:03 pm | प्रसाद_१९८२
आपआपल्या राज्यात परत जाणार्या मजूरांची, जी संख्या सध्या समोर येत आहे तेवढे मजूर, तुम्ही म्हणताय तसे तीन दिवसात आपआपल्या घरी गेले असते ? उगा मोदींचा विरोध करायचा म्हणून काहिही लिहायचे.
---
19 May 2020 - 1:32 pm | यश राज
तीव्र सहमत..
मुळात ३ दिवसात एवढे सगळे मजुर आपापल्या गावी कसे गेले असते. आणि समजा जरी त्याना जावु दिले असते तर परीस्थीती चिघळली नसती याची खात्री कोणी देवु शकतो का? जर तसे झाले असते तर हेच प्रश्न वेगळ्या स्वरुपात मोदिंना विचारले असते.
जसे की , "कोरोनामुळे सगळ्या जगात हाहाकार उडालेला दिसत असुन मोदींनी लॉकडाऊन जाहीर करायला ३ दिवस ऊशीर का केला, मजुरांना स्थलांतर करण्याला परवानगी का दिली?, आता जर मजुरांमार्फत इतर ठिकाणी जर कोरोनाचा संसर्ग झाला असेल तर त्याला जवाबदार कोण" इत्यादी इत्यादी.
चीत भी मेरी पट भी मेरा..
19 May 2020 - 6:14 pm | चौकस२१२
चीत भी मेरी पट भी मेरा..
अगदि बरोबर टोकाचा अन्ध मोदि द्वेश मग सगल बकिच जग जे करत आहे ते मोदिन्नि केल मह्न्जे चुकच ..
18 May 2020 - 5:55 pm | मंदार कात्रे
मार्मिक
18 May 2020 - 5:51 pm | संजय क्षीरसागर
> सामान्य भारतीय जनतेला त्रास देऊन मोदींना नक्कीच आसुरी आनंद मिळत असावा, नाही का?
अजिबात नाही ! फकीर आनंद आणि दु:ख यापलिकडे गेलेला असतो.
नोटाबंदीत रांगेत उभे राहून प्रामाणिक लोकांनी हाकनाक प्राण गमावले. पण सर्व जग माया आहे, इथे ये-जा चालूच राहाणार असा विचार फकीर करतो. त्यामुळे जनतेचा छ्ळ वगैरे कसा होईल ? करोडो लोकांना स्वतःच्या घरी पोहोचायला शेकडो मैल पायपीट करावी लागली पण फकीरी वृत्तीला हा सर्व खेळच आहे, त्यात वैषम्य वाटून घेण्यासारखं काही नाही.
18 May 2020 - 7:04 pm | चौकस२१२
मोदिन्न महित नहि पन हे जे काय लिहिताय आणि परिस्थितीवर मात कशी करीत येईल त्याऐवजी फकिरी वृत्तीचे तुणतुणे लावलाय त्यामुळे निश्चितच असुरी आनंद मिळत असावा
18 May 2020 - 7:58 pm | संजय क्षीरसागर
२१ तारखेला ट्रायल लॉकडाऊन केल्यावर, लोकांना घरी जाण्यासाठी ३ दिवसांचा अवधी देऊन, २५ तारखेला देश लॉकडाऊन केला असता तर आज करोडो लोकांवर नाहक लादलेली दयनीय परिस्थिती, कोणताही सरकारी खर्च न होता टळली नसती का ?
18 May 2020 - 4:25 pm | मदनबाण
Sushruta
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Samjho Na Kuch To Samjho Na...
18 May 2020 - 6:13 pm | मामाजी
मदननबाणजी, आपल्या माहितीसाठी..
https://drive.google.com/open?id=1tN2xMm65nQj0Pn9K8ukwvSUvZVjqlK7t
19 May 2020 - 12:02 pm | गोंधळी
वैदिक विमान....https://www.washingtonpost.com/news/worldviews/wp/2015/01/04/indians-inv...
आणि अणूबॉम्ब (जो महाभारतात वापरला होता),दूरचित्रवाणी द्वारे परिषद(video conference)असे असंख्य शोध आपण लावलेले आहेत.
या सगळ्याचा डेटाबेस ज्या ढगात(cloud storage) साठवून ठेवला आहे त्याचा फक्त शोध घेतला पाहिजे इस्रो ने बस.
आणि आदरणीय मोदीजी हे करुन राहतील यात शंकाच नाही.
18 May 2020 - 9:27 pm | चामुंडराय
ह्या धाग्याचा आवाका बराच मोठा आहे.
महर्षी सुश्रुतां पासून ते थोतांडी, फकिरी, नोटाबंदी, घरबंदी, टाळेबंदी, सर्जिकल स्ट्राईक पर्यंत !!
चला, मंडळींच्या भावनांचा निचरा तर होतो आहे ह्या निमित्ताने, हे हि नसे थोडके.
18 May 2020 - 11:38 pm | वामन देशमुख
खरंच हसून गार झालो राव!
19 May 2020 - 12:06 am | मराठी कथालेखक
असे मानणार्यांना दोनच प्रश्न
१) लॉकडाऊन करण्याचे निकष काय होते ?
२) लॉक डाउन मागे घेण्याचे निकष काय होते / असतील.
या दोन प्रश्नांची वस्तुनिष्ठ उत्तरे (आकडेवारी सह) कुणी देवू शकेल काय ?
19 May 2020 - 2:30 am | मोदक
वस्तुनिष्ठ उत्तरे (आकडेवारी सह) कुणी देवू शकेल काय ?
हो.
भारत सरकारला माहितीच्या अधिकाराअंतर्गत हे दोन प्रश्न विचारा.
19 May 2020 - 4:49 am | चौकस२१२
१) लॉकडाऊन करण्याचे निकष काय होते ?
- रोगाचा प्रसार तर होणार त्यामुळे हाती एकच होते कि प्रसाराचा वेग मंदावयाचा ( फ्लॅट थे कर्व) जेणे करून आहे ती वैद्यकीय सुविधा हे "लोड" हाताळू शकतील आणि त्या सुविधा वाढव्याला जरा वेळ मिळेल आणि हा प्रयोग बऱ्याच देशात यशस्वी झालं असे सध्या तरी म्हणता येईल येथील आलेख बघा https://www.google.com/search?q=world+corona+stats&rlz=1C1CAFB_enAU612AU...८
हे करितां ना सामाजिक स्वास्थ्य कि आर्थिक मंदी यात वैचारिक वाद होते यात शंका नाही ..परंतु जेव्हा भांडवलषयी सरकारे सुद्धा स्वास्थ्याला उद्योगा पेक्षा प्राधान्य देतात ( ऑस्ट्रेलिया लिबरल पक्ष ) तेवहा असा प्रकारचाच "लोकडोवन" हे कडू औषध घेणे किती महत्वाचे होते ते कळते ( अर्थात आंधळा विरोध नसेल तर)
२) लॉक डाउन मागे घेण्याचे निकष काय होते / असतील.
वरील भाग १ जर साधय करू शकले तर टप्या टप्या ने निर्बंध कमी करणे हा विचार आहे
त्याआधी हाती घेतलेले उपाय
- चाचण्यांचे प्रमाण वाढवणे
- सर्वात जास्त परिणामकारी निर्बंध आधी ( बऱ्याच देशात अंतर्राष्ट्रूया प्रवांमुळे प्रसार झाला आणि त्यानंतर स्थानिक प्रसार )
- आर्थिक मदत ( इंगलंड ने ८०$ पगार सरकारने दिले , ऑस्ट्रेलिया ने बेकारी भत्ता दुपार केलं आणि महिना ३००० डॉलर ज्यानं नोकरी आहे त्यांना देऊ केले ६ महिन्यासाठी आणि दोन्ही देशात बंडवालशे पक्ष सत्तेत आहेत हे लक्षात घ्या, पाळणाघरांची सबसिडी वाढवली )
- सतत माहिती (डेटा ) गोल करीत राहणे
निर्बंध कमी करणे करणे
उलट्या पद्धतीने जे निर्बंध उठवल्याने प्रसार कमीत कमी वाढेल
- मर्यादित शिथिलता
- शाळा सुरु
- डेटा
कोणाकडेच "मॅजिक बुलेट " नाहीये
19 May 2020 - 4:52 am | चौकस२१२
इंगलंड ने ८०% ...असे वाचावे
दोन्ही देशात भांडवलशाही .. असे वाचावे
19 May 2020 - 11:52 am | अभ्या..
हा साक्षात्कार तर एपिक.
हे भान कधी तर स्वतःला पाहिजे तेवढ्या ब्लेम गेम खेळून झाल्यावर. आपण करतोय काय अन त्याचे परिणाम काय होणारेत ह्याचे इतकेही भान नसू नये.
जरा कुठे लॉकडाऊन काय आहे ते कळायला लागले की मस्त टार्गेट सापडले. करोन जिहाद. जमाती तर पहिल्यापासूनच आहेत ना? कार्यक्रम कधी घेतला, कधी संपला, कसे अडकले? का अडकले? सगळे ते सांगूच शकतात ना. पण मिडीयासमोर असे चित्र उभे की तो मौलाना साद का कोणतरी एक मोठी करोनाने भरलेली सुटकेस घेऊन जमातींना करोना वाटत बसलाय अन लोकांना ते करोनाचे विषाणू मल्टीलेव्हल मार्केटिंगने सगळीकडे पाठवतोय. पुढे काय. महिनाभर नुसता कंठशोष. त्या मौलानाचे तोंड पाहूनच कंटाळा आला. आज त्याचे घर सापडले, उद्या फार्म हाऊस सापडले, पर्वा बँक अकाउंट सापडले, तेरवा जावई सापडला अन इतक्या गाड्या अन इतके पैसे. देशातल्या सगळ्या मुसलमानासमोर प्रश्नचिन्ह. कुणी मुस्लीम भाजीवाल्यावर बंदी घालतोय तर कुणी धर्माचा बोर्ड लावून फळे विकतोय. देशभरातले सगळे जमाती सापडले पण हा मौलाना अजुन नाही सापडला. का नाही सापडला हे विचारायचे नाही. अशा लॉकडाऊनमध्ये सगळे अधिकार असताना दिल्ली पुलिस अन आसपासची राज्ये स्वतःकडेच असताना तो आधी डोवालला भेटू शकतो पण आता सापडत नाही. किती मेले जमाती? आता सध्या सगळे मृत आहेत त्यांना सगळ्यांनाच ह्या जमातीद्वारे झालेले का इन्फेक्शन? ती तर माणसेच होती ना? अगदी त्यांना ठरवून कॅरीयर/इन्फेक्टेड केले तर सग्ळे काय कोरोनाप्रुफ होते का? सब्जेक्ट बंद म्हनले की आता तो सब्जेक्ट बंद. त्या पिरियडमध्ये कधीपर्यंत संपेल ह्याचा अंदाज आलेला का? बर वाढले तर काय होईल ह्याचा अंदाज. इल्ला.
नंतर चीन. तो ट्रंप तिकडे म्हणाला की सगळ्याला कारणीभूत चीनच. लगेच सग्ळीकडे बोंबाबोंब चीनच्या नावाने. आता अमेरिकाही त्यांच्यावर बंदुका ताणतीय तर घ्या आपली पण ताणून. बरं अगदी पुढे जाऊन सापडलाच चीन. काय करणारे? दोन तीन चॅनेले नुसते ट्रंप पेंटागॉनला अदेश देतोय अन चीन कसा बेक्कार सापडलाय ह्यावर दिवसदिवस दळण दळताहेत. इकडे तो जिनपिंग अन तिकडे ट्रंप. मधे दोन चार युध्दनौकांचे ग्राफिक्स. होत काहीच नाही. होणारही काही नाही. सुरुवातेला चीनने फालतू पीपीई किट अन टेस्टिंग किट पाठवल्याच्या बोंबा. झाले काय? काही नाही. अभिमानाने सांगायचे की आम्ही इतके पीपीई किट अन मास्क देशात तयार केले. अरे ते नॉनवोव्हन पॉलीप्रॉपलीन फॅब्रिक गेल्याच वर्षीच्या प्लास्टिक बॅनमध्ये वन टाईम युज मटेरिअल नको म्हनून बॅन झालेले. तेम्व्हाचेही आदेश संदिग्धच. बर मटेरिअल कुठून येते त्याचे? फार थोडे आपण बनवतो बाकी येते अर्थात चीनमधूनच. आम्ही फक्त गेल्या वर्षी सरकारने पिशव्या बनवू नका म्हणून बंद केलेले. आता त्याचे मास्क आणि पीपीई किटस बनवतो.
अजून एक हळूच ब्लेमगेम मागास राज्यातले मजूर. तेच कारणीभूत सर्वांना. त्यांनीच वाढवल्या झोपडपट्ट्या अन बकालपणा. त्यांना तेवढेच करायचे असते तर त्याम्च्या राज्यात नाही का करु शकत? इथे त्यांची काय गरज होती हे समजणार आहेच येत्या महिन्यात. आपल्यालाही कळणारे अन त्यांच्या गृहराज्यालाही. त्यांचे तिकडचे बापही तसेच. आधी ट्रेनच्या नावाने शंख, मग बसच्या नावाने, ट्रकने येत मरणारे चालत निघाले की त्यांना राज्य बंद करणारे. एपिक अॅक्चुअली.
दोनतीन महिने लोकं घरात अडकवले की काय होणारे हे खरंच माहीत नसते का? अत्यावश्यक सेवा, जीवनावश्यक वस्तू आणि वर्क फ्रॉम होम ह्याशिवाय भारतात जग नसतेच का? दिअवसाच्या अन आठवड्याच्या पगारावर जगणारी कीती जनता देशात आहे ह्याचा काहीच अंदाज नाही का? अॅक्चुअली काहीच सेव्हिंग नसणारी अन फक्त हातावर पोट असलेली कीती जनता किती दिवस निभवू शकेल हे सर्व? पाण्याची खोली सरासरी ५ फूट आहे म्हनल्यावर सगळेच पानी पाच फूट खोल नसते. एखादा महिना उधार उसनवारी करुन कसेतरी निभवता येईल. दोन महिने पूर्ण होऊन पुढेही काही अंदाज दिसेना म्हनल्यावर काय करणार लोक? बर त्यांनी गावाकडे जायचे म्हनाले की पसरेल कोरोना म्हणायचे. कुठून कुठे पसरतोय? शहराकडून गावाकडे? मग गावे आधीपासून अडकलीत त्यांचे काय? इतके दिवस चाललेली व्यवस्था एका झटक्यात बंद करून जगण्याची नवीन पध्दती सुरु करायची म्हनले तर कसे व्ह्वावे. नॉर्मल माणसाला नॉर्मल परिस्थितीत साधे गाव बदलायचे ठरवले तर लगेच रुळत नाही. आता इतक्या सर्वांनी अशा विपरीत परिस्थितीचा सामना कसा करायचा? असा सामना करतानाही गर्दी जमवायची नाही, हे फॉर्म भरा, तिथे रजिस्ट्रेशन करा, हे अॅप डाउनलोड करा, इतक्याच वेळात करा आणि असेच करा नाहीतर लाठ्या खा असे सांगताना भारतातल्या सर्वात गरीब, सर्वात अडाणी, सर्वात मजबूर अन सर्वाधिक त्रासलेल्या माणसाचा विचार होता का?
सुरुवातीला लॉकडाउन हे ह्याचे उत्तर आहे असा समज करुन दिला गेला, नंतर काही औशधांची चर्चा झाली, इम्म्युनिटी वाढवण्याची चर्चा झाली, प्लाज्मा थेरपी झाली, नंतर ऑक्स्फर्डाहून वॅक्सिन येणारे ही चर्चा. आता आपल्याला कोरोनासोबतच राह्यचेय अन कुणाकडेच मॅजिक बुलेट नाही ही चर्चा.
खरे आहे हे. कुणाकडेच उपाय नाहीये तर करु नका प्लीज उपाय.
केल्या उपायाचे अपाय निस्तरणार आपणच. कारण गर्वसे कहो हम आत्मनिर्भर है.
19 May 2020 - 2:16 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मास्तराचे अभ्यास पत्र.
स.न.वि.वि. अभ्या...अरेरे..... सर्वच्या सर्व म्हणजे टोटल प्रतिसाद दुर्दैवी आहे, विरोध करायचा म्हणून करायचा म्हणून विरोध स्पष्ट दिसत आहे. असे निगेटीव्ह विचार कराल तर कसा आत्मनिर्भर बनेल भारत.
शेनीटायजरने हात धुवा आणि नाकाला रुमाल-बीमाल बांधून कामाला लागा. इकडं तिकडं स्पर्श होणार नै ते बघा. गोळ्या, सुया, पोती, कंगवे, फण्या याच्या भरवशावर राहू नका. ज्या दिवशी काही दवा-दारु येईल त्या दिवशी ते रांगेतल्या लोकांना अनुक्रमे सगळं मिळणार आहे. आपल्या देशातील सगळ्यांना रांगेत उभे राहून वस्तू घेण्याचा आणि मरण्याचा अनुभव आहेच. बाकी रोगाने सर्वेच्या सर्व मरणार नै, असे समजून वागा. शेजारी पाजारी, गावात, तालुक्यात जिल्ह्यात कोरोनावाला एखादा रुग्ण बरा होऊन आला असेल तर त्यांच्या स्टो-या वाचू नका. फूलं उधळून त्यांचं गल्लीत स्वागत करीत बसू नका. डॉक्टर, पोलीस आणि नर्सेसला त्यांचं काम त्यांना करु द्या. सोललेले पाय, जखमा, मेलेले लोक आठवू नका. पायी चालणार्या गर्भार महिला मजूर त्यांच्या वेदना आणि तत्सम गोष्टी पाहु नका. कोणाला सांगून त्रास करुन घेऊ नका. शक्यतो, टीव्ही पाहू नका म्हणजे ते लोक दिसणार नाहीत. पेपरं वाचू नका. आपल्या मित्रांना- आप्तस्नेहींना पोटापाण्याच्या जुगाडावर फोकस करायचा सांगा.
आलेच एखाद्या फोरमवर, वाट्स्पवर तर तिकडे फार वाद घालू नका. शेठ काहीबाही बोलून जातात आणि त्यांच्या समर्थकांना जसे कवितेत नसलेला आशय शोधावा लागतो तसे ते नसलेल्या गोष्टी आणि काहीच्या काही स्पष्टीकरणं आणि उदात्त हेतू वगैरे सांगत फिरत असतात. अशाच विचारांनी भारत दोन हजार नव्याण्णव मधे सुखी होणार आहे असे समजून नाकासमोर चालत राहा. तान घ्यायचा नाय. पण, आपल्याला जे दिसतं ते बोलल्याशिवाय राह्यचं नाय. जीवाला जपा. कुटुंबाला जपा. काळजी घ्या. शुभंम भवतू
- दिलीप बिरुटे
(अभ्याचा मास्तर)
19 May 2020 - 5:54 pm | चौकस२१२
देशातल्या सगळ्या मुसलमानासमोर प्रश्नचिन्ह. !
असा सर्वसाधारण भारतीय म्हणलं नाहीये .. उगाच काहीतरी काय सांगताय..
मूलमानांच्या मुल्लांवर टीका होत होती ..कारण त्यातील काही मुल्लाणी जे तारे तोडले कि आला पुढे हे सब झूट आणि मशिदीत एकत्र आलात तर सुरक्षित ...!
उद्या जर एकाधे शंकराचार्य असे म्हणले असते कि देवळात देवापाशी आलात ना तर रोगापासून भीती नाही " तरीही त्याला सर्वसामान्य माणूस मूर्खपणाचा म्हणेल
मुसलमान समजलात एक जरी चूक दाखवली कि लगेच इस्लामफोबिया..! वाह
19 May 2020 - 5:13 pm | मराठी कथालेखक
तुमच्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद पण वस्तुनिष्ठ निकष म्हणजे साधी सरळ आकडेवारी सांगता येईल का ?
म्हणजे एकूण अॅक्टिव केसेस अमूक इतक्या, किंवा एकूण केसेस (अॅक्टिव्ह + बरे झालेले + मृत) अमूक इतक्या, किंवा दिवसाला इतक्या केसेस मिळत असतील तर लॉकडाऊन सुरु व त्याचप्रमाणे लॉकडाऊन मागे घेण्याचे सांख्यिकीय निकष काय असतील ? किंवा हॉस्पिटल्सची (किंवा आयसीयू वा व्हेंटिलेटर) संख्या किंवा हॉस्पिटल्सची संख्या व रुग्णांची संख्या याचे काही गुणोत्तर. अगदी काहीही निकष असतील तरी ते इथे सांगता येतील का ? कोणते निकष चूक की बरोबर वगैरे मी म्हणत नाहीये. पण निकष काय होते/ आहेत याची उत्सुकता आहे.
जसे एखादा पाण्याचा वॉल्व चालू करण्याचे साधे निकष असतात की टाकीतील पाणी अमू़क इतक्या पातळी पर्यंत खाली आले की वॉल्व चालू करावा व अमूक इतक्या पातळी पर्यंत वर चढले की वॉल्व बंद करावा.
19 May 2020 - 5:43 pm | मराठी कथालेखक
हा प्रतिसाद चौकस२१२ यांना होता.
19 May 2020 - 6:26 pm | चौकस२१२
तुम्ही विचारता तसे हे सरळ सोडवता येणारे गणित नाहीये आणि मी हि काही संख्याशास्त्राण्या किंवा सांसर्गिक रोग तद्न्य नाही ( आणि तुम्ही पण नसावे )
निकष बंद करण्याचा: हा होता कि ( येथील अनुभवावरून सांगतो)
- रोग परदेशातून येतोय ते प्रवासाची आधी बंद करा .. वाट पाहू नका
- वैद्यकीय तज्ज्ञ (स्थानिक आणि इतर देशात) काय तातडीचे संशोधन करीत आहेत आणि आधीचं अनुभवावरून याचाच फैलाव कास होऊ शातो यासाठी विचारांची देवन घेवाण
- वयस्कर लोकांनावर जास्त बंधन आधी हि व्यदकीय माहिती त्यामुळं;शाळेचं आधी वृद्धाश्रम आधी बंद
- सर्वत वाईट काय होईल आणि त्यास्तही किती तयारी करीत येईल याचा अंदाज
असे टप्पे घेत गेले सरकार.. आता यात अजून काय निकष असतील ते सरकार दरबारी विचाले तरच काळातील..
आणि काय उत्तर देणार या तुमचं प्रश्नाला ?
जे दिसतंय ते असे कि निर्बंध काम करीत आहेत, आणि करताना पोटाला चिंता घाव्या लागतोय..
२) निर्बंध उठवणायचे : वरील चाय उलटे.. आता बघू
दुर्दवाने भारतात टोकाला जय्च्चच या वृत्ती मुले एक गट असा कि २१ दिवस झाले कि सगळे जादूने २२ वय दिवशी सुरळीत असे मानणारा आणि दुसरा गट १ दिवस तरी बंधन कशाला.. मग सोसा
19 May 2020 - 10:19 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
१) लॉकडाऊन करण्याचे निकष काय होते ?
ऑ... लॉकडाऊनला काही निकष होते ? काहीही निकष नव्हते. भाईयो और बहनो, आज रात बारां बजह से सब बंद रहेगा. काहीही आगा न पीछा. चैन तोड़ायची होती म्हणे. च्यायला, त्या पेक्षा मेणबत्त्या आणि थाळीचा टास्क मनोरंजन म्हणून मस्त होता, लोकांनी वराती काढून त्यात नाविन्य तरी आणले होते.
२)लॉक डाउन मागे घेण्याचे निकष काय होते / असतील.
ऑ.. लॉकडाऊनमुळे जे धुपाटणे हाती आले आहे त्यामुळे त्यांनाही अजुन समजलेले नाही की करावे तरी नेमके काय करावे. आता आम्हाला कोरोना बरोबर जगायला शिकायचं आहे, हे त्याचं उत्तर.
-दिलीप बिरुटे
19 May 2020 - 5:19 pm | मराठी कथालेखक
माझे मतही असेच आहे, पण तरी दुसरी बाजूही ऐकावी म्हणून वस्तुनिष्ठ प्रश्न विचारुन बघितला आहे.