नका जाऊ बाहेर लॉकडाऊनमधी राया (लावणी)
नका जाऊ बाहेर लॉकडाऊनमधी राया..
पुन्हा नाही मिळणार असा एकांत कधी राया..
कोरसः
उठाबशा काढतो हातापाया पडतो.. नका भाईर जावा ओ दाजी
पोलिस मारतील,क्वारंटाईन करतील घरातह्च र्हावा ओ दाजी.
तुम्हा पाहुनि सैरभैर झालेय विसरले क्षुधा अन शांती
पण सोय लावते तुमची सारी हक्काची घ्या विश्रांती
सावज पाहे बाहेर मेला तो करोना पारधी राया....
घेऊ काळजी तब्बेतीची मिळून आपण दोघं
किती असू दे करोना बाई भलताच डेंजर रोगं
काया माझी तुमच्यासाठी बनवली मी औषधी राया...
body {
background: url(https://i.postimg.cc/3JFS7g8f/IMG-20200503-162101.jpg);
background-size: 4500px;
}
प्रतिक्रिया
14 May 2020 - 7:23 pm | तुषार काळभोर
डिसेंबरात अन् जानेवारीत लाट येणारे..
14 May 2020 - 7:42 pm | जव्हेरगंज
औषध चांगलं आहे!! ;)
+१
14 May 2020 - 9:07 pm | गणेशा
घेऊ काळजी तब्बेतीची मिळून आपण दोघं
किती असू दे करोना बाई भलताच डेंजर रोगं
काया माझी तुमच्यासाठी बनवली मी औषधी राया...
लावणी कार कोण आहे कळाले मला
+1
15 May 2020 - 1:20 am | गणेशा
झोपताना 2 शब्द, (ह्या पहिल्या 2 ओळी वाचताना सुलोचना बाई आठवल्या ) तुमच्या लावणीच्या पुढे लिहिण्याचा प्रयत्न करतोय..
घेऊ काळजी तब्बेतीची मिळून आपण दोघं
किती असू दे करोना बाई भलताच डेंजर रोगं
तुमच्यासाठी देह सारा..औषध झाला
रामबान हा काढा..अस्सल ठसका
थेंब थेंब हा अमृत झाला
अन ऐका कि, अवो ऐका कि
रोज रातीला झोपताना.. ओठास लावा मला
घेऊ काळजी तब्बेतीची मिळून आपण दोघं
किती असू दे करोना बाई भलताच डेंजर रोगं
15 May 2020 - 7:51 am | तुषार काळभोर
!!!
15 May 2020 - 12:53 am | मोगरा
+1
15 May 2020 - 12:19 pm | कौस्तुभ भोसले
व्वा कडक
+१
16 May 2020 - 11:13 am | मन्या ऽ
हे भारी जमलंय!
16 May 2020 - 11:14 am | मन्या ऽ
हे भारी जमलंय! +१
16 May 2020 - 5:54 pm | चौथा कोनाडा
+१
भारी !
पण सोय लावते तुमची सारी, हक्काची घ्या विश्रांती
ही ओळ विशेष आवडली !
17 May 2020 - 1:43 pm | चांदणे संदीप
चांगला प्रयत्न.
पुलेशु!
सं - दी - प
24 May 2020 - 10:38 am | पाषाणभेद
मंग आमचा नंबर कवा येनार?
25 May 2020 - 1:19 pm | बिपीन सुरेश सांगळे
वाह
वेगळा प्रकार अन सुरेख हाताळला