[कविता' २०२०] - पोपट

साहित्य संपादक's picture
साहित्य संपादक in स्पर्धा
11 May 2020 - 9:18 pm

पोपट

विचारला तू प्रश्न सुगंधी, उत्तरात मी फूल ठेविले
दप्तरात पुस्तके हवी, तिथे कुणी पिस्तूल ठेविले

पसरती तश्रीफ माझी, आरामखुर्चीतही मावेना
थोरला झोपाळा हवा, तिथे कुणी स्टूल ठेविले

लावणारच होतो आग मी, जगास माझ्या ठिणगीने
वातानुकुलाचे सेटिंग, तिथे कुणी कूल ठेविले

म्हातारलो इतका की, म्हातारचळही सोसवेना
काळीज रिते हवे, तिथे कुणी मूल ठेविले

जिंदगी पोपट जाहली, अश्या तोऱ्यात की
तिखटजाळ मिसळ हवी, तिथे कुणी अमूल ठेविले

प्रेरणा : https://www.misalpav.com/comment/1065395#comment-1065395

body {
background: url(https://i.postimg.cc/3JFS7g8f/IMG-20200503-162101.jpg);

background-size: 4500px;
}

प्रतिक्रिया

कौस्तुभ भोसले's picture

11 May 2020 - 11:03 pm | कौस्तुभ भोसले

वाचायला बरी आहे

मन्या ऽ's picture

11 May 2020 - 11:12 pm | मन्या ऽ

शेवटच कडवं :D

साहित्य संपादक's picture

15 May 2020 - 9:33 pm | साहित्य संपादक

मतदान पद्धत : सदस्यांनी प्रतिसादात +१ असे लिहिलेले एक मत धरले जाईल. +१०, +१११, +७८६, +१००^१०० हे सर्व १ मत धरले जाईल.

जव्हेरगंज's picture

11 May 2020 - 11:49 pm | जव्हेरगंज

आता होतो वाचायला कविता, कुणी इथे गझलून ठेविले
=))
+१

आगाऊ म्हादया......'s picture

13 May 2020 - 7:57 am | आगाऊ म्हादया......

हझलच वाटत्ये

गणेशा's picture

14 May 2020 - 2:23 pm | गणेशा

हा हा हा.. पोपट

साहित्य संपादक's picture

15 May 2020 - 9:32 pm | साहित्य संपादक

मतदान पद्धत : सदस्यांनी प्रतिसादात +१ असे लिहिलेले एक मत धरले जाईल. +१०, +१११, +७८६, +१००^१०० हे सर्व १ मत धरले जाईल.

माझीही शॅम्पेन's picture

14 May 2020 - 2:33 pm | माझीही शॅम्पेन

+१

तुषार काळभोर's picture

14 May 2020 - 7:14 pm | तुषार काळभोर

लावणारच होतो आग मी, जगास माझ्या ठिणगीने
वातानुकुलाचे सेटिंग, तिथे कुणी कूल ठेविले

फिस्स करून हसू आलं.

बाकी मिसळीत एकदा अमुल बटर ट्राय करायला पाहिजे.

चांदणे संदीप's picture

17 May 2020 - 1:17 pm | चांदणे संदीप

मला कळालंय कोणंय ते.... =)) =))
या अलौकिक काव्याबद्दल कविला माझ्याकडून चिंचवडात मस्तानी.

कवितेला अर्थातच, + १

सं - दी - प

पाषाणभेद's picture

24 May 2020 - 11:09 am | पाषाणभेद

हा हा हा ... आम्हालाही समजले!!!
झकास!!!

चांदणे संदीप's picture

25 May 2020 - 9:41 am | चांदणे संदीप

मला हे विडंबन पैजारबुवांचे वाटलेले. ;)
गामाजी, चिंचवडात याल तेव्हा कळवा. मस्तानी मिळत असेल तर नक्की मस्तानी कट्टा करणेत येईल. काही कारणांमुळे उपलब्ध नसली तर घरून काहीतरी गोड (रंगीत द्रव्य नाही) करून तुम्हाला देणेत येईल.

कळावे,
आ.न.

सं - दी - प

गामा पैलवान's picture

29 May 2020 - 7:46 pm | गामा पैलवान

संदीप चांदणे,

पाहुणचाराच्या प्रस्तावाबद्दल आभार! :-)

तुम्हांस विडंबन दखलपात्र वाटल्याचं पाहून नवल वाटलं. खरंतर माझा बेत वेगळाच होता. माझी समर्थ ही पहिली कविता पाठवली तिला सुरुवातीस ० मतं मिळाली. त्यामुळे माझी महत्वाकांक्षा जागृत झाली आणि दुसरी कविता पाठवूनही परत शून्यकार मारायची इच्छा झाली. त्यामुळे कवितेसारखं काहीतरी असूनही कविता नसलेलं असं काहीसं लिहायचं ठरवलं. म्हणून हे विडंबन रचलं.

आ.न.,
-गा.पै.

तळटीप : खरंतर हा कविता म्हणायच्या लायकीचा प्रकार नाही. तरीपण साहित्य संपादकांनी स्वीकारल्यामुळे त्यांचेही आभार! :-)

बिपीन सुरेश सांगळे's picture

25 May 2020 - 1:15 pm | बिपीन सुरेश सांगळे

गझल वाल्याना जरी आवडली नाही
तरी गझल मधले विचार / कल्पना भन्नाट
अहाहा