[कविता' २०२०] - अडगळ

साहित्य संपादक's picture
साहित्य संपादक in स्पर्धा
13 May 2020 - 10:21 am

अडगळ

आता खूप साचलेले
नको झाले हे सामान
जागा तेवढीच आहे
याचे राहू देत भान...

आधी आवश्यक आणि
जे जे वाटे उपयोगी
एक वस्तूही त्यांतली
नाही साठवण्याजोगी...

हौस होती, जमवल्या
काही चीजा शोभीवंत
आता फेकून देताना
किती वाटते ना खंत...

जेव्हा आलो पहिल्यांदा
डाग होते फक्त चार
ऐसपैस आणि वाटे
घर मोकळेच फार...

आधी नवीन नेटके
मग तुटके फुटके
मन अजून सांभाळे
काही जुने नि फाटके...

आता अडचण होते
सामानाची या घराला
पण रिकामे करूया
चल आधी या मनाला...

body {
background: url(https://i.postimg.cc/3JFS7g8f/IMG-20200503-162101.jpg);

background-size: 4500px;
}

प्रतिक्रिया

गणेशा's picture

13 May 2020 - 7:02 pm | गणेशा

आधी नवीन नेटके
मग तुटके फुटके
मन अजून सांभाळे
काही जुने नि फाटके...

वा भारीच...
+1

मन्या ऽ's picture

14 May 2020 - 12:47 am | मन्या ऽ

कविता आवडली..
पण नेमकी का आवडली हे शब्दांत मांडता येण कठीण वाटतंय..

प्राची अश्विनी's picture

14 May 2020 - 1:44 pm | प्राची अश्विनी

+1

श्रीगणेशा's picture

17 May 2020 - 2:56 am | श्रीगणेशा

+१
"पण रिकामे करूया
चल आधी या मनाला..."

खरं तर मनातली, आठवणींची हवीहवीशी वाटणारी अडगळ रिकामी करणं अवघड..

चांदणे संदीप's picture

17 May 2020 - 1:39 pm | चांदणे संदीप

कविता आवडली.

+ १

सं - दी - प

पाषाणभेद's picture

24 May 2020 - 10:42 am | पाषाणभेद

छान!

बिपीन सुरेश सांगळे's picture

25 May 2020 - 12:57 pm | बिपीन सुरेश सांगळे

सुंदर कविता
सोपे शब्द पण मनाला भिडणारे