प्रश्न उजेडाचे -- प्रश्न अंधाराचे
आकाशाच्या निळाईची पडे रानभूल
प्रकाशाशी जळालेले पाण्याचे अंकुर
थांबावं का थोडं इथे? दिसते का माया?
मरावं का कोणीं? तुझी क्षुधा शमवाया
तुझे ज्ञान वाचू कितीं? ऐकू कितीं देवां?
प्रत्ययाच्या दारापाशी मिळेना पुरावा
पाण्याच्या या प्रवाहाला म्हणू गंगामाई
म्हणून का बुडालेला माघारून येई?
सामसूम झाली, चढे रात्रीचा अंमल
दिसेल ते शिजवण्या पेटलेली चूल
कुठवर नेशी ओझं? साध वेळ आतां
नाकारून जाशी कुठं इच्छांची चाहूल?
किती पहा आहे उभा सवाल सुंदर
उत्तराच्या मोहापायी गेला दुर्लक्षून
पडले तर पडू द्यावे तुकड़े प्रश्नाचे
पहा किती उजेडाचे? किती अंधाराचे?
body {
background: url(https://i.postimg.cc/3JFS7g8f/IMG-20200503-162101.jpg);
background-size: 4500px;
}
प्रतिक्रिया
13 May 2020 - 7:05 pm | गणेशा
अप्रतिम कविता.. मनापासून आवडली..
दोन दोनदा वाचली...
+1
खालील ओळी जास्त आवडल्या
पाण्याच्या या प्रवाहाला म्हणू गंगामाई
म्हणून का बुडालेला माघारून येई?
पडले तर पडू द्यावे तुकड़े प्रश्नाचे
पहा किती उजेडाचे? किती अंधाराचे?
14 May 2020 - 12:41 am | मन्या ऽ
अ-प्र-ति-म
+१
14 May 2020 - 1:43 pm | प्राची अश्विनी
सुंदर. +1
14 May 2020 - 7:22 pm | तुषार काळभोर
एकदम हुच्च कविता. मस्त
14 May 2020 - 8:35 pm | सौ मृदुला धनंजय...
+1
14 May 2020 - 10:00 pm | स्मिताके
+१
15 May 2020 - 12:32 pm | Swanand Wagle
Apratim
15 May 2020 - 1:45 pm | कौस्तुभ भोसले
+१
16 May 2020 - 11:10 pm | मधुका
"तुझे ज्ञान वाचू कितीं? ऐकू कितीं देवां?
प्रत्ययाच्या दारापाशी मिळेना पुरावा
पाण्याच्या या प्रवाहाला म्हणू गंगामाई
म्हणून का बुडालेला माघारून येई?"
हा सवाल! वाह!
17 May 2020 - 1:42 pm | चांदणे संदीप
गूढकाव्य आवडले.
+१
सं - दी - प
24 May 2020 - 10:40 am | पाषाणभेद
छान!
1 Jun 2020 - 10:02 pm | सत्यजित...
मनाला विश्वासाच्या बाजूंवर पडलेल्या प्रश्नांना,प्रत्ययांतून मिळणार्या उत्तरांसह समाधानही हवं असतं! ते तसं मिळत नाही,तेंव्हा उजेड-अंधाराचे प्रश्न विचारत अशी एखादी कविता उभी होत असावी!
अभिनंदन!