आयुष्य
आयुष्य हे कधी आहे
विस्तीर्ण पानासारखे
आशा निराशेच्या
हिंदोळ्यांवर झुलणारे
वाचता येईना कोणा
यावरील भाग्यरेषा
आयुष्य हे कधी आहे
अथांग सागरासारखे
सुख दु:खाच्या लाटांनी
चिंब भिजवणारे
सांगता येईना कोणा
अथांगतेच्या परिभाषा
आयुष्य हे कधी आहे
निबीड अरण्यासारखे
शंकाकुशंकाच्या विषवल्लींनी
दाट वेढलेले
झाकता येईना कोणा
डाग ओरखड्यांचे
आयुष्य हे कधी आहे
ओसाड वाळवंटांसारखे
मानपमानाच्या कल्पनांनी
रूक्ष विस्तारलेले
झुगारता येईना कोणा
कल्पनांची बंधने
आयुष्य हे कधी आहे
अनंत आकाशासारखे
यशापशयाच्या मेघांनी
जीवन ओथंबलेले
मांडता येईना कोणा
श्रेयांची गणिते
आयुष्य हे कधी आहे
सर्व दूर क्षितीजासारखे
नितीअनितीच्या संकल्पनांनी
नित्य विभागलेले
नोंदता येई ना कोणा
संकल्पनांची स्पंदने
जरी या सर्वांनी
आयुष्य आपले व्यापले
झटकूनी मळभ निराशेचे
होऊनी कोजागिरीचा चंद्र
शिंपावे आनंदाचे चांदणे
body {
background: url(https://i.postimg.cc/3JFS7g8f/IMG-20200503-162101.jpg);
background-size: 4500px;
}
प्रतिक्रिया
11 May 2020 - 10:23 pm | ऊमा बधे
छान आहे कविता
15 May 2020 - 9:35 pm | साहित्य संपादक
मतदान पद्धत : सदस्यांनी प्रतिसादात +१ असे लिहिलेले एक मत धरले जाईल. +१०, +१११, +७८६, +१००^१०० हे सर्व १ मत धरले जाईल.
11 May 2020 - 11:22 pm | गणेशा
छान आहे कविता
+1
आयुष्य आहे कधी..
तुझ्या सारखे मखमली
तर कधी माझ्या सारखी पाषाणी
तरीही जगतोय प्रत्यक क्षण....
कधी उत्कट प्रेम.. तर कधी विराणी..
14 May 2020 - 7:05 pm | तुषार काळभोर
छान विचार
17 May 2020 - 1:06 pm | चांदणे संदीप
इतकं काही लिहिलं गेलं असेलं आयुष्यावर. तरीही प्रत्येकजण काहीतरी शोधितच असतो. आपापल्या परीने लिहितंच असतो. त्या सर्वांना मला हेच सांगावसं वाटतं...
आयुष्याच्या प्रश्नाला, उत्तर द्यावे काय, न कळे
प्रत्येकाचे आयुष्य वेगळे, प्रत्येकाचे प्रश्न वेगळे
सं - दी - प
23 May 2020 - 8:57 pm | मनस्विता
+१
24 May 2020 - 11:15 am | पाषाणभेद
छान आशादायक कविता!