[कविता' २०२०] - रेंगाळतो आहे...

साहित्य संपादक's picture
साहित्य संपादक in स्पर्धा
9 May 2020 - 11:45 am

रेंगाळतो आहे...

आजतोवर वाचलास तु
हा एक योगायोग आहे
एक नजर टाक बाहेर
तुझा मृत्यु दारात रेंगाळतो आहे

भरल्यापोटीचे तुझे भुकेचे डोहाळे
काही केल्या संपत नाहीत
डोळे उघडुन बघ जरासे
गरजुंची आज दैना आहे
एक नजर टाक बाहेर
तुझा मृत्यु दारात रेंगाळतो आहे

अपेयासाठी रांगा लावुनी
काय तु कमावतो आहेस?
आज तु वाचलास परि
तु उद्याचे बुकिंग करुन ठेवतो आहेस

जीवाचा आटापिटा करत
तुझ्याच हितासाठी
देव स्वतः झुंजतो आहे
तरीही क्षुल्लक कारणे देऊन
तु रस्ते धुंडाळतो आहेस

क्षणभर नजर टाक बाहेर
तुझा मृत्यु दारात रेंगाळतो आहे...

body {
background: url(https://i.postimg.cc/3JFS7g8f/IMG-20200503-162101.jpg);

background-size: 4500px;
}

प्रतिक्रिया

तुषार काळभोर's picture

10 May 2020 - 9:58 am | तुषार काळभोर

भावना पोचल्या.

आजूबाजूला हेच बघून उद्विग्न होतो कधी कधी.

गणेशा's picture

10 May 2020 - 1:37 pm | गणेशा

क्षणभर नजर टाक बाहेर
तुझा मृत्यु दारात रेंगाळतो आहे...

भारी लिहिले आहे, परिस्थीती उत्तम सांगितली आहे..

साहित्य संपादक's picture

15 May 2020 - 9:39 pm | साहित्य संपादक

मतदान पद्धत : सदस्यांनी प्रतिसादात +१ असे लिहिलेले एक मत धरले जाईल. +१०, +१११, +७८६, +१००^१०० हे सर्व १ मत धरले जाईल.

मोगरा's picture

14 May 2020 - 12:34 am | मोगरा

भरल्यापोटीचे तुझे भुकेचे डोहाळे
काही केल्या संपत नाहीत
डोळे उघडुन बघ जरासे
गरजुंची आज दैना आहे
एक नजर टाक बाहेर
तुझा मृत्यु दारात रेंगाळतो आहे

चांदणे संदीप's picture

17 May 2020 - 12:28 pm | चांदणे संदीप

वा! असे म्हणायला कवितेत वावच नाही.

सं - दी - प

सत्यपरिस्थितीला "वा!" तरी कसे काय म्हणणार?
असो..
पुढच्यावेळी आणखी चांगले लिहिण्याचा नक्की प्रयत्न करेल. आपल्या प्रामाणिक प्रतिक्रियेसाठी धन्यवाद! :)

बिपीन सुरेश सांगळे's picture

25 May 2020 - 1:07 pm | बिपीन सुरेश सांगळे

कविता आवडली

सर्व प्रतिसादकांना मनापासुन धन्यवाद! :)
वाचकांचे आभार! :)