मी खुशाल आहे
रोजचाच का हा ,आता सवाल आहे
मी खुशाल आहे का तूखुशाल आहे,
एवढे जरी सारे तू बोलून गेली होती
कालच्याच फोटोत ,तो गाल लाल आहे
रुसल्यात पापण्या या रात्रीस काय सांगे
जळतेस कुणासाठी वातीस सवाल आहे
आलीच होती दारात घरात यायचे होते
का उंबऱ्याशी झुंजते का मंद चाल आहे
कोणतीच कचेरी बोलत नाही काही
तो पायरी वर उभा हातात निकाल आहे
रडलो जरी मी तुझ्यासाठीच का रडलो
या मंथनाचा प्रवास ,आजकाल आहे
body {
background: url(https://i.postimg.cc/3JFS7g8f/IMG-20200503-162101.jpg);
background-size: 4500px;
}
प्रतिक्रिया
6 May 2020 - 10:05 pm | तुषार काळभोर
बाकी प्रतिसाद वाचून नंतर.
6 May 2020 - 10:32 pm | काकामामा
छान अाहे
7 May 2020 - 3:54 pm | साहित्य संपादक
मतदान पद्धत : सदस्यांनी प्रतिसादात +१ असे लिहिलेले एक मत धरले जाईल. +१०, +१११, +७८६, +१००^१०० हे सर्व १ मत धरले जाईल.
6 May 2020 - 11:25 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
रुसल्यात पापण्या या रात्रीस काय सांगे
जळतेस कुणासाठी वातीस सवाल आहे.
ख़ास....!
-दिलीप बिरुटे
7 May 2020 - 1:25 am | गणेशा
प्रत्येक शेर /कडवे छान आहे..
पण कुठल्याच कडव्याचा कशाला संदर्भ लागत नाहीये.. sorry मला असे वाटले...
उदा.
कोणी तरी खुशाल आहे हा सवाल करते.
पण पुढच्या कडव्यात फोटोत गाल लाल आहे कळाले नाही.
एक कडवे सोडून पुन्हा
कोणी तरी दारात आली घरात आली नाही पुन्हा कळाले नाही.
बाकी पण कळाले नाही..
7 May 2020 - 4:09 pm | संजय क्षीरसागर
बघा :
कोणतीच कचेरी बोलत नाही काही
तो पायरी वर उभा हातात निकाल आहे
> तो म्हणजे तिचा न्यू पती. त्याच्या हातात तिच्या बाजूनी लागलेला निकाल आहे.
आलीच होती दारात घरात यायचे होते
का उंबऱ्याशी झुंजते का मंद चाल आहे
> म्हणजे तिला आऊटॉफ कोर्ट मिटवायचं होतं, पण ऐन उंबर्यात वकिलाचा सल्ला आडवा आला.
रडलो जरी मी तुझ्यासाठीच का रडलो
या मंथनाचा प्रवास ,आजकाल आहे
> कवीपण तयारीचा आहे. तो म्हणतो हा मंथनाचा प्रवास आहे; ते चालूच राहाणार. हिच्यासाठी रडायचं कशाला ?
7 May 2020 - 4:19 pm | संजय क्षीरसागर
एवढे जरी सारे तू बोलून गेली होती
कालच्याच फोटोत ,तो गाल लाल आहे
> आधी फडाफडा बोल्ली, मग मारहाण आणि त्याचा पुन्हा हा सेल्फी !
7 May 2020 - 4:25 pm | संजय क्षीरसागर
रोजचाच का हा ,आता सवाल आहे
मी खुशाल आहे का तूखुशाल आहे,
> आता परत कशाला फोन ? तू तिकडे मजेत मी इकडे मजेत . कवितेचं नांव 'मंथनाचा प्रवास' हवं होतं.
7 May 2020 - 4:36 pm | मन्या ऽ
हायला! असा ही अर्थ लावता येतोय.. भारीच की राव!
7 May 2020 - 5:03 pm | गणेशा
वा भारी सांगितले तुम्ही.. मी कित्येकदा विचार केला पण असे वाटलेच नव्हते
7 May 2020 - 6:14 pm | गामा पैलवान
संजय क्षीरसागर,
मला कवितेतलं काही कळंत नाही. पण तुम्ही सांगितलेला अन्वयार्थ मनापासनं पटला, नव्हे आवडला. धन्यवाद! :-)
आ.न.,
-गा.पै.
8 May 2020 - 12:56 pm | नावातकायआहे
सं क्षी सरांचा नाद करायचा नाही! :-)
कविता झेपली नाही हे वे सां न
7 May 2020 - 1:33 am | मन्या ऽ
सुंदर!
पण
गज़ल लिहिण्याचा प्रयत्न केल्यासारख वाटतंय!
7 May 2020 - 6:30 am | प्रचेतस
+१
आवडली.
7 May 2020 - 5:36 pm | राघव
ठीक कविता.
मीटर सांभाळायला हवे, चांगली कविता झाली असती अजून. पुलेशु.
8 May 2020 - 11:07 am | कौस्तुभ भोसले
मस्त
9 May 2020 - 9:00 am | चांदणे संदीप
अजून एक गजल... म्हणण्याइतकी साधारण रचना!
सं - दी - प
2 Jun 2020 - 4:47 pm | सत्यजित...
गझल म्हणाल तर वृत्त,यती आणि शेराच्या दोन मिसर्यांतून राबता स्पष्ट असायला हवा. कविता म्हणाल तर तीत एका भावनेचा ओघ अपेक्षित आहे.
पुलेशु!