कुछ दिल ने कहा
कहा सध्या रात्री जुनी गाणी बघत असते ब्लॅक & व्हाईट खूप आवडतात आणि भावतात
त्यातलेच एक ऑल टाईम favourite गाणे म्हणजे कुछ दिल ने कहा
blob:A55FCEB0-1541-4480-9DE3-80CA512059A7
(सौजन्य: youtube)
गाणे: कुछ दिल ने कहा
चित्रपट:अनुपमा (१९६६)
गायिका :लता मंगेशकर
संगीत: हेमंतकुमार
गीतकार:कैफी आझमी
ह्या गाण्यात सगळेच जमून आले आहे गाण्याचे शब्द ऐकताना जगण्याचे सारच ४ ओळीत सांगितल्याचे फील येते विशेष करून दुसरे कडवे
महाबळेश्वर चे छायाचित्रण पण खूप डोळे शांतावणारे आहे आणि शर्मिला टागोर आणि धर्मेंद्र चा अभिनय पण जमून आला आहे
एक रहस्यमयी डूब संगीतात जाणवते नायिका स्वतःच्याच तंद्रीत तरी पण काहीतरी सगळ्यांना लागू होईल असे काहीतरी संगतीये असे वाटते
गाणे खूपच आवडीचे झाल्याने हा चित्रपट उत्सुकतेने पहिला पण थोडी निराशा झाली गाणी आणि संगीत अप्रतिम आहे पण कथा अजून फुलवता आली असती असे वाटले कथा बीज चांगले आहे पण नंतरचा भाग आटोपल्यासारखा वाटतो ओव्हरऑल चांगला चित्रपट आहे
(हृषीकेश मुखर्जी हे नाव वाचून आणि गाण्यांमुळे अपेक्षा खूपच वाढल्या होत्या) मी तुनळीवर पहिला असल्यामुळे काटछाटीची शक्यता आहे
ह्याच्यातलेच अजून एक गाणे धीरे धीरे machal ते पण खूप आवडते (त्यातला हिरो कसाही असला तरी)
blob:D9DD5AB9-CE2B-4E66-AE14-7D1A6C46EF1A
अजून खूप ब्लॅक & व्हाईट गाणी आवडतात त्याकाळचे जीवन दिसून येते आणि आत्ता पेक्षा त्याकाळचे जीवन चांगले होते असे वाटायला लागते तेवढ्यात व्हाट्सएप वर काहीतरी msg नोटिफिकेशन येते आणि आत्ता आहे तेच चांगले अशी गाडी रुळावर येते
असेच अजून एक गाणे आहे तुलनेने नवीन आहे
कहांसे आये badara
blob:8FC9AAC6-DBF3-40D9-AA70-12EC2F269AD2
Kahan Se Aye Badra - Yesudas & Haimanti Shukla - Chashm-e-Buddoor
Movie Name: Chashme Buddoor (1981)
ह्याचे संगीत आणि शब्द खूप छान आहे थोडेसे sad आहे पण
प्रतिक्रिया
26 Apr 2020 - 12:12 pm | विजुभाऊ
"कहासे आये बदरा " हे गाणे राग मधमाद सारंग मधले आहे. थोडेसे दुख्खी सूर असतात कारण हा दुपारच्या वेळेची तगमग दाखवणारा राग आहे.
या रागातील आणखी एक गाणे म्हणजे " भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी "
26 Apr 2020 - 9:49 pm | Prajakta२१
रागदारीबद्दल सांगितल्याबद्दल. शिवरंजनी रागातली गाणी उदास असतात असे ऐकून आहे जसे कि मेरे नैना सावन भादो ,तेरे मेरे बीच में कैसा है ये बंधन (एक दुजे के लिये मधले)
26 Apr 2020 - 10:53 pm | मराठी कथालेखक
जाने कहा गये वो दिन (मेरा नाम जोकर) हे पण शिवरंजनी रागातलं आहे. मला यातलं फारसं काही कळत नाही पण फार पुर्वी शिकायचा प्रयत्न केला होता. सा रे ग प ध सा (म्हणजे म आणि नी गाळला) =>शिवरंजनी राग होतो असं काहीसं स्मरतंय. ग पण बहुधा कोमल होता. नंतर हे सगळं मला झेपणारं प्रकरण नसल्याने सोडून दिलं. गाणं ऐकायचं आणि आनंद घ्यायचा ..
28 Apr 2020 - 2:50 pm | मराठी_माणूस
ह्या लिंक मधे , हा राग मेघ आहे असे म्हटले आहे
https://chandrakantha.com/raga_raag/film_song_raga/megh.shtml
28 Apr 2020 - 10:33 pm | विजुभाऊ
नाही. दोन्ही नी मुळे तसं वाटते इतकेच
पण तो मधमाद सारंग आहे
26 Apr 2020 - 3:53 pm | मराठी कथालेखक
कुछ दिल ने कहा हे माझंही आवडतं गाणं आहे.
या गाण्याबरोअबरच आठवण होते ती कोहरा मधल्या ओ बेकरार दिल या गाण्याची त्याची टीम पण हीच आहे (गीतकार, संगीतकार , गायिका)
बाकी
हे काय आहे ?
26 Apr 2020 - 9:55 pm | Prajakta२१
गाण्याची you tube url इन्सर्ट केलीये पण विडिओ कुठलेच अपलोड झाले नाहीयेत क्षमस्व
ओ बेकरार दिल हे मला पण आवडते गाण्याचे शब्द नैराश्य दाखवणारे असले तरी गाण्याचे चित्रीकरण आशादायी वातावरणात झाल्यासारखे वाटते
ओ बेकरार दिल हो चुका हैं मुझको asuonse प्यार मुझे तू ख़ुशी न दे,नयी जिंदगी न दे असे शब्द आहेत आणि नायिका बागडतीये तरीपण गाणे आवडतेच
26 Apr 2020 - 10:56 pm | मराठी कथालेखक
हेमंत कुमारच्या संगीताची एक विशिष्ट शैली जाणवायची अनेकदा. त्यांची गाणी वेगळ्याच विश्वात घेवून जायची. कोहरांचं "ये नयन डरे डरे" पण मस्त. रिबेका नावाच्या जुन्या कादंबरीवर आधारलेला हा चित्रपट आहे.
26 Apr 2020 - 11:29 pm | Prajakta२१
कोहरा मधली सगळी गाणी छान आहेत चक्क विश्वजित सारखा नायक असून बघावीशी आणि ऐकावीशी वाटतात
अजून देव आनंद ची सगळी ब्लॅक & व्हाईट गाणी छान आहेत विशेषतः मोहम्मद रफींच्या आवाजातली
गाणे :जिया ओ जिया कुछ बोल दो
चित्रपट:जब प्यार किसी से होता है
गायक:मोहम्मद रफी,लता मंगेशकर (दोघांची वेगवेगळी सोलो अत्यंत प्रेक्षणीय आणि श्रवणीय आहेत )
संगीत शंकर जयकिशन
गीत :शैलेंद्र/हसरत जयपुरी
https://www.youtube.com/watch?v=u_xHTc6AP90
रिबेका ह्या फ्रेंच कादंबरीचे चांगले भारतीय रूपांतरण केले आहे कोहरा मध्ये
4 May 2020 - 9:21 pm | Prajakta२१
27 Apr 2020 - 7:03 pm | चौथा कोनाडा
माझं आवडतं :
29 Apr 2020 - 8:11 am | सुमो
कहाँ से आये बदरा... खूप सुंदर गाणं.
29 Apr 2020 - 4:03 pm | Prajakta२१
https://www.youtube.com/watch?v=87CcAeWkeiw
Movie: Chhaya
Singers: Lata Mangeshkar , Talat Mahmood
Lyricists: Rajinder Krishan
Music Director : Salil Chowdhury
Leading Cast : Asha Parekh, Sunil Dutt
Director : Hrishikesh Mukherjee
Year : 1961
हा चित्रपट बघितला नसल्यामुळे संदर्भ माहिती नाही तरी पण गाण्याचे शब्द रूपकात्मक वाटतात
4 May 2020 - 9:19 pm | Prajakta२१
1 May 2020 - 3:04 pm | Prajakta२१
मोहम्मद रफींनी केवळ आवाजाच्या जोरावर गाजवलेली गाणी
१. लिखे जो खत तुझे
२. लाखो है निगाह में
३. 'तेरी आखों कें सीवा
हि गाणी बघताना हे लगेच जाणवते बाकी सगळे ठीक ठाक असून फक्त सिंगिंगमुळे गाणी वेगळी झालीयेत
ह्या सगळ्यात आशा पारेख हा एक कॉमन फॅक्टर आहे हे विशेष
3 May 2020 - 11:12 pm | Prajakta२१
https://www.youtube.com/watch?v=F-0QYyhRg7A
विडिओ url पेस्ट केली तरी विडिओ येत नाहीये म्हणून लिंकच टाकतीये
इथे विडिओ का येत नाहीये असो
हे अजून एक
गाणे: ओ मेरी shahenkhuba
चित्रपट:लव्ह इन टोकियो
गायक: मोहम्मद रफी
गीतकार:हसरत जयपुरी
संगीतकार:शंकर जयकिशन
नयनरम्य चित्रीकरण आणि गीताचे बोल (गायक पण) यासाठी सारखे बघावेसे ऐकावेसे वाटते
प्रियकराचे प्रेयसीसाठीचे आर्जव प्रभावीपणे उतरवले आहे
जपानी वातावरणात नायकाला शोधणारी पूर्ण भारतीय पोशाखातील नायिका हे या गाण्याचे अजून एक वैशिष्टय
3 May 2020 - 11:28 pm | मराठी कथालेखक
YouTube मध्ये share वर click केल्यावर embed वर click करा त्यानंतर दिसणारा पुर्ण code copy करुन इथे paste करा video दिसेल. तरी अडचण कायम राहिल्यास मला कृपया व्यनि करा.
4 May 2020 - 9:17 pm | Prajakta२१
4 Jun 2020 - 10:39 pm | Prajakta२१
अजून दोन -लागा चुनरी में दाग
१. लागा चुनरी में दाग -काहीच बोलायची गरज नाही गाणे ,संगीत,नृत्य सगळे परफेक्ट जमले आहे
२. पिया ऐसो जिया में -गीता दत्त यांनी भावपूर्णतेने गायलेले मीनाकुमारीने अदाकारीने अजून चांगले केलेय