गेम
"सुरेश, माझी कथा वाच!"
"गेम खेळतोय मी! असं आहे तरी काय, त्यात?
"खूनी समोरच्याला फक्त प्रचंड टेंशन देऊन मारतो!"
"काहीतरीच! हे पहा, माणूस पॅनिक होईल; पण त्याचा मृत्यू अशक्य!"
"मोबाइल कुठे आहे? हां, शेल्फ वर! स्टूल वगैरे दिसत नाही." उड्या मारत पोचण्याचा प्रयत्न. प्रत्येक उडीने ताण वाढतोय! मग वस्तुने मोबाइल खाली पाडण्याचा प्रयत्न. सर्वांगावर घाम! "ल्युssडोsss! गेले पॉईंट्स!" भिंतीवर बुक्के. श्वास लागतोय. "सापडलं स्टूल! बॅssटरीss"
वीज नाही! रमेश हसत उभा! राग अनावर होऊन सुरेश कोसळतो.
"म्हणलं ना, फक्त टेंशन देऊन खून करता येतो!"
सुरेश ताडकन उठतो आणि स्टूल रमेशच्या डोक्यात मारतो.
"म्हणलं ना, माणूस पॅनिक होईल; पण त्याचा मृत्यू अशक्य!!!"
body {
background: url(https://i.postimg.cc/NM70Z4Dn/147450-abstract-purple-and-white-blur-ligh...);
background-size: 1900px;
}
प्रतिक्रिया
19 Apr 2020 - 8:37 pm | जव्हेरगंज
लै आवडली!! भारी लिहीलंय!!
+१
19 Apr 2020 - 9:53 pm | स्वलिखित
कथा छान आहे आवडली
पण काटछाट करावी लागली असं दिसतेय
19 Apr 2020 - 11:54 pm | पलाश
+१
20 Apr 2020 - 4:59 pm | शा वि कु
.
20 Apr 2020 - 6:17 pm | मोदक
+१
27 Apr 2020 - 1:04 pm | टर्मीनेटर
+१
आवडली!
27 Apr 2020 - 9:27 pm | मनस्विता
+१
29 Apr 2020 - 11:47 pm | निशाचर
+१
30 Apr 2020 - 10:49 pm | कुलस्य
मतदान केलेल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद !!