[शशक' २०२०] - दुर्लक्ष

शा वि कु's picture
शा वि कु in स्पर्धा
20 Apr 2020 - 6:03 pm

दुर्लक्ष

महेंद्र चहासाठी हाक आल्यावर उठला. डोळ्यांच्या कोपऱ्यातून येणाऱ्या कटाक्षांकडे दुर्लक्ष करत त्याने दात घासले. विनिता आणि आई बाबा आपल्या काळजीत आहे का त्याला माहित नाही ? इतक्या दिवसांनी तिच्यासोबत आणि निशीसोबत मोकळा वेळ मिळत होता. तर हा माणूस असा दुर्मुखलेला का असतो ? किती दिवसांनी मुंबईच्या गर्दीपासून लांब गावात निवांत राहता आलं. बाळासोबत तर खेळणे पहिल्या दोन महिन्यांनंतर मिळालेच नव्हते.
आईबाबांसोबत व्हरांड्यात बसून चहा, निशीची बडबड, बाळासोबत विमान-विमान, विनिताची कातीव मान... यात का नाही रमतेस तू ? अशी कुठली शक्यता आहे त्याचा विचार करायला सुद्धा घाबरतोयस ?
बेसिनमध्ये कफ थुंकून,साबणाने हात धुऊन महेंद्र स्वयंपाकघराकडे वळला. काही गोष्टी शब्दात पकडल्या तर खऱ्या होतात.

body {
background: url(https://i.postimg.cc/NM70Z4Dn/147450-abstract-purple-and-white-blur-ligh...);

background-size: 1900px;
}

प्रतिक्रिया

शा वि कु's picture

20 Apr 2020 - 7:44 pm | शा वि कु

.

+१
मन चिंती ते वैरी न चिंती!! अशा या मनातल्या कफापासून थेट कोरोनापर्यंत जाणार्‍या विचारांकडे दुर्लक्ष करून त्यांना शब्दरूपातही न आणण्याचा प्रयत्न चांगला वाटला.

श्वेता२४'s picture

21 Apr 2020 - 11:51 pm | श्वेता२४

+१

टर्मीनेटर's picture

28 Apr 2020 - 8:44 am | टर्मीनेटर

+१