बिलीव इट ऑर नॉट
गणाचा भुताखेतांवर प्रचंड विश्वास. त्यातच बाजार करून यायला चांगलाच उशीर झाला, त्यातून आडरानावरची वाट. दिसायला धिप्पाड असला तरी भित्री भागुबाईच. सगळीकडे अंधार, रातकिड्यांचा किर्र आवाज. घाबरगुंडी उडून पावलं झपाझप घराकडे पडू लागली. तेवढ्यात पांढऱ्या धोतरातलं अंधुकसं कोणीतरी दिसलं तेवढंच आपलं सोबतीला.
"ओ पाव्हणं, कुठं निघालं?"
"वाडीवर चाल्लोया आमची भैन राहतिया.". (थोडी विश्रांती) चिंचेच्या झाडाखाली थांबतात.
"पाव्हणं तुमाला भुताचा भेव वाटतंय का?"
(हसून) "नाय रं का?"
बिडी वाऱ्यानं पेटत नाही म्हणून पाव्हणा झाडाच्या पलीकडे जातो. गप्पागप्पात गणा बाजूला बघतो, पाव्हणं नाही?.. अन् गावात पळत सुटतो. गणा गप्प बसला म्हणून पाव्हणा येऊन बघतो तर, गणा नाही.
पाव्हण्याचा चांगलाच विश्वास बसलाय आता भूतांवर.....
body {
background: url(https://i.postimg.cc/NM70Z4Dn/147450-abstract-purple-and-white-blur-ligh...);
background-size: 1900px;
}
प्रतिक्रिया
20 Apr 2020 - 6:02 pm | शा वि कु
द मा मिरासदार.
20 Apr 2020 - 6:28 pm | मोदक
भुताचा जन्म.
20 Apr 2020 - 6:04 pm | चांदणे संदीप
+१
सं - दी - प
20 Apr 2020 - 7:18 pm | असा मी असामी
+१
21 Apr 2020 - 2:41 am | मीअपर्णा
+१ मस्त. थोडक्यात महत्व्वाचे :)
21 Apr 2020 - 11:52 pm | श्वेता२४
+१
22 Apr 2020 - 12:05 pm | जव्हेरगंज
+१ 🤯
23 Apr 2020 - 7:16 pm | भ ट क्या खे ड वा ला
दम दमा दम
26 Apr 2020 - 12:05 pm | गुल्लू दादा
+1
27 Apr 2020 - 4:58 pm | हॅरी पॉटर
+१
28 Apr 2020 - 8:41 am | टर्मीनेटर
+१
आवडली!
29 Apr 2020 - 11:00 pm | बेंगुताई
+1
29 Apr 2020 - 11:29 pm | ऊर्जा
+1
30 Apr 2020 - 12:15 am | लोथार मथायस
+१