[शशक' २०२०] - एका माणसाचा भ्रमनिरास

शा वि कु's picture
शा वि कु in स्पर्धा
20 Apr 2020 - 4:46 pm

एका माणसाचा भ्रमनिरास

गवतात सळसळ झाली आणि सरणा वळला.
शुद्धीवर आला तेव्हा समोर जटांमधून प्रेमळ डोळे लुकलुकत होते.
"जानवर ?"
"बिनविषारी. तिकडे-" जटाधाऱ्याने शैवज पर्वतशिखराकडे बोट दाखवले- "दक्षिणेकडे वळला."
सरणाने पदस्पर्श करू पहिला, पण जटाधारी मागे सरकला.
"आयुष्यमान भव:"
"रामराज्यात सुखाचा पेला काठोकाठ भरला असताना तुमच्यासारख्या योगीचं दर्शन म्हणजे अगदी दुग्धशर्करायोग!"
रामचंद्रांचा उल्लेखास योग्याने हात जोडले.
"पंडितजींचा पुत्र विषमाने तडफत होता, मुळी घ्यायला आलो आणि... आता इथून नगरीकडे रस्ता कुठून ?"
जटाधाऱ्याने पूर्वेकडे बोट दाखवले.
सरणा हात जोडून चालू पडला. काही विचाराने मागे वळून त्याने विचारले "मुनिवर, आपण...?"
"शम्बुक"
सरणाच्या कपाळावर बारीकशी आठी उमटली. तर्काने नकळत मारलेली खूणगाठ सोडवण्याचा प्रयत्न करत सरणा पुर्वेकडे चालू लागला.

body {
background: url(https://i.postimg.cc/NM70Z4Dn/147450-abstract-purple-and-white-blur-ligh...);

background-size: 1900px;
}

प्रतिक्रिया

चांदणे संदीप's picture

20 Apr 2020 - 5:18 pm | चांदणे संदीप

उत्तम लेखन. भ्रमनिरास व्हावा हे दुर्दैवी.

सं - दी - प

तुषार काळभोर's picture

20 Apr 2020 - 5:46 pm | तुषार काळभोर

शंबुक साठी थोडी गुगल ची मदत घ्यावी लागली.
बाकी आपण सर्वात थोड्या अधिक प्रमाणात एक सरणा असतोच.
म्हणून बातमी मध्ये आपलं लक्ष (नकळत का होईना) अाडनावा कडे असतं.

शा वि कु's picture

20 Apr 2020 - 6:00 pm | शा वि कु

.

गणेशा's picture

21 Apr 2020 - 5:25 pm | गणेशा

+1

गणेशा's picture

21 Apr 2020 - 5:25 pm | गणेशा

+1

वीणा३'s picture

21 Apr 2020 - 9:35 pm | वीणा३

+१

श्वेता२४'s picture

21 Apr 2020 - 11:55 pm | श्वेता२४

+१

शेखर's picture

22 Apr 2020 - 9:03 am | शेखर

+१

मनस्विता's picture

27 Apr 2020 - 9:24 pm | मनस्विता

+१

टर्मीनेटर's picture

28 Apr 2020 - 8:37 am | टर्मीनेटर

+१
आवडली!

निशाचर's picture

29 Apr 2020 - 11:43 pm | निशाचर

+१