कनेक्ट विथ फ्रेन्ड्स
खायला काळ न् भुईला भार! निकम्मा कुठला! म्हशीमागे फिरतो टोणगा! ...रावल्याचा नित्य उध्दार.
माझी गीता म्हस! हरामखोर! ...रावल्याचं धुमसणं.
माझ्यासंगट गावी नेतो याला...चुलत्याची सूचना आणि अंमलबजावणीही.
रस्ता रूंदीकरणात मगनलाल चाळी जाणार. पैका घ्या किंवा पर्यायी जागा. गीताच्या बापानं पैका घेतला,रावल्याच्या बापानं जागा.
रावल्या गावाहून घरी . ए आये,पक्या माझी गीता कुठे गेली?
ए देवदास,सामान बांध. चिरागनगरला रूम भेटलीय आपल्याला.
हायरे! इथे दोस्त नाय,गीता नाय. निकम्म्याचा शिक्काही तसाच.
ए बबलू,काय करू रे?
डिलीवरी बाॅयचा जाॅब करणार?
नक्कीच.
आणि एक दिवस....
डिंगडाॅन्ग.
दोन्ही चेह-यांवर अविश्वास!
मी इथे घरकाम करते राहुल.
प्रेमकहाणी पुन्हा सुरू.
' कनेक्ट विथ फ्रेन्ड्स ' असंही ????
body {
background: url(https://i.postimg.cc/NM70Z4Dn/147450-abstract-purple-and-white-blur-ligh...);
background-size: 1900px;
}
प्रतिक्रिया
24 Apr 2020 - 2:49 pm | ऋतु हिरवा
आयुष्य नव्याने सुरू करायला हवे
24 Apr 2020 - 4:22 pm | गणेशा
+१
शेवट आवडला ..
24 Apr 2020 - 11:28 pm | ज्योति अळवणी
छान
26 Apr 2020 - 1:22 pm | जव्हेरगंज
साधी सिंपल गोष्ट आवडली!
+१
27 Apr 2020 - 3:18 pm | सर्वसाक्षी
सरळ सोपी चेपु कथा
27 Apr 2020 - 3:20 pm | सर्वसाक्षी
+१ लिहायचं राहिलं होतं