अर्थतज्ञ
तसा तो सगळे नियम पाळून रहात होता. पण सुरवातीचा काळ गेल्यावर, तरीही लॉकडाऊन चालू ठेवणे कितपत उपयोगी ठरेल याबद्दल साशंक होता.
आपली मते तो नेटवर नेटाने मांडत होता. रोगाच्या प्रसाराएवढेच आर्थिक परिस्थितीचेही भान ठेवले पाहिजे, असा त्याचा आग्रह होता.
पण लॉकडाऊन वाढतच गेला. पुढे पुढे जीवनावश्यक गोष्टींचाही तुटवडा वाढला. सरकारला बर्याच सवलती द्याव्या लागल्या.
आता घरोघरी तपासणी सुरु झाली. त्याचीही झाली.आणि तो बाधित निघाला. तडक रवानगी हॉस्पिटलमध्ये! पण लक्षणे काहीच नव्हती.
तीन आठवड्यांनंतर सुटका झाली. जगाचे व्यवहार बरेच चालू झाले होते. त्याने कंपनीत फोन केला. कोणी उचलला नाही.
तो कंपनीत गेला. नोटीसबोर्डावर ती लिस्ट होती! त्याचेही नांव होते त्यांत!!!
body {
background: url(https://i.postimg.cc/NM70Z4Dn/147450-abstract-purple-and-white-blur-ligh...);
background-size: 1900px;
}
प्रतिक्रिया
20 Apr 2020 - 1:23 pm | मोहन
+१
20 Apr 2020 - 1:27 pm | सौंदाळा
+1
20 Apr 2020 - 2:02 pm | कंजूस
??
20 Apr 2020 - 3:29 pm | चांदणे संदीप
कुणी इस्कटून सांगेल का?
सं - दी - प
20 Apr 2020 - 4:14 pm | जव्हेरगंज
एका सामान्य नागरिकाची कथा दिसतेय..
शेवट
तो कंपनीत गेला. नोटीसबोर्डावर ती लिस्ट होती! त्याचेही नांव होते त्यांत!!!
म्हणजे मृत व्यक्तींंच्या यादीत त्याच नाव होतं!!
20 Apr 2020 - 4:44 pm | चांदणे संदीप
कुच जम्या नै..
बहुतेक निकाल जाहीर झाल्यावर लेखक महोदयांकडूनच ऐकायला लागेल.
सं - दी - प
27 Apr 2020 - 2:13 pm | टर्मीनेटर
कथेला नाही, पण ह्या प्रतिसादाला +१
चार वेळा वाचूनही काहीच अर्थबोध झाला नाही! तसेच शीर्षक आणि मजकुराचा संबंधही लक्षात आला नाही. त्यामुळे
हे पटलं !!
20 Apr 2020 - 4:15 pm | जव्हेरगंज
बरी आहे!
+१
20 Apr 2020 - 4:29 pm | पलाश
गोष्ट वाचून लगेच कळली नाही.
ती लिस्ट (कंपनीच्या ढासळलेल्या आर्थिक परिस्थितीमुळे) कामावरून काढून टाकलेल्यांची असेल का? असं असेल तर त्याला वाटणारं भय खरं ठरलं. शीर्षक या तर्काने सुसंगत वाटतं आहे.
बाकी मतं वाचायला आवडतील.
20 Apr 2020 - 4:52 pm | जव्हेरगंज
ती लिस्ट (कंपनीच्या ढासळलेल्या आर्थिक परिस्थितीमुळे) कामावरून काढून टाकलेल्यांची असेल का?
हैला, हे लॉजिक पटतंय.. असंच असावं... मग जमलीये म्हणावी लागेल कथा..
20 Apr 2020 - 10:34 pm | पलाश
+१
अर्थतज्ञ हे शीर्षक शेवटच्या वाक्यात हलकासा धक्का देऊन सिद्ध करणारी ही शशक थोड्या वेळानंतर उलगडली. मस्त आहे.
21 Apr 2020 - 7:26 pm | शा वि कु
.
22 Apr 2020 - 12:27 pm | कुमार१
+ १
23 Apr 2020 - 7:34 pm | संजय क्षीरसागर
असं मोदीश्रीनी सांगितलंय. कोरोनाबाधिताला नोकरीतून काढल्यावर त्यानी डायरेक्ट मोदींना कळवायला हवं.
23 Apr 2020 - 9:25 pm | स्मिताके
+१