सहवास
" उठ लवकर किती वाजलेत बघा जरा"
" हो बाई, वाजलाय अलार्म तुमच्या रेकॉर्डेड गाण्याचाच "
" चटकन आवरून ब्रेकफास्ट करून घे "
" दडपे पोहे, नाश्त्याला ? स्वतःची आवड मारा आमच्या माथी ! फक्कड जमलेत हो ! "
" बाल्कनीतल्या झाडांना पाणी घालायचं विसरू नको "
" जास्वंद काय बहरलाय गं ! "
" कधीतरी हात जोडत जा रे देवासमोर "
" गणेशराव, हे घ्या तुमचं आवडतं फुल "
"आटपलं का साहेब, चल उशीर होतोय "
" ये पार्किंग मध्ये गाडी काढतोय "
" पॉडकास्ट नको लावूस रे सकाळी, एफएम चालू कर "
" हायला स्वदेसचं "पल पल है भारी", आपला पहिला पिक्चर ना, आणि अगं एक सांगायचं राहिलं ”
-------
" काल जोशी कुणाला सांगत होता, कसा जगतोय हा ? फार वाईट झालं ह्याची बायको फारच अकाली गेली "
body {
background: url(https://i.postimg.cc/NM70Z4Dn/147450-abstract-purple-and-white-blur-ligh...);
background-size: 1900px;
}
प्रतिक्रिया
24 Apr 2020 - 4:05 pm | गणेशा
सुरुवात पासुन स्वदेश च्या गाण्या पर्यंत एकदम मस्त लिहिले आहे.. आवडले.
शेवटाची लाईन धक्का द्यायचा या कारणाने उगाच मध्ये आली आसे असे वाटते.. (माझा द्रुष्टिकोण चुकीचा असु शकतो) पण मला शेवटच्या लाईनचा आणि वरचा काही संबंध लावताच येइना.. वरचे सगळॅ मनातलेच होते की आठवणीतले ?
असो तरी पहिल्या सर्व ओळींसाठी +१ कारण त्या उत्तम वातावरण निर्माण करत आहेत.. मस्त एकदम.
+१
24 Apr 2020 - 11:21 pm | ज्योति अळवणी
आवडली शशक
25 Apr 2020 - 8:26 am | केंट
+१
26 Apr 2020 - 6:59 pm | तेजस आठवले
+१
28 Apr 2020 - 10:01 am | टर्मीनेटर
+१
29 Apr 2020 - 5:42 am | सुमो
+1